वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
“यश हा एक प्रवास आहे. ते केवळ अंतिम ठिकाण किंवा साध्य नव्हे.”
– बेन स्वीटलँड, लेखक
“यश म्हणजे काय? मला वाटतं यश हे अनेक विचारांचं अजब मिश्रण असतं. तुम्ही जे करताय, तेवढंच पुरेसं नाही, तुम्हाला आणखी कष्ट करायला हवेत आणि या सगळ्यात काहीतरी प्रयोजनही नक्की हवं. यश या साऱ्या विचारातून घडत जातं.”
– मार्गारेट थॅचर, ब्रिटनच्या माजी पंतप्रधान
“यश मिळवणं? अगदी सोपी गोष्ट आहे ही! फक्त योग्य वेळी, योग्य प्रकारे योग्य ती कृती करत राहा.”
– अरनॉल्ड ग्लासो, प्रसिद्ध उद्योजक
“कधीच चुका न करणं म्हणजे यश नाही; तर एकच चूक दुसऱ्यांदा न करणं ही गोष्टच तुम्हाला यशप्राप्तीकडे घेऊन जात असते.”
– जॉर्ज बर्नार्ड शॉ, प्रसिद्ध नाटककार
“मनाशी एखादी कल्पना ठरवा. त्यानंतर तुमचं सारं आयुष्य त्या कल्पनेच्या पूर्ततेसाठी झोकून द्या. मनात फक्त तिचाच विचार असू दे. स्वप्नातही तीच दिसू दे. तुमच्या जीवनाच्या प्रत्येक क्षणात ती असू दे. तुमच्या शरीराचा अणू-रेणू त्याच ध्येयाने पछाडलेला असू दे. बाकी साऱ्याचा विचारही सोडून द्या. यशाचा मार्ग हाच आहे.”
– स्वामी विवेकानंद
“जर यशस्वी व्हायचं असेल तर तुमची यशासाठीची तळमळ अपयशाच्या भीतीपेक्षा कित्येक पटीनं जास्त हवी.”
– बिल कॉस्बी, अभिनेते, लेखक
“ज्यांच्यात प्रचंड अपयश पचवण्याची धमक असते, तेच भव्यदिव्य यश संपादन करू शकतात.”
– रॉबर्ट एफ. केनेडी, राजकीय नेते
“प्रत्येक यशाची गुरुकिल्ली एकच! ती म्हणजे कृती करत राहणं.”
– पाब्लो पिकासो, चित्रकार
“तुम्हाला अमुक एक गोष्ट चांगली आहे किंवा तमुक गोष्टीवर विश्वास ठेवा असं सांगितलं गेलं, तरी तुम्ही प्रत्यक्षात तुम्हाला स्वत:ला जे ठाऊक आहे ते जास्त महत्त्वाचं असतं. त्यावर जेव्हा विश्वास ठेवता तेव्हाच तुमचं तुम्ही भव्य स्वप्न साकारण्याच्या मार्गावर पाऊल ठेवता. यशाचा आविष्कार तुमच्या आतूनच होत असतो.”
– राल्फ वाल्डो इमर्सन, लेखक व कवी
“आपल्या प्रत्येकाच्या स्वत:च्या अशा खास इच्छा असतात. प्रत्येकाच्या बोटांचे ठसे जसे वेगळे आणि खास तशाच त्या वेगळ्या असतात. यशस्वी होण्याचा उत्तम मार्ग म्हणजे तुम्हाला काय आवडतं, तुमचं कशावर प्रेम आहे, याचा शोध घेणं. त्यानंतर इतरांना सेवा म्हणून ते उत्तम प्रकारे देऊ करणं, खूप कष्ट करणं आणि या विश्वातल्या ऊर्जेच्या मार्गदर्शनाखाली यश संपादन करणं.”
-ऑप्रा विन फ्रे, टीव्ही शो अॅन्कर, सामाजिक कार्यकर्त्यां
“अपार कष्ट आपल्या कामाप्रती अविचल निष्ठा आणि आपण जिंकू किंवा अपयशी ठरू याची तमा न बाळगता आपल्या कामात १०० टक्के झोकून देण्याचा, पूर्ण शक्ती लावून ते काम करण्याचा निश्चय या गोष्टीतूनच यश साकारत जातं. म्हणूनच यशस्वी व्यक्ती आणि इतरांच्यातला फरक काय? इतरांकडे क्षमता नसतात, ताकद नसते किंवा ज्ञान नसते असं नाही. पण यशस्वी व्यक्तींमध्ये जी आंतरिक तळमळ आणि इच्छा असते, त्याची कमी इतरांमध्ये असते.”
