(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • भाजपा ‘फक्त’ ३७० वर प्रचार करतोय का??

    सध्याच्या निवडणूकीत भाजपावर एक आरोप सतत होत आहे की भाजपा ३७० विषयावर प्रचार करतोय. ३७० चा आणि महाराष्ट्राचा काय संबंध?? "तुम्ही केलेल्या कामावर बोला", "विकासाच्या मुद्यावर बोला", "तुम्ही पुन्हा निवडणून आल्यावर काय करणार यावर बोला" अशा अनेक गोष्टी विरोधक आणि काही पत्रकारांकडून उपस्थित होत आहेत.

    सर्वप्रथम एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की ३७० आणि महाराष्ट्राचा संबंध नाही ही बाब चुकीची आहे. काश्मिर मधून विस्थापित झालेले अनेक काश्मिरी पंडीत महाराष्ट्राचे नागरिक आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे ३७० हटवल्यानंतर काश्मिर मधे जमीन घेणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरू शकते, MTDC च्या माध्यमातून महाराष्ट्र सरकार काश्मिरमधे दोन Resort बांधायची योजना बनवत आहे. याचा फायदा काश्मिरी आणि मराठी युवकांना रोजगाराच्या दृष्टीने होऊ शकतो. तिसरी आणि सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे ३७० हे काँग्रेसने केलेल्या काही मोठ्या पापांपैकी एक आहे आणि ते हटवण्यासाठी जेव्हा मतदान केले तेव्हा ते देशातल्या प्रत्येक कोपऱ्यातल्या खासदारांनी मत दिले ज्यात महाराष्ट्रातील खासदार पण आहेत. पण या देशहिताच्या कार्यातही महाराष्ट्रातल्या काँग्रेस-राष्ट्रवादीच्या खासदारांना भाग घ्यावासा वाटला नाही. आज भाजपा ३७० वरून बोलतो तेव्हा काहींना होणाऱ्या जळजळीचे मुख्य कारण हे आहे की यामुळे पक्षाचा जनाधार आणि विश्वासार्हता आणखीनच वाढली आहे. पण मुद्दा हा आहे की भाजपा फक्त ३७० विषयावर प्रचार करतो हे कितपत योग्य आहे??

    तर मुळात हे अर्धसत्य आहे. भाजपाचे नेते जेव्हा प्रचारा दरम्यान भाषण करतात तेव्हा ते आपल्या सरकारने केलेली कामे मांडतात. त्या केलेल्या अनेक कामांतील एक म्हणून ३७० मांडले जाते पण भाजपाचा प्रचार तेवढ्यापुरताच मर्यादित नाही. गेल्या काही दिवसांत भाजपा नेत्यांच्या ज्या काही सभा झाल्या त्यात मांडल्या गेलेल्या निरनिराळ्या विकास कामांची यादी करायची झाल्यास ती खालीलप्रमाणे होते.

