वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
महाराष्ट्र राज्याला विशेषतः कोकणामध्ये खारे, गोडे आणि निमखारे पाणी असे तिन्ही प्रकारचे नैसर्गिक जलस्रोत उपलब्ध आहेत. या उपलब्ध असलेल्या नैसर्गिक जलस्रोतांच्या सुयोग्य नियोजनाद्वारे मत्स्य उत्पादन वाढवून नीलक्रांती घडविणे ही काळाजी गरज आहे. देशाच्या आर्थिक व सामाजिक विकासात मत्स्य व्यवसायाचा महत्त्वाचा वाटा आहे. कोकणामध्ये सागरी मासेमारी व्यवसायामुळे आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या वर्गातील लोकांकरिता स्वस्त व पोषक अन्न उपलब्ध होते. त्याचबरोबर रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होतात. या अनुषंगाने या लेखामध्ये कोकणातील सागरी मासेमारी या विषयी आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया.
April 14, 2023
जीवन हा संघर्ष आहे. शारीरिक असो वा मानसिक असो, संघर्षाबरोबर वेदना आल्याच. वेदना नको म्हणून संघर्ष नको असे म्हटले तर जगण्यातले वैविध्य, नाविन्य संपेल. जीवन नीरस, बेचव होईल. वेदनेचा सामना समजून उमजून करण्यातच आपले भले आहे.
April 11, 2022
लेखाची ओळख :: झाडांच्या बियांत, सर्व पोषणमूल्ये असलेली तेले आणि अितर घटक का असतात? तसेच, बाळंत झाल्यानंतर आअीच्या स्तनांत, सर्व पोषणमूल्ये असलेलं दूध का निर्माण होत? हे सांगणारा लेख.
December 26, 2016
माणूस आणि जीवसृष्टीतील इतर प्राणीमात्र यात एकच मोठा फरक आहे तो म्हणजे माणसात जिज्ञासा अथवा कुतुहल असते इतर प्राणीमात्रात ती नाही. या जिज्ञासेपोटी माणूस विचार करीत गेला आणि त्याचा मेंदू अधिक तल्लख झाला. माणूस केवळ स्वतः चा विचार करीत नाही तर इतरांचा, जीवसृष्टीचा व त्यापलीकडचाही विचार करतो. या मानवी जिज्ञासेतूनच माध्यमांचा जन्म झाला. ‘माध्यम’ हा शब्द मुळात ‘मिडियम’ या असिरिअन शब्दापासून तयार झालेला आहे.
October 29, 2023
डिझेलचे तांत्रिक नाव ‘हाय स्पीड डिझेल’ (एच.एस.डी.) असे आहे व ते रुडॉल्फ डिझेल या जर्मन संशोधकाच्या नावावरून आले आहे. वेगवान वाहनासाठी वापरले जात असल्यामुळे ‘हाय स्पीड’ हे नाव पडले. त्यामुळेच मोटार पंपासारख्या शेतकी कामासाठी वापरल्या जाणाऱ्या साधनाच्या तुलनात्मक कमी गतीच्या इंजिनात वेगळ्या डिझेल तेलाचा वापर होतो व त्याला लाइट डिझेल ऑइल (एल.डी.ऑ.) असे संबोधतात.
February 27, 2023
आज दिनांक १६ ऑक्टोबर. आज संपूर्ण जगात ” वैश्विक अन्न दिन ” साजरा केला जातो. आजच्या दिवसाला एक गोष्ट आपण ठरवूया की १) अन्न वाया घालवायचं नाही. २) जेवढं अन्नदान शक्य आहे तेवढं नक्कीच करु. लक्षात घ्या की, अन्नदान हे सर्व दानांमध्ये श्रेष्ठ आहे.
October 16, 2020
काँग्रेस पक्षाचे युवा नेते राहुल गांधी हे नुकतेच महाराष्ट्राच्या धावत्या दौर्यावर येवून गेलेत.
