(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • युवकांनो आध्यात्मात समरस व्हा !

    आजच्या या विज्ञान तंत्रज्ञानाच्या युगात युवकांनो आध्यात्मात समरस व्हा ! असे म्हटल्यानेबहुतांशी युवक गोंधळून गेले असतील, यात शंका नाही. सर्वांना असा प्रश्न पडला असेल की, आजच्या संगणकाच्या प्रगत युगात आध्यात्मासारख्या जुनाटव मागासलेल्या विषयाला पुढे आणून मी युवकांची दिशाभूल करत आहे. किंवा अंधश्रध्देला खतपाणी घालत आहे. आदि आदि.

      August 6, 2018


  • दर्पण’कार बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन

    निर्भिड पत्रकारिता’ या शब्दाला बट्टा लावण्याचं पातक अगदी गेल्याच वर्षी ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर या एका मराठी संपादकाकडून घडलं आणि बाळशास्त्री, टिळक, गांधी आदिंलारख्या निर्भिड आद्य पत्रकारांची मान शरमेने वर स्वर्गात खाली गेली असावी या बाबत निदान माझ्या मनात तरी काही शंका नाही..बाळशास्त्रींना तर ‘याचसाठी केला होता का अट्टाहास’ असही वाटलं असण्याची शक्यता आहे.

      January 6, 2017


  • मानसिक दबाब

    हा फोटो नीट पहा. आॅस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जेफ थॉ़म्पसनने ७ खेळाडुंना क्षेत्ररक्षण करण्यासाठी अगदी फलंदाजाजवळ लावले आहें. म्हणजे यष्टी रक्षक तसेंच स्वतः मिळुन असें नऊ खेळाडु खेळपट्टी जवळच आहेत. राहता राहीलें २ खेळाडु उर्वरीत मैदानात क्षेत्र रक्षणासाठी उरतात.

      August 5, 2023


  • भारतीय रेल्वेचे पसरत गेलेले जाळं

    फोटो सौजन्य : इंटरनेट
    फोटो सौजन्य : इंटरनेट

    इ.स. १८५३ मध्ये भारतीय रेल्वेचा शुभारंभ मुंबई ठाणे रेल्वेने झाला आणि त्यानंतर सन १८५४ मध्ये हावरा हूगळी मार्ग सुरू झाला. कलकत्त्यामध्ये १८४५ पासून रेल्वे उभारणीचे वारे वाहत होते. अनेक श्रीमंत व्यापाऱ्यांनी पैसे उभारण्यास सुरुवात केली होती. इंग्लंड मध्ये भारतीय रेल्वेच्या वार्तेमुळे सर्व थरांतील नागरिक थक्क झाले होते. भारतात भारतीय रेल्वेने भांडवल उभारण्याकरिता काढलेले शेअर्स बाजारात हातोहात खपले होते व त्यामध्ये सर्व थरांतील नागरिकांनी पैसे गुंतविले होते. हा एक जगप्रसिद्ध प्रकल्प होणार अशी प्रत्येकाला खात्री वाटत होती. भारतातील प्रदेशांची विविधता व विषम हवामान, यामुळे रेल्वे बांधणीत नाना तर्‍हेच्या अडचणी येणार याची लॉर्ड डलहौसींंना कल्पना होती, परंतु त्यांची दूरदृष्टी इतकी अचूक होती, कि या रेल्वे बांधणीमुळे इंग्लंडचा फायदा तर होईलच, पण भारतातही औद्योगिक क्रांती घडून भारताची प्रचंड वेगाने प्रगती होईल याबाबत त्यांची बालंबाल खात्री होती. या खात्रीतुनच त्यांनी रेल्वे बांधणीची सुरुवात केली. इंग्लंड मध्ये रेल्वे शेअर्स घेण्याची हावया शीर्षकाची एक कविता त्यासुमारास एका नामांकित वृत्तपत्रातून प्रसिद्धही झाली होती.

