(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • ऋणानुबंध

    1975-1976 मध्ये बँकेत सहजासहजी नोकरी मिळत असे त्या काळातील गोष्ट. नोव्हेंबर 1976 मध्ये एका राष्ट्रीयकृत बँकेत नोकरीला लागलो. त्यावेळेस माझे वय अवघे 19 वर्षे पूर्ण. पहिलीच नोकरी. आधी कुठे नोकरीचा अनुभव नाही. मी ज्या दिवशी बँकेत नोकरीला रूजू झाले.

      April 24, 2023


  • चिनी वस्तू स्वस्त का आहेत?

    पुण्यातील एक नामवंत उद्योगपती चंदू चव्हाण यांचा व्यापारी अनुभवावर आधारीत हा लेख, भावनांच्या डोहात डुंबणाऱ्या देशप्रेमी लोकांना विचार करायला लावणारा हा लेख.. फेसबुकवरुन आला तसा शेअर केलाय. वाचा आणि प्रतिक्रिया लिहा.

    खुळचट राष्ट्रवादी penny wise pound foolish आहेत.ती त्यांच्या अभिमान cum फुकाचा गर्व या समर्थ रामदासांनी सांगितलेल्या मूर्खपनाच्या लक्षणाला साजेसं वर्तन आहे.

    असो या लेखाचा उद्देश आपण जो देश म्हणूंन आर्थिक/सामाजिक/राजकीय मुर्खपणा करतो आणि त्यामुळे आपल्या देशाच्या वस्तुंच्या किमती जास्त आहेत त्याबद्दल आहे.

    चांगल्या वस्तू स्वस्त बनवण्यासाठी गरज आहे इकॉनॉमी मध्ये efficiency of capital असण्याची. कशाने येते हि efficiency of capital?

    मी चीन मध्ये 45 दिवस राहिलो, शेतकऱ्यांच्या घरी राहिलो, 10000 पेक्षा जास्त किलोमीटर passenger train ने प्रवास केला. युनिव्हर्सिटी च्या प्राध्यापकांना भेटलो, शेकडो लोकांना भेटलो.एवढच जाणून घ्यायचं होतं की 1950 साली भारतापेक्षा मागासलेला असलेल्या देशाने एव्हडी सामाजिक आणि आर्थिक प्रगती कशी केली?

    काही कारणं सांगतो जी महत्वाची आहेत. मूलभूत प्रश्न सोडवल्याशिवाय हा प्रश्न सुटणार नाही.

    1) कंमुनिस्ट क्रांतीने स्त्रियांना मुक्त केलं, जबरदस्तीने का होईना शर्ट पॅन्ट घालायला लावली, केस कापायला लावले आणि कामाला लावलं.चीन च्या आणि भारताच्या GDP मधला फरक समजून घ्यायचा असेल तर फक्त पडद्यात आणि बुरख्यात असलेल्या स्त्रियांचं उत्पन्न (जर त्यांनी काम केलं असतं तर) gdp मध्ये जमा करा आणि 65 वर्षाचं compounding करा. चीन शी स्पर्धा करायची असेल तर पाहिलं काम स्त्रीमुक्ती चं करा.

    एका बाजूला कोट्यवधी बालमजूर शाळेत जात नाहीत आणि दुसऱ्या बाजूला कोट्यवधी स्त्रिया चूल आणि मूल यात अडकवून ठेवण्याविषयी तुम्ही काही करत नसाल तर तुमची देशभक्ती नपुंसक आहे. तुम्हाला त्याची लाज वाटली पाहिजे

    कारण देश म्हणजे देशातील माणसे असतात

    2) कंमुनिस्टांनी धर्म संपवला, आता बौद्ध मंदिरात फक्त पर्यटक जातात.
    धर्मांच्या मठात आणि ट्रस्ट मध्ये राष्ट्रीय बचत चीन मध्ये अडकली नाही ती productive use मध्ये येऊन capitalism चा विकास चिनी कंमुनिस्ट पार्टी च्या नियंत्रणाखाली झाला.

