वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
जयपूर येथे ‘सीमा सुरक्षा’विषयक एका परिसंवादात संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांनी केलेल्या भाषणातील एका विधानाला नकारात्मक रंग देऊन संरक्षण मंत्र्यांना अकारण वादात ओढण्याचा सुरू झालेला खटाटोप अनाकलनीय आणि अनाठायी आहे.
June 27, 2015
एमपीएससी (MPSC) म्हणजे काय?
एमपीएससी म्हणजे, महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन अर्थात महाराष्ट्र लोकसेवा आयोग. हा भारतीय राज्यघटनेच्या कलम ३१५ अन्वये निर्माण केला असून घटनेच्या कलम ३२० अन्वये, सेवक भरती व त्यासंबंधी सल्ला देण्याचे काम, हे आयोग पार पाडते. प्रशासनात पात्र व गुणवत्ताधारक उमेदवारांची भरती केली जावी, त्यात कोणत्याही प्रकारचा गोंधळ होऊ नये, गरप्रकार होऊ नये. यासाठी घटनाकर्त्यांनी राज्यघटनेत स्पष्ट तरतूद करून प्रशासकीय सेवांच्या भरतीसाठी, स्पर्धात्मक परीक्षांचे आयोजन करण्याची जबाबदारी या घटनात्मक संस्थेकडे सोपविली आहे.
लोकसेवा आयोगाद्वारे खालील सेवांकरता स्पर्धा परीक्षा घेतली जाते -
- राज्यसेवा परीक्षा
- महाराष्ट्र वनसेवा परीक्षा
- महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षा
- महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा गट अ परीक्षा
- महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा गट ब परीक्षा
- दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर व न्याय दंडाधिकारी, प्रथम वर्ग परीक्षा
- साहाय्यक मोटर वाहन निरीक्षक परीक्षा
- पोलीस उपनिरीक्षक परीक्षा
- विक्रीकर निरीक्षक परीक्षा
- साहाय्यक परीक्षा
- लिपिक-टंकलेखक परीक्षा
राज्यसेवा परीक्षेच्या माध्यमातून राज्य शासनाच्या सेवेतील, राजपत्रित गट ‘अ’ व गट ‘ब’ संवर्गातील खालील विविध पदांसाठी एकच परीक्षा घेतली जाते. राज्यसेवा (पूर्वपरीक्षा, मुख्य परीक्षा व मुलाखत या संपूर्ण प्रक्रियेमधून) पुढील पदांसाठी विद्यार्थ्यांची निवड केली जाते-
- उपजिल्हाधिकारी (गट अ)
- पोलीस उपअधीक्षक/साहाय्यक पोलीस आयुक्त (गट अ)
- साहाय्यक विक्रीकर आयुक्त (गट अ)
- उपनिबंधक, सहकारी संस्था (गट अ)
- उपमुख्य कार्यकारी अधिकारी/गटविकास अधिकारी (गट अ)
- महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा (गट अ)
- मुख्याधिकारी, नगरपालिका/परिषद, गट अ
- अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क (गट अ)
- तहसीलदार (गट अ)
- साहाय्यक, प्रादेशिक परिवहन अधिकारी, (गट ब)
- महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा (गट ब)
- कक्ष अधिकारी (गट ब)
- गटविकास अधिकारी (गट ब)
- मुख्याधिकारी, नगरपालिका/नगर परिषद, (गट ब)
- साहाय्यक निबंधक सहकारी संस्था (गट ब)
- उपअधीक्षक, भूमी अभिलेख (गट ब)
- साहाय्यक आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, (गट ब)
- नायब तहसीलदार (गट ब)
महसूल सेवा
उपजिल्हाधिकारी :-
हे राज्य सेवेतील सर्वोच्च पद आहे. बढती आणि सरळ सेवा प्रवेशाने या पदावर नेमणूक होते आणि १० ते १५ वर्षांच्या सेवेनंतर भारतीय प्रशासकीय सेवेमध्ये बढतीद्वारे प्रवेश मिळू शकतो.
नेमणुका - उपविभागीय अधिकारी, विविध खात्यांचे उपजिल्हाधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारी. कामाचे स्वरूप
पुढीलप्रमाणे आहे-
- उपविभागीय अधिकारी म्हणून काम करताना उपविभागातील शांतता व सुव्यवस्था पाहणे, महसूल वसुली, निर्वाचन अधिकारी म्हणून कार्य इत्यादी.
- विविध खात्यांचा उपजिल्हाधिकारी म्हणून काम करताना त्या त्या खात्याशी संबंधित कार्यवाही पूर्ण करणे व माहिती अद्ययावत ठेवणे.
- निवासी उपजिल्हाधिकारी म्हणून काम करताना वरिष्ठ व कनिष्ठ कार्यालयात समन्वय साधणे व जिल्हाधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीत जिल्हा प्रशासनात सुसूत्रता ठेवणे.
तहसीलदार :-
या पदावर निवड राज्यसेवा परीक्षा (एमपीएससी)द्वारे केली जाते. राज्य सरकार प्रत्येक तालुक्यासाठी एक तहसीलदार नेमते. तहसीलदारांच्या कामाचे स्वरूप पुढीलप्रमाणे -
- तालुक्यातील महसूल वसुली, प्रशासन याबाबतची सर्व कामे तहसीलदार पार पाडतात. महसूल वसुलीबाबत अर्धन्यायिक अधिकार तहसीलदाराला दिलेले आहेत.
- तालुका दंडाधिकारी या नात्याने शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठीचे न्यायिक अधिकार तहसीलदाराला आहेत.
- आपत्ती व्यवस्थापन, नुकसानभरपाई, शासकीय योजनांची अंमलबजावणी, भूमी अभिलेखाबाबतचे निर्णय इ. जबाबदाऱ्याही तहसीलदार पार पाडत असतात.
नायब तहसीलदार :-
महाराष्ट्र जमीन महसूल कायदा १९६६ अन्वये राज्य शासन प्रत्येक तालुक्यासाठी एक किंवा जास्त नायब तहसीलदारांची नेमणूक करू शकते. तहसीलदारास करावी लागणारी कामेच नायब तहसीलदारांना पार पाडावी लागतात. कामांचे स्वरूप पुढीलप्रमाणे आहे-
- तहसीलदार पातळीवर घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी नायब तहसीलदार करतात.
- महसूल अधिकारी म्हणून महसूल वसुली, बिगरशेती परवाने देणे इ.बरोबर जातीचे, रहिवासाचे दाखले देणे ही काय्रे नायब तहसीलदाराला पार पाडावी लागतात.
- शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी दंडाधिकारी म्हणून काही न्यायिक अधिकार नायब तहसीलदाराला देण्यात आले आहेत.
- महसुली कामकाजांतर्गत अर्धन्यायिक अधिकारी म्हणून नायब तहसीलदार काम पाहतात.
महाराष्ट्र पोलीस सेवा :-
राज्यसेवेतील निवडीचे सर्वोच्च पद पोलीस उपअधीक्षक किंवा उपविभागीय पोलीस अधिकारी आहे. उपअधीक्षकांच्या कामाचे स्वरूप पुढीलप्रमाणे आहे-
- गंभीर स्वरूपाच्या अपराधांचा तपास करणे.
- अधीनस्थ पोलीस कर्मचाऱ्यांवर नियंत्रण व त्यांच्या तालमी इ.ची जबाबदारी डीवायएसपीवर असते. यासाठी ते वर्षांतून एकदा सर्व पोलीस ठाणी व चौक्यांची तपासणी करतात.
- शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी तसेच काही बाबतीत परवाने देण्याचे अधिकार डीवायएसपीला असतात.
महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा :-
शासनाचे विविध विभाग, महामंडळे येथील लेखाविषयक व वित्तीय जबाबदारीचे काम करण्यासाठी प्रशिक्षित अधिकारी उपलब्ध करून देता यावेत या उद्देशाने केंद्र सरकारच्या धर्तीवर १९६५ मध्ये महाराष्ट्र वित्त व लेखा सेवेची स्थापना करण्यात आली. १९६२ साली स्थापन करण्यात आलेल्या लेखा व कोषागार संचालनालयाचे संचालक लेखा विभागाचे प्रमुख असतात. भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांची या पदावर नेमणूक करण्यात येते.
राज्यसेवा परीक्षेतून वित्त व लेखा सेवा गट अ व ब या पदांसाठी निवड होते व या उमेदवारांची नेमणूक अनुक्रमे कोषागार अधिकारी/ साहाय्यक संचालक व अतिरिक्त कोषागार अधिकारी/ उपमुख्य लेखाधिकारी या पदांवर करण्यात येते. वित्त व लेखा सेवा अधिकाऱ्यांच्या जबाबदाऱ्या पुढीलप्रमाणे आहेत -
- या सेवेतील अधिकाऱ्यांना शासनाच्या विविध विभागांमध्ये लेखाविषयक व लेखा परीक्षणविषयक बाबी सांभाळण्यासाठी प्रतिनियुक्तीवर पाठविण्यात येते.