    सन १८५६ व १८५७ या दोन वर्षात भारतीय स्वातंत्र्य युद्धामुळे राज्यकर्त्यांना चांगलाच हादरा बसला. त्याचा परिणाम रेल्वे बांधणीवर झाला आणि कामकाज थंडावत चाललं; परंतु पुढे या घटनेच्या परिणामी ईस्ट इंडिया कंपनीकडून राज्य कारभार पूर्णपणे ब्रिटिश राजवटीच्या अधिपत्याखाली आला. संपूर्ण देशावर इंग्रजांची जबरदस्त पकड बसली व रेल्वे बांधणीला पुन्हा एकदा जोरात चालना मिळाली.

    सन १८५९ पर्यंत मद्रास, अलाहाबाद, कानपूर, अमृतसर, अटारी, ते थेट लाहोर या ठिकाणांपर्यंत रेल्वेचं जाळं पसरू लागलं. सन १८६५ ते १८७० या दरम्यान थळ आणि बोरघाट ( कसारा व खंडाळा ) या अवघड घाटांचं बांधकाम झालं. ही जगातील रेल्वे बांधणीतील सर्वात उच्च प्रतीची बांधकाम ठरल्यामुळे भारतातील रेल्वे बांधणी संबंधी सर्वत्र प्रशांत सत्कार काढले जाऊ लागले. मुंबईपासून उत्तर, पश्चिम, पूर्व व दक्षिणेकडील मार्ग सुरू झाले. सन १८८२ पर्यंत थेट दिब्रुगड पर्यंत आसामबांधणी पूर्ण झाली. रेल्वे बांधणीच्या यशाची पताका फडकावली गेली. त्या रेल्वे बांधणी दरम्यान काही दुर्घटनांचा सामनाही करावा लागला. अगदी सुरुवातीच्या काळातील पहिली दुर्घटना म्हणजे इंग्लंड होऊन बोटीने रेल्वेचे डबे येत असताना ती बोटच समुद्रात बुडाली; दुसरी अशीच एक दुर्घटना अशी, की भारताकडे येण्यास निघालेलं पहिलं इंजिन भारतात न येता चुकून ऑस्ट्रेलियाकडे रवाना झालं.

    भुसावळ ते जबलपूर या ३३९ मैलांच्या रेल्वे मार्गाचं बांधकाम घनदाट जंगलातून करणं हे जबरदस्त आव्हान होतं. या ठिकाणी वाघ, बिबट्यांसारखी जंगली श्वापदं, मलेरिया सारखा रोग, आणि नर्मदेच्या पाण्याचा प्रचंड प्रवाह या तीन गंभीर समस्या होत्या. या समस्यांवर मातकरीत नर्मदा नदीवर पूल बांधला गेला व कलकत्ता व दिल्ली या शहरांशी मुंबई जोडली गेली. सन १८७० मध्ये रेल्वे बांधणीचा खर्च प्रत्येक मैल अंतरासाठी १७,००० पौंड इतका झाला.

    १९२५ साली रेल्वेने हनुमान उडी घेत विजेवर चालणारी पहिली लोकल मुंबई कुर्ला हार्बर लाईनवर सुरू केली. यापुढील काळात इ.सन. १९३७ पर्यंत ब्रह्मदेश हा भारताचाच भाग होता. त्यामुळे रंगून, मंडाले, कुमलॉंग ही रेल्वे बांधणी पूर्ण करण्यात आली. सिलोन मधील कोलंबो हे शहर भारताच्या धनुष्यकोडी पर्यंत बोटीने व पुढे रेल्वेमार्गाने भारताला जोडलं गेलं.

    दुष्काळात दुर्गम प्रदेशात धान्य पोहोचविण्याची जबाबदारी रेल्वेने घेतल्यामुळे हजारो लोकांना धान्य मिळालं. दुर्गम अशा प्रदेशांत पर्यंत जवळजवळ ५,००० मैल रेल्वेमार्ग नेण्यात आले. दुसऱ्या महायुद्धाचे ढग जमा होऊ लागले तेव्हा सैन्य व युद्धसामग्री हलविण्याकरता रेल्वेवर बराच बोजा पडला. त्यातच रेल्वेची इंजिनं स्वल्पविराम मालगाडीचे डबे, मध्य आशियात पाठवावे लागले. भारतातील २६ छोटे मार्ग बंद करावे लागले. रेल्वे कारखान्यात युद्धसामुग्री बनवावी लागली. वायव्य सरहद्द प्रांतात रेल्वे थोड्याच भागात पोहोचली होती, त्यामुळे अफगाणिस्तानकडे लक्ष पुरविता आलं नाही. दुसऱ्या महायुद्धापाठोपाठ १९४७ साली भारत स्वतंत्र झाला, परंतु फाळणी झाल्याने रेल्वे मालमत्तेची विभागणी करावी लागली व काही मार्ग बंद करावे लागले.

