वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
आपल्या बागेतील फुल पाहताच कोणाचेही लक्ष वेधून घेणारी वनस्पती म्हणजे ‘अग्निशिखा’ होय.अग्निशिखा ही वनस्पती नष्ट होण्याच्या मार्गावर आहे.जंगलात शोध घेतला तर ही वनस्पती खूपच विरळ प्रमाणात आढळून येत आहे. जंगलांना वारंवार लागणाऱ्या आगींमुळे ह्या वनस्पतीचे जमिनीतील कंद नष्ट होतात.पर्यायाने ही प्रजाती दुर्लभ झाली आहे.नामशेष होण्याच्या मार्गावर असणाऱ्या ह्या वनस्पतीला आपल्या परसबागेत स्थान देण्याची आज निकड निर्माण झाली आहे.
April 14, 2011
देशात पुरेसा पैसा चलनात असला तर उपभोगासाठी त्याचा वापर करून काही रक्कम बचत केली जाऊ शकते. या बचतीने बँकातील ठेवी वाढतात आणि त्यामुळे बँका अधिक कर्ज देऊ शकतात. उपभोक्ते, उद्योजक, शेतकरी, व्यापारी यांना अधिक कर्ज मिळाल्याने अधिक उत्पादन, अधिक विक्री आणि अधिक निर्यात शक्य होते.आणि त्यातू देशाची आर्थिक प्रगती साधता येते.
January 16, 2023
एखाद्या देशात साधारणपणे, ५ वर्षे राहिले की सर्वसाधारण समाजाची कल्पना येऊ शकते. साउथ आफ्रिका, स्पष्टपणे, ४ समाजात विभागाला आहे. १] काळे (मूळ रहिवासी), २] गोरे (जवळपास ३०० हून अधिक वर्षे वास्तव्य), ३] भारतीय वंशाचे (नुकतीच १५० वर्षे पूर्ण झाली!!) ४] कलर्ड ( मिश्र संयोगातून जन्मलेला समाज).
October 1, 2018
या विद्यापीठाचे वैशिष्ट्य असे, की बहुजन समाजातील मॅट्रिक पास तरुणांना नोकरीसाठी जाणीवपूर्वक संधी दिली. आणि तालमीच्या कट्टयावर बसणारी ही पोरं विद्यापीठात काय गुण उधळणार? अशा अर्थाने त्या काळातही टीका सुरू झाली. पण विद्यापीठाच्या या कर्मचाऱ्यांनी विद्यापीठाची शान आणि मान उंचावली.
November 18, 2021
महाराजांची जयंती कधी साजरी करावी हा वादाचा मुद्दा होताच कामा नये. मला तर वाटतं महाराजांची जयंती रोज साजरी करावी. ती मनातल्या मनात साजरी करावी. अशी रोज साजरी केलेली शिवजयंती उत्सवी नसावी, तर वागणुकीतून असावी. महाराजांनी घालून दिलेल्या आदर्शावर आपण आधुनिक काळात वागतोय की नाही, याचं भान ठेवून आपलं दररोजचं वागणं असलं, की मग ही शिवजयंती रोजच्या रोज साजरी होईल..महाराजांच्या नांवाला आणि इभ्रतीला धक्का लागेल असं आपलं वागणं असता कामा नये याची दक्षता प्रत्येकाने घेतली, क मग वेगळी शिवजयंती साजरी करण्याची गरजच भासणार नाही..
February 19, 2018
आज भारत देश स्वतंत्र होऊन ६७ वर्ष झाली. देश विज्ञान-तंत्रज्ञानात वेगाने प्रगती करीत आहे. भारतीय शास्त्रज्ञ चंद्र आणि मंगळावर यान उतरविण्याच्या तयारीत आहेत. विज्ञान-तंत्रज्ञानात वेगवेगळे शोध लावण्याच्या प्रयत्नात आहेत
May 22, 2015
आधी कोविडची साथ; त्या नंतर सीमे वर चीनची आगळिक; संतापलेल्या भारतीयांनी चीनी वस्तूं वर बहिष्कार टाकण्या करता दिलेली हांक; आणि शेवटी झालेली जाणीव की आपली अर्थ व्यवस्था चीन मधून आयात केलेल्या वस्तूंवर येवढी अवलंबून आहे की आपण फार काही वस्तूं वर बहिष्कार टाकूच शकत नाही. या सर्व घडामोडींच्या निमित्ताने काही मुद्दे अधोरेखित झाले आहेत, व त्याची नोंद आत्ताच घेणे गरजेचे आहे. कारण एकदा का सीमे वर परत शांतता झाली, कोविड संक्रमण आटोक्यात आले, की हे मुद्दे आपल्या करता महत्वाचे राहणार नाहीत.
July 24, 2020
सेवानिवृत्ती हा आयुष्यातला एक नवीन टप्पा. येथेच ‘स्व’चा शोध घेण्याची प्रक्रिया सुरू होते. या आनंदाचा शोध घेत घेत मार्गक्रमण करणे हेच खरे निवृत्तीनंतरचे कार्य.
December 17, 2021
योगासनांमुळे आपल्या शरीरातील स्नायू उठावदार होत असतात. तसेच ग्रंथींचे कार्य देखील सुधारते.
November 24, 2010
१९९० चे दशक हे भारतासाठी आर्थिक उदारीकरणाचे (Liberalization) वर्ष होते. केबल टीव्ही आणि एमटीव्ही (MTV) संस्कृती भारतात आली होती. यामुळे चित्रपट संगीताचा बाज अधिक आधुनिक आणि कॉस्मोपॉलिटन झाला. परंतु, याच काळात गाण्यांमधील शब्दांवरून आणि कोरिओग्राफीवरून अनेक मोठे सामाजिक आणि राजकीय वादही निर्माण झाले.
August 20, 2026
Copyright © 2025 | Marathisrushti