(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • ऑक्टोबर २७ – ‘गुणी’ टेलर आणि मुरलीचा दणका

    १९६४ : कसोटी सामन्यांना प्रेक्षणीय, लोकप्रिय आणि निकाली बनविण्यात मोलाचा हातभार लावणार्‍या एका धुरंधर कर्णधाराचा जन्म.

      October 29, 2010


  • पासपोर्ट का आणि कशासाठी?

    आपला देशातून जगातील इतर कोणत्याही देशांत जाण्यासाठी पासपोर्ट अनिवार्य आहे. पासपोर्ट म्हणजे आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी सरकार कडून नागरिकाला प्रदान केले गेलेले अधिकृत प्रमाणपत्र. नागरिकत्वाचा हा एक सबळ पुरावा असतो. त्यामुळे परदेशात जाताना पासपोर्ट व त्या देशाचा व्हिसा अत्यावश्यएक असतो. अमेरिका आणि युरोपमधील देशांचे व्हिसा मिळविण्याची प्रक्रिया प्रत्यक्ष जाण्याच्या दिवसांपूर्वी काही महिने आधी सुरू करावी लागते. पासपोर्टमध्ये तुमच्या विषयी सर्व माहिती नोंदवलेली असते आणि ती हे दर्शवते की तुम्ही भारताचे नागरिक आहात. भारतात तीन प्रकारचे पासपोर्ट आहेत. पर्सनल पासपोर्ट, डिप्लोमॅटिक पासपोर्ट आणि ऑफिशियल पासपोर्ट. पासपोर्ट जारी केल्यापासून १० वर्षे रेग्युलर पासपोर्ट वैध असतो. पासपोर्ट कायदा १९६७ नुसार पासपोर्टसाठी अर्ज करताना खोटी माहिती दिल्यास शिक्षा होऊ शकते. पासपोर्ट हा एक महत्त्वाचा शासकीय दस्तावेज म्हणून सुद्धा उपयोगी पडतो. भारतीय पासपोर्टचा (Passport) हा जगभरातील सर्वात प्रभावशाली पासपोर्टच्या यादीत समावेश करण्यात आला आहे. भारतीय नागरिक आता विना व्हिसा जगातील ५९ देशामध्ये प्रवास करू शकतात. इंडियन पासपोर्टवर काही देशांमध्ये 'व्हिसा ऑन अराइवल' सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

    भारतात तीन प्रकारचे पासपोर्ट आहेत. विशेष म्हणजे या तिन्ही रंगांचे वैशिष्ट्य वेगवेगळे आहे.
    निळा (सामान्य व तत्काळ) सामान्य व्यक्तिसाठी.

    देशातील सामान्य व्यक्तिसाठी निळ्या रंगात पासपोर्ट बनवला जातो. ‍निळा रंग भारतीय नागरिकाला रिप्रझेंट करत असतो. त्यात ऑफिशियल व डिप्लोमॅट्सपासून वेगळे ठेवत असतो. सरकारनेच हे अंतर निर्माण केले आहे. कस्टम अधिकारी तसेच विदेशात पासपोर्ट तपासणी करतांना अडचणी येत नाहीत.

    पासपोर्टधारकाचे नाव असते. जन्म तारीख, जन्म स्थळाचा उल्लेख असतो. सोबत‍ छायाचित्र व स्वाक्षरी असते. व्यक्तीची ओळख दर्शवण्यासाठी पासपोर्टकडे महत्त्वपूर्ण दस्तावेज म्हणून पाहिले जाते.
    पांढरा (ऑफिशियल, सरकारी कामासाठी.)

    गव्हर्नमेंट ऑफिशियल तसेच सरकारी कामासाठी पांढर्याप रंगाचा पासपोर्ट दिला जातो. सरकारी कामासाठी विदेशात जाणार्यास व्यक्तीला पांढरा पासपोर्ट दिला जातो. ऑफिशियल आयडेंटिटीसाठी हा पासपोर्ट पाहिला जातो. कस्टम चेकिंग करताना याच पद्धतीने डील केले जाते.
    पांढर्या पासपोर्टसाठी अर्जदाराला स्वतंत्र अर्ज करावा लागतो. पांढर्यां पासपोर्ट मिळवण्यासाठी अर्जात ठोस कारण द्यावे लागते. पांढरा पासपोर्टधारकाला विविध सुविधा मिळत असतात.

    मरून (डिप्लोमॅटिक, भारतीय डिप्लोमॅट्स व वरिष्ठ सरकारी अधिकारी.)
    भारतीय राजनयिक (डिप्लोमॅट्स) व सरकारी वरिष्ठि अधिकार्यां ना (आयपीएस, आयएएस दर्जाचे अधिकारी) मरून रंगाचा पासपोर्ट दिला जातो. हाय क्वॉलिटी पासपोर्टसाठी स्वतंत्र अर्ज दिला जातो.

    एका आठवड्याच्या आत तत्काळ पासपोर्ट बनून मिळतो. सामान्य पासपोर्टप्रमाणेच ऑनलाइन अर्ज करता येतो. यासाठी अर्जदाराला एनेग्झर-आय भरावे लागते. यात अर्जदाराला आपली सविस्तर माहिती भरावी लागते. सर्व दस्ताऐवज एका फर्स्ट क्लास गझेटेड ऑफिसर द्वारा व्हेरिफाय करावे लागतात.
    सामान्य पासपोर्ट बनवण्यासाठी १० ते १३ दिवसांचा कालावधी लागतो. रजिस्टर्ड पोस्टने पासपोर्ट अर्जदाराच्या घरी पाठवला जातो. सामान्य व्यक्तिला १० वर्षांच्या मुदतीत पासपोर्ट दिला जातो.