September 11, 2010
घनदाट काळ्या केसांसाठी
केसांच्या मुळांना मिळणारे पोषण हेच काळ्या, दाट आणि लांबसडक केसांचे रहस्य आहे. योग्य आयुर्वेदिक उपायांनी केस केवळ काळेच होतात असे नव्हे, तर त्या केसांवर एक नैसर्गिक चमकही दिसून येते. केस काळे करण्यासाठी आयुर्वेदात अनेक उपाय सांगण्यात आले आहेत. कलर, डाय किंवा शाम्पूने केसांना पोषण मिळत नाही. आयुर्वेदिक जडी-बुटींनी केस धुतल्याने तसेच आयुर्वेदिक तेल लावल्याने पोषण मिळते. आयुर्वेदिक उपायांनी केस केवळ काळेच होतात असे नव्हे, तर त्या केसांवर एक नैसर्गिक चमकही दिसून येते. त्याचबरोबर केस गळणेही बंद होते.
काही आयुर्वेदिक उपाय काळ्या केसांसाठी.
आवळा पावडर आवळ्याची पावडर काळ्या रंगाच्या लोखंडाच्या भांड्यात एक दिवस ठेवा. दुसर्या् दिवशी सकाळी त्यात थोडे पाणी मिसळून पेस्ट तयार करा. ही पेस्ट संपूर्ण आठवडाभर पाणी मिसळून लोखंडाच्या भांड्यात ठेवा. आठवड्याभरात या पेस्टचा रंगही काळा होईल. पूर्ण काळी झाल्यानंतर ही पेस्ट डायप्रमाणे केसांना लावावी. दोन ते तीन वेळा वेगवेगळ्या दिवशी हा प्रयोग करून पाहा. केस नैसर्गिकरीत्या काळे होऊ लागतील आणि त्यांची चमकही वाढेल.
शिकेकाई शिकेकाई आणि सुका आवळा चांगला ठेचावा. दोन्ही तुकडे पाण्यात रात्रभर ठेवून सकाळी कापडाने हे पाणी गाळताना या कापडाने ते दाबून एकत्र करावे. या पेस्टने केसांना मालीश करावी. मालीशनंतर अर्ध्या तासाने अंघोळ करावी. केस वाळल्यानंतर खोबरेल तेल लावावे. असे केल्यास केस काळे, दाट, लांबसडक आणि चमकदार होतात. विशेष म्हणजे, शिकेकाई आणि आवळा वापरल्यास केस कधी पांढरे होत नाहीत आणि ज्यांचे पांढरे झालेत ते काळे होतात.
खोबरेल तेल, जैतुन तेल आणि लिंबू खोबरेल तेल आणि जैतुन तेल (ऑलिव्ह ऑईल) समप्रमाणात मिसळून त्यात लिंबाच्या रसाचे काही थेंब टाका. या मिश्रणाने केसांना मालीश करा. मालीशनंतर डोके गरम टॉवेलने तीन मिनिटे झाकून ठेवा. असे केल्यास केस गळणे थांबते आणि केस काळेही होतात.
मेथी पावडर मेथीच्या बियांमध्ये केसांना पोषक अशी सर्व तत्त्वे असतात. मेथीच्या दाण्यामध्ये फॉस्फेट, लेसिथिन, न्यूक्लिओ-अल्ब्युमिन आणि कॉड लिव्हर ऑईलबरोबरच फॉलिक अॅासिड, मॅग्नेशियम, सोडियम, जस्त, तांबे, नियासिन, थियामिन, कॅरोटिन अशी पोषकद्रव्ये असतात. ही पोषकद्रव्ये केसांच्या मुळांना मजबूत करतात. मेथीच्या दाण्यांचे ग्राईंडरमध्ये चूर्ण करून पाण्यात कालवून त्याची पेस्ट तयार करा. यामुळे केस काळे, दाट आणि लांबसडक होतीलच; शिवाय कोंड्याची समस्याही नाहीशी होईल.
अमरवेल सुमारे 250 ग्रॅम अमरवेल तीन लिटर पाण्यात उकळा. जेव्हा पाणी अर्धे उरेल आणि अमरवेल पाण्यात पूर्णपणे विरघळेल तेव्हा पातेले उतरवा. सकाळच्या वेळी या पाण्याने केस धुवा. यामुळे केस काळे, घनदाट आणि लांबसडक होतात.
त्रिफळा त्रिफळा चूर्णात निम्म्या प्रमाणात लोह भस्म मिसळा. हे मिश्रण सकाळ-संध्याकाळ सेवन केल्यास केस गळणे थांबते आणि केसांना नैसर्गिक रंग प्राप्त होतो.