    १९४८ सालापर्यंत अनेक संस्थानं आणि मुख्य रेल्वे मिळून ४२ लहान मोठे रेल्वे गट होते. त्या सर्वांमध्ये सुसूत्रीकरण नव्हतं; त्यामुळे चांगली कार्यक्षमता नव्हती व देशाच्या अर्थव्यवस्थेत योग्य भर पडत नव्हती. यांमध्ये १३ वर्ग प्रथम दर्जाचे, १० वर्ग दुसऱ्या दर्जाचे, १९ वर्ग तिसर्‍या दर्जाचे असे वर्गीकरण केलेले मार्ग होते. यांमधील ३२ मार्गांचा अधिकार संस्थानिकांचा होता. सांगली संस्थानाचे ५ महिला इतकी छोटी लाईन, तर निजामाच्या राज्यात १,३९६ मैलांचा रेल्वेमार्ग त्यांच्या मालकीचा होता. एकूण ३५,००० मैल लांबीच्या मार्गांपैकी ७,५५९ मैलाचा रेल्वे मार्ग संस्थानिकांच्या हातात होता.

    इ.सन. १९५२ सालापर्यंत या सर्व भारतीय रेल्वे मार्गांचे राष्ट्रीयीकरण झालं. त्यानुसार सेंट्रल, वेस्टर्न, साऊथ, नॉर्थ, नॉर्थ ईस्ट ( मध्य/पश्चिम/दक्षिण/उत्तर,उत्तर-पूर्व ) असे विभाग करण्यात आले. या विलीनीकरणाने भारतीय रेल्वे ही एक महान राष्ट्रीय संपत्ती म्हणून गणली जाऊ लागली.

      August 2, 2019


  • श्रीगणेशभुजङ्गम् – मराठी अर्थासह

    श्रीमद् आदिशंकराचार्यांनी या स्तोत्राची रचना भुजंगप्रयात या वृत्तात केलेली असल्याने त्याला गणेश भुजंगम् असे म्हणतात.

      February 28, 2024


  • केसांच्या आरोग्यासाठी टिप्स

    सौंदर्याच्या दृष्टीने केसांचे अत्यंत महत्व आहे. केस गळणे, केसात कोंडा होणे, अकाली केस पांढरे होणे, केस तुटणे यासारख्या केसांच्या समस्या असतात.
    या केसांच्या समस्यांनी आज अनेक स्त्री आणि पुरुष दोघेही ग्रासलेले आहेत. केसांची समस्या गंभीर असली तरीसुद्धा, आपण जर आपल्या जीवनशैलीमध्ये अगदी थोडासाच बदल केल्यास केसांच्या सर्व समस्यांचे सहजतेने निरसण होईल. यासाठी येथे काही सहज सोपे उपाय दिले आहेत.

    केसांचे आरोग्या आपल्या संपूर्ण आरोग्यावरच अवलंबुन असते. जसे जर आपल्या शरीरातील रक्तसंचारण [Blood circulation] योग्य प्रकारे होत असल्यास त्यायोगे केसांच्या मुळांचे पोषण योग्य प्रकारे होते. यांमुळे केसांची मुळे घट्ट होतात. परिणामी केस गळणे, तुटणे यासारख्या समस्या होत नाहीत.