    पासपोर्टचा इतिहास
    पासपोर्ट (पारपत्र) या संकल्पनेची अंमलबजावणी भारतात सर्वप्रथम पहिल्या महायुद्धाच्या वेळी करण्यात आली. त्यापूर्वी भारतात येताना आणि बाहेर जाताना कोणत्याही परवान्याची गरज भासत नव्हती. भारताच्या संरक्षणासाठी १९१४ मध्ये तत्कालीन प्रशासनाने पासपोर्ट बंधनकारक केला. त्यासाठी स्वतंत्र कायदा तयार करण्यात आला; पण, हा कायदा अल्पायुषी ठरला. पहिले महायुद्ध संपल्यानंतर हा कायदा रद्द करण्यात आला. अवघे सहा महिने या कायद्याची अंमलबजावणी करण्यात आली; पण, तत्कालीन प्रशासनाला हा कायदा पुढे सुरू ठेवण्याचे अधिकारी देण्यात आले. या कायद्याच्या निमित्ताने तत्कालीन इंग्रजी राजवटीने आपल्या साम्राज्याच्या सीमा अधिक बळकट केल्या. अखेर, "पासपोर्ट' ही संकल्पना सुरू ठेवण्याचा निर्णय घेऊन, १९२० मध्ये नवीन "भारतीय पासपोर्ट कायदा' तयार करण्यात आला. कालांतराने "द पासपोर्ट (एंट्री इन टू इंडिया) ऍक्ट" १९२०' असे त्याचे नामकरण करण्यात आले. पासपोर्ट हा केंद्र सूचीतील विषय असला तरीही १९३५ मध्ये यात बदल करून देशातील काही राज्यांना हा अधिकार देण्यात आला. त्यात मुंबई, दिल्ली अशा राज्यांचा समावेश होता. त्यामुळे या राज्यांमध्ये पासपोर्ट कार्यालये सुरू करण्यात आली. अर्थात त्या राज्याच्या गृहखात्याच्या नियंत्रणात पासपोर्ट अधिकारी कार्य करीत असे. भारत स्वतंत्र झाल्यावर पासपोर्ट हा विषय परत केंद्रसूचीमध्ये समाविष्ट करण्यात आला. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे त्यावर नियंत्रण ठेवण्यात आले आहे. १९५४ पर्यंत संबंधित राज्य सरकारतर्फे पासपोर्ट देण्यात येत होते. केंद्र सरकारतर्फे १९५४ मध्ये पहिली पाच प्रादेशिक पासपोर्ट कार्यालये देशात सुरू करण्यात आली. त्यात मुंबई, दिल्ली, मद्रास (चेन्नई), कलकत्ता (कोलकता) आणि नागपूर या शहरांचा समावेश होता. पासपोर्ट काढणे सुलभ करण्यासाठी पासपोर्ट सेवा केंद्र (पीएसके) सुरू करण्यात आली आहेत. सध्या भारतात ८१ पासपोर्ट सेवा केंद्र आहेत.

    "पीएसके'मुळे या पासपोर्ट कार्यालयावरील ताण कमी झाला आहे. पासपोर्टसाठी 18002581800 या कॉल सेंटरवर दूरध्वनी करून तसेच, www.passportindia.gov.in या संकेतस्थळाला भेट देऊन अर्जाच्या स्थितीची अद्ययावत माहिती घेण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.
    पोलिस पडताळणीची प्रक्रिया "ऑनलाइन' करण्यासाठी पासपोर्ट आणि पोलिस या विभागातर्फे पहिले पाऊल उचलण्यात आले आहे.

    पासपोर्टची वाढती मागणी
    स्वातंत्र्यानंतर सुरवातीच्या काही वर्षांमध्ये परदेशात जाणारे मूठभर नागरिकच पासपोर्टसाठी अर्ज करीत होते. त्यामुळे या खात्यावरील ताण मर्यादित होता; पण, आता जागतिकीकरणामुळे जग हे "ग्लोबल व्हिलेज' होत असताना पासपोर्टची मागणी करणाऱ्या नागरिकांची संख्या झपाट्याने वाढली आहे. १९५८ मध्ये देशातील फक्त ३३ हजार २१६ नागरिकांना पासपोर्ट देण्यात आला होता. त्यापुढील 48 वर्षांमध्ये म्हणजे २००६ पर्यंत ही संख्या ४४ लाख ४१ हजार ७६८ पर्यंत वाढली. २०१० मध्ये परराष्ट्र मंत्रालयाने तब्बल ८४ लाख ३९ हजार ५८४ पासपोर्ट वितरित केले आहेत.
    पासपोर्ट काढण्यासाठी पासपोर्ट सुविधा केंद्रात प्रत्यक्ष जाऊन किंवा ऑनलाइन अर्ज भरता येतो. त्यासाठी www.passportindia.gov.in या संकेतस्थळावर जाऊन आपण अर्ज "डाऊनलोड' करू शकतो, तसेच "ऑनलाइन' भरू शकतो.
    पासपोर्ट सर्वसाधारण, की तत्काळ काढायचा आहे; त्यानुसार त्याचे शुल्क निश्चिपत करण्यात आले आहे. तसेच, लहान मुले, प्रौढ आणि ज्येष्ठ नागरिक या वर्गवारीत पासपोर्ट मिळतो. भरलेल्या अर्जाची पासपोर्ट सेवा सुविधा केंद्रातील अधिकाऱ्यांकडून छाननी होते. पोलिस पडताळणीचा अहवाल आल्यानंतर प्रत्यक्ष पासपोर्ट छापला जातो.

