(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • वूड, प्लायवूड या लाकडांच्या प्रकारात काय फरक असतो?

    लाकूड हे कपाटे, दरवाजे, पार्टिशन व इतर फर्निचर यासाठी वापरतात.

      January 2, 2023


  • शेवटचा राजयोगी गेला..

    तसं पाहायला गेलं तर, मनोहर पर्रीकर काही राष्ट्रीय राजकारणात नव्हते. केंद्रीय संरक्षण मंत्री म्हणून त्यांनी पार पाडलेली अल्पकाळाची जबाबदारी वगळता, त्यांची संपूर्ण कारकीर्द गोव्यापुरतीच मर्यादीत होती. लोकसभेच्या अवघ्या दोन जागा असलेलं, गोवा देशातील सर्वाच लहान राज्य. असं असुनही या लहानश्या राज्यातलं एक व्यक्तिमत्व अखील भारतीय का होतं, त्यांच्या जाण्याने अख्खा देश का हळहळतो, असं काय वेगळेपण होतं या माणसात, याचा विचार करता, हाती लागतं ते एक कारण आणि ते म्हणजे त्यांचा साधेपणा आणि रोजच्या जगण्यातला सहजपणा.

      March 18, 2019


  • रम्य ते बालपण : मुरलीधर नाले

    बालपणीच्या काही आठवणी सुप्त मनाच्या कोपऱ्यात दडलेल्या असतात आणि या स्मृती वाढत्या वयात कधीतरी तळातून उमलणाऱ्या कळीसारख्या हळुवारपणे उमलतात. बालमन जसं निरागस तसंच त्या आठवणीदेखील. जळगाव जिल्ह्यातील एका ५००० लोकवस्तीच्या गावातून मी आलेला. कुटुंबाचा परीघ मोठा. घर लहान परंतु परस्परांमधील नातं अतिशय जिव्हाळ्याचं. बालपणी गावी असलेल्या शेतकी शाळेत सातवीपर्यंतचे शिक्षण झाले.

      June 26, 2022


  • गोलमाल ‘चित्रपटाला ४३ वर्षे पूर्ण झाली

    मुंबईत ड्रीमलॅन्ड थिएटरमध्ये या चित्रपटाने खणखणीत रौप्यमहोत्सवी यश संपादले. या चित्रपटातील अमोल पालेकर यांची रामप्रसाद आणि लक्ष्मीप्रसाद दशरथप्रसाद शर्मा अशी दोन रुपे घेतलेली भूमिका आणि त्यांचा आपले कार्यालयीन बॉस भवानी शंकर ( उत्पल दत्त) यांच्याशी झालेला गंमतीदार संघर्ष या सूत्राभोवती हा खुसखुशीत मार्मिक मिस्कील मनोरंजक चित्रपट रंगला.

      April 20, 2022


  • कायस्थ प्रभुंची कोकण परिसरातील देवी-स्थाने !

    चांद्रसेनीय कायस्थ प्रभु ज्ञातीचा इतिहास हा मुख्यतः स्थलांतराचा इतिहास आहे. इ.स. १३०५ मध्ये मांडवगडच्या पतनानंतर महाराष्ट्रात मुख्यतः कोकण आणि मावळ प्रांतात जी कायस्थ प्रभु कुटुंबे स्थलांतरित झाली त्यांनी ते रहात असलेल्या परिसरातच अध्यात्मिक आधार शोधायचा प्रयत्न केला.

      June 28, 2025


  • युरोप ऑन रेल (युरेल) आणि युरो स्टार – भाग ६

    युरो स्टार

    युरो स्टार ही इंग्लिश खाडीच्या खालून जाणारी रेल्वे. युरोपला गेलं, की यातून जरूर प्रवास करायला हवा इतकी ही प्रख्यात आहे. इंग्लंड देशाची संस्कृती या इंग्लिश खाडीमुळे इतर युरोपियन देशांच्या संस्कृतीपेक्षा भिन्न राहिली. दुसऱ्या महायुद्धात याच खाडीमुळे इंग्लंड जर्मनीच्या हल्यातून वाचलं होतं. इंग्लंड व फ्रान्स या खाडीमुळेच आपलं वेगळेपण टिकवून होते. इंग्लिश खाडीखालील रेल्वेबोगद्यानं दोन्ही शहरं हाकेच्या अंतरावर आली. लंडन, पॅरीस व ब्रुसेल्समधील नागरिक इंग्लंड, फ्रान्स, बेल्जियम अशा देशांत कामाला जातात व रात्री आपापल्या देशात परत येतात. अमेरिकन सोसायटीने १९९४ मध्ये चॅनेल टनेल-ट्रेनला जगातील सात आश्चर्यांपैकी एक म्हणून घोषित केले होते.

