(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • श्रीहरी स्तुति – २८

    त्या परमात्म्याला स्वतःच्या अंतरंगात आणि आपल्याला त्याच्या चैतन्याच्या अंशरुपात कशाप्रकारे समजून घ्यायचे? त्याचे निरूपण करताना आचार्य श्री पुढे म्हणतात,

      November 18, 2020


  • नवे वर्ष,नवी परीक्षा

    सुधारक'कार आगरकरांचे 'शिष्य’ 'तुतारी'कार केशवसुत आपल्या ‘तुतारी’या कवितेत सांगतात-

    "जुने जाऊ द्या मरणालागुनि
    जाळूनी किंवा पुरुनी टाका
    सडत न एका ठायी ठाका
    सावध ऐका पुढल्या हाका
    खांद्यास चला खांदा भिडवूनी"

    असा एल्गार करणारा संदेश त्यांनी नव्या पिढीला दिला.जुन्या गोष्टींना कवटाळून न बसता काळाचे भान ठेवून तरुणांनी नवे विचार आत्मसात करावेत,असे त्यांनी सांगितले.

    क्रांतीकारी कवी ज्ञानपीठ विजेते सर्वांचे आवडते कुसुमाग्रज आपल्या 'प्रेम' या कवितेत म्हणतात-
    "उन्हाळ्यातल्या ढगासारखा हवेत रहाशील फिरत
    जास्तीत जास्त बारा महिने बाई बसेल झुरत
    नंतर तुला लगिनचिठ्ठी
    आल्याशिवाय राहील काय?
    म्हणून म्हणतो जागा हो
    जाण्यापूर्वी वेळ..."

    तर मित्रांनो,आजचा जमाना हा सतत अपडेट राहण्याचा आहे.जसे आपले स्मार्टफोन तुम्ही सतत अपडेट करत असतात.तसेच तुम्हांला पण अपडेट रहावे लागणार आहे.'लोक काय म्हणतील'? हे आता जुने झाले आहे.ते आता अपडेट करुन 'दिल जो कह रहा हे सुनो' हे नवीन अपडेट तुम्हांला तुमच्या सिस्टीम मध्ये इंस्टॉल करुन घ्यावे लागणार आहे.नाहीतर तुम्ही सतत हँग होणार हे नक्की.

    मनुष्य हा सामाजिक प्राणी आहे.समाजाने लागू केलेले नियम आपण पाळत असतो.भलेही ते आपल्या हिताचे नसो.'लोक काय म्हणतील' ही भावना आपला पिच्छा सोडत नाही.मी असं केलं तर लोक काय म्हणतील यातून कोणीही सुटत नाही.(अगदी प्रेमविवाह करायचा पण लोक काय म्हणतील?)

    थोडे स्वार्थी व्हा.सवयींचे गुलाम बनू नका.शेवटी एक तंत्र सांगतो,माणसाला गुलामगिरी सहन होत नाही.किंवा कोणी बोललेलं ही सहन होत नाही.कोणी जर म्हटलं हे तुला जमणार नाही तर आपण पेटून उठतो व ती गोष्ट करुन दाखवितो.

    मी माझ्या मनाला नेहमी म्हणतो,'हे तुला जमणार नाही'.मग माझे संपूर्ण शरीर सर्व शक्ती एकवटून बंड करुन उठते(१८५७ सारखे) व ती गोष्ट प्राप्त केल्याशिवाय शांत बसत नाही.

    -- दीपक गायकवाड

      January 5, 2017


  • नवं सौरचक्र

    सूर्याच्या पृष्ठभागाचं तापमान सुमारे सहा हजार अंश सेल्सियस इतकं असतं, तर सौरडागांचं तापमान हे सुमारे तीन हजार सेल्सियस इतकं असतं. हे सौरडाग जरी सूर्याच्या इतर पृष्ठभागाच्या तुलनेत थंड असले तरी, हे सौरडाग म्हणजे अतितीव्र चुंबकीय क्षेत्राची ठिकाणं आहेत. सूर्यावरून उफाळणाऱ्या सौरज्वाला या, याच डागांच्या परिसरात निर्माण होतात.

      February 17, 2022


  • आधुनिक आक्रमण!

    प्रकाशन दिनांक :- 28/03/2004

    नित्य नवीन बदलांना स्वीकारीत काळ झपाट्याने पुढे सरकत आहे. प्रत्येक दिवशी उगवणारा सूर्य कोणता तरी नवा बदल घेऊन येत आहे. काही बदल अगदी सहज जाणवण्याइतपत ठळक आहे तर काही बदलांची प्रक्रिया अतिशय सुक्ष्म आहे.