    पासपोर्टसाठी आवश्यसक कागदपत्रे
    - रहिवासाचा पुरावा
    पाणी बिल, फोन बिल, लाइट बिल, चालू खात्याचे बॅंक पासबुक, निवडणूक ओळखपत्र, गॅस कनेक्शान, रेशनकार्ड, आधार कार्ड.
    - वयाचा दाखला
    २६ जानेवारी १९८९ नंतर जन्म झालेल्यांना जन्माचे प्रमाणपत्र बंधनकारक आहे. त्यापूर्वीचा जन्म असल्यास जन्माचे प्रमाणपत्र, शाळेचा दाखला.
    - शैक्षणिक पात्रतेचे प्रमाणपत्र.
    - महिलांसाठी विवाह नोंदणी प्रमाणपत्र.
    - प्लेन बॅंकग्राउंडवर तीन पासपोर्ट साईझ फोटो (3.5 बाय 3.5 सेंटीमीटर).
    केंद्र सरकारने पासपोर्ट मिळण्याची प्रक्रिया अत्यंत सोपी आणि सुलभ केली आहे. सामान्य माणसालाही पासपोर्ट काढता येईल इतकी सहज-साधी प्रक्रिया करण्यावर भर दिला आहे. कागदपत्रांची पूर्तता आणि खरी माहिती अर्जात नमूद केलेली असल्यास 80 टक्के पासपोर्ट वेळेत मिळतात. केंद्र सरकारने पासपोर्टची प्रक्रिया सोपी केल्यावर आता बायोमॅट्रीक डिटेल्स असलेला ई-पासपोर्ट लॉंच करणार आहे. चीप असलेले हे ई-पासपोर्ट परराष्ट्र मंत्रालय लवकरच देणार आहे. याद्वारे पासपोर्ट संबंधी सर्व माहिती इलेक्ट्रॉनिक माध्यमातून तपासता येईल. ई-पासपोर्ट संबंधीताची माहिती सुरक्षित ठेवेल आणि बनावट पासपोर्ट बनवणाऱ्यांना चाप बसेल. ई-पासपोर्टमध्ये एक इलेक्ट्रॉनिक चीप असते. चीपमध्ये त्याच सूचना असतात ज्या पासपोर्टच्या डाटा पेजवर छापलेल्या असतात. या चीपद्वारे इमिग्रेशन अधिकाऱ्यांना कुठल्याही घोळाचा छडा लावता येईल आणि पासपोर्टचा दुरुपयोग रोखण्यात मदत होईल. ई-पासपोर्टनंतर परराष्ट्र मंत्रालय पूर्णपणे डिजिटल पासपोर्ट लॉंच करणार आहे. हा असा पासपोर्ट असेल जो मोबाइल मध्येही ठेवता येऊ शकेल. या अत्याधुनिक तंत्रामुळे कुठल्याही ठिकाणाहून आपल्याला लवकरात लवकर पासपोर्ट मिळवता येईल. तसंच कोणी एकाच वेळी दोन ठिकाणाहून पासपोर्टसाठी अर्ज केल्यास संबंधित यंत्रणेतून मंत्रालयाला त्या ठिकाणचा ऍलर्ट जाईल. यामुळे दोन ठिकाणाहून पासपोर्ट मिळवण्याच्या प्रकाराला आळा बसेल.

    जगभरातील पासपोर्टची क्रमवारी करणाऱ्या आर्टन कॅपिटलच्या ‘पासपोर्ट निर्देशांका’च्या नव्या आवृत्तीत जर्मन पासपोर्टने पहिले स्थान पटकावले आहे. भारतीय पासपोर्ट ७८ व्या क्रमांकावर आहे. वाढीच्या दृष्टीने सर्वांत आघाडीवर अमेरिका आहे, तर त्यानंतर चीन, जर्मनी, ग्रेट ब्रिटन, जपान व भारत यांचा क्रमांक लागतो. गेल्या वर्षी भारताला पहिल्या पाचांमध्ये स्थान मिळाले होते. या पद्धतीमध्ये जगभरातील पासपोर्टची माहिती संकलित केली जाते, ती दर्शवली जाते आणि पासपोर्टच्या प्रभावीपणानुसार त्यास क्रमवारी दिली जाते; तसेच पासपोर्टधारकाला किती देशांमध्ये व्हिसामुक्त प्रवेश करता येऊ शकतो किंवा देशात प्रवेश केल्यावर व्हिसा घेता येतो (व्हिसा ऑन अरायव्हल) त्यानुसार संबंधित पासपोर्टला ‘व्हिसा-फ्री स्कोअर’ दिला जातो. जर्मनीचा व्हिसा स्कोअर सर्वाधिक १५७ आहे, तर १५६ स्कोअर नोंदवून सिंगापूर दुसऱ्या क्रमांकावर आहे. भारताचा स्कोअर ४६ असून, चीन व पाकिस्तान अनुक्रमे ५८ व ९४व्या स्थानावर आहेत. केवळ २३ स्कोअर मिळालेला अफगाणिस्तानचा पासपोर्ट सर्वांत कमी प्रभावी आहे.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ :- इंटरनेट

      February 3, 2017


  • श्रीगणेश चतुर्थी

    भाद्रपद शुद्ध चतुर्थी रोजी गणेश चतुर्थी व्रत केले जाते. हे व्रत, उत्सव जवळपास संपूर्ण भारतात करतात. याला वरद चतुर्थी असेही नांव आहे.

