वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
जगभरात सर्व स्तरांमध्ये ट्विटर हे लोकप्रिय माध्यम बनले आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी, हॉलीवुड-बॉलीवुड कलावंत किंवा नरेंद्र मोदींपासून अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामांपर्यंत अनेक नेते ट्विटरची मदत घेतात.
December 25, 2014
२० ऑगस्ट २०१८ च्या ‘लोकसत्ता ( पुणें आवृत्ती)मधील बातमीद्वारें सई परांजपे यांचें भाषेबद्दलचें मत वाचलें ; तसेंच २१ऑगस्टच्या लोकसत्तातील ‘लोकमानस’मध्ये या विषयावरील विनित मासावकर व श्रीनिवास जोशी यांची मतेंही वाचनांत आली. ( एक स्पष्टीकरण : सई परांजपे यांची चर्चात्मक मुलाखात मी प्रत्यक्ष पाहिलेली-ऐकलेली नाहीं. त्याबद्दल ‘लोकसत्ता’मध्ये आलेल्या बातमीचाच संदर्भ मी येथें देऊं शकतो).
सई परांजपे यांच्याबद्दल मला आदर आहे. त्याचें मत व इतरांनी मांडलेलें मत मूलत: योग्यच आहे. त्यावर वाद नाहीं. तसेंच, २०व्या शतकाच्या सुरुवातीच्या कांहीं दशकांच्या काळातील स्वातंत्र्यवीर सावरकर व माधव ज्यूलियन यांचें भाषाशुद्धीविषयक कार्य मोठेंच आहे. सावरकरांच्या प्रत्येक क्षेत्रातील कार्याबद्दल परमादर व्यक्त करावासा वाटतो. सुयोग्य प्रतिशब्द निर्माण करून त्यांनी भाषाशुद्धीच्या क्षेत्रात दिलेलें योगदान अतुलनीय आहे. तेंच भाषाशुद्धीचें कार्य त्याआधीच, म्हणजे १९व्या शतकाच्या मध्यावर हिंदीत हिंदीत भारतेन्दु हरिश्चंद्र व बंगालीत राजा राममोहन राय यांनी व त्यांच्या समकालीनांनी केलेले आहे. पण भाषाशुद्धीचे मुकुटमणी आहेत छत्रपती शिवाजी महाराज. त्यांनी १७ व्या शतकाच्या उत्तरार्धातच ‘राज्यव्यवहारकोशा’चें निर्माण करविलें होतें.
हें सर्व म्हटल्यानंतर, आणि त्याचें महत्वही मान्य करून, प्रथमत: मला ही गोष्ट मांडावीशी वाटतें की भाषा ही शुद्ध तर हवीच, पण शुद्धतेचा अत्याग्रह धरला तर, १९व्या शतकानंतर हिंदी-उर्दूचें काय झालें तें ध्यानांत ठेवणें गरजेचे आहे. आधी ‘खडी-बोली-हिदी’ व रेख़्ता ( उर्दू) या दोन्ही एकच (भाषा) होत्या. पण शुद्धतेच्या अत्याग्रहामुळे त्यांच्या वाटा वेगळ्या झाल्या, आणि(भारताततरी) उर्दूचें क्षेत्र सीमित झाले.
नंतर मला असा महत्वाचा मुद्दा मांडावासा वाटतो की, भाषा ही प्रवाही असते, आणि अन्य भाषांशी संपर्क आल्यावर आपसात देवाणघेवाण होणें अपरिहार्यच आहे. भाषेत बदल घडलेच नाहींत, तर तिची स्थिती सांचलेल्या डबक्यासारखी होते, व हळूंहळूं तिचा ह्रास होऊं लगतो, हें सत्य आपल्याला स्वीकारावेंच लागेल. हें भाषाशास्त्रज्ञ सांगतात.
अरबीतून व खासकरून फारसीमधून मराठीत आयात झालेल्या शब्दांची एक लहान यादी मासावकर यांनी दिली आहे. त्याव्यतिरिक्त , विविध क्षेत्रांमधले शब्द, मी मुद्दा स्पष्ट करण्यांपुरते देतो – खुर्द, बुद्रुक, रिकीब, खरीप, रबी, अवजार, अवलाद, वारस, समई, पायजमा, मशागत, मेजवानी, मुलाखत, मजकूर, दप्तर, बस्ता (लग्नाच्या संदर्भात हा खास वापरला जाणारा शब्द आहे ), रुखवत, जंजीरा, नाखवा, फडणवीस, चिटणीस, पागनीस , पोतनीस, डबीर , पेशवा, किल्ला, जिल्हा, इब्लिस, बर्फ, इत्यादी. फारसीवर आधारित , व व्यवसायावरून पडलेली , लोकांची आडनांवें आपण बदलणार काय ? ( मग आपल्या सध्याच्या मुख्यमंत्र्यांच्या ‘फडणवीस’ या आडनांवाचें काय ? )
मराठ्यांच्या इतिहासात पेशवाईचें फार महत्व आहे, त्या काळाला आपण मग काय म्हणणार ? तसेंच, आपण नेहमी ‘लोकशाही’, ‘घराणेशाही’ असे शब्द वापरतो (खास करून राजकारणात). हिंदी-हिदुस्तानी-उर्दूवर फारसीचा फार प्रभाव असला तरी, हिंदीत ‘लोकशाही’ यासारखा शब्द वापरला जात नाहीं , तर ‘लोकतंत्र’ हा शब्द रूढ झालेला आहे, आणि तो ‘लोकशाही’पेक्षा अधिक योग्य आहे. मराठीत ही ‘शाही’ आली कुठून ? तर, आधी बहामनी राज्य व नंतर त्याचे तुकडे पडलेल्या ५ ‘शाह्यां’मधून. या शिया राजवटी होत्या, आणि त्यांच्यावर इराणी प्रभाव होता, त्यामुळे तेथें ‘शाही’ शब्दाचा उपयोग सर्रास होत असे., शिवाजी महाराजांवर वाचतांना आपली सारखीच आदिलशाही, कुतुबशाही अशा शब्दांची भेट होत असते.
‘व’ हें अव्यय मूळ अरबी आहे, हें कितीतरी लोकांना माहीतच नसतें. तें फारसीद्वारें आलेलें नसून, दोनएक हजार वर्षांपूर्वी समुद्री मार्गानें येणार्या अरब व्यापार्यांकडून आलें आहे, हें देवीसिंह चौहान यांनी दाखवून दिलेलें आहे.
