वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
भूकंपासाठीची मार्गदर्शक तत्वे वेगवेगळ्या देशात वेगवेगळी उपलब्ध आहेत. ही तत्वे तयार करताना सर्वप्रथम इतिहासात झालेल्या भूकंपाचा अभ्यास केला जातो. त्यानुसार भूकंप-प्रवण क्षेत्र ठरवले जाते. कुठल्या भागात भूकंपाची किती शक्यता आहे ते ठरवले जाते, जसे कमी शक्यता, मध्यम शक्यता आणि सगळ्यात जास्त शक्यता अशी.
January 29, 2023
आपली जन्मतारीख हे एक गुढ ( कोड लँग्वेज) आहे. आपण विशिष्ट तारखेलाच का जन्म घेतला यामागे काही संकेत आहेत. ही जन्मतारीख व त्यातील महिना व वर्षाचे आकडे आपल्या आयुष्याचा प्रवास कोणत्या दिशेने होणार आहे त्याचा अंदाज देतात..
January 10, 2015
कल्याणजी आनंदजी हे निर्मात्यांचे संगीतकार होते.असे म्हणण्याचे कारण ते निर्मात्याला हवे आहे तसे देत असत.थोडक्यात ते बनिया वृत्तीचे होते.आणि स्वताला बनिया म्हणवून घेण्यात त्यांना कमीपणा वाटत नसे.
August 13, 2022
त्याकाळी व्यापारी मंडळी त्यांच्याजवळील भली मोठी रक्कम बँकेत आणून भरत. रोखपालाकडे गर्दी असेल तर नोटांची पिशवी व चलन रोखपालाकडे ठेवून जात. गर्दी ओसरली की सवडीने, रोखपाल ती पिशवी उघडे आणि रोकड मोजून घेई. समोर संबधित दुकानदार नसेच! सारी काम विश्वासावर! ही नेहमीचीच प्रथा!
April 7, 2023

October 13, 2015
सध्या सर्वत्र UPSC MPSC टॉपर्सच्या सत्कार व मनोगत व्यक्त करण्याचे पीक सर्वत्र आलेय- पुढे टीप असतेच- सेमिनारच्या दुसऱ्या तिसऱ्या दिवशी batch सुरु होणार ह्यातून काय समजायचे - टॉपर्सचे मनाला हळुवार भिडतील असे अत्र तत्र सर्वत्र पोस्टिंग्स करायचे- बौद्धिक मते मांडायची आणि व्हा व्हा मिळवून स्वतःची पाठ थोपटून घ्याची- मुलेही मिळतात म्हणा- दुनिया बनती है बनानेवाला चाहिये- और ये तो मुंबई है- आजकाल पूना मे भी येही फॅड है!
क्लास लावताना जरा ह्या गोष्टी विचारच:
१) result सांगा- किती विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलं-त्यातील कितींनी मुख्य परीक्षा दिली-त्यापैकी किती उत्तीर्ण झाले?
२) फॅकल्टी सांगा- परीक्षा पास होऊन शिकवणारे आहे कि परीक्षा पास होत नाही म्हणून लेकचर मधून आर्थिक घडी शिवणारेच आहेत- हेही काही वाईट नसतात -अनेकदा उत्तमच असतात-पण नेहमी नाही-ते तपासाच
३) UPSC असेल तर वरील मुद्दा अजून महत्वाचा-कारण मग Academicans म्हणजे विषय तज्ज्ञ आणि स्पर्धक असे दोन फळीतील फॅकल्टी लागतात- एका विषयाला किमान दोन!
४) पुण्यात,ठाण्यात,गोरेगावात म्हणे UPSC १६००० मध्ये शिकवतात- MPSC अजून १२००० मध्ये- हा निव्वळ फसवेपणा असावा किंवा मोठे औदार्य दाखवणारे फॅकल्टी असावे- आपण हे विचारा कि टोटल कोर्स किती तासांचा- UPSC सामान्य अध्ययन किमान ४०० तासांचा, वैकल्पिक विषय किमान १३० तासांचा, आणि MPSC राज्यसेवा किमान ४०० तासांचा अभ्यासक्रम आहे- तासाला उत्तम फॅकल्टी किमान ७००/- घेतात हे लक्षात ठेवून गणित मांडा- ह्यात प्रशाकीय खर्च-नफा हे वगळले आहे- तरी फीस बाबतीत एक अंदाज येईल. कमी फीस म्हणजे सर्व वाईटच असे नाही, पण मोफत शिकवणारे- ज्ञानदान देणारे सोडून बाकीचे मग स्पर्धेत टिकायचे म्हणून कमी तासात ,किंवा हलके फॅकल्टी वापरून हे गणित जुळवता- आपण डोळस पणे हे तपासले पाहिजे- MPSC राज्यसेवा शुल्क साधारणपणे ३२-३५००० असते व UPSC चे ८५००० च्या आसपास असावे.
