(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • श्री कनकधारा स्तोत्रम् – २

    मुग्धा मुहुर्विदधती वदने मुरारेः प्रेमत्रपा-प्रणहितानि गताऽऽगतानि।मालादृशोर्मधुकरीव महोत्पले या सा मे श्रियं दिशतु सागरसम्भवायाः ॥२॥

    मुग्धा - अत्यंत शुद्ध,निर्मल, सरल, निष्पाप, अबोध. आई महालक्ष्मीची दृष्टी अशी आहे.

    मुहुर्विदधती वदने मुरारेः- ती दृष्टी वारंवार भगवान मुरारी अर्थात मुर राक्षसाचे शत्रू भगवान श्रीहरींच्या मुखकमलावर जात असते.

    गताऽऽगतानि- जात राहते .येत राहते. ही आचार्यश्री ची रचना मोठी सुंदर आहे. आईची दृष्टी भगवंताच्या मुखावर जाते .परत येते. पुन्हा जाते. पुन्हा येते. यामध्ये तिच्या चांचल्य गुणाचा भाग आहे तसाच सौंदर्याचा देखील.

    ती दृष्टी स्थिर का नाही? याचे नितांत सुंदर वर्णन करताना आचार्य श्री कारण देतात,
    प्रे
    मत्रपा-प्रणहितानि- ची दृष्टी प्रेम आणि लज्जा यांनी भरलेली आहे. श्रीहरींवर उत्कट प्रेम असल्याने ती दृष्टी भगवंताच्या मुखकमलाकडे जाते आणि दृष्टादृष्ट होताच त्रपा लज्जेने आईची दृष्टी खाली वळते. असे नितांत रमणीय दृश्य आचार्य वर्णन करीत आहेत.
    त्याच सौंदर्याला उपमा देताना ते म्हणतात,

    मालादृशोर्मधुकरीव महोत्पले या- एखाद्या महोत्पल म्हणजे पूर्णप्रफुल्लित कमळावर मधुकरींची रांग यावी तशी. वास्तविक येथे फक्त आई लक्ष्मीचीच दृष्टी आहे. पण तीच वारंवार जाणे-येणे करत असल्याने जणू काही रांग वाटत आहे. सातत्याने त्या दृष्टीचे आवागमन एखादा दृष्टीचा समुदाय असल्यासारखे वाटत आहे.

    सा मे श्रियं दिशतु सागरसम्भवायाः- सागर संभवा अर्थात समुद्रातून जन्माला आलेली. समुद्रमंथनाच्या दिव्य प्रसंगात समुद्रातून जी चौदा रत्ने प्रगटली यामध्ये आई महालक्ष्मी चे वर्णन आहे. त्याचा संदर्भ वापरत आचार्य श्री म्हणतात ,समुद्रातून प्रकट झालेल्या आई महालक्ष्मीची ती दृष्टी मला वैभव प्रदान करो."

    -- विद्यावाचस्पती प्रा. स्वानंद गजानन पुंड

      March 11, 2020


  • सामाजिक शिष्टाचार – लक्षपूर्वक ऐकणे

    एकमेकांचे म्हणणे ऐकून घेतल्याशिवाय एकत्रपणे काम करताच येत नाही. ऐकण्याचे महत्व कशासाठी ? दुसर्‍याचे ऐकून घेणे व कोणतीही गोष्ट लक्षपूर्वक ऐकणे या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. लक्षपूर्वक ऐकणे म्हणजे आजूबाजूच्या निरनिराळ्या आवाजातील हवा तो नेमका आवाज निवडून त्यावर पूर्ण लक्ष केंद्रित करणे. कोणत्या आवाजाकडे लक्ष देणे हे त्या त्या वेळच्या गरजेवर अवलंबून आहे.

      October 16, 2018


  • श्रीगुरुचरित्राचं लेखनस्थान : कडगंची

    श्रीदत्तात्रेयांच्या भक्तांसाठी वेदसम असलेल्या श्रीगुरुचरित्राचं लेखनस्थळ..