– विन्सेट (विन्सी) लोम्बार्डी, ख्यातनाम फूटबॉलपटू
“समाजाला हितकारक ठरतील अशा कृती करणं आणि त्या प्रक्रियेचा आनंद घेणं म्हणजे यश! यावर तुमचा विश्वास असेल, अन् ही व्याख्या तुम्ही मनापासून स्वीकारत असाल, तर ‘यश’ तुमचंच आहे.”
– केली किम
March 18, 2017
पपई हे फळ अत्यंत रूचकर व पौष्टिक असते.तसेच हे सगळ्यांना आवडणारे व बारा माही उपलब्ध असे फळ.ह्याचा आपण वेगवेगळ्या तऱ्हेने उपयोग करू शकतो मग शेक असो वा फ्रूट सलाड सगळ्याच हि पपई रूचकर लागते.
तसे काही आपण ह्यातून फारसे पक्वान्न बनवत नाही कारण हे फळ कच्चे असताना भाजी व पिकल्यावर नुसतेच खायला छान लागते.
ह्याचे १०-१२ फूट उंच वृक्ष असतो व ह्या झाडाला फांद्या नसतात.पाने ताडाच्या पानांप्रमाणे छत्राकार,विस्तृत व विभक्त खणांची असतात.फुले हिरवी,पांढरी व एकलिंगी असतात.फळ एक कोष्ट,लंबगोल,कच्चे असताना हिरवे व पिकल्यावर पिवळसर असते त्याच्या आत बिया असतात ज्या चाॅकलेटी रंगाच्या व पाणीदार अशा पिकलेल्या फळात तर कच्च्या फळात पांढऱ्या असतात.
कच्चे फळ हे चवीला तिखट,कडवट असते ते उष्ण असते व कफ वात शामक असून पित्तकर असते.
तर आता आपण प्रथम कच्च्या पपईचे घरगुती उपचार पाहूयात:
१)कच्च्या पपईचा चीक गजकर्णावर लावावा फायदा होतो.
२)मुळव्याधीवर पपईच्या कच्च्या फळाचा चीक लावल्यास ३ दिवसांनी मोड कमी होतो.
३)कच्ची पपई वाटून हातपायांवर बांधून झोपल्यास हातपायांची आग व भेगा कमी होतात.
४)कच्च्या पपईचे तुकडे मांस शिजवताना त्यात धालावे म्हटजे मांस लवकर शिजते व सुपाच्य होते.
५)कृमींवर मोठ्या माणसांना १ चमचा पपईचा चीक+साखर हे मिश्रण घ्यावे व लहान मुलांना हा चीक १-२ थेंब साखरे सह द्यावा.
(क्रमश:)
वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
December 21, 2016
जीवनात काही गोष्टी योगायोगाने अशा काही घडत जातात, की मागे वळून पाहताना त्या खरंच घडल्या होत्या यावर विश्वास बसत नाही. तशीच गोष्ट माझ्या आयुष्यात घडली आणि ती म्हणजे रेल्वेने युरोपची भ्रमंती!
सन १९८० मध्ये माझा एक मित्र वैद्यकीय उच्च शिक्षणासाठी जर्मनीत गेला. त्यानं जर्मनीला येण्याचं आग्रहाचं आमंत्रण दिलं आणि त्यातूनच एका अविस्मरणीय रेल्वेप्रवासाची आखणी कागदावर उतरली. युरोपमधील अंदाजे १७ देश (ग्रीस ते थेट नॉर्वे, स्वीडन) एकसंध असून त्यांमधील १ लाख मैल लांबीचं रेल्वेचं जाळं प्रवाशांना या सर्व देशांच्या कानाकोपऱ्यापर्यंत नेतं. युरोप सोडून परदेशांतील पर्यटकांना या संपूर्ण मार्गावरील रेल्वेचा पास माफक किंमतीत मिळतो. हा पास अगदी १५ दिवसांपासून ३ महिन्यांपर्यंत मिळतो. महत्त्वाचं म्हणजे सलग तेवढे दिवस वापरून संपवावा लागतो. हा प्रवास फर्स्ट क्लासनं होत असल्यामुळे कोणतीच धकाधक नसते. इंग्लंडची भूमी ही बाकी युरोपीय देशांपासून मध्यात येणाऱ्या ब्रिटिश समुद्रधुनीमुळे वेगळी होत असल्याने व त्यातही ब्रिटिशमंडळी इतरांपासूनचा आपला वेगळेपणा आवर्जून टिकवत असल्याने अर्थातच हा युरेलचा परंतु पास लंडनमध्ये वा इंग्लंडमध्ये फिरण्यासाठी उपयोगी पडणार नव्हता; (आपल्यापुढचा) इंग्लंडसाठी वेगळं तिकीट काढण्याचा पर्याय खुला असतोच.
