वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
शरीरामध्ये कार्य करणा-या चैतन्याला जीवात्मा असे म्हणतात. तर या संपूर्ण सृष्टीचे संचालन करणाऱ्या परम चैतन्याला परमात्मा असे म्हणतात. जीवात्मा हा या परमात्म्याचाच अंश आहे. त्याचाच अपार क्षमतेच्या आधारे आपल्या मर्यादित चैतन्याच्या आधारे जीवात्मा या देहाचे संचालन करीत असतो. या वास्तविकतेला आचार्य येथे अधोरेखित करीत आहेत.
November 9, 2020
उद्योगव्यवसाय म्हटला की त्याला तीन प्रकारच्या भांडवलाची आवश्यकता असते.
1) पैशांचे भांडवल
2) वेळेचे भांडवल
3) मनुष्यबळाचे भांडवल
अनेक जणांकडे पैशांचे भांडवल उपलब्ध नसते. पण त्यामुळे काळजी करू नये.कारण वेळेचे व मनुष्यबळाचे भांडवल प्रत्येकाकडेच उपलब्ध असते. पण त्याची जाणीवअनेकजणांना नसते. हे भांडवल किती प्रमाणात उपलब्ध असते ते बघुया.
प्रत्येक माणूस दिवसा कमीत कमी आठ तास तरी काम करू शकतो. माणूस साधारणपणे महिन्यात 25 दिवस काम करतो. म्हणजे तो एका महिन्यात सर्वसाधारणपणे 200 तास काम करतो. रविवार, इतर सुट्या व रजांचा विचार केला तर एक माणूस एका वर्षात साधारणपणे 10 मिहिने किंवा 2000 तास काम करतो. तासाला कमीत कमी 10 रुपये या दराने त्याचे मुल्य काढायचे ठरवले तर, प्रत्येक माणसास दिवसासाठी 80 रुपये, महिन्यासाठी 20000 रुपये व एक वर्षासाठी 2 लाख रुपये मुल्याचा वेळ उपलब्ध असतो.
मनुष्यबळाचा विचार केला तर पूर्ण वेळ माणुस नोकरीवर ठेवायचा झाला, तर त्याला कमीत कमी महिना 5000 रुपये पगार द्यावा लागतो. म्हणजे वर्षाला कमीत कमी 60000 रुपये पगार द्यावा लागतो.
वेळेच्या व मनुष्यबळाच्या भांडवलाचा एकत्रित विचार केला तर प्रत्येक माणसाकडे कमीत कमी 2 लाख 60 हजार रुपये भांडवल आपोआप उपलब्ध हे असतेच. अर्थात या भांडवलाचा उपयोग कसा करायचा हे ज्याचे त्याने ठरवायचे असते.
पूर्वी घरगुती शिकवण्या घेणे, कपडे शिवून देणे, खाद्यपदार्थ किंवापोळ्या करून देणे, पाळणाघर चालवणे यांसारखे अल्प भांडवलाचे व्यवसाय उपलब्ध होते;पण या प्रकारच्या व्यवसायाला प्रतिष्ठा नव्हती.
आता असे व्यवसाय उपलब्ध आहेत की ज्याला पैशांच्या भांडवलाची गरज भासत नाही किंवा अत्यल्प भांडवलाची गरज भासते. यांना जास्त करून वेळेच्या व मनुष्यबळाच्या भांडवलाची गरज भासते. तसेच या व्यवसायांना बर्यापैकी प्रतिष्ठा असते किंवा या व्यवसायात माणसे चांगली प्रतिष्ठा मिळवू शकतात. हे व्यवसाय कोणते हे थोडक्यात बघू.
1) विमा प्रतिनिधीः-
भारतामधेविमा व्यवसाय हा अत्यंत वेगाने वाढणार्या व्यवसायांपैकी एक व्यवसाय आहे. यामधेआयुर्विमा (LifeInsurance) वसर्वसाधारण विमा (GeneralInsurance) हेदोन प्रकार येतात. आता या क्षेत्रात खाजगी कंपन्यांनी प्रवेश केल्यामुळे स्पर्धावाढली आहे. आता सर्वच विमा कंपन्यांना उच्च दर्जाच्या विमा प्रतिनिधींची गरज आहे.
2) म्युच्युअल फंड सल्लागारः-
म्युच्युअल फंड हे गुंतवणुकीचे नवीन साधन उपलब्ध झाले असून, हा पण व्यवसाय प्रचंड वेगाने वाढतो आहे. या ठिकाणी म्युच्युअल फंड सल्लागारांची फार मोठ्या प्रमाणावर आवश्यकता आहे.
