(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • मराठवाड्यातील अष्टविनायक

    अष्टविनायक ही संकल्पना आपल्या सगळ्यांना परिचित असून आपण सर्वजण त्या स्थानांची आवर्जून यात्रा करतो. ही अष्टविनायकांची स्थाने बरीचशी प्राचीन असून या प्रत्येक स्थानाला पौराणिक, धार्मिक, ऐतिहासिक बैठक आहे. या सर्व गणेशस्थानांमध्ये देवांनी, असुरांनी, ऋषींनी, भक्तांनी गणेशाची आराधना केलेली असून त्याचे प्रतीक म्हणून गणेशमूर्तीची स्थापना केलेली आढळते.

      May 21, 2024


  • श्री त्रिपुरसुंदरी स्तोत्रम् – १

    कदंबवनचारिणीं मुनिकदम्बकादंबिनीं,
    नितंबजितभूधरां सुरनितंबिनीसेविताम् |
    नवंबुरुहलोचनामभिनवांबुदश्यामलां,
    त्रिलोचनकुटुम्बिनीं त्रिपुरसुंदरीमाश्रये ॥१||

    भगवान जगद्गुरु आदि शंकराचार्य स्वामी महाराज भगवती त्रिपुरसुंदरीचे उपासक होते. शाक्त संप्रदायात वर्णन केलेल्या दशमहाविद्यांपैकी हे सर्वश्रेष्ठ स्वरूप आहे त्रिपुरसुंदरी.
    बाला, षोडशी,ललितांबा अशा विविध स्वरूपात तिचे पूजन केले जाते.
    या आपल्या आराध्य स्वरूपाचे वर्णन करताना आचार्यश्री म्हणतात,
    कदंबवनचारिणीं- कदंब वृक्ष हा शाश्वताचे प्रतीक आहे. चिरंतन, सनातन शक्ती असणारी आई जगदंबा कदंब वृक्षाच्या वनामध्ये विचारण, भ्रमण करणारी. मुनिकदम्बकादंबिनीं- मुनी अर्थात ऋषीमुनी. कदंब शब्दाचा दुसरा अर्थ आहे समूह. तर कादंबिनी म्हणजे मेघमाला. ऋषीमुनींच्या समूहाला आपल्या कृपा वर्षावाने तृप्त करणारी मेघमाला.
    नितंबजितभूधरां- आपल्या नितंब प्रदेशाच्या गोलाई आणि पुष्टतेने पृथ्वीला जिंकणारी. सुरनितंबिनीसेविताम् - सुर म्हणजे देवता. त्यांच्या नितंबिनी अर्थात सुंदरींच्या द्वारे सेवा केली जात असणारी.
    नवंबुरुहलोचनाम् - नव अर्थात नवीनच उगवलेल्या, अंबुरूह म्हणजे कमळाप्रमाणे, लोचन म्हणजे नेत्र असणारी.
    अभिनवांबुदश्यामलां- अभिनव अर्थात नवीनच तयार झालेल्या, अंबु म्हणजे पाणी, अंबुद म्हणजे मेघ, श्यामल म्हणजे सावळी. नवीन तयार झालेल्या अर्थात पाण्याने भरलेल्या मेघाप्रमाणे घन:श्याम असणारी.
    त्रिलोचनकुटुम्बिनीं- त्रिलोचन अर्थात ज्यांना तीन नेत्र आहेत असे म्हणजे भगवान श्रीशंकर. त्यांची कुटुंबिनी अर्थात सहधर्मचारिणी. त्यांच्यासह संपूर्ण ब्रह्मांडाची संचालिका, असणाऱ्या,
    त्रिपुरसुंदरीमाश्रये - श्री जगदंबा त्रिपुरसुंदरीचा मी आश्रय करतो. तिच्या चरणकमली शरण जातो.

    -- प्रा. स्वानंद गजानन पुंड

      June 2, 2020


  • किचन क्लिनीक – अक्रोड

    किचन क्लिनीक – अक्रोड

    अक्रोडाचे स्वरूप जर आपण पाहिले तर अगदी मानवी कवटी व मेंदूशी साधर्म्य असणारे वाटते.
    अक्रोडाचा वापर खायला,तेल काढायला तसेच
    अक्रोडाचा वापर स्क्रब म्हणून देखील केला जातो.

