(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • श्री. गंगावतरण

    श्री गंगामाई तूं माते । पावन करिसी सर्वाते ।।
    धुवूनी काढसी पापाते । तुझ्या स्पर्शाने ।। १।।

    जया होई गंगास्नान । जाईल तो उध्दरुन ।
    गंगादेवी पतीत पावन । किर्ति असे तुझी ।।२।।

    कहानी ऐका गंगेची । पृथ्वीवरी अवतरण्याची ।।
    पराकाष्ठा केली प्रयत्नाची । भगीरथाने ।।३।।

    समुद्राचे झाले मंथन । अमृत निघाले त्यांतून ।।
    विष्णु कुंभ हाती घेऊन ब्रम्हास दिले ।।४।।

    जेव्हां राक्षस मातले । कुंभ घेण्या येवूं लागले ।।
    ब्रह्मास कठिण वाटले । त्या क्षणी ।।५।।

    विष्णूंनी केला उपदेश । पार्वती बहिण गंगेस ।।
    आणूनी तिजला स्वर्गास । अमृत शिंपावे ।।६।।

    गंगा होईल आमृतमय । कुंभाची मग भिती न रहाय ।।
    पावन करित ती जाय । स्वर्गातील सर्वाते ।।७।।

    आमृतमय गंगा झाली । स्वग्रातुन वाहु लागली ।
    सर्व देवता संतुष्ट झाली । तिच्या आगमनाने ।।८।।

    सुर्यवंशी राजा भगिरथ । करु लागला तप अविरत ।
    सामर्थ्य चालले वाढत । तयाचे ।।९।।

    तपाची शक्ती महान । तयापुढे नमती सर्वजण ।।
    परमेश्वरही देती मान । तपवस्वी पुढे ।।१०।।

    तपाच्या लहरी ऊठती । स्वर्गात त्या जाऊं लागती ।।
    गंगेच्या चरणीं आदळती । एका मागुनी एक ।।११।।

    तप शक्तीच्या लहरी । गंगेस बैचैन करी ।।
    धावत गेली श्री हरी । तयासी पुसण्या ।।१२।।

    भगीरथाचे तप कठिण । शक्ती त्याची होत महान ।।
    सर्वासाठी ते आव्हान । इच्छा सत्वरी पूरवावी ।।१३।।

    प्रसन्न झाली गंगादेवी । भगीरथासी दर्शन देई ।।
    तुजवर मी प्रसन्न होई । माग वर म्हणाली ।।१४।।

    हे माझें गंगाआई । पृथ्वीवरी तूं येई ।।
    पातकासी दिलासा देई । ह्या भूमीवर ।।१५।।

    भगीरथाची पाहता भक्ती । येण्यासाठी मान्य करिती ।।
    सोडून देई स्वर्गाती । पृथ्वीवरी येण्या ।।१६।।

    नारद आले स्वर्गातूनी । भगीरथा आशीर्वाद देऊनी ।।
    गंगेस रोकती तत्क्षणी । पृथ्वीवरी उडी घेण्या ।।१७।।

    हास्य वदन करुनी । दोघांना सागंती समजावूनी ।।
    परिणाम उडी घेण्यानी । गंगामाईच्या ।।१८।।

    प्रंचड प्रवाह गंगेला । सहन न होई पृथ्वीला ।।
    दुभंगुनी जाई पाताळाला । महान शक्ती मुळें ।।१९।।

    उपाय एक तयावरी । जर शिव झेलील शिरावरी ।।
    नंतर उतरसी पृथ्वीवरी । भार हलका होईल ।।२०।।

    प्रसन्न करावे शिवासी । वर मागावा त्यासी ।।
    मदत करावी गंगेसी । पृथ्वीवरी येण्याते ।।२१।।

    भगीरथ प्रयत्न महान । तपश्चर्या केली कठिण ।।
    शिवासी केले प्रसन्न । वर मागुनी घेती ।।२२।।

    गंगेची महान शक्ती । पृथ्वी माते न पेलती ।।
    घ्यावे तू शिरावरती । उडी घेत समयी।।२३।।

    गंगेने उडी घेतली । गंगेने शिरावर झेली ।।
    गंगा जटेत सामावली । शिवशक्ति मुळें ।।२४।।

    उतरुन प्रथम शिव जटेंत । प्रवाह केला खंडित ।।
    नंतर पृथ्वीवरी उतरुनी । वाहु लागली गंगा ।।२५।।

