वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

चंद्रावरील एकूण पदार्थांपैकी किमान साठ टक्के पदार्थ हे या ग्रहापासून आल्याचं विविध प्रारूपांतून दिसून येतं. चंद्राच्या जन्माला कारणीभूत ठरणाऱ्या या ग्रहाला खगोलशास्त्रज्ञांनी ‘थिआ’ हे ग्रीक पुराणातलं नाव दिलं आहे. चंद्राच्या जन्माची ही कहाणी जरी बऱ्याच अंशी स्वीकारली गेली असली तरी, या थिआचे अवशेष काही पृथ्वीवर सापडलेले नाहीत. त्यामुळे चंद्राच्या जन्मामागील सिद्धांतातील अनिश्चितता कायम राहिली आहे.
March 31, 2022
दात तोंड स्वच्छ केल्यावर चेहरा पुसण्यासाठी आपला स्वतंत्र नॅपकीन न घेता, बेसिनवरचा सार्वजनिक टाॅवेल वापरू लागलो. त्यामुळेच साथीचे रोग पसरायला शहरी भागात मदत होते. पण गावामधे मात्र स्वतःचा टाॅवेल स्वतःच्या खांद्यावर, डोक्यावर, कंबरेला गुंडाळून काम सुरु असते.
February 24, 2018
पालक देखील तेवढेच मनापासून शाळेत सहभागी होणारे. संध्याकाळचे जेवण पाच साडेपाच वाजताच आटोपून चर्चमधे choir प्रॅक्टीस (समूह - गान) करायला जाणे नित्याचेच. त्यामानाने शाळेतले कार्यक्रम कधीतरी होणारे, आणि म्हणून अधिक लोकप्रिय. आपल्या मुलांच्या शाळेतल्या बेसबॉल, बास्केटबॉल, व्हॉलीबॉल, फुटबॉल वगैरे टीम्सना पालकांचा उदंड प्रतिसाद असतो. आसपासच्या गावातल्या इतर छोट्या शाळांच्या टीम्स आल्या की सामने मोठे अटीतटीचे होतात. मोठमोठ्या व्यावसायिक खेळांच्या टीम्स प्रमाणे छोट्या छोट्या शाळांच्या टीम्सना देखील स्वत:ची जान पेहचान असते. ह्या टीम्स मग आपल्या गावाच्या नावापुढे आपल्या टीमचं नाव लावून स्वत:ची ओळख निर्माण करतात. जसं सू सेंटर वॉरियर्स, रॉकव्हॅली रॉकेट्स, डिक्सन सिटी ईगल्स वगैरे. प्रत्येक टीमचा युनिफॉर्म आणि रंगसंगती ठरलेली असते. त्यामुळे आपल्या शाळेच्या टीमला पाठिंबा देण्यासाठी त्यांच्या रंगसंगतीची जॅकेट्स किंवा टोप्या वापरून पालक, इतर कुटुंबीय आणि मित्रमंडळी अशा सामन्यांना आवर्जून उपस्थिती लावतात. खेळांप्रमाणेच शाळांचे band concerts देखील असेच भरपूर लोकप्रिय असतात. चार-सहा महिन्यांतून जेंव्हा कधी असा concert शाळेच्या सभागृहात किंवा जिम्नॅशियम मधे सादर होतो तेंव्हा मुलांचे आई वडील, आजी आजोबा, लहान भावंडं असा सगळा लवाजमा हजर असतो.
सॉकरची प्रॅक्टीस गावातल्या मैदानावर होते तेंव्हा लहान मुलामुलींच्या टीम्स आजूबाजूच्या ग्राउंड्सवर खेळत असतात. मुलांचे आई-वडील, आजी-आजोबा, भावंडं घरनं येतांना गाडीतून घडीच्या खुर्च्या, सतरंज्या वगैरे घेऊन येतात. मग दोन ग्राउंड्सच्या मधल्या जागेत खुर्च्या, सतरंज्या टाकून हा सारा कुटुंब कबिला विसावतो. मोठी माणसं कौतुकाने आपल्या मुला/नातवंडांना खेळताना बघत असतात. लहान मुलं आसपास धावपळ करत असतात. उन्हाळ्याचे तीन-चार महिने आणि त्यातून मिळणारे मोजकेच लख्ख सूर्यप्रकाशाचे दिवस, खुली मोकळी हवा आणि निसर्गाशी जवळीक सगळे जण मनापासून उपभोगत असतात.