      February 7, 2017


  • अमेरिकेतील वन्यप्राणी जीवन – भाग ८

    अमेरिकेतल्या अस्वलांमधे ग्रीझली बेअर्स आणि ब्लॅक बेअर्स हे दोन प्रकार. ग्रीझली अस्वलं कॅनडामधे आणि अमेरिकेच्या वायव्येकडच्या राज्यांमधे प्रामुख्याने आढळतात. कॅनडा आणि अमेरिकेमधली सीमा रेषा ही उघडीच असल्यामुळे या सीमेलगतच्या भागात ग्रीझलीज मोकळेपणाने दोन्ही देशांमधे ये जा करत असतात. एकंदर ग्रीझलीजची संख्या सुमारे ६०,००० असावी असा अंदाज आहे. त्यांतील बहुतेक कॅनडातच आहेत तर अमेरिकेच्या वायोमींग, मॉंटेना, आयडॅहो, वॉशिंग्टन या राज्यांमधे मिळून १५०० ग्रीझलीज असावेत.

    काळ्या अस्वलांच्या मानाने ग्रीझलीज आकारमानाने खूपच मोठे असतात. ४००-५०० किलो वजनाच्या या ग्रीझलीजना काळ्या अस्वलांप्रमाणे सराईतपणे झाडावर झरझर चढता येत नाही. अशा प्रकारे पलायनाचा मार्ग खुंटल्यामुळे संकटाची थोडीशी जरी शंका आली तरी ग्रीझलीज आक्रमक बनतात. विशेषत: लहान बच्चे बरोबर असले तर मादी फारच आक्रमक बनते. ग्रीझलीजच्या हल्ल्यामुळे मृत्युमुखी पडणार्‍या लोकांपैकी सुमारे ६०% मृत्यू हे अशा चवताळलेल्या माद्यांमुळे होतात. ग्रीझलीज शक्यतो माणसांपासून दूर रहाण्याचा प्रयत्न करतात. ग्रीझलीजच्या परिसरात कॅंपींग करण्यासाठी जाणार्‍या लोकांना विशेष काळजी घ्यावी लागते. ग्रीझलीजचे घ्राणेंद्रीय फारच तीक्ष्ण असते, आणि कॅंपच्या जवळपास निष्काळजीपणाने टाकलेलं खाद्य किंवा डबे म्हणजे संकटाला निमंत्रणच ! एकदा का ते कॅंप्सच्या जवळ यायला चटावले की ते धीट बनतात आणि माणसावर हल्ले करायला मागे पुढे पहात नाहीत. बर्‍याचदा अशा ग्रीझलीजना गोळी घालून ठार मारण्याशिवाय पार्क रेंजर्सपुढे काही उपाय रहात नाही. त्यामुळे अशा कॅंपसमधे दोन झाडांच्यामधे उंचावर एक दोरी लावून त्यात शिंकाळ्यासारखं खाद्य बांधून ठेवण्याची पद्धत असते.

    शक्यतो काळी अस्वलं, ग्रीझलीजच्या प्रदेशात फिरकत नाहीत परंतु पाईन नट्स, एकॉर्नस, बेरीज असा काही शाकाहारी आहार दोघांच्याही आवडीचा असल्यामुळे, त्याच्या शोधार्थ ग्रीझलीज कधी कधी काळ्या अस्वलांच्या प्रदेशात प्रवेश करतात. कधी ग्रीझलीज आणि काळ्या अस्वलांची आमने सामने गाठ पडलीच तर ग्रीझलीजच्या मोठ्या आकारमानामुळे आणि आक्रमतेमुळे, काळी अस्वलं घाबरून पळ काढतात. वायोमींग राज्यातल्या यलोस्टोन नॅशनल पार्क या जगप्रसिद्ध राष्ट्रीय उद्यानामधे ग्रीझलीज आणि लांडगे ह्या कट्टर शत्रूंची अनेकदा एकमेकांशी गाठ पडते. बहुतेक वेळा लांडग्याच्या कळपाने एखाद्या एल्कची शिकार केलेली असते आणि शिकारीच्या वासानं एखादं ग्रीझली ऐनवेळी तिथे येऊन टपकतं. मग लांडग्यांचा कळप आणि ग्रीझलीचा, उंदीर-मांजराचा खेळ चालतो. ग्रीझलीच्या मोठ्या आकारमानामुळे आणि आक्रमक स्वभावामुळे, लांडगे ग्रीझलीवर समोरासमोर हल्ला करण्याचं धाडस करत नाही. कधी गनिमी कावा करून एखादा लांडगा ग्रीझलीचं लक्ष विचलीत करतो आणि तोवर बाकीचे लांडगे भक्षाचे लचके तोडून पळ काढतात. तर कधी कधी दोन तीन लांडगे एकत्र येऊन ग्रीझलीच्या पुठ्ठ्यावर पाठीमागून हल्ले करून त्याला बेजार करून सोडतात. ग्रीझलीचा आहार शाकाहारी, मांसाहारी असा संमिश्र असतो. मूस, हरीण, एल्क, बायसन, करीबू अशा प्राण्यांची शिकार करण्यात ग्रीझलीचा हातखंडा असतो. कधी कधी काळ्या अस्वलांवर हल्ला करून त्यांचा फडशा पाडायला देखील ते मागे पुढे पहात नाहीत. ग्रीझलीजना मासे देखील फार आवडतात, त्यामुळे नद्या, ओढ्यांच्या उथळ भागात उभं राहून, पंजाच्या फटक्याने सामन, ट्राउट, बास जातीचे मासे मारून ते खातात. ग्रीझलीजना मेलेल्या प्राण्यांचं मांस खाण्याचं देखील वावडं नसतं.