      September 19, 2023


  • अमेरिकेतील छोटी गावे – भाग ७

    अगदी छोट्या (चार-पाचशे वस्तीच्या) गावांमधे तर सगळेजण एकमेकांना ओळखतात. थोड्या मोठ्या (दोन-चार हजार वस्तीच्या) गावांमधे सगळ्यांच्या ओळखी नसल्या तरी ओळखीचं हास्य तरी असतं. गाडीतून, पिक-अप ट्रकमधून जाता येताना एकमेकांना हात वर करून ओळख दाखवणं, हा सर्वसाधारणपणे शिरस्ता असतो. नवीन लोकांना देखील गाडीतून जाताना ओळखीचं हास्य किंवा हात वर करून दाखवणार. गावातल्या छोट्याश्या पोलीस ठाण्यामधे मोजून असणार दोन किंवा तीन पोलीस. त्यामुळे प्रत्येक पोलिसाला गाववाले ओळखतात. मग अगदी कोणत्या वीकएंडला कोणत्या पोलिसाची ड्युटी आहे, तो नवशिक्या आहे की तीस वर्षे खात्यात काढून मुरलेला आणि आजोबांसारखा प्रेमळ आहे, हे देखील सगळ्यांना ठाऊक. प्रत्येक पोलीस कुठे रहातो हे देखील सार्‍या गावाला माहीत. त्यामुळे शक्यतो त्याच्या घराच्या आसपासच्या रस्त्यावर आरडा ओरडा किंवा धिंगाणा न घालण्या एवढी पोराटोरांना देखील अक्कल आलेली असते. अगदी छोट्या गावांमधे तर सारा गावच जणू पोलीसाचे काम करत असतो. गावातल्या उंडारणार्‍या पोरांवर सगळ्या गावाचं लक्ष असतं. त्यामुळे वाह्यात पोरांच्या उनाडक्या आई बापांच्या कानावर जायला वेळ लागत नाही आणि त्यात काही गैर आहे असं आई बापांनाही वाटत नाही.

    छोट्या गावांमधले रस्ते देखील छोटे आणि रहदारी देखील तुरळकच. अशा गावांमधे ट्रॅफिक लाईट्स देखील जेमतेम एक दोनच असतात. काही ठिकाणी उघडझाप करणारे (blinking) लाईट्स असतात. त्याच्या अनुसार तिथे आलं की गाड्या हळू करायच्या, आजूबाजूचा अंदाज घ्यायचा आणि मग पुढे जायचं. बहुतेक ठिकाणी stop signs असतात. त्याच्या अनुरोखाने गाड्या बरोबर थांबून मगच पुढे जातात. गाववाल्यांची पत्ते सांगायची पद्धत देखील विशिष्ट असते. सगळा उल्लेख, डांबरी रस्ता (black top) किंवा कच्चा रस्ता (gravel or dirt road) या संदर्भात होणार. दिशांचा अदमास तर यांच्या अंगी अगदी लहानपणापासूनच मुरलेला असतो. Go two blocks east on black top, then go two and half blocks on the dirt road अशा सूचना सर्रास ऐकायला मिळतात. अशा प्रकारे सूचना देऊन कोणी पत्ता सांगायला लागलं की सुरवातीला आम्ही अजागळासारखे बघत रहायचो, मग समजल्यासारखं दाखवून मुंडी हलवायची आणि हळूच उघड्यावर येऊन आकाशात सूर्य कुठे दिसतोय ते बघायचं आणि त्यावरून आडाखे बांधून दिशेचा अंदाज घ्यायचा. पुढे पुढे मग आपल्या परिसराचा अंदाज आला की त्यांच्या दिशादर्शक सूचना आपल्या संदर्भात बसवायच्या. म्हणजे मुख्य रस्त्यावरून चर्चच्या दिशेला वळलं की आली ईस्ट किंवा गॅस स्टेशनवरून उजवीकडे वळले की झाली साउथ वगैरे. तरी देखील गोंधळल्यासारखं व्हायचं ते होतंच. (आपल्या सारखं “गांधी रोड वरून वंदना टॉकीजच्या बाजूच्या गल्लीत वळायचं किंवा मारुतीच्या देवळावरून खाली आलं की कट्ट्यावर बसलेल्या कुणालाही विचारा – कुलकर्णी कुठे रहातात ते”. असा प्रकार नाही). Enter from the east or west entrance at the south end of the building, असल्या सूचनादर्शक पाट्या पाहून लिहिणार्‍याला गदगदून हलवून सांगावसं वाटतं “अरे बाबा, असं कोडं सांगितल्यासारखं का सांगतोस ? सरळ सांग ना की गॅस स्टेशनच्या बाजूला जे दार आहे तिकडून आत शिरा किंवा पोस्ट ऑफिसच्या जवळच्या दरवाजाचा वापर करा” म्हणून.

    छोट्या गावांमधे downtown म्हणजे मोठा मजेशीर प्रकार असतो. एका रस्त्याच्या दोन बाजूंस असलेली काही दुकानं म्हणजे downtown. त्यात एक दोन बॅंका, दोन चार रेस्टॉरंट्स, गॅस स्टेशन्स, काही अ‍ॅंटीक शॉप्स, एखादं दुसरं ग्रोसरी स्टोअर, बार्बर शॉप, छोटसं पोस्ट ऑफिस, dairy queen सारखं एखाद आईस्क्रीम शॉप, अशी सारी दाटीवाटीने बसलेली. या दुकानांना पार्कींग लॉट नसतो. त्यांच्या समोर रस्त्यावरच गाड्या लावायच्या आणि उतरून दुकानात जाऊन कामं उरकायची. एक काळ होता जेंव्हा छोट्या गावांमधे घरगुती स्वरूपाची दुकानं म्हणजे जीवनाचा एक अविभाज्य भाग होता. त्यात किराणा मालापासून घरगुती वापरायच्या वस्तूंपर्यंत बरंच काही मिळायचं. गावातली पोरं उन्हाळ्यात आईस्क्रीम खायला किंवा गोळ्या चॉकलेट खायला तिकडे यायची. घरात कधी गरज लागलीच तर विजेचे दिवे, खिळे, शाळेच्या वह्या वगैरे लहान सहान गोष्टींसाठी लोक तिकडे धाव घ्यायचे. चकाट्या पिटण्यासाठी, घडीभर टेकण्यासाठी, पंचक्रोशीतल्या भानगडी ऐकण्यासाठी, स्थानिक राजकारणावर गरमा गरम चर्चा करण्यासाठी, ते एक हक्काचं ठिकाण असायचं. मुलांना उधारीवर खाऊ देतांना कुणी त्यांच्याकडे ओळखपत्र मागायचं नाही आणि दुकानदाराच्या उधारवहीत नुसतं नाव लिहून त्याच्यापुढे पैसे लिहून ठेवले तर चालायचं. एखाद्या न्हाव्याच्या दुकानात, दर्शनी काचेमधे “आज संध्याकाळी आपल्या शाळेची टीम जिंकली तर उद्या जे कोणी येतील त्यांचा हेअर कट फुकट” असा आपुलकीचा आणि गावातल्या शाळेबद्दलचा जिव्हाळा दाखवणारा बोर्ड दिसायचा.