3) विक्री प्रतिनिधीः-
हल्ली अनेक कंपन्या त्यांच्या उत्पादनांची किंवा सेवांची विक्री दुकानदारांमार्फत न करताविक्री प्रतिनिधींमार्फत करतात. विशेषतः आरोग्यविषयक उत्पादने करणार्या कंपन्याहा मार्ग अनुसरतात.
4) सामुपदेशक (Councilors):-
मोठ्या प्रमाणावर यांची गरज आहे.
5) प्रशिक्षक (Trainer) :-
हल्ली अनेक कंपन्यांना व संस्थांना प्रशिक्षकांची गरज भासते. शिक्षक (Teacher) व प्रशिक्षक (Trainer) यात मोठा फरक आहे. प्रशिक्षक हा त्या क्षेत्रातील तज्ञ असावा लागतो. सचिन तेंडुलकर हा क्रिकेटचा प्रशिक्षक होऊ शकेल पण तो हुतुतु, खोखो, आट्यापाट्या या खेळांचा प्रशिक्षक होऊ शकणार नाही पण शिक्षक होऊ शकेल
6) सल्लागार (Consultants):-
हल्ली अनेक कंपन्यांना व संस्थांना सल्लागारांची गरज भासते.
असे अजुन पुष्कळ व्यवसाय आहेत.
सर्वसाधारणपणे ग्रामीण भागासाठी 10 वी पास व शहरी भागासाठी 12 वी पास असलेले व 18 च्या वर वय असलेले कोणीही स्त्री-पुरुष हा व्यवसाय करू शकतात. काही व्यवसायांमधे वयाची व शिक्षणाची अट नसते, तसेच अनुभवाची गरज नसते.कॉलेजमधे जाणारे विद्यार्थी, महिला, गृहिणी, तसेच निवृत्त झालेले लोक हा व्यवसाय करू शकतात. हा व्यवसाय ते पुर्ण वेळ (Full Time), अर्ध वेळ (Part Time) किंवा स्वतःच्या सवडीप्रमाणे केव्हाही करू शकतात.. तसेच नोकरी करणारे पण हे व्यवसाय करू शकतात.
यासाठी ऑफीस, दुकान, गोडाऊन वगैरेची गरज नसते.भांडवली गुंतवणुक जवळ जवळ नसते. इतर व्यापार्यांना ठेवावे लागतात तसे अनेक प्रकारचे हिषोब ठेवावे लागत नाहीत. बहुतेक आर्थिक व्यवहार हे कंपनी व ग्राहक यांचेमधे परस्पर होत असतात. विक्री प्रतिनिधींना फक्त कमीशन मिळत असते किंवा फी मिळत असते. त्यामुळे आर्थिक व्यवहारांच्या दृष्टीने हे व्यवसाय फार सोपे असतात.
ज्यांना लोकांना भेटायची आवड आहे, लोकांशी संवाद साधणे आवडते, उत्तम सादरीकरणाचे कौशल्य आहे, लोकांना आपले म्हणणे पटवण्याची कला आहे (Convincing Power) ते लोक या व्यवसायात यशस्वी होतात असे आढळून आले आहे.
तरी मराठी लोकांनी या संधीचा फायदा घ्यावा व उद्योग व्यवसायाच्या क्षेत्रात पदार्पण करावे हीच इच्छा व अपेक्षा!
उल्हास हरी जोशी
मोः-9226846631
July 27, 2015
१ जानेवारी २००२ या दिवशी युरो या चलनानं त्या-त्या देशाच्या मूळ चलनाची जागा घेतली. म्हणजेच जर्मनीत १० मार्कची नोट घेऊन आता कुणी बाजारात गेलं तर त्या चलनाला काही अर्थ उरला नव्हता. फक्त युरोमध्येच सगळे व्यवहार होणार असं आता ठरलं होतं. यामुळे आता १२ देशांमधल्या साधारण ३० कोटी जनतेला फक्त युरो हे एकच चलन वापरायचं होतं.
