(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • अंध महिला पुनर्वसन समिती, अलिबाग

    दृष्टी ही आपल्याला मिळालेली आतापर्यंतची सर्वात सुंदर व मौल्यवान भेट आहे. ज्या निसर्गात आपण लहानाचे-मोठे होतो त्या निसर्गाचे गहिरे रंग व विविध छटा, आपल्या आवडत्या व्यक्तींचे चेहरे व त्या चेहर्‍यांवरचं फुललेलं हास्य, दवात भिजलेली पहाट, मावळताना आजूबाजूच्या मखमली आभाळावर केशरी रंग सांडून गेलेला सूर्य, गाणारे पक्षी, रात्रीच्या गडद साम्राज्यात अवतरलेली अतिशय धीट अशी चंद्राची कोर, बेभान झालेला पाऊस, खवळलेला समुद्र, हिरव्यागार डोंगरांधून वाहणारे मोतीदार झरे, व या निसर्गसृष्टीला हिरवा श्वास देणारी झाडे या सर्व गोष्टीचं हृदयात चिरंतन जतन करण्यासाठी व आयुष्यात असे अनुभवलेले बहारदार क्षण व आठवणी अजरामर करून टाकण्यासाठी दृष्टीची नितांत गरज असते.

      July 5, 2011


  • हृदयरोग व आहार

    हृदयाचा ठोका चुकला किंवा हृदयाची धडधड वाढली हे वाक्प्राचार आपल्या भावना व्यक्त करीत असतात. हा हृदयाचा लयबध्द ठेका जर चुकायला लागला, ताल बिघडला, तर आयुष्यात बरीच गडबड सुरु होते. प्राणवायूयूक्त रक्त संपूर्ण शरीराला पुरविण्याचे काम हृदयाचे असते. रक्तवाहिन्या रक्त वाहून नेतात . हृदयातील व निलांमधील झडपा सतत उघडझाप करीत असतात व त्यामुळे हे कार्य व्यवस्थित सुरु राहते. हृदयाचा आकार हा साधारणपणे प्रत्येकाच्या मुठीएवढा असतो. एवढेसे हृदय, पण काय कमालीचे काम करते ! अशा ह्या अवयवाची काळजी घेणे ही आपली जबाबदारी आहे. ह्या जबाबदारीची जाणीव लहानपणापासून असावी आणि त्यासाठी विशेष प्रयत्न असावेत.

    हृदयावर जेवढी गाणी किंवा कविता होतात,तेवढ्या इतर कुठल्याही अवयवावर होत नाहीत. कारण हृदय व डोळे हे दोन अवयव भावना व्यक्त करण्याचे उत्तम साधन आहेत. अविरतपणे म्हणजे जन्मापासून मृत्यूपर्यंत x काम करणारे हृदय, हे अत्यंत लयबद्ध काम करीत असते. या लयबद्धतेला वैद्यकशास्त्रात सुद्धा अतिशय महत्व आहे. हृदयाचा ठोका चुकला किंवा हृदयाची धडधड वाढली हे वाक्‍प्रचार आपल्या भावना व्यक्त करीत असतात. हा हृदयाचा लयबध्द ठेका जर चुकायला लागला, ताल बिघडला, तर आयुष्यात बरीच गडबड सुरु होते. प्राणवायूयूक्त रक्त संपूर्ण शरीराला पुरविण्याचे काम हृदयाचे असते. रक्तवाहिन्या रक्त वाहून नेतात . हृदयातील व निलांमधील झडपा सतत उघडझाप करीत असतात व त्यामुळे हे कार्य व्यवस्थित सुरु राहते. हृदयाचा आकार हा साधारणपणे प्रत्येकाच्या मुठीएवढा असतो. एवढेसे हृदय, पण काय कमालीचे काम करते ! अशा ह्या अवयवाची काळजी घेणे ही आपली जबाबदारी आहे. ह्या जबाबदारीची जाणीव लहानपणापासून असावी आणि त्यासाठी विशेष प्रयत्न असावेत.