- शासकीय रकमांचे वित्तीय विनियोजन करणे व याबाबत गरप्रकार होऊ न देणे ही या सेवेतील अधिकाऱ्यांची जबाबदारी असते.
- कार्यालयातील/विभागातील वित्तीय व्यवस्थापन तसेच वेतन भत्ते, रजा व आस्थापनाविषयक कामे या अधिकाऱ्यांना हाताळावी लागतात.
विक्रीकर (व्हॅट) विभाग :-
विक्रीकर (व्हॅट) हा राज्य शासनाच्या महसुलातील सर्वात जास्त वाटा असणारा कर म्हणून आहे. विक्रीकर विभाग हा अर्थमंत्रालयाच्या अधीनस्थ कार्यरत आहे. मुंबई विक्रीकर कायद्यान्वये विभागीय आयुक्त, महाराष्ट्र राज्य हे खात्यातील सर्वोच्च पद आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे विक्रीकर निरीक्षक पदासाठी वेगळी परीक्षा आयोजित करून साहाय्यक विक्रीकर आयुक्त पदासाठी निवड करण्यात येते.
साहाय्यक विक्रीकर आयुक्ताच्या जबाबदाऱ्या- व्यापाऱ्यांची नोंदणी करणे, नोंदणीकृत व्यापाऱ्यांना सल्ला, मार्गदर्शन करणे, कराची वसुली इ. बाबींची निर्धारणा शाखेसंबंधीची कामे.
विक्रीकर निरीक्षकाच्या जबाबदाऱ्या - प्रत्यक्ष करवसुली व त्याचा पाठपुरावा करण्याची जबाबदारी विक्रीकर निरीक्षकाची असते. नोटीस व समन्स बजावणे व याबाबतची कार्यवाही तसेच डीफॉल्टर्सचा पाठपुरावा करणे या बाबीही विक्रीकर
निरीक्षकाच्या कार्यकक्षेत येतात.
मोटार वाहन विभाग :-
हा विभाग गृहमंत्रालयाच्या अधीन असतो. राज्यसेवा परीक्षेतून साहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी गट-ब या पदासाठी निवड करण्यात येते. साहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्याच्या जबाबदाऱ्या पुढीलप्रमाणे आहेत -
शिकाऊ व पक्के ड्रायिव्हग लायसेन्स तसेच आंतरराष्ट्रीय वाहन चालक परवाना साहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्याकडून दिला जातो. वाहनांची नोंदणी, हस्तांतरण तसेच दुसऱ्या राज्यात/प्रदेशात गेल्यास त्याचे 'ना हरकत प्रमाणपत्र' देणे या बाबी साहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांच्या कार्यकक्षेत येतात. परवाने व नोंदणी प्रमाणपत्राचे नूतनीकरण व दुय्यम प्रती देण्याबाबतची कार्यवाही साहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांकडून होते.
राज्य उत्पादन शुल्क विभाग :-
उत्पादन शुल्क हा राज्यसूचीतील विषय असून राज्य महसुलामध्ये याचा मोठा वाटा असतो.
राज्यसेवा परीक्षेद्वारे उपअधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क या पदावर नियुक्तीसाठी निवड करण्यात येते. प्रत्येक जिल्ह्य़ासाठी एक राज्य उत्पादन शुल्क उपअधीक्षक राज्य शासनाकडून नेमण्यात येतात.
राज्य उत्पादन शुल्क उपअधीक्षक :-
या पदाच्या जबाबदाऱ्या पुढीलप्रमाणे आहेत-
मद्यार्क व अमली पदार्थाची तस्करी रोखणे व त्यासाठी वेगवेगळ्या उद्योग, व्यवसायांची तपासणी करणे हे या विभागातील अधिकाऱ्यांचे महत्त्वाचे काम आहे. मद्य, मद्यार्क, अमली पदार्थ, औषधी द्रव्ये इ. बाबतच्या महसुलाची वसुली हे अधिकारी करतात. अमली पदार्थविषयक गुन्ह्य़ांचा तपास करण्याची जबाबदारीसुद्धा या अधिकाऱ्यांवर सोपवण्यात आली आहे.
आयोगाकडून साहाय्यक व लिपिक संवर्गासाठी स्वतंत्रपणे परीक्षा घेतल्या जातात. राज्यसेवा परीक्षेच्या माध्यमातून कक्ष अधिकारी पदावर निवड होते.
कक्ष अधिकाऱ्यांच्या कामाचे स्वरूप :-
कार्यासनात येणारे टपाल व धारिकांवर विहित वेळेत कार्यवाही पूर्ण करण्याची जबाबदारी कक्ष अधिकाऱ्यांवर असते. प्रत्यक्षात ही कार्यवाही साहाय्यकांकडून सुरू होत असली
October 26, 2016
दमदार कथानक आणि संवाद असलेल्या प्रोमोजने एखाद्या चित्रपटाचं मार्केटींग करुन प्रेक्षकांना स्वत:च्या चित्रपटाकडे खेचुन आणायचे आणि “तगडी स्टारकास्ट” च्या बळावर सिनेमात काहीतरी वेगळेपण आहे हे दाखवण्याचा प्रयत्न केल्यावर प्रेक्षकांना एनकॅश करायचे हे ट्रेंड आता जुने झालेत. श्रेयस तळपदे, अमृता खानविलकर, जितेंद्र जोशी, इला भाटे यांची मुख्य भूमिका असलेला बाजी हा चित्रपट मसालेदार आणि स्टारडम झालाय.हे वेगळ्या शब्दात सांगायचे तर कथेत अनोखेपणा नाही; पण फॅण्टासी क्रियेट करुन जुना व सध्याच्या काळाला सांगड घालण्यात काही फरकाने यशस्वी ठरलाय. संवादशैलीलात्या भागातला बाज आहे व मनाला भिडतील असे नाही! रोमॅन्टीक सेन्स बरा असला तरी प्रेमाचा फण्डा अचुकपणे हाताळण्यात आलेला आहे.
बाजीची कथा घडते कोकणातल्या श्रीरंगपूरच्या छोट्याशा गावामध्ये भारत स्वतंत्र झाल्यावर बारा-चौदा वर्षा नंतरच्या काळातील ही कथा! चिविलदास (श्रेयस तळपदे), हा सामान्य घरातील मुलगा स्वाभावाने बर्यापैकी बालीश जो आपल्या आईसोबत (इला भाटे) रहातोय, उदरनिर्वाह करण्यासाठी त्यांचं किराणा मालाचं दुकान आहे. त्याच गावात गौरी (अमृता खानविलकर) नावाची मुलगी आहे जी चिदुची बालमैत्रीणं पण आहे; तिच्या स्वपनातला राजकुमार आहे "बाजी"! बाजी हे पात्र म्हणजे श्रीरंगपूरच्या गावकर्यांचा रक्षणकर्ता. कोणत्याही आपत्कालिन स्थितीत बाजी हा गावकर्यांच्या मदतीला धावून यायचा. हे सर्व चित्रपटाच्या सुरुवातीला कॉमिकच्या चित्रातून निवेदनात्मक पध्दतीने कथन करुन उत्तमरित्या सादरीकरण तर कुठे कलाकारांच्या अभिनयातून आल्यामुळे सुरुवातीचे प्रसंग खिळवून ठेवणारे आहेत. गौरीच्या स्वप्नातला राजकुमार सुध्दा बाजीच आहे कारण लहान असताना आपल्या गावातल्या जत्रेतील “जाइंट व्हील” वरचा तोल सुटल्यावर अडकल्यामुळे ती पडणार तितक्यात बाजी घोड्यावर येऊन तिला वाचवतो आणि म्हणूनच तिचं इतिहासातल्या बाजी वर प्रेम जडलयं. पण सध्याच्या स्थितीत तिचा मित्र चिदु तिच्यावर मनापासून प्रेम करतोय. चिदूचं व्यक्तीमत्त्वा आणि त्याचं स्थान हे आपल्यासाठी केवळ एका उत्तम मित्राप्रमाणे
आहे. कारण त्याच्या गुणांचा दुरपर्यंतही बाजीशी संबंध नाही. त्यामुळे कथेला “रोमॅण्टीक टच” देखील मिळतो. चिदुच्या भोळेपणाचा गैरफायदा अनेकांनी आत्तापर्यंत घेतला असला तरी तो एक थट्टेचा भाग असतो. याच सुमारास मार्तंड (जितेंद्र जोशी)ची एंट्री होते. सुरुवातीला साधा, सरळ असलेल्या मार्तंडची खलकीवृत्ती कशी जागृत होते आणि चित्रपटाच्या अखेरपर्यंत त्याचा खलनायकी चेहर्याची खुनशी रुपं कशी उळघडत जातात हे सुरेखरित्या पडद्यावर साकारण्यात आले आहे. खलनायक बनलेला मार्तंड पुढे चिदुची हत्या करुन समुद्रात ढकलून देतो. पण ज्यासाठी चिदुची हत्या होते आणि जे बाबी मार्तंडच्या विक्षिप्त पणाला ठरतात ती म्हणजे पुरातन खजिना. आणि या दुर्मिळ खजिन्याच्या रक्षणासाठी बाजी त्या गावात वावरत होता. चिदुच्या हत्ये आधी ज्यावेळी त्याला कळते की आपण बाजीचे वंशज आहोत त्या वेळी गौरी ही गोष्ट तो अनेक मार्गाने पटवून देतो.