    लंडन पॅरिस भुयारी रेलमार्ग निर्माण करण्याची पहिली योजना १८०२ मध्ये मांडली गेली होती; पण दोन्ही देशांतील राजकीय वातावरण एकमेकांबाबत सामंजस्याचे नसल्याने अशी योजना कधीच फलद्रूप होणार नाही असं दोन्ही देशांनी गृहीतच धरलं होतं.

    दुसऱ्या महायुद्धात हिटलर असा बोगदा गुप्तपणे करतही असेल असं ब्रिटिश नागरिकांना वाटत होतं. किंबहुना, असा बोगदा असता तर हिटलरनं ब्रिटिश भूमीवर आपले भक्कम पाय रोवले असते. प्रत्यक्षात १९८२ सालानंतर 'चॅनेल टनेल'चा गंभीर विचार दोन्ही देशांनी केला आणि चक्रं वेगात फिरू लागली. १९८८ मध्ये प्रत्यक्ष कामाला सुरुवात होत १९९४ पर्यंत काम पूर्ण झालं. इंग्लंडमधील फोक्स्टोन केंट स्टेशन या शेवटच्या स्टेशनपासून बोगद्याची सुरुवात होते. समुद्राखालून ५० कि.मी. लांबीचा हा बोगदा फ्रान्समधील कॉक्वेल्स पास-दे-केलिस येथे संपतो. बोगद्यात जाण्या-येण्याचे दोन वेगवेगळे भाग असून, बाजूने सर्व्हिस टनेललाईन आपत्कालीन वेळी वापरण्याकरता ठेवलेली आहे.

    समुद्रपातळीपासून २५० फूट खोलीवर बोगद्याची बांधणी असून, ३५ कि.मी. अंतरावर भर समुद्रात तो ५०० फूट खोलीवर जातो. समुद्रातील वादळं, भूकंप यांपासून कोणताही धोका पोहचणार नाही याची विशेष काळजी घेतलेली आहे. बोगदा बांधणीचं काम १० वेगवेगळ्या कंपन्यांना देण्यात आलेलं होतं. बांधणी खर्चाच्या प्राथमिक अंदाजापेक्षा १४० टक्के जास्त खर्च झाला होता. हा खर्च एकूण ४,६५० मिलियन पाउंड्स म्हणजे आजच्या भावाने एकूण ११ बिलियन पाउंड्स होता. १५,००० कामगार व इंजिनीअर्स दोन्ही बाजूंनी काम पुढे नेत होते. शेवटच्या क्षणाला २ इंच व्यासाचं भोक पाडून एका इंग्लिश कामगाराने फ्रेंच कामागारांशी समारंभपूर्वक हस्तांदोलन केलं. हे काम पूर्ण होईपर्यंत १० कामगारांचा अपघाती मृत्यू झाला होता.

    समुद्राखालून जाताना गाडीचा वेग ताशी १६० कि.मी. इतका असतो. सर्व सिग्नल यंत्रणा ड्रायव्हरला संगणकाच्या पडद्यावर दिसत असते. गाडीचा वेग प्रत्येक भागात ठरलेला आहे. त्या वेगात कमी-जास्त फरक झाल्यास गाडी ताबडतोब थांबविण्याची व्यवस्था आहे. या मार्गावर मालगाड्या, तसंच मोटारी आणि ट्रक्स घेऊन जाणाऱ्या जम्बो मालगाड्या धावत असतात. युरोस्टार गाडी लंडन ते पॅरीस हे ५८० कि.मी. अंतर २ तास १५ मिनिटांत, तर लंडन-ब्रुसेल्स ५१५ कि.मी. १ तास ५० मिनिटांत पूर्ण करते.

    दुर्घटना टाळण्यासाठी अनेक उपाययोजना आहेत. तरी दोन वेळा अघटित घटनांशी सामना करावा लागला होता. १९९६ साली नोव्हेंबर महिन्यात मालगाडीतील एका लॉरीने अचानक पेट घेतल्याने प्रचंड गोंधळ झाला व बोगद्यातील यंत्रणेचं बरंच नुकसान झालं होतं. डिसेंबर २००९ मध्ये प्रचंड हिमवर्षावामुळे एक युरोस्टार गाडी बोगद्यात अडकून पडली होती. असे अपवाद वगळता आतापर्यंत लक्षावधी प्रवाशांनी युरोस्टारने प्रवास केलेला असून, आता ही रेल्वे युरोपची जीवनरेषा बनलेली आहे.

