वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
अन्नपूर्णे सदापूर्णे शङ्करप्राणवल्लभे ।ज्ञानवैराग्यसिद्ध्यर्थं भिक्षां देहि च पार्वति ॥ ११॥
आई जगदंबा पार्वतीला अन्नपूर्णेच्या स्वरूपात भिक्षा मागताना भगवान जगद्गुरु शंकराचार्य स्वामी महाराज येथे काही वेगळ्याच भूमिका आपल्यासमोर ठेवत आहेत.
अन्नपूर्णे सदापूर्णे- या पहिल्याच उल्लेखात हे वेगळेपण लक्षात घेता येते. हे दोनही शब्द वेगवेगळे करून पाहिले तर तो भाव लक्षात येत नाही. अन्न देणारी, सदैव पूर्णता देणारी असे दोन सामान्य अर्थ होतील. पण एकत्रित पाहिले तरच वेगळा अर्थ कळू शकतो.
अन्न हा मानवी जीवनाचा आधार. त्यालाही ब्रह्म म्हटले. पण ते सामान्य अन्ना बाबत. ते अन्न चार-पाच दिवसावर टिकत नाही. सदैव टिकणारे ते खरे अन्न. ते तोंडाने घेता येत नाही. ते श्री गुरुमुखातून कर्णात पाझरते. त्या शास्त्रज्ञानाला, ब्रह्मज्ञानाला शाश्वत अन्न म्हणतात. ते प्रदान करणारी जी तिला साद आहे, "अन्नपूर्णे सदापूर्णे. "
शङ्करप्राणवल्लभे- ती भगवान शंकरांची प्रिया आहे. ते शंकर आहेत तर ही शांकरी. कल्याणकारिणी.
ज्ञानवैराग्यसिद्ध्यर्थं- ना देवी अन्नपूर्णा सामान्य आहे ना तिला मागितलेले अन्न. मागणी ज्ञानवैराग्याच्या सिद्धीसाठी आहे. त्याच भिक्षेची मागणी आहे. कोणाला? तर पार्वतीला. आत्तापर्यंत अन्नपूर्णा म्हणत होते. आताच पार्वती का? तर त्या शब्दातच खेळ आहे.
कधी काळी जी सती होती ती शंकरांना सोडून दक्षयज्ञात गेली. शेवटी जळाली. नष्ट झाली. का? तर शंकरांना सोडून गेली. त्यांच्या चरणाशी स्थिर राहिली नाही. मग नष्ट झाली.
दुसऱ्या जन्मात पार्वती झाली. पर्वत कन्या. अचला, अविचला झाली.
माझी वृत्ती ईशचरणी अशीच अविचल राहो हीच भिक्षा मागायची आहे. त्या सदैव आनंददायी, ज्ञानवैराग्य सिद्धिदायिनी भिक्षेसाठी पार्वतीला मागणे...
भिक्षां देहि च पार्वति !
-- विद्यावाचस्पती प्रा. स्वानंद गजानन पुंड
March 8, 2020
प्रबोधन पर्वात वृत्तपत्रांना खूप महत्त्व प्राप्त झाले. या वृत्तपत्रांनी आणि नियतकालिकांनी समाजमन घडवण्याचे महत्त्वाचे कार्य केले. जाणीव जागृती केली. स्वातंत्र्याच्या आकांक्षाबरोबरच नवप्रेरणा, जिज्ञासा यांचे खुले आकाश समाजासमोर उभे केले. अगदी त्याच प्रकारे मागच्या दहा-पंधरा वर्षात समाज माध्यमांनी नवी क्रांती घडवून आणली आहे.
November 19, 2023
सकाळी श्रीनगर सोडल्यावर पहलगामला जाताना हायवे च्या दोन्ही बाजूला पाचशे , पाचशे मीटर अंतरावर रायफलधारी जवान दिसत होते . मिलट्रीच्या गाड्या , ट्रक्स , जागोजाग होणारं चेकिंग मी पहात होतो . पेट्रोलिंग का सुरू आहे हे कळत नव्हतं. कदाचित काश्मीर मध्ये असलेल्या मिलट्रीच्या व्यवस्थेचा हा भाग असावा अशी मी मनाची समजूत घातली होती .
April 28, 2023
११ सप्टेंबर २००७ रोजी अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथे संपन्न झालेल्या विश्व शांती संमेलनांत (World Peace Conference) त्यांनी जगातील सर्व धर्मांच्या प्रतिनिधींसमोर विश्वाच्या कल्याणासाठी भारतीय तत्वज्ञान आणि शक्तिपातयोग यांची कास धरणे किती अत्यावश्यक आहे हे पटवून दिले. त्यावेळी उपस्थित सर्वांकडून पूर्वाभ्यासाचे प्रात्यक्षिक करून घेतले. उपस्थित मान्यवरांना पूर्वाभ्यासामुळे विलक्षण शांतीचा अनुभव आल्याचे त्यांनी जाहीरपणे सांगितले आणि पत्राद्वारे प्रशंसा केली.