पण गौरी चिदुवर प्रेम करत नसल्यामुळे, पुढे ट्विस्ट म्हणून वेगळा प्रसंग साकारण्याचा प्रयत्न दिग्दर्शका कडून केला गेलाय ज्यामुळे चित्रपट शैलिदार बनतो. कारण चिदु नंतर नव्याने नायकाची एंट्री होणार हे कोणत्याही चित्रपटाचा ठरलेला पॅटर्न असतोच. पुढे नायकाची अर्थात श्रेयस तळपदेची नव्याने एंट्री होते आकाश या व्यक्तीरेखेच्या माध्यमातून. आकाश हा हिरे चोर आहे. मुंबईहून हिरे चोरल्यावर थेट समुद्राच्या मार्गाने पोलिसांच्या तावडीतनं निसटत असतानाच त्याची नवका वादळाच्या तडाख्यात उलटते आणि आकाश थेट श्रीरंगपूरच्या समुद्र किनार्यावर येऊन आढळतो. चिदुच्या साथीदाराला जेव्हा आकाश बेशुध्द अवस्थेत सापडत़ो त्यावेळी आकाशला चिदुच्या घरी दाखल करण्यात येते. पण आकाश हा खरा चिदु नसून आकाश आहे, हे ज्यावेळी त्याच्या आईलला कळते तेव्हा तिची आई म्हणून झालेली व्याकुळ अवस्था पण त्याचवेळी आकाश श्रीरंगपूर मध्ये असणं ही किती महत्त्वाचं आहे हे ज्यावेळी आकाशला समजतं तेव्हा त्याच्या रुपाने झालेला बाजीचा प्रवेश गावकर्यांच्या दृष्टीनेही एकार्थी सुखद अनुभव असतो. इथे मार्तंड व त्याच्या माणसाने अख्खा गाव वेठीस धरलेला असतानाच त्याचा साम्राज्याला सुरुंग लागायला सुरुवात झालेली असते तर दुसरी गौरीच्या स्वप्नातला सुपरहिरो परतल्यामुळे “रोमॅन्स फ्लेव्हर” अनुभवायला मिळतो. पण गुन्हेगार असलेला आकाश ज्यावेळी हे सत्य गौरीला सांगणार तितक्यात मार्तंडच्या गुंडांकडून त्याचावर हल्ला होतो पण या प्रसंगाला ही आकाशने केलेली फाईट यामध्ये नाविन्य नसलं तरी त्यापुढे येणारे ट्विस्ट आणि पोलिस इन्सपेक्टर आकाशचा करत असलेला पाठलाग यातून “बाजी स्टाईल”ने सरकलेला चित्रपटाचा शेवट नक्कीच आपल्याला खिळवून ठेवेल.
बाजी चित्रपटाचं वैशिष्ट्य म्हणजे सर्वच कलाकारांचा कसदार अभिनय, सुयोग्य दिग्दर्शन आणि प्रसंग व काळानुसार केलेला वस्तुंचा वापर, वेशभुषा, चित्रपटाच्या तांत्रिक बाजू आणि बाजीची कथा सांगण्यासाठी आकर्षकरित्या केलेलं अॅनिमेशन त्याला जोड म्हणजे सचिन खेडेकरांच कथामय निवेदन. महत्त्वाचं म्हणजे मार्तंडच्या व्यक्तीरेखेला जितेंद्र जोशीचे न्याय दिलायं असंच म्हटलं पाहिजे. पुरस्कारांच्या वेळीही मार्तंडची दखल घ्यावी लागेल. सिनेमाची गाणी सुध्दा कथेच्या प्रसंगाला शोभणारी आहेत.
या चित्रपटाची खटकणारी बाजू म्हणजे लांबलेलं कथानक; सुरुवातीला खुप इंटरेस्टीग वाटणारी कथा नंतर रटाळवाणे वाटत रहातं. “साऊथ टच” असलेल्या फाईट सीन्स याआधी ही अनेक मराठी सिनेमांमधून पहायला मिळाल्या आहेत. त्याच धाटणीवर आधारीत इथेही काही प्रमाणात बघायला मिळतात. दुसरं म्हणजे शेवटच्या 'सीन' ला आकाश हा मार्तंड पळवून नेत असलेला खजिना सोडवण्यासाठी घोड्यावरुन येताना दाखवण्यात आलाय; पण मुळात प्रश्न असा मनात येतो की घोडा आला कुठून? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे बाजी चा पोषाख इतक्या वर्षानंतर ही सहीसलामत कसा? न त्याला वाळवी न कुठे छेद? कारण बाजीचा पोषाख हा ज्य ठिकाणी ठेवण्यात आलेला असतो त्यावरुन असा शंका येणं सहाजिक आहे!
फॅण्टासी, रोमान्स आणि मसालेदार कथा व अभिनयात वरचढ आणि या सर्वांचं कॉम्बीनेशन म्हणजे बाजी हा सिनेमा. जर अश्या चित्रपटांना आपण पसंत करत असाल तसंच श्रेयस तळपदे व अमृता खानविलकर यांच्या पडद्यावरील केमिस्ट्रीला पहाण्यासाठी तरी बाजी एकदा पहायला काहीच हरकत नाही.
February 9, 2015
ज्या कालखंडात रामायण व महाभारत प्रथम लिहिल्या गेले त्या कालखंडातील विश्वकर्मा समाजाचा विचार या प्रकरणात केला आहे. हा कालखंड नक्कीच वैदिक काळाच्या नंतरचा पण बुध्दपूर्व आहे यात शंका नाही. कांही इतिहास तंज्ज्ञांनी इ.स. पूर्व १५०० नंतरचा काळ उत्तर वैदिक काळ मानला आहे. परंतु याच कालखंडात घडलेले रामायण आणि महाभारत नेमके कोणत्या वर्षात घडले या विषयी एक वाक्यता नाही. तसेच ही दोन्ही महाकाव्ये कधी लिहिल्या गेलीत या विषयी सुद्धा एकमत दिसत नाही. तरी या अध्यायात उपलब्ध ग्रांथिक पुराव्यावरुन इ. स. पूर्व १५०० ते इ. स. पूर्व ६०० या ९०० वर्षाच्या प्रदीर्घ कालखंडातील विश्वकर्मा समाजाच्या अस्तित्वाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला आहे.
February 13, 2026
रोजच्या जेवणात असलेल्या तिखट पदार्थात सर्वांना आवडणारा एक चटपटीत आंबट तिखट पदार्थ म्हणजे चटणी.
ही चटणी बहुगुणी औषध आहे. जिरे, मिरी, मिरची, हिंग, कढीपत्ता, चिंच, पुदीना, कोथींबीर या पैकी कोणत्या तरी पदार्थाने नटलेली सजलेली, रंगीबेरंगी चटणी रोजच्या जेवणात असावी. सुकी किंवा ओली कशीही असली तरी चविष्ट लागते. म्हणजे इष्ट चवीची !
डाव्या हाताला असणारी चटणी मधे मधे खाल्ली की उजव्या बाजूच्या इतर पदार्थांची रूची पण आपोआपच वाढत असते.
लसूण, शेंगदाणे, तीळ, नारळ, जवस, कारळे, कांदा यापैकी ( म्हणजे आठवड्यातून दरदिवशी एक कोणत्याही वेगळ्या प्रकारची चटणी केली तरी) त्यातील मुख्य पदार्थ हा एक प्रकारची तेलबी असते.
या बिया आणि इतर वेगवेगळे मसाले कुटले कि त्यातील तेल बाहेर येते. त्यात मीठ घालून ढवळले की, चटणी तयार. यात कुटण्याची पद्धत महत्वाची.
मिक्सरमधून बारीक वाटून होते, पण कुटण्याचा संस्कार होत नाही. संस्कार बदलला कि परिणाम बदलतात, चवही बदलते.
मिक्सर आणि पाटा वरवंटा वापरून केलेल्या चटणी किंवा वाटपामधे फरक पडतोच ना ! मिक्सरमध्ये ब्लेडच्या सहाय्याने बारीक बारीक तुकडे पाडणे आणि वरवंट्याचा घाव घालून पाट्यावर रगडणे या दोन्ही कृतीतून तेलबीयांमधले तेल बाहेर पडल्यामुळे चवीतही फरक पडतो. म्हणून संस्कार महत्वाचा !
चटणीला चव येण्यासाठी वापरला जाणारा मसाला कच्च्या स्वरूपातच वापरला जातो. हे उघड सत्य आहे.
हे फक्त लक्षात आणून देतो की, चटणीमधले तेल आणि मसाले कच्च्या स्वरूपात वापरले जातात, तर भाज्या या सुसंस्कारीत करून खाल्ल्या जातात. भाज्या कच्च्या नाहीत, मसाले भाजून नाहीत, तर ते जास्त औषधी.