    जंकफूड, बेकरी पदार्थ, रस्त्यावरील तळलेले पदार्थ, परत परत तेच तेल टाळण्यासाठी वापरणे, क्रीम, मांसाहार, आईस्क्रीम सारखे पदार्थ, सिगारेट, मद्यपान इत्यादी गोष्टी आपल्या तब्बेतीस घातक असतात, हे आपणास माहित आहे. पण तब्ब्येत म्हणजे हे सर्व पदार्थ आपल्या हृदयावर प्रत्यक्षपणे परिणाम करीत असतात. असे पदार्थ सतत खाल्ल्यावर रोगांची मालिकाच सुरु होते. प्रथम वजन वाढायला लागते. नंतर उच्च रक्तदाब, हृदयविकार, मधुमेह, इत्यादी रोगांची मालिका तरुण वयातच सुरु होते. आजकालचे बैठे काम, शरीराच्या कमी झालेल्या हालचाली, व्यायाम न करणे, कामाचा ताणतणाव, ह्या सगळ्याची भरच पडते. आजकाल अनेक कंपन्यांमध्ये दर वर्षी वैद्यकीय चाचण्या घेतल्या जातात. त्यामुळे खरेतर लोकांना वेळीच आपल्या चुका कळू शकतात. पण तरी वेळ नाही म्हणून दुर्लक्ष केले जाते. खास करून बॉर्डर वर असलेली साखर बॉर्डरलाईन लिपीड प्रोफाईलचे अहवाल ही एक धोक्यालची घंटा असते. यावेळी खरेतर तातडीने डॉक्टईर आणि आहारतज्ञ गाठणे गरजेचे असते. तसे न करता, काही दिवस आपण वाचलेले, ऐकलेले, प्रयोग करतो आणि तरी जिना चढायला लागल्यावर धाप लागते. दिवस संपता संपता थकवा जाणवतो आणि मग आम्ही डॉक्ट,र गाठतो.

    हृदयविकाराची कारणे अनेक असतात,पण आहारातील चुकांमुळे जो प्रश्न उद्भवतो, तो म्हणजे रक्तवाहिन्या अरुंद होणे. अरुंद रक्तवाहिन्या पूर्ण क्षमतेने रक्तपुरवठा करू शकत नाहीत. आणि ही रक्तवाहिनी जर हृदयालाच रक्तपुरवठा करणारी असेल, तर रक्ताचा पुरवठा न झाल्यामुळे जी अवस्था होते, त्याला ऍथेरोस्केलेसीस म्हणतात. कोलेस्टेरॉल, कमी व जास्त घनतेची लायपोप्रोटीन्स, संतृप्त व असंत्रुप्त मेद, ह्या सगळ्या बद्दल आपण मागे एका लेखात माहिती घेतली आहे. त्यामुळे आता प्रत्यक्ष हृदयरोगात आहार कसा असावा, हे पाहूया .

    हृदयरोगाचा आहार, हा कमी उष्मांक , कमी कर्बोदके, सर्वसाधारण प्रथिने, कमी स्निग्ध पदार्थ, त्यातही कमी कोलेस्टेरॉल व बहुअसंपृक्त मेदाम्ले असलेले व सर्वसाधारण जीवनसत्वे व खनिजांचा असावा. आहारात तंतुमय पदार्थ असावेत.

    कर्बोदके एकूणच उष्मांकाचे प्रमाण कमी करावे लागते. त्यामुळे कर्बोदके सुद्धा आहारात कमीच असावीत. जर रोग्याला मधुमेह व लट्ठपणा असेल तर कर्बोदाकांवर विशेष लक्ष द्यावे लागते. बटाटा, ब्रेड, साखर, साबुदाणा, असे पदार्थ कटाक्षाने टाळावेत. साखरेच्या ऐवजी गुळ खाण्याचा सल्ला चुकीचा ठरू शकतो कारण त्यात उष्मांक एकसारखेच असतात. गहू, ज्वारी, बाजरी, नाचणी, उत्तम, थोडा तांदूळही गरजेचाच आहे. शक्यरतो सकाळी घ्यावा.