    संतुलित आहार घ्यावा

    तळलेले पदार्थ, आंबट, खारट, तिखट, मसालेदार आहाराचे प्रमाण कमी करावे. हवाबंद पदार्थ, जंकफूड, फास्टफूडच्या आहारी जाणे टाळावे. कारण अशा आहारात केसांच्या आरोग्यासाठी आवश्यक असणारे प्रोटीन, जीवनसत्वे, कॅल्शियम, लोह, जिंक इ. पोषकतत्वे नसतात. केसांच्या आरोग्यासाठी वरील पोषकतत्वांनी भरपूर असणाऱया हिरव्या पालेभाज्या, विविध फळे, मोड आलेली कडधान्ये, दुध, अंडी, सुकामेवा विशेषतः बदाम यांचा आहारात समावेश करावा. पुरेसे पाणी वरचेवर प्यावे. यांमुळे रक्तसंचार सुधारण्यास मदत होते. मानसिक ताणतणाव रहित रहावे. नियमित व्यायाम करावा. यांमुळे रक्तसंचारण सुधारण्यास मदत होते. योग्य रक्तसंचारणामुळे केसांची मुळे घट्ट होतात. यांभुळे केस गळण्यासारख्या समस्या होत नाही. केसांच्या आरोग्यासाठी ‘ड’ जीवनसत्व अत्यंत उपयुक्त असते. यासाठी सकाळच्या कोवळ्या ऊन्हात काही वेळ उभे रहावे. व्यसनांपासून दूर राहणे हे केसांच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्वाचे असते. कारण धुम्रपान, मद्यपानाद्वारे अनेक विषारी घटक रक्तप्रवाहात येत असतात. त्यामुळे इतर आरोग्याच्या समस्येबरोबर केसांच्या समस्यासुद्धा उद्भवतात. धुम्रपान करणाऱया व्यक्तींचे केस लवकर पांढरे होतात.रासायनिक औषधे, कंडीशनरचा वापर हानिकारक ठरु शकतो. यासाठी तज्ञांच्या मार्गदर्शनानेच शक्यतो यांचा वापर करावा. यापेक्षा भृंगराजतेल, मेहंदी यांचा वापर करावा.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

      January 9, 2017


  • शिवराज्याभिषेक दिन

    ५ जून १६७४ व ६ जून १६७४: या दोनही दिवशी राज्याभिषेकाचे मुख्य विधी संपन्न करण्यात आले. अनेक नद्यांचे व समुद्राचे जल रायगडावर मागविले गेले होते. या दिवशी अनेक होमहवन करण्यात आले, यजमानांची औदुंबर शाखांचे असं करवून घेतले होते आणि मग होमहवन संपन्न झाल्यावर शिवरायांनी स्नान केले आणि अभिषेक शाळेत दाखल झाले आणि तेथील सिंहासनावर आरूढ झाले. मग ब्राह्मणांनी मंत्रांच्या घोषात शिवरायांवर अभिषेक केले. या अभिषेकावेळी शिवरायांचा हात धरून ब्राह्मणांनी ‘महते क्षत्राय महते अधित्यात महते जानराज्यायेष व भरता राजा सोमोअस्माकं ब्राह्मणानांच राजा’ अशी घोषणा केल्याचा उल्लेख देखील सापडतो. (मराठ्यांचा इतिहास, रा.वि. ओतूरकर)

      June 6, 2022


  • माघी गणेश जयंती

    गणपतीचे एकंदरीत तीन अवतार मानण्यात येतात. या तिन्ही अवतारांचे जन्मदिवस वेगवेगळे आहेत. पहिला वैशाख पौर्णिमेचा पुष्टीपती विनायक जयंतीचा दिवस, दुसरा भाद्रपद शुक्ल चतुर्थीचा पार्थिव गणेश जन्मदिवस आणि तिसरा माघ शुक्ल चतुर्थीचा श्रीगणेश जयंतीचा दिवस !

      February 13, 2024


  • श्री विष्णु पादादिकेशांत स्तोत्र – १५

    भगवान श्रीविष्णूंच्या चरणतलाचे वर्णन केल्यानंतर आता आचार्यश्री त्या चरणाला असणाऱ्या अनुपमेय अंगुलींचे वर्णन करीत आहेत. ते म्हणतात,

      December 18, 2020


  • सावधान, श्रीकृष्ण जिवंत आहे.

    कृष्ण अंधारात जन्माला. ह्याच प्रवास जसा गूढ आहे, तशी ह्याची शिकवणही गूढ आहे. ती नीट समजून घ्यावी लागते. कृष्णाला समजावून घ्यायचं तर जरा सावध राहायला हवं. त्याला सोप्या भाषेत समजावून सांगत आहेत निरेन आपटे!!

      August 19, 2025