(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • “पाणवठा” जिथे माणुसकी सोबत प्राणुसकी नांदते.

    सावली गौरव सोहळ्याचा दिवस हा गणराज आणि डॉक्टर अर्चना यांच्या घरचा सोहळा असल्यासारखा वाटत होता. अर्चनाजी म्हणाल्या सुद्धा, आर्थिक विवंचना रोजची असतेच पण या दिवशी मात्र आम्ही आणि आमचा संपूर्ण पाणवठा परिवार एका वेगळ्याच आनंदात विहार करत असतो.

      September 12, 2022


  • आंतरराष्ट्रीय चहा दिन

    चहाबद्दल असे सांगितले जाते की पाच हजार वर्षांपूर्वी ‘शेननंग’ नावाचा चिनी राजा होऊन गेला. तो प्रयोगशील, दूरदृष्टी असलेला, कलेचा भोक्ता होता. त्या राजाच्या राज्याचा विस्तार खूप मोठा होता. आपल्या राज्यातील दूरच्या ठिकाणी जाऊन प्रजेची हालहवाल विचारावी म्हणून त्याच्या लवाजम्यासकट निघाला. एके ठिकाणी विश्रांतीसाठी थांबले. राजाने नोकरांना पाणी उकळण्यास सांगितले. पाणी उकळायला ठेवले त्या वेळेस काही वाळलेली पाने उकळत्या पाण्यात पडली. पाणी करडय़ा रंगाचे झाले. राजा संशोधनवृत्तीचा असल्यामुळे तो ते पाणी प्यायला. त्याला खूप तरतरी आली. हाच जगातील पहिला चहा आहे असे मानले जाते.

      May 21, 2022


  • आर्मी डे

    आर्मी डे

    भारतीय लष्कराचा मूळ पाया व अंतर्गत गाभा हा ब्रिटीश आर्मीवर आधारलेला आहे. याच ब्रिटिशांकडून १५ जानेवारी १९४९ ला फिल्डमार्शल (तत्कालीन जनरल) के. एम. करिअप्पा यांनी पदभार स्वीकारला. यामुळे हा दिन भारतीय लष्कर दरवर्षी ‘आर्मी डे’ म्हणून साजरा करते.

    भारतीय लष्कर ही प्रशंसनीय काम केलेली सन्माननीय संस्था आहे व आंतरराष्ट्रीय पातळीवरही आपल्या लष्कराला मान आहे.

    भारतीय लष्कराची एक प्रतिमा आहे, ती चांगली आहे, लष्कराची नेहमीच प्रशंसा झालेली असून लष्कराने देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय आव्हानांचा सामना करताना आदर्श कामगिरी केलेली आहे,संयुक्त राष्ट्रांच्या शांतिरक्षक सेनेत भारतीय लष्कराची मोठी भूमिका आहे, आंतरराष्ट्रीय समुदायाने भारतीय लष्कराच्या कामाची स्तुतीच केली आहे. भारतीय लष्कर हे केवळ शक्तिप्रदर्शनासाठी नाही पण या संस्थेकडे एक परिपक्वता व जबाबदारी आहे.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३

      January 16, 2017


  • सिसिली लेफोर्ट – दुसऱ्या महायुद्धातील स्त्री गुप्तहेर

    16 जून 1943 ला सिसिलिने लॉर व्हेलित प्रवेश केला.तिने कुरियर म्हणून शस्त्रे स्फोटके पोचवण्याचे काम केले. ज्यामुळे फ्रांस गुप्तहेरानी रुळ उखडणे,पॉवर स्टेशन, कारखाने,उधवस्थ केले. ज्यामुळे जर्मन सैनिक सावध झाले.त्यामुळे एसओई गुप्तहेर संघटनेच्या हेराना सावध रहाण्याचे आदेश दिले गेले.

      December 4, 2022


  • “अभिनंदन,आमीर खान तुझे त्रिवार अभिनंदन…!!!”

    ‘आमीर खानने माफी मागावी’ अशी मागणी करणाऱ्या डॉक्टरांनी, फसवेगिरी करणाऱ्या डॉक्टरांवर कारवाही करण्याची मागणी कधी केली काय ? लोकांचा जनआक्रोश ओढवून घेईपर्यंत डॉक्टरांनी हे प्रकरण ताणू नये, अन्यथा त्याचे परिणाम निश्चितच भोगावे लागतील. यापूर्वी योगगुरु स्वामी रामदेवबाबांनीही वैधकीय व्यवसायावर वारंवार कोरडे ओढले, आणि सत्य जगासमोर मांडले आहे.

