(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • गौरीदशकम् – ७

    यस्याः कुक्षौ लीनमखण्डं जगदण्डं
    भूयो भूयः प्रादुरभूदुत्थितमेव ।
    पत्या सार्धं तां रजताद्रौ विहरन्तीं
    गौरीमम्बामम्बुरुहाक्षीमहमीडे ॥ ७॥

    आई जगदंबा गौरीच्या विश्वजननी स्वरूपाचे वर्णन करताना आचार्यश्रींनी या श्लोकाची रचना केली आहे.

    कोणत्याही मानवी जीवाची रचना मातृगर्भात असणाऱ्या बीजांडा पासून होत असते. या बीजांडा पासून अनंत कोटी ब्रह्मांडांपर्यंत सर्वत्र विद्यमान चैतन्य शेवटी आई जगदंबेचे आहे हे सांगण्यासाठी आचार्यश्रींनी अशी रचना केलेली आहे.
    आईचे हे जगज्जननी स्वरूप सांगताना ते म्हणतात,

    यस्याः कुक्षौ लीनमखण्डं जगदण्डं- जिच्या कुशीमध्ये हे संपूर्ण जगत् रूपी अंड अखंड लीन असते.

    यातील लीन शब्द मोठा सुंदर आहे. हे विश्व आईच्या उदरातून जन्माला येते. विलय होते तेव्हा देखील तेथेच असते. त्यातच विलीन होते. अर्थात ज्या वेळा ते दिसत नाही त्यावेळी देखील ते आईच्याच उदरात असते. विश्व दृश्य असो की नसो, ती विश्वजननी आहेच.
    असा सुंदरतम अर्थ त्यातून प्रगट होतो.

    भूयो भूयः प्रादुरभूदुत्थितमेव - त्या उदरातून हे विश्व भूयो भूय: अर्थात वारंवार, जागृत झाल्या प्रमाणे निर्माण होते. जसा एखादा माणूस झोपेत असताना त्याच्या संपूर्ण बाह्य विश्वाचा विलय होतो. मात्र उठल्या क्षणी पुन्हा जशाला तसे दिसते. तसे हे विश्व आईच्या उदरातून वारंवार प्रगट होते.

    पत्या सार्धं तां रजताद्रौ विहरन्तीं- पतीचा सह रजत म्हणजे चांदीच्या पर्वतावर निवास करणाऱ्या त्या, येथील चांदीचा पांढरा रंग आणि चमक धारण करण्याच्या समानतेवरून कैलास पर्वताला चांदीचा पर्वत म्हटले आहे. त्यावर निवास करणाऱ्या,

    गौरीमम्बामम्बुरुहाक्षीमहमीडे- कमलाप्रमाणे नेत्र असणाऱ्या आई गौरीचे मी स्तवन करतो.

    -- प्रा. स्वानंद गजानन पुंड

      May 5, 2020


  • शरीराचा आकार आणि आहार

    काही लोकांच्या शरीरामध्ये कमरेच्या वरच्या भागात तर काही लोकांच्या कमरेच्या खालच्या भागात अधिक चरबी असते. तसेच काही लोकांमध्ये लवकर चरबी वाढत नाही. तज्ज्ञांच्या मते, माणसाचे शरीर एकसारखे नसते, त्यामुळे असे होते. प्रत्येकाच्या शरीराचा आकार वेगळा असतो. त्यामुळे भोजन पद्धतीही त्यानुसारच असायला पाहिजे. सर्वांच्या शरीरातील वेगवेगळ्या भागांत चरबी वाढत असते. त्यामुळे ती नियंत्रित करण्यासाठी शरीराच्या गरजाही वेगवेगळ्या असतात.

    अॅपल शेप (सफरचंदाचा आकार)

    या आकाराचे शरीर चारही बाजूंनी गोलाकारात पसरलेले असते. हा आकार अनुवांशिक असतो आणि यामध्ये छाती आणि खांदे रुंद असतात. याउलट कमरेच्या खालच्या भागात म्हणजेच पायांमध्ये कमी चरबी असते. तज्ज्ञांच्या मते, या शरीराच्या आकारात बॅली फॅट कमी करण्यासाठी अत्यंत मेहनत करावी लागते; परंतु खाली दिलेल्या टिप्सच्या माध्यमातून त्यावर नियंत्रण मिळवता येऊ शकते.