    एक द्रूश्य आगळे । गंगेने पृथ्वी प्रदाप्रिले ।।
    जमुनी देव सगळे । सोहळा बघती ।।२६।।

    स्वर्गातील अमृत । गंगेच्या रुपात ।।
    पृथ्वी वरुन वहात । जावू लागले ।।२७।।

    पृथ्वीवरील पातक धुतले । तिला पावन केले ।।
    पाप नाशिननी संबोधिले । गंगामाईसी ।।२८।।

    डॉ.भगवान नागापूरकर
    १०- ३०१०८३

    ( दशहरा म्हणजे दहापापे हरण करणारी. हे गंगानदीचे नांव आहे. ज्येष्ठ शुद्ध प्रतिपदेपासून ज्येष्ठ शुद्ध दशमी पर्यंत गंगेचे पूजन, अर्चन, गंगास्तूति वाचन, गंगा स्तोत्र पठण, गंगा स्नान, जलपान, गंगावतरणाच्या इतिहासाचे वाचन या पैकी शक्य असेल ते करुन दशहरा उत्सव साजरा करावा )

      January 10, 2018


  • ध्वनीप्रदूषण प्रतिबंधक उपाययोजना

    आवाजाच्या प्रदूषणाचे दुष्परिणाम वेळीच ओळखून त्यावर उपाय योजल्यास शारीरिक परिणामांचे धोके टाळता येतात. ध्वनी निर्माण करणाऱ्या यंत्रांवर कंपने रोखणे, निर्माण होणाऱ्या ध्वनीचे शोषण करणारे उपाय योजावेत. ध्वनीनिर्मिती कमी असणारी यंत्रणाच खरेदी करावी.

      May 20, 2023


  • नैवेद्य भाग ५

    अकाल मृत्युहरणम
    सर्वव्याधिविनाशनम,
    विष्णु पादोदकं तीर्थं
    जठरे धारयाम्यहम् ।।

    तीर्थ ग्रहण करताना हा मंत्र म्हणतात. मंत्र म्हटलेलं पाणी आणि साधं पाणी यांचं केमिकल अॅनालेसिस कदाचित एकच येईल. पण आपण या एचटुओ मधे श्रद्धा निर्माण केली की, पाण्याचंच तीर्थ बनतं.
    त्यासाठी आपला विचार भारतीय हवा. देवावर श्रद्धा हवी आणि मुख्य म्हणजे स्वतःवर विश्वास हवा.

    तसेच
    अच्युतानंद गोविंद
    नामोच्चरण भेषजात ।
    नश्यन्ति सकला रोगाः
    सत्यम् सत्यम् वदाम्यहम् ।।

    हा श्लोकदेखील म्हणतात.
    अन्न असो वा औषध, देवाचं नाव घ्यावं आणि निश्चिंत व्हावं.
    मी परत परत खात्रीनं सांगतोय, असं श्लोककर्ता वारंवार बजावून सांगतोय, पण नाही पटत.

    औषधं सर्व रोगानाम्
    श्रद्धया हरिसेवनम असं वाग्भटाचार्यदेखील म्हणतात.

    काही गोष्टींची कारणमिमांसा केली तरी बुद्धीच्या स्तरावर उत्तरे मिळत नाहीत. अनेक औषधे तयार करत असताना काही विशिष्ट श्लोक, स्तोत्र, मंत्र म्हणावेत, म्हणजे औषधाची कार्यकारी क्षमता वाढते.
    याला अनुभवाशिवाय दुसरा वैज्ञानिक पुरावा काय देता येणार.

    मी घेत असलेले अन्न किंवा औषध हे ईश्वरीय इच्छेने घेत आहे, माझे कर्तृत्व शून्य आहे. अशी मनाला सम किंवा शून्य स्थितीत आणून ठेवणारी अवस्था निर्माण करून जेव्हा अन्न वा औषध सेवन केले गेले तर त्याचे परिणाम सकारात्मक दिसतात, असे आजचे मानसोपचार तज्ज्ञ देखील म्हणतात.

    हे केवळ भारतीय लोकच म्हणतात, असंही नाही, होमीयोपॅथीमधे पण आय ट्रीट, ही क्युयर्स असंच म्हणतात ना !
    अगा म्या नाही केले असे माऊलींचे शब्द आहेत. असो.

    अन्न सेवन करत असतानाची भावना महत्वाची असते. म्हणून अन्नसेवन करण्यापूर्वी देवाला नैवेद्य दाखवावा.
    यात आणखी एक भाव असतो, तुझेच तुजला अर्पण !
    तूच तुझ्या शक्तीने तयार केलेले, तुझे अन्न मी तुला अर्पण करतो.