    भारतात प्रचंड पैसा धर्मामुळे unproductive कामासाठी मंदिर/मशीद/चर्च मध्ये ब्लॉक झाला आहे

    आज भारतात जवळपास 30 टक्के deposit हे तिरुपती/शिर्डी/मशीद/चर्च सारख्या धार्मिक ट्रस्ट/सोसायटी/क्लबचे आहेत,
    त्यांना बँका 10 टक्के व्याज देतात त्यामुळे उद्योगांवर कर्जावरील व्याजाचे दर 13-14 टक्के आहेत. चीन मध्ये हेच व्याजाचे दर उद्योगांसाठी 6 टक्के आहेत,

    म्हणजे आपण तिरुपती आणि त्यासारख्या मंदिरांना संपत्ती ब्लॉक करायची. त्या संपत्तीला 10 टक्के व्याज द्यायचं आणि आपल्या उद्योजकांना सांगायचं वस्तू स्वस्त द्या.
    कसं शक्य आहे?

    बाकी 50 टक्के deposits गव्हर्नमेंट आणि कॉर्पोरेट्स चे आहेत, गरीब/मध्यमवर्गीय जनतेचे deposits फक्त 20 टक्के आहेत.
    रिटेल loans जी लोकांनी घेतली आहेत ती जवळपास 30 टक्के आहेत त्याला व्याजाचे दर अजून जास्त आहेत, ढोबळमानाने असं म्हणता येईल की 50 टक्क्यांपेक्षा जास्त व्याज सामान्य जनता भरते

    हि व्याजरूपी लूट कोणाच्या बोडक्यावर टाकली जाते-साईबाबा/तिरुपती/मंदिर/मशीद इत्यादी, त्यांची संपत्ती जप्त केली तर
    हाऊसिंग/education/शेती या साठी लोन एक टक्क्याने देता येतील. आणि उद्योगांसाठी 5-6 टक्क्याने. मग इथले उद्योजक वस्तू स्वस्त बनवू शकतील.

    धर्म नष्ट करा ती सर्वात मोठी देशभक्ती होईल.
    चिनी वस्तू आपोआप महाग आणि भारतीय वस्तू स्वस्त होतील. धार्मिक मूर्खपणामुळे efficiency of capital कमी होते

    3) चीन मध्ये जमिनीची मालकी राष्ट्राची असल्यामुळे सगळ्या जमिनीवर शेती होते, सगळ्या तळ्यात मत्स्य शेती होते, त्यामुळे अन्न धान्य/ फळं/मास मच्छी हि खूप स्वस्त आहे. त्यामुळे लोकांचं जीवनमान चांगलं आहे.

    भारतातल्या 40 टक्के शेतीयोग्य जमिनीवर शेतीच होत नाही. जमिनीच्या मालकांना शेतीत इंटरेस्ट नाही आणि मजुरांकडे शेती नाही.

    तळ्यात मत्स्यशेती तर नगण्य होते, त्यामुळे अन्नधान्याच्या किमती खूप जास्त आहेत. या व अनेक धार्मिक कारणांमुळे भारत in general कुपोषित आहे. Business हे देखील युद्ध असतं, कोट्यावधींना कुपोषित/वंचित ठेवून तुम्ही ते जिंकू शकत नाही. इतिहासात तसं केल्याने आपण खूप वेळा हरलो आहोत.

    हे बदला धर्माना जमिनीत गाडा .ती खरी देशभक्ती, चिनी वस्तूंवरील बंदी तुम्ही करू पन शकत नाही आणि ते करणं मुर्खपणा आहे

    चीन ची भांडवलशाही यामुळे ही अमेरिकेपेक्षा efficient आहे. आज अमेरिकेपेक्षा पेक्षा चीन ची अर्थव्यवस्था PPP बेसिस वर मोठी आहे. हि जादू त्यांनी कॅपिटलीसम आणि कंम्युनिसम चं त्यांच्या देशाला योग्य मिश्रण ठेवून आणि धर्म संपवून केलेलं आहे. चीन ला शिव्या घालणारे आणि वस्तूंवर बहिष्कार टाका म्हणणारे माझ्या मते अभ्यास नं केलेले आहेत. त्यांना आग सोमेश्वरी असताना बंब रामेश्वरी पाठवणारे मूर्खच म्हणायला लागेल. हे मूर्ख आम्ही मुतून एक गवताची आग कशी विझवली यात यात खुश आहेत.