    थंडीचा मोसम जवळ येऊ लागला की ग्रीझलीज भरपूर खाऊन शरीरामधे चरबीचा संचय करून घेतात. थंडीच्या ऐन कडाक्यात ६००० फुटांवर, उत्तरेकडच्या डोंगर उतारांवर, खोबणी, बीळांमधे जाऊन ग्रीझलीज झोपी जातात (hibernation). थंडीचे हे काही महिने ते पूर्णपणे झोपूनच काढतात. परंतु काही ठिकाणी मात्र जिथे वर्षभर अन्न मिळतं, तिथे ग्रीझलीजना असं थंडीमधे झोपी जावं लागत नाही.

    ग्रीझलीजचा संचार कॅनडा आणि अमेरिकेच्या उत्तरेकडच्या राज्यांपुरता सिमीत असला तर त्यामानानं काळी अस्वलं सर्वत्र आढळतात. अलास्कापासून खाली मेक्सिकोपर्यंत आणि अटलांटिक पासून पॅसिफिकपर्यंत सर्वत्र त्यांचा संचार असतो. तपकिरी रंगाची अस्वलं (त्यात ग्रीझलीज देखील आले) ही युरेशियातून आलेली तर काळ्या अस्वलांचा उगम सुमारे २ दशलक्ष वर्षांपूर्वी अमेरिकेतच झाला. काळी नर अस्वलं १५०-१७५ किलो वजनाची असतात (काही थोराड नर चक्क ३००-३५० किलो वजनाचे असतात) तर माद्या १००-१५० किलो वजनाच्या असतात. काळी अस्वलं साधारणपणे जंगलात आणि झाडाझुडपांच्या गर्दीमधे रहाणं पसंत करतात. परंतु कधी कधी शेतांच्या कडेला, माळरानात देखील ही आढळतात.

    हिवाळ्यात, झाडांच्या मोठ्या ढोल्यांमधे, मोठ्या दगडांच्या किंवा ओंडक्यांच्या खाली, नद्यांच्या सुकलेल्या पात्रांमधे तयार झालेल्या खबदाडीमधे, बीळांमधे, ती झोपी जातात. पेनसिल्व्हेनियामधे डोंगराळ, दाट झाडींच्या भागामधे काळी अस्वलं खूप आहेत. काही वेळा स्थानिक वर्तमानपत्रांमधे त्यांच्या बातम्या यायच्या. काही वेळा या डोंगराळ भागातल्या छोट्या गावांमधे, एखाद्या घराच्या डेक खाली, अडगळीमधे जागा शोधून, एखादं काळ अस्वल झोपी गेलेलं हिवाळ्यात आढळून यायचं. मग वनखात्याचे लोक येऊन त्याला गुंगीचं औषध देऊन पकडायचे आणि दूर जंगलात सोडून यायचे. कधीतरी कोणाच्यातरी आवारामधे अस्वलांचे ठसे दिसणं, बागेच्या कुंपणांच्या खांबांवर, झाडांच्या बुंध्यांवर त्यांच्या नखांचे ओरखाडे दिसणं हे देखील बरेचदा व्हायचं. आडवाटेच्या रस्त्यानं जाताना तर बरेचदा एखादं एकांड अस्वल किंवा मादी आणि एखाद दुसरं पिल्लू दुडक्या चालीने रस्त्याच्या कडेच्या गवतातून चालताना दिसायचे.