आपली सकाळ रोज चहानें सुरूं होते. चहा ही हें पीक व पेय जसें चीनमधून इंग्रजांनी आणलें, तसेंच त्यांच्याबरोबरच ‘चहा’ हें नांवही आले ( मूळ : ‘चा’). तसेंच ‘उदबत्ती / अगरबत्ती’चें. असे इतर शब्द पूर्वेकडूनही आपण घेतलेले आहेत. ते परकीय शब्द आपल्याला कसे चालले ? त्याचें ‘संकर’ वाटलें नहीं का ?
महाराष्ट्रातील कालगणना ‘शालिवाहन शका’नें होते. त्यातील ‘शक’ हा शब्द परकीयच की ! गौतम बुद्धाला ‘शाक्यमुनी’ म्हटलें जातें, आणि शाक्य हा शब्द ‘शक’पासूनच आलेला आहे. ( पण भगवान बुद्ध यांना कोणीही बाहेरचे, अभारतीय मानलें नाहीं ; जुन्या काळींही नाहीं, व आजही नाहीं. जगातल्या कुठल्याही देशात त्यांना भारतीयच मानलें जातें) .एवढेंच काय, ‘हिंदू’ हा शब्दही खरें तर भारतीय नाहीं ; ‘सिंधु’ शब्दाचे अवेस्ताकालीन इराणमध्ये (त्यांच्या भाषिक नियमांनुसार) झालें ‘हिंदु’, आणि तो शब्द तिकडून तत्कालीन इराणी लोकांनी व ग्रीकांनी भारतात आणला. मग आतां, संकर हटवण्यांसाठी ‘हिंदूं’ना ‘सिंधू’ म्हणायचें कां? त्यानें तर भलताच घोळ होईल ! म्हणजेच, काय अंतर्गत आणि काय बाहेरील, या बाबीबद्दल गंभीर विचार करूनच बोलावें लागतें.
प्रतिशब्दांचें म्हणाल तर, ‘जादू’ यासारख्या शब्दासाठी ‘माया’ (आठवावा सिनेमा – ‘मायाबाजार’) तसेंच ‘गारुड’ यांसारखें शब्द अस्तित्वात होते व आजही आहेत. प्राचीन काळीं ‘यातु’ हा शब्द प्रचलित होता, तो आतां फारसा वापरला जात नाहीं. पण ‘जादू’ हा शब्द रूढ झाला, व आज तो अधिक चालतो. ‘बाग’ यासाठी उपवन, वाटिका, असे जुने शब्द आहेत की, पण ‘बाग’ हा शब्द रूढ झाला.
मराठी व इतर बर्याच आधुनिक भारतीय भाषा या संस्कृतोद्भव आहेत. या भाषांमध्ये संस्कृतच्या आधारें तत्सम व तद्भव शब्द बहुसंख्य आहेत. ते ‘बाहेरून’ (अन्य भाषेमधून) आले म्हणून त्यांना संकर म्हणायचें कां ? आणि, त्यांना ‘संकर’ न म्हणतां,भाषेचें मूळ रूपच म्हणायचें जर असेल, तर मग या भाषांमधील देश्य अथवा देशज शब्दांना संकर म्हणायचें कां ? याचें उत्तर सोपें नाहीं.
बरें, संस्कृत तरी संकरविहीन आहे कां ? ज्योतिषातील ‘होरा’ हा शब्द ग्रीक ‘होरोस्’ या शब्दावरून आलेला आहे असें म्हणतात. (अर्थात् , ज्योतिषी तें मान्य करीत नाहींत, ही गोष्ट अलाहिदा. ते म्हणतात की अहोरात्र या शब्दामधून होरा शब्द आलेला आहे). अगदी वैदिक-संस्कृत, जिला ‘देववाणी’ व ‘छांदस’ म्हणत, तिनेंही द्रविड व मुंडा भाषांमधून शब्द घेतलेले आहेत, जसें की ‘लांगल’ मुंडा भाषेतून. आणि, आतां ते शब्द , किंवा त्यांचे अपभ्रंश जे मराठीत वा अन्य आधुनिक भाषांमध्ये आले, जसें की, ‘लांगल’ पासून ‘नांगर’, त्यांना तत्सम / तद्भव म्हणायचें की संकर ? म्हणजे, ही एक भानगडच झाली !
इंग्रजीशी संबंध आल्यामुळे मराठीनें अनेक शब्द तिच्यातून घेतले आहेत. ( तिथेंच तर सध्याचा हा सारा वाद आहे. फारसीचे शब्द मराठीत कांहीं शतकांपूर्वीच रुळले, त्यामुळे त्यांच्याबद्दल विशेष कोणी हरकत घेत नाहीं ). पण, ज्या गोष्टी आधी अस्तित्वातच नव्हत्या, तिथें इंग्रजी शब्दांचा वापर होणारच. उदा. रेल्वे, स्टेशन, सिग्नल, इस्पितळ (हॉस्पिटल), डॉक्टर, वगैरे. स्वातंत्र्यवीर सावरकर भाषाप्रभू होते, म्हणून त्यांनी अनेक प्रतिशब्द निर्माण केले व ते रूढही झाले. मात्र, अनेक शब्दांना आजही पर्यायी शब्द उपलब्ध नाहींत. कांहीं प्रतिशब्द तयार केले गेलेले असले तरी, त्यांत प्रमाणीकरण (स्टँडर्डायझेशन) झालेलें नाहीं. कित्येकदा असें होतें की कुणी तसा एखादा निर्मित प्रतिशब्द वापरला, तर मूळ इंग्रजी शब्द कंसात दिला जातो, म्हणजे अर्थाचा गोंधळ होऊं नये. कांहीं उदाहरणें – समाजविज्ञानातील ‘मोरे’ ( स्पेलिंग – more’ ) याला प्रमाणित मराठी प्रतिशब्द नाहीं , आणि असलाच, तर त्या विषयाच्या शब्दकोशाबाहेर वा त्या विषयातील ज्ञानी (एक्सपर्ट) मंडळींव्यतिरिक्त कितीशा लोकांना तो माहीत असतो ? तसेच, ‘मिथक’ हा शब्द घ्या. हा शब्द ‘Myth’ या शब्दापासून बनवला गेलेला आहे. त्यासाठी क्वचित् ‘मिथ्यकथा’ हा शब्दही वापरला जातो. तर मग ‘मिथ्यकथा’ हा शब्दच कां बरें ‘प्रमानित’ म्हणून रूढ झाला नाहीं ? याचें कारण कदाचित असें असावें की, ‘मिथ्या’ या शब्दाला संस्कृतमध्ये व तत्सम शब्द वापरणार्या आधुनिक भाषांमध्ये एक विशिष्ट अर्थ आहे, व तो, ‘फोल’, ‘खोटें’, ‘अशाश्वत’ असा प्रकारचा अर्थ आहे. (आठवावें आदिशंकराचार्यांचें