    असो शेवटी मुखशुद्दी साठी

    "गोरा सोजीर मज समक्षच माझ्या भार्येशी कुकर्म करीत असतांना, मी सुद्धा त्याच्यावर धरलेली आपल्या हातातली छत्री मधुनमधून किंचित् कलती करून त्यास उन्ह लागेल असें करून त्या दुष्ट सोजीरावर सूड उगवत होतो."

    चिल्लर चिनी चीजवस्तुंवर चिंधीचोर राष्ट्रवाद्यांनी घातलेल्या "कडक" बहिष्काराच्या निमित्ताने, अनेक वर्षांपूर्वी वाचलेलं (बहुधा चिं.वि.जोशी?) हे वाक्य आज सहज आठवलं.

      October 25, 2016


  • जाती/जाई

    ।। चतुर्भुजाय नम: जाती पत्रं समर्पयामि ।।

    जाईच्या फुलांच्या मंद सुवासाने प्रत्येक मनुष्य अगदी मंत्रमुग्ध होतो.बायकांना तर जाईच्या फुलांच्या गजऱ्याचे भारीच वेड असते.अगदी नाजुक,पांढरी फुले तर प्रत्यक्षात नभातील चांदणे वेलींवर फुलल्या सारखे वाटते.आणी म्हणूनच जाई देखील गणेश प्रिय आहे.

    ह्याचा वेल असतो व फांद्यांना धारदार कडा असतात.पाने हि छोट्या पत्रकांच्या स्वरूपात ७-११ जोड्या असतात.फुले पांढरी,लांब,सुगंधी व पुष्पदंडावर उगवणारी असतात जी पावसाळयात फुलतात.

    ह्याचे उपयुक्तांग आहे पाने,मुळ,फुले व त्वचा.तसेच हि चवीला कडू,तुरट असून उष्ण गुणाची व हल्की,स्निग्ध व मृदु असते.जाई त्रिदोषशामक आहे.

    आता आपण ह्याचे गुणधर्म जाणून घेऊयात:

    १)जाईची पाने चावल्यास दात व हिरड्या मजबूत होतात.

    २)तोंडात उष्णतेचे फोड आल्यास जाईच्या पानांच्या काढ्याने गुळण्या करतात.

    ३)वात विकारात जाईच्या फुलांच्या तेलाने मालीश करतात.

    ४)जाईच्या पानांचा व मुळाचा काढा हा जखमा स्वच्छ होऊन भरून येण्यास वापरतात.

    ५)त्वचारोगामध्ये जाईच्या मुळांचा काढा उपयुक्त आहे.

    (सुचना: ह्या लेखातील वनस्पती वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे )

    वैद्य(सौ)स्वाती हेमंत अणवेकर,
    आरोग्य आयुर्वेदीक क्लिनीक,
    म्हापसा गोवा.
    संपर्क:९९६०६९९७०४

      August 13, 2017


  • गुटखा निर्मिती कंपन्यांमार्फत कायद्याची पायमपल्ली…कागदी वेष्टनाच्या आत प्लास्टिक आवरण

    प्लास्टिकच्या अमर्याद वापरामुळे झालेल्या प्रदूषणाने भारतातील तमाम जनता त्रस्त झाली असतांना, काही प्रमाणात दिलासा देण्यासाठी सरकारने प्लास्टिकच्या वापरासंबधी काही नियम घालून दिलेत. परंतु या नियमातील त्रुटींचा आधार घेऊन गुटखा निर्मिती कंपन्यांनी पर्यावरणालाच धोका निर्माण केला.

      September 30, 2011


  • एक अभूतपूर्व सामना’

    हिंदुराव धोंडे पाटील (निळू फुले) व मास्तर (श्रीराम लागू) यांच्यामधील रंगलेला ‘सामना’ पाहिलेला नाही असा मराठी सिने रसिक विरळाच. या सिनेमातली या दोन अतिशय ताकदीच्या कलाकारांमधील ही अभिनयाची जुगलबंदी म्हणजे आपल्यासारख्या चित्रपट प्रेमींना मेजवानीच आहे.