मसाला टिकवण्यासाठी किंवा नीट कुटला जावा, यासाठी तो भाजला जातो. तो परत परत भाजला तर त्यातला दळ, वास, तेल, आणि औषध निघून जाते. पूड होण्यासाठी किंचित गरम करणे इथपर्यंत ठीक आहे, पण खमंग वास आणि परत तेल सुटेपर्यंत भाजणे, म्हणजे त्यातील अंगभूत औषध उडवून लावल्यासारखं आहे. हे निमंत्रित केलेल्या पाहुण्याला, घराच्या दारात आल्यावर, आम्ही आता शिनिमाला जातुय, *तू आता परत जा, असे सांगण्यासारखेच झाले.
वैद्य सुविनय दामले
कुडाळ, सिंधुदुर्ग
9673938021
12.11.2016
November 12, 2016
गेल्या ५० वर्षात, वेळोवेळी अनेक सूक्ष्म आणि लघू उद्योजकांच्या सहवासातून जी एक जाणीव प्रकर्षाने निर्माण झाली त्याबद्दलचे हे विचार.
सातत्याने वाजणाऱ्या फोनच्या घंटीमुळे मी जरा त्रासिक पणे जागा झालो. घड्याळाकडे बघितले तर रात्रीचे दोन वाजले होते. जगदीशचा फोन होता हे स्क्रीन वरील नाव आणि चेहेरा बघून समजले. एवढ्या अवेळी फोन आला की नाही म्हंटले तरी पोटात थोडे धस्स होतेच. डोळे चोळत मी विचारले, “कायरे जग्या, तुला झोप येत नाही का? अरे ज्यांना येते त्यांना तरी शांत झोपू दे ना.”
थोड्या विलंबानंतर गंभीर स्वरात आवाज आला, “अरे शर्माची बातमी समजली का?”
“का, काय झाले ? काल संध्याकाळी तो बडोद्याला परत जायच्या आधी तर त्याच्याशी बोललो ”
“अरे, आत्ताच त्याच्या सहकाऱ्याचा फोन आला होता. हायवे वर त्याची मोटार एका ट्रकला धडकून एका क्षणात सर्व काही संपले आहे. तुझे त्याच्याशी घनिष्ट संबंध होते म्हणून एवढ्या अपरात्री कळवतो आहे.”
एका क्षणात खाडकन पूर्ण जागा झालो. शर्माशी माझा संबंध गेल्या सहा महिन्यांचा. डोळ्यासमोर एखाद्या चित्रफीतीप्रमाणे आमच्या भेटी तरळू लागल्या. चाळीशीतला शर्मा एक अत्यंत हुशार आणि कर्तबगार उद्योजक होता. त्याने अक्षरशः शून्यातून जवळपास तीस कोटींचा धंदा उभा केला होता.
January 29, 2026
जगातील १० ९ देशांमध्ये मलेरिया नियमितपणे आढळतो . २००७ सालच्या आकडेवारीप्रमाणे ३४.७ कोटी लोकांना मलेरियाची लागण झाली होती . त्यातील ८० टक्के रुग्ण अफ्रिका खंडातील होते . उर्वरित रुग्णात ८० टक्के रोगी हे भारत म्यानमार , पाकिस्तान , बांगला देश , इंडोनेशिया या देशात आढळून आले . जगभरात ९ कोटी लोकांचा मृत्यू मलेरियाने झाला . नेहमीच अशी आकडेवारी फक्त नोंद झालेल्या रोग्यांचीच असल्याने खऱ्या संख्येचा अंदाज येत नाही .
मलेरिया - निर्मूलनाच्या डावपेचांची आखणी मुख्य तीन घटक विचारात घेऊन करावी लागते .
अ ) मलेरियाच्या परोपजीवांचा माणूस हा मुख्य बळी आहे . अशा वेळी रुग्णाला पूर्णपणे गरज असलेली सर्व तऱ्हेची औषधे देऊन रोगमुक्त करणे हे पहिले कार्य होय . त्याचबरोबर ज्यांना मलेरिया झालेला नाही त्यांचे या रोगापासून पूर्णपणे संरक्षण करणे हे तितकेच महत्त्वाचे परंतु अतिशय कठीण काम आहे .
ब ) परोपजीवांच्या Asexual व Sexual अशा दोनही अवस्थांचा समूळ नायनाट होणे आवश्यक आहे . असे केल्यास डासांच्या शरीरात शिरण्यास ते शिल्लक उरणार नाहीत . याकरिता पूर्ण औषधोपचार होण्याची आवश्यकता आहे . अर्ध्यावर मधेच औषधे सोडणे अतिशय घातक आहे . त्यातच औषधे निकामी ठरविण्याची त्यांची प्रवृत्ती दर दशकागणिक एकेका औषधांच्या गटांबरोबर नियमितपणे चालत आलेली आहे .
क ) डास ( मलेरियाचे मुख्य वाहक ) त्याची अंडी , अळी , पुपा ( कोश ) यांचा संपूर्ण नायनाट विविध पद्धतीने करणे व डासांनी माणसाला चावण्याचे मार्ग विविध उपायांनी बंद करणे हे मलेरिया निर्मूलनाच्या कामातील दोन अतिमहत्त्वाचे घटक आहेत .
प्राचीन रोमन , इजिप्शियन इतिहासात तसेच राणी क्लिओपात्राच्या महालातील अंतपुराच्या वर्णनात मच्छरदाणीचा उल्लेख , इतकेच नव्हे तर नेपोलियन युद्धावर जाताना तंबूमधील सामानात आढळलेल्या मच्छरदाण्या यावरून हे सर्व डासांच्या विरोधात असल्याचे सूचित होते
डासांच्या चावण्यापासून पूर्णपणे सुटकेचा सर्वात उत्तम व खात्रीचा उपाय म्हणजे मच्छर दाणीत ३६५ दिवस झोपणे हाच आहे . World Health Organization ने मच्छरदाणी वापरणे यास पहिल्या नंबरचा उपाय म्हणून घोषित केलेले आहे . काही मच्छरदाण्या कीटकनाशक द्रावाचा फवारा मारूनच तयार केल्या जातात . आजकाल प्रवासात घडी मोडून नेता येणाऱ्या मच्छरदाण्याही मिळतात . उदा . बर्गे यामिनी या कंपनीच्या बनविलेल्या मच्छरदाण्या होय . मच्छरदाणीतून बाहेर पडताना कोणतीही फट न राहाणे आवश्यक असते . तसेच कोठेही फाटून भोक नाही याची खबरदारी घ्यावी . जेवढी जाळी बारीक व पक्की तेवढा डासाला प्रतिबंध अधिक , मच्छरदाणीत झोपण्याची सवय करणे म्हणजे तसे पाहू गेल्यास दिव्यच असते परंतु त्याला तरणोपाय नाही . मच्छरदाणीचा उपयोग दुहेरी पद्धतीने होतो . यामुळे मूलत : मादी डासाला मनुष्याचे रक्त शोषण्यास मिळत नाही व हे मुख्य अन्नच न मिळाल्याने मादी डासाकडून अंडी टाकण्याची प्रक्रियाच थांबते व अर्थात त्यामुळे डासांची प्रजोत्पत्तीच खुंटल्याने त्यांच्या संख्येत प्रचंड घट होते . दुसरा महत्त्वाचा उपयोग म्हणजे मलेरियाच्या रुग्णाचे रक्त डासांना न मिळाल्याने मलेरियाचे परोपजीवी डासाच्या शरीरात शिरू शकत नाहीत . त्यामुळे परोपजीवांच्या जीवनचक्राला खीळ बसते .
मादी डासाची अंडी तुंबलेल्या पाणथळीत सर्वात जास्त प्रमाणात असतात . अशी साचलेली डबकी बनण्याची अनेक कारणे आहेत . फुटक्या काचेच्या बाटल्या , प्लॅस्टिकच्या बाटल्या व पिशव्या , मोटारी व दुचाकींचे टाकून दिलेले रबरी टायर्स अशा अनेक माध्यमातून पाण्याची डबकी तयार होतात . परंतु ह्याबरोबरच आज शहरांत तयार झालेली डासांची आगरे मुख्यत : नवीन टॉवर्सची बांधकामे , मेट्रो रेल्वे , वॉक वे ची कामे , उड्डाणपूल बांधकामे ह्या जागा आहेत . स्लॅब टाकताना , सिमेंट क्युरींग करताना २ ते ३ आठवडे साठविले जाणारे पाणी , उंच टॉवर्सच्या बांधकामापूर्वी खोलपर्यंत पायासाठी होणारी खोदाई ( जणु तो गढूळ पाण्याचा तलावच असतो ) या सर्व गोष्टींमुळे डासांसाठी जागोजागी उत्तम वसतीस्थानेच तयार होतात . या सर्व कामांच्या ठिकाणी काम करणारा मजूर वर्ग अतिशय गरीब , कुपोषणाने ग्रासलेला व बरेच मजूर हे बाहेरील प्रदेशातून आलेले असतात . जेथे मलेरियाने कायमचे ठाण मांडलेलेच असते . त्यातील बऱ्याच मजूरांना मलेरिया हा रोग आधी झालेला असतानाच कामाकरिता ते शहरात आलेले असतात . त्यातही कामाकरिता लागणारे पाणी अशा जुन्या विहिरीतून घेतलेले असते ज्यामधील पाण्यात डासांचे कायमचे वास्तव्य असते . त्यामुळे अशा बांधकामांच्या जागांमुळे हे डास व मलेरियाचे परोपजीवी या दोघांचा प्रसाद अखंडपणे शहरवासियांना मिळत असतो . या सर्व समस्येवर युद्ध पातळीवर योजना आखणे
आवश्यक आहे . पावसाळ्यात ही परिस्थिती जास्त गंभीर असते परंतु वर्षभर मलेरिया चालूच असतो . कोट्यावधी रुपयांची उलाढाल करणारे बिल्डर्स दुर्दैवाने या समस्येकडे गांभिर्याने लक्ष देत नाहीत व हवालदील झालेले शहरवासी मुकाट्याने मलेरिया विरुद्ध लढत असतात .
