वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
झोप हा फार गहन विषय आहे. झोपेसंबंधीच्या फक्त येथे आवश्यक असलेल्या संकल्पनांचा उल्लेख केला आहे.
July 25, 2021
एकूणच इथला भारतीय समाज, हा गतानुगतिकतेत अडकलेला आहे. प्रचंड अंधानुकरण आणि “बाबा वाक्यं प्रमाणम!!: हे इथल्या जीवनाचे प्रमुख सूत्र मांडता येईल. ज्या प्रमाणे मुली नको तितक्या पुढारलेल्या आहेत, त्याच प्रमाणे मुले देखील, अमेरिकन संस्कृतीचे तसेच अनुकरण करीत आहेत, न्यूयॉर्क मधली fashion हा इथल्या जीवनाचा मूलमंत्र आहे. केसांचे वळण(जीवनाला कसलेच “वळण” नाही!!), कपडे त्याच प्रमाणे घालायचे इत्यादी.
August 25, 2018
कबीर साहेबांनी भक्तीसाठी ज्या चार रामाचे मार्गदर्शन केले ते सर्व आध्यात्मिक मार्गावर चालणाऱ्या साधकासाठी पथदर्शकाचे काम करणार आहेत. राम शब्दाला प्रतीकरूप मानून त्यांनी भक्ती करणाऱ्या सर्व साधकांना स्पष्ट इशारा (चेतावणी) दिला आहे की तुम्ही कोणत्या रामाची भक्ती करण्यात मग्न झाले आहात.
July 31, 2023
भगवान श्री विष्णूंच्या वरच्या दोन हातात शंख आणि चक्र विराजमान असतात. स्वाभाविक सर्वप्रथम शंखाचे वर्णन केल्यानंतर वंदनाचा दुसरा मान आहे सुदर्शन चक्राचा. भगवान वैकुंठनाथांच्या त्या लोकविलक्षण अयुधाचे वर्णन करताना आचार्य श्री म्हणतात,
December 5, 2020
“साहेब हा आमच्या पक्ष कार्यालयाच्या आत बाहेर संशयास्पदरित्या फिरताना आढळला म्हणून तुमच्याकडे आणलाय याला.” दोन कार्यकर्ते एका भेदरलेल्या व्यक्तीला पोलिस स्टेशनमध्ये घेऊन आले होते.
इन्स्पेक्टर साहेबांनी त्याला अपादमस्तक न्याहाळले,
December 29, 2010
आयुर्नश्यति पश्यतां प्रतिदिनं याति क्षयं यौवनं
प्रत्यायान्ति गताः पुनर्न दिवसाः कालो जगदभक्षकः ।
लक्ष्मीस्तोयतरड्गभड्गचपला विद्युच्चलं जीवितं
तस्मान्मां शरणागतं शरणद त्वं रक्ष रक्षाधुना ॥१५॥
या नश्वर जगातून वाचवण्यासाठी ईश्वर असणाऱ्या भगवंताला आचार्य श्री प्रार्थना करीत आहेत. ते सांगतात,
आयुर्नश्यति पश्यतां प्रतिदिनं - पहा! हे आयुष्य रोज कमी कमी होत चालले आहे. वास्तविक आयुष्यातील एक दिवस कमी होणे म्हणजे ईश्वरी सेवेची एक संधी नष्ट होणे आहे. वाढत्या वयासोबत ही जाणीव वाढली नाही, तर वाढ नेमकी कशाची?
याति क्षयं यौवनं- तारुण्य लयाला जात आहे. पर्यायाने क्षमता नष्ट होत आहेत.
प्रत्यायान्ति गताः पुनर्न दिवसाः - एकदा गेलेला दिवस कधीही परत येत नाही. शेवटी पश्चातापच करावा लागेल.
कालो जगदभक्षकः - काळ हा संपूर्ण विश्वाचे भक्षण करणारा आहे. त्याच्या तावडीतून आजपर्यंत कोणी सुटला नाही. आपणही सुटण्याची शक्यता नाही.
लक्ष्मीस्तोयतरड्गभड्गचपला - ज्या पैशाच्या आधारावर आपण स्वतःला सुरक्षित समजतो तो पैसा पाण्यावरच्या तरंगा प्रमाणे चंचल आहे. कधी, कुठून आणि कसा निघून जाईल सांगता येत नाही. या जगातील मोठमोठी साम्राज्ये, राजसत्ता नष्ट झाल्या मग माझ्या पैशाचा पाड तो किती?