      March 28, 2004


  • बेरियम टेस्ट

    हे फोटो काढण्यास क्ष किरण तज्ञांना आधी भेटणे जरुरीचे आहे कारण यासाठी पुन्हा उपाशी पोटी जावे लागते. व आदल्या दिवशी जुलाबाचे औषधही घ्यावे लागते. जर बेरियम टेस्ट फक्त पोटासाठी (स्टमक, ड्युओडेनम) असले तर फक्त १५ मिनिटेच लागतात व यात स्पेशल डबल कॉंन्ट्रास्ट स्टडी म्हणजे हवा व बेरियम मिश्रण करुन पोटाचे अल्सरसाठी फोटो काढले जातात.

      September 9, 2010


  • पारसी समाजाचे नववर्ष नवरोज

    ग्रेगरी कॅलेंडरनुसार, पतेती किंवा नवरोज वसंत ऋतूमध्ये साजरा केला जातो. पारशी समाज मूळचा इराण या देशातील. या देशाचे पूर्वीचे नाव म्हणजे पर्शिया, पारशी लोकांचे वास्तव्य असलेला देश. पण चौदाव्या शतकात इराणमध्ये धर्म परिवर्तनाचे वारे सुरु झाले आणि पारशी लोकांवर अत्याचार करण्यात येऊ लागला. त्यामुळे पारशी समुदायाने तो देश सोडला. यापैकी मोठा समुदाय हा भारतात आला आणि मुंबईत वास्तव्य करु लागला.

      March 21, 2022


  • मेकालेच्या शिक्षणाने आमच्या संवेदना शून्य केल्यात..!

    इंग्रजांना हद्दपार करून ६५ वर्षे झालीत, भारतीयांच्या संवेदना नष्ट करणाऱ्या लॉर्ड मेकालेच्या कथित शिक्षण पद्धतीला केव्हा हद्दपार करणार आहोत ? जाती, धर्म,पंथ, प्रांत, भाषा या शुल्लक बाबींवरून लढण्यासाठी प्रवृत्त करणाऱ्या कलंकाला केव्हा पुसणार आहोत ?

      June 12, 2012


  • अगस्त्य/हादगा

    अगस्त्य/हादगा

    ।। सर्वेश्वराय नम: अगस्तीपत्रं समर्पयामि।।

    अगस्त्याचे ७-१० सेंमी उंचीचे अल्पायूषि व लवकर वाढणारा वृक्ष असतो.काण्ड सरळ व विरळ फांद्याचे असते.पाने १५-३० सेंमी लांब असतात व त्यास ४१-६१ पत्रके असतात.फुल पांढरे,नौकाकार,मंजिरी स्वरूपात असते.फळ ३० सेंमी लांब वाकडे असते व त्यात १५-२०बिया असलेली शेंग असते.

    ह्याचे उपयुक्त अंग पंचांग असून हा चवीला कडू,व थंड गुणाचा असतो व गुणाने हल्का व रूक्ष असतो.हा कफपित्तशामक आहे.

    चला आता आपण ह्याचे उपयोग पाहुयात:

    १)अगस्त्याची त्वचा व पाने जखमेवर लावायला व सुजेवर उपयुक्त आहेत.

    २)अगस्त्याच्या पानांची व फुलांची भाजी कृमीमध्ये उपयुक्त अाहे.

    ३)अगस्त्याचा सालीचा रस हा कफमोकळा करतो म्हणून ह्याचा उपयोग सर्दी,खोकला ह्यात होतो.

    ४)अगस्त्याच्या फुलांचा उपयोग स्त्रीयांच्या अंगावर पांढरे जाणे ह्या आजारावर होतो.

    ५)अगस्त्याचे पिकलेले फळ हे मेध्य आहे.

    (सुचना: ह्या लेखातील वनस्पती वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे )

    वैद्य(सौ)स्वाती हेमंत अणवेकर,
    आरोग्य आयुर्वेदीक क्लिनीक,
    म्हापसा गोवा.
    संपर्क:९९६०६९९७०४

      August 20, 2017


  • आहारातील बदल भाग ५६ – चवदार आहार -भाग १७

    तिखट पदार्थात सर्वात जास्त वापरला जाणारा पदार्थ म्हणजे मिरची. कोशिंबीरी लोणच्या पासून ते सर्व भाज्या आणि फक्त मिरचीच्या ठेच्यापर्यत आपला ठसका दाखवणारी ही मिरची, तिखट पदार्थात आपले स्थान अबाधित राखून आहे.