    • जर तुमचे आतडे अधिक संवेदनशील असतील तर अल्कोहोलचे सेवन करणे तुमच्यासाठी हानिकारक ठरू शकते. अशावेळी तुम्हाला ही सवय सोडून द्यावी लागेल. अशा स्थितीत झोपेशी संबंधित समस्या वाढायला लागतात.

    • या आकारासाठी प्रोबायोटिक फूड अत्यंत फायदेशीर आहे. यामध्ये फॅट कमी असतात पोषक द्रव्ये अधिक असतात. त्यामुळे पचनक्रिया चांगली राहते. तसेच पोटही साफ होते.

    • भरपूर पाणी पिल्याने पचनक्रिया चांगली राहील. तसेच शरीरात भरपूर पाणीही राहील. डायट, सोडा यासारख्या काबरेनेटयुक्त पेयपदार्थांचे सेवन करू नये. कारण यामुळे पोट फुगते.

    बनाना शेप (केळीचा आकार)
    केळीच्या आकाराचे शरीर असलेले लोक हडकुळे आणि उंच असतात. या लोकांनी काहीही खाल्ले तरी त्यांच्या शरीरावर जास्त परिणाम होत नाही. तसेच या लोकांचे स्नायूही अत्यंत कमी असतात. या लोकांनी योग्य आहार घेतला नाही तर त्यांना लवकर थकवा येतो. त्यामुळे त्यांनी खालील बाबी लक्षात ठेवाव्यात.

    • स्नायू वाढवण्यासाठी प्रथिनयुक्त खाद्यपदार्थांचे सेवन करावे. ग्रिल्ड चिकन, उकडलेली अंडी यांचा आहारात समावेश करावा.

    • या आकाराच्या लोकांनी आपल्या भोजन पद्धतीबाबत विशेष काळजी घेतली पाहिजे. रक्तात साखरेचे प्रमाण टिकवून ठेवण्यासाठी हे अत्यंत आवश्यक आहे, अशा लोकांचे वजनही लवकर वाढत नाही, त्यामुळे काळजी करण्याचे कारण नाही. या लोकांनी बाहेरील खाद्यपदार्थ खाण्याचे टाळावे.

    • आरोग्यदायी मेद/ प्रथिनयुक्त पदार्थांचे सेवन करावे. सर्व प्रकारच्या धान्यापासून तयार करण्यात आलेले पॉपकॉर्न, बदाम, दही आणि अँव्होकॅडो यासारख्या फळांचे सेवन करावे.

    पीअर शेप (नाशपाती फळासारखा आकार)
    पेरूसारखे दिसणार्‍या नाशपाती या फळासारखा आकार असणार्‍या लोकांचे शरीर वरच्या बाजूने अरुंद आणि कमरेच्या खालच्या बाजूने रुंद असते. अशा लोकांचे जेव्हा वजन वाढते तेव्हा पोटाच्या खालचा भाग, कंबर आणि मांड्या जड व्हायला लागतात. मेदयुक्त दुग्धजन्य उत्पादने आणि गोड पदार्थ ही या लोकांची कमकुवत बाजू आहे. अशावेळी या लोकांना खालील उपाय करायला पाहिजेत.

    • आइस्क्रीममध्ये मेद आणि साखर जास्त असते, त्यामुळे याऐवजी कमी गोड असलेल्या फ्रोजन योगर्ट यासारख्या खाद्यपदार्थांचे सेवन करावे.

    • दुग्धजन्य पदार्थांमध्ये भरपूर पोषक द्रव्ये असतात. त्यामुळे या पदार्थांचे भरपूर सेवन करावे. एक औंस चीजमध्ये 100 कॅलरी आणि आठ ग्रॅम फॅट असते.

    त्यामुळे याचे सेवन कमी फॅट असलेल्या क्रॅकर्ससोबत केले जाऊ शकते.

    • अपचन होईल अशा पदार्थांपासून दूरच राहावे. दिवसातून किती वेळा जेवण करता, याकडेही लक्ष ठेवावे.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३१७३३
    संदर्भ.इंटरनेट

      January 6, 2017


  • गोकर्ण/विष्णूक्रांता

    ।। विघ्नराजाय नम: विष्णूक्रांतापत्रं समर्पयामि।।

    गोकर्णाचा बहूवर्षायु वेल असतो.ह्याला जांभळी अथवा पांढऱ्या रंगाची फुले फुलतात.ह्याच्या शेवगा बोटभर लांब असतात.