विद्युच्चलं जीवितं - विजे प्रमाणे जीवन चपल आहे. विजे प्रमाणेच त्याला धरून ठेवता येत नाही. अनेकदा ते धक्केच देते.
तस्मान्मां शरणागतं शरणद त्वं रक्ष रक्षाधुना - त्यामुळे शरण आलेल्या माझे, हे शरण देणाऱ्या भगवंता आता आपणच रक्षण करा.
या जगात आपल्या शिवाय सर्व नश्वर आहे. त्यामुळे मी आपल्याला शरण आलो आहे.
-- प्रा. स्वानंद गजानन पुंड
August 3, 2020
आषाढ सुरु होतो तोच वारी चे वेध घेऊन...!! आम्ही सुद्धा गेलो होतो वारीला...!हे दुसरं वर्ष आमचं!! नोकऱ्या... शाळा कसं काय जमणार २१ दिवसांचा वारीचा सोहळा अनुभवायला वैगरे सारखे प्रश्न गेल्यावर्षी पासून अडगळीत गेले ते गेलेच.... माऊलीला भेटण्याची आमची इच्छा आणि तितकीच माऊलीची सुद्धा !!! अहो...जिथे जगतनियंता पाठीशी उभा तिथे इतर चिंता उभ्या राहतायत होय ? हां ... थोडा वेगळा केला प्रवास आम्ही पण वारी करून पांडुरंगाच्या पायी डोकं ठेवून आलो हे हि खरंय !!
सामानाची बांधाबांध करता करता वारकरी गेल्यावर्षीची वारी मनातून जगत असतो... आम्ही सुद्धा गेल्या वर्षीच्या आठवणीत रमलो..पांढरे सदरे ..उपरणी सगळी छान तयारी करून ठेवली आणि वारी ची चाहूल लागल्याबरोबर लगेच bookmyshow वर जागा धरून ठेवल्या... दिंडीत कसं काही वारकरी पुढे जाऊन पाल (तंबू)रोवून ठेवतात ना!!...हो नंतर उगाच प्रॉब्लेम नको ना? आणि आमची ठरलेली दिंडी बरं का .. काही ठरलेले... काही नवीन जोडले गेलेले वारकरी असे सगळे एकत्रच जातो आम्ही..!! एकमेकांच्या मनातल्या विठ्ठलाला अनुभवत... स्वतःच्या अंतरंगातल्या विठ्ठलाची अनुभूती घेत घेत त्या विठ्ठलाच्या वारी चा आनंद म्हणजे स्वर्गसुख !! जिवंतपणी मोक्ष अनुभवणं म्हणजे काय ते हे २१ दिवस शिकवून जातात आम्हाला!! आळंदीला कळस हलला आणि पालखीप्रस्थान झालं कि मग ... भेटी लागी जिवा लागलीसे आस !! ऊन..वारा..पाऊस कशाचीही तमा न बाळगता अखंड नामघोषात मन तल्लीन होऊन जातं ! रोजच्या जबाबदाऱ्या..मुलांच्या शाळा... स्वतःच्या नोकऱ्या या ऊन.. वाऱ्या... पावसासारख्याच आडमार्गी होत्या पण माऊली ने या सगळ्याचा भार सांभाळलेला होता त्यामुळे आम्हालाही विशेष चिंता नव्हतीच या कशाची!! वारीत वारकरी मोकळ्या वेळात सुद्धा नामस्मरण करीत असतात तसाच आमच्या whatsap गप्पांमधून पांडुरंग रंगू लागला ..तो रंगला आणि आम्हालाहि रंग चढू लागला त्याच्या भक्तीचा! असाच प्रवास करत करत दिवेघाट... जेजुरी...अगदी वाखरी पर्यंत येऊन पोहोचलो...सगळ्या दिंड्या एक होऊन माऊली भेटीला जातात तसंच पुणे-मुंबई अशी सगळी मंडळी आम्ही एक झालो.. पुढे चंद्रभागा तीरावर पुंडलिकाचं मंदिर दिसलं आणि साद आली ... "आलोच!!" नवखे वारकरी ना आम्ही सगळे!..देवदर्शन नीट व्हायला हवं ना ! आणि पुंडलिका खेरीज कोण भेट घडवून देणार माऊलीची आम्हाला?? एव्हाना आमच्या आषाढीचा दिवस उजाडला...आज माऊली ची भेट होणार हि भावनाच हृदयात उफाळून येत होती सारखी...आणि पावलांनी वाट धरली......... षण्मुखानंदची!!!!