आम्ही तीन मित्रांनी हा प्रवास करावयाचा व जर्मनी गाठायचेच असा बेत पक्का केला. युरोप रेल नकाशे, युरेल पास नियम, युरेल टाईम टेबल 'युरोप ऑन १५ डॉलर्स अ डे' अशी विविध पुस्तकं मिळवणं; याशिवाय प्रत्यक्षात युरेलने प्रवास केलेल्या व्यक्तींशी चर्चा करणं, अशा प्रकारे सहा महिने खपून आमची जय्यत तयारी झाली. कोणती गाडी कोणत्या स्टेशनवर घ्यायची, कोठे राहायचं अशा प्रवासासंबंधी अनेक प्रश्नांच्या उत्तरांची नोंद प्रत्येकाजवळील कागदावर तयार होत होती. आम्हाला भारत सरकारच्या नियमाप्रमाणे ५०० डॉलर्स मिळणार होते. त्यांतील ३२० डॉलर्स ही रक्कम २१ दिवसांच्या युरेल पासासाठी वापरल्यावर, खिशात उरणार फक्त १८० डॉलर्स. त्यांतूनच इतर खर्च भागवायचा, म्हणजे अगदी अटीतटीचा सामना होता. पोटाला चिमटा घ्यायचा, जास्त वेळ गाडीत घालवायचा. त्यातही काही प्रवास रात्रभराच्या गाडीने करावयाचा, पण प्रेक्षणीय स्थळं मात्र पुरेपूर पदरी पाडून घ्यायची ह्या हिशोबाने योजना कागदावर १०० टक्के यशस्वीरीत्या आखली गेली. या पासचं वैशिष्ट्य असं, की कोणतीही गाडी कुठेही पकडता येत होती. मनाला वाटेल तिथे उतरण्याची परवानगी होती. आरक्षण करणंही अजिबात आवश्यक नव्हतं. फक्त ज्या देशांमधून आमचा गाडीचा मार्ग निवडला होता त्या प्रत्येक देशाचा 'मल्टिपल एन्ट्री व्हिसा' मुंबईतून ३ महिन्यांच्या मुदतीसाठी घ्यावा लागला होता.
आमचा प्रवासाचा मार्ग साधारण याप्रमाणे आखला गेला
मुंबई ते अॅमस्टरडॅम (हॉलंड) विमानाने प्रवास
१. अॅमस्टरडॅम ते लंडन (इंग्लंड) - ह्या प्रवासाला युरेलचा पास चालणार नव्हता.
२. लंडन ते पॅरिस (फ्रान्स) - येथेही युरेल पास चालणार नव्हता. (पॅरिसहून पुढच्या प्रवासासाठी युरेलचा पास वापरण्यास सुरुवात.)
३. पॅरिस ते जिनिव्हा (स्वित्झर्लंड) - ४ दिवस स्वित्झर्लंड देश रेल्वेनं पालथा घालायचा.
४. जिनिव्हा ते इन्सबुक (ऑस्ट्रिया)
५. जर्मनी
६. इटली
अशा रीतीनं ५ देश युरेलनं व दोन देश वेगळी स्वतंत्र तिकिटं काढून पाहावयाचे ठरले.
