(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • जुळ्यांना वाढवताना – नवीन लेख मालिका

    … अशा एक ना अनेक प्रश्नांना आम्ही जुळ्यांचे आईवडील सामोरे जात असतो. ओह! तुमचेही हेच प्रश्न आहेत का? तर मग तुमच्या सगळ्या प्रश्नांना उत्तरं घेऊन येत आहोत आम्ही.. या नव्या मालिकेत.. ‘जुळ्यांना वाढवताना..’

      December 23, 2021


  • कापसापासून सुतापर्यंत

    अन्न वस्त्र आणि निवारा, या मानवाच्या मूलभूत गरजांपैकी अन्न सर्व सजीवांना जीवन जगण्यासाठी लागते आणि इतर सजीव प्राणी आपल्या अन्नाची सोय करतातच, शिवाय स्वतःला निवाराही शोधतात. पण वस्त्र अथवा कपडा हे मानवीपणाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य आहे.

      November 10, 2023


  • कोरोनाला हरवू, आपणच जिंकू..!

    वाढत्या कोरोना प्रादुर्भावाचा विचार करता कधी आपल्या दाराजवळ येईल काय सांगता येत नाही.संचारबंदी लॉकडाऊन ही एक सर्व कुटुंब एकमेकांसोबत मिळून मिसळून राहण्यासाठी सुवर्णसंधी समजा आणि घरातच थांबून बाहेर विनाकारण न फिरता कुटुंबासमावेत वेळ घालवा.कोरोनाला हारावण्यासाठी आपण प्रत्येकाने सर्वतोपरी काळजी घ्या.लवकरच आपण या कोरोनाला हरवू ही लढाई आपण जिंकून पुन्हा एकमेकांना नक्की भेटूया.

      April 21, 2020


  • वेदसार शिवस्तोत्रम् – १०

    भगवान श्रीशंकरांच्या वैभवाचे कथन करताना जगद्गुरु शंकराचार्य स्वामी महाराज म्हणतात….

      August 23, 2020


  • कांगारूंचे गर्वहरण

    सेंट ल्युसियाच्या डॅरेन सामी मैदानावर झालेल्या सुपर ऐट सामन्यात टीम इंडियाने कांगारूंना लोळवत २०२३ विश्वचषकातला हिशोब चुकता केला आहे. प्रचंड दडपण आणि ह्रदयाची धडधड वाढवणार्या या लढतीत भारतीय गोलंदाजांनी प्रयत्नाची शिकस्त करत बलदंड अॅासी फलंदाजीला नमवले आहे.

      June 25, 2024


  • जगण्याची साधी सोप्पी तत्वे-भाग एकोणचाळीस

    आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-क्रमांक नऊ

    कामासाठी दिवस, विश्रांतीसाठी रात्र-भाग चार

    कमळ दिवसा उमलते, सायंकाळी मावळते.

    समांतर पर्णविन्यास असलेल्या गुलमोहोर, चिंच, लाजरी इ. वनस्पतींची पानेदेखील दिवसा उघडतात आणि सायंकाळनंतर बंद होतात.

    वनस्पतीमधील फोटो सिंथेसिस ही अन्न निर्मितीची प्रक्रिया या सूर्यावरच अवलंबून असते, हे पण आपण शाळेत शिकलोय.

    पक्ष्यांचा चिवचिवाट, कोंबड्यांचे आरवणे, कावळ्यांची कावकाव सूर्योदयानंतर सुरू होते.

    ब्राह्म मुहूर्तावर उठून आपले आह्निक आवरून दिवसाच्या कामकाजासाठी सज्ज व्हावे, असे आयुर्वेदातही लिहिले आहे.

    सर्व शुभकार्ये दिवसाचीच होतात. दिवसा सकारात्मक उर्जा कार्यशील असते. रात्री नसते. सत्वगुण दिवसाचा असतो तर रात्र ही तमोगुणी असते.

    उगवत्या सूर्याचे दर्शन घ्यावे. म्हणजे सकारात्मक उर्जा मिळते, तर सूर्य अस्ताला जाताना त्याला पाहू नये, नकारात्मक शक्ती वाढते, हे पण भारतीय दर्शनशास्त्रामधे लिहिले आहे.

    आरोग्यम् भास्कराद इच्छेत, म्हणजे आरोग्य हे सूर्यावर अवलंबून आहे. आरोग्याचा स्वामी सूर्य आहे. चांगल्या आरोग्यासाठी सूर्यापासून आपल्याला उर्जा मिळत असते.