    स्प्रिंग सीझनमधे नव्यानेच जन्मलेले बछडे बिळांतून, ढोल्यांतून बाहेर पडून हिंडा फिरायला लागतात. बछड्यांच्या जवळपासच त्यांची आई देखील असते आणि संकटाची चाहूल लागताच ती बछड्यांना झाडावर चढायला लावते. पहिला हिवाळा संपेपर्यंत बछडे सततच आई बरोबर असतात आणि साधारणपणे दीड वर्षांचे झाले की स्वतंत्रपणे हिंडू लागतात. काळ्या अस्वलांचा आहार देखील संमिश्र असतो. छोटी फळं, बिया, यांच्याच बरोबरीने कीटक, वाळवी, मुंग्या, मधमाश्या वगैरे देखील त्यांच्या आहारात असतात. खारी, उंदीर सश्यांसारख्या छोट्या प्राण्यांबरोबरच हरणाची छोटी शावकं देखील ते मारतात. मरून पडलेल्या प्राण्यांचं मांस देखील त्यांना वर्ज्य नसते. ग्रीझलीज प्रमाणे काळ्या अस्वलांना देखील सामन, ट्राउट हे मासे पकडून खायला आवडतं. ग्रीझलीजच्या मानाने काळी अस्वलं मनुष्यवस्तीच्या बरीच जवळ येतात. कॅंप साईट्सवर येऊन तंबूंच्या आसपास पडलेलं खाणं धुंडाळणं हा त्यांचा आवडता उद्योग असतो. गावांमधे येऊन कचर्‍यांचे डबे शोधायला किंवा शेळ्या, मेंढ्या, वासरांवर हल्ले करायला देखील हे मागे पुढे पहात नाहीत.


    अमेरिकेतल्या वन्यप्राणी जीवनाच्या मानाने भारतातले वन्यप्राणीजीवन कैकपटींनी अधिक वैविध्यपूर्ण आणि रोमांचक आहे, यात काही वाद नाही. गीरच्या जंगलात उरलेले थोडेफार एशियन वंशाचे सिंह, एशियन हत्ती, वाघ, काझीरंगाच्या जंगलातले गेंडे, उडत्या घारी, कच्छच्या वाळवंटातली वन्य गाढवे, हिमालयात आढळणारे स्नो लेपर्डस, नाना प्रकारचे पक्षी, साप, ….. किती नावे घ्यावीत? दुर्दैवाची गोष्ट म्हणजे, या अद्भूत नैसर्गिक ठेव्याची आपण अक्षम्य अशी हेळसांड करत आहोत. जंगले नष्ट होत चालली आहेत. कित्येक पशूपक्षांच्या जाती नष्ट झाल्या आहेत, होत आहेत. जंगलांच्या आसपास रहाणार्‍या खेडुतांची जीवनप्रणाली आणि वन्यप्राण्यांची आश्रयस्थाने यांच्यातील संघर्ष वाढतच जात आहे. शेती, नागरी वस्त्या आणि तथाकथित आधुनिकता आपले पाश फैलावून, निसर्गाचा आणि त्याच्याशी निगडीत नैसर्गिक साधनसंपत्तीचा नाश करत आहे.

    अमेरिकेची इतर अनेक बाबतीत नक्कल करण्याचा प्रयत्न करणारे आपण, त्यांच्याकडून, निसर्ग आणि वन्यप्राणीजीवनाच्या संवर्धनाच्या बाबतीत काहीतरी शिकणार आहोत का?

    -- डॉ. संजीव चौबळ

      December 24, 2016


  • किचन क्लिनीक – पालेभाज्या – करडई

    किचन क्लिनीक – पालेभाज्या – करडई

    हे बहुवर्षायू क्षूप असते. हि भाजी चवीला गोड,तिखट,भूक वाढविणारी व उष्ण असते.हि भाजी शरिरातील वात व कफ दोष कमी करते व पित्त दोष वाढविते.

    हि भाजी जेवणात तर वापरतात तशीच ती घरगुती औषध उपचारात देखील वापरली जाते.
    आता हिचे औषधी उपयोग पाहूया.

    १)सर्दी झाल्यास करडईच्या कोवळ्या पाल्याची भाजी द्यावी.