    -– डॉ. अविनाश वैद्य

      October 14, 2022


  • बे एरिया

    सॅनफ्रन्सिस्कोच्या दक्षिणेला काही मैलांवर सॅनहोजे, फ्रिमाँट, डब्लिन, लिव्हरमोर, प्लेझंटन ही शहरे येतात. पॅसिफिक महासागर आणि सॅनफ्रान्सिस्को बे हे दोन्ही समुद्रकिनारे असल्याने इथली हवा आपल्या मुंबईकडे असते तशीच असते. पण इथले हवामान लहरी आहे.

      December 21, 2023


  • बिन भांडवली किंवा अल्प भांडवली व्यवसाय

    उद्योगव्यवसाय म्हटला की त्याला तीन प्रकारच्या भांडवलाची आवश्यकता असते.

    1) पैशांचे भांडवल
    2) वेळेचे भांडवल
    3) मनुष्यबळाचे भांडवल

    अनेक जणांकडे पैशांचे भांडवल उपलब्ध नसते. पण त्यामुळे काळजी करू नये.कारण वेळेचे व मनुष्यबळाचे भांडवल प्रत्येकाकडेच उपलब्ध असते. पण त्याची जाणीवअनेकजणांना नसते. हे भांडवल किती प्रमाणात उपलब्ध असते ते बघुया.

    प्रत्येक माणूस दिवसा कमीत कमी आठ तास तरी काम करू शकतो. माणूस साधारणपणे महिन्यात 25 दिवस काम करतो. म्हणजे तो एका महिन्यात सर्वसाधारणपणे 200 तास काम करतो. रविवार, इतर सुट्या व रजांचा विचार केला तर एक माणूस एका वर्षात साधारणपणे 10 मिहिने किंवा 2000 तास काम करतो. तासाला कमीत कमी 10 रुपये या दराने त्याचे मुल्य काढायचे ठरवले तर, प्रत्येक माणसास दिवसासाठी 80 रुपये, महिन्यासाठी 20000 रुपये व एक वर्षासाठी 2 लाख रुपये मुल्याचा वेळ उपलब्ध असतो.

    मनुष्यबळाचा विचार केला तर पूर्ण वेळ माणुस नोकरीवर ठेवायचा झाला, तर त्याला कमीत कमी महिना 5000 रुपये पगार द्यावा लागतो. म्हणजे वर्षाला कमीत कमी 60000 रुपये पगार द्यावा लागतो.

    वेळेच्या व मनुष्यबळाच्या भांडवलाचा एकत्रित विचार केला तर प्रत्येक माणसाकडे कमीत कमी 2 लाख 60 हजार रुपये भांडवल आपोआप उपलब्ध हे असतेच. अर्थात या भांडवलाचा उपयोग कसा करायचा हे ज्याचे त्याने ठरवायचे असते.

    पूर्वी घरगुती शिकवण्या घेणे, कपडे शिवून देणे, खाद्यपदार्थ किंवापोळ्या करून देणे, पाळणाघर चालवणे यांसारखे अल्प भांडवलाचे व्यवसाय उपलब्ध होते;पण या प्रकारच्या व्यवसायाला प्रतिष्ठा नव्हती.

    आता असे व्यवसाय उपलब्ध आहेत की ज्याला पैशांच्या भांडवलाची गरज भासत नाही किंवा अत्यल्प भांडवलाची गरज भासते. यांना जास्त करून वेळेच्या व मनुष्यबळाच्या भांडवलाची गरज भासते. तसेच या व्यवसायांना बर्‍यापैकी प्रतिष्ठा असते किंवा या व्यवसायात माणसे चांगली प्रतिष्ठा मिळवू शकतात. हे व्यवसाय कोणते हे थोडक्यात बघू.

    1) विमा प्रतिनिधीः-
    भारतामधेविमा व्यवसाय हा अत्यंत वेगाने वाढणार्‍या व्यवसायांपैकी एक व्यवसाय आहे. यामधेआयुर्विमा (LifeInsurance) वसर्वसाधारण विमा (GeneralInsurance) हेदोन प्रकार येतात. आता या क्षेत्रात खाजगी कंपन्यांनी प्रवेश केल्यामुळे स्पर्धावाढली आहे. आता सर्वच विमा कंपन्यांना उच्च दर्जाच्या विमा प्रतिनिधींची गरज आहे.

    2) म्युच्युअल फंड सल्लागारः-
    म्युच्युअल फंड हे गुंतवणुकीचे नवीन साधन उपलब्ध झाले असून, हा पण व्यवसाय प्रचंड वेगाने वाढतो आहे. या ठिकाणी म्युच्युअल फंड सल्लागारांची फार मोठ्या प्रमाणावर आवश्यकता आहे.

