(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • जाडेपणा – एक समस्या…

    आपल्या देशात सौंदर्याच्या ज्या परिभाषा आहेत त्याच मुळात चुकीच्या आहेत. त्या परिभाषेतूनच परीचा जन्म झालेला असावा. सुंदर स्त्री म्हणजे सडपातळ ! आणि जाडी स्त्री म्हणजे कुरूप आणि म्हणता येणार पण दुर्लक्षित करावी अशी. सध्या हा विषय ऐरणीवर आलाय त्याला बऱ्याच गोष्टी कारणीभूत आहेत.

      February 10, 2021


  • चोर कृष्णाची दही हंडी

    मराठी भाषा किती प्रगल्भ आहे पहा. पंढरीच्या विठुरायाला कृष्णाचे रूप मानून अभंग गायला जातो,
    ” गळा बांधुनिया दोर, धरला पंढरीचा चोर”
    देवाला चोर म्हणून त्याची पूजा केली जाते. कृष्णालाही माखन चोर म्हणतात. कृष्ण दही-लोणी चोरत असे. त्यासाठी गोकुळातील सवंगड्याना एकत्र बोलवी आणि गोकुळातल्या महिलांनी वर बांधून ठेवलेल्या मटक्यातील दही किंवा लोणी चोरून वाटून खात असे.

      March 8, 2026


  • “माणूस” म्हणून….!

    मी “बाबासाहेबांवर” काही लिहिले.. लाेकांनी मला फोन करून विचारले “तुम्ही बौध्द किंवा दलित आहात का…?” मी आपल्या ” शिवछत्रपतींवर”काही लिहिले.. लाेकांनी मला फोन करून विचारले “तुम्ही मराठा आहात का…?”

      September 4, 2017


  • डीएनएमधील नत्रयुक्त घटक

    डीएनएमध्ये असलेले प्युरीन आणि, पिरिमिडीन बेसेस डीऑक्सिरायबोज साखर आणि प्रथिनांच्या पचनातून मिळणाऱ्या अमिनो आम्लांपासून बनतात. यातील ॲडेनीन, रायबोज साखरेबरोबर अँडिनोसिनचा रेणू बनवितो. अँडिनोसिन फॉस्फेटशी बंध तयार करून असे काही रेणू बनवितो ज्यात विविध प्रक्रियांसाठी लागणारी उष्मांक शक्ती सामावलेली असते.

      October 24, 2023


  • नकोत नुसत्या भिंती

    वाढत्या शहरीकरणाच्या रेट्यात घराचे स्वप्न गरीबांच्याच नाही, तर मध्यमवर्गीयांच्याही आवाक्याबाहेर गेले आहे. मागणी खूप आणि पुरवठा कमी; त्यामुळे जिथे मिळेल, जशी मिळेल तशी जागा घ्या अशी आज परिस्थिती आहे.

      December 20, 2023


  • श्री वेंकटेश प्रपत्ती – मराठी अर्थासहित

    स्वामी प्रतिवादी भयंकरम् अण्णा रचित `श्री वेंकटेश प्रपत्ती’ आणि त्याचा मराठी अनुवाद…

      June 23, 2020


  • दि. १ एप्रिल १९५५ – गीतरामायणातील पहिले गीत प्रसारित

    दि. १ एप्रिल १९५५ ला रामनवमीच्या मुहूर्तावर गीतरामायणातील पहिले गीत सादर झाले.

      April 15, 2017


  • श्री त्रिपुरसुंदरी स्तोत्रम् – ३

    कदंबवनशालया कुचभरोल्लसन्मालया,
    कुचोपमितशैलया गुरुकृपालसद्वेलया |
    मदारुणकपोलया मधुरगीतवाचालया ,
    कयापि घननीलया कवचिता वयं लीलया ॥३||

    श्रीविद्या, श्रीकामेश्वरी, श्रीराजराजेश्वरी अशा विविध नावांनी शास्त्र जिची आराधना करते अशा आई जगदंबा त्रिपुरसुंदरी चे वर्णन करताना जगद्गुरु आदि शंकराचार्य स्वामी महाराज म्हणतात,
    कदंबवनशालया- कदंब वृक्षाच्या फांद्यांनी निर्माण केलेल्या घरात निवास करणारी.
    कदंब वृक्ष हा शाश्वताचे, चिरंतनाचे प्रतीक. त्यामुळे आईच्या चिरंतनत्वांचा विचार मांडण्यासाठी आचार्यश्री कदंबवनचारिणीं, कदंबवनवासिनीं, कदंबवनशालया अशा शब्दात वारंवार आई आणि कदंब वृक्षाचा सहसंबंध अधोरेखित करीत आहेत. कुचभरोल्लसन्मालया-हृदय मंडलावर मोत्यांच्या विविध माला धारण केल्याने सुंदर दिसणारी.
    कुचोपमितशैलया- पर्वताकार विशाल स्तनमंडल असणारी. गुरुकृपालसद्वेलया- गुरुकृपारूपी तरंगांनी संपन्न.
    गुरुकृपेने परमात्मा प्राप्त होतो. परमात्म्याचे स्वरूप आहे आनंद. जसे जल संग्रहावरील तरंग जलाचेच असतात तसे आनंद सागरातील तरंगही आनंदाचेच असतात.
    तरंग हे स्थिर असणाऱ्या जलाचे चंचल स्वरूप आहे.
    तशा स्वरूपात जी मूलतः निश्चल निर्विकार असूनही चैतन्य स्वरूपात विश्व संचालन करणारी. या आनंद स्वरूपामुळे गुरुकृपा.
    मदारुणकपोलया- मधु प्राशनाने कपोल म्हणजे गालावरचा प्रदेश लालबुंद झालेली. मधुरगीतवाचालया - मधुर गीत गुणगुणत असणारी.
    कयापि घननीलया कवचिता वयं लीलया - घनश्याम असणाऱ्या कोणत्या देवीच्या लीलेमुळे आम्ही कवच असल्याप्रमाणे सुरक्षित आहोत?
    अर्थातच आई जगदंबा त्रिपुरसुंदरीचीच ही कृपा आहे.

    -- प्रा. स्वानंद गजानन पुंड

      June 4, 2020


  • श्रीहरी स्तुति – ३७

    प्राणापासून बुद्धी पर्यंत विचार करत असताना या प्रत्येक जागी जरी चैतन्याचा आविष्कार दिसत असला तरी तो प्रतिबिंब रूप आहे. ते माझे स्वरूप नाही. अशाप्रकारे निश्‍चिती झालेल्या त्या साधकाला आत्मतत्वाचे घ्याल अशा नकारात्मक स्वरुपात होणे उपयोगाचे नाही .

      November 27, 2020


  • वर्तनशैली – मोबाईल वापरताना !!

    पूर्वीच्या काळी आपल्या सर्वांची जीवनशैली आणि राहणीमान, ही सोपी आणि सुटसुटीत आणि एकसंध अशी होती. एकत्र कुटुंबामध्ये सर्वप्रकारचे सण, कार्ये उत्सव साजरे व्हायचे. शेती, नोकरीधंदा तत्सम उद्योगामध्ये घरची मंडळी व्यस्त असायची. त्यामुळे जगण्याला फारसे पदर नसायचे वा सार्वजनिक वावर हा क्वचित प्रसंगी असायचा. आजच्या गतिमान युगात मात्र बदलत्या वेगवान जीवनशैलीमुळे सर्वांचा सार्वजनिक जीवनातला सहभाग वाढला आहे.

      December 26, 2015