    अति सर्वत्र वर्ज्ययेत, या न्यायाने प्रदेश विचार करून, मिरचीचा वापर युक्तीने करावा. काही जण मिरच्या चराचरा चावून खातात, त्यांना भविष्यात काही गंभीर आजारांना सामोरे जावे लागण्याची शक्यता असते.

    सुकी लाल मिरची आणि हिरवी ओली मिरची यामधे तुलना करायची झाल्यास सुकी लाल मिरची त्यातल्या त्यात बरी म्हणावी. कढी, पिठले, डाळ तडका इ. पदार्थांना लाल मिरचीशिवाय शोभा नाही.
    आणि कोशिंबीर, कांदेपोहे, सोलकढी, आमटी या मधे हिरव्या मिरचीचा वास, काही खास असतो.

    पण या हिरव्या मिरचीची साल किंवा बी आतड्यांना जर चिकटून राहिली तर तिथे व्रण म्हणजे जखम होण्याची शक्यता असते. म्हणजेच ही साल किंवा बी पोटात जाताना अगदी बारीक होऊन गेली तर धोका तेवढा नाही.

    यासाठी युक्ती काय करावी ?
    एकतर या हिरव्या मिरचीचे तुकडे करून वापरण्याऐवजी, ती फोडणीमधे अख्खीच वापरावी. म्हणजे त्याचा खास वासपण येईल आणि खाताना ती बाजूला काढून पण ठेवता येईल. किंवा याची सरळ पेस्ट म्हणजे चटणी करून ती वापरावी. कमी पुरते. बी आणि साल पण चिकटून रहाण्याची शक्यता कमी ! ( फोडणीमधे अख्खी वापरताना पुढचे टोक जरा मोडावे, नाहीतर गरम तेलात ती फुटते, आणि गरम तेल उडते. सावधान ! )

    ज्यांना तिखट तर हवेच आहे, पण हिरव्या मिरचीने त्रास होतो, त्यांनी जिथे शक्य आहे तिथे लाल मिरची वापरावी. ही मिरची पूर्णपणे पिकल्यानंतर वाळवून ठेवलेली असते. त्यामुळे पचायला हलकी किंवा त्रास द्यायला हिरवीपेक्षा सहनशील असते.

    लाल मिरचीची पावडर तर सहजपणे सर्व ठिकाणी वापरली जाते. रंग येण्यापासून, चव वाढवणे आणि सजावटीपर्यंत ही लाल मिरची उपयोगी ठरते.

    मिरचीच्या सालीचे गुण बघितले तर एक महत्वाचा गुण लक्षात येतो, तो म्हणजे ती कफाच्या विरोधी गुणाची आहे. चिकटपणा कमी करणारी आहे, रक्तातील चिकटपणा पण कमी करणारी आहे. रक्तातील चिकटपणा म्हणजे आजच्या भाषेत, कोलेस्टेरॉल !

    आणि मिरचीची बी, याच्या बरोबर विरूद्ध गुणाची म्हणजे मधुर रसाची ! साठवणीची मिरचीपूड करताना, त्यातील बीया काढून टाकल्या तर ती मिरचीपूड टिकते. नाहीतर मधुर रसाची असल्याने, बीयांना किड लागण्याची शक्यता जास्ती असते.

    म्हणून तर प्रमेहात आणि स्थौल्यात मिरचीची बी वर्ज्य सांगितली आहे.... इति कै. विद्याताई जळूकर मॅडम.

    पोपट मिरच्या खातो, पण साल नाही खात. फक्त गोड बीयाच खातो.

    तिखट खाण्यात पण एक मजा असते. भाजी, उसळ आणि आमटी या तिखट पदार्था व्यतिरिक्त आणखी काही विशिष्ट तिखट पदार्थ आपल्या खाण्यात असतात. जे तिखट असतातच, पण त्यांची काही खास तिखट चव हेच त्यांचे वैशिष्ट्य असते. जसे पावभाजी, पाणीपुरी, भेळ, भजी, बटाटेवडे, आणि त्याच्याबरोबरची ओली सुकी तिखट चटणी.

    हे पदार्थ म्हणजे अगदी जानी दुश्मन नाहीत, पण ते डाव्या बाजुलाच वाढलेले आहेत, हे विसरूनही चालणार नाही.