    गोकर्ण चवीला कडू,गुणाने कोरडी व थंड असते.

    आता आपण गोकर्णाचे उपयोग जाणून घेऊयात:

    १)कोडावर गोकर्णाच्या मुळाचा लेप करतात.

    २)अर्धशिशिवर गोकर्णाच्या बिया व मुळ एकत्र वाटून लेप लावावा.

    ३)काना जवळ आलेली सुजेवर गोकर्णाची पाने व सैंधव मीठ एकत्र वाटून लेप लावावा.

    ४)कफरोगात गोकर्णाचे मुळ गाईच्या निरशा दुधासेबत देतात.

    (सुचना: ह्या लेखातील वनस्पती वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे )

    वैद्य(सौ)स्वाती हेमंत अणवेकर,
    आरोग्य आयुर्वेदीक क्लिनीक,
    म्हापसा गोवा.
    संपर्क:९९६०६९९७०४

      August 13, 2017


  • ठाणे म्यूझिक फोरम

    तर मंडळी , अाटपाट नगर होतं { ठाणे हां , अहमदनगर नव्हे! }.तिथे ३ झपाटलेल्या वल्ली होत्या : शशांक दाबके — अनंत जोशी अाणि धनश्री लेले ! २०१३ सालापासून त्यांनी एक पण केला : काय पण झालं तरी ठाण्यातल्या लोकांना संगीताची भरगच्च मेजवानी द्यायची अाणि या त्यांच्या अट्टाहासातून गेली ५ वर्षे ठाणे म्यूझिक फोरम अाणि उत्कर्ष मंडळयांच्या सहयोगाने हा संगीतरथ अव्याहत वाटचाल करतोय ! अाणि हा कार्यक्रम होण्याचं ठिकाण काय तर सहयोग मंदिर ! या वास्तूचं नांव सहयोग खेरीज दुसरं असूच शकत नाहि ! कितीतरी विषयांवरचे कार्यक्रम अखंडपणे इथे चालतात अाणि अाम्हां ठाणेकरांना अाकंठ तृप्त करतं हे सहयोग मंदिर मंडळी यावर्षी २४ , २५ , २६ मार्च असे ३ दिवस हा कार्यक्रम झाला.पहिल्या दिवशी ओढव रागांवर { म्हणजे ५ सुरांवर अाधारित } , दुसर्‍या दिवशी षाढव रागांवर { म्हणजे ६ सुरांवर अाधारित } अाणि सांगतादिनी संपूर्ण सूरसप्तकावर अाधारित राग सादर केले गेले ! तीन दिवस कान तृप्त झाले ! बाकी एखादा संगीत वा कलेविषयक अनुभव हा वर्णन करुन दुसर्‍या व्यक्तीला तितकाच अानंद देऊ शकेल इतकी कुणाचीहि लेखणी समर्थ कशी असेल ? फार तर तांत्रिक बाबींवर वर्णन करता येईल

      March 29, 2017


  • नवी ओळख पुसून टाका!

    जगात अब्जावधी लोक आहेत, परंतु तरीसुद्धा एका व्यक्तीसारखी हुबेहूब दुसरी व्यक्ती असणे शक्य नाही. अगदी जुळ्या मुलांमध्ये देखील सूक्ष्मसा फरक असतोच. सांगायचे तात्पर्य, प्रत्येक व्यक्तीची एक स्वतंत्र ओळख असते.

      August 27, 2006


  • कारण येथे सर्वांना जिंकायचे आहे

    स्पर्धेच्या या जगामध्ये माणूस स्पर्धक झाला आणि तो इतका बेभान झाला की त्याला कुठल्याही गोष्टीची काही घेणे देणे नाही , त्याला फक्त जिंकायचं आहे आणि ती जिंकणे त्याच्या आयुष्याचं ध्येय होऊन बसलेल आहे. इथल्या बहुतेक सर्वच स्पर्धेमध्ये माणूस निश्चितच जिंकणार पण खर्या आयुष्याच्या स्पर्धेमध्ये तो हरणार तर नाही ना ही भीती मात्र वाटते…..