सर्व इमारतींच्या बाहेरील बाजूस पाण्याचा निचरा होण्याकरिता उत्तम बांधकाम योजनेची गरज आहे . घराच्या सर्व खिडक्या व दारांना उत्तम बारीक जाळी लावून घेणे हा एकमेव उपाय आहे . याबाबतचा कायदा प्रथम अमेरिकन बिल्डर असोसिओशनवर जारी करण्यात आला होता व तो देशभर कसोशीने पाळला गेला आहे . डास घरात शिरण्याच्या वेळा संध्याकाळी ५ ते ७ व पहाटे ४ ते ६ अशा आहेत . त्यावेळात घरात शिरलेले डास लपून राहून केव्हाही चावण्यास तत्पर असतात . तेव्हा यावर बारीक जाळी लावणे हा एकमेव ठाम उपाय आहे .
पाण्यातील विरघळलेल्या विविध क्षारांच्या प्रमाणावर डासांची अंडी वाढणे वा वाढ रोखणे अवलंबून असते . पाण्यात मीठाचे प्रमाण जास्त असल्यास डासांची वाढ रोखली जाते . समुद्राचे पाणी ठराविक प्रमाणात डबक्यातील पाण्यात मिसळल्यास डासांच्या वाढीवर विपरीत परिणाम होतो . याचा उपयोग केरळ राज्यात ' कोचिन समुद्र पाणी ' वापरून डासांची वाढ रोखण्यासाठी केला गेला आहे .
डास वाढीतील पुढला टप्पा म्हणजे लार्व्हे वा अळी अवस्था यांचा नायनाट Themiphos , Fenthion या रसायनामुळे करता येतो . या रासायनिक द्रव्यामुळे अळ्या गुदमरुन मरण पावतात . काही जातीचे जलप्राणी , जिवाणू ( Bacteria ) विषाणू ( Virus ) यांचा उपयोग अळ्या नष्ट करण्यासाठी करतात . या बाबतचे नवीन शास्त्र विकसित होत आहे . Guppy , Gambusia जातीचे मासे नुकतेच वाढणारे लार्व्हे फस्त करतात . ते त्यांचे आवडीचे खाद्य असल्याने या जातीच्या माशांची वाढ करून ते विविध डबक्यांमध्ये सोडतात . Bacillus spaericus , Bacillus thuringiensis , Mermitid Nematode , Notonecid ( bug ) , Amblyospora ( protozoa ) , Coelomomyces ( Fungus ) Nuclece Polyhedron ( Virus ) , Cyclopoid ( crustacean ) असे हे विविध जलचर , जिवाणू , विषाणू लार्व्हेची वाढ रोखण्यास मदत करतात .
काही गमतीशीर अनुभवांचे किस्से खाली देत आहोत .
सरकारी फतवा व डासांची होणारी वाढ :
कच्छ हा रेताड वाळवंटाचा प्रदेश , तेथे डासांची वाढ अत्यल्प होत असे . शेतीसाठी त्या भागात दिवसा पाणीपुरवठा होत असे . डासांच्या वाढीसाठी तेथे कोणतीच गोष्ट पूरक नव्हती . पुढे विद्युतभार नियमन आले आणि सरकारने दिवसा विद्युतपुरवठा कारखान्यांसाठी व रात्रीला पाण्याचा पुरवठा शेतीला देण्यास सुरवात केली . प्रथम काही महिने शेतकरी रात्र रात्र जागून पाण्याचे नियोजन व्यवस्थित करीत . सरकारच्या धोरणात कोणताच बदल होत नव्हता . शेतकरी रात्रीच्या जागरणांना कंटाळले व त्यांनी शेतात पाणथळी तयार केली . त्यामध्ये रात्रभर पाणी भरुन वाहू लागले . आजूबाजूला चिखल व दलदल सुरू झाली . डासांचे फावले व हा हा म्हणता डासांची प्रजा प्रचंड वाढू लागली . मलेरिया होऊ लागला . एका वीज नियमनाच्या धोरणाने डासांचे मात्र फावले .
एक साधुबाबा खेड्यात रहात . त्यांच्याबद्दल अशी ग्वाही देत असत की ते उघड्यावर , सांडपाण्याजवळ जरी झोपले तरी त्यांना डास कधीही चावत नसत . या साधुबाबांचे अन्न हे विविध तऱ्हेची पाने , त्यांचा रस हेच असे . त्यांच्या शरीरामधून उर्त्सजित होणारे घटक डासांना धोकादायक असल्याने साधुबाबांच्या वाटेला ते जात नसत .
एका लहान मुलांच्या अनाथगृहातील एका विशिष्ट खोलीत राहणाऱ्या मुलांना मलेरिया होत असे . यासंबंधित कारण शोधताना एका जुनाट बाटलीतील पाण्यात पाणवेल ठेवल्याने डासांच्या अळ्या तयार झालेल्या होत्या व त्यातून डासांची फौज तयार होत असे .
डासांचा नायनाट करण्याच्या पद्धती :
डासांचा रासायनिक पद्धतीने नाश करण्याचा ओनामा D.D.T. Dichlorodiphenyltrichloroethane ) या जगप्रसिद्ध कीटकनाशकाच्या शोधापासून सुरू झाला . Paul Hermann Muller यांना १ ९ ४८ सालातील वैद्यकीय शास्त्रातील Physiology विभागाचे नोबेल पारितोषिक D.D.T. संशोधनाकरिता मिळाले होते .
१९४५ साली मलेरिया निर्मूलन हा राष्ट्रीय कार्यक्रम म्हणून हाती घेणारा व्हेनेझुएला हा जगातील पहिला देश होता . तेव्हापासून जगभर D.D.T. ह्या कीटकनाशकाचा उपयोग डास निर्मूलनाकरिता राष्ट्रीय पातळीवर जोरात सुरू झाला . पहिली पंधरा वर्षे डासांची प्रजा नष्ट करण्यात जबरदस्त यश आले व मलेरियावर मात करण्याचा विजय दृष्टीक्षेपात दिसू लागला . १ ९ ५५ च्या सुमारास D.D.T. ला दाद न देणारे ( Resistant ) डास प्रथम ग्रीसमध्ये आढळले व हळूहळू जगभर ही समस्या उभी राहात गेली . D.D.T. च्या नुसत्या फवाऱ्याने सुद्धा डासांच्या घरात शिरण्याच्या पद्धतीत अडथळा येतो . रसायनाचा थोडा अंश घराच्या भिंतीवर बरेच दिवस टिकतो त्यामुळे डासांनी जरी घरात प्रवेश केला तरी त्यांची मनुष्याला चावण्याची क्षमता नाहिशी होते . याला संपर्क विषबाधा म्हणतात .
डासांना पिटाळून लावणारी विविध रसायने :
१ ) D.D.T. व Pyrethrum यांचे फवारे
२ ) Melethion ( organo phosphorus ) मैदानात , इमारतींच्या बाजूच्या मोकळ्या जागेत पसरविणे
३ ) 30 % Pyrethrum Extract
४ ) Diethyl Tolumide हे ओडोमस मधील मुख्य रसायन
५ ) Citrona मिश्रित मेणबत्या ( सोकिंग कॉईल्स )
६ ) कापराच्या ( Camphor ) वड्या मंदपणे Coil वर जळत ठेवणे . अथवा कापराच्या वड्या गार किंवा कोमट पाण्यात ठेवल्याने त्याचा वास हळूहळू खोलीत पसरतो .
७ ) कांदा फोडून पाण्यात पसरट बशीत खोलीच्या कोपऱ्यात ठेवणे
८ ) Citronella याला डास - वनस्पतीच म्हणतात . त्यापासून तयार केलेली तेल , मलमे अंगाला लावतात .
९ ) Ageratum या वनस्पतीच्या फुलातून निघणारा Coumarin हा द्राव डासांना घातक असल्याने ते या झाडापासून दूर पळतात .
१० ) Deep cantrip , Horsemint या वनस्पती घराच्या बाहेरील अंगणात लावल्यास डास घरात शिरत नाहीत .
११ ) कडुनिंबाची सुकलेली पाने जाळणे .
१२ ) गाईच्या शेणाच्या गोवऱ्यांचा धूर करणे .