५) पण वरील गणितात वर्गात किती विद्यार्थी आहे हे मांडलेच नाही- आपण सांगा किती असावे- एक शिक्षक किती विद्यार्थ्यांकडे लक्ष देऊ शकतो-१-२-३-४.... किती-हा अंदाज बांधा आणि विचार-BATCH साइझ.
६) टेस्ट सिरीज तर असावीच- सराव परीक्षा हवेच- त्याचे वेळापत्रक मागा -शक्य असल्यास मागच्या वर्षीच्या टेस्ट पहा-
७) अभ्यासिका-लायब्ररी हवीच- एक वेळ AC क्लासरूम नसेल तरी चालेल-पण समृद्ध लायब्ररी हवीच
८) मेंटॉर हवेच-जसे पी व्ही सिंधू ला गोपीचंद आहे, सचिन ला रमाकांत आचरेकर आहेत, तसे स्पर्धकाला देखील हवेच.
९) आजकाल सोशल मीडियावर मोफत नोट्स,दरोजचे बातम्या पसरवीत काही मुले नियमितपणे क्लासची जाहिरात करतात-पैसे ठेवून होत असलेली ह्या मार्केटिंगला तर मुळीच भुलू नका- ह्या मार्केटिंग तज्ज्ञांचे स्वतः कोणतीही परीक्षा पास न होण्यामागचे कारण हेच असावे कि चालू घडामोडी म्हणजे आज कि ताजा खबर नसते हे ह्यांना कळलेच नाही!
१०) ह्याव्यतिरिक्त आपण सुज्ञपणे तपासा- भेटा-वारंवार भेटा-डेमो लेक्चर हा प्रकारच फसवा असतो- का ते समजून घ्या -
भुलू नका- भान ठेवा- क्लास का लावताय तो उद्देश काय आहे आणि त्या उद्देशाला अनुसरून क्लास काय देतेय ह्याचा तपास करा मग क्लास प्रवेश निश्चित करा
-- प्रा. हितेशकुमार एस. पटले
May 16, 2017
केवढं मोठं ज्ञान तो साधा टॅक्सीवाला मला देऊन गेला होता. हॉर्न माणसांसाठी नसून जनावरांसाठी असतो, हे हॉर्नच गाडीला असण्यामागचं कारण असेल याचा विचारच मी कधी केला नव्हता.
December 3, 2016
१९०५ मध्ये दसऱ्याच्या दिवशी, स्वदेशीच्या पुरस्कारार्थ झालेल्या विदेशी कपड्यांच्या होळीचे जनक ठरले स्वातंत्र्यवीर सावरकर. राजकारणासाठी शिक्षण संस्थेच्या वसती गृहातून हकालपट्टी झालेले सावरकर हे ‘पहिले’ विद्यार्थी ठरले.
October 7, 2021
आफ्रिकेच्या व्हिक्टोरिया सरोवरात सोडलेल्या ‘नाईल पर्च’ माशाने लहान ‘सिचलीड’ मासोळी खाण्याचा सपाटा लावला व मासोळी निर्वंश होण्याची वेळ आली.
January 21, 2025
माझा जन्म नागपूर मधील १९४२ च्या प्रचंड उन्हाळयातला. मी बहुदा पाणी पाणी म्हणून पहिले रडणे सुरू केले असावे. जन्मत: दुधापेक्षा मला पाणी जास्त प्रिय आणि यामुळेच पाण्याने सतत माझा पिच्छा पुरवला आहे.
माझे बालपण चाळीतून चालू झाले, घरात दोन नळ होते पण त्यातून पाणी आल्याचे मी कधी पाहिले नव्हते. पुस्तकातल्या चित्रात केवढा पाण्याचा झोत दाखवीत. सार्वजनिक मोरीतील नळाला रात्री २ तास करंगळीच्या धारे इतके पाणी येत असे. तेथील झुंबड व बाचाबाची नित्याची होती. पाणी भरणे व ते विविध भांडयात साठविणे हा आमच्या प्रत्येकाच्या जीवनाचा महत्वाचा घटक म्हणजे बालपणापासून हेच पहिले संस्कार होते.
November 12, 2018
Copyright © 2025 | Marathisrushti