    अक्रोड चवीला गोड,उष्ण,स्निग्ध,पचायला जड असून वातदोष कमी करणारे व कफपित्त वाढविणारे आहे.हे शुक्रधातू वाढवितात,,वजन वाढायलामदतकरतात.पौष्टीक,बलकारक,
    हृदयाला हितकर असतात.

    अक्रोड खाल्ल्याने मेंदूची ग्रहण शक्ती वाढते व बुद्धि चांगली होते म्हणूनच लहान मुलांना अक्रोड खायला द्यावा.

    अक्रोड अतिप्रमाणात खाल्ल्यास पित्ताचा त्रास होऊ शकतो.

    (ह्या लेखामधील उपचार हे वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे हि विनंती)

    वैद्य स्वाती हे.अणवेकर
    आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
    म्हापसा गोवा.
    संपर्क:
    ९९६०६९९७०४

      January 10, 2017


  • शर्यत : ससा आणि कासव

    गोल-गोल होते रिंगण, कोण जिंकले, कोण हरले, प्रश्न होता बिकट. …

      December 23, 2016


  • गरिबांची गाडी – सिंहावलोकन

    मुंबईवरील इंग्रजी सत्तेची पहिली चाळीस वर्षे लोटल्यावर साधारपणे १७१० नंतर – रोग, परकीय आक्रमणे इ. संकटांचे भय बरेचसे ओसरले होते. बळ आणि आत्मविश्वास हे गुण वाढले तेव्हां काहीशा निर्भयपणाने इंग्रज प्रगतीचा मार्ग आक्रमू लागले.

      March 8, 2015


  • खांदेरीच्या पोटात दडली विजयगाथा

    पोर्तुगीझांबरोबर स्वराज्यास त्रास देणारे जंजिरेकर सिद्दी आणि इंग्रज यांना शह देण्यासाठी, इंग्रजांची सिद्दीला मिळणारी रसद ठप्प करण्यासाठी, या दोन शत्रूच्या मुळावर पाचर ठोकण्यासाठी अलिबाग आणि मुंबईच्या मध्यावरील बेटांवर छत्रपती शिवरायांनी बांधलेला किल्ला.... खांदेरी. खांदेरी म्हणजे इंग्रजी भाषेत हेनरी. यानंतर सिद्दीने दीड किलोमीटर असलेल्या बेटावर उंदेरी किल्ला बांधला. अलिबागसमोरील खोल समुद्रात हे जलदुर्ग आहेत. मुंबई समुद्र किनाऱ्यावरून दिसणारे हे जलदुर्ग नेहमीच खुणावत असतात. पण जाण्या-येण्याच्या गैरसोयी आणि या बेटावर वावरण्यास असलेले निर्बंध यामुळे हे दुर्ग पाहणे कठीण होऊन गेले आहे. खांदेरी बेट हे सरकारच्या तटरक्षकाच्या ताब्यात असल्याने पर्यटकांना लाभ घेता येत नाही. परंतु एक पर्याय म्हणजे येथे कोळी लोकांचे दैवत वेताळबाबाचे मंदिर असल्याने त्यांची ये-जा नेहमी सुरु असते.त्यांच्यासोबत मात्र येथे आपला संचार करू शकतो.उंदेरीवर मात्र कोणी जात नाही. मुंबई पोर्ट ट्रस्टच्या ताब्यात असलेल्या या बेटांवरील ब्रिटीशकालीन दिपगृहाला कान्होजी आंग्रे यांचे नांव देण्यात आले आहे.