    १) ३०,००० किमी रस्तेबांधणी
    २) १८,००० गावांचा पाणी प्रश्न सोडवला
    ३) ग्रामीण आवास योजने अंतर्गत गरिबांसाठी ७ लाख घरे
    ४) २०२१ पर्यंत सर्व गरिब कुटुंबांना घरे देण्याचे उद्दिष्ट
    ५) शिक्षणात महाराष्ट्र क्रमांक ३ चे राज्य
    ६) दुष्काळमुक्त महाराष्ट्र करण्यासाठी प्रयत्नशील
    ७) १५ वर्षांत आघाडी सरकारने शेतकऱ्यांना दिलेली मदत २०,००० कोटी तर भाजपा युती सरकारने ५ वर्षांत दिलेली मदत ५०,००० कोटी
    ८) आघाडी सरकारच्या काळात शेतकरी बोनस रू.५० असायचा, भाजपा सरकारने २०१४ ते २०१७ रू.२०० तर २०१८-२०१९ मधे रू.५०० बोनस दिला.
    ९) मुंबई-गोवा महामार्गाचे काम जोमाने सुरू. दीड वर्षात पूर्ण होणार
    १०) ३८ जलप्रकल्पांचे काम जोमाने सुरू
    ११) रायगड हे आगामी Industrial Hub बनणार
    १२) मराठा समाजाला कोर्टात टिकणारे आरक्षण दिले
    १३) धनगर आणि आदिवासींचे प्रश्न मार्गी लावले
    १४) ST समाजाच्या योजनांचा वाभ धनगर समाजालाही होणार
    १५) OBC समाजातील विद्यार्थ्यांना परदेशात जाऊन शिकण्यासाठी शिष्यवृत्ती
    १६) स्मार्ट सिटी योजने अंतर्गत हजारो कोटींची कामे
    १७) क्लस्टर बांधकामाचा प्रश्न सोडवला
    १८) मेट्रोचे जाळे
    १९) १,६०,००० विहिरींचे बांधकाम
    २०) ५ लाख शेतकऱ्यांना पंप पुरवले
    २१) १९,००० गावे दुष्काळमुक्त
    २२) आगामी काळात गरिबांसाठी १० लाख घरे बांधणार
    २३) ४० लाख लोकांना वैद्यकीय सहाय्यता
    २४) जल जीवन मिशनसाठी ३.५ लाख कोटी रूपयांची तरतूद
    २५) ग्रामीण भागातील पायाभूत सुविधांसाठी २५ लाख कोटींची तरतूद
    २६) गरिब शेतकऱ्यांसाठी पेंशन योजना
    २७) Direct Benefit Transfer मुळे थेट १००% मदत शेतकऱ्या पर्यंत
    २८) किसान निधीचा शेतकऱ्यांना फायदा
    २९) शेतकऱ्यांच्या जनावरांसाठी Vaccination Programme
    ३०) कौशल्य विकास आणि मुद्रा लोन सारख्या योजनांचा ग्रामीण भागातील युवकांना फायदा
    ३१) One Ticket Policy साठी प्रयत्न (Local/Metro/Best etc. साठी एक टिकीट)
    ३२) कोळीवाडा आणि गावठाणांसाठी नवीन योजना
    ३३) Airport लगतच्या झोपडपट्टीचा पुनर्विकास
    ३४) प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत ३०० चौ.फुटांची घरे देणार.
    ३५) आशियातला सगळ्यात मोठा पूनर्विकास धारावीत होणार
    ३६) उज्वला योजनेचा १.५ कोटी गरिब कुटुंबांना लाभ
    ३७) बांद्रा-वर्सोवा Sea Link
    ३८) विविध ठिकाणी रिंग रोडचे बांधकाम
    ३९) जलवाहतूकीला चालना
    ४०) जलयुक्त शिवार आणि मागेल त्याला शेततळे योजनेचा शेतकऱ्यांना लाभ

    हि केंद्र आणि राज्य सरकारची 'काही' कामे ज्यांचा उल्लेख 'काही' ठिकाणच्या भाषणांमधे झाल्याचे मी नोंदवून ठेवले. या व्यतिरिक्त अनेक भाषणे झाली आहेत आणि त्यात अनेक वेगळे मुद्दे आणि कामे मांडली आहेत ज्याचा वरिल यादीत समावेश नाही. तसेच यात एका विशिष्ट शहरासाठी/प्रदेशासाठी केलेल्या किंवा प्रत्येक उमेदवाराने त्याच्या कार्यक्षेत्रात केलेल्या कामांचा उल्लेख नाही. मग आता विचार करा की त्या सगळ्या मुद्द्यांना जोडले तर किती मुद्दे होतील??