    पण हळू हळू हे चित्र बदलत आहे. वॉलमार्टने अमेरिकेच्या आतल्या भागांमधे देखील आपले हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. त्यांच्या प्रचंड स्टोअर्समधून सारं काही उपलब्ध असतं. भाजीपाला, इतर खाद्यपदार्थ, कपडे, औषधं, इलेक्ट्रॉनिक वस्तू, फर्निचर, घरातल्या वापरातल्या सार्‍या वस्तू, जे म्हणावं ते. त्यांच्या प्रचंड मोठ्या प्रमाणावर चाललेल्या उद्योगामुळे वॉलमार्ट जितक्या स्वस्त दरात वस्तू विकू शकते, तितक्या स्वस्त दरात ही जुनी दुकानं विकू शकत नाहीत. वॉलमार्टच्या जगडव्याळ पसार्‍याला टक्कर देऊन टिकून रहाणं या छोट्या दुकानांना शक्यच नसतं. त्यामुळे ही छोटी दुकानं धडाधड बंद होऊ लागतात. उदाहरणार्थ नुसत्या आयोवा राज्यामधेच १९८३ ते १९९३ च्या दशकामधे वॉलमार्टच्या आक्रमणामुळे ७३०० छोटी दुकानं बंद झाली. एकंदर पाहणीवरून असा निष्कर्ष निघतो की वॉलमार्ट किंवा तत्सम एखादं मोठं दुकान एखाद्या आतल्या भागात सुरू झालं की पुढच्या ४-५ वर्षांत आसपासच्या २० मैल अंतरापर्यंतच्या छोट्या गावांत साधारण २०% धंदा कमी होतो. वॉलमार्ट भले नवीन रोजगार निर्माण करण्याच्या वल्गना करत असेल पण आजवरचा अनुभव असं सांगतो की वॉलमार्टने निर्माण केलेल्या दर १०० रोजगारांमागे, आजूबाजूच्या छोट्या दुकानांतील १५० लोकांच्या रोजगारीवर गदा आलेली असते.

    लोक देखील एकदा वॉलमार्ट संस्कृतीची चटक लागली की आपल्या छोट्या गावातल्या छोट्या दुकानांमधे जाणं टाळायला लागतात. हे सारं अपरिहार्यच आहे. या मोठमोठ्या super market chains जसजशा आपले पाश अमेरिकेच्या अंतर्भागातल्या छोट्या आणि मध्यम गावांभोवती आवळायला लागल्या आहेत आणि जागतिकीकरण हे जसजसं दिवसेंदिवस प्रखर सत्य होत चाललं आहे, तसतसं ग्रामीण अमेरिकेच्या ह्या जुन्या जीवनातल्या एका पर्वाचा अंत जवळ येत चालला आहे.

    -- डॉ. संजीव चौबळ

      February 17, 2016


  • आपले शरीर व बांधा

    मूल जन्माला येते, ते नैसर्गिकरित्या सुडौल व बांधेसूदच असते. त्यानंतर वाढीच्या वयात आहार व व्यायाम जसा असेल त्याप्रमाणे शरीराचे आकारमान, वजन बदलत जाते. नैसर्गिकरित्या असलेला बांधा/चण मात्र तसाच राहतो. उदाहरणार्थ, व्यक्ती बारीक, मध्यम किंवा रुंद चणीच्या असू शकतात.

    ज्या व्यक्ती मुळातच बारीक चणीच्या आहेत, त्यांनी कितीही आहार व व्यायाम केला तरी मूळची चण बदलत नाही. त्यावर चरबीची किंवा स्नायूंची वाढ होऊन वजन वाढेलही, पण एकदा आहार व व्यायाम थांबला की काही काळातच शरीर पुन्हा नैसर्गिक चण धारण करेल.

    याच प्रकारे मध्यम व रुंद बांध्याचेही होते. म्हणूनच शरीर सुडौल, बांधेसूद करायची सुरुवात करण्याआधी आपला मूळचा बांधा कसा आहे हे माहीत असणे अत्यंत गरजेचे असते.
    एकदा आपला बांधा कळला की मग आपले वजन किती असावे हे ठरवता येते. बारीक चणीच्या व्यक्तीचे वजन मध्यम चणीच्या व्यक्तीत योग्य वजनापेक्षा 2-3 किलो किलो जास्त असू शकते.

    उदाहरणार्थ - 5 फूट 2 इंच उंचीच्या तीन व्यक्ती आहेत. एक बारीक चणीची, एक मध्यम व तिसरी रुंद चणीची.
    या उंचीसाठी मध्यम चणीच्या व्यक्तीचे योग्य वजन 50 ते 55 किलोदरम्यान असते, तर बारीक चणीच्या व्यक्तीचे योग्य वजन 47 ते 52 किलो व रुंद चणीच्या व्यक्तीचे 52 ते 57 किलो असू शकते. त्यामुळे आपली उंची व बांधा यावर आपले योग्य वजन अवलंबून असते, हे प्रथमत: लक्षात घ्यायला हवे.