    शिवाजीमहाराजांनी आरमाराबद्दल विचार केला तेव्हापासून म्हणजे इ.स. १६७१ पासून त्यांचे खांदेरी- उंदेरी या समुद्रातील बेटावर लक्ष होते. इंग्रज, पोर्तूगीजांच्या वाढत्या कारवायांना आळा घालण्यासाठी या बेटावर आपले मजबूत आरमार असावे असे त्यांना वाटत होते. त्याप्रमाणे त्यांनी पावले उचलली. इ.स.१६७९ साली मायनाक भंडारी यांना काम करण्यास बजावले. काम सुरु होताच इंग्रज खवळले. यावर तेथे आपले अधिकारी पाठवून बेट आपल्या मालकीचे असल्याचा कांगावा केला. पण मायनाक भंडारीने त्यांना न जुमानता काम जोराने सुरु ठेवले. पण मायनाक भंडारीने झाल्या प्रकाराबद्दल महाराजांना निरोप धाडला होता. हे ऐकून महाराजांनी आपल्या आरमाराचा सेनापती दौलतखान यास तातडीने रवाना केले.इ.स. ३ सप्टेंबर १६७९ इंग्रजांनी बेटाचा ताबा घेण्यासाठी ह्युजेस हा अधिकारी नेमला व इ.स. ६ सप्टेंबर १६७९ रोजी ह्युजेस आपल्या तुकडीनिशी बेटावर चालून आला. पाऊस पडत होता. दर्या उसळला होता.बेटावर लाटा येऊन थडकत होत्या त्याचवेळी मुंबई दिशेने अनेक बोटीतून सैन्य खांदेरीच्या दिशेने निघाले होते. मायनाक भंडारीनी बेटावरील तोफांचा ताबा घेतला होता तर त्या खवळलेल्या सागरात दौलतखान गस्त घालीत होता. चाणाक्ष सेनापती दौलतखान याने त्या इंग्रज तुकडी वर असे आक्रमण केले की, ते ज्या बोटीतून आले होते, त्यासहित त्यांना जलसमाधी दिली. तीन अवाढव्य गुराबा आणि साठ एक नांव होत्या.किमान ५००० इंग्रज सैन्य होते. परंतु सुखासुखी कोणी परतला नाही. इंग्रज नरमले. दुसरीकडून जंजीऱ्याचा सिद्दी कासम जागा झाला. दौलतखानने त्याची गत इंग्रजाप्रमाणे केली. हे सुरु असतना मायनाक भंडारीने अल्पावधीतच खांदेरीची मजबूत तटबंदी उभी केली. आज इतकी वर्षे होऊन गेली तरी तुफान दर्याच्या लाटांना तोंड देत खांदेरीची तटबंदी अद्याप ठामपणे उभी आहे. त्या पराक्रमाची गाथा सांगण्यासाठी वर्षानुवर्षे अशीच उभी राहणार आहे. खांदेरीच्या पोटात दडलेली ही विजयीगाथा थोड्या थोडक्या लोकांना ठाऊक असेल. जेव्हा पूर्णपणे खांदेरी उभा राहिला तेव्हा महाराज नव्हते. जर महाराज अजून दहा वर्षे असते तर एक इंग्रज दिसला नसता किंवाऔरंगजेब दख्खन मध्ये दाखल झाला नसता. तसेच स्वराज्याची वाताहतही झाली नसती.

    इ.स.१५८८ ची एक गोष्ट सांगाविशी वाटते. स्पेनचा स्पँनिश आरमाडा म्हणून जगातील अव्वल दर्जाचे आरमार. काटक, धिप्पाड, कष्टाळू स्पँनिश सैन्य अटलांटा महासागरातील उत्तर समुद्रात त्यांचे राज्य होते. ते स्वत:ला बलवान आम्हीच असे म्हणत आणि त्यांच्या वाटेला कोणी जाण्याची हिमंत करीत नव्हते. ब्रिटनच्या मनात त्यांच्याविषयी सल होती. दळणवळण यंत्रणा कुचकामी ठरत असल्यामुळे इंग्रज चवताळले होते. योग्य संधीची वाट पाहत त्यांनी स्पँनिश आरमाराला आम्ही खऱ्या अर्थाने बलवान आहोत, असे सांगितले. त्यामुळे स्पँनिश सैन्य इंग्रजावर धावून गेले. कुमक कमी असलेल्या आणि आरमारात प्रवीण नसलेल्या इंग्रजांनी स्पँनिश नौकांना सैन्यासहित जलसमाधी दिली आणि विजय संपादन केला. तेव्हा तसे कारणही घडले एक मोठ्या वादळाचा तडाखा युध्द सुरु असताना झाले. अन इंग्रजांच्या पथ्यावर पडले. त्यानंतर इंग्रज सर्वत्र संचार करू लागले. राज्याचा विस्तार होत गेला. पण त्यांनी त्या बुडविलेल्या नौका समुद्रातून बाहेर काढल्या. खर्च अमाप आला. परंतु आपल्या विजयाचे स्मरण भविष्यात आपल्या पिढीला व्हावे म्हणून त्या नौकाच्या लाकडापासून त्यांनी टेबल बाकडे बनविले आणि *ग्रीनव्हीच नेव्हल अँकँडमी* या सैनिकी शाळेत ठेवले. येथे शिक्षणास आलेल्या सैनिकांना आपण बसत असलेल्या आसनाविषयी माहिती दिली जात असते. एक विजयी भावना त्याच्या मनात जागृत होत असते. ते टेबल बाकडे या आधुनिक युगात अडगळीतील सामान न करता आजही त्या सैनिकी शाळेत आपल्या मुठभर पूर्वजांनी पराकोटीचा संघर्ष करीत पराक्रमाचा पूर्वेतिहास लिहिला आहे, याचा त्यांना सार्थ अभिमान वाटत आहे.