    प्रथिने प्रत्येकाच्या गरजेनुसार प्रत्येक किलो वजनामागे एक ग्रॅम प्रथिने आवश्याक आहेत. किलो वजन असल्यास ग्रॅम प्रथिने आहारात असावीत. डाळी, कडधान्ये, गाईचे दुध, अंड्याचा पांढरा भाग, मासे, कमी उष्मांक असलेले पनीर इत्यादी मधून प्रथिने चालतील. पण मटन, पोर्क, इत्यादी नसलेलेच चांगले .
    स्निग्ध पदार्थ हृदयरोग असणाऱ्या साठी स्निग्ध पदार्थ हा खूपच चर्चेचा विषय असतो. आपल्या शरीरात कोलेस्टेरॉल तयार होत असते. त्यामुळे आहारातून शरीरात जाणाऱ्या कोलेस्टेरॉल बद्दल प्रत्येकाने जागरूक असणे आवश्यअक आहे. लोणी, चीज, क्रीम, अंड्याचा पिवळा भाग, मांसाहारातील रेड मिटच्या किडनी, लिव्हर इत्यादी भागात कोलेस्टेरॉल जास्त असते म्हणून हे पदार्थ टाळावेत. आपण ज्याला बॅड कोलेस्टेरॉल म्हणतो, ते कमी घनतेचे लायपोप्रोटीन्स असतात आणि हेच आपल्या रक्तवाहिन्या अरुंद करतात . त्यामुळे वरील पदार्थ टाळणेच उत्तम. रोजच्या आहारात आपण मुख्यत्वे तेल व तुपाचा वापर करतो. तेलाच्या अनेक जाहिराती आपल्याला संभ्रमात पाडणाऱ्या असतात. काही जाहिराती झिरो कोलेस्टेरॉल तेलाच्या असतात, तर काही तेले फिल्टर किंवा रिफाईंड असतात. ह्यावर उत्तम उपाय म्हणजे आलटून पालटून वेगवेगळ्या कंपन्यांचे व वेगवेगळ्या प्रकारच्या तेलांचा वापर करावा. घाण्याचे तेल पण उत्तम असते. तेलबियांपासून काढलेल्या घाण्यावरच्या तेलात स्निग्ध पदार्थात विरघळणारी जीवनसत्वे सुद्धा असतात. इतर तेलांमध्ये त्यांना फोर्टीफाय केलेले असते. ओलिव्ह मोहोरी, करडई तेले उत्तमच आहेत, ह्या सगळ्यापेक्षा महत्वाची बाब म्हणजे प्रत्येक माणसाला एक महिन्याला एक लिटर तेल पुरेसे आहे. वनस्पती तूप व ते वापरून केलेले पदार्थ टाळलेलेच बरे. साजूक तूप शरीरास उत्तम आहे. प्रत्येकाने रोज चमचे ( टी स्पुन्स पूर्ण भरून ) तूप खावे.

    तंतुमय पदार्थ भाज्या व फळे तसेच कडधान्य व तृणधान्याचे बाहेरील आवरण तंतुमय असते. काकडी, मुळा, गाजर, सफरचंद, यांचे साल न काढता स्वच्छ धुवावे व सालीसकट खावे. पालेभाज्यांची कोवळी देठे पूर्ण वापरावीत. शेंगभाज्यांच्या शिरा न काढता त्या चिराव्यात म्हणजे भरपूर तंतू आपल्या पोटात जातात. हे तंतू बॅड कोलेस्टेरॉल कमी करतात व रक्तवाहिन्या स्वच्छ ठेवण्याचे काम करतात.

    जीवनसत्वे व खनिजे एखादी मोठी इमारत छोट्या विटा, त्याहून छोटे कण असलेली वाळू, व सिमेंट यांची बनलेली असते. त्याप्रमाणेच जीवनसत्वे व खनिजे यांचे प्रमाण अत्यल्प असले तरीही ते अत्यंत मोठी कामे करीत असतात. फळे, भाज्या दुध, अंडी, सुका मेवा, यामधून शरीराला याचा पुरवठा होत असतो. पण हृदयरोग्यांनी फळे व भाज्यांच्या माध्यमातूनच ह्याचे ग्रहण करावे.

    ह्या सगळ्या सोबत तज्ञ व्यायाम तज्ञाकडून व्यायाम शिकणे, किंवा योगासने, प्राणायाम करणे अत्यंत गरजेचे आहे. आपल्या हृदयाची धडधड अनेक वर्ष लयबद्ध होत राहावी असे वाटत असल्यास नियमित व्यायाम, उत्तम आहार व नियमित वैद्यकीय तपासणी अत्यंत आवश्यवक आहे .