वचन - ‘ब्रह्म सत्य जगत् मिथ्या’). आज मेडिकल विज्ञान, स्पेऽस टेकनॉलॉजी, इनफर्मेशन टेकनॉलॉजी, वगैरे ज्ञानाची अशी अनेकानेक क्षेत्रें आहेत जिथें दररोज नवनवीन शब्द निर्माण होत आहेत. त्यांचे प्रतिशब्द निर्माण करायचें म्हटलें तरी, तसे ते निर्माण करायला व ते रोजच्या व्यवहारात रूढ व्हायला बराच वेळ लागेल, अनेक दशकें लागतील. तत्पूर्वी , इंग्रजी शब्दच वापरले जाणार हें उघड आहे. जसें की, ‘संगणक-आज्ञावली’ हा प्रतिशब्द तयार झालेला असला तरी ‘सॉफ्टवेअर’ हा शब्दच रूढ झालेला आहे. हा सॉफ्टवेअर शब्द तरी कसा आला, तर कंप्यूटर(संगणक) मधील जे इलेक्ट्रॉनिक पार्टस् असतात, त्यांना ‘हार्डवेअर’ म्हटलें जातें, आणि त्या अनुषंगानें या आज्ञावलीला ‘सॉफ्टवेअर’ म्हटलें जातें. मग आतां ‘हार्डवेअर’ ला काय प्रतिशब्द ? अन्, तोही बनवला तर मग, या हार्डवेअरमधील ‘प्रिंटेड सर्किट बोर्ड (तेंही मल्टी-लेयर), ट्रांझिस्टर, इंटिग्रेटेड सर्किट, अशा कितीतरी शब्दांचे काय करायचें ? तसेंच, आय.टी. क्षेत्रातील ‘यू.एस्.बी. पोर्ट’, इंटरनेट, वेबसाईट, ब्लॉग, वगैरे शब्दांचें काय करायचें ? कॅन्सरला ‘कर्करोग’ हा शब्द रूढ आहे. पण मग, मॅग्नेटिक रेझोनन्स इमेजिंग, सी टी स्कॅन, पी टी स्कॅन, केमोथेरापी, हिस्टोपॅथॉलॉजी वगैरेंचे काय ? आणखी कांहीं पहा – ‘ऑटिझम’साठी ‘स्वमग्न’ किंवा ‘आत्ममग्न’ असा शब्द वापरला जातो. पण घोळ असा आहे की, साधारण (नॉर्मल) लोकसुद्धा आत्ममग्न असूं शकतात, असतात. त्यामुळें, स्वमग्न किंवा आत्ममग्न म्हटलें की ऑटिझमचा उल्लेख होतो आहे की नॉर्मल माणसाच्या आत्ममग्नतेबद्दल बोललें जात आहे, हें स्पष्ट होण्यासाठी संदर्भावरच अवलंबून रहावें लागतें. [ऑटिझम हा शब्द ज्या लॅटिन शब्दावरून निर्माण केला गेला आहे, त्याचा अर्थ स्वमग्नतेशी संबंधित असला तरी, ऑटिझम या शब्दाला एक विशिष्ट अर्थ (connotation) प्राप्त झालेला आहे, हें ध्यानात घेणें आवश्यक आहे ] . हँडिकॅप्ड’ यासाठी ‘दिव्यांग’ हा सुंदर प्रतिशब्द निर्माण केला गेलेला आहे व तो रूढही होतो आहे, पण मग, ‘मेंटली चॅलेंज्ड’, ‘डिफरंटली एबल्ड’, ‘डिस्लेक्सिया’, ‘डिस्कॅल्क्युलिया’ यांचें काय ?
ही यादी बरीच लांबेल, पण वरील उदाहरणें पुरेशी आहेत.
आपण मराठीत होणार्या इंग्रजीच्या संकराबद्दल बोलतो. पण इंग्रजीनेंही अनेक शब्द बाहेरून घेतले आहेत. सुरुवातीच्या कालात , म्हणजे हजारएक वर्षांपूर्वी, तिनें स्कँडिनेव्हियन भाषांमधून शब्द घेतलेले आहेत. मध्ययुगात तर दोनएकशे वर्षें इंग्लंडमधील राजभाषा व उच्चभ्रूंची भाषा फ्रेंच होती. त्याचा परिणाम म्हणून इंग्रजीत अनेक फ्रेंच शब्द स्थिरावलेले आहेत. खानपान (खाणेपिणें) , मेजवानी वगैरेंच्या क्षेत्रातील ‘वरच्या’ दर्जाचे (साहित्यिक पातळी नव्हे, तर तत्कालीन सामाजिक वरची पातळी) शब्द फ्रेंच आहेत, व ते आजही तसेच वापरले जातात. इंग्रजीनें अन्य भाषांकडून पण शब्द घेतलेले आहेत. मध्ययुगात क्रूसेडस् मुळे इंग्लिश लोकांचा मध्यपूर्व-आशियाशी संबंध आला व तिकडून इंग्रजीनें शब्द घेतले. अरब ‘मूरस्’नी स्पेनादि भागात राज्य केलें , त्यामुळे युरोपीय भाषांमध्ये, आणि त्यांच्याद्वारें इंग्रजीत त्यांचे शब्द शिरले, स्थिरावले. कॉलनियल काळातही इंग्रजीनें बाहेरील शब्द घेतले. अमेरिकन नेटिव्ह ‘इंडियन्स’ (रेड इंडियन्स) कडून पण अमेरिकन-इंग्लिशनें शब्द घेतले, जसें की ‘मेसा’. अमेरिकेतील अनेक नद्यांची नांवें मूळ ‘नेटिव्ह इंडियन्स’नी दिलेलीच रूढ झाली. त्यांना ‘परकीय’ म्हणायचें कां ? ‘जंगल’, ‘खाकी’, असे शब्द, ‘पक्का साहिब’ यासारखे वाक्प्रचारही भारतामधून इंग्रजीत सामावले. ( खाकी – मूळ शब्द फारसी ‘खाक’ ). वेस्ट इंडीज् , साउथ आफ्रिका वगैरे भूभागांमधूनही इंग्रजीनें शब्द घेतलेले आहेत. ( त्या त्या भूभागांमध्ये तर लोक तेथील ‘लोकल इंग्रजी’त तेथील आणखीही बरेच शब्द वापरत असतातच). एवढेंच नव्हे, तर , (राजकारणादि तशी अन्य कांहींच कारणें नसतांनाही ) , केवळ, इंग्रजीत योग्य-तो चपखल (apt) प्रतिशब्द उपलब्ध नाहीं, म्हणून, त्या भाषेनें ‘देजा व्हू’ सारखे वाक्प्रचारही परभाषेतून आपलेसे केले . अगदी हल्ली हल्ली इंग्रजीनें ‘prepone’ सारख्या, भारतात तयार झालेल्या शब्दाला सामावून घेतलें ( मी शिकत असतांना हा शब्द तर भारतातही प्रचारात नव्हता . तो गेल्या कांहीं दशकांमध्ये भारतात निर्माण झालेला आहे).