१३ ) अंगाला लावण्याची तेले युकॅलिप्टस , जर्मेनियम , लवंग , नीम , संत्रे , लिंब यांचा एकत्रित बनविलेला रस , कडुनिंब नारळ वा ऑलिव्ह तेल मिश्रण १ : ४ प्रमाणात बनविणे
१४ ) डबक्यात टाकण्याची रसायने पॅरीस ग्रीन , रॉकेल , कॉपर सल्फेट या सर्व रसायनांचा फवारा छोट्याशा यंत्राद्वारे संपूर्ण मोठ्या गावात करता येतो . फवारणीनंतर काही महिने त्यांचा प्रभाव राहू शकतो त्याला Residual Spraying effect म्हणतात .
१५ ) Bacillus Thuringiensis Variety
Israelensis ( BTI ) हे जंतूपासून निघणारे विषारी द्राव डास निर्मुलनात मुंबई महानगरपालिका वापरण्याच्या विचारात आहे . त्याबाबतची तपासणी हाफकिन इंस्टिट्युट मध्ये चालू आहे . या रसायनाकडे प्रथम डास आकर्षित होतात . नंतर त्यांच्या शरीरात ते रसायन पसरले जाते व ते डास मारले जातात . एकदा मारलेल्या फवाऱ्याचा परिणाम महिनाभर राहू शकेल असा कंपन्यांचा दावा आहे .
या सर्व रासायनिक फवाऱ्यांचे व अंगाला लावल्या जाणाऱ्या मलमांचे , तेलाचे श्वसन संस्था ( खोकला , सर्दी , दम्याचा Attack ) त्वचेवर येणारे पुरळ , लाली या सर्व प्रकारांनी मनुष्याच्या शरीरावर होणाऱ्या दुष्परिणामांचा विचार होणे तितकेच गरजेचे आहे .
डासांना मारण्यासाठी बाजारात बॅटरीवर चालणाऱ्या रॅकेटस आलेल्या आहेत . त्याने १०० % डास मरतात परंतु अशा पद्धतीतून किती डास मारले जाणार हाही एक मोठा प्रश्न आहे .
गडद रंगाचे कपडे घालणाऱ्या व्यक्तिकडे तसेच ज्यांच्या घामामध्ये कार्बनडाय ऑक्साईड व लॅक्टिक अॅसिड यांचे प्रमाण जास्त असते अशा लोकांकडे डास हे जास्त प्रमाणात आकर्षित होतात . नैसर्गिक घटकांपासून बनविलेली मलमे लावल्याने डासांना घामामधील रासायनिक द्रव्यांचा सुगावा लागत नाही व पर्यायाने डासांना माणसाचे अस्तित्व जाणवत नाही .
डी.आर.डी.ओ. या संस्थेने मॅक्सो मिलिटरी , मेक्सो सेफ व सॉफ्टवारप अशी मलमे बनविली आहेत . या मलमांचे टिशु पेपर ही उपलब्ध आहेत . डासांना फसविणाऱ्या रेणूंचा यात वापर केला आहे . बऱ्याच मलमांचा सुवास डासांना पिटाळून लावणारा असतो .
मलेरिया नियंत्रण आखणी
सिसिली ( इटाली ) मध्ये २५०० वर्षांपूर्वी तापाची साथ आटोक्यात आणण्यासाठी पाण्याची डबकी बुजविण्याचे यशस्वी प्रयोग करण्यात आले होते . ( मात्र तेव्हा मलेरिया परोपजीवी - माणूस - डास यांच्या संबंधाबाबतचे काहीही ज्ञान नव्हते ) १ ९ व्या शतकात ब्रिटनमध्ये अशा तऱ्हेचे अनेक कार्यक्रम राबविण्यात आले होते . १ ९ ०१ मध्ये लाहोर ( पाकिस्तान ) जवळील मियाँमीर या गावात इंग्रज सरकारने असाच कार्यक्रम राबविला होता . परंतु त्यामध्ये फारसे यश मिळाले नव्हते . पुढे अमेरिका व युरोपियन देशात बांधकाम क्षेत्रात आमूलाग्र बदल घडून आला . सांडपाण्याची व्यवस्था चोख झाली आणि डासांचे निर्मूलन जवळजवळ १०० % यशस्वी झाले व मलेरिया नाहीसा झाला .
१ ९ ५७ मध्ये मलेरिया निर्मूलन कार्यक्रमाची महत्त्वाकांक्षी योजना जागतिक आरोग्य संस्थेने आखली परंतु ही योजना अफ्रिका , भारत , श्रीलंका , पाकिस्तान या देशात बऱ्याच अंशी अपयशी ठरली . काही भागांमध्ये तर साथीने थैमान घातले . तेव्हा हा कार्यक्रम वस्तुनिष्ठ असण्याची गरज भासली . यानंतर त्याची आखणी निर्मूलनाऐवजी नियंत्रण अशी करण्यात आली .
मलेरिया हा ऋतूशी निगडीत असून भारतात जुलै ते नोव्हेंबर दरम्यान त्याचे प्रमाण सर्वात जास्त असते . १८ ते ३० सेंटीग्रेड तापमानात डासाच्या शरीरात मलेरिया परोपजीवांची व्यवस्थित वाढ होते . अति थंड व अति उष्ण हवामानात मलेरिया होण्याचे प्रमाण कमी होते . वातावरणातील आर्द्रतेचा डासाच्या अपेक्षित आयुष्यमानाशी जवळचा संबंध असतो . सापेक्ष आर्द्रता कमी असल्यास डास जास्त काळ जिवंत राहू शकत नाहीत . आर्द्रता अधिक असल्यास त्यांची कार्यक्षमता वाढते व ते जास्त अन्न मिळविण्याचा प्रयत्न करतात , म्हणजे ओघानेच जास्त लोकांना चावण्याचा सपाटा सुरू करतात .
साधारणपणे पावसामुळे डासांची पैदास वाढते व त्यामुळे मलेरिया होण्याचे प्रमाण तेव्हा जास्त असते . काही वेळा त्याचे साथीत रूपांतर होते . मात्र धुवाधार पावसात डासांची पैदास करणाऱ्या डबक्यांच्या जागा वाहून गेल्याने मलेरिया पसरविणाऱ्या अॅनॉफेलीस जातीचे डास या विपरीत हवामानात सहसा आढळत नाहीत .
मलेरिया नियंत्रण
१ ) डास निर्मूलन कार्यक्रमाची अंमलबजावणी युद्ध पातळीवर होणे आवश्यक आहे . या कामाच्या पाठीमागे सामाजिक व राजकीय कार्यकर्त्यांची इच्छाशक्ती व पैशाचे पाठबळ यावरच निर्मूलन किती प्रभावी ठरेल हे सर्वस्वी अवलंबून आहे .
२ ) रोगाचे निदान झाल्यावर लवकरात लवकर योग्य औषधे चालू करणे .
३ ) रक्तामधील निदानाप्रमाणे योग्य औषधाची निवड
४ ) औषधांना दाद न देण्याचे परोपजीवांचे प्रमाण किती आहे यावर रोग आटोक्यात येणे अवलंबून आहे .
५ ) देशा - देशाप्रमाणे माणसांमधील प्रतिबंधकारक शक्तीची पातळी निरनिराळी असल्याने औषधांचा परिणाम सारखाच राहू शकत नाही .
६ ) औषधांच्या किमती ही गरीब देशातील जनतेसमोर गंभीर समस्या आहे . महाग किमतीच्या औषधांचा वापर करणे अशक्य असते व ती न वापरता आल्याने रोग नियंत्रणात आणणे कठीण जाते .
७ ) ज्या प्रदेशात मलेरियाचा प्रादुर्भाव नसतो तेथील प्रवासी संयोगाने मलेरिया ग्रस्त भागात गेल्यास त्याला मलेरिया होण्याची शक्यता जास्त प्रमाणात असते .
या सर्व मुद्द्यावर सविस्तर चर्चा घडवून जागतिक आरोग्य संघटनेने ( W.H.O. ) मलेरिया निर्मूलन कामासाठी कार्केन पद्धतीची योजना आखलेली आहे . ज्यायोगे जगभर समान धोरण अवलंबिले जावे या दृष्टीकोनातून नियमावलीची आखणी केलेली आहे . यामुळे मलेरिया रोगाचे निर्मूलन शक्य होणार आहे .
-डॉ. अविनाश वैद्य
October 31, 2022

शिवमहिम्न स्तोत्र – मराठी अर्थासह – भाग २
अमुष्य त्वत्सेवासमधिगतसारं भुजवनं
बलात्कैलासेऽपि त्वदधिवसतौ विक्रमयतः ।
अलभ्या पातालेऽप्यलसचलितागुष्ठशिरसि
प्रतिष्ठा त्वय्यासीद् ध्रुवमुपचितो मुह्यति खलः ।।12।।
मराठी- तसेच ज्या रावणाच्या हातांना तुझ्या सेवेच्या प्रसादाने प्रचंड बळ मिळाले, त्यानेच जबरदस्तीने तुझ्या निवासात जोर जबरदस्तीचा प्रयत्न केला. त्याच्या मस्तकावर तुझ्या नुसत्या अंगठ्याच्या दाबाने त्याला पाताळातही प्रतिष्ठा लाभली नाही. खरोखर, भरभराट झाली की दुष्ट प्रवृत्तीचा माणूस चुकतोच.