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.आश्ले षा भागवत, आहारतज्ज्ञ

      January 7, 2017


  • व्रेडफोर्टचं विवर

    व्रेडफोर्टचं विवर हे पृथ्वीवरच्या ज्ञात विवरांपैकी सर्वांत मोठ्या आकाराचं विवर आहे. तसंच ते अतिप्राचीन विवरांपैकी एक आहे. काळानुसार ते पृथ्वीवरचं दुसऱ्या क्रमांकाचं प्राचीन विवर ठरलं आहे. हे विवर सुमारे दोन अब्ज वर्षांपूर्वी निर्माण झाल्याचं भूशास्त्रीय संशोधनावरून दिसून येतं. हे विवर इतकं जुनं आहे की, या दीर्घ काळात त्याच्या कडा पूर्णपणे धुपून गेल्या आहेत. त्यामुळे त्या आता अस्तित्वात नाहीत. आता मागे राहिला आहे तो अशनीच्या आघातामुळे विवराच्या मध्यभागी निर्माण झालेला उंचवटा. हा उंचवटा म्हणजेच व्रेडफोर्टच्या परिसरातले डोंगर! या विवराचा व्यास सुमारे १७२ किलोमीटर इतका असल्याचा जो निष्कर्ष काढला गेला होता, तो भूशास्त्रीय पुराव्यावर आधारलेला आहे. तिथल्या जमिनीत सापडलेल्या विविध खनिजांवरून, खडकांच्या स्वरूपावरून हा अंदाज व्यक्त केला गेला आहे.

    व्रेडफोर्टचा परिसर म्हणजे एक विवर असल्याचं स्पष्ट झाल्यानंतरच्या काळात, त्या परिसरातील, चुंबकत्व, गुरुत्वाकर्षण, भूशास्त्र, इत्यादींबद्दलची नवी माहिती उपलब्ध होत गेली. या नव्या माहितीवरून या विवराच्या कडा पूर्वी कशा आणि कुठपर्यंत पसरल्या असाव्यात, याची अधिक अचूक गणितं मांडली गेली. त्यानुसार हे विवर म्हणजे पूर्वी एकाभोवती एक असणाऱ्या अनेक कडांनी मिळून तयार झालेली गुंतागुतीची रचना असल्याचं दिसून आलं. या रचनेवरून या विवराचा पसारा सुमारे अडीचशे ते पावणेतीनशे किलोमीटरच्या दरम्यान असल्याचं स्पष्ट झालं. जर हे विवर इतकं मोठं असलं, तर हे विवर निर्माण करणारा अशनीही अतिप्रचंड आकाराचा असायला हवा. अमेरिकेतील रोचेस्टर विद्यापीठातील नॅटली अ‍ॅलन आणि त्यांच्या इतर सहकाऱ्यांनी आता या अशनीचा आकार शोधून काढला आहे. नॅटली अ‍ॅलन आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं हे संशोधन अलीकडेच ‘जर्नल ऑफ जिओफिजिकल रिसर्च’ या शोधपत्रिकेत प्रसिद्ध झालं आहे.

    नॅटली अ‍ॅलन आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं हे संशोधन गणिती प्रारूपावर आधारलेले आहे. या प्रारूपात त्यांनी या विवराशी संबंधित विविध प्रकारच्या उपलब्ध माहितीचा वापर केला. आघात झाल्यानंतर निर्माण होणाऱ्या विवराचं स्वरूप हे अशनीच्या वेगावर, त्याच्या आदळण्याच्या कोनावर, त्याच्या आकारावर, त्याच्या भूशास्त्रीय घडणीवर तर अवलंबून असतंच; परंतु त्याचबरोबर जिथे हा आघात झाला, तिथल्या जमिनीच्या भूशास्त्रीय घडणीवरही ते अवलंबून असतं. आतापर्यंत झालेल्या सर्व संशोधनाचा तपशीलवार आढावा घेऊन, या संशोधकांनी ही सर्व भूशास्त्रीय माहिती जमा केली. यात इथे सापडलेल्या खडकांचे प्रकार, त्यातली खनिजं, इत्यादींचा समावेश होता. या ठिकाणच्या जमिनीत असलेल्या क्वार्टझाइट, ग्रॅनाइट, डुनाइट, कॅल्साइट, अशा वेगवेगळ्या खडकांंच्या थरांच्या जाडीचाही या संशोधकांनी आपल्या संशोधनात वापर केला. जेव्हा एखाद्या अशनीची रासायनिक घडण माहीत नसते, तेव्हा तो अशनी ग्रॅनाइटच्या खडकापासून बनलेला असल्याचं गृहीत धरलं जातं. त्यानुसार हा आघातक ग्रॅनाइटपासून बनला असल्याचं, या प्रारूपात गृहीत धरलं गेलं व ग्रॅनाइटची घनता या प्रारूपातील गणितासाठी वापरली गेली.