या समावेशक वृत्तीमुळे काय झालें, तर इंग्रजी भाषा समृद्धच झाली. आजही ऑक्सफर्ड डिक्शनरीची संपादक मंडळी दरवर्षीं, इंग्रजीत सामावल्या जाणार्या नवनवीन शब्दांची यादी प्रमाणित (स्टँडर्डाइझ) करत असतात. ( ‘प्रीपोन’ शब्द त्यांनी अशा प्रकारेंच स्वीकारला आहे) . आतां बोला !
*****
मला असें वाटतें की, सई परांजपे काय किंवा हे अन्य दोन सद्गृहस्थ काय, त्यांची हरकत बहुतेककरून, अशा वरील प्रकारच्या ( मी जी उदाहरणें दिली आहेत, त्या व तशा तर्हेच्या ) शब्दांच्या वापराबद्दल नसावी. सई परांजपे यांनी नाटकांना (नाहक) दिल्या जाणार्या इंग्रजी नांवांबद्दल (शीर्षकांबद्दल) उल्लेख केला आहे, श्रीनिवास जोशी हे, मम्मी, डॅडी वगैरे शब्दांच्या वापराबद्दल आक्षेप घेतात, तर मासावकरांचें म्हणणें आहे की आपल्या भाषेत शब्द उपलब्ध असतांना अन्य भाषेतील शब्द कां वापरावेत ? [ इथें मला एक गोष्ट मासावकारांच्या वाक्याला (स्टेटमेंटला) जोडावीशी वाटते, अन् ती ही की आपल्या भाषेत शब्द नुसते उपलब्ध असून चालत नाहीं, तर ते वापरात रूढही असावे लागतात. मासावकरांना कदाचित हेंच अभिप्रेत असावें ] .
या सर्व चर्चेनंतर , आणि शब्दसंकर भाषेला समृद्ध करतो समृद्ध करतो , ही गोष्ट मांडल्यानंतर शुद्धीच्या आणखी एका मुद्द्याकडे वळणें अपरिहार्य आहे. अंतत: हेंही कबूल करावें लागेल की मराठी भाषा अशुद्ध होत चालली आहे. त्याबद्दल माझा स्वत:चा संदर्भ मम्मी-डॅडी अशा शब्दांच्या वापराबद्दल नाहीं , कारण तसा वापर हा संकर आहे, मूलत: अशुद्धी नाहीं. पण, शब्दांचें लिंग चुकीचें वापरणें ( उदा. ‘व्यक्ती’ शब्द पुल्लिंगी वापरणें, ‘ऑफिस’ हा स्त्रीलिंगी, वगैरे ), अर्थबदल होत असला तरीही र्हस्व-दीर्घाची काळजी न घेणें ( खरें तर, पर्वा न करणें) , वाक्यरचनेतील गफलती, अशा मूलभूत बाबींमुळे भाषेत जी अशुद्धी व , कांहीं वेळा गडबडही, निर्माण होते, त्याबद्दल मला स्वत:ला जास्त काळजी वाटते. किरकोळ चुकांकडे कदाचित दुर्लक्ष करतां येईलही; महत्वाचें म्हणजे, आपल्या चुकांना ‘चुका’च न मानणें , ‘काय फरक पडतो ?’ असा प्रतिप्रश्न करणें , अशा तर्हेचा दृष्टिकोन (attitude) , आणि बेपर्वा ( callous) वृत्ती, ही अधिक-काळजीची कारणें आहेत. आणि त्याहीपेक्षा जास्त चिंता करण्यासारखी गोष्ट म्हणजे, आपली शुद्धाशुद्ध भाषा संख्येच्या निकषावर योग्यायोग्य ठरविण्याचा ठाम आग्रह धरणें , ही. ( उदा. ‘तीन टक्के लोकांची भाषा’ असा उल्लेख ). बोलींमध्ये वैविध्य तर असणारच, पण ‘प्रमाणित’ भाषेसाठी, संख्याबळ हें शुद्धत्व ठरवण्यांचा निकष कसा असूं शकेल ? . एक वेगळ्या क्षेत्रातील उदाहरण द्यायचें तर, ‘ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्डस्’ ही सरकारी संस्था, ‘प्रमाण’ (स्टँडर्ड) ठरवतांना, ‘किती लोकांना काय बरोबर वाटतें’ असा विचार करत नाहीं, तर, त्याचे निकष वैज्ञानिक, वेगळे असतात. तसेंच, ऑक्सफर्ड डिक्शनरीचें संपादक मंडळही ‘ब्रेक्झिट’सारख्या सार्वत्रिक मतदानातून आपले निर्णय घेत नाहीं. आज जनसाधारणांचा शुद्धाशुद्धतेचा विचार करण्यांकडे कल दिसत नाहीं ( की, आतां आपल्याला ‘प्रमाणित’-- स्टँडर्ड -- भाषाच नको आहे ?, अशी शंका यावी ) . एवढेंच नव्हे, तर प्रिंट-मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया याही, अशुद्ध भाषेला हातभारच लावत आहेत!
अशा परिस्थितीत, एक नि:श्वास टाकून म्हणावें लागतें की, एक म्हणजे, सई परांजपे म्हणतात त्याप्रमाणें, आपण अशा अशुद्ध भाषा वापरणार्या गोष्टींवर , जसें की नाटक, टीव्ही सीरीयल वगैरेंवर, आपल्यापुरता बहिष्कार टाकायचा , त्यातील वैफल्य जाणूनही असा बहिष्कार टाकून मनाला स्वत:पुरतें समाधान मिळवायचा प्रयत्न करायचा ; किंवा, दुसरें म्हणजे, आपलें कथन हें अरण्यरुदन आहे हें जाणूनही सुधारणा करण्यांचा विफल प्रयत्न करायचा ; एवढेच विकल्प आपल्या हातात उरतात.