    ज्यांचा देवावर विश्वास नाही, देवाला आम्हीच बनवले आहे, आम्हीच निवृत्त केले आहे, अश्या विचारसरणीच्या मंडळींनी देखील त्या अज्ञात शक्तीला शरण जावे, आपण घास घेण्यापूर्वी हा विचार जरूर मनात निर्माण करावा.

    आता नैवेद्यातील कर्मकांड.
    वाढलेल्या पानाभोवती पाणी हातात घेऊन, ताटाभोवती डावीकडून ऊजवीकडे गोलाकार फिरवावे. आणि ताटातील चार सहा शीते बाहेर काढून ठेवावीत. पाण्याची ही गोलाकार रेषा ही ताटात येणाऱ्या सूक्ष्म जीवांसाठी जणुकाही लक्ष्मणरेषा तयार झाली. आता बाहेरील जीव ताटात येणार नाहीत, पण त्यांना सुद्धा आपल्यातील अन्नाचा भाग मिळावा, पाण्याच्या काढलेल्या रेषेवरून, अन्न शोधत येणार्‍या जंतुना पटकन अन्न मिळावे. म्हणून चित्राहुती.
    असंही असू शकेल.

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग
    9673938021.
    11.09.2016

      September 11, 2016


  • बाईपण भारी देवा…एक अप्रतिम चित्रपट…

    बाईपण भारी देवा हा एक अप्रतिम चित्रपट आहे. या चित्रपटात ( मंगळागौर  ) या नृत्याला  मध्यभागी ठेवून चित्रपटाची कथा उत्तम गुंफलेली आहे. मनोरंजन करता करता या चित्रपटातून स्त्रियांच्या अनेक समस्या मांडण्याचा उत्तम प्रयत्न केला गेला आहे.

      July 26, 2023


  • स्त्री यंत्र नाही हो

    स्त्री यंत्र नाही हो , ती ही माणुस आहे .
    तीला ही मन आहे ,ह्रदय आहे.
    तीला ही भावना आहेत .
    ती ला ही हसावेसे वाटते .
    चारचौघांमध्ये मिसळावेसे वाटते .
    आपल्या विचारांना प्रकट करावेसे वाटते .
    काम करून ती ही थकते .
    ती ला ही आरामाची गरज असते .

    असे म्हणतात की या जगात कोणीही परिपुर्ण नाही ,मग एका स्त्री कडून ती परिपुर्ण होण्याची अपेक्षा का केली जाते .
    प्रत्येक वेळी तीच्या चुकांचा उहापोह का केला जातो ?

    का वारंवार केलेल्या चुकांच्या उहापोहामुळे तीच्यात न्युनगंड तर निर्माण होत नाही ना?
    कधी आळशी तर अकार्यक्षमतेची लेबल्स चढविली जातात .
    केवळ पोटाला जेवण ,अंगाला कपडा व चैनीला वस्तु एवढ्याच तीच्या गरजा असतात का?

    नाही , खरी गरज असते ती भावनिक आधाराची ,तीला समजुन घेणार्या आपल्या माणसाची ,तीला गरज असते प्रेमाची ,मायेची .
    तुमचा एक कौतुकाचा शब्द तीला दहा हत्तींचे बळ देऊन जाते .
    "तु थकली असशील ,थोडा आराम कर "हे प्रेमळ शब्द तीला नवीन उत्साह देऊन जातात .
    तीला ही तीच्या आवडी निवडी असतात .
    तीला ही मित्र मैत्रिणी असताच ,त्याच्यात बसावं गप्पा गोष्टी कराव्यात असही तीला वाटते .
    कधी कधी स्वतःसाठी एक क्षण जगण्याची तीचीही इच्छा असते
    तीलाही कधी कधी एकांतात बसावेसे वाटते .
    भुतकाळातील आठवणींना उजाळा द्यावासा वाटतो .
    तीच्या आवडत्या व्यक्तीशी खुप गप्पा माराव्याशा वाटतात .
    पण म्हणुन काय ती स्वैराचारी होते ?का ती माणुस नाही ?
    तीला भावभावना नाहीत ?
    का तीच्या गरजा इतरांपैक्षा वेगळ्या असतात ?
    मित्रांनो !