January 5, 2019
भारत हा सुपरपॉवर असल्यासारखा वागत असून अण्वस्त्रधारी पाकिस्तानला स्वतःचे रक्षण कसे करायचे हे चांगले माहित आहे असे विधान पाकिस्तानच्या पंतप्रधानांचे परराष्ट्र धोरण व सुरक्षा विषयक सल्लागार सरताज अझीझ यांनी आताच केले. पाकिस्तानमधील दहशतवादी कारवायांना भारतातील गुप्तचर यंत्रणा रॉचा पाठिंबा असल्याचे पुरावेही आमच्याकडे आहेत
September 2, 2015
खायची पानं व एरंडेल तेल
मायग्रेन किंवा डोकेदुखीचा त्रास सुरू झाला की सारा दिवस कटकटीचा जातो. मग त्यापासून सुटका मिळवण्यासाठी काही औषध-गोळ्या घेण्यापेक्षा खायची (नागवेलीची पानं) आणि एरंडेल तेल हा घरगुती उपाय नक्की वापरून पहा. खायचे पान थंड प्रवृत्तीचे असल्याने डोकेदुखीच्या त्रासापासून आराम मिळण्यास मदत होते. तसेच एरंडेल तेलामध्ये दाहशामक घटक व त्वचेत लगेच झिरपण्याची क्षमता वेदना त्वरीत दूर करण्यास मदत करतात. (एरंडेल तेल- गुडघेदुखीवर रामबाण उपाय)
हे मिश्रण कसे बनवावे?
तव्यावर आवश्यकतेनुसार(काही थेंब) एरंडेल तेल गरम करावे. त्यावर खायची पानं पसरून दाबावीत. थोडी चॉकलेटी रंगाची झाल्यानंतर गॅस बंद करावा.पानं थोडी थंड झाल्यावर या पानांनी डोक्याच्या दुखर्यास भागावर शेक द्यावा. डोकेदुखीचा त्रास कमी करण्यासाठी थोडे गरम असतानाच या पानाने डोक्याला शेक द्यावा.
बडिशेपमध्ये कॅल्शियम, सोडियम, आर्यन आणि पोटॅशियम सारख्या खनिजांचा भरणा असतो. यामुळे स्मरणशक्ती वाढवण्यास बडिशेप फायदेशीर ठरते.
वरील उपाय आपल्या डॉक्टरांना विचारून करावा.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०७१७३३
संदर्भ.इंटरनेट
November 14, 2016
जागतिकीकरण आणि आधुनिक पाश्चात्य तंत्रज्ञान यांच्या वाढत्या प्रभावामुळे आणि प्रसारामुळे जग जवळ येतयं. हे मान्य करावचं लागेल. आजच्या ग्लोबलायझेशनच्या युगात तरुण पिढीला ग्लोबल होऊ पाहातेय. अगदी माझ्यासहित. उदाहरणादाखल सांगायचचं झालं तर, इयत्ता पाचवीला असताना मला सर्वप्रथम इंग्रजी हा विषय अभ्यासाला अमलात आणला गेला तर इयत्ता आठवीला नसताना सर्वप्रथम कॉम्प्युटर हाताळता आला.
January 12, 2011
१)शरद ऋतुमध्ये शरीरात पित्त वाढते त्यामुळे ह्या ऋतूत तुप सेवन करावे.
२)उन्हाळ्याच्या दिवसात रात्री तुपाचे सेवन केल्यास फायदा होतो.
३)हिवाळयात तुप दिवसा सेवन करणे चांगले.
४)जर तुम्हाला वजन वाढवायचे असेल तर तूप जेवणा सोबत घ्यावे.
५)अजीर्णाचा त्रास असताना तुप सेवन करू नये.
६)तुपाचा वापर करत असताना नियमीत गरम पाणीच वापरावे.
तुप कोणी खाऊ नये:
स्थूल मेदस्वीव्यक्ती,आमवात,भुकनसणे,
अजीर्ण,जुलाब व कफाचे विकार असल्यास तुप सेवन करू नये.
तूपसेवनाचाअतिरेक केल्यास,मळमळ,
उल्टी,जुलाब व शरीरात अवास्तव चरबी वाढणे अशा तक्रारी उद्भवू शकतात.
(ह्या लेखामधील उपचार हे वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे हि विनंती)
वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:
९९६०६९९७०४
February 24, 2017
ह्याच्या सुंदर रंगावरून ह्याला वांगे हे नाव पडले असावे.बायकांचा फेव्हरेट वांगी कलर हो.वांगीची भाजी हि ब-याच मंडळीची आवडीची बुवा.वांगीच भरीत,रसभाजी,कापं,वांगी भात,भरली वांगी,वांगीचं लोणचे,वांगीची आमटी सगळेच पदार्थ सुरेख लागतात बुवा.