    या सर्व माहितीचा वापर करून नॅटली अ‍ॅलन आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी, या प्रारूपाद्वारे कोणत्या आकाराचा अशनी, कोणत्या वेगानं या ठिकाणी आदळल्यास अडीचशे किलोमीटरहून अधिक व्यासाचं विवर तयार होईल हे शोधून काढलं. नॅटली अ‍ॅलन आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी काढलेल्या निष्कर्षांनुसार, अडीचशे किलोमीटरहून अधिक व्यासाचं विवर निर्माण करणाऱ्या या अशनीचा व्यास हा १५ किलोमीटर नव्हे, तर सुमारे २५ किलोमीटर इतका प्रचंड असावा. हा अशनी पृथ्वीवर सेकंदाला सुमारे १५ किलोमीटर वेगानं आदळला असावा. या अशनीमुळे झालेला आघात हा पूर्वीच्या गणितांनुसार केल्या गेलेल्या आघातापेक्षा साडेतीनपटींहून अधिक तीव्र असण्याची शक्यता दिसून आली.

    केंद्रापासून विविध अंतरावरील जमिनीत निर्माण झालेल्या दाबाचं गणितही या संशोधकांनी या प्रारूपाद्वारे केलं आहे. या आघातामुळे निर्माण झालेला, आघाताच्या जवळच्या जमिनीच्या आतला दाब हा वातावरणाच्या दाबाच्या तुलनेत दहा लाख पटींइतका प्रचंड असावा. एखादं खनिज निर्माण होण्यासाठी उच्च तापमानाबरोबरच ठरावीक दाब निर्माण व्हावा लागतो. त्यामुळे आघाताच्या जागेपासून विविध अंतरावर विशिष्ट प्रकारची खनिजं सापडतात. या प्रारूपावरून काढल्या गेलेल्या विविध अंतरावरील जमिनीतील दाब हा, त्या अंतरावर प्रत्यक्ष सापडलेल्या खनिजांच्या निर्मितीला आवश्यक असणाऱ्या दाबाशी जुळणारा आहे. आघातादरम्यान निर्माण झालेल्या या प्रचंड दाबामुळे इथल्या जमिनीचा पृष्ठभाग वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रमाणात, कमी-जास्त उचलला जाऊन, विवराच्या या गुंतागुंतीच्या रचनेची निर्मिती झाली असावी. या आघातामुळे इथे इतकी उष्णता निर्माण झाली की, जमिनीच्या सुमारे ५५ किलोमीटर खोलीपर्यंतच्या भागाला द्रवस्वरूप प्राप्त झालं. तसंच आघाताच्या जागेपासून सुमारे १३० किलोमीटरपर्यंतच्या पृष्ठभागावर वितळलेले खडक पसरले. द्रवरूप खडक निर्माण होण्यास तापमान किमान अडीच हजार अंश सेल्सिअस असावं लागतं.