    तीला समजुन घ्या ,तीचे दुःख समजुन घ्या .
    तीच्याशी मनमोकळे पणाने बोला ,कारण हे आयुष्य खुप लहान आहे .
    व गेलेला व्यक्ती पुन्हा कधीच परत येत नाही .आणि मागे उरतात त्या फक्त आठवणी व डोळ्यात पश्चातापाचे पाणी !!!!


    -- संकलन : अशोक साने
    फेसबुक, WhatsApp यासारख्या माध्यमातून दररोज येणारे चांगले लेख तुमच्यासाठी शेअर करतो.. लेखकाचे नाव माहित नाही.

      June 13, 2017


  • भीती

    भीती ही एक भावना आहे. ती प्रत्येक जीवांमध्ये असते. व्यक्तिनुसार ती कमी जास्त असते. भीतीची कारणे वेगळी असू शकतात परंतु भीतीचा भाव प्रत्येकाच्या मनात कायम घर करुन असतो.

      January 25, 2024


  • पक्षाघात (Paralysis)

    शरीरातील एक किंवा अधिक स्नायू कार्य करीत नसतील तर अशा स्थितीला पक्षाघात म्हणतात. चेतासंस्थेला विशेषकरून व मेरुरज्जूला इजा झाल्यास पक्षाघात होतो. पक्षाघातामुळे स्नायू लुळे व दुबळे होतात. अशा स्थितीत जर संवेदी चेतांनाही धक्का पोहोचला तर बाधित भागातील संवेदनाही नाहीशा होतात.

    पक्षाघात पक्षाघाताच्या इतर कारणांमध्ये मेंदूला होणारा रक्तपुरवठा अचानक थांबणे (स्ट्रोक), डोक्याला किंवा पाठीला मार बसून चेतांना किंवा मेरुरज्जूला इजा पोहोचणे, पोलो, बोटुलिन या जीवविषाचा परिणाम, चेतातंतू आवरणदाह इत्यादींचा समावेश होतो. चेतापेशींना ऑक्सिजन आणि ग्लुकोजचा नियमित पुरवठा होणे आवश्यक असते. काही कारणाने उदा., मेंदूला रक्तपुरवठा करणाऱ्या धमनीतील गाठ अवरोधामुळे रक्तपुरवठा थांबला तर चेतापेशींचे कार्य थांबते. अशा चेतापेशी ज्या अवयवाचे किंवा स्नायूंचे नियंत्रण करतात, त्या अवयवांच्या हालचालींवर परिणाम होतो आणि पक्षाघात होतो. काही वेळा अचानक रक्तदाब वाढल्यास मेंदूमधील धमनी फुटून मेंदूमध्ये अंतर्गत रक्तस्राव होतो. या रक्तस्रावामुळे चेतापेशींवरील दाब वाढून पक्षाघात होतो. मस्तिष्कस्तंभामध्ये (मज्जारज्जू आणि मेंदू यांना जोडणाऱ्या भागामध्ये) रक्तस्राव झाल्यास पक्षाघाताबरोबर मृत्यूही ओढवतो.

    पक्षाघात एखाद्या विशिष्ट भागापुरता (स्थानिक) किंवा सार्वदेहिक असू शकतो. शरीराच्या ज्या भागावर परिणाम घडतो त्यानुसार पक्षाघाताचे वर्णन करता येते. उदा., एका बाजूचा हात आणि त्याच बाजूचा पाय लुळा पडणे (अर्धपक्षाघात), कमरेखालील भाग व दोन्ही पाय लुळे पडणे (अधरपक्षाघात), दोन्ही हात व पाय लुळे पडणे (चतुरांगघात).

    पक्षाघाताचे सामान्यपणे सौम्य आणि तीव्र असे दोन प्रकार करता येतात. सौम्य पक्षाघात बहुतेक वेळा रेम झोपेच्या कालखंडामध्ये होतो (पहा: झोप). अंथरुणातून उठताना चालणे, बोलणे किंवा डोळे न उघडता येणे, चेहरा निश्चल होणे, डाव्या किंवा उजव्या बाजूच्या चेहऱ्यावरील सुरकुत्या नाहीशा होणे, ओठ खाली पडणे, हातातून वस्तू खाली पडणे, चप्पल घातल्यानंतर ती नकळत पायातून निसटणे ही सौम्य पक्षाघाताची लक्षणे आहेत. अशी लक्षणे दिसून आल्यास त्वरित वैद्यकीय मदत घ्यावी. वेळीच उपचार झाल्यास सौम्य पक्षाघात बरा होतो.