हि वांगी लहान व मोठी अशा दोन आकारात मिळतात बरं का.दोन्ही छान लागतात.वांगीचे रोप हे कंबर भर उंच असते व त्यात हि गोल गोमटीफळे लागतात जी आपण भाजी करीता वापरतो.जसा हिचा उपयोग स्वयंपाकात होतो तसाच हिचा आपण घरगुती उपचारात देखील उपयोग करू शकतो बरं.
वांगे हे चवीला तुरट,कडवट,तिखट असे मिश्र चवीचे असून उष्ण असते त्यामुळे ते शरीरातील वात पित्त व कफ हे तीन्ही दोष कमी करते.पण वांग्यावर केल्या जाणा-या संस्काराचा जबरदस्त परिणाम होतो बरे का ह्याचा अर्थ असा कि आपण जर वांग्याची रस भाजी केली अर्थात बटाट व पाणी ह्या सोबत वांगे शिजवल्यावर ते हमखास वात वाढवणार पण तेलात तळलेले काप व वांग्याचे भरीत वात कमी करणार, आहे ना हि गंमत संस्काराची.
आता वांग्याचे घरगुती उपचारात उपयोग पाहुया:
१)वांग्याचे गुळ घालून केलेले भरीत संध्याकाळी खाल्ल्यास छान झोप लागते.
२)गळवे पिकुन सूज कमी व्हायला वांगी भाजून त्याचे पोटीस बांधावे.
३)कोरडा खोकला येऊन घशाला कोरड पडत असल्यास १ कप कच्च्या वांग्याचे तुकडे ४ कप पाण्यात १० मिनिटे उकळावे व गाळून त्यात १/२ चमचा हळद व १ चमचा खडीसाखर घालून ते पाणी प्यावे.
४)कोवळ्या वांग्याचे तुकडे रात्रभर पाण्यात भिजत घालावे व सकाळी ते तुकडे काढुन त्या पाण्याने हात धुवावे.ह्याने तळहातावर येणारा घाम कमी होतो.हा प्रयोग ३ आठवडे करावा.
५)डोळे दुखत असल्यास वांग्याच्या रसांच्या घड्या डोळ्यावर ठेवाव्यात आराम मिळतो.
वांगे अतिमात्रेत खाल्ल्याने पोटात वात धरून संडासला साफ न होण्याची तक्रार होऊ शकते.
वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
November 16, 2016
भारताच्या समुद्रकिनार्यालगत एका सरकारी अहवालानुसार १.४ कोटी कोळी समाज रहात आहेत. यापैकी ४० लाख कोळी बांधव हे समुद्रात मासेमारी करिता जातात असा अंदाज आहे. अडीच ते तीन लाख मासेमारी करणार्या बोटींच्या साहाय्याने ते ही मासेमारी करतात.
December 17, 2016
सिग्मंड फ्राईड एकदा बायको व मुलाला घेऊन बागेत फिरायला गेला. मुलगा छोटा होता. आई-वडील गप्पात गुंग झाल्यावर तो हळूच तेथून संधी साधून गायब झाला. थोडया वेळानंतर समोरच खेळणारा मुलगा गेला कुठे म्हणून आई कासावीस झाली. घाबरून ती इकडे तिकडे त्याला शोधण्यासाठी पळू लागली. घाबरलेल्या, सैरावैरा पळणार्या आपल्या पत्नीला फ्राईड म्हणाला, ‘‘अगं मला एवढंच सांग आपला बागेत जायचा बेत ठरला तद्नंतर तू त्याला अमुक एक जागी जाऊ नकोस असं काही सांगितलं होतं का?’’ ती म्हणाली हो, ‘‘बागेतल्या कारंज्याजवळ जाऊ नको असं बजावलं होतं. त्याने, लगेच बायकोला घेऊन कारंज्याकडे कुच केली. मुलगा कारंज्याच्या थुई-थुई नाचणार्या पाण्यात पाय बुडवून मजेत पाण्याचे फवारे अंगावर घेत नाचत होता.’’ बायकोने मुलाला हाक मारली व फ्राईडचा हात धरत विचारलं, ‘‘तुम्हाला सिध्दी प्राप्त झालीय का ? हा कारंज्याजवळच आहे हे कसे तुम्हाला कळालं ?’’ फ्राईड म्हणाला - ‘‘सिध्दी-बिध्दी काही नाही, मला माणसाचं मन समजतं थोडंफार.’’