    वैद्य सुविनय दामले
    कुडाळ, सिंधुदुर्ग
    9673938021
    17.11.2016

      November 17, 2016


  • अपरिचित इतिहास

    अपरिचित इतिहास

    शिवरायांच्या स्वराज्याच्या हाकेने प्रेरित झालेले मावळातले महादेव कोळी वीर खेमा नाईकाच्या नेतृत्वात मुघल सत्तेविरुद्ध दंड थोपटते झाले. शिवनेरी सकट आपले सारे किल्ले त्यांनी जिंकून घेतले. दख्खन पादाक्रांत करण्यासाठी तेव्हा शहजादा असलेला औरंगजेब लाखोंचे सैन्य घेऊन आला होता. त्याने एका मुघल सरदारास हजारोंची फौज देऊन हे महादेव कोळ्यांचे बंद मोडून काढण्यास पाठविले. एवढ्या प्रचंड फौजेपुढे मावळे टिकले नाहीत. कित्येक मारले गेले आणि खेमा नाईकासमवेत दीड हजार बंदी बनविण्यात आले.मुघलांची दहशत बसावी म्हणून नाईकाच्या रक्तसंबंधातले तमाम लोक पकडून आणून कापले गेले. नाईकास निर्वंश केले आणि सगळ्या दीड हजार बंदी केलेल्यांची शीरे कापली गेली. त्या शिरांच्या ढीगावरच एक चबुतरा बांधण्यात आला. हाच तो कोळी चौथरा जो आजही शिवनेरीवर पाहायला मिळतो. इतिहासाच्या कुठल्याच नोंदीत त्या वीरांची नावे उपलब्ध नाहीत. नाईकाचे खरे नाव, गाव आदी काहीच उपलब्ध नाही. खेमा/खेमू नाईक असा त्या नेत्याचा उल्लेख फक्त काही ठिकाणी आढळतो.

    महादेव कोळ्यांचा शिवनेरीवर संहार

    पुणे परिसरातील शिवरायांच्या कारवाया आदिलशाहीला खुपत होत्या. मुघलांना जरी त्या ठाऊक असल्या तरी अजून त्यांना त्यांचा थेट उपसर्ग होत नव्हता. योगोयोग म्हणावा का ते माहित नाही पण त्याच सुमाराला काही महादेव कोळी लोकांनी मुघलांविरुद्ध आघाडी उघडून जुन्नर व शिवनेरीचा ताबा घेतला.

    ह्यापूर्वी हा भाग निजामशाहीकडे होता. निजामशाही पडल्यानंतर सीमाभागाकडे आदिलशाहीचे व मुघलांचे थोडे दुर्लक्ष होत होते. कदाचित ह्याचा फायदा घेऊन ह्या महादेव कोळ्यांनी त्या प्रांतावर अधिकार स्थापित केला. मुघलांनी ह्यावर लगेच उपाययोजना करण्यासाठी व महादेव कोळ्यांना पस्त करण्यासाठी एक भली मोठी फौज पाठवली.

    शिवनेरीला वेढा पडला व लवकरच महादेव कोळ्यांच्या नवख्या सैन्याने बलाढ्या मुघल सैन्यापुढे नांगी टाकली. सुमारे १५०० महादेव कोळ्यांना जेरबंद करण्यात आले. त्यांचे अतोनात हाल करून नंतर माथ्यावरच्या एका चौथऱ्यावर त्यांचा शिरच्छेद करण्यात आला. ह्या नरसंहाराची आठवण म्हणून आज त्या चौथऱ्याला कोळी चौथरा नावाने संबोधिले जाते. नंतर त्या चौथऱ्यावर एक घुमटी बांधली गेली व त्यावर फारसीमधे दोन शिलालेखदेखिल आहेत.

    दुर्दैवाने आज त्या महादेव कोळ्यांची किंवा त्यांच्या म्होरक्याची नावे उपलब्ध नाहीत. इस्लामी राज्यकर्त्यांनी त्यावेळी केलेल्या अनेक नरसंहारांपैकी एक म्हणून ही घटना गणली जाईल.

    संदर्भग्रंथ

    • श्री राजा शिवछत्रपती खंड १, पृष्ठ ६९९-७११
    • शिवनेरी, नाणेघाट, हरिश्चंद्रगड व परिसर, पृष्ठ ४३-४४

    © *शिवकालीन सत्य इतिहास ग्रुप*

    jiRaje.co.in/

      November 6, 2016