    अतिधूम्रपानामुळे मेंदूमध्ये रक्तस्राव होण्याची शक्यता वाढते. तसेच रक्तदाबाची औषधे नियमित न घेतल्यास किंवा उच्च रक्तदाब नियंत्रणाखाली न ठेवल्यास मेंदूमध्ये रक्तस्राव होण्याची शक्यता वाढते. मेंदूमध्ये रक्तस्रावाचे निदान चुंबकीय अनुस्पंद प्रतिमा (एमआरआय) तंत्राने करता येते. निदानानंतर लागलीच शस्त्रक्रिया करून मेंदूमधील रक्ताची गुठळी काढली तरी मेंदूच्या ज्या भागात गुठळी झाली होती तो भाग पूर्ववत कार्यरत होणे कठीण असते. शरीराचा डावा किंवा उजवा भाग पक्षाघाताने लुळा पडल्यास संवेदी चेतापेशींच्या कार्यामध्ये फारसा अडथळा येत नाही. भौतिक चिकित्सा उपचारांनी काही प्रमाणात अशा अवयवांची हालचाल पुन्हा होऊ शकते. घसा आणि ग्रसनी यांचे नियंत्रण करणाऱ्या मेंदूच्या भागाला पक्षाघात झाल्यास बोलणे आणि गिळणे या क्रियांवर परिणाम होतो.
    मेंदूमध्ये वाढलेली गाठ लगतच्या निरोगी पेशीवरील दाब वाढवते. त्यामुळे निरोगी पेशी निकामी होतात आणि पेशीनियमन करणाऱ्या भागाचा पक्षाघात होतो. पोलिओसारख्या विकारामध्ये चेतांच्या संदेशवहन क्षमतेमध्ये बिघाड होऊन स्नायू दुर्बल होतात. हा सुद्धा पक्षाघाताचा प्रकार आहे. पक्षाघात झाल्यानंतर त्वरित उपचार केल्यास काही प्रमाणात सुधारणा होण्याची शक्यता वाढते. ज्या चेतापेशी मृत होतात त्यांच्याजवळील चेतापेशींच्या वृक्षिका मृत चेतापेशींची जागा घेऊन अवयवांचे नियंत्रण करतात. मर्यादित प्रमाणात अवयवांची हालचाल, बोटांची हालचाल किंवा हातापायांचा उपयोग करता आल्यास पक्षाघात झालेल्या रुग्णाचे जीवन परावलंबी होत नाही.

    प्राणिमात्रांमधील पक्षाघात काही प्राण्यांच्या जाती भक्ष्य पकडण्यासाठी त्या भक्ष्यामध्ये परिणाम घडून येईल अशा जीवविषाचा वापर करतात. काही प्राणी अशा तंत्राचा वापर शिकारी प्राण्यापासून सुटका करून घेण्यासाठीही करतात. गांधीलमाशीच्या काही जाती प्रजनन चक्र पूर्ण करताना तिची मादी नाकतोडयासारख्या भक्ष्याला दंश करून पक्षाघात घडवून आणते आणि त्याला घरट्यात आणून ठेवते. त्यानंतर ती या नाकतोडयाच्या शरीरात अंडी घालते. अंडयातून बाहेर पडलेले डिंभ त्या नाकतोडयावर जगतात.

    जपानमध्ये आढळणारे फुगू हे विषारी मासे आहेत. या माशांमध्ये टेट्रोडोटॉक्सिन हे चेतासंस्थेवर परिणाम करणारे जीवविष असते. हे मासे ज्यांना दंश करतात त्यांच्या चेतापेशींमधील सोडियम आयनांच्या कार्यात बिघाड निर्माण करतात.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.मराठी विश्वकोश

      October 22, 2016


  • मुबलकापासून (abundance) असंग्रहाकडे (minimalistic) धाव !

    आवश्यक असेल तेवढेच जतन करायचे आणि हातातील अनावश्यक साठ्याचा त्याग करायचा. गरजा किमान करीत स्वतःला शक्य तितके छाटत जायचे. तरीही मस्त जगता येते,याची पूर्वी घेतलेली अनुभूती पुन्हा घ्यायची.