मिडवेस्ट आणि ग्रेट प्लेन्सच्या बर्याचशा भागात गावांमधली अंतरं खूप. काही छोटी गावं तर इतकी दूर दूर असतात की तिथून कुठे जायचं म्हणजे अंतराचा हिशोब न करता तासांचाच हिशोब करावा लागतो. गावात असलंच तर एखादं छोटंस किराणामालाचं किरकोळ दुकान असणार. आठवड्याची किंवा पंधरवड्याची खाण्यापिण्याची सोय करायची म्हणजे अर्ध्या पाऊण तासावर जरा बर्याशा गावी जायचं. कपड्यांची वगैरे खरेदी करायची म्हटली तर दीड दोन तासांचा पल्ला गाठून एखाद्या बर्यापैकी मोठ्या गावात जायचं. मग या छोट्या गावातल्या मुला माणसांसाठी, साधी कपड्यांची खरेदी म्हणजे एक छोटंस काम न राहता तो एक सोहळाच बनतो. ठेवणीतले कपडे घालून, थोडंसं नटून सजून, धुळी चिखलानं भरलेली गाडी धुवून, लोक अशा मोठ्या गावात जातात. मग नुसतंच घाईघाईने खरेदी उरकून घरी परतण्यात काय मजा? मग कुठे नुसतं मोठ्या गावातल्या प्रशस्त रस्त्यावरून फिरणं, थोड्या मोठ्या आणि लखलखीत इमारती बघत रहाणं, खाणं पिणं, एखादा सिनेमा बघणं, ट्रॅक्टरच्या किंवा पिक-अप ट्रकच्या शोरूम्स मधे जाऊन नवीन ट्रक किंवा ट्रॅक्टर्स बघणं, असा भरगच्च कार्यक्रम असतो. लोक भल्या सकाळी आपल्या गावातून निघतात आणि दिवसभर अशी जीवाची चैन करून रात्री अंधार पडला की परत आपल्या खेडेवजा छोट्या गावाकडे परततात.
-- डॉ. संजीव चौबळ
February 8, 2016
प्रत्येकाची एक कहाणी असते कोणाची दुःखाची, कोणाची यशाची, सुखाची, कर्तुत्वाची प्रेरणेची,कोणाची एकटेपणाची, कोणाची अपयशाची अशीच एक मीनाकुमारीची हळवी कहाणी मनाला चटका लावून जाणारी कहाणी आपल्याला अस्वस्थ करते. मीनाकुमारी ही एक हळवी, व्यथित पण अफाट प्रतिभेची अभिनेत्री होती.
May 29, 2025
जनजागृतीसाठी पथनाटय़ाचा वापर करतात हे साऱ्यांनाच माहीत आहे, मात्र परदेशात प्रसिद्ध असलेला स्ट्रीट माईम हा कलाप्रकार भारतात फार कमी प्रसिद्ध आहे. माईमचा प्रचार आणि प्रसार व्हावा याकरता माईम आर्ट अॅण्ड कल्चर या संस्थेच्या तरुणांनी पाऊल उचललं आहे. नवीन वर्षाच्या पूर्वसंधेला या तरुणांनी सीएसटी, मरिनड्राईव्ह आणि कुलाबा अशा ठिकाणी स्ट्रीट माईम सादर केलं. त्यांच्या कलेविषयी थोडसं.
एकांकिका, नाटक अशा कलेतून पुढे आलेले अनेक कलाकार आपल्याला माहीत आहेत. अशाच प्रकारातला एक कलाप्रकार म्हणजे ‘माईम.’ शब्दांचा वापर न करता, चेह-याचा हावभाव करत एखादी कला लोकांपर्यंत पोहोचवणे म्हणजे माईम. युरोप, अमेरिका, सिक्कीम अशा ठिकाणी हा माईम प्रकार प्रचंड चालतो. स्ट्रीट माईमलाही परदेशात प्रचंड मागणी आहे. आपल्याकडे पटनाथ्य सादर करून जनजागृती केली जाते. भारतातही स्ट्रीट माईमचा प्रकार रुजावा याकरता काही तरुण प्रयत्न करत आहेत.
नववर्षाच्या पूर्व संध्येला सीएसटी, मरिन ड्राईव्ह, कुलाबा अशा ठिकाणी काही तरुण स्ट्रीट माईम करताना दिसले. नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी या तरुणांनी स्ट्रीट माईमचं आयोजन केलं होतं. स्वप्नील गटवे, प्रमोद गुतूकडे, कुणाल काटे, सुयोग आंब्रे, प्रणय फडतरे, सागर चव्हाण आणि दीप नाईक या तरुणांनी कुणाल मोतलिंग याच्या मार्गदर्शनाखाली या स्ट्रीट माईमला सुरुवात केली आहे. सुरुवातीला कॉमेडी अॅक्ट सादर केल्यावर मुंबई पोलिसांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याकरता त्यांनी ‘सलाम मुंबई पोलीस’ यावर आधारित कलाकृती सादर केली.
माईम आर्ट अॅण्ड कल्चरलचा संचालक कुणाल मोतलिंग म्हणतो की, ‘परदेशात स्ट्रीट माईमला प्रचंड मागणी आहे. मात्र आपल्या देशात स्ट्रीट माईमचा म्हणावा तेवढा प्रसार झालेला नाही. आपल्या हावभावने लोकांपर्यंत एखादा विषय नेणं फार अवघड काम असतं, जे माईममध्ये होतं. भारतातही माईम संस्कृती रुजावी, याकरता आम्ही स्ट्रीट माईम अॅक्टचा उपयोग करायचं ठरवलं.’