खरोखर मित्रांनो कवयत्री बहिणाबाईंनी म्हटल्याप्रमाणे आता भुईवर असणारं मन क्षणार्धात आकाशात जाते. प्रयोग करून पहा, डोळे मिटून ध्यान करताना ध्यानात माकडे यायला नकोत असा विचार केला कि दोन-तीन माकडं डोळयासमोर येतील. एखादया दारावर आत डोकावू नये अशी पाटी लावली कि आत डोकावण्याची तीव्र इच्छा मनात निर्माण होईल व काहीही करून आपण आत डोकावणारच.
एक राजा लढाईला जाताना राजमहालात आपल्या देखण्या राणीला ठेवून जिवलग मित्राकडे चावी देऊन राजा त्याला म्हणाला, ‘‘मित्रा मी जर तीन दिवसांत परत आलो नाही तर लढाईत माझा मृत्यू झाला असे समजून तू राजमहालाचे कुलूप उघड व राणी तुझीच असे समज.’’ राजा लढाईला निघाला. वाटेत एक तासानंतर तो विश्रांतीला थांबला. पाहतो तर काय त्याचा जिवलग मित्र खूप वेगाने घौडदौड करत चावी घेऊन आला व राजाला म्हणाला अरे यार ही किल्ली दुसर्या कुलपाची दिसतेय, राणीच्या महालाची नाही. पाहिलंत ना, राणीच्या मोहापायी तीन दिवसांनी कुलूप उघडण्याची राजाज्ञा त्याने धुडकावून लावली होती.
अंर्तमनाला एखादी गोष्ट करू नकोस असे ताकिद देऊन दरडावून सांगितले की ते तीच गोष्ट करून बघण्यासाठी धडपड करते. त्यावेळी बर्हिमनाने त्याला सहजपणे - हळुवारपणे, तत्वनिष्ठ भावनेने गोंजारत समजावून सांगितले व त्याचे फायदे-तोटे मैत्रीभावनेने लक्षात आणून दिले कि अंर्तमन-बर्हिमन यात सुसंवाद सुरू होतो. तेथे ताणाचा अजिबात लवलेश नसल्याने दुष्कृत्य घडत नाहीत. अंर्तमन व बर्हिमन यांच्यात सतत बोलणे चालू असते. त्यालाच स्वसंवाद असे म्हणतात. आपल्या मनाचा काही भाग आपण सर्वांना दाखवण्यासाठी प्रयत्न करतो. पण काही भाग मात्र कोणालाही व कधीही दिसू नये यासाठी आपण जागरूक असतो.
आपला भाव देवाला दिसावा असे भक्ताला वाटते, आपले प्रेम प्रेयसीला कळावे असे प्रियकराला वाटते, कविता रसिकांनी वाचावी व लोकांनी आपणांस दाद दयावी असे कवीला वाटते. आपल्या जीवनाचा काही भाग सगळयांना दिसावा पण संपूर्ण अंतरंग मात्र सगळयांना दिसावे, असे आपणास कधीच वाटत नाही. कारण आपण प्रथम आपले व नंतर जगाचे असतो.
मन हा आपल्या जीवनाचा गाभा आहे. जीवनाचे सारे रंग व तरंग सामावून घेणारे अंतरंग म्हणजे मन. निर्वाणाचा साक्षात्कार होतो तो मनाच्याच ठायी. सारे वेग व आवेग विराम पावतात ते मनाच्याच ठायी. जीवनाचे सुख-दुःख हे मनावरच अवलंबून असते. म्हणून मनात काय चाललेय याचा वारंवार एक्स-रे काढण्यासाठी सजग राहून दिर्घश्वसनाचा सराव करावा. थोडे चालणे, काही आसने करणे, सुर्यनमस्कार घालणे महत्वाचे असते. हे करण्याबरोबर मनाचे शांत चित्ताने तटस्थपणे निरिक्षण करावे त्यासाठी *रोज सकाळ-संध्याकाळ मांडी घालून शांत बसा. तटस्थपणे येणार्या जाणार्या श्वासाला डोळे मिटून जाणत रहा*. यामुळे मनातील विचारांचे वादळ हळूहळू शांत होऊ लागेल व मनाचा एक्स-रे व्यवस्थित पाहून मनानी मनानेच ऑपरेशन करून मनाला प्रसन्न करता येईल.
शेवटी म्हणतात ना, ‘‘मन करा रे प्रसन्न - सर्व सिध्दीचे कारण.’’
Forwarded Post
December 12, 2016
Copyright © 2025 | Marathisrushti