    मग जर एवढे महाराष्ट्राच्या विकासाचे मुद्दे मांडून जर भाजपा नेते ३७० वर ३-४ मिनीटे बोलत असतील तर त्याचा एवढा बाऊ का??
    पण तरिही तो होत आहे आणि निवडणूक संपपर्यंत जाणीवपूर्वक चालू राहील. पण भाजपाचा एक सामान्य कार्यकर्ता म्हणून नम्रपणे सांगतो की आम्हाला फरक पडत नाही. कारण आमच्यावर अटलजींचे संस्कार आहेत. अटलजी भर संसदेत म्हणाले होते, "सत्ता का खेल तो चलता रहेगा,सरकारे आएगी-जाएगी,पार्टियां बनेगी-बिगडेंगी पर ये देश रहना चाहिए,इस देश का लोकतंत्र रहना चाहिए" हा देश आणि या देशातील लोकतंत्र टिकवण्यासाठी आम्ही ३७० हटवण्याचे काम केले आहे आणि त्याविषयी भरभरून बोलणार कारण त्यासाठी आमच्या नेत्यांनी स्वतःच्या प्राणांची आहुती दिली आहे. मग त्याने आमच्या विरोधकांना पोटदूखी होत असेल तर तो त्यांचा प्रश्न आहे आमचा नाही. आम्ही एकच जाणतो की 'राष्ट्र प्रथम'!!! आणि हो आणखीन एक जाणतो, आएगा तो देवेंद्र ही!!!

    - SwaG
    (स्वानंद गांगल)

      October 15, 2019


  • जुळ्यांची’ ऑनलाईन शाळा

    जुळ्यांना वाढवताना एक मंत्र मी कायम जपलाय, तो म्हणजे त्यांना स्वयंभू बनवणं! आणि यापूर्वी देखील इतर मुलांकडे बघताना हे असंच असंलं पाहिजे हे नेहमी वाटायचं.

      December 23, 2021


  • मुंबई : रणजीचे राजे

    मुंबई : रणजीचे राजे

    भारतातील सर्वात मोठी प्रथमश्रेणी क्रिकेट स्पर्धा अर्थात प्रतिष्ठेच्या ‘रणजी करंडक’साठीचा २०२३-२४ चा हंगाम १४ मार्चला संपला. रणजीच्या अनभिषिक्त सम्राट असणाऱ्या मुंबईने १९३४-३५ मध्ये ही स्पर्धा सुरू झाल्यापासून विक्रमी ४२व्यांदा अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात ही स्पर्धा जिंकली.

      May 17, 2024


  • पावसाळ्यात गच्ची का गळते? यावर उपाय कोणते?

    गच्चीतून पाणी गळण्याची कारणे खूप आहेत. काँक्रिटच्या स्लॅबची जाडी वाजवीपेक्षा कमी ठेवल्यास स्लॅब वजनाखाली झुकणे, परिणामी मध्यभागी खालच्या बाजूस व तुळईच्या ठिकाणी वरच्या बाजूस भेगा पडणे, कॉक्रिटसाठी वापरलेले सिमेंट कमी प्रतीचे व वाजवीपेक्षा कमी वापरलेले असणे,

      January 21, 2023


  • अंतराळातील कचरा

    पृथ्वीभोवतालच्या अंतराळात बराच कचरा जमा झाला आहे. आपणच निर्माण केलेला हा कचरा, आज आपल्याच उपग्रहांना घातक ठरतो आहे. आपल्या भोवतालच्या अंतराळाचा, आपल्या सुखसोयींसाठी पूर्ण क्षमतेने उपयोग करायचा असेल, तर या कचऱ्याचा वेळेवर निचरा होणेही गरजेचे आहे. या ‘अंतराळ कचऱ्याच्या संदर्भातील विविध बाबींवर प्रकाश टाकणारा हा लेख…