    3) विक्री प्रतिनिधीः-
    हल्ली अनेक कंपन्या त्यांच्या उत्पादनांची किंवा सेवांची विक्री दुकानदारांमार्फत न करताविक्री प्रतिनिधींमार्फत करतात. विशेषतः आरोग्यविषयक उत्पादने करणार्‍या कंपन्याहा मार्ग अनुसरतात.

    4) सामुपदेशक (Councilors):-
    मोठ्या प्रमाणावर यांची गरज आहे.

    5) प्रशिक्षक (Trainer) :-
    हल्ली अनेक कंपन्यांना व संस्थांना प्रशिक्षकांची गरज भासते. शिक्षक (Teacher) व प्रशिक्षक (Trainer) यात मोठा फरक आहे. प्रशिक्षक हा त्या क्षेत्रातील तज्ञ असावा लागतो. सचिन तेंडुलकर हा क्रिकेटचा प्रशिक्षक होऊ शकेल पण तो हुतुतु, खोखो, आट्यापाट्या या खेळांचा प्रशिक्षक होऊ शकणार नाही पण शिक्षक होऊ शकेल

    6) सल्लागार (Consultants):-
    हल्ली अनेक कंपन्यांना व संस्थांना सल्लागारांची गरज भासते.

    असे अजुन पुष्कळ व्यवसाय आहेत.

    सर्वसाधारणपणे ग्रामीण भागासाठी 10 वी पास व शहरी भागासाठी 12 वी पास असलेले व 18 च्या वर वय असलेले कोणीही स्त्री-पुरुष हा व्यवसाय करू शकतात. काही व्यवसायांमधे वयाची व शिक्षणाची अट नसते, तसेच अनुभवाची गरज नसते.कॉलेजमधे जाणारे विद्यार्थी, महिला, गृहिणी, तसेच निवृत्त झालेले लोक हा व्यवसाय करू शकतात. हा व्यवसाय ते पुर्ण वेळ (Full Time), अर्ध वेळ (Part Time) किंवा स्वतःच्या सवडीप्रमाणे केव्हाही करू शकतात.. तसेच नोकरी करणारे पण हे व्यवसाय करू शकतात.

    यासाठी ऑफीस, दुकान, गोडाऊन वगैरेची गरज नसते.भांडवली गुंतवणुक जवळ जवळ नसते. इतर व्यापार्‍यांना ठेवावे लागतात तसे अनेक प्रकारचे हिषोब ठेवावे लागत नाहीत. बहुतेक आर्थिक व्यवहार हे कंपनी व ग्राहक यांचेमधे परस्पर होत असतात. विक्री प्रतिनिधींना फक्त कमीशन मिळत असते किंवा फी मिळत असते. त्यामुळे आर्थिक व्यवहारांच्या दृष्टीने हे व्यवसाय फार सोपे असतात.

    ज्यांना लोकांना भेटायची आवड आहे, लोकांशी संवाद साधणे आवडते, उत्तम सादरीकरणाचे कौशल्य आहे, लोकांना आपले म्हणणे पटवण्याची कला आहे (Convincing Power) ते लोक या व्यवसायात यशस्वी होतात असे आढळून आले आहे.

    तरी मराठी लोकांनी या संधीचा फायदा घ्यावा व उद्योग व्यवसायाच्या क्षेत्रात पदार्पण करावे हीच इच्छा व अपेक्षा!

    उल्हास हरी जोशी
    मोः-9226846631

      July 27, 2015


  • माझं हार्मोनियम वादनाचं प्रेम

    आम्ही हुबळीला होतो तेव्हां मी चौथीत होते.,त्यावेळी शाळेत नुकताच गाण्याचा क्लास सुरु झाला होता..पण पाचवीपासून ,त्यामुळे मला सामील होता आलं नाही. एक मोडक नावाचे शिक्षक होते..मी दुपारच्या जेवणाच्या सुट्टीत त्यांना जाऊन भेटले आणि मला पेटी शिकवाल का म्हणून विचारले होते..ते ” हो..हो” म्हणाले , पण जेव्हां मी पिच्छा सोडला नाही तेव्हां त्यांनी मला ” सा रे ग म…” वाजवून कोणतं बोट कुठे ठेवायचं वगैरे सांगितलं.

      April 25, 2023


  • रेल्वे स्टेशनमास्तर

    रेल्वे व्यवस्थापनात स्टेशनमास्तर हे एक महत्त्वाचं आणि जबाबदार पद असतं. मुख्य स्टेशनावरून प्रवासीगाड्या सुटतात किंवा तिथे थांबून पुढील प्रवासाला निघतात; या संपूर्ण काळात स्टेशनवर जे काही घडतं त्या सर्व घटनाक्रमांची संपूर्ण जबाबदारी तेथील सर्वेसर्वा-अधिकारपदावर असलेल्या स्टेशनमास्तरची असते.

      July 12, 2022