    २)ह्या भाजीचा पोटीस सुजेवर बांधल्यास सुज व वेदना कमी होतात.

    ३)मोठ्या व्यक्तिंना क्रुमीचा त्रास झाल्यास करडईची भाजी करडईच्याच तेलात शिजवून खावी.

    ४)लघ्वी चिकट व गढूळ होणे ह्यात करडईच्या पानांचा रस २ चमचे+धणे पूड १ चमचा हे मिश्रण रोज सकाळी ८ दिवस घ्यावे.

    ५)घशात चिकट कफ येणे व तोंडात चिकट लाळ तयार होणे ह्या तक्रारीवर करडईची कोवळी पाने चावून त्याचा रस थुंकावा.

    हि भाजी जास्त खाल्ल्यास डोळ्यांचे विकार,रक्तदोष व पित्ताचे विकार होतात.

    -- वैद्य स्वाती हे.अणवेकर
    आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
    म्हापसा गोवा.
    संपर्क:९९६०६९९७०४

      October 24, 2016


  • रताळी

    रताळे हे कंदमूळ आहे. रताळी हे एक उपवासाचे पदार्थ. तसेच रताळे हे प्रत्येक माणसाला आवडतेच. लहान मुलांना भूक लागली तर आई लागलीच दूध व साखर घालून मुलाला देतात. रताळे हे प्रत्येकासाठी अत्यंत पौष्टिक अन्न आहे. बटाट्याप्रमाणेच रतळ्याचेही उपयोग आहेत. भरपूर जीवनसत्त्वे त्याचप्रमाणे भरपूर खनिजे तसेच भरपूर प्रथिने यात आहेत. रताळ्याचा उगम कसा व कुठून झाला हे अज्ञात आहे. मात्र रताळ्यात अमेरिकेमध्ये तयार होते तसेच आफ्रिका व काही ठिकाणी दक्षिण आशियातही मिळते. मात्र फार पूर्वीपासून रताळा हे भारताला परिचित आहे. तसे बघितले तर फूड अँड अॅग्रीकल्चरल ऑर्गनायझेशन (एफ.ए.ओ.) यांनी सर्व जगात संवर्धन केल्याप्रमाणे संबंध जगात रताळ्याचे उत्पादन जास्त असते. चीनमध्ये जगात दुसऱ्या नंबरवर रताळ्याचे उत्पादन होते.. अगदी नवीन अमेरिकन शेतकरी डॉ. मॅथ्यू मॉरिसन याने रताळ्याचे अनेक पृथ्थकरण करून त्यातील उपयोगाकरिता पुढे आणली. रताळे ही कोणीही कुठून आणले तरी अत्यंत पौष्टीक असे जाहीर केले. याचे कारण म्हणजे रताळे कोठेही कोणत्याही हवामानात वापरता येते. आश्चर्य म्हणजे रताळी अनेक देशात निर्यातही करतात, हे विशेष.

    आता रताळी सर्वत्र उपलब्ध असल्याकारणाने रताळ्याचे अनेक प्रकार करण्यात येतात. अगदी बटाटे उकडून बटाट्याची भाजीदेखील उपवासाला चालते म्हणजे ते एक पूरक अन्न चालू शकते. रताळ्याची कापा बटाट्यासारखी तेलात अगर तुपात तळून चांगल्या लागतात. रताळे किसणीने किसून त्याची पॅटीस अथवा अनेक प्रकार उपयोग करता येतो. तसेच लहान मुलांचे अथवा ज्येष्ठ नागरिकांचे पाय दुखत असल्यास रताळ्याचा उपयोग अवश्य करता येतो. थोडक्यात रताळे हे एक चविष्ठ आणि निरनिराळ्यात प्रकारात केलेली अपूर्व देणगीच म्हणावे लागेल.

    रताळ्यात सगळे आढळते. त्यात जेजे आहे ते ते सर्वत्र मिळते.

    १०० ग्रॅम रताळ्याचा गुणधर्म खालीलप्रमाणे आहे.