    तुमचे वजन व उंची प्रमाणात आहे किंवा नाही हे मोजायचे एक प्रमाण असते. त्याला Body Mass Index असेही म्हणतात. जर हा Index 18 ते 25च्या मध्ये असेल, तर तुमचे वजन उंचीच्या प्रमाणात आहे, असे म्हणता येते.

    मात्र या वजनाच्या खेळात एक मेख मात्र आहे! आपल्या शरीराचा डौलदारपणा, सुबकपणा व आरोग्य यावर अवलंबून असते.

    आपल्या एकूण वजनाच्या किती टक्के भाग स्नायूंनी व किती टक्के भाग चरबीने बनलेला आहे, याचे प्रमाण हीच ती मेख! वजन जरी उंचीप्रमाणे योग्य असेल, पण जर त्यात चरबीचे प्रमाण जास्त असेल, तर शरीर बेढब व स्थूल दिसते. पण जर स्नायूंचे प्रमाण जास्त असेल, तर मात्र शरीर सुबक, पिळदार व कसलेले दिसते. म्हणूनच वजन कमी करण्यापेक्षा शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करणे हे सुडौल बांधा मिळवण्यासाठी नितांत आवश्यक आहे. स्त्रियांमध्ये ही चरबी मुख्यत्वे कमरेच्या आजूबाजूस साचते, तर पुरुषांमध्ये पोटावर. त्यामुळेच स्त्रियांमधील स्थूलता ही पेअरच्या आकाराची व पुरुषांमधील सफरचंदाच्या आकारासारखी दिसते. मासिक पाळी संपल्यावर मात्र स्त्रियांमध्येही पुरुषांप्रमाणे पोटावरही चरबी साठू शकते. म्हणूनच या वयानंतर स्त्रियांच्या पोटाचा घेरही वाढलेला दिसतो. स्नायू व चरबी यांचे प्रमाण स्त्री-पुरुषांमध्ये वेगवेगळे असते.

    पुरुषांमध्ये चरबीचे प्रमाण वजनाच्या कमीत कमी 12-15% असणे व स्त्रियांमध्ये 25-28% असणे हे आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक असते. त्यामुळे सुडौल बनवण्याच्या नादात चरबीचे प्रमाण यापेक्षा कमी करण्याचा प्रयत्न केला, तर हानिकारक ठरू शकते. स्थूलपणाचे दुष्परिणामही बरेच आहेत. गुडघेदुखी, कंबरदुखी, थकवा, जडत्व, Varicose Veins, सायटिका, उच्च रक्तदाब, मधुमेह, हृदयरोग इ.इ. त्यामुळे शरीर सुडौल दिसण्याबरोबरच ते निरोगी ठेवण्यासाठी वजन त्यामुळे आटोक्यात असणे गरजेचे असते.

    आजकाल ठिकठिकाणी Gyms, Yoga Centres यांचे पेव फुटलेले दिसते. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे सल्ले मिळतात. त्यामुळे नक्की कसे व किती वजन कमी करावे याबाबत गोंधळ असतो. सुडौल बांध्यासाठी योग्य आहार व व्यायाम याला पर्याय नाही.
    * प्रथमत: हे लक्षात घ्यावे की व्यायाम आपल्यावर लादलेली गोष्ट न होता ती जीवनशैली बनली पाहिजे.
    * आठवडयातून 4-5 वेळा एक तासभर योग्य प्रकारे व्यायाम केल्यास शरीर सुडौल व निरोगी बनतेच.

    * व्यायामही वेगवेगळया प्रकारचे असतात. त्यातील एक प्रकार म्हणजे एरोबिक पध्दतीचे व्यायाम - उदा. चालणे, पळणे, पोहणे, नृत्य. सध्या प्रचलित असलेला झुंबा याच प्रकारात मोडतो. अतिरिक्त चरबी घटवण्यासाठी या प्रकारच्या व्यायामांची गरज असते. मात्र त्यासाठी कुठलाही एरोबिक व्यायाम कमीत कमी अर्धा तास, न थांबता व मध्यम गतीने करणे आवश्यक आहे.

    तुमचे वय व शारीरिक व्याधी - उदा. गुडघेदुखी, कंबरदुखी तसेच मधुमेह, उच्च रक्तदाब यांसारखे आजार इ. ध्यानात धरूनच एरोबिक व्यायाम प्रकार व त्याची गती निश्चित करावी. अन्यथा त्याचे दुष्परिणाम होऊ शकतात.

    दुसरा प्रकार म्हणजे वजन उचलण्याचे व्यायाम. यामध्ये स्नायूंना बळकटी मिळते व स्नायूंचे आकारमानही वाढते. यामुळे शरीर पुष्ट, सशक्त व पिळदार होते. वजन वाढवण्यासाठी असे व्यायाम खूप उपयुक्त असतात.
    शरीरातील स्नायूंचे प्रमाण वाढल्यामुळे अतिरिक्त चरबी निघून जाण्यासही मदत होते.

    तिसरा प्रकार म्हणजे लवचीकता वाढवणारे व्यायाम प्रकार. यात सांध्यांचे व्यायाम, सूक्ष्म व्यायाम व योगासने यांचा समावेश होतो.
    व्यायामांमुळेच नवीन बनलेले, बळकट झालेले स्नायू लवचीक असतीलच असे नाही. असे कडक स्नायू ताण सहन करू शकत नाहीत. त्यामुळे लचक भरणे, सांधे दुखणे असे त्रास होऊ शकतात.