-- सुभाष स. नाईक.
भ्रमणध्वनी : ९८६९००२१२६ , ९०२९०५५६०३.
ईमेल : vistainfin@yahoo.co.in
August 31, 2018
यशोगाथा सार्वत्रिक व सर्व दूर असायलाच हव्यात.पर्यावरण व प्रदूषणाचा प्रश्न गंभीर होत असतानाच काही व्यक्ती स्वतःच्या प्रतिभेचा वापर करून नवनवीन मार्ग व त्यावर उपाय शोधत आहेत.गोंदिया येथील शालू जगदीश कोल्हे यांच्या प्रयत्नांमुळेच अनेक तलावांनी मोकळा श्वास घेतलाय,त्याचबरोबर६३तलावांचे पुनरुज्जीवनही झाले आहे.
December 31, 2024
अहंतागुणे सर्वही दुःख होते | मुखे बोलिले ज्ञान ते व्यर्थ जाते |
सुखी राहता सर्वही सूख आहे | अहंता तुझी तूचि शोधूनि पाहे ||161||
अहंतागुणे नीति सांडी विवेकी | अनीतीबळे श्र्लाघ्यता सर्व लोकी |
परी अंतरी सर्वही साक्ष येते | पःमाणांतरे बुेि सांडूनि जाते ||162||
देहेबुेिचा निश्र्चयो दृढ झाला | देहातीत ते हीत सांडीत गेला |
देहेबुेि ते आत्मबुेि करावी | सदा संगती सज्जनाची धरावी ||163||
मने कल्पिला वीषयो सोडवावा | मने देव निर्गूण तो वोळखावा |
मने कल्पिता कल्पना ते सरावी | सदा संगती सज्जनाची धरावी ||164||
देहादीक पःपंच हा चिंतियेला | परी अंतरी लोभ निश्र्चीत ठेला |
हरीचिंतने मुक्तिकांता वरावी | सदा संगती सज्जनाची धरावी ||165||
अहंकार विस्तारला या देहाचा | स्त्रियापुत्रमित्रादिके मोह त्यांचा |
बळे भ्रांति हे जन्मचिंता हरावी | सदा संगती सज्जनाची धरावी ||166||
बरा निश्र्चयो शाश्र्वताचा करावा | म्हणे दास संदेह तो विसरावा |
घडीने घडी सार्थकाची करावी | सदा संगती सज्ज्नाची धरावी ||167||
करी वृत्ति जो संत तो संत तो संत जाणा | दुराशागुणे जो नव्हे दैन्यवाणा |
उपाधी देहेबुेिते वाढवीते | परी सज्जना केवि बाधू शके ते ||168||
नसे अंत आनंत संता पुसावा | अहंकार विस्तार हा नीरसावा |
गुणेविण निर्गूण तो आठवावा | देहेबुेिचा आठवो नाठवावा ||169||
देहेबुेि हे ज्ञानबोधे त्यजावी | विवेके तये वस्तुची भेट घ्यावी |
तदाकार हे वृत्ति नाही स्वभावें | म्हणोनी सदा तेचि शोधीत जावे ||170||
- श्री रामदासस्वामी लिखित मनाचे श्लोक (क्रमशः)
January 22, 2016
दादासाहेब फाळकेंचा पहिला मूकपट ‘राजा हरिश्चंद्र’ हा १९१३ साली प्रदर्शित झाला. त्यानंतर अनेक मूकपटांची निर्मिती झाली. तेव्हा मूकपट पडद्यावर चालू असताना तबला पेटी वाजवून काहीजण संगीताची साथ देत असत.
November 24, 2022
केळे बाराही महिने बाजारात मिळणारे फळ आहे. फळांमधील केळं आरोग्यासाठी अतिशय गुणकारी ठरते. केळ्यात पोटॅशियम आणि विटॅमिन भरपूर प्रमाणात असतात. त्याशिवाय केळ्यात इतरही अनेक पोषक तत्व असतात, जी शरीरासाठी अतिशय गुणकारी असतात. त्यामुळेच कोणत्याही प्रकारचं केळं आपल्या खाण्यात सामिल केल्याने फायदे होतात. दररोज केळं खाल्याने हार्ट ॲटॅकची शक्यता मोठ्या प्रमाणात कमी होते. त्याशिवाय केळ्याचे इतरही अनेक फायदे आहेत. अति पिकलेल्या केळ्याचे अनेक फायदे आहेत.
April 20, 2022
प्राचीन काळातही श्रीगणेशाच्या अनेक मूर्ती होत्या असे आढळते. प्राचीन वाङ्मयात या मूर्ती कशा तयार कराव्यात, त्यांच्या हातात काय काय वस्तू असाव्यात, त्यांना कोणता रंग असावा, किती हात असावेत इत्यादी तपशील आढळतो. तद्नुसार श्रीगणेशाची निरनिराळी नांवेही ठेवलेली आढळतात.
August 17, 2023
श्रीकृष्ण जन्मकथा सांगतो
ऐका विनवितो
श्री विष्णु अवतार घेतो
ह्या सृष्टीवर ||१||
दुष्टांचा होई अनाचार
पृथ्वीते होई पापभार
त्यांचा करण्या संहार
परमेश्र्वर अवतरती ||२||
कंस राजा दुष्ट
स्वतःस समजे श्रेष्ठ
प्रजेला देई कष्ट
स्वार्थापोटी ||३||
छळ करु लागला जनांचा
लुटमार अत्याचार छंद त्याचा
खूनही करी साधूसंतांचा
दुष्टपणे ||४||
कंसाची देवकी बहीण
चित्त तिचे परमेश्र्वरी विलीन
सात्विक होते तिचे मन
परमेश्र्वराठायीं ||५||
देवकीचे लग्न ठरले
वसुदेवाला तिनें वरले
सर्व कार्य पार पडले
कंस राजा घरी ||६||
देवकी वसुदेवासंगे बैसली
भोयांनी डोली उचलली
वरात घरी जाण्या निघाली
कंस भावा घरुन ||७||
कंस राजा चाले संगे
वरातीच्या मागोमगे
निरोप देण्या तिजलागें
वसुदेव देवकीसी ||८||
वरात येता गांव वेशीला
एक चमत्कार घडला
आकाशवाणी झाली त्या वेळेला
चकीत होती सर्वजण ||९||
कंस राजा तूं मातला
नष्ट कराया तुजला
विष्णू अवतरती पृथ्विला
देवकीचे पोटी ||१०||
देवकी वसुदेवाचे आठवे बाळ
कंसाचा तो कर्दनकाळ
योग्य येता वेळ
ठार करील कंसाला ||११||
देवकी पुत्र शत्रु माझा
दचकून गेला कंस राजा
विस्मयचकीत झाली प्रजा
आकाशवाणी ऐकूनी ||१२||
कंसाने विचार केला
देवकीपुत्र जन्मता मारण्याला
बंदीस्त केले त्याना
ठार करण्या बाळ तयांचे ||१३||
एका मागुनी एक मारीले
सात पुत्राना ठार केले
पापाचे तेंव्हा घडे भरले
कंसाचे ||१४||
आठव्या वेळी देवकीस
गर्भ राहता नऊ मास
आगळाच होत असे भास
चमत्कार घडला ||१५||
पृथ्वी पावली समाधान
सृष्टी गेली बहरुन
प्रफूल्ल झाले वातावरण
स्वागत करण्या प्रभूचे ||१६||
पूर्वीचे सर्व बदलले
दुःखी मन पालटले
रोम रोम ते आनंदले
चिंता न उरली देवकीस ||१७||
प्रभू आगमनाची तयारी
सर्व देव मिळूनी करती
देवकीस सांभाळी
आपली शक्ती देवूनीया ||१८||
सुर्य उधळी प्रकाश
वरुण जल शिंपी सावकाश
वायु लहरी फिरती आकाशी
देवकीसाठी ||१९||
बागेत पसरला सुगंध
वातावरण होई धुंद
देवकीचा आनंद
द्विगुणीत झाला ||२०||
देवकीचे सारे चित्त
प्रभुचरणी जात
झाली ती निश्चिंत
भार ईश्वरी सोडूनी ||२१||
श्रावणमासे कृष्णपक्षे आष्टमीला
मध्यरात्रीचे सुमाराला
देवकीचे बाळ आले जन्माला
ईश्वर अवतार घेई ||२२||
सर्व वातावरण शांत
बाळ करी आकांत
परी सर्व होते निद्रिस्त
कारागृहाचे द्वारपाल ||२३||
थकून देवकी झोपली
बाळ तिचे पदराखालीं
वसुदेवासी चिंता लागली
बाळाची ||२४||
झाला एक चमत्कार
साखळदंड तुटूनी उघडले दार
विजेमुळे मार्ग दिसे सत्वर
वसुदेवाला ||२५||
त्वरीत उठूनी बाळ उचलले
तयासी टोपलीत ठेवले
डोईवर ठेवूनी चालले
वासुदेव ||२६||
वसुदेव चालला
नागराज पाठी आला
फणा काढूनी वाचवी बाळाला
पावसापासून ||२७||
वसुदेव यमुनाकाठी
दुथडी वहात होती
निश्चयी पाण्यांत शिरती
बाळ घेऊन ||२८||
पाण्यांत टाकता पाय
यमुना ही दर्शना धाव
ईश्वरचरणीं स्पर्श होय
पावण होणेसी ||२९||
पाण्याची पातळी वाढली
चरणस्पर्श होता दुभंगली
वाट करुनी दिली
वसुदेवाला ||३०||
पैलतिरी गांव गोकूळ
नंद गवळ्यातील श्रेष्ठ सकळ
पत्नी यशोदे झाले बाळ
त्याच रात्रीं ||३१||
कन्या होती आदिमाया
ईश्वर सुरक्षे जन्म घ्याया
ईच्छित त्याचे कार्य कराया
आली उदरी यशोदेच्या ||३२||
घर नंदाचे उघडे
यशेदा निद्रिस्त पडे
लक्ष्य नव्हते कन्येकडे
घरातील लोकांचे ||३३||
बाळ ठेवले यशोदेपासी
उचलून घेतले कन्येसी
पांघरुन घालूनी बाळासी
वसुदेव परतला ||३४||
मुलीस घेऊन आला
ठेवी देवकीच्या कुशीला
कोण जाणील ह्या लिला
प्रभूविणा ||३५||
बंद झाले द्वार पूर्ववत
मुलीने केला रडूनी आकांत
द्वारपाल जागविले त्वरित
ते खबर देई कंसाला ||३६||
कंस आला धाऊन
सर्व लष्कर घेऊन
बाळ मारावे म्हणून
आपल्या शत्रुते ||३७||
कन्या बघूनी चकीत झाला
कां फसवितोस मजला
शिव्या देत असे प्रभुला
मुलीचे रुप बघूनी ||३८||
मुलीस घेतले बळजवरीं
आपटण्या दगडावरी
हात नेता आपले शिरीं
कन्या हातून निसटली ||३९||
चमत्कार घडला त्या समयीं
कन्या आकाशी जाई
अचानक अकाशवाणी होई
त्यावेळी ||४०||
आठवे बाळ नंदा घरी
ईश्वर रुप अवतारी
येतां वेळ ठार करी
कंसा तुला ||४१||
आकाशवाणी ऐकोनी
घडला चमत्कार बघून
कंसा ते कापरे भरुनी
राजगृही परतला ||४२||
कंस प्रयत्न जाय निष्फळ
विधी लिखीत असे अटळ
कोण रोकती काळ
प्रभूविणा ||४३||
इकडे यशोदे देखिले
बाळ गोजिरे वाटले
आनंदमय गांव झाले
बाळाचे आगमनें ||४४||
नांव श्रीकृष्ण ठेविले
नंदाघरी वाढले
गोपाळांत खेळले
आनंदरुप ||४५||
यशोदाघरी देवकीचे बाळ
ठार केले कंसा येता वेळ
मारले नंतर दुष्ट सकळ
श्रीकृष्णाने ||४६||
श्रीकृष्णाचा अवतार
दुर्बलांना तो आधार
करसी दुःखाचा निवार
प्राणीमात्रासाठी ||४७||
जन्माष्ठमीचा उत्सव
ओतून त्यांत दुर्बलांना तो आधार
करसी दुःखाचा निवार
प्राणीमात्रासाठी ||४७||
जन्माष्ठमीचा उत्सव
ओतून त्यांत भक्तीभाव
साजरा करिती सर्व
प्रेमभरे ||४८||
श्रीकृष्ण सांगे गीता
युद्धभूमीवर असता
कौरव पांडव युद्धा सज्ज होतां
अर्जूनासी ||४९||
भगवत् गीता महान
ग्रंथ म्हणून मान
जीवनाचे तत्वज्ञान
तयामध्यें ||५०||
श्रीकृष्णभक्तांनी
वाचावी ही कहाणी
भक्तिरुपें होऊनी
रोज एकदां ||५१||
।। शुभं भवतु ।।
डॉ. भगवान नागापूरकर
७- १००८८३
January 6, 2018
जगात सगळीकडे बदलाचे वारे वाहताना दिसतात. खेडोपाडी वागण्या बोलण्यात अगदी खाण्या पिण्यातही शहरीकरणाचा प्रभाव होताना दिसत आहे. सध्या लोकांचा जास्त एनर्जी असलेले पदार्थ, तळकट पदार्थ, साखर आणि साखरेचे पदार्थ, मीठ/मीठाचे पदार्थ खाण्याकडे कल वाढलेला दिसतो तसेच फळ व भाज्या खाण्याकडे दुर्लक्ष होताना दिसतय. ह्या सर्वांनाचा परिणाम म्हणून आहारातून तंतुमय पदार्थाचे प्रमाण कमी होताना दिसतोय. ह्या सर्व जीवन पद्धतीचा एकत्रित परिणाम आपल्या आरोग्यावर होताना दिसतोय. मधुमेह, ह्रदय रोग, हाइपरटेंशन, काही विशिष्ट प्रकारचे कॅन्सर, आणि ह्या मुख्यत्वे करून लठ्ठपणा वाढवताना दिसतोय. ह्या सर्वांवर मात करण्यासाठी बहुतेकदा कमी कॅलरीज घेण्याचा सल्ला दिला जातो. कुपोषण (malnutrition) न होता केलेले कमी कॅलरीजचे सेवन दिर्घायुष्य लाभण्यास आणि आरोग्य तारुण्यातच राखण्यात मदत करताना दिसतात, पण आयुष्य किती काळ वाढवू शकेल ह्याचा मात्र निश्चित अंदाज बांधता येत नाही.
कॅलरी रिसट्रीकशन ही अशी खाण्याची पद्धत आहे कि ज्यात आहारातील कॅलरीजचे सेवन कमी केले जाते. कॅलरीज किती कमी करायच्या हे मात्र त्या व्यक्तीच्या पूर्वीच्या कॅलरीजच्या सेवनावर किंवा त्या व्यक्ती सारख्या इतर व्यक्तीच्या सरासरी कॅलरीजच्या सेवनावर अवलंबून असते.
Calorie Restriction with Optimal Nutrition (CRON) हा आहार कॅलरीज मध्ये कमी असूनही इतर अन्नघटकांनी समृद्ध असतो. नुसत्या कॅलरीज रिसट्रीकशन आहारापेक्षा CRON आहार घेणाऱ्या व्यक्तींमध्ये आरोग्य दिर्घकाळ सुस्थितीत राखण्यात मदत करताना दिसतात. ह्यामुळेच अशी व्यक्ती आपले आयुष्य दिर्घकाळ सुंदररित्या जागताना दिसतात.
CRON आहाराचे आरोग्यावर होणारे चांगले परिणाम
- लठ्ठपणा टाळण्यास व वजन कमी करण्यासाठी मदत
- मधुमेह, हाइपरटेंशन, कॅन्सर टाळण्यास/आटोक्यात आणण्यासाठी मदत
- ह्रदयरोग व रक्तवाहिन्यावरील ताठरपणा कमी करण्यास तसेच ह्रदयाचे ठोके नियंत्रित करण्यासाठी उपयोगी पडतात. ह्रदय व इतर रक्तवाहिन्यांची लवचिकता कमी होणे, ह्या गोष्टीं ह्रदयरोगाशी निगडित आहेत आणि ह्या अपायकारक गोष्टींवर नियंत्रण मिळविण्यात यश आल्याने CRON आहार महत्वाचे ठरतात.
- CRP, triglycerides, Low Density Lipoprotein (LDL), high density lipoprotein (HDL) आणि रिकाम्या पोटीची रक्तातील साखरेवर नियंत्रण सुधारल्याने इतर रोगांचा धोका कमी करण्यात मदत.
- कॅन्सरचा धोका निर्माण करण्याशी निगडीत असलेले विविध मेटाबॉलिक घटक आणि हार्मोन्स कमी करण्यात यश त्यामुळे कॅन्सरचा धोका कमी होण्यास मदत
- शरीरातील आणि मुख्यत्वे करून पोटात आढळणाऱ्या चरबी मध्ये घट
Circulating insulin, testosterone, estradiol and inflammatory cytokines ह्या सारखे घटक जे कॅन्सरशी निगडित आहेत त्यामध्ये घट
- Insulin like growth factor I आणि IGFBP -3 मध्ये घट परंतु जर प्रथिनांचे सेवन गरजेपेक्षा (dietary reference intake) जास्त केल्यास मात्र हा फायदा मिळताना दिसत नाही.
कमी कॅलरीजचे सेवन अयोग्य पद्धतीने केल्यास होणारे दुष्परिणाम
- कुपोषणास निमंत्रण
- रक्तक्षय, पायाच्या तळव्यावर सूज येणे, चक्कर येणे, चिडचिड होणे, सुस्ती येणे, डिप्रेशन मध्ये जाणे ह्या सारख्या परिणामांना तोंड द्यावे लागते
- माणसांवरील काही छोट्या प्रयोगात असे आढळले आहे कि मसल मास, स्ट्रेंथ (ताकद) कमी होणे, bone mineral density कमी होणे; middle aged आणि वृद्ध व्यक्तींमधे मृत्युच्या प्रमाणात वाढ होताना दिसते
- कोल्ड सेन्सिटिव्हीटी चा धोका वाढतो
- आठवड्याला 1/2 ते 1 किलो पेक्षा जास्त वजन घटवल्यास पित्ताशयात खडे निर्माण होणे, किंवा रक्तातील इलेकट्रोलाईट मधील संतुलन बिघडणे ह्या सारखे धोके वाढतात
- 21 वर्षाखालील मुलामुलींनी, लहान मुलांनी खूप कमी कॅलरीजचे सेवन करून वजन घटवू नये कारण त्यांची शारीरिक वाढ खुंटते, मानसिक वाढीवर ही त्याचा परिणाम होताना दिसतो. किशोर वयातील मुलांच्या मेंदूत भौतिक (physical) बदल घडून येऊ शकतात.
- Underweight मातांमध्ये दिवस भरण्यासाठी अगोदरच प्रसूती होणे, बाळाचे वजन कमी असणे ह्या सारखे धोके वाढतात म्हणूनच गरोदरपणात स्त्रियांनी अतिशय कमी कॅलरीज असलेला आहार घेणे टाळा.
- एखादी स्त्री गरोदर राहण्याचा प्रयत्न करत असेल तर आशा स्त्रीने सुद्धा असा कमी कॅलरीजचा आहार घेऊ नये कारण बीएम्आय आवश्यकतेपेक्षा कमी असल्यास इनफरटीलिटीचा (वंध्यत्व) धोका वाढतो, मासिकपाळी वेळच्या वेळी न येणे, तसेच हार्मोन्समधे बदल होणे ह्या सारखे धोके वाढतात.
- जसे गरोदर स्त्रियांना त्रास होतो तसाच त्रास स्तनपान करणार्या स्त्रीला ही होतो. जो पर्यंत स्त्री स्तनपान करत असेल तो पर्यंत त्या स्त्रीने कमी कॅलरीजचा आहार घेऊ नये, तर स्तनपान बंद केल्यावरच कमी कॅलरीजचा आहार घेऊ नये. आयुष्याच्या सुरवातीलाच म्हणजे बाळाच्या जन्मापासूनच त्याला मिळणारा आहार हेल्दी असावा. बाळाच्या योग्य वाढीसाठी, cognitive development सुधारण्यासाठी आईचा आहार हेल्दी असावा. कारण पहिले काही महिने बाळाला सर्व अन्नघटक आईच्या दूधातूनच मिळत असतात. तसेच स्तनपानाचा दिर्घकाळ होणारा फायदा म्हणजे त्या बाळाच्या पुढील आयुष्यात लठ्ठपणा किंवा स्थूलता न वाढणे, आणि Non Communicable Disease (NCD) चा धोका ही कमी होतो.
आयुष्यभर हेल्दी आहार घेतल्यास वेगवेगळ्या प्रकारचे कुपोषण तर थांबवतेच आणि त्या बरोबर मधुमेह, ह्रदयरोग, स्ट्रोक आणि कॅन्सर सारख्या NCD रोगांपासूनही बचाव करण्यासाठी मदत करतात.
हे फायदे मिळवण्यासाठी काही उपयुक्त टीप्स
- जेवढ्या कॅलरीज खाल तेवढ्या खर्च केल्यास वजन नियंत्रणात राहते
- वजन वाढू न देण्यासाठी एकूण कॅलरीजच्या 30% पेक्षा कमी कॅलरीज फॅटस (स्निग्ध पदार्थ) मधून घ्याव्यात.
- साखर शक्यतो कमी प्रमाणातच घ्या. एकूण कॅलरीजच्या 10% पेक्षा कमी कॅलरीज साखरेतून घ्याव्यात. आरोग्य आणखीन सुधारण्यासाठी फक्त एकूण 5% कॅलरीज साखरेतून घेतल्यास उत्तम.
- प्रौढ व्यक्तिंनी 5 ग्रॅम पेक्षा जास्त मीठाचे सेवन करू नये. मीठाचे सेवन कमी झाल्यास हाइपरटेंशन टाळण्यास किंवा ते उशीरा होण्यास उपयुक्त ठरू शकते. त्याचा दुसरा फायदा म्हणजे ह्रदयरोग आणि स्ट्रोक चा धोका ही कमी होऊ शकतो.
ह्या सर्व फायद्यांसाठी कमी कॅलरीजचे सेवन करावयाचे असल्यास CRON (Calories Restriction with Optimal Nutrition) आहाराचे सेवन करा.
June 8, 2015
दुग्धैर्मध्वाज्ययुक्तैर्दधिसितसहितैः स्नापितं नैव लिड्गं
नो लिप्तं चन्दनाद्यैः कनकविरचितैः पूजितं न प्रसूनैः ।
धूपैः कर्पूरदीपैर्विविधरसयुतैर्नैव भक्ष्योपहारैः क्षन्तव्यो मे पराधः शिव शिव शिव भो श्रीमहादेव शम्भो ॥६॥
भगवान श्री शंकरांच्या पूजनाचा विषय निघाल्यानंतर या पूजेमध्ये अर्पण करण्याच्या पुढील पदार्थांची आचार्यश्री ना स्वाभाविक आठवण झाली. या उपचारांचा देखील मी कधी विनियोग केला नाही. अशी कबुली देत त्यासाठी क्षमा मागताना आचार्यश्री म्हणतात,
दुग्धैर्मध्वाज्ययुक्तैर्दधिसितसहितैः - दूध,मध, आज्य म्हणजे तूप यांनी युक्त असलेल्या दही आणि साखर सह, अर्थात पंचामृताने,
स्नापितं नैव लिड्गं - मी कधीही शिवलिंगाला स्नान घातले नाही.
नो लिप्तं चन्दनाद्यैः- त्या भगवान शंकरांच्या प्रतीक शिवलिंगावर कधी चंदन इत्यादींचा लेप लावला नाही. कनकविरचितैः पूजितं न प्रसूनैः - कधी सोने इत्यादींनी सजविलेल्या फुलांनी, अर्थात फुले किंवा आभूषणांनी,
धूपैः- ऊद इ. धूपांनी, कर्पूरदीपै - कापूर आरती इत्यादींनी कधी भगवंता तुझी पूजा केली नाही.
र्विविधरसयुतैर्नैव भक्ष्योपहारैः - विविध रसांनी युक्त असणारे भक्ष इत्यादी नैवेद्य समर्पित केले नाही.
नैवेद्यात मधुर, आम्ल,लवण,कटू, कशाय आणि तिक्त हे
सहा रस असावेत आणि भक्ष्य म्हणजे खाता येणारे, लेह्य म्हणजे चाटता येणारे, पेय म्हणजे पिता येणारे आणि चोष्य म्हणजे चोखता येणारे अशा चार प्रकारचे अन्न असावे असे वर्णन आहे.
क्षन्तव्यो मे पराधः शिव शिव शिव भो श्रीमहादेव शम्भो - हे श्री महादेव शंभो माझ्या या अपराधांना क्षमा करा.
-- प्रा. स्वानंद गजानन पुंड
July 25, 2020
Copyright © 2025 | Marathisrushti