      April 9, 2023


  • डिझेल व पेट्रोलमधील फरक

    डिझेलचे तांत्रिक नाव ‘हाय स्पीड डिझेल’ (एच.एस.डी.) असे आहे व ते रुडॉल्फ डिझेल या जर्मन संशोधकाच्या नावावरून आले आहे. वेगवान वाहनासाठी वापरले जात असल्यामुळे ‘हाय स्पीड’ हे नाव पडले. त्यामुळेच मोटार पंपासारख्या शेतकी कामासाठी वापरल्या जाणाऱ्या साधनाच्या तुलनात्मक कमी गतीच्या इंजिनात वेगळ्या डिझेल तेलाचा वापर होतो व त्याला लाइट डिझेल ऑइल (एल.डी.ऑ.) असे संबोधतात.

      February 27, 2023


  • जनाबाईचे अभंग

    जनाबाईचे अभंग दूरदूपर्यंत लोकप्रिय झाले आणि तिची ख्याती कबिरांच्या कानी गेली, इतके सुंदर अभंग रचणारी ही स्त्री आहे तरी कोण या उत्सुकतेपोटी संत कबीर जनाईच्या भेटीसाठी पंढरीस आले. तिथे आल्यावर त्यांना कळाले की ती नामदेवांच्या घरी कामास आहे. तिथे गेल्यावर त्यांना कळाले की ती गोपाळपुरास गोव-या थापायला गेली आहे, तिला येण्यास काही अवधी लागेल. दासीचे घरकाम करणारी, गोव-या थापणारी बाई अभंग लिहिते याचे त्यांना फार अप्रूप वाटले आणि ते तिची वाट बघत तिथे थांबण्याऐवजी गोपाळपुरास गेले.

    तिथे नदीकाठावर दोन पोक्तवयीन स्त्रिया एकमेकीशी भांडत असल्याचे दृश्य त्यांना दिसले. त्या दोघींच्या मधे गोव-यांचा मोठा ढीग होता, गोव-या चोरल्याचा एकमेकीवर त्या आरोप करत होत्या.

    कबीर काही वेळ त्यांचे भांडण बघत तिथेच उभे राहिले. अन् मग काही वेळाने त्यांनी त्या दोघींना विचारले की, ‘‘इथे जनाबाई नावाची कोणी स्त्री आहे का?’’

    त्यांच्या या प्रश्नाने दोघींपैकी एक स्त्री उसळून बोलली -‘‘ही काय, हीच की जनी! चोरटी! माझ्या गोव-या चोरून माझ्याशी भांडण करत्येय! अन् वर तोंड करून मलाच शानपन शिकवत्येय.’’

    त्या बाईच्या या उद्गाराने कबिरांना थोडासा धक्का बसला. कारण त्यांच्या मनात जनाईचे वेगळेच चित्र उभे राहिले होते. तरीही त्यांचा त्या बाईच्या सांगण्यावर विश्वास बसला नाही. ते तिथेच आशाळभूत नजरेने त्यांचे भांडण बघत उभे राहिले. त्यांनी न राहवून दुसरीला विचारले की, ‘‘तूच जनी आहेस का?’’
    यावर ती हातातल्या गोव-या खाली टाकून बोलती झाली, ‘‘होय बाबा, मीच ती जनी. तुला काही त्रास आहे का माझा?’’ तिच्या या उत्तराने अन् तिच्या वर्तणुकीने गोंधळून गेलेले कबीर आपली काही तरी चूक झाली असा विचार करून तिथून पाय काढता घेण्याच्या मन:स्थितीत होते.

    मात्र जनाईच्या होकाराने दुस-या बाईला अजून बळ आले. ती कबिरांना म्हणाली, ‘‘हे बघा, तुम्ही कोण हायसा मला ठाव न्हाई, पर तुमी एक काम करा. आमच्या दोघींच्या बी गोव-या यात आहेत. तुमी आमच्या आमच्या गोव-या निवडून वेचून द्या. तुमी एव्हढं काम करा अन् मग हिथून जावा.’’