    – मदन देशपांडे

      December 4, 2023


  • श्रावणमास आणि उपवास

    श्रावणात जलधारा बरसत असताना सूर्य नारायण मात्र ढगांच्या आड रुसून बसतो. बाहेर ही अवस्था तर शरीरातील सूर्य नारायण म्हणजेच उदरस्थ पाचकाग्नी ही थोडा मंदच असतो, तो जड पदार्थ पचवण्यास समर्थ नसतो आणि तरीही असा आहार घडलाच तर मात्र अजीर्ण,अतिसार,ताप याला पर्याय नाही. जवळपास सर्वच जण याचा अनुभव घेतात.(म्हणूनच वैद्य वर्गात या महिन्यास सिझन असं म्हणतात. ) या मुळेच एका दगडात दोन पक्षी मारावेत तसे आध्यात्म व आरोग्य दोन्ही सांभाळायला उपवासाची परंपरा वर्षांनुवर्षे चालत आली आहे.

    या काळात पाचकाग्नी ला विश्रांती ची गरज असते,पण आपण खरंच ती अपेक्षित विश्रांती देतो का? की कामात बदल म्हणजे विश्रांती तसं खाण्यात बदल म्हणजे उपवास असं करतो? त्या दिवशीची खिचडी,साबुदाण्याचे वडे असे पदार्थ आठवले की याचे उत्तर मिळेल. मग अशा पदार्था ऐवजी गरम पाणी, एखादे फळ खाऊन केलेला उपवास निश्चितच लाभदायक.

    दिवसभराच्या उपवासाचं जाऊदे पण उपवास सोडताना तर श्रीखंड, पुरी,जिलेबी सारखे पदार्थ तर आपण घेतोच आणि ते सुद्धा दिवसभराचा उपवास भरून निघेल असं भरपेट. हे म्हणजे 2-3 महिने विश्रांती घेतलेल्या खेळाडूस थेट ऑलिंपिक च्या मैदानावर उतरवल्या सारखे. ज्याप्रमाणे असा खेळाडू मोठे आव्हान पेलू शकत नाही तसाच दिवसभर विश्रांतीने थोडा मंदावलेला अग्नी ही पंच- पक्वान्नानी सजलेला जड आहार पचवू शकत नाही. याबद्दल चुलीचं उदाहरण बघू. चुलीमधे बराचवेळ काही सरपण घातलं नाही तर आग विझते, मग पुन्हा पेटवताना आपण कागदाचे कपटे, काटक्या वगैरे टाकून आग पेटवतो व मग मोठ-मोठी लाकडे टाकली तरी ती सहज स्वाहा होतात. तसचं उपवास सोडतानाही मंदाग्नीचा विचार करून हलके, ताजे जेवण (उदा. गरम भात, तूप, वरण ) असा आहार घेतल्यास आहार पचतो, पाचकाग्नी वाढतो व आपण दुसर्‍या दिवसांपासून जो काही आहार घेऊ तो पचवण्यास सक्षम ही होतो.जर उपवासा मागची ही आयुर्वेदिक अग्नी संकल्पना समजून घेऊन उपवास केला तर आध्यात्म व आरोग्य दोन्ही ही हेतू साध्य होतील व आनंदाने म्हणता येईल

    - "श्रावणमासी हर्ष मानसी,
    हिरवळ दाटे चोहिकडे॥
    क्षणात येई सरसर शिरवे,
    क्षणात फिरूनी उन पडे ॥

    -- वैद्य प्रसाद सणगर,
    कोल्हापूर

    (आरोग्यदूत या WhatsApp ग्रुपमधून साभार)

      August 26, 2016


  • कोकणातील कातळशिल्पे

    मार्च 2022 मध्ये युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या तात्पुरत्या यादीमध्ये कोकणातल्या रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनुक्रमे 5 आणि एक आणि गोव्यातील एक ठिकाण अशा एकूण 7 कातळ खोदशिल्पे असलेल्या गावांचा समावेश करण्यात आला. कोकणाला खूप मोठा सांस्कृतिक ऐतिहासिक वारसा लाभला आहे. ह्या कातळ खोद चित्रांच्या रूपाने तो पुढे येत आहे.

      January 17, 2023


  • श्री गणेश पंचरत्न स्तोत्र – भाग १

    भगवान जगदगुरु आदि शंकराचार्यांचे स्तोत्र वाङमय म्हणजे परमानंदाचा शब्दावतार. यापैकी एकेका श्लोकाचा दररोज रसास्वाद घेण्याचा प्रयत्न करुया, विद्यावाचस्पति प्रा स्वानंद गजानन पुंड यांच्या सिद्धहस्त लेखणीतून उतरलेल्या श्री शांकर स्तोत्ररसावली या आध्यात्मिक सदरातून.....