एकांकिका, नाटक अशा कलेशी खरा संबंध जडतो तो महाविद्यालयातून. आज प्रत्येक महाविद्यालयात स्वंतत्र सांस्कृतिक विभाग आहे. कला क्षेत्रात पदार्पण करू पाहणा-या विद्यार्थ्यांना या सांस्कृतिक विभागाचा खूप फायदा होतो. मात्र आजही अनेक कॉलेजमध्ये माईम या क्षेत्राला हवा तेवढा वाव मिळालेला नाही. शिवाय माईमच्या स्पर्धाही खूप कमी प्रमाणात भरवल्या जातात. त्यामुळे माईम आर्ट अॅण्ड कल्चर या संस्थेतील तरुण मंडळी माईमचा प्रचार करण्यासाठी पुढे आली आहेत.
२२ मार्च रोजी जागतिक माईम दिवस साजरा केला जातो. माईम या कलाप्रकाराचा प्रचार व्हावा याकरता माईम आर्ट अॅण्ड कल्चर या संस्थेतर्फे कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात इच्छुक कलाकारांनी सहभागी होऊन त्यांची माईम कला सादर करायची आहे. त्याचप्रमाणे दरवर्षी २२ सप्टेंबर रोजीही असाच एक कार्यक्रम आयोजित केला जातो. या दोन्ही कार्यक्रमांना अनेक इच्छुक कलाकार सहभागी होत असतात. अशाच कार्यक्रमांमुळे माईमला कलाप्रकाराला चालना मिळेल, असं या संस्थेतील तरुणांना वाटतं.
माईम आर्टिस्ट असलेला कुणाल मोतलिंग सांगतो, एका शाळेत माईम आर्ट शिकवतो. शिवाय अनेक माईम स्पर्धामध्ये परीक्षकांचं कामही करतो. इतरांना शिकवता शिकवता त्यालाही खूप शिकायला मिळतं असं तो सांगतो. माईम आणि स्ट्रीट माईम कलाप्रकाराचा भारतभर प्रचार व्हावा यासाठी या तरुणांनी उचलेलं हे पाऊल खरंच कौतुकास्पदच म्हणावं लागेल.
स्नेहा कोलते
Sneha Kolte
snehagkolte.sk@gmail.com
February 16, 2017
सागरी किनारपट्टीवर असलेल्या अशा गवतयुक्त पाणथळ प्रदेशांमुळे लाटांनी होणारी किनाऱ्यांची धूप थांबवली जाऊन वादळांपासून होणारे नुकसानही घटते. अतिवृष्टी झाल्यास अधिकचे पाणी किनारी पाणथळ प्रदेशांत मुरते आणि मानवी वस्ती जलमय होण्याच्या संभाव्य धोक्याचे प्रमाण कमी होते.
February 2, 2022
व्यवहारात सर्वसामान्यपणे वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकमध्ये लो डेन्सिटी पॉलिथिलिन (एलडीपीई), हाय डेन्सिटी पॉलिथिलिन पॉलिव्हीनाइल क्लोराईड, पॉलिकार्बोनेट पॉलिस्टायरीन (पीएस), पॉलियुरेथीन (पीयू), पॉलिलीप्रॉपीलीन (पीपी), पॉलिथिलीन-टेरेथेलेट (पेट) हे प्रकार येतात. अनेक पॉलिमरमध्ये कार्बन आणि हायड्रोजन असतो. पीव्हीसीमध्ये क्लोरीन असतो. नायलॉनमध्ये नायट्रोजन असतो.
October 22, 2023
पावसाळा सुरु होत आहे या दिवसांत पचनशक्ती मंदावते पावसाळी हवेमुळे खोकला, कफ व घशाचे त्रास होतात. आणि स्वाईन फ्यु डेंग्यू, चिकन गुनिया असे आजार होतात. त्यासाठी पुढील उपचार करावे.
एका स्टीलच्या पातेल्यात दोन ग्लास पाणी घेऊन त्यात दोन झेंडूच्या फुलांच्या पाकळ्या, ६-८ निशिगंधा ची/ गुलछडी चीफुले, ६-७ तुळशी ची पाने, व दोन गलांडीची फुले रात्री भिजत ठेवावी व सकाळी पाणी गाळून घ्यावे व घरातील प्रत्येकाने अर्धी अर्धी वाटी एकावेळी (लहान मुलांना पाव वाटी एकावेळी) सकाळ संध्याकाळ घ्यावे.यामुळे पावसाळ्यात होणारा व्हायरल इन्फेक्शनचा ताप येण्याची शक्यता कमी असते.असा माझा अनुभव आहे.
अरविंद जोशी.B.Sc, पुणे
टीप-वरील सर्व फुले फुलवाल्याकडे मिळतात.
June 15, 2017
तो खातो म्हणून –
मी खातो,
हा खातो म्हणून –
तो खातो.
August 30, 2022
वृद्धाश्रमात ठाण्याच्या –
माझी आत्या असते,
मधूनमधून जातो –
मी तिला भेटायला.
August 28, 2022
Copyright © 2025 | Marathisrushti