    आता गोव-या सारख्याच दिसतात. शेणाच्या, गोल आकाराच्या त्या गोव-यात कुठली गोवरी कुणाची हे कसं ठरवणार याचं कोडं कबीरजींना पडलं. कबीर विचारात पडलेले बघून जनाई म्हणाली, ‘‘त्यात काय इतका विचार करायचा? अगदी सोप्पं काम आहे.’’
    आता कबीरजी चकित झाले होते.

    सारख्या दिसणा-या शेणाच्या गोव-यात कुठली गोवरी कुणाची हे ओळखता येणं अशक्य होतं, मात्र जनी म्हणतेय की हे सोप्पं आहे. हे कसं काय सोपं असू शकतं किंवा तिच्याकडे या समस्येचं काय उत्तर आहे हे ऐकण्याकरता कबीरजी थोडे आतुर झाले. त्यांची आतुरता त्यांच्या चेह-यावर झळकली.

    कबिरांच्या चेह-यावरची उत्सुकता बघून जनाई हसून म्हणाली, ‘‘अहो, महाराज हे अगदी सोपं काम आहे. सर्व गोव-या एके ठिकाणी करा. अन् त्यातल्या प्रत्येक गोवरीला कानी लावा. ज्या गोवरीतून ‘विठ्ठल, विठ्ठल’ आवाज येईल ती गोवरी माझी. अन् ज्यातून आवाज येणार नाही ती गोवरी हिची!’’

    जनाईच्या उत्तराने कबीरजींचा चेहरा एकदम फुलून आला. अन् त्या दुस-या बाईचा चेहरा गोरामोरा झाला.

    कबीरजी पुढे झाले आणि त्यांनी त्या ढिगातील दोन गोव-या उचलल्या. गोव-या उचलून कानी लावल्या अन् काय आश्चर्य, त्या गोव-यातून ‘विठ्ठल विठ्ठल’ असा आवाज येत होता. आपण इथं येऊन कोणतीही चूक केली नाही. आपण एका महान कवयित्रीला भेटत आहोत. जिच्या विचारात देव वसतो आहे’, हे त्यांच्या लक्षात आलं. कबिरांनी सा-या गोव-यांची वाटणी केली. त्या बाईच्या काही मोजक्याच गोव-या होत्या तर बहुतांश गोव-या जनाबाईच्या होत्या.

    जनाईच्या गोव-यांच्या ढिगावर त्या बाईने आपल्या काही गोव-या लावून तो ढीग आपलाच असल्याची खोटी बतावणी केली होती अन् वर जनाईला ती खोटे ठरवत होती.
    गोव-यांची वाटणी झाल्यावरही कबिरांच्या चेह-यावर प्रश्नचिन्ह कायम होते.

    जनाईने त्यांच्या मनातील शंका ओळखली आणि म्हणाली, ‘‘या गोव-यातून हा आवाज कसा आला याचं तुम्हाला कोडं पडलंय का? एकदम साधी गोष्ट आहे. मी या गोव-या थापताना विठ्ठलाचेच नाव घेते अन् माझ्या ध्यानी मनी पांडुरंग असतो, तोच या गोव-यातसुद्धा असतो.’’

    कबीर चकित होऊन जनाबाईकडे पाहत राहिले अन् मग त्यांनी स्वत:ची ओळख करून दिली. कबीरजींचा परिचय ऐकून जनाबाई त्यांना घरी घेऊन गेल्या.

    एकाग्रचित्ताने केलेल्या नामस्मरणातील ताकद सांगणारी ही घटना सत्य न समजता केवळ एक आख्यायिका असावी असा जरी विचार केला तरी यातील भावार्थ श्रेष्ठ आणि चिरंतन असाच आहे. भक्ती कशी करावी याचे नियम नाहीत, मात्र ती मनापासूनची असावी, ती सच्ची असली की आपल्यालादेखील ईश्वराचा सर्वत्र प्रत्यय येतो.