      October 6, 2023


  • आमीर खानचा ‘दंगल’ चित्रपट काल बघीतला

    आमीर खानचा 'दंगल' चित्रपट काल बघीतला.
    आमीर खानचा हा चित्रपट कुस्तीला एका वेगळ्या उंचीवर घेऊन जाणाराच ठरणार आहे. 'म्हारी छोरियाँ छोरो से कम हैं के?' असा प्रश्न पुरुष प्रधान व्यवस्थेला विचारत एक बाप आपल्या मुलींना कुस्तीपटू म्हणून कसं घडवतो आणि त्याच्या पोरीही आखाड्यात कशी 'दंगल' करतात, याची ही कथा मनोरंजक आहेच, व प्रेरणादायी ही आहे. कुस्तीपटू महावीर सिग फोगट यांचा जीवनप्रवास मोठ्या पडद्यावर उतरविण्यासाठी आमीर खान यांनी नेहमी प्रमाणे खूप मेहनत घेतली आहे. आपल्या मुलींनी उत्तम असे कुस्तीपटू बनावे यासाठी एक पिता आपल्या मुलींशी कठोरपणे वागतो, व आपल्या दोन्ही मुलींना कसे घडवतो यांचे सुंदर चित्रण आमीर खान यांनी मांडले आहे. हरियाणातील एका छोट्या गावात राहणाऱ्या महावीर सिंह फोगट (आमीर खान) यांची ही कथा आहे. फोगट हे राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेतील पदक विजेते आहेत. आंतरराष्ट्रीय स्पर्धेत देशाला पदक मिळवून द्यायचं स्वप्न त्यांनी उराशी बाळगलेलं असतं. परंतु, घरच्या हलाखीमुळे कुस्तीचा आखाडा सोडून त्यांना नोकरी करावी लागते. देशासाठी पदक न जिंकता आल्याची सल त्यांच्या मनाला सतत बोचत असते. त्यामुळे आपल्याला एक मुलगा व्हावा आणि त्यानं आपलं हे स्वप्न पूर्ण करावं, अशी त्यांची तीव्र इच्छा असते. मात्र, त्यांना चौथीही मुलगीच होते. आपलं स्वप्न अधुरंच राहिल्यानं ते काहीसे निराश होतात. अशातच, एक दिवस त्यांच्या दोन मुली - गीता आणि बबिता त्यांची छेड काढणाऱ्या शेजारच्या दोन पोरांची चांगलीच धुलाई करून घरी येतात. त्यांचा हा 'पराक्रम' पाहून महावीर फोगट यांच्या आशा पल्लवित होतात. मुली मुलांपेक्षा कुठेच कमी नसल्याची जाणीव त्यांना होते आणि मग सुरू होतो एक जिगरबाज प्रवास. मुलींना कुस्तीपटू म्हणून घडवण्याचा महावीर फोगट यांचा निर्धार पक्का असतो, मुलीही सज्ज असतात, पण समाज - संस्कृतीचा सामना करत त्या सगळ्या आव्हानांना कसं अस्मान दाखवतात, हे पाहणं नक्कीच रंजक आहे.
    पटकथा, संवाद आणि चित्रण सगळंच प्रेक्षकांना खिळवून ठेवतं. अनेक दृश्यं पाहताना डोळ्यांच्या कडा पाणावतात. अभिनयाबद्दल बोलायचं तर, आमीर खानने 'मिस्टर परफेक्शनिस्ट' पणा परत सिध्द केला आहे. आमीर खाननं महावीर फोगट यांच्या भूमिकेत कमाल केली आहे. वयाप्रमाणं बदलत जाणारी देहयष्टी आणि देहबोली केवळ आमीरच साकारू शकतो. मुलींवर जिवापाड प्रेम करणारा मात्र आपलं स्वप्न साकार होऊ शकणार नाही म्हणून निराश झालेला बाप व नंतर मुलींमध्येच आपलं स्वप्न पाहात मेहनत घेणारा प्रशिक्षक त्यानं जबरदस्त साकारला आहे. महावीरचे तरुणपणातील कुस्तीचे प्रसंग (सिक्स्पॅक ऍब्ज) ते उतारवयात वाढलेलं वजन आणि सुटलेलं पोट हे सर्व मोठं आव्हान त्यांनी सहज पेललं आहे. तो सिनेमाभर इतका सहज वावरतो की तो अभिनय करतोय असं वाटतंच नाही. त्याशिवाय, फातिमा सना शेख, सान्या मल्होत्रा, जायरा वसीम आणि सुहानी भटनागर या चार मुलींनीही त्याला उत्तम साथ दिली आहे. साक्षी तन्वर आणि अपारशक्ती खुराना आपल्या भूमिका चोख बजावल्या आहेत. ज्यांना कुस्ती म्हणजे काय हे पण माहित नाही, त्यांनाही हा सिनेमा आवडेल, अशी मांडणी दिग्दर्शकाने केलीय. सिनेमा कुठेच कंटाळवाणा होत नाही. उलट, कुस्तीचा थरार सिनेप्रेमींच्या अंगावर रोमांच उभा करणारा आहे. पार्श्वसंगीत त्यात अधिकच भर घालतं. तारे जमिन पर, गजिनी, ३ इडियट्स, धूम ३, पीके यांसारखे चित्रपट देणा-या आमीर खानच्या यशात आता दंगलचा उल्लेख हा कायम उंचावत राहणार आहे.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३