    नॅटली अ‍ॅलन आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या या संशोधनातून आणखी एक नवी गोष्ट स्पष्ट झाली आहे. याचा सबंध रशियातील कारेलिआ इथे सापडलेल्या भूशास्त्रीय अवशेषांशी आहे. सन २०१४मधील एका संशोधनात रशियातील कारेलिआ येथे, काचेच्या गोट्यांसारखे दिसणारे काही मिलिमीटर आकाराचे गोलक सापडले. हे गोलक सुमारे दोन अब्ज वर्षांपूर्वी निर्माण झाल्याचं आढळून आलं. हे गोलक व्रेडफोर्ट इथल्या आघातादरम्यान दूरवर उडालेले पदार्थ असण्याची शक्यताही दिसून आली. नॅटली अ‍ॅलन आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या संशोधनानुसारही, व्रेडफोर्टवरच्या आघातामुळे तिथले काही पदार्थ सुमारे दोन-अडीच हजार किलोमीटर अंतरावर फेकले गेल्याचा अंदाज व्यक्त केला गेला आहे. कारेलिनाचं व्रेडफोर्टपासूनंच अंतर हे सुमारे दहा हजार किलोमीटर आहे. दोन अब्ज वर्षांपूर्वी सर्व खंड हे एकत्र असण्याची शक्यता लक्षात घेता, कारेलिनाचं व्रेडफोर्टपासूनचं तेव्हाचं अंतर खूपच कमी असलं पाहिजे. त्यामुळे नॅटली अ‍ॅलन आणि त्यांच्या सहकाऱ्यांना अपेक्षित असणारी जागा आणि आजची कारेलिना एकच असण्याची एक शक्यता व्यक्त केली गेली आहे.

    सुमारे साडेसहा कोटी वर्षांपूर्वी आजच्या मेक्सिकोजवळ असणाऱ्या चिक्षुलूब इथे आदळलेल्या अशनीनं पृथ्वीवरची ७५ टक्के जीवसृष्टी नष्ट केली. या महानाशात डायनोसॉर सर्वस्वी नष्ट झाले. हा अशनी सुमारे दहा किलोमीटर व्यासाचा होता. व्रेडफोर्ट इथे आदळलेला अशनी हा तर आकारानं, चिक्षुलूब इथे आदळलेल्या अशनीपेक्षा अडीचपट मोठा होता. या प्रचंड आकाराच्या अशनीमुळे झालेला नाशही तितकाच प्रचंड असायला हवा. परंतु या महानाशाचे पुरावे उपलब्ध नाहीत. कारण या काळात जीवसृष्टी अत्यंत प्राथमिक स्थितीत होती. या काळचे पृथ्वीवरचे सजीव जरी प्रकाशसंश्लेषण करू शकत असले तरी, वृक्षराजी अस्तित्वात आलेली नव्हती. त्यामुळे या आघातानंतर मोठ्या आगी लागण्याचा प्रश्नच नव्हता.

    आघाताच्या काळात जीवसृष्टी जरी प्राथमिक अवस्थेत असली तरी, या आघातामुळे त्याकाळीसुद्धा वातावरणात मोठे बदल झाले असावेत. तेव्हाही प्रचंड प्रमाणात धूळ उडून, सूर्यप्रकाश काही काळासाठी अडवला गेला असावा. परिणामी, तापमान घसरलं असावं आणि सजीवांच्या प्रकाशसंश्लेषणाच्या क्रियेतही अडथळा आला असावा. प्रकाशसंश्लेषण थांबल्यानं, प्रकाशसंश्लेषणावर अवलंबून असलेल्या सजीवांवर याचा मोठ्या प्रमाणावर प्रतिकूल परिणाम झाला असावा. या आघातानंतर तापमान खाली आलं असलं तरी, वातावरणात जमा झालेल्या कार्बनडाय ऑक्साइड या हरीतगृह वायूमुळे नंतरच्या काळात तापमानात वाढही झाली असावी. या अतिप्रचंड आघाताच्या वेळी उडालेली धूळ पूर्णपणे खाली बसायला किती काळ लागला हे सांगता येत नाही. हा काळ दहा वर्षांपर्यंतचा दीर्घ असू शकतो. ही धूळ खाली बसल्यानंतरही, पृथ्वीला या आघाताच्या परिणामातून पूर्णपणे सावरायला यापेक्षाही दीर्घ काळ लागला असणार, हे उघडच आहे!

    -छायाचित्र सौजन्य : Lauren Dauphin/NASA Earth Observatory/Landsat
    Pierre Thomas / Planet Terre
    tadpolefarm / Wikimedia

    चित्रवाणीः व्रेडफोर्टचं विवर

      November 26, 2022


  • करावे तरी काय?