      January 14, 2023


  • जांभई येणे

    दररोजच्या जीवनात आपण 'जांभई' देतांना इतरांना पाहतो. तसेच 'जांभई'चा अनुभव आपण स्वत:ही घेतलेला आहेच म्हणा. 'जांभई' येणे ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. झोपी जाण्यापूर्वी अथवा झोपेतून उठल्या- उठल्या आपण तोंड व शरीर वेडेवाकडे करून जांभई देतो. एखाद्या वेळी अधिक थकतो. तेव्हा आपल्या शरीरातील प्राणवायूचे प्रमाण कमी होते. तेव्हा या प्राणवायूची कमी ही 'जांभई' भरून काढत असते, असे मानले जाते. तर जांभई' ही आपला मेंदू थंड ठेवण्यासाठी येते, असा दावा बरमिंघटन विद्यापीठातील अभ्यासकांनी केलाय. 'जांभई' का येते? याचे मागील कारण शोधून काढण्यासाठी अभ्यासकांनी पोपटांवर परीक्षण केले होते. त्यांनी परिक्षणासाठी अतिशय उष्ण, कमी उष्ण व सामान्य वातावरण, अशा स्थळांची निवड करून प्रत्येक वातावरणात पोपटांना काही तास ठेवले. कमी व सामान्य वातावरणातील पोपटांना जांभई आली नाही. मा‍त्र उष्ण वातावरणातील पोपटांना वारंवार जांभई येत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांच्या म्हणण्यानुसार आपण जेव्हा सामान्य तापमानात असतो तेव्हा आपल्या मेंदू शांत राहतो. त्यामुळे आपल्याला जांभई येत नाही. त्याचप्रमाणे थंड वातावरणातही आपल्याला जांभई येत नाही.मात्र उष्ण वातावरणमध्ये आपला मेंदू तापत असल्याने आपल्याला जांभई येते. झोप येण्याआधी व झोपेतून उठल्या- उठल्या मेंदूला योग्य तापमानात आणण्यासाठी आपल्या जांभई येत असते.

    जांभईच्या शास्त्रीय अभ्यासासाठी शास्त्रज्ञांनी शंभराहून अधिक ज्येष्ठांचे निरीक्षण केले. कुटुंबातील सदस्यांमध्ये जांभई ही तुलनेने मित्र किंवा इतर घटकांपेक्षा अधिक संसर्गजन्य असल्याचे यातून दिसून आले. नातेवाइकांत हे प्रमाण दहामध्ये आठ, तर अनोळखींमध्ये ते दहात केवळ एक असल्याचे आढळून आले. दुसरीकडे जांभई देण्यास उशीर झाला तर ती अधिक लांबण्याची शक्यता असते. हे परिचित व अपरिचित दोन्ही व्यक्तींबाबत घडू शकते. या प्रकल्पात जगातील विविध देशांतील लोकांचा अभ्यास करण्यात आला. त्यातून जांभईवर परिणाम करणारी काही तथ्ये गोळा करण्यात आली. यात राष्ट्रीयत्व, त्वचेचा रंग, भिन्न सांस्कृतिक सवई, सहभागी व्यक्तीचे वय, लिंग. याशिवाय दोन व्यक्तींमधील नातेसंबंध हे ते घटक असल्याचे संशोधन प्रकल्पाच्या प्रोफेसर एलिझाबेटा पालागी यांनी म्हटले आहे. मुलांमध्ये जांभईची ही संसर्गजन्य प्रक्रिया पहिल्या पाच वर्षांपर्यंत विकसित होत नाही. त्यामागे भावना हे कारण सांगण्यात आले आहे. इतरांच्या भावना नीटपणे समजून घेण्याची क्षमता त्यांच्यात निर्माण झालेली नसते. त्यामुळे मुले या नियमाला अपवाद ठरली असल्याचे संशोधनातून स्पष्ट झाले आहे. परिचित व्यक्तीच्या सहवासात जांभई येते. त्याचबरोबर अनोळखी व्यक्तीला जांभई देतानादेखील जांभई येण्याची वृत्ती होते किंवा त्याला टाळण्यात येते. या शास्त्रज्ञ सामाजिक सहानुभूतीची संकल्पना देतात. ही बाबदेखील संशोधनातून आढळून आली आहे. 480 जांभई स्पर्धेतून अभ्यास करण्यात आला. हा संशोधन प्रकल्प एक वर्ष चालला. त्यात 109 ज्येष्ठांना सहभागी करून घेण्यात आले होते. 04 वर्षांपर्यंत मुलांमध्ये मोठ्या माणसांसारखा हा संसर्ग आढळून येत नाही.

    संजीव वेलणकर पुणे.
    संदर्भ :- marathi.webdunia.com

      January 19, 2017


  • आश्रम आणि मंदिर

    आश्रम कशाला म्हणावे आणि मंदिर कशाला म्हणावे? हयाबददलचे विवेचन

      November 21, 2010