      June 10, 2012


  • फेब्रुवारी ११ : विश्वचषक २००३ – कॅनडाचा विजय आणि शेन वॉर्नचे ड्रग स्कॅन्डल

    कॅनडाचा पहिल्याच एक्दिवसिय साम्न्यातिल विजय आणि बन्दि घात्लेले औषध घेत्ल्याने वॉर्नि विश्वचषकातुन बाद

      February 11, 2011


  • दोन्ही डावात शतक आणि जॉफचे शतकांचे शतक

    1920मध्ये कसोटी क्रिकेट पुनरुज्जीवित झाले तेव्हा वॉरन वयाच्या पस्तिशीत होता. त्याचा धडाका नंतर टिकला नाही. एका कसोटीत दोन शतके काढणार्‍या या फलंदाजाला आपल्या कारकिर्दीतील पुढच्या शतकासाठी तब्बल 17 वर्षे वाट पाहावी लागली.

      August 10, 2010


  • सिद्धिविनायकचरणी २ कोटींचे हारतुरे..

    निदान सिद्धिविनायक ट्रस्टने अशा प्रकारच्या उधळपट्टीला थारा देऊ नये. “मन्नत” वाल्याला तेच पैसे ट्रस्टच्या माध्यमातून एखाद्या चांगल्या कार्यासाठी देण्याची विनंती करावी. एवढीच गणेशभक्तांची अपेक्षा असणार. किमान तेवढी अपेक्षा ट्रस्टने पुरवावी. अर्थात ट्रस्टने पुरवली नाही तरी बाप्पा ही अपेक्षा नक्कीच पुरवेल.

      September 13, 2016


  • मराठी आपली आई,धर्म आपली माता

    आचार्य विनोबा भावे म्हणतात, ‘मराठी आपली आई,धर्म आपली माता.आपण खरे मातृपूजक आहोत. दुसऱ्याच्या मातेची निंदा करणारे नव्हेत.’ आपली मराठी भाषा किती ओजस्वी,प्रसादपूर्ण,सहजबोधआहे हे यशवंतराव चव्हाण असं समाजातून सांगतात.

    ‘मराठीत भावना व्यक्त करणाऱ्या शब्दांची जुळणी पहा कशी आपोआप सहज होऊ लागते.तुम्ही आपल्या भाषेवर अपार प्रेम करावं, नाहीतर तुमची ऐनवेळी बोलताना फजिती होईन!

    आचार्य विनोबांनी देवनागरीचा लिपी म्हणून केवळ मराठीसाठीच नव्हे तर सर्व भारतीय भाषांकरिता उपयोग करावा असा आग्रह धरला आहे. भाषाकोषकार विश्वनाथ नरवणे यांचंही म्हणणं हेच आहे.

    विनोबा म्हणतात, ‘मराठीच्या लेखकांनी इतर भाषेतील बोधप्रद साहित्य अनुवादित करुन मराठी वाचकांना द्यावे. मराठीचे अवांतर वाचन मुलांनी केल नाही तर त्यांना पुढे फार पश्चात्ताप होईल!’ असाही निष्कर्ष ते काढतात.

    म. गांधी मातृभाषा हीच शिक्षणाचे माध्यम म्हणून वापरली तर आपण स्वदेशीचा अंगिकार केला असं खऱ्या अर्थाने म्हणता येईल असे सांगतात.

      August 17, 2017


  • अंजिराच्या शेतीतुन समीर डोंबेचे “पवित्रक” ब्रँडनेम  

    समीर डोंबे याचा इंजिनिअर ते अंजीर किंग असा गेल्या सहा वर्षांचा प्रवास. दौंड तालुक्यातील खोर गावच्या युवा शेतकऱ्याने इंजिनिअरिंगचे लॉजिक शेतात वापरुन अंजिरांच्या शेतीतून मोठी कमाई केली. विशेष म्हणजे, लॉकडाऊनच्या काळातही त्याने तब्बल 20 टन अंजीर विकले.

      October 22, 2021