-- डॉ. अविनाश वैद्य
October 2, 2022

October 14, 2015
सुक्या मेव्याचा राजा म्हणून बदामाला ओळखले जाते. शरीर व मनाचे आरोग्य चांगले राखण्यासाठी औषधी व अन्न अशा दोन्ही स्वरूपात बदाम वापरले जातात. त्यात असणाऱ्या अलौकिक गुणधर्मामुळे सौंदर्यप्रसाधन म्हणूनही त्याचा वापर केला जातो. तेल, साबण, क्रीम, मिठाई अशा विविध ठिकाणी बदामाचा वापर केला जातो.
औषधी गुणधर्म
शुष्क बदाम बी मधुर, कषाय, तीक्त गुणात्मक असून मधुर विपाकी व उष्ण वीर्यात्मक आहे. त्यामुळे बदाम बी स्निग्ध, बलकर, पौष्टिक, वातनाशक व कफकर आहे. या सर्व गुणधर्मामुळे आयुर्वेदात अनेक औषधांमध्ये बदामाचा वापर करतात. कॅल्शिअम, फॉस्फरस, लोह, नायसिन, ‘ब’ जीवनसत्त्व, तंतूमय व पिष्टमय पदार्थ, खनिज, प्रथिने, स्निग्धता ही घटक द्रव्य बदामामध्ये असतात. या घटकांनी उत्साह वाढतो व शरीरामध्ये रक्ताचं प्रमाण वाढण्यास मदत होते. त्यामुळे संपूर्ण शरीराचं आरोग्य चांगलं राहून दीर्घायुष्य लाभतं. बदामाच्या देशी व जंगली अशा दोन जाती आहेत. जंगली बदाम हा चवीला कडू असतो. तर देशी बदाम हा गोड असतो.
उपयोग
० बदामाचं तेल केसांच्या मुळाशी लावलं असता केसांना पोषक घटक मिळाल्यानं केसांची वाढ चांगली होते व केस गळणं, कोंडा होणं, अकाली केस पिकणं या समस्या दूर होतात.
० डोळयांखाली काळी वर्तुळं तयार झाली असतील तर बदाम दुधामध्ये उगाळून त्यांचा लेप लावावा. लेप सुकल्यानंतर चेहरा स्वच्छ धुवावा. नियमितपणे ही प्रक्रिया केल्यास डोळ्यांखालील काळी वर्तुळे निघून जातात.
० बदाम पेस्ट, दुधाची साय व गुलाब पाणी एकत्र वाटून चेहऱ्याला लावल्यास चेहऱ्यावरील सुरकुत्या, काळे डाग, मुरुमे जाऊन चेहरा टवटवीत व कांतीयुक्त होतो.
० बदाम रात्री पाण्यात भिजत घालून सकाळी सोलून खावेत. याने स्मृतिभ्रंश, विस्मरण हे आजार कमी होतात.
० भिजलेल्या बदामाची पेस्ट दुधात कालवून दूध उकळावे व गाईचे तूप, वेलची, साखर घालून त्याची खीर बनवावी. ही खीर खाल्याने अशक्तपणा व थकवा दूर होतो. यासह वंध्यत्व
असणाऱ्या रुग्णांनी नियमितपणे या खिरीचं सेवन करावं.
० वारंवार डोकेदुखी होत असेल तर बदामाची खीर खावी. तीव्र डोकेदुखीमध्ये बदाम आणि कापूर दुधात उगाळून त्याचा लेप कपाळावर लावावा.
० शरीरामध्ये चांगल्या कोलेस्टेरॉलची निर्मिती होण्यासाठी नियमितपणे ४ बदाम रोज सकाळी उपाशीपोटी खावेत. यामुळे चांगल्या कोलेस्टेरॉलची (एच.डी.एल) निर्मिती होते व वाईट कोलेस्टेरॉलला (एल.डी.एल.) प्रतिबंध केला जातो. तसंच हदयविकार, रक्तदाब हे विकार टाळले जातात.
० जुनाट मलावरोधाची तक्रार असेल तर नियमितपणे झोपताना ६-८ बदाम खाल्ल्यास सकाळी पोट साफ होतं.
० चेहऱ्यावर काळे वांग आले असतील किंवा ओठ काळे दिसत असतील तर दुधाच्या सायीमध्ये बदाम उगाळून हळुवार मालीश करावी. यामुळे काळसरपणा दूर होतो.
० त्वचा कांतीयुक्त होण्यासाठी बदामाचं तेल, चंदन तेल, लोणी व मध यांचं मिश्रण त्वचेवर लावून हलक्या हाताने मसाज करावा. यामुळे त्वचेवरील सुरकुत्या कमी होऊन रंग उजाळतो.