    आपल्या सैनिकांनी देखील असाच पराक्रम केला होता हे आपल्या भावी पिढीला प्रेरणादायक ठरावे म्हणून आपल्या समजूतदार आणि शहाणपणा अंगी मुरलेल्या लोकशाहीतील नेत्यांनी आपली चुणूक दाखवायला हवी होती. याविषयी सत्ताधीशांनी खांदेरीच्या पोटात काय काय दडलंय, याचा कधी शोध घेण्याचा प्रयत्न केला नाही. वरचेवर देशप्रेमाची गाथा सांगणारे बेंबीच्या देठापासून कोकलतील, पण भूतकाळातल्या या स्मृती खणून काढण्याचे प्रयत्न कोणी करणार नाही. आपल्याला बलवान राष्ट्र घडवायचे असेल तर सैनिकी शाळामध्ये असे विषय तरी घ्यायला काही हरकत नसावी.

    अशोक भेके

      April 20, 2017


  • श्री ललितापंचरत्न स्तोत्रम् – ५

    प्रातर्वदामि ललिते तव पुण्यनाम- कामेश्वरीति कमलेति महेश्वरीति।
    श्रीशाम्भवीति जगतां जननी परेति वाग्देवतेति वचसा त्रिपुरेश्वरीति॥५॥

    पाश्चात्य साहित्यातील एक वाक्य प्रसिद्ध आहे, नावात काय ठेवले आहे? अर्थात त्याचा संदर्भ जरी वेगळा असला तरी, नावात काय ठेवले आहे? हा प्रश्न पाश्चात्त्यांनाच पडू शकतो. भारतीय संस्कृती तर सरळ सांगते जे काय ठेवले आहे ते नावातच ठेवले आहे. नामातच ठेवले आहे.

    भगवंताचे नाम ही भक्ताची सर्वात आवडती गोष्ट. नामाच्या आधारे नामी पर्यंत पोहोचणे हे साधनेचे वर्म.

    प्रस्तुत श्लोकात पूज्यपाद आचार्यश्री आई लालितेच्या विविध नावांचा विचार प्रस्तुत करीत आहेत.

    आरंभी स्मरण, त्यानंतर वंदन आणि आता नामोच्चारण.
    बौद्धिक स्तरावर स्मरण, मानसिक स्तरावर वंदन आणि शरीराच्या मुखाने सातत्याने नामोच्चारण अशी ही रचना.

    त्यासाठी आचार्य म्हणतात,

    प्रातर्वदामि- मी सकाळी बोलतो. नाम घेतो.

    वचसा- वाणीने.

    ललिते - हे आई ललितांबे !

    तव पुण्यनाम- तुझी पुण्यदायक नावे.

    कोणकोणती आहेत ही नावे? तर

    कामेश्वरी- सकल कामनांची ईश्वरी. अर्थात भक्तांच्या सकलं कामना पूर्ण करणारी.