    -- WhatsApp वरुन

      July 8, 2017


  • ३ मे १९६५ – दादरमधील शिवाजी मंदिरचा शुभारंभ

    मराठी नाटयरसिक, कलावंतांशी हृद्य नाते जोपासणा-या दादरमधील शिवाजी मंदिरचा शुभारंभ ३ मे १९६५ रोजी झाला. मराठी रंगभूमी ही आज देशातील अत्यंत प्रगत रंगभूमी मानली जाते, याचे कारण तिचा पावणेदोनशे वर्षांचा वैभवशाली इतिहास एवढेच नसून ती सतत प्रवाही, पुरोगामी आणि कालसुसंगत राहिली, हेही आहे. चित्रपटाच्या उदयानंतर संगीत रंगभूमी अस्ताकडे निघाली असता तिने कात टाकली, काळानुरूप आपले रूप बदलले आणि ती पुनश्च बहरली. त्यानंतरही अनेक चढउतार तिने अनुभवले. या सर्व घटना-घडामोडींची जिवंत साक्षीदार असलेली मुंबईतली दादरच्या शिवाजी मंदिरची वास्तू आहे. मराठी व्यावसायिक रंगभूमीशी तिचे अविचल नाते आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक रंगकर्मीला एक ना एक दिवस आपण शिवाजी मंदिरच्या मंचावर स्वत:ला जोखून बघावे असे वाटत असते, यातच या वास्तूची महत्ता दडली आहे. १९६५ साली जेव्हा मुंबईत बंदिस्त नाटय़गृह ही दुर्मीळ चीज होती त्या काळी शिवाजी मंदिर बांधले गेले. अर्थात त्याआधीही ते खुले नाटय़गृह म्हणून अस्तित्वात होतेच. परंतु शिवाजी मंदिरचा बंदिस्त रंगमंच उपलब्ध झाला आणि १२ महिने १३ काळ मराठी नाटकांना कायमस्वरूपी रंगमंच मिळाला. या वास्तूच्या स्थापनेत महाराष्ट्र राज्याचे माजी गृहमंत्री बाळासाहेब देसाई यांचे मोलाचे सहकार्य लाभले. गोवा राज्याचे पहिले मुख्यमंत्री दयानंद बांदोडकर उद्‌घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. दर्शनी भागात श्री शिवछत्रपतींचा भव्य पुतळा असलेले नाटक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी सर्व सुखसोयींनी परिपूर्ण असे प्रेक्षागृह उभारण्याचा संकल्प मंडळाच्या स्थापनेवेळी सोडण्यात आला होता.

    पौराणिक, ऐतिहासिक, सामाजिक, रहस्यनाटय़, बालनाटय़ अशा सर्व प्रकारांतली नाटके इथे सादर होऊ लागली. निर्माते, लेखक, दिग्दर्शक, कलाकार, तंत्रज्ञ, रंगमंच कामगार यांच्या अनेक पिढय़ा शिवाजी मंदिरच्या मांडवाखालून गेल्या, मोठय़ा झाल्या. ८०-९० च्या दशकापर्यंत शिवाजी मंदिरचा कट्टा हा हौशी, होतकरू रंगकर्मीचा अड्डा होता. शिवाजी मंदिरमध्ये आपला हुन्नर दाखवायची संधी एक ना एक दिवस आपल्याला मिळेल आणि आपण मोठे होऊ, नावारूपास येऊ, हे स्वप्न उराशी बाळगत कटिंग चहावर दिवसचे दिवस ढकलत या अड्डय़ावर नित्य हजेरी लावणाऱ्या अनेकांचे हे स्वप्न पुढे साकारतही असे. यातले कित्येक जण शिवाजी मंदिरपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या छबिलदास रंगमंचावरून आलेले असत. छबिलदासच्या प्रायोगिक/ समांतर रंगभूमीवर नाटके करणारे रंगकर्मी आणि शिवाजी मंदिरचे नाटकवाले यांच्यात एके काळी विस्तवही जात नसे. परस्परांना ते कमी लेखत. कारण त्यांच्यातला एक असे आपल्याला रंगभूमीवर जे ‘प्रयोग’ करायचे आहेत, त्याकरता म्हणून नाटक करणारा; तर दुसरा- रसिकांचे रंजन करण्याबरोबरच त्यांचे प्रबोधन करण्याचा वसा घेऊन नाटके करणारा. खरे तर दोघांचीही भूमिका मराठी रंगभूमी आणि मराठी संस्कृतीच्या उत्थानाकरता तितकीच महत्त्वाची होती. यथावकाश दोघांनाही आपले हे आग्रह दुराग्रह असल्याचे ध्यानी आले आणि त्यांच्यातला दुरावा संपला. म्हणूनच एके काळी छबिलदासवर सक्रिय असलेली मंडळी आज शिवाजी मंदिरमध्ये आपली ‘प्रयोगसिद्ध’ नाटके सादर करताना दिसतात. शिवाजी मंदिर ज्याने जिंकले, तो जगाच्या पाठीवर कुठल्याही रंगमंचावर हार खाणार नाही असे म्हटले जाते. ते खरेच आहे. याचे कारण शिवाजी मंदिरचा प्रेक्षक सुशिक्षित, सुजाण, दर्जेदार अभिरुची बाळगणारा आहे. त्याला उडदामाजी काळे-गोरे चोखपणे पारखता येते.

