वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
माझ्या परिचयातील दोन चित्रकार असे आहेत की, जणू दोन ध्रुवच! दोघांनीही कलेची उपासना ही संघर्षातूनच केलेली आहे. मात्र आज दोघांच्यातही मोठी तफावत आहे. त्यातील एक म्हणजे, राम. रामला लहानपणापासून चित्रकलेची आवड होती.
July 27, 2023
बँकांमधील सर्व कार्यपद्धतीचा अनुभव घेण्याचे भाग्य मला लाभले ते 1984 साली जेव्हा मला पंजाब नॅशनल बँकेत नोकरी मिळाली तेव्हा. त्याकाळी क्लार्क-कम-टायपिस्ट आणि क्लर्क-कम-कॅशियर अशी वेगवेगळी पदे भरली जायची. कॅशियरचे काम करतांना विशेष भत्ता दिला जातो. मी टायपिस्टचे काम करत असताना रोखपालाचे काम करण्याची वेळ फारशी आली नाही,
May 8, 2023
आज १५ सप्टेंबर…! आजच्या दिवशी १९५९ साली भारतात दुरदर्शन ची सेवा सुरु झाली. दुरदर्शनचे पहिले संचालक होते प्रत्येक मराठी माणसाचे लाडके व्यक्तिमत्व पु. ल. देशपांडे…! पु.लं.नीच “दुरदर्शन” हे नाव सुचवले आणि नंतर ते सर्वमान्य झाले….!
September 15, 2017
मधुमेह जडलेल्या व्यक्तीला निरामय जीवन जगायचे असेल तर मधुमेहींसाठी डॉक्टरांनी नेमून दिलेलाच आहार घेणे आणि त्या आहाराच्या बाबतीतली पथ्ये कसोशीने पाळणे हा एकमेव उपाय असतो. डॉक्टर मंडळी वारंवार ही पथ्ये आणि हा आहार सांगत असतात. ब्लड शुगरची पातळी योग्य राहील असाच हा आहार असतो. असे काही आहार.
मधुमेही व्यक्तीने स्टार्च म्हणजे पिष्टमय पदार्थ कमी असणार्या. भाज्या प्राधान्याने खाल्ल्या पाहिजेत. त्यात प्रामुख्याने पालक आणि मोड आलेली हिरवी कडधान्ये यांचा समावेश होतो. हे मोड आलेले कडधान्य आहारात मिसळून खाणे जास्त श्रेयस्कर असते.
स्ट्रॉबेरी हे फळ मधुमेहींसाठी सर्वात उत्तम मानावे लागेल. कारण त्यामध्ये तंतूमय पदार्थ जास्त असतात आणि पाण्याचे प्रमाण खूप असते. या फळात गोडी भरपूर असली तरी कॅलरीज्चे प्रमाण कमी असते आणि कर्बोदकेही मर्यादित असतात. तेव्हा ब्रेकफास्टच्या वेळी चार स्ट्रॉबेरीज् खाल्ल्या तरी लगेच काही शुगर वाढत नाही.
मधुमेही व्यक्ती चरबीचे प्रमाण कमी असणारे मांसाहरी पदार्थ खाऊ शकतात. उदा. मासे आणि चिकन. मांसाहार करताना मधुमेही व्यक्तीने प्राण्यांच्या शरीराचे विशेष भाग आवर्जून मागितले पाहिजेत.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
January 8, 2017
पुढचे दहा दिवस आनंदाचे, चैतन्याचे, मोठमोठ्याने आरती म्हणण्याचे, मोदक आणि खिरापतीवर ताव मारण्याचे ! आज सकाळी झाडावरून ओंजळीत काढलेली फुले घरात नेताना त्यांतील दोन फुले अचानक जमिनीवर सांडली. गेल्या दोन वर्षात अनेक जिवलग त्या फुलांसारखे हातातून निसटले. “उरलेल्या” फुलांनिशी हा सण साजरा करायचा आहे.
September 12, 2021

सन १९९४ मधली गोष्ट… ऑस्ट्रेलिआतल्या सिडनीपासून शंभर किलोमीटर अंतरावर असलेल्या, वोलेमाय राष्ट्रीय उद्यानातील डोंगरदऱ्यांतून काही जणांची भटकंती चालू होती. या भटकंतीदरम्यान, डेनिस नोबल यांना पाइनच्या प्रकारातलं एक अनोळखी सूचिपर्णी झाड आढळलं.
November 28, 2023
सकाळी-सकाळी ऑफिसला निघण्याच्या गडबडीत आपण रिकाम्या पोटी काहीही खाऊन बाहेर निघतो. मात्र तुमची ही सवय तुमच्या आरोग्यासाठी घातक ठरु शकते. असे काही पदार्थ आहेत जे कधीही सकाळी रिकाम्या पोटी खाऊ नयेत. सकाळी रिकाम्या पोटी कधीही हे ५ पदार्थ खाऊ नका
September 15, 2017
राजकारणाचे गुन्हेगारीकरण हे स्वतंत्र आणि निष्पक्ष निवडणुकांच्या मूळ स्वरुपाच्या विरोधात आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले राजकारणी निवडणूक प्रक्रियेला दूषित करतात. माननीय सर्वोच्च न्यायालयाने वेळोवेळी विविध सूचना दिल्या असूनही कोणताही राजकीय पक्ष त्याच्या वतीने गुन्हेगारी घटकांच्या उन्मुलनासाठी पाऊल उचलताना दिसत नाही.
March 31, 2021
शिक्षण म्हणजे केवळ माहिती गोळा करण्याबद्दल नाहीये .. खरं पाहता ते माणसाची जाणीव आणि आकलनशक्ती विकसित करण्याबद्दल आहे ..!!
August 20, 2019
विश्व कीटक भक्षी वनस्पतींचे हे शीर्षक वाचून बऱ्याच वाचकांचे डोळे विस्फारतील. त्यांचा विश्वासही बसणार नाही. परंतु वनस्पती जगतात अशाही वनस्पती आहेत. त्यांची ओळख आपण ह्या लेखात करून घेणार आहोत. महाराष्ट्रातही अशा वनस्पती सापडतात.
November 14, 2022
Copyright © 2025 | Marathisrushti