    कमला- कमळामध्ये निवास करणारी. कमळाप्रमाणे उर्ध्वगामी वृत्ती असणारी. ती वृत्ती प्रदान करणारी.

    महेश्वरी- महेश्वराची सहलीलाचारीनी.

    श्रीशाम्भवी- शंभू अर्थात भगवान शंकर. शम् म्हणजे कल्याण. तर भू म्हणजे निर्माण होणे. ज्यांच्या चरणाशी जगाचे कल्याण निर्माण होते ते शंभू. त्यांची चैतन्यशक्ती ती शंभूची शांभवी.

    जगतां जननी - सकल विश्वाची जननी. आदिशक्ती. मूळमाया.

    परा- परा शब्दाचा अर्थ आहे श्रेष्ठ.

    परा हा एक वाणी चा प्रकार देखील आहे. चौथ्या प्रकारच्या या वाणीत साधकाला अखंड ओंकार नाद ऐकू येतो. तो ओंकार आईचे स्वरूप आहे .

    वाग्देवता- वाणीची देवता. जगातील सर्वच पशूंना कोणत्या ना कोणत्या स्वरूपात आवाज काढता येतो. त्यांना देखील ध्वनी आहे. पण त्यांना वाणी नाही. त्यांना आपल्या मनातील सर्व भावना पाहिजे तशा बोलता येत नाही. वाणी हे माणसाचे वैभव आहे. आई ललिता त्या वाणीची देवता आहे. सोप्या शब्दात ती आपल्याला मनुष्यत्व प्रदान करणारी आहे.

    त्रिपुरेश्वरी- या आई जगदंबा ललितेची उपासना श्री त्रिपुरसुंदरी रूपात केली जाते.

    त्रिपुर शब्दाचा अर्थ स्वर्ग, मृत्यु ,पाताळ. तर देहाच्या बाबतीतला अर्थ स्थूल, सूक्ष्म आणि कारण देह. या सगळ्यांची स्वामिनी.

    सकाळी मी वाणीने तिचे भजन करतो.

    -- विद्यावाचस्पती प्रा. स्वानंद गजानन पुंड

      April 1, 2020


  • खरे सौंदर्य

    काही वर्षांपूर्वी एखाद्या व्यक्तिची निवड त्याच्या गुणांनी, संस्कारांनी केली जायची पण आज गुण असो वा नसो रूपवान असणे गरजेचे मानले जाते. बुद्धी असो व नसो धनवान हवे ही मान्यता सगळ्यांमध्ये दिसून येते. परंतु खरे सौंदर्य कोणते ? आज आपल्याला जागोजागी beauty parlour दिसून येतात. शरीराचे सौंदर्य टिकवण्यासाठी किती खटाटोप करतात पण कोणते सौंदर्य जपावे ह्याची समज नाही.

      December 20, 2021


  • बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली

    कोकणातील शेती, पशुसंवर्धन आणि मत्स्य व्यवसाय यांचा विकास करुन येथील ग्रामीण लोकांची आर्थिक उन्नती करण्यास मदत व्हावी, या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने १८ मे १९७२ रोजी दापोली येथे कोकण कृषी विद्यापीठाची स्थापना केली. त्यावेळी या विद्यापीठाकडे दापोलीचे कृषी महाविद्यालय, मुंबईचे पशुवैद्यक महाविद्यालय आणि कोकणातील १६ संशोधन केंद्रे होती.

      June 13, 2022


  • बंदची घुसमट आता पुरे !

    एकीकडे सगळं काही खुलं केल्या जात असताना, अगदी सार्वजनिक कार्यक्रमांनाही मान्यता दिली जात असताना मंदिरांची कुलपे न उघडण्यामागे कोणतं तर्कशास्त्र असेल? हे लक्षात येत नाही. देवळे उघडण्यामागे लोकांची श्रद्धा हे कारण आहेच, परंतु यामागे भक्कम असे अर्थकारण देखील आहे. देवस्थानांच्या आधारे अक्षरश: लाखो कुटुंबे जगत असतात. हा निव्वळ श्रद्धेचा विषय नसून रोजीरोटीचा सवाल आहे. हे सरकारच्या लक्षात येत नसेल का?

      September 18, 2020