    लवचीकपणा वाढविणाऱ्या व्यायामांमुळे हे स्नायू लवचीक होतात व कुठल्याही प्रकारचा ताण सहन करू शकतात. त्यामुळे पाय मुरगळणे, मुका मार लागणे, सांधेदुखी इ. छोटया-मोठया दुखापती टळू शकतात.

    वजन उचलण्याचे व्यायाम केल्यामुळे स्नायूंमध्ये जर Soreness किंवा ताठरपणा येत असेल तर या व्यायामांमुळे तो कमी होण्यास खूप मदत होते.

    संजीव वेलणकर पुणे
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. वृषाली वझे आहारतज्ज्ञ

      November 15, 2016


  • महाराष्ट्राच्या अरण्यातील वृक्ष संपदा – भाग २ – सुगंधित चंदनवृक्ष

    सुगंधी तेलासाठी प्रसिद्ध असलेला एक वृक्ष. हा वृक्ष सँटॅलेसी कुलातील असून जगभर चंदनाच्या साधारणपणे २५ जाती आहेत. हा मूळचा भारतीय वृक्ष असून भारत, चीन, श्रीलंका, मलेशिया, इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया ते हवाई बेटांमध्ये याची लागवड करण्यात आली आहे. कोरडया भागात समुद्रसपाटीपासून सु. १,२०० मी. उंचीपर्यंत चंदन मोठया प्रमाणात आढळतो. कर्नाटक, तामिळनाडू राज्यांत चंदनाचे वृक्ष विपुल प्रमाणात आढळतात. कर्नाटक राज्यात म्हैसूर तसेच इतर अनेक ठिकाणी या वृक्षावर आधारित अनेक लघुउद्योगांचा विकास झालेला दिसून येतो. याच्या सुवासिक गुणधर्मामुळे अनेक शतकांपासून ह्याचा वापर, लागवड व व्यापार चालत आला आहे. परंतु याच कारणामुळे या वृक्षाचे वन्य (Wild) वाण सध्या नामशेष होण्याच्या उंबरठ्यावर आहेत. मोठ्या आकारमानाची लाकडे आता आढळत नसल्यामुळे फर्निचरांसाठीच्या लाकूडकामासाठी याचा वापर संपला असला, तरीही सुवासिक तैलार्कासाठी याची मोठ्या प्रमाणावर लागवड होते.

      January 15, 2024


  • आरवाईन ते फ्रीमाँट : एक प्रवास

    सर्वसामान्य भारतीयांना असते तसे अमेरिकेचे आकर्षण मलाही होते. पण आजवरचा सारा प्रवास विमानाने झालेला होता. आंतरराष्ट्रीय प्रवास करणारी विमाने सर्वसाधारणपणे जमिनीपासून तेहतीस ते छत्तीस हजार फूट उंचीवरून जात असतात. त्यामुळे ‘टेकऑफ’ किंवा ‘लँडिंग’ करताना काही मिनिटे खालचा, आजुबाजूचा निसर्ग आणि परिसर काय तो आपल्याला दिसतो. डोमेस्टिक ओअर लाईनने अमेरिकेतील दोन शहरांमध्ये प्रवास केला तर हे विमान जमिनीपासून बारा ते सोळा हजार फूट उंचीवरून जाते.

      December 30, 2023


  • भारतीय स्त्री वैज्ञानिक जानकी अम्मल

    अम्मल ह्या  एक प्रसिद्ध वनस्पतिशास्त्रज्ञ आणि पेशी शास्त्रज्ञ होत्या  ज्यांनी अनुवंशशास्त्र, उत्क्रांती, वनस्पति भूगोल आणि मानववंशशास्त्र या क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिले. पद्मश्री पुरस्कार विजेत्या जानकी अम्मल या भारतीय विज्ञान अकादमीच्या संस्थापक फेलो आहेत.

      August 14, 2025


  • कितना बदल गया जमाना !

    माझ्या अभियांत्रिकी दिवसांमध्ये जग काहीच्या काही वेगळंच होतं. त्यातले काही ट्रेसेस सध्या आगंतुकपणे भेटताहेत- उदा. आर एस खुर्मी आणि बी एल थेराजा यांची पुस्तके (२० च्या वर आवृत्या) आजही विद्यार्थ्यांच्या टेबलवर ठाण मांडून आहेत. त्यांच्या मांडवाखालून किती अभियंत्यांच्या पिढ्या यशस्वीपणे गेल्या आहेत, याचा हिशेब ठेवणं आता चित्रगुप्तालाही अवघड झालं असेल.

      April 10, 2023


  • दारावर भाजी महाग का?