कलौंजी( कांद्याचे बी.) एक लिटर पाण्यात पन्नास ग्रॅम कलौंजी उकळा. हे उकळलेले पाणी थंड करून त्याने केस धुवा. एक महिन्यात केस काळे आणि लांबसडक होतील.
कडुलिंब कडुलिंबाची पाने पाण्यात मिसळून ठेचून पेस्ट तयार करा. ही पेस्ट डोक्याला लावा. दोन ते तीन तासांनी केस धुवा. यामुळे केस गळणे कमी होऊन ते लांबसडक आणि काळेही होतील.
मेंदी आणि आवळा कोरडी मेंदी आणि कोरडा आवळा समप्रमाणात घेऊन सायंकाळी पाण्यात भिजत घाला. रात्रभर भिजविल्यानंतर सकाळी या पाण्याने केस धुवा. असे वारंवार केल्याने केस काळे, मुलायम आणि लांबसडक होतात.
रिठा एक ग्रॅम कापूर, १०० ग्रॅम नागरमोथा आणि रिठ्याच्या फळाचा गर, पावशेर शिकेकाई आणि200 ग्रॅम आवळा हे मिश्रण एकत्र करून दळा. अर्धा ग्लास पाण्यात हे मिश्रण टाकून लेप तयार करा. हा लेप केसांना लावून केस सुकेपर्यंत वाट पाहा. त्यानंतर कोमट पाण्याने केस धुवा. यामुळे केस काळे, घनदाट आणि लांबसडक होतील. तसेच ते सिल्की आणि चमकदार होतील.
शंखपुष्पी शंखपुष्पीपासून तयार केलेले तेल दररोज केसांना लावले तर पांढरे केसही काळे होतात.
भांगरा डोक्यावरील काही भागात केस नसतील, तर भांगराच्या पानांचा रस काढून त्या भागात लावावा. काही दिवसांनी तेथे काळे केस उगवू शकतात. ज्यांचे केस वारंवार गळतात अशा व्यक्तींनी हा उपाय जरूर वापरून पाहिला पाहिजे. त्रिफळा चूर्णाला भांगराच्या रसात उकळून नंतर ते व्यवस्थित वाळवावे. नंतर हे मिश्रण दळून ठेवा. हे मिश्रण दररोज सकाळी केवळ दोन ग्रॅम सेवन करा. यामुळे केस पांढरे होणे थांबते.
काळे तीळ काळ्या तिळाचे तेल केसांना लावल्याने केस पांढरे होत नाहीत. दररोज तिळाच्या तेलाने मालीश केल्यामुळे केस नेहमी मुलायम, काळे आणि लांबसडक राहतात.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०७१३३
संदर्भ.डॉ. भारत लुणावत.
November 18, 2016
गणपतीला ‘नवीन आरंभाची देवता’ म्हणून ओळखले जाते आणि हे आपल्याला आठवण करून देते की कोणत्याही प्रवासाचा सर्वात महत्वाचा भाग प्रथम सुरू करणे आहे. म्हणूनच लोक सहसा ‘श्री गणेशा करूया’ असे म्हणतात ज्याचा अर्थ ‘चला सुरू करा’ असा होतो. इथेच आम्ही आमचा पहिला धडा शिकतो की जेव्हा पैसे कमवायचे असतात तेव्हा तुम्ही तुमचे पैसे गुंतवण्याचे पहिले पाऊल उचलले पाहिजे
November 26, 2022
ठाणे इथल्या सरस्वती स्कूल मराठी माध्यम पूर्व प्राथमिक विभागात मुलांना भरपूर मोकळीक दिली जाते. मूल आपल्या परिसराचं आकलन स्वतः करून घेतं, आपण त्यांना योग्य मुक्त अवकाश दिला पाहिजे, या सहजशिक्षण प्रक्रियेबद्दल शाळेत शिक्षक आणि घरी पालक आता सजग झाले आहेत. यासाठी गेले तीन वर्षे त्या विभागाच्या मुख्याध्यापिका रती भोसेकर आणि शिक्षक कार्यरत आहेत, तेव्हापासूनच पालकांचे ऑनलाइन वर्कशॉप सुरू आहेत.
July 14, 2026
Copyright © 2025 | Marathisrushti