कृपेने लंकेशा भुजबळ तुझ्या लाभ, परि तो
मदाने कैलासा उचलत बळें यत्न करतो ।
दबे अंगुष्ठाने तव, न मिळतो मान वितली (वितल- सप्तपाताळांपैकी एक)
खलाची ऐश्वर्ये खचितच असे बुद्धि फिरली ॥ १२॥
यदृद्धिं सुत्राम्णो वरद ! परमोच्चैरपि सतीम्
अधश्चक्रे बाणः परिजनविधेयत्रिभुवनः ।
न तच्चित्रं तस्मिन् वरिवसितरि त्वच्चरणयोः
न कस्याप्युन्नत्यै भवति शिरसस्त्वय्यवनतिः ।।13।।
मराठी- हे (भक्तांना) वर देणार्या शंभो, तिन्ही लोकांना आपल्या सेवकांप्रमाणे ताब्यात ठेवणार्या, इंद्रादि देवांपेक्षाही अधिक संपत्ती जमवणार्या बाणासुराने तुझ्या चरणी माथा टेकला यात त्याच्यासाठी आश्चर्याची गोष्ट काहीच नाही. तुझ्या चरणी डोके टेकल्यावर कोणाची प्रगती होत नाही ?
तिन्हॊ लोकी बाणासुर हुकुम चाले, जमवितो
सुरांपेक्षा जादा मिळकत, परी दंडवत तो ।
तुझ्या पायी, तेणे चकित न कुणी होय जगती
पदी माथा टेके नच मग कशी होत प्रगती ॥ १३ ॥
अकाण्डब्रह्माण्डक्षयचकितदेवासुरकृपा
विधेयस्याऽऽसीद्यस्त्रिनयन विषं संहृतवतः ।
स कल्माषः कण्ठे तव न कुरुते न श्रियमहो
विकारोऽपि श्लाघ्यो भुवनभयभङ्गव्यसनिनः ।।14।।
मराठी- हे त्रिलोचन शंकरा, (समुद्रमंथनाच्या वेळी) (हलाहल विष बाहेर पडल्याने) सर्व जग अनपेक्षित रीत्या नाशाच्या भीतीने भयभीत झालेले असतांना, देव आणि दानव यांच्यावर कृपा करण्यासाठी ते विष आपल्या कंठात एकत्रित केल्याने (प्राशन केल्याने) तुझा कंठ डागाळला. तो (काळा डाग) तुझे सौंदर्य वाढवीत नाही असे नाही. जगाचे भय दूर करण्याचा वसा असणार्यांमधील (एखादी) विकृती स्तुत्यच होय.
निघे एकाएकी विष, सुर तसे दैत्य डरले
हिता विश्वाच्या, तू गिळुन विष कंठात धरिले ।
निळा धब्बा ग्रीवे, सुभग रुप ते का न खुलते?
उखाडे जो भीती, पुसट विकृती स्तुत्य ठरते ॥ १४ ॥
असिद्धार्था नैव क्वचिदपि सदेवासुरनरे
निवर्तन्ते नित्यं जगति जयिनो यस्य विशिखाः ।
स पश्यन्नीश त्वामितरसुरसाधारणमभूत्
स्मरः स्मर्तव्यात्मा नहि वशिषु पथ्यः परिभवः ।।15।।
मराठी- हे शंभो, या देव,दानव व मानव भरलेल्या जगात ज्या विजेत्याचे बाण कधीतरीच आपले नेहेमीचे कार्य न करता परततात, तो (मदन) तुलाही इतर सर्वसाधारण देवांपैकी आहेस असे समजला आणि स्वतःच नामशेष झाला. जितेंद्रियांची मानखंडना हितकर होत नाही हेच खरे !
जगी या दैत्यांच्या, मनुज, सुर यांच्या, कधितरी
जयाच्या बाणांना यश न, अवमान स्मर करी । (स्मर - मदन)
तुला कल्पूनीया इतरजन, तो भस्म बनला
बधे ना जो गात्रां, अविनय तयाचा नच भला ॥ १५ ॥
मही पादाघाताद् व्रजति सहसा संशयपदं
पदं विष्णोर्धाम्यद्भुज-परिघ-रुग्ण-ग्रह-गणम्।
मुहुद्यौदौस्थ्यं यात्यनिभृतजटाताडिततटा
जगद्रक्षायै त्वं नटसि ननु वामैव विभुता ।।16।।
मराठी- खरोखर जगाच्या रक्षणासाठी तू नृत्य करतोस. तथापि, त्या नृत्या दरम्यान होणार्या पायाच्या आघातांनी पृथ्वीचा थरकाप होतो, विष्णूचे पद म्हणजे आकाश, जिथे तुझ्या फिरणार्या हातांनी ग्रहांचे तुकडे झालेले दिसतात, आणि तुझ्या पिंजारलेल्या जटांच्या झटक्याने स्वर्गाच्या किनार्यांची दुरवस्था होते. खरोखर (कधीकधी) (जगासाठी हितकारक) मोठ्या गोष्टीही तापदायक होतात.
जगासी राखाया करिसि तव नृत्या, परि धरा
पदन्यासे कापे, नभभर ग्रहांचाच कचरा ।
करांच्या घेर्याने, सुरपुर तटी क्षोभ उठतो (सुरपुर- स्वर्ग)
जटांच्या आघातें, जनहित कधी त्रास ठरतो ॥ १६ ॥
वियद्व्यापी तारा-गण-गुणित-फेनोद्गम-रुचिः
प्रवाहो वारां यः पृषतलघुदृष्टः शिरसि ते ।
जगद्द्वीपाकारं जलधिवलयं तेन कृतमि
त्यनेनैवोन्नेयं धृतमहिम दिव्यं तव वपुः ।।17।।
मराठी- पूर्ण आकाशाला व्यापणार्या आणि नक्षत्रांच्या तेजाने वाढत्या चमचमणार्या फेसाने युक्त (आकाशगंगेच्या) जलाचा प्रवाह, ज्याने या पृथ्वीला वेढून एखाद्या बेटाप्रमाणे केले आहे, तुझ्या मस्तकावर केवळ एका छोट्याशा थेंबाप्रमाणे दिसतो, यावरूनच तुझ्या दिव्य देहाचे माहात्म्य प्रतीत होते.
प्रभा स्वर्गंगेची चमचम नभी फेस पसरे (स्वर्गंगा- आकाशगंगा)
प्रवाहाने वेढी वसुमति दिसे बेटच बरे । (वसुमति- पृथ्वी)
शिरी वाटे छोटे टिपुसच तुझ्या शोभुन दिसे
प्रचीती व्याप्तीची तव मम मनी दिव्यच ठसे ॥ १७ ॥
रथः क्षोणी यन्ता शतधृतिरगेन्द्रो धनुरथो
रथाङ्गे चन्द्रार्कौरथचरणपाणिः शर इति।
दिधक्षोस्ते कोऽयं त्रिपुरतृणमाडम्बरविधि
विधेयैः क्रीडन्त्यो न खलु परतन्त्राः प्रभुधियः ।।18।।
मराठी- त्रिपुरासुरासारख्या गवताला जाळण्यासाठी पृथ्वीचा रथ, त्याला चंद्र-सूर्याची दोन चाके, इन्द्रासारखा सारथी, श्रेष्ठ (मेरू) पर्वत / श्रेष्ठ सर्प (वासुकी) यांचे धनुष्य, ज्याचे हाती चक्र आहे असा (चक्रपाणी) विष्णू बाण, एवढे सगळे अवडंबर कशासाठी ? खरोखर, परमेश्वराची बुद्धी स्वतःच्या विचारानेच चालते, इतरांच्या नाही हेच खरे !
कशाला सामग्री त्रिपुर गवता भस्म करता
धुरे जिष्णू, विष्णू शर, नि शकटा चंद्र सविता । (धुरा– सारथ्याची जागा, जिष्णू– इन्द्र, शकट–गाडा,रथ)
धनू मेरू-सर्पासह, रथ मही, ईश्वर मती
कशी चाले, बुद्धी इतर मनुजां तेथ न गती ॥ १८ ॥
टीप- या श्लोकाला संदर्भ शिव पुराण व मत्स्य पुराणातील, शंकराने सर्व देवांच्या साहाय्याने, मेरु पर्वताचे धनुष्य व वासुकीची प्रत्यंचा बनवून त्रिपुरांचा नाश केला त्या कथेचा आहे. तसेच श्रीमद् शंकराचार्यांच्या ‘ चंद्रशेखराष्टका’तही अशाच वर्णानाचा श्लोक आहे त्याची आठवण होते.
हरिस्ते साहस्रं कमलबलिमाधाय पदयोः
यदेकोने तस्मिन्निजमुदहरन्नेत्रकमलम् ।
गतो भक्त्युद्रेकः परिणतिमसौ चक्रवपुषा
त्रयाणां रक्षायै त्रिपुरहर जागर्ति जगताम् ।।19।।
मराठी- हे तिन्ही नगरांचा नाश करणार्या शंभो, श्रीविष्णूने तुझ्या पायांवर एक हजार कमळे अर्पण केली, त्यात एक कमी पडले असता त्याने (संख्या पूर्ण करण्यासाठी) आपले एक नेत्र रूपी कमळ वाहिले. हा भक्तीचा आवेग (सुदर्शन) चक्राच्या स्वरूपात दृश्य झाला आणि तो तिन्ही जगतांच्या रक्षणासाठी जागृत असतो.