      January 5, 2017


  • जानेवारी २१ : महागात पडले भाड्याचे विमान !

    डेविड गॉवर आणि जॉन मॉरिसला महागात पडली मैदानावरून केलेली हवाई सफर…

      January 21, 2016


  • फळे आरोग्यासाठी चांगली

    फळे आरोग्यासाठी चांगली असतातच पण या फळांचे आरोग्यासाठी असणारे विशिष्ट फायदे आपल्याला माहिती नसतात. पपई उष्ण असल्याने उन्हाळ्यात खावू नये की थंडीत खावी याबाबत नेहमीच चर्चा झटत असते. मात्र, पपई खाण्याचे तुम्हाला फायदे माहीत आहेत का?

    - पपईमुळे व्यक्तीच्या रोगप्रतिकारक शक्तीमध्ये वाढ होते. प्रतिकारक शक्ती चांगली असल्यास कोणताही आजार झाल्यावर तो लवकर बरा होता.

    - पपईमध्ये मोठ्या प्रमाणात जीवनसत्त्व 'क' असते. पपई खाल्ल्याने शरीरातील या जीवनसत्त्वाची पातळी चांगली राहण्यास मदत होते.

    - पपईने डोळ्यांचे आरोग्य सुधारते. पपईमध्ये जीवनसत्त्व 'अ'चे प्रमाण चांगले असते. डोळ्यांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी 'अ' जीवनसत्त्वाची आवश्यकता असते.
    वयानुसार दृष्टी राहण्यासाठी पपई खाणे फायदेशीर केव्हाही चांगले असते.

    - पपई खल्ल्याने पचन सुधारते. जेवणाच्या वेळा बदलणे, काही कारणांनी बाहेरचे खावे लागणे, वातावरणातील बदल यांचा शरीरावर परिणाम होत असतो. यामध्ये
    पचनशक्तीवर परिणाम होतो. मात्र पपई खाल्ल्यास पचनशक्ती सुधारण्यास मदत होते.

    - वजन कमी करण्यास उपयुक्त फळ आहे. अनेकदा आपल्याला अवेळी भूक लागते. मात्र पपईने या भुकेवर नियंत्रण मिळविणे शक्य होते.

    - एका मध्यम आकाराच्या पपईमध्ये साधारण १२० कॅलरीज असल्याने पोट भरते. याशिवाय पपईमध्ये असणारे फायबर्स भूकेवरील नियंत्रणासाठी अतिशय उपयुक्त ठरते.