    मुदा करात्तमोदकंसदा विमुक्तिसाधकं !
    कलाधरावतंसकंविलासिलोकरञ्जकम् !!
    अनायकैकनायकं विनाशितेभदैत्यकं !
    नताशुभाशुनाशकं नमामि तं विनायकम् !!१!!

    भगवान श्री गणेशांच्या दिव्य वैभवाचे आनंदगायन करताना भगवान जगद्गुरु आदि शंकराचार्य स्वामी महाराज शब्दकळा साकारतात,

    मुदा करात्तमोदक- मुदा अर्थात आनंदाने. ज्यांनी आनंदाने हाती मोदक धारण केला आहे असे. आतून, आपला आपल्याला होणारा आनंद म्हणजे मोद. भगवान स्वत: त्या आनंदाने युक्त आहेत आणि भक्तांच्या जीवनात तो आनंद देण्यासाठी त्यांनी हातात मोदक घेतला आहे. मोद म्हणजे आनंद , तो निर्माण करतो तो मोद-क.
    सदाविमुक्तिसाधक- हा आनंद प्राप्त होणे हेच मुक्‍तीचे स्वरूप. साधकांना सदैव मुक्ती प्रदान करणारा आहे माझा मोरया.

    कलाधरावतंसक - कलाधर म्हणजे चंद्र. त्याच्या विविध कला असतात. ती चंद्रकला मस्तकावर धारण करून सौंदर्यपूर्ण असणारे ते कलाधरावतंसक.

    विलासिलोकरञ्जक- स्वर्गाला विलास लोक असे म्हणतात. तेथे देवता तथा स्वर्गीय जीव विविध आनंदांचा चा उपयोग घेत विलास करीत असतात. त्या सगळ्यांना आनंद प्रदान करणारे मोरया विलासिलोकरञ्जक संबोधिले जातात.

    अनायक-एकनायक- त्यांच्यावर कोणाचीही सत्ता चालत नाही म्हणून त्यांना म्हणतात अनायक. तसेच ते एकटेच सगळ्या विश्वाचे नायक असल्याने त्यांना म्हणतात एकनायक .

    विनाशितेभदैत्यक- इभ म्हणजे हत्ती. हा सर्वाधिक बलशाली जीव. तसे जे भयंकर दैत्य ते इभदैत्य.

    श्री मुदगल पुराणात आपल्याच आत असणाऱ्या काम, क्रोधादिक षट् विकारांना आणि ममत्व तथा अहंकार यांना राक्षस रूपात वर्णिले आहे. यासर्व महाभयानक राक्षसांचा विनाश करणारे श्री गणेश विनाशितेभदैत्यक असतात.

    नताशुभाशुनाशक- नत अर्थात शरण आलेल्यांचे अशुभ अर्थात दुःख, दैन्य, दारिद्र्य, पीडा, व्यथा इ. आशु म्हणजे तत्काल नष्ट करणारे भगवान गणेश भक्तांसाठी नताशुभाशुनाशक आहेत असे भगवान शंकराचार्य स्वामी महाराज म्हणत आहेत.

    भगवान श्री गणेशांच्या याच स्वरूपाने आनंदित होऊन ते म्हणतात- नमामि तं विनायकम् !

    भगवान गणेशांवर कोणाचीही नायकत्व चालत नाही त्यामुळे त्यांना वि-नायक म्हणतात. तसेच ते एकटेच सगळ्यांचे विशेष नायक असल्यानेही त्यांना वि-नायक म्हणतात.

    अशा विनायक भगवान गणेशांना मी वंदन करतो.!! १!!

    -- प्रा. स्वानंद गजानन पुंड

      January 1, 2020


  • आजचा आरोग्य विचार – भाग तेरा

    सकाळी लवकर उठावे. दोन श्लोक म्हणावेत. तळहात पहावेत. व्यायाम करावा, सर्व आह्निके आवरावीत. आणि देवासमोर उभे राहून प्रार्थना करावी. मनातल्या मनात नको. अदृश्यातील देवाची नकोच. आपल्या संस्कृतीमधे उपासना सगुणाची सांगितलेली आहे. सगुणाच्या उपासनेचा टप्पा पूर्ण झाला की निर्गुणाची उपासना करायची.

      February 13, 2018