    आपल्याकडे निष्क्रियता हा अपराध नाही, उलट त्याचे कौतुकच होते. एखाद्याने काही कल्पकता दाखवून वेगळे करण्याचा प्रयत्न केला तर मात्र तो अपराध ठरतो. सव्वाशे कोटींचा हा देश आहे.

      May 18, 2008


  • सखाराम बाईंडर या नाटकाचा पहिला प्रयोग

    नाटकाचा विषय असलेला बाइंडर वाईला राहायचा, खाणावळ चालवायचा. म्हणजे त्याने त्या वेळी ठेवलेली बाई ती खाणावळ चालवायची. तेंडुलकर या बाइंडराला भेटले होते. त्यांना तो चांगलाच लक्षात राहिला होता. तो तऱ्हेवाईक होता म्हणून नव्हे, तर तो ‘खरा’ होता, म्हणून.

      March 10, 2022


  • नो स्मोकिंग डे

    वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या (WHO) मते धूम्रपान आणि तंबाखूमुळे दरवर्षी 7 दशलक्ष लोकांचा मृत्यू होतो.

      March 9, 2022


  • हृदयरोगाचा अर्वाचीन इतिहास

    आधुनिक इतिहासात हृदय-विकार किंवा खरेतर हृदयाशी निगडीत रक्तवाहिन्यांशी सम्बन्धित आजार यावर प्रथम लक्ष वेधण्याचे निवेदनाचे श्रेय विल्यम हेबरडीन यांना जाते. बदलत्या जीवनशैलीमुळे बरेचसे विकार डोके वर काढतात असे दिसून येते. वाढते शहरीकरण तसेच औद्योगिकरण यामुळे आहाराच्या पद्धतीत बदल झाले, अंगमेहनतीची कामे बाजूस जाऊन बैठ्या जीवनशैलीचा शिरकाव झाला. त्यामुळे हृदयरोग, उच्च-रक्तदाब, मधुमेह यांसारखे रोग मोठ्या प्रमाणावर आढळून येऊ लागले

      March 11, 2018


  • देशापुढील ई-कचऱ्याची गंभीर समस्या

    देवनार डम्पिंग ग्राउंडवरील कचऱ्याला गुरुवारी पहाटे लागलेली आग सोमवारपर्यंत धुमसत होती. आगीने रौद्र रूप धारण करण्याची कदाचित बरीच करणे असतील. मुळात कचराच होऊ नये म्हणून बऱ्याच योजना आखण्यात आल्या आहेत पण देशातील नागरिक मनापासून त्यांच्या कृतीतून अंमलबजावणी करताना दिसत नाहीत त्यामुळे दिवसेंदिवस सगळ्याच प्रकारच्या कचार्यांची समस्या देशापुढे गंभीर रूप धारण करीत आहेत.

      February 12, 2016


  • करवा चौथ

    दर वर्षी कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्ष च्या चतुर्थीस करवा चौथ व्रत असते. परंपरेनुसार हिंदी भाषीय विवाहित महिला यादिवशी पहाटेच स्नान करून शिव शंकराला व सूर्याला जल अर्घ्य देवून सकाळ ते रात्री चंद्र दर्शनापर्यंत उपाशी राहून आपल्या पतीच्या लांब आयुष्यासाठी चंद्र देवतेस प्रार्थना करतात. भारतात मुख्यत्वे राजस्थान, उत्तरप्रदेश, गुजरात, हरियाना, हिमाचल प्रदेश, मध्यप्रदेश, पंजाब या राज्यांमध्ये हे पारंपारिक व्रत विवाहित महिला दरवर्षी करतात.

      October 26, 2017


  • दिशा बदलण्याची गरज

    प्रकाशन दिनांक :- 25/01/2004
    देशात सर्वत्र सध्या ‘फिल गुड’ चा बोलबाला आहे. एका मागोमाग एक घोषणांचा सपाटा लावीत सरकार प्रत्येकाला खूष करण्याच्या प्रयत्नात दिसते. तसेही निवडणुकीचे वर्ष असले की, सर्वसामान्य जनता खूष असतेच.

      January 25, 2004