एरवी साठी ऑडिटोरियम पण आज मात्र सगळ्यांसाठी मंदिर बनून गेला...! त्यात प्रवेशताच गंध... बुक्क्याच्या टिक्याने अंतर्बाह्य विठ्ठलमय झालो...! वेगवेगळे वेष परिधान केलेले... वेगवेगळ्या ठिकाणाहून आलेले सगळे पण कपाळावरच्या तो एक टिळा इतका उठून दिसत होता कि आम्ही सगळेच आता भागवत !! राम कृष्ण हरी कानावर आलं आणि स्तब्ध झालो ...संथ लयीच्या नामस्मरणापासून ते गजर होई पर्यंत!!!जणू काही भगवंताचं विश्वरूप दर्शन घडत होतं...स्वराभिषेक होत होता माऊलीच्या पायावर!!!
राम कृष्ण हरी ने वातावरण भरून टाकलं तिथलं!! अभंगरसात न्हाऊन निघत असतानाच कर्नाटकातून दिसणारा विठ्ठल सुद्धा अनुभवला !...विश्वरूप पाहून थक्क झालेल्या मनाने हात जोडले गेले आणि रंध्रा रंध्रा ने नामघोष केला ...... जगदोद्धारणा!! विठ्ठल आता पुरेपूर सामावला मनामध्ये..... 'आता अंतरंग झाले पांडुरंग........' हे शब्द जगला तिथला प्रत्येक जण!! आता तिथे बाकी कोणीच उरलं नाही... गायक नाही... वादक नाही...रसिक नाही... तिथे कणाकणात होता फक्त आणि फक्त 'विठ्ठल'!! अभंगशृंखला सुरु झाली... नामदेव पायरीच दर्शन घेऊन एक एक पाऊल माऊलीच्या गाभाऱ्याकडे जाऊ लागलो !! माऊलीचं साजरं रूप डोळे भरून अनुभवलं आणि विठ्ठला.... मायबापा ... आमच्या मनातल्या भक्तीचा सूर असाच निरागस राहो ही प्रार्थना करून त्याच्या पायावर नतमस्तक झालो!!
मोरया इंटरटनमेंट Morya Entertainment(पुणे) आणि Mukesh Patil ventures (मुंबई ) या दोन पालख्यांनी आमची आषाढवारी.... 'अभंगवारी' घडवून आणली !! गेली ४ वर्ष ज्यांच्या स्वरांमधून या वारीची ओढ लावली आणि पुंडलिकाच्या भक्तिभावाने ज्या स्वरांनी आम्हाला विठ्ठलाचं दर्शन घडवून आणलं ते म्हणजे आमचे सर! या वर्षीच्या सोहळ्याचं अजून एक वैशिष्टय म्हणजे वैभव जोशी यांनी लिहिलेली आणि प्राजक्ता माळी यांनी निवेदनातून ती उत्तमरीत्या साकारलेली संहिता !! माऊलीच्या गळ्यात नानाविध अलंकार असले तरी तुळशीहाराने माऊलीचं रूप खुलून दिसतं. या वर्षी Soniya Saanchi दि ने सरांसाठी बनवलेला कुर्ता म्हणजे सरांच्या स्वरांमधून अनुभवलेल्या भक्तीचं 'मूर्त स्वरूप' भासला!!
वारीत चालणं हे भाग्यच पण कर्तव्यात बांधले गेलेल्यां आमच्यासारख्यांच्या धावपळीच्या आयुष्याला वारीचा रंग देऊन विठ्ठला दर्शनाची अनुभूती देणारे सरांचे स्वर....म्हणजे माऊलीने आम्हाला दिलेली सगळ्यात गोड आणि मौल्यवान भेट !!
आज तिथून परतणाऱ्या प्रत्येक पावलाने मनात हा स्वररूपी विठ्ठल सामावून घेतला आणि प्रत्येकाच्या मनातल्या शुद्ध भक्तीभावनेने न्हाऊन निघालेला हा सोहळा संपन्न झाला ती पुढल्या वर्षीची वारीची आस घेऊनच !!