    सर्व आहारीय पदार्थ गोळा करण्याचा कालावधी पण सूर्योदयाला सुरू होतो, त्याचप्रमाणे औषधी संग्रह करायला सुद्धा दिवसच सांगितलेला आहे.

    हे सर्व नियम निसर्गाने ठरवलेले आहेत. माणूस हा पण त्याच निसर्गातील एक घटक आहे. त्यामुळे या निसर्ग नियमांना आपणही बांधील आहोत, हे कदापि विसरून चालणार नाही.

    यावरून पुनः पुनः हेच सिद्ध होते, की दिवस हा कामे करण्यासाठी तर रात्र ही विश्रांती घेण्यासाठी आहे. त्यात ढवळाढवळ करू नये.

    हे नियत काम नियत वेळी करणे हेच आरोग्य, हे नियम पाळणाऱ्या सर्वांना नियत आयु मिळते. हे पण आपण व्यवहारात पहातो.

    पर्णाळी पाहोन उचले ........
    .....आणि पुरूष भ्रमिले

    याला काय म्हणावे, असे समर्थ देखील विचारत आहेत. पानावरून चालणारी अळी पुढे पाय टाकताना, पुढे आधार आहे का, हे चाचपून बघते आणि मगच पाय पुढे टाकते, म्हणून पानावरून ती खाली पडत नाही, एवढा सावधपणा एवढ्याश्या अळीमधे सुद्धा आहे, आणि मनुष्यप्राणी (दासबोधामधे देखील 'पुरूष' हा शब्द लिंगवाचक नसून, स्त्री आणि पुरूष या दोघांनाही एकत्रित म्हणून वापरला आहे. गैरसमज नसावा. ) मात्र आपल्या सुरक्षेसाठी जे जे उपाय सांगितले आहेत ते सर्व नियम पुरूष आपणहून मोडतो, आणि नंतर दैवाला दोष देत बसतो.

    अखंड सावधान असावे, दुश्चित्त कदापि नसावे.

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    19.05.2017

      May 19, 2017


  • गजाननासी वंदन करुनी

    मराठी रंगभूमीवरील नाटककार, अभिनेते आणि दिग्दर्शक म्हणून दिवंगत बाळ कोल्हटकर यांचे नाव सर्वांना परिचित आहे. त्यांच्या ‘वाहतो ही दुर्वांची जुडी’, ‘दुरितांचे तिमीर जावो’, ‘देव दीनाघरी धावला’ या नाटकांनी मराठी रंगभूमीवर आपला स्वतंत्र ठसा उमटवला. हे गाणे स्वतः कोल्हटकर यांनीच लिहिले असून त्याचे संगीतही त्यांचेच आहे. पुढे त्याची कॅसेट निघाली आणि त्यात हे गाणे प्रख्यात गायक सुरेश वाडकर यांनी गायले.

      July 8, 2025


  • काळ्या पैशांचा उगम, नोटबंदी आणि सद्यपरिस्थिती

    नोटबंदीसारखा धाडसी निर्णय घेतल्याबद्दल मोदी सरकारचं मनापासून अभिनंदन करणं गरजेचंच आहे. काळा पैसा, आतंकवाद, नकली चलन या सर्व रोगांचा एका फटक्यात नायनाट करण्याचं काम सरकारच्या या एका निर्णयानं केलं आहे.

      November 21, 2016


  • आपलं रसायनशास्त्र

    लोकसत्ता’मध्ये मराठी विज्ञान परिषदेतर्फे गेली अनेक वर्षे सदर चालवलं जातंय! विज्ञानाच्या अनेकविध अंगांविषयी सामान्य माणसाच्या मनात अनेक कुतूहलं निर्माण होत असतात. या सदरातून ही कुतूहलं शमवण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. त्या निमित्ताने दैनंदिन जीवनातील अनेक वैज्ञानिक विषय हाताळले गेले आहेत.

      February 9, 2023


  • अगत्य

    आमच्या कडे स्वयंपाक करणाऱ्या छाया ताईंच्या धाकट्या बहिणीच्या लग्नाला परवा गेले होते. खूप वर्षांनी त्यांच्या घरात शुभ कार्य होणार होतं याचा एकूण आनंद सगळ्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता.

      June 4, 2022