तुझ्या पायी पद्मे दशशत हरी एक पडते
कमी, अर्पी नेत्रा कमल म्हणुनी भक्तिपर ते ।
उमाळा भक्तीचा प्रकटत जणू चक्र फिरते
तिन्ही लोकी जागे, सतत जन-सांभाळ करिते ॥ १९ ॥
टीप- विष्णु पुराणानुसार सुदर्शन ही विश्वकर्म्याची निर्मिती असून महाभारतातील उल्लेखानुसार ते अग्नीने कृष्णाला ‘कालचक्र’ म्हणून भेट दिले. शिवपुराणानुसार ते शंकराने विष्णूला वर म्हणून दिले.
क्रतौ सुप्ते जाग्रत्त्वमसि फलयोगे क्रतुमतां
क्व कर्म प्रध्वस्तं फलति पुरुषाराधनमृते।
अतस्त्वां सम्प्रेक्ष्य क्रतुषु फलदानप्रतिभुवम्
श्रुतौ श्रद्धां बद्ध्वा दृढपरिकरः कर्मसु जनः ।।20।।
मराठी- यज्ञ समाप्तीनंतर (यज्ञ संपला तरी) त्याचे फळ देण्यासाठी तू सज्ज असतोस. परमेश्वराच्या आराधनेशिवाय समाप्त यज्ञकर्माचे फळ कसे काय मिळेल ? त्यामुळे यज्ञानंतर फलदानाचे कार्य तू करतोस हे पाहून लोक वेदवचनावर विश्वास ठेऊन यज्ञ करायला उद्युक्त होतात. (सतीने यज्ञकुंडात उडी मारल्यानंतर शंकराने यज्ञाचा विध्वंस केला. तरीही साधकांना हवनाची चांगली फळे देण्यास तो कटिबद्ध आहे असा गर्भितार्थ.)
तुझा ऐसा बाणा फल वितरणा, ध्वंस हवना
नियंत्याच्या पूजेविण फळ कसे लाभत जना ? ।
जनां वाटे खात्री तव फल वितरणें, ही तव कृती
श्रुतीवक्तव्याचा सकल जन विश्वास करिती ॥ २० ॥
क्रियादक्षो दक्षः क्रतुपतिरधीशस्तनुभृताम्
ऋषीणामात्विज्यं शरणद सदस्याः सुरगणाः।
क्रतुभ्रंशस्त्वत्तः क्रतुफलविधानव्यसनिनो
ध्रुवं कर्तुः श्रद्धाविधुरमभिचाराय हि मखाः ।।21।।
मराठी- हे सर्वांच्या आश्रयदात्या शंभो, आपल्या कर्तव्यांमध्ये प्रवीण व सर्व प्राण्यांचा नायक दक्ष हा यज्ञाचा यजमान (होता), ऋषी त्याचे पुरोहित, सर्व देवगण यज्ञाला उपस्थित, (असे असूनही) ज्याला यज्ञाचे फळ देण्याची आवड आहे अशा तू यज्ञाचा नाश केलास. कारण यागाच्या विधींवर श्रद्धा नसताना केलेले याग यज्ञ करणार्याच्या नाशास कारणीभूत होतात.
पित्याचे पुष्टीच्या हवन सुरसंगे घडतसे (पुष्टी- दक्षाची एक मुलगी)
ऋषी पौरोहित्या, नृप कुशल, शास्ता प्रविणसे ।
तुला गोडी देण्या हवन-फळ, विध्वंस करिसी
अश्रद्धांची कृत्ये-हवन करिती नाशच कशी ॥ २१ ॥
प्रजानाथं नाथ प्रसभमभिकं स्वां दुहितरं।
गतं रोहिद् भूतां रिरमयिषुमृष्यस्य वपुषा ।।
धनुष्पाणेर्यातं दिवमपि सपत्राकृतममुम् ।
त्रसन्तं तेऽद्यापि त्यजति न मृगव्याधरभसः।। २२।।
मराठी- हे नाथा, लाल हरिणीचे रूप घेतलेल्या स्वतःच्या कन्येशी रममाण होण्याच्या लालसेने काळवीटाचे रूप घेऊन अश्लाघ्य रीतीने गेलेल्या, तू हाती धनुष्य घेऊन (बाण मारून जखमी केलेल्या) आणि वेदनेने त्रस्त झालेल्या ब्रह्म्याला, तू आज सुद्धा व्याधाच्या आवेशाने सोडत नाहीस.
मृगी लाली कन्या, लगट मृग कामार्त शरिरी
करी ब्रह्मा मोहें जुलुम जबरीही तिजवरी ।
पळे स्वर्गी जख्मी तव शर शरीरात घुसता
किराताच्या त्वेषे अजुन खिळवी त्यास पुरता ॥ २२ ॥
टीप- या श्लोकात ब्रह्मवैवर्त पुराण, मत्स्य पुराण, अनेक ब्राह्मण ग्रंथ, श्रीमद् भागवत व इतर अनेक पुराणांमध्ये ब्रह्मा व सरस्वती यांच्या संदर्भात आलेल्या गोष्टींवर आधारित, आकाशात दिसणार्या मृगनक्षत्र व व्याधाचा तारा यांच्यावर कल्पनाविलास केलेला आढळतो. या किराताच्या उल्लेखाबरोबर ‘किरातार्जुनीयम्’ मधील अर्जुन व किरात यांच्यातील युद्धाचीही आठवण झाल्याखेरीज रहात नाही.
स्वलावण्याशंसा धृतधनुषमह्नाय तृणवत्
पुरः प्लुष्टं दृष्ट्वा पुरमथन पुष्पायुधमपि ।
यदि स्त्रैणं देवी यमनिरतदेहार्धघटनाद् –
अवैति त्वामद्धा बत वरद मुग्धा युवतयः ।।23॥
मराठी- हे तीन नगरांचा नाश करणार्या, वरदायका शंभो, आपल्या सौंदर्याच्या प्रशंसेत (हाती) धनुष्य धरलेल्या मदनाला आपल्या समोर क्षणार्धात जळालेला पाहून सुद्धा, (केवळ), तुझा यम-नियमांनी बद्ध देह अर्धनारीश्वर रूपात संलग्न झाल्याने तू स्त्रीच्या अधीन झालास असे जर देवी पार्वती समजत असेल.... अरेरे तरुण स्त्रिया खरोखर भोळ्या असतात.
स्तुती रुपाची त्या, मदन धनुषा घेउन करी
झणी पाहे त्याची जळुन उरली राखच, तरी ।
असे वाटे, अर्धी तनु म्हणुन तू लंपट असे
अये देवी, छे छे, युवति मन भोळे अति कसे ॥ २३ ॥
श्मशानेष्वाक्रीडा स्मरहर पिशाचाः सहचराः
चिताभस्मालेपः स्रगपि नृ-करोटीपरिकरः ।
अमाङ्गल्यं शीलं तव भवतु नामैवमखिलम्
तथापि स्मर्तॄणां वरद परमं मङ्गलमसि ।।24।।
मराठी- हे मदनाचा नाश करणार्या शंकरा, स्मशान हे तुझे क्रीडांगण, भूतप्रेते हे तुझे खेळगडी, अंगी चितेतील राखेचा लेप, तसेच गळ्यात मानवी मुंडक्याची माळ असते. तुझे सर्व वर्तन ओंगळ असले तर असू दे, तथापी हे वर देणार्या शंकरा, जे लोक तुझी तुला आठवण काढतात, त्यांच्यासाठी तू मंगलच आहेस.
चिता भस्मा अंगी, मसणवट क्रीडांगण तुला
भुते प्रेते साथी, मनुज कवटी माळहि गळा ।
असो भीतीदायी, मन न मम चिंता करितसे
भले त्याचे होई वरद हृदयी आठवतसे ॥ २४ ॥
**********************
-- धनंजय बोरकर.
(९८३३०७७०९१)
August 21, 2022
संत तुकाराम महाराज यांनी श्री भगवान श्रीकृष्ण यांचे बालपणाचे वर्णन करणारे जे अभंग आहेत, त्या अभंगाला बाळक्रीडा अभंग असे शिर्षनाम देण्यात आलेले असून त्या अभंगांना वारकरी सांप्रदायात फार मोठ्या प्रमाणात गायिल्या जात असतात. हे बाळक्रीडा अभंग ४२ असून त्या सर्व अभंगांना (माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम | ऐसें देईं प्रेम काहीं कळा ||धृ||) हे गाताना एकाच धृपद लावले जाते.
August 20, 2018
हिंदू पंचागनुसार, वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्ष तृतीया तिथीला परशुरामाची जयंती साजरी केली जाते. धर्म ग्रंथांप्रमाणे याच दिवशी विष्णु देवाचे आवेशावतार परशुरामाचा जन्म झाला होता.
May 3, 2022
Copyright © 2025 | Marathisrushti