      September 1, 2020


  • संपूर्ण साक्षरतेचे स्वप्न दूरच

    शिक्षणाच्या प्रचार आणि प्रसारासाठी विविध योजना राबवून आणि कोट्यवधी रुपये खर्च करूनही अपेक्षित परिणाम दिसत नसल्याने अखेर मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा कायदा करण्यात आला. या कायद्यामुळे शिक्षणाची गंगा सर्वदूर पसरेल अशी आशा निर्माण झाली. पण, या कायद्यातील काही त्रुटी लक्षात घ्यायला हव्यात. त्या वेळीच दूर केल्यास मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाच्या कायद्याची फलश्रुती दिसून येईल.

      December 8, 2010


  • गौरीदशकम् – १

    लीलालब्धस्थापितलुप्ताखिललोकां
    लोकातीतैर्योगिभिरन्तश्चिरमृग्याम् ।
    बालादित्यश्रेणिसमानद्युतिपुञ्जां
    गौरीममम्बामम्बुरुहाक्षीमहमीडे ॥ १॥

    आई जगदंबेच्या शुद्ध सात्विक स्वरूपाला गौरी असे म्हणतात. तिचा गौरवर्ण तिच्या सात्विकतेचे ,शुद्धतेचे, पावित्र्याचे प्रतीक आहे.

    या आई जगदंबेचे वर्णन करताना जगद्गुरु आदि शंकराचार्य स्वामी महाराज म्हणतात,
    लीलालब्धस्थापित

    लुप्ताखिललोकां- भगवान ब्रह्मदेवांच्या दिवसाच्या शेवटी म्हणजे कल्पांती ही चवदा भुवनात्मक सृष्टी विलोप पावते. पुन्हा नवीन कल्पात अर्थात श्री ब्रह्मदेवांच्या नवीन दिवसाच्या आरंभी जिच्या सहज लीलेने हे सर्व लोक हे लुप्त झालेले लोक जणू पुन्हा सापडल्यासारखे आपापल्या जागी स्थिर होतात अशी.

    लोकातीतैर्योगिभिरन्तश्चिरमृग्याम् - लोकातीत अर्थात सामान्यजनांच्या पेक्षा अधिक श्रेष्ठ असलेले योगी लोक अंतकरणात सतत जिचा शोध घेतात, अर्थात सतत जिचे चिंतन करीत असतात अशी.

    बालादित्यश्रेणिसमानद्युतिपुञ्जां- बाल आदित्य अर्थात नुकताच उगवलेला सूर्य, त्याची श्रेणी अर्थात समूह. म्हणजे जणू काही अनंत सूर्यांचे एकत्रित स्वरूप. त्या एकत्रित तेजाप्रमाणे दैदिप्यमान अशी.

    अर्थात जिचे तेज कोट्यावधी सूर्याप्रमाणे लखलखते आहे मात्र बालरवी म्हणताना त्यात अपेक्षित आहे, की जरी असे कोट्यावधी सूर्याचे तेज असले तरी ते दाहक नाही. भीषण नाही. उलट प्रभातीच्या सूर्याप्रमाणे ते आल्हाददायक आहे आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे समोरच्याला प्रेरणादायी आहे. जसा सूर्य उगवला की माणूस कामाला लागतो तसे आई जगदंबेचे दर्शन त्याला कर्तव्यरत करते.

    गौरीममम्बामम्बुरुहाक्षीमहमीडे - गौरी अर्थात गौरवर्णाची असलेली, अंबा म्हणजे जगदंबा, अंबुरुहाक्षी म्हणजे कमळाप्रमाणे नेत्र असणाऱ्या आई जगदंबेचे स्तवन करतो.

    -- प्रा. स्वानंद गजानन पुंड

      April 28, 2020


  • कर्मयोगी कीटक

    कर्मयोगी कीटक

    मधमाश्या या आपल्या मित्र आहेत, हे आपल्याला ज्या दिवशी कळेल, त्या दिवशी आपले पुष्कळ हित होईल. सध्या त्यांना शत्रू समजून आपण आपले नुकसान करून घेत आहोत…..

