वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
सध्याच्या धकाधकीच्या दैनंदिन जिवनात आज आपल्याला सर्वच स्तरावर स्पर्धांना तोंड द्यावे लागत आहे. प्रत्येक कुटुंब होरपळून निघत आहे आणि त्याचे दुषपरिणाम खूप गंभीर होताना दिसत आहेत.
June 21, 2011
श्री कौपीनेश्वर मंदिर हे एक ऐतिहासिक मंदिर आहे. हे मंदिर ठाणे शहराचे एक भूषण आहे. मासुंदा तलावाच्या पूर्वेला हे मंदिर उभे आहे. मुंबई गॅझेटिअर (ठाणे) पान क्र. ३५४ वर या मंदिराविषयी माहिती मिळते. त्यातील वर्णनाप्रमाणे हे ठाण्यातील सुप्रसिद्ध मंदिर सर्वात मोठ्या म्हणजे चौतिस एकर भूभाग व्यापणाऱ्या ठाण्यातील प्रसिद्ध मासुंदा तलावाच्या पूर्वेच्या काठी उभे होते.
July 8, 2024
वनस्पती अभ्यासकांच्या दृष्टीने वृक्षाचे वय हे अत्यंत महत्त्वाचे असते. वृक्षाचे वय हा फक्त एखाद्याच्या कुतूहलापुरता मर्यादित विषय नसून, सदर वृक्षाने वातावरणातले कोणते बदल अनुभवले आहेत, याचेही ते निदर्शक असते. वृक्षाचे वय काढण्यासाठी कोणकोणत्या पद्धती वापरल्या जातात त्याचा आढावा घेणारा, तसेच आज अस्तित्वात असलेल्या विविध प्राचीन वृक्षांची ओळख करून देणारा हा लेख…
February 20, 2024
माघ महिन्यातील श्रीगणेश जयंतीच्या दिवशी मला ‘चिमणी’ची न चुकता आठवण होतेच. कमर्शियल जाहिरातींची कामं करताना अनेक स्त्री-पुरुषांशी संपर्क आला. कामानिमित्तानं आलेला हा संपर्क, कुणाशी काही दिवसांचा तर काहींशी अनेक वर्षांसाठी असायचा.
रमेश, वेलणकरांकडे कामाला असतानाची गोष्ट आहे.
April 9, 2023
डॉ. नारळीकर १९७२ मध्ये भारतात आले आणि लगेचच त्यांचे मराठी विज्ञान परिषदेबरोबर जे गहिरे नाते जुळले ते आजपर्यंत अबाधित आहे एव्हढेच नाही तर आता चांगलेच मुरले आहे. याच ह्रद्य नात्याच्या प्रवासाचा स्मरणरंजनात्मक आढावा घेतलाय या लेखात श्री. अ. पां. देशपांडे यांनी.
November 22, 2021
साधारणतः वयाची ५० शी ओलांडली की काहिंना हळूहळू गुडघेदुखीचा त्रास सुरू होतो, त्याचे कारण शरीरातील सांध्यांमध्ये लुब्रिकंट, कॅलशियम तयार होण्याची क्रिया मंदावणे.
त्यावर हुकमी उपाय म्हणून गुडघे बदलणे (कृत्रिम गुडघे) असे डाॅक्टरांकडून सुचविले जाते.
जे लोक श्रीमंत आहेत त्यांना हा इलाज परवडतो, त्याची कारणे फक्त श्रीमंती असेही नाही, कित्येक वेळा हा खर्च विमा कंपनीकडून वसुलतात. पण सामान्यांचे, मध्यमवर्गीयांचे काय?
अनेक वेळा कुणीतरी सांगितले म्हणून हे लोक अशा महागड्या उपचारासाठी कर्ज काढून तयार होतात.
परीणाम.... अपयश!
निसर्गाची किमया अशी की त्याने प्रत्येकाला दोन गुडघे दिले ते त्याच्या आयुष्यभर पुरावे म्हणून; पण आपणच त्याची आयुष्यभर काळजी न घेतल्यामुळे ही परिस्थिती ओढवते.
बरं हे कृत्रिम गुडघे बसविल्यामुळे २-३ वर्षे बरे वाटते आणि पुन्हा हरीदासाची कथा मूळ पदावर.
यावर एक भारतीय निसर्ग उपचार पद्धती आहे. जिचा लाभ लाखो गुडघादुखीने त्रस्त व जे भलीमोठ्ठी रक्कम खरंच करू शकत नाहीत त्यांच्यासाठी.....
शहरात नाही पण खेडोपाडी न लावता कोणत्याही प्रकारचा लागवड खर्च न करता सहजपणे उगवणारी व आपणा सर्वांना परिचित असलेली बाभूळ या दुखण्यावरचा सोपा उपाय आहे.
अमेरिकेत हे झाड नाही. नाहीतर आतापर्यंत त्यांनी हर्बल नावाखाली हे औषध आपल्याला देऊन करोडो रूपयांचा चुना लावला असता.
असो, या बाभळीच्या शेंगा वाळवून त्याचे चूर्ण तयार करून रोज सकाळी एक चमचा थोड्या कोमट पाण्याबरोबर घ्या. २-३ महिन्यात गुडघेदुखी गायब. औषध जवळपास फुकट आणि लाखो रूपयांची बचत.
बाभळीच्या शेंगा शोधत बसण्यापेक्षा बाभळीचा डिंक जो खाण्याचा डिंक म्हणून विकत मिळतो. तो गाईच्या तूपात तळून गरम पाण्याबरोबर घ्यावा. किंवा लाडू करून खावेत. जोडीला खोबरेल तेल पण दोन चमचे दोन वेळा घ्यावे.
-- `आरोग्यदूत' WhatsApp ग्रुपवरुन
May 17, 2017
एखाद्याने केलेली निंदा ही ऐकणार्याने सकारात्मकतेने ऐकली तर बरे… नाहीतर एखादी व्यक्ती आधीच स्वत:च्या विचारांनी व्यापलेली असेल तर्…काही चांगले न होता त्याच्याकडुन बरेच असे वाईट घडुन जाते. म्हणुनच खरेतर ही म्हण “निंदकाचे घर नसावे शेजारी” अशी असायला हवी.
July 13, 2020
श्रावण आला की मला आमच्या लहानपणीच्या अनेक गमतीशीर आठवणी नजरसमोर येतात. त्यातीलच एक म्हणजे श्रावणी. आता तो काळ गेला. मुळात किती लोक जानवे घालतात हाच संशोधनाचा विषय. श्रावणी करणारेही कुणी आढळत नाही. आताच्या पिढीतील मुलांच्या आनंद मिळवण्याच्या विविध गोष्टी बघीतल्या तर आमचे आनंद मिळवण्याचे मार्ग किती साधे आणी सोपे होते हे पाहून आजही मन आनंदाने भरून जाते.
August 13, 2018
शंकर रामाणींच्या भाषेत “देहयात्रेत गुंतलेल्या ” आपणां सर्वांना कोरोना नावाच्या तमाने अस्तित्वाच्या तळाशी नेऊन ठेवले पण काल सरलेल्या दीपोत्सवाने सर्वदूर भान देणारे दिवे लावले आणि आपले तळ उजळून निघाले.
October 30, 2022
भारतीय कुटुंबाची अख्खी महत्ता, गुण वैशिष्ट्ये या रोजच्या डब्ब्यात ठासून भरलेले आहेत असं म्हटलं तर मुळीच वावगं वाटणार नाही !
June 10, 2017
Copyright © 2025 | Marathisrushti