    शिवाजी मंदिर नाट्यगृहाने अनेक दशके पहिली आहेत. वेळेनुसार घडणारे बदलही प्रेक्षकांनी पाहिले आहेत आणि पहात आहेत. मात्र आजही तोच पारंपारिक नाट्यकलेचा ठेवा या नाट्यगृहाच्या माध्यमातून जतन करून ठेवला आहे. आशिया खंडातील हे आदर्श नाट्यगृह आहे येथील दर्जेदार आणि निर्दोष ध्वनीयोजना, आसन व्यवस्था आणि प्रकाश योजना यांची विशेष काळजी घेतल्यामुळे जवळपास एक हजार प्रेक्षक एकावेळी बसून कार्यक्रमाचा आनंद घेऊ शकतात. वेळोवेळी होत असलेल्या देखभालीने नाट्यगृह अजून काही दशके सुस्थितीत चालेल अशी अपेक्षा आहे. शिवाजी मंदिरमध्ये नाटक व तत्सम नृत्य, गीत, संगीताचा कार्यक्रम हमखास रंगतो असं आवर्जून सांगणारे अनेक रसिक आहेत. नटवर्य नानासाहेब फाटक, नटवर्य चिंतामणराव कोल्हटकर, गणपतराव बोडस, मा. दत्ताराम, डॉ. काशिनाथ घाणेकर, डॉ. श्रीराम लागू, विमल कर्नाटक, मीनाक्षी शिरोडकर, सुधा करमरकर, आशा काळे यांच्यापासून आज लोकप्रिय असलेल्या विक्रम गोखले, मोहन जोशी, प्रशांत दामले, भरत जाधव यांच्यापर्यंत सर्वांचेच शिवाजी मंदिर श्रद्धास्थान आहे. शिवाजी मंदिराच्या रंगमंचावर प्रवेश केला की वेगळंच स्फुरण चढतं, उत्साह संचारतो असे त्यांचे उद्गार आहेत. समाज प्रबोधनासाठी केले जाणारे लोकनाट्य, मुक्तनाट्य सादर करण्यात आली. शिवाजी मंदिरने अनेक नवनव्या उपक्रमांना नेहमीचं प्रोत्साहन दिलं आहे, आश्रय दिला आहे.

    १९९३ च्या मुंबईतील साखळी बॉम्बस्फोटांच्या घटनेआधी शिवाजी मंदिरात बॉम्बस्फोट घडवून आणण्याचा कट रचला जात आहे, हे एका कोकणी मुस्लीम प्रेक्षकाने शिवाजी मंदिरच्या ट्रस्टींना पत्र लिहून सावध केले होते. त्या पत्राधारे आवश्यक ती खबरदारी घेतल्यामुळेच शिवाजी मंदिर या हल्ल्यातून वाचले. या वास्तूच्या धर्मनिरपेक्ष पुण्याईमुळेच हे शक्य झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट/ लोकसत्ता

      May 3, 2017


  • मनाचे श्लोक – ८१ ते ९०

    मना मत्सरे नाम सांडू नको हो | अती आदरे हा निजध्यास राहो |
    समस्तांमधे नाम हे सार आहे | दुजी तूळणा तूळिताही न साहे ||81||

    बहू नाम या रामनामी तुळेना | अभाग्या नरा पामरा हे कळेना |
    विषा औषध घेतले पार्वतीशे | जिवा मानवा किंकरा कोण पूसे ