वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
नमस्कार... मी म्युच्युअल फंड बोलतोय.....
खूप वर्षांपासून तुमच्याशी बोलण्याची इच्छा होती. खरं तर तुमच्यावर खुप अारोप करायचेत, तक्रार करायचीय जमलंच तर हक्कानं रुसुनही बसायचंय, पण हे सगळं नेमकं कधी करावं हेच कळत नव्हतं. काय अाहे ना कि, अापण जो पर्यंत स्वत:ला सिद्ध करत नाही, तो पर्यंत कुणी अापल्याला हिंग लावुन विचारत नाही हेच खरं.... अाता शेअरबाजार सर्वोच्च स्थानी गेला अाहे, म्हटलं हिच योग्य वेळ अाहे हे सर्व बोलण्याची
प्रथम मी माझा अल्पसा परिचय परत एकदा करुन देतो. माझा जन्म १९६४ साली संसदेत झाला, १९८७ सालापासुन मी वयात अालो, १९९५ पासुन मी कर्तत्व गाजवायला सुरुवात केली. अाज माझ्या ताफ्यात ४५ कंपन्या अाणि ३००,००० च्या अासपास स्किम्स अाहेत. SIP, Daily- Weekly-Monthly STP, Lumpsum Investment करण्यासारखी वेगवेगळी अायुधं अाहेत. छत्रपति शिवाजी महाराजांचा अादर्श घेत गनिमी काव्याचा वापर करुन मी महागाईशी झालेल्या अनेक लढाया अाजपर्यंत जिंकल्यात. माझा परतावा नेहमीच "करमुक्त" होता. मी गेल्या २०-२५ वर्षापासुन स्वत:ला सिद्ध करत अालोय. पण तुमचा जीव त्या पीपीएफ आणि फिक्स्ड डिपाॅझिटमध्ये अडकुन बसला. मी मानतो कि, पीपीएफ कंम्पाऊंडिंग पद्धतीने व्याज देतो, पण कंम्पाऊंडिंगमध्ये मी "बाहुबली" अाहे, माझ्या SIP चा मुकाबला तर कुणीही करु शकत नाही पण तुम्ही PPF च्या मोहात अडकुन मला विसरलात, चक्क दुर्लक्ष केलंत माझ्याकडे........ "जरा इतिहासाची पाने उलटून बघा, तुमच्या लक्षात येईल कि , पीपीएफ माझ्यासमोर किती छोटा बच्चु अाहे ते..._
पुरावाच द्यायचा झाला तर गेल्या १५ वर्षात दरवर्षी १ लाख रु तुम्ही पीपीएफ मध्ये गुंतवले असतील, तर ते अाता ३५ लाख असतील पण तेच माझ्यात गुंतवले असते तर १.३२ करोड असले असते, पण तुमच्या डोळ्यावर पीपीएफच्या "फिक्स"ची पट्टी बांधलेली. घोडा भरकटु नये म्हणुन दोन्ही डोळ्यांच्या कडेला धातुचे अावरण बांधले जाते तसंच तुम्ही स्वत:ला करुन घेतलंत, माझं तर काहीच अडलं नाही पण शेवटी नुकसान कुणाचं झालं? तुमचंच ना!!
तीच गोष्ट बँक एफडी ची..सर्वांना या एफडीने वेड लावलंय. एखाद्या चेटकीणीने सुंदर स्त्रीचं रुप घ्यावं आणि माणसांनी भुरळुन घरातील घरदांज, खानदानी पत्नीचा कसलाही विचार न करता तिच्या भ्रामक सौदर्यांला बळी पडावं तसं झालं तुमचं या एफडीच्या बाबतीत.. अाता हळुहळु तिचा मेकअप उतरतो अाहे तिचं खरं रुप दिसत अाहे, व्याजदर खाली येता अाहेत म्हणुन तुम्ही निदान अाता माझ्या डेट फंडाकडे बघतायत तरी.. पण इतके दिवस तिला पटवण्यासाठी , कर वाचवण्यासाठी काय काय नाटकं केलीत ते अाठवा ना जरा......फाॅर्म १५ जी/ १५ एच काय........ !! एकाच बॅंकेच्या वेगवेगळ्या शाखात एफडी करणं काय.......!! एफडी मॅच्युअर्ड झाली कि परत त्याची रिन्युअल काय...जास्त व्याज मिळवण्याच्या चक्करमध्ये कुठं पतसंस्थेत जावुन एफडी कर, तर कुठं चक्क मल्टीलेवल चेन मध्ये जावुन गुंतवणुक करुन कपाळ भिंतीवर अादळुन घेतलंत..पण शेवटी काय झालं....एवढं सगळं करण्यापेक्षा थोडं माझ्याकडे प्रेमाने बघीतलं असतं तर या सर्वांची उत्तर "डेट फंडात" सापङली असती. कर वाचला असता, पांढरा पैसा पांढराच राहिला असता अाणि तुमचा पैसा घेवुन कुणी पळुन गेल नसतं.
तिच गोष्ट "रियल इस्टेटची"......... खुप भाव दिला हो तुम्ही त्याला. कुठलाही पारदर्शक व्यवहार नाही, सगळाच अडामधडाम व्यवहार केलात. माझ्या सुशिक्षित सल्लागारापेक्षा "रियल इस्टेटचा" अडाणी दलाल तुम्हाला जवळचा वाटला. बिनीच्या गोलंदाजाने जीव तोडून गोलंदाजी करावी, फलंदाजाला त्रिफळाचीत करावं पण एवढं करुनही अम्पायरने त्याच्यावर विनाकारण डूख धरत तो नोबाॅल देत त्याला नाॅट अाऊट द्यावा, हे तुम्हाला खरोखरच अन्यायकारक अाहे असं वाटत असेल तर थोडं थांबा.. तुमच्याकडूनही असाच माझ्यावर अन्याय झाला कि नाही!!!!
हो...निदान इतिहास तरी हेच सांगतोय. अाज मी पूर्ण तयारीनेच तुमच्याकडे आलोय, माझ्याकडे आता काही फंडाचा मागिल २० वर्ष किंवा त्यापेक्षाही जास्त वर्षाचा इतिहास उपलब्ध अाहे.
अगदी शानदार, पारदर्शक करमुक्त २०% च्या ही पुढे परतावा देवुनही गुंतवणुकीसाठी तुम्ही "रियल इस्टेट"चे लाड केले व मला पुर्णपणे अजुनही स्विकारलं नाही असा माझा अारोप अाहे अाणि माझ्या इक्विटी फंडाची कामगिरी पाहता तो खरा अाहे हे तुम्हाला नक्कीच पटेल. किमान यापुढे तरी तुम्ही त्यांची दखल घेवुन त्यांना प्रथम प्राधान्य देताल ही माझी अपेक्षा नक्कीच गैरवाजवी म्हणता येणार नाही.
खाली अनुक्रमे फंडाचे नाव, त्यांचे वय व परतावा (दर साल दर शेकडा, कंम्पाऊंड म्हणजेच चक्रवाढ दराने, बरं का) दिलेला अाहे.
Hdfc Taxsaver 20.81 29.23%
Hdfc Equity Fund 22.26 25.51%
Reliance Growth 21.49 25.30%
Franklin Ind Prima 23.35 24.79%
Franklin Ind Bluechip 23.35 24.48%
Birla Balanced 95 22.15 23.62%
Hdfc Prudence 23.18 22.25%
Tata Ind Taxsaving 21.01 21.92%
Reliance Vision 21.49 21.38%
Hdfc Top 200 fund 20.56 21.33%
Sbi Magnum Taxgain 24.02 20.64%
Hdfc Capital Builder 23.18 20.55%
अाज मी स्वत:ला सिद्ध केलंय..
इतके स्वच्छ, इतक्या पारदर्शकपणे तुम्ही रियल इस्टेटचे रिटर्न्स पाहु शकतो का ? केवळ एक चेक देवुन गुंतवणुक करु शकतो का? दर महिन्याला गुंतवणुक करु शकतो का? दररोज त्याचे बदलते मुल्य पाहु शकतो का? जितके असतील तितके पैसे गुंतवू शकतो का? अंशत: रक्कम परत घेवू शकतो का ?विकुन 3 ते 5 दिवसात पैसे परत मिळवु शकतो का?
याचं उत्तर जर "नाही" असं असेल, तर यानंतर अापण अापली जास्तीत जास्त गुंतवणुक माझ्या इक्विटी फंडात केली पाहिजे.
June 7, 2017
नागपूर ह्या फळा करीता जगभरात प्रसिध्द आहे.संत्री हे फळ आवडत नाही अशी व्यक्ती विरळच असेल.ह्याचा रस देखील आपण आवडीने पितो.तसेच केक,बिस्कीट,जाम,मध्ये देखील ह्याच्या रसाचा वापर करतात असे म्हणतात तरी कारण अाॅरेंज फ्लेवर हा भारी फेमस आहे बुवा.
ह्याचे झाड हे लिंबाच्या झाडा समान असते.ह्याची फळेचवीलाआंबट,उष्ण,रूचीवर्धक,वातनाशक,
व सारक म्हणजेच मोठ्या आतड्यातील मळ पुढे सरकवणारी असतात.तसेच हे फळ पचायला जड असते.
ह्याचे अनेक औषधी उपयोग देखील आहेत ते आता आपण पाहूयात:
१)संत्राच्या रसात थोडे सैंधव मीठ घालून प्यायल्यास अति ताण पडून आलेला थकवा नष्ट होऊन तरतरी येते.
२)शरीरातून होणारा रक्तस्राव थांबवायला १ कप संत्र्याचा रस १ चमचा साखर व ४ चमचे आवळ्याचा रस घालून प्यावा.
३)संत्र्याची ताजी साल कोरड्या इसबावर १५-२० मिनिटे चोळावी फायदा होतो.
४)संत्र्याच्या सालीची चटणी गरम करून गळूवर बांधावी म्हणजे ते पिकून फुटते.
५)पोटात भूक असून देखील तोंडाला चव नसेल तर संत्र्याचा रस+ओवा+जीरे+हिंग हे मिश्रण घोट घोट प्यावे.
पण संत्री अतिप्रमाणात खाल्ल्यास जुलाब होऊ शकतात.
वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
December 17, 2016

“मी तिरंगा फडकावून येईन किंवा तिरंग्यात झाकून मला आणले जाईल!” अशी प्रतिज्ञा सैन्यातील जवान करतात आणि युद्धभूमीवर आपलं शौर्य दाखवतात. त्यांचं शौर्य घराघरात नेण्याचं काम ‘लक्ष्य’ फाऊंडेशन करत आहे आणि ह्या फाऊंडेशनची स्थापना केली आहे सौ. अनुराधा प्रभुदेसाई ह्यांनी. ह्याच अनुराधाताईंना भारताचा सैनिक मावशी नावाने ओळखतो. सैनिकांच्या मावशीचा आणि त्यांच्या कार्याचा वेध घेतला आहे निरेन आपटे ह्यांनी.
March 20, 2026
प्रातः स्तुवे परशिवां ललितां भवानीं त्रय्यन्तवेद्यविभवां करुणानवद्याम्।विश्वस्य सृष्टि-विलय-स्थितिहेतुभूतां
विद्येश्वरीं निगमवाङ्गमनसाविदूराम्॥४॥
प्रातः स्तुवे - प्रातःकाळी अर्थात सूर्योदयाच्या देखील पूर्वी, डोळे देखील उघडण्याच्या आधी, मी स्तुती करतो.
परशिवां- पर म्हणजे अत्यंत श्रेष्ठ. शिव म्हणजे अत्यंत पवित्र. अत्यंत श्रेष्ठ आणि पवित्र असणारी.
ललितां- अत्यंत लालित्यपूर्ण असणारी.
भवानीं- भव म्हणजे भगवान शंकर. त्यांची चैतन्यशक्ती ती भवानी.
त्रय्यन्त- कोणत्याही वेदांचे संहिता, आरण्यक, ब्राह्मण आणि उपनिषद असे चार भाग असतात. उपनिषद हा चौथा भाग असल्याने त्याला, तीनच्या नंतर असणारा म्हणून त्रय्यन्त म्हटले. अर्थात त्रय्यन्त म्हणजे उपनिषद ,वेदान्त.
वेद्यविभवां- वेद्य म्हणजे स्पष्ट करण्याचे, जाणवून देण्याचे. तर विभव म्हणजे वैभव . अर्थात वेदांत तत्वज्ञानी जिचे वैभव स्पष्ट करते अशी. त्याद्वारे जिला जाणता येते अशी.
करुणानवद्याम्- करुणा अर्थात दया. अनवद्या अर्थात निर्दोष. सामान्य व्यवहारात दये मध्ये समोरच्याला आपल्यापेक्षा हीन समजणे आणि त्याच्यावर उपकार करणे. हा भाव असतो. तो दोष नसलेली दया म्हणजे वात्सल्याने आई परिपूर्ण आहे.
विश्वस्य - विश्वाच्या. सृष्टि-निर्मिती.
विलय- प्रलय, विनाश.
स्थिति- संचालन.
हेतुभूतां - या सगळ्याचे मूळ कारण असणारी.
विद्येश्वरीं- सर्व प्रकारच्या विद्या अर्थात ज्ञानाचे अधिष्ठान असणारी. निगम- वेदादि शास्त्रे, वाङ्गमनसा- वाणी आणि मनाने
विदूराम्- प्राप्त होणे असंभव असलेली.
अशा आई ललितांबेचे मी स्तवन करतो.
-- विद्यावाचस्पती प्रा. स्वानंद गजानन पुंड
March 31, 2020
15 ऑगस्ट 1947 ला जेंव्हा भारत स्वतंत्र झाला तेंव्हा जर कोणी असे म्हटले असते की भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात ब्रिटनचा पंतप्रधान हा भारतीय असेल तर त्या व्यक्तीला त्यावेळी वेड्यात काढले गेले असते. पण नियतीचा खेळ काही वेगळाच असतो.
January 13, 2023
पंडित नेहरूंचे लहान मुलांवर अतिशय प्रेम होते. पडिंत नेहरू यांनी लहानमुलांच्या शिक्षणावर आणि संभाळावर अधिक भर दिला होता. लहान मुले म्हणजे देशाचे भविष्य असे ते म्हणत.
November 14, 2021
अमेरिकन हार्ट असोसिएशनच्या पहिल्या महिला अध्यक्ष डॉ. हेलन टाऊसिग या बालहृदयरोजतज्ज्ञ म्हणून प्रसिद्ध होत्या. जन्मतःच हृदयात दोष असणार्या बालकांवर हृदयशस्त्रक्रिया करून त्यांचे आयुष्यमान उंचावणारी शल्यचिकित्साडॉ. ब्लॅलॉक यांनी प्रथमतः यशस्वी केली व त्यानंतर त्यांचे नाव सर्वतोमुखी झाले.
May 14, 2019
सुरक्षा रक्षकाने एका दमात खुलासा केला…… मन अत्यंत बेचैन झाले, दिवसभर कांहि सुचत नव्हते….. इतके वर्ष झाली पण आजोबांचा तो निर्विकार चेहेरा नाही विसरता आला…….
October 17, 2018
एकता कपूर यांच्याकडून सासू-सुन चित्रपटाची अपेक्षा होती ..
अपेक्षाभंग केल्याबद्दल धन्यवाद !
March 28, 2011
काही वेळा विमा पॉलिसीचे हप्ते भरायचे राहून जातात किवा आर्थिक अडचणींमुळे ते भरता येत नाहीत. अशा वेळी पॉलिसी लॅप्स होते. लॅप्स झाल्यानंतरच्या कालावधीत विमाधारकास काही झाल्यास पॉलिसीचे फायदे मिळू शकत नाहीत. म्हणून पॉलिसी लॅप्स होऊ देऊ नये. अर्थात लॅप्स झाल्यानंतरही पॉलिसी पुन्हा सुरू करणे शक्य असते. मात्र, अशा वेळी विमा कंपनीचे काही निकष पूर्ण करावे लागतात.
September 8, 2010
Copyright © 2025 | Marathisrushti