      January 24, 2024


  • या मसाल्यात दडलंय काय? – भाग दोन

    ३) हळद- वनस्पती शास्त्रातील नाव कर्क्यूमा लाँगा, याचे जमिनीतले खोड म्हणजे हळदकुंड. पुराणकाळापासून मंगलकार्यातील व पाककृतीत मानाचे स्थान. पदार्थांना रंग व चव देणारी हळद आहेच तशी गुणकारी. सांगली सर्वात जास्त हळद पिकविणारी व निर्यात करणारी. पिढ्यान्पिढया हळद कृष्णाकाळच्या भूमिगत गोदामात साठवली जाते. जखम झाल्यास रक्तस्त्राव थांबवण्यासाठी व जंतुप्रतिबंधक म्हणून हळद लावण्याचा प्रघात आहे. हळदीमध्ये लोहाचे प्रमाण सर्व पदार्थापेक्षा अधिक आहे. ६८ मि. ग्रॅ. हे लोह शोषले जाण्यासाठी साहाय्य करणारे मँगनीज ९ मि. ग्रॅ., कॅल्शियम १५० मि. ग्रॅ., फॉस्फरस २८०, जस्त ३ मि. ग्रॅ. प्रतिशत असते. लोह खूप असल्यामुळे पांडुरोगात उपयोगी व एकंदरीत प्रतिकारशक्ती वाढवते. यातील कर्क्युमीन कर्करोगप्रतिबंधक आहे.

    ४) वेलची- एलिटेरिया कार्डामोमम नावाची एवढीशी वेलची! पाकशास्त्रात व मुखशुद्धीसाठी महत्त्वाचे स्थान, पाकशास्त्रातील पाककृतीत वेलची आवश्यक. काळा मसाला तिच्याशिवाय होत नाही. वेलची उत्तेजक, पाचक, पोटातील वायू कमी करणारी, मळमळ कमी करणारी. लवंगेप्रमाणेच कामवासना वाढवणारी. हे गुणधर्म त्यातील तैलद्रव्यामुळे येतात म्हणून ती थंड ठिकाणी ठेवावी म्हणजे तैलद्रव्ये उडत नाहीत. श्वसनसंस्थेला, पचनसंस्थेला शामक. महत्त्वाचे म्हणजे वेलची बिंबिकेची गुठळी होऊ देत नाही. मादी फुलातून वेलची तयार होते. नर फुले दिसायला सुंदर. वेलचीत प्रतिशत कॅल्शियम, १३० मि. ग्रॅ., फॉस्फरस १६०, मॅग्नेशिअम १७३,
    मँगनीज ९ जस्त ३ व कोलीन १५५० मि. ग्रॅ. असते.

    ५) दालचिनी - सीमॅमोमम झीलॅनिकम या
    झाडाची साल. याचा क्रियाशील घटक सीनॅमिक अॅसिड. हे जंतूनाशक आहे. त्यामुळे पूर्वी इजिप्तमध्ये कलेवरांना लेप लावायचे. रोमन लोक अत्तरे व मद्यात उपयोग करतात. आशियाई स्वयंपाकात करतात.
    दालचिनीचा अर्क औषधात वापरतात, त्यामुळे पोटातील वायू कमी होऊन पोटदुखी कमी होते. पाचक व भूक प्रज्वलित होते.

    ६) आले - झिंझीबार ऑफिसीनेलचे भूमिगत खोड. भारत सर्वात जास्त आले पिकवले व निर्यात करतो. मुख्य द्रव्य जींजेरॉल. प्रसाधने, सुवासिक द्रव्ये, शीतपेये यात वापर. पाचक, पोटातील वायू कमी करते. चघळल्यास लाळ सुटते. वार्धक्यात लाळ कमी होऊन तोंडात शुष्कता येते. अशावेळी आवळकट्टी, आलेपाक, चघळावी म्हणजे लाळ सुटून पचनास मदत होते. यात लोह ४ मि. ग्रॅ., मॅग्नेशिअम ४०५, मँगेनीज ५, कॅल्शियम २०, फॉस्फरस ६० मि. ग्रॅ. प्रतिशत असते. आल्यामुळे रक्तातील बिंबिकेची गुठळी होत नाही. कर्करोगप्रतिबंधक, रक्तातील शर्करा कमी करते. यावर अधिक संशोधन चालू आहे.

      March 14, 2023