० मेंदू, हदय, डोळे यांचं आरोग्य चांगलं राखण्यासाठी नियमितपणे बदामाचं सेवन करावं. ० शारीरिक व मानसिक स्वास्थ्यासाठी, बाळंतिणीचं दूध वाढविण्यासाठी, तिच्या शरीराची झीज भरून तसंच वातप्रकोप कमी करण्यासाठी बदाम,काजू, िडक, खोबरं, मनुका, चारोळी, पिस्ता, खारीक यांचे गूळ घालून लाडू बनवावेत. रोज नियमित एक लाडू खाल्ल्याने खूप फायदा
होतो.
सावधानता
सहसा बदाम बी ही कवचाच्या आत असल्यामुळे सुरक्षित आहे. फक्त बदाम खाताना अति प्रमाणात खावू नये. ते सारक गुणधर्माचे असल्यामुळे अति खाल्ल्यास जुलाब होण्याची शक्यता असते.
-- डॉ. शारदा महांडुळे, sharda.mahandule@gmail.com
आरोग्यदूत या WhatsApp Group वरुन साभार
October 21, 2016
सोशल मिडियावरचा नविन काळे यांचा हा ललित लेख शेअर करत आहे
June 8, 2017

सुप्रसिध्द नट, चरित्र अभिनेते आणि सिने दिग्दर्शक गजानन जागीरदार याचे मूळ आडनाव जहागिरदार असे होते. कॉलेजात शिकत असतांना समाजवादी विचारांनी त्यांना प्रभावित केले. त्यामुळे सरंजामशाहीचे द्योतक असलेले जहागिरदार हे आडनाव सोडून, त्यांनी आपल्या मूळ गावाच्या नावाला कर जोडून काथर्देकर हे आडनाव धारण केले. परंतू हे आडनाव अुच्चारण्यास आणि लिहीण्यास कठीण असल्यामुळे बरेच घोटाळे होअू लागले. काही व्यक्तींना तर ते अुच्चारणेच जमेना. शेवटी त्यांनी जागीरदार हे आडनाव स्वीकारले. कारण जहागीर हा शब्द मूळ फारशी जागीर या शब्दाचा अपभ्रंश आहे. जागीरीमुळे, जहागिरीची बाधाही टळली आणि काथर्देकरामुळे होणारी जिभेची सर्कसही टळली. पुढे जागीरदार हेच त्यांचे आडनाव कायमचे रूढ झाले.
February 26, 2018
पंढरीचे भूत मोठे , आल्या गेल्या झडपी लागे असं हे विठ्ठलनामाचं भूत, एकदा का मागे लागलं की त्यापासून सुटका नाही. अनेक संतांना या भुताने पछाडलं, त्यातलेच एक संत तुकाराम महाराज. त्यांची पत्नी आवली आणि लखूबाई म्हणजे रुख्मिणी या दोघींवरचं नाटक, सं.देवबाभळी.
June 12, 2023
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा भारत भेटीदरम्यान काय भूमिका घेतील याबद्दल सर्वांनाच कुतुहल होते. या दौर्यात ओबामा यांनी भारताभिमुख भूमिका घेतली तसेच संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा समितीतील भारताच्या कायम सदस्यत्वाला पाठिंबा देऊन त्यांनी खूष केले; परंतु जाता-जाता भारताने इराणच्या अणुकार्यक्रमाला तसेच म्यानमारमधील मानवी हक्कांच्या पायमल्लीला विरोध करावा असे सुचवून स्वत:चे हित साधले.
November 10, 2010
खरे तर आमच्या मो. ह. विद्यालयाची तुम्ही शान होता. अहो सगळेच शिक्षकाची नोकरी करतात आणि नोकरी करता करता फालतू राजकारणात गुंतून रहातात तसे तुम्ही केले नाहीत हे महत्वाचे तुम्ही शिक्षक होतात ‘ शिक्षक राजकारणी ‘ नव्हता हे महत्वाचे. कारण शिक्षक म्हटले की त्या छोट्या का होईना विश्वात राजकारण नावाची कीड घुसतेच , आता सगळीकडे घुसते , काळच बदलला आहे .
July 14, 2020
Copyright © 2025 | Marathisrushti