    हा लेख ठेल्यावर भाजी विकणार्या भाजीवाल्याच्या स्पष्टीकरणावर आधारित आहे.
    तसे म्हणाल तर आठवड्यातून २-३ दिवस घराच्या १-२ किमी परिसरात कुठला ना कुठला साप्ताहिक बाजार हा लागतोच. पण नेहमीच अश्या बाजारांंत जाणे जमत नाही. आठवड्यातून एक-दोनदा तरी आमची सौ. दारावर भाजी विकत घेते. भाजीवाला जवळपास राहणारा आहे. हा भाजीवाला दररोज ठेल्यावर भाजी सजवून संध्याकाळी ५ ते रात्री ९-१० पर्यंत भाजी विकण्यासाठी उत्तम नगरच्या गल्ली बोळ्यात फिरतो. साधारणत: हा हिवाळ्याच्या दिवसांत २०० किलो आणि उन्हाळ्यात १५० किलो भाजी विकतो. पावसाळ्यात याहून कमी. गेल्या आठवड्यात ४ दिवसांच्या सुट्ट्या होत्या, घरीच होतो. सौ. भाजी घेत होती. मी भाजीवाल्याला सहज विचारले मंडीचे भाव आणि तुमच्या भावात एवढा जास्त फरक का असतो? आश्चर्य वाटेल, पण भाजीवाल्याने मंडईतून भाजी आणण्यापासून ते दारावर ग्राहकाला विके पर्यंत भाव का आणि कसा वाढतो याचे सविस्तार वर्णन केले आणि फोटू हि काढू दिला.
    सकाळी दहा वाजता हा भाजीवाला केशोपूर स्थित सब्जीमंडी येथे भाजी विकत घ्यायला जातो. मंडईतले भाव पाहून, किती आणी कोणती भाजी विकत घ्यायचे ठरवितो. अधिकांश भाज्यांचा मंडईत कमीतकमी ५ किलोचा भाव असतो. ५-१० किलोच्या हिशोबाने अधिकांश भाज्या विकत घ्याव्या लागतात. त्या दिवशी त्याने अंदाजन १५० किलो भाजी विकत घेतली होती. २०० रुपये ऑटो भाडे हि दिले.
    दारावर भाजी विकत घेणारे ग्राहक भाजीसाठी जास्ती भाव देतात. त्यांना चांगली भाजी अपेक्षित असते. ठेल्यावर भाजी ताजी आणि सुंदर दिसत असेल तरच ती विकली जाते. त्या साठी भाजी घरी आणल्यावर भाजीवाला उदा: फूलगोभीवर(फ्लावर) लागलेले जास्ती डंठल तोडावे लागतात. बंद्गोभी (कॅबज), वरचची खराब पाने काढावे लागते. काही भाज्या स्वच्छ करण्यासाठी उदा: लागलेली माती काढण्यासाठी त्या पाण्यातून काढ्याव्या लागतात. बहुतेक वेळा बटाटे, कांदे आणि टमाटर आणि इतर भाज्या दर्जाच्या हिशोबाने वेगळ्या करून विकाव्या लागतात. शिवाय ग्राहक स्वत: भाजी निवडतात त्यामुळे हि काही भाजी वेगळी होतेच. शेवटी उरलेली भाजी रात्री ९.३० नंतर मिळेल त्या भावात विकावी लागते. ग्राहकांना मिरची आणि कोथिंबीर हि मुफ्त मध्ये द्यावी लागते. या शिवाय पाव, अर्धा किलोच्या हिशोबाने भाजी विकत घेणाऱ्या ग्राहकांना २५-५० ग्राम भाजी जास्त द्यावी लागते. बहुतेक घरी भाजी विकत घेणारे ग्राहक बांधलेले असतात. जर ग्राहकाला वजनाच्या बाबतीत यत्किंचित शंका आली तो तुटण्याची शक्यता असतेच.भाजी स्वच्छ करणे आणि ग्राहकाला २५-५० ग्रम जास्त देण्यामुळे जवळपास १०% भाजी ग्राहकांपर्यंत पोचता-पोचता कमी होते. किती हि झाले तरी, आठवड्यातून एखाद्याच दिवशी १००% भाजी विकल्या जाते. उरलेली १०% ते २०% टक्के भाजी कमी भावात अर्थात घेतलेल्या भावात आणि कधी कधी तर त्याहून कमी किमतीत विकावी लागते. कधी कधी तर, उरलेली भाजी शेजारपाजारच्या लोकांना मुफ्त मध्ये हि वाटावी लागते. उन्हाळ्यात आणि पावसाळ्यात दुसर्या दिवशी पर्यंत भाजी खराब होण्याची शक्यता असते.

    आता आपण हिशोब करू. समजा भाजीवाल्याने मंडईतून १० रुपये किलोच्या हिशोबाने १५० किलो भाजी विकत घेतली, झाले १५०० रुपये. शिवाय १०० रुपयांची कोथिंबीर आणि मिरची मुफ्त मध्ये देण्यासाठी. २०० रुपये ऑटोचे. किमान ५००-७०० रुपये भाजीवाल्याची कमाई, १०० रुपये दान-दक्षिणा (मुंबईत दान दक्षिणा जास्त असू शकते ), ५० रुपये किरकोळ खर्च. असे झाले २५०० रुपये. आपण गृहीत करू १५ % उरलेली भाजी (२२.५ किलो) रेट टू रेट विकली. अर्थात २५००-२२५ = २२७५ रुपये.
    आता उरलेली ११२.५ किलो भाजी किमान २० रुपये किलोच्या (सरासरी भाव) हिशोबाने भाजीवाल्याने विकली तरच त्याला २२५० रुपये मिळतील. अर्थात कमीत कमी दुप्पट भावात भाजी विकावीच लागेल तरच भाजीवाल्याला ५०० रुपये स्वत:साठी वाचविता येईल.पण इथे हि एक घोळ आहे. प्रत्येक दिवशी दुसरे भाजीवाले कुठल्या भावाने भाजी विकत आहे, हे हि ध्यानात ठेवावे लागतात. (मंडईत भाजीवाले वेगवेगळ्या भावाने भाजी विकत घेतात). बहुतेक वेळा कांदे, बटाटा, फुलगोभी किंवा अन्य मौसमी भाज्या दुप्पट भावाने विकता येत नाही. या शिवाय नेहमीच्या ग्राहकांना थोडी सवलत हि द्यावीच लागते. त्या मुळे अन्य भाज्यांवर किलोवर १५-२० रुपये जास्ती आकारावे लागतात.

    भाजीवाल्याचे स्पष्टीकरण ऐकल्या वर लक्ष्यात आले, मंडईतल्या भावात आणि घर पोच भाजी विकणार्या फेरीवाल्याच्या भावात फरक का असतो. मला तर त्याचे म्हणणे पटले, तुम्हाला?

    टीप: आपली प्रतिक्रिया अपेक्षित

      April 19, 2016