©अपर्णा
August 7, 2019
आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्व-क्रमांक अकरा
जे जे देवासाठी ते ते देहासाठी-भाग 10
वस्त्र अर्पण केल्यावर यज्ञोपवित किंवा उपवस्त्र घालावे. यज्ञोपवित म्हणजे जानवे . आणि उपवस्त्र म्हणजे मुख्य वस्त्राला पूरक असलेले. सर्वसाधारणपणे खांद्यावरून खाली येणारे उपवस्त्र मानावे. जसे शाल, उपरणे, ओढणी, पदर ज्याने शरीराचा वरील भाग झाकला जाईल. वपु म्हणतात, त्याप्रमाणे बाईला साडी जेवढी भरजरी घ्यावी, तेवढा ब्लाऊजपीस हलक्या प्रतीचा घ्यावा, म्हणजे तो झाकण्यासाठी तरी खांद्यावरून अंगभरून पदर घेतला जातो.
देव देवतांना या वस्त्रांची गरजच काय , या तर निर्जीव मुर्ती ! यांना हे सर्व उपचार कशाला ? हीच तर खरी मेख आहे. जे जे देवासाठी ते ते देहासाठी, हेच तर शिकायचं आहे.
वस्त्रांबरोबर वेगवेगळे अलंकारदेखील घातले जातात. आता देवताना अलंकार प्रत्यक्ष घालण्याऐवजी अक्षताम् समर्पयामी... असे म्हणून खरंतर भागवलं जातं. पण देहासाठी भागवाभागवी नाही. खरं अलंकार घातले पाहिजेत.
सोने, चांदी, तांबे, पंचधातु इ. तसेच मोती, हिरा, प्रवाळ, पाचू, माणिक इ. रत्ने तसेच काच, स्फटीक यापासून बनविलेले दागिने परिधान करावेत. अंगठी, वाकी, कंठहार, बांगड्या, पाटल्या, बाजूबंद, कंबरपट्टा, बिलवर, नथ इ. सर्व अलंकार जसे स्त्रिया परिधान करतात, तसे पुरूष देखील गळ्यात वैजयंती किंवा मोत्याच्या माळा, छातीवर कवच, कानात कुंडले, हातामधे कडी, डोक्यावर मुकुट, असे अलंकार धारण करत असत.
या रत्नांचा शरीरावर प्रत्यक्ष परिणाम होत असतो. सूर्य चंद्र अनेक ग्रह यांच्यापासून येणारे किरण या रत्नांवर पडून त्वचेला स्पर्श केल्यावर रक्ताभिसरणावर थेट परिणाम होतो. म्हणून हातातील प्रत्येक बोटामधे वेगवेगळ्या रत्नांच्या अंगठ्या घालत असतात. प्रत्येक ग्रहाचा विशिष्ट रत्नांशी संबंध सांगितलेला आहे. तसेच विशिष्ट रत्नांचा शरीरातील वात पित्त कफ या तीन दोषांवर आणि सातही धातुंवर सूक्ष्म परिणाम होत असतो.
आजकाल तरूणांच्या हातात प्लॅस्टिकच्या बांगड्या, रबराची कडी, फ्रेंडशिपचे बेल्ट दिसतात, ज्याचे फायदे होण्यापेक्षा तोटेच जास्ती होताना दिसतात.
मला वाटलं म्हणून, मला आवडलं म्हणून, मी हे रत्न हातात घातले, असे करू नये. ग्रहशास्त्रानुसार जे योग्य असेल ते, त्या तज्ञांच्या सल्ल्यानुसार वापरावेत. नाहीतर त्रासही होऊ शकतो.
ज्याला इफेक्ट आहे, त्याला साईड इफेक्ट असणारच ना !
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
04.06.2017
June 4, 2017
या पुराणाचा विषय आहेत भगवान श्री गणेश. पर्यायाने अंतिम सत्य काय तर श्री गणेश. सर्वोच्च सत्ता कोणती तर भगवान श्री गणेश.अनादी,अनंत, निर्गुण, निराकार, परब्रह्म काय तर भगवान श्री गणेश. त्या भगवान श्रीगणेशांना जाणून घेण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे श्रीमुद्गलपुराण.
September 2, 2019
पिकांमध्ये बदल करणे, पीक पद्धतीत बदल करणे, नगदीच्या इतर पिकांचा विचार करणे, उत्पादक आणि विक्रेता या दोन्ही भूमिका स्वत: करून पाहण्याचा प्रयत्न करणे, यावर कधी विचारच झाला नाही. शेवटी कष्ट म्हणजे केवळ ढोर मेहनत नसते. कष्टाच्या व्याख्येत मेहनतीच्या जोडीला बुद्धीची, कल्पकतेची जोड असतेच.
August 3, 2008
Copyright © 2025 | Marathisrushti