November 6, 2020
दर वर्षागणिक गणेशोत्सव साजरा करण्याचे प्रमाण वाढते आहे. स्वातंत्र्यानंतर गणेशोत्सवाचा उपयोग लोकप्रबोधनासाठी होऊ लागला. पण गर्दी जमते आहे हे पाहिल्यावर त्याचा फायदा उपटण्यासाठी, राजकीय नेते आणि जाहिरातदार व्यापारी तेथे घुसले. आणि नेमकी येथेच एका धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरेची वाट लागायला सुरुवात झाली.
September 4, 2017
January 5, 2023
मी ठाण्यात जन्मले हे माझं अहोभाग्य. कारण मला कलाकार न होण्याला एकही कारण ठाण्याकडे नव्हतं, उलट ही कलावंत कशी होत नाही हे पाहणारेच अवतीभवती होते. कथ्थक नृत्यगुरू डॉ. राजकुमार केतकर. अगदी हाकेच्या अंतरावर यांचे नृत्यवर्ग. गडकरी रंगायतनसारखी वास्तू दोन मिनिटांच्या अंतरावर आणि कलासरगम, मित्रसहयोग यांसारख्या नाट्यसंस्था संधी द्यायला उत्सुक.
September 30, 2022
षट्तारां गणदीपिकां शिवसतीं षड्वैरिवर्गापहांषट्चक्रान्तरसंस्थितां वरसुधां षड्योगिनीवेष्टिताम्।
षट्चक्राञ्चितपादुकाञ्चितपदां ष़ड्भावगां षोडशीं
श्रीशैलस्थलवासिनीं भगवतीं श्रीमातरं भावये।।४।।
षट्तारां - हा शब्द समजून घेण्यासाठी थोडी कसरत करणे आवश्यक आहे.
षट्तारा म्हणजे सहा ताऱ्यांचा समुदाय. असा समुदायास असतो कृतिका नक्षत्राचा. त्या सहा कृतिका देवसेनापती कार्तिकेयाच्या माता. श्री कार्तिकेय म्हणजे स्कंद हे देवी पार्वतीचे पुत्र. ती देवी पार्वतीच सर्व रूपात नटली असल्याने, कृत्तिका रूपातील सहा ताऱ्यांच्या रूपात नटलेली ती षट्तारा.
या सहापैकी सगळ्यात मोठ्या ताऱ्याचे नाव अंबा आहे हे विशेष.
गणदीपिकां- विश्वातील सर्व जीव हेच जणू जगदंबेचे गण आहेत. त्यांना चैतन्य प्रदान करणारी.
शिवसतीं- भगवान शंकरांची प्रियतमा. षड्वैरिवर्गापहां- काम, क्रोध,लोभ,मोह,मद आणि मत्सर यांना षड्वैरी म्हणतात. त्यांच्या वर्ग म्हणजे समुदायाला, अपहा म्हणजे दूर करणारी.
षट्चक्रान्तरसंस्थितां- मूलत: सहस्त्रारचक्रात निवास करणारी आदिशक्ती, शरीरातील मूलाधारा पासून आज्ञाचक्रा पर्यंत सहा चक्रांच्या ठिकाणी निवास करते.
वरसुधां- श्रेष्ठ अमृत स्वरूपिणी.
षड्योगिनीवेष्टिताम्- सेवा करण्यासाठी सहा योगिनींनी वेढलेली.
षट्चक्राञ्चितपादुकाञ्चितपदां- नाभी कमलस्थित कुंडलिनी शक्ती सहा चक्रांवर आपली पावले उमटवत शेवटी सहस्त्रार चक्रात स्थिर होते. त्या चक्रांना पार करत जाण्याला, त्याद्वारे चरण सुशोभित असणाऱ्या जगदंबेला षट्चक्राञ्चितपादुकाञ्चितपदा म्हणतात.
ष़ड्भावगां - शास्त्रात वर्णिलेल्या अस्ति, भाति इ. सहा भाव अर्थात अवस्थांची अधिष्ठात्री.
षोडशीं- कायम सोळा वर्षांच्या युवती प्रमाणे सौंदर्यवती.
श्रीशैलस्थलवासिनीं भगवतीं श्रीमातरं भावये- श्रीशैल पर्वतावर निवास करणाऱ्या आई जगदंबेचे मी भजन करतो.
-- विद्यावाचस्पती प्रा. स्वानंद गजानन पुंड
April 6, 2020
तुळतुळीत टक्कल आणि दोन पुनरागमनांसाठी प्रसिद्ध असलेला सय्यद किरमानी.
December 28, 2010
बुद्धीने दाखविलेल्या प्रकाशात ज्या बुद्धिपतीच्या प्राप्तीचा साधनामार्ग उजळून निघतो त्या भगवान गणेशांना श्री महाबुद्धीश असे म्हणतात.
February 5, 2022
Copyright © 2025 | Marathisrushti