    - पपई खाणे केव्हाही चांगले. त्यामुळे ताण कमी होण्यास मदत होते. दिवसभराच्या धावपळीने आपल्याला बऱ्याचदा थकल्यासारखे जाणवते. अशावेळी वाटीभर पपईचे काप खाल्ल्यास आलेला शीण कमी होण्यास मदत होते.

    - पपई खाण्यामुळे शरीरातील हॉर्मोन्सचे प्रमाण संतुलित राखण्यासही मदत होते.

    -- सुषमा मोहिते
    -- Sushama Mohite
    आरोग्यदूत - Aarogyadoot

      September 13, 2017


  • एक तीळ नऊ जणात…

    आमच्या वेळी, म्हणजेच पन्नास वर्षांपूर्वी विद्यार्थ्यांविषयी तळमळ असणारे शिक्षक होते. त्याच्याही आधी पु. लं. चे चितळे मास्तर होते. ज्यांनी ‘विद्यादान’ हेच आपलं ध्येय आयुष्यभरासाठी जपलं. मिळणाऱ्या तुटपुंज्या पगारात कसंबसं भागवत आपल्या विद्यार्थ्यांच्या आयुष्याचं सोनं केलं.

      December 22, 2022


  • श्री शिवभुजंग स्तोत्रम् – १०

    त्वदन्यः शरण्यः प्रपन्नस्य नेति
    प्रसीद स्मरन्नेव हन्यास्तु दैन्यम् |
    न चेत्ते भवेद्भक्तवात्सल्यहानि - स्ततो
    मे दयालो सदा सन्निधेहि ‖ १० ‖

    भक्ताच्या आणि भगवंताच्या आगळ्यावेगळ्या नात्याचे विवेचन करताना आचार्यश्री म्हणतात,
    त्वदन्यः शरण्यः प्रपन्नस्य नेति - माझ्यासारख्या प्रपन्न अर्थात संसारातील दुःखांनी त्रस्तझाल्यानंतर शरण येणाऱ्यांसाठी सुख,शांती, समाधानाच्या प्राप्तीचे आपल्यासारखे अन्य स्थान नाही.
    प्रसीद - त्यामुळे आपल्याला शरण आलेल्या माझ्यावर प्रसन्न व्हा.
    स्मरन्नेव हन्यास्तु दैन्यम् - मी आपले स्मरण केले असल्याने माझे दैन्य दूर करा. माझ्या दुःखाचे शमन करा.
    येथे आचार्य मधील भक्त भगवंतालाच वेगळ्या अर्थाने वेठीला धरतो. तो भगवंताला म्हणतो तुला हे दुःख दूर करणे भाग आहे. कारण त्यात माझाच नाही तुझा देशील फायदा आहे.
    न चेत्ते भवेद्भक्तवात्सल्यहानि:- जर तू असे केले नाही तर तुझ्या 'भक्तवात्सल्य' भावाची हानी होईल. लोक तुला यापुढे भक्तवत्सल म्हणणारच नाहीत. त्यामुळे तुझ्या त्या भक्तवत्सल विशेषणाचा आब राखण्यासाठी का होईना, माझे रक्षण कर कारण मी तुझी भक्ती करीत आहे. त्यामुळे भक्ताचे संरक्षण करणे, त्याचे दुःख निवारण करणे हे जणू काही , हे भगवंता तुझे कर्तव्यच आहे.
    ततो मे दयालो सदा सन्निधेहि - त्यामुळे हे दयासिंधू मला कायम आपल्याजवळ ठेव.
    कारण हे भगवंता तुझ्या चरण कमला पाशी केवळ आणि केवळ आनंद आहे. तिथे माझे दुःख आपोआपच दूर होईल. त्यामुळे मला संनिध म्हणजे चरणकमलां जवळ स्थान दे.

    -- प्रा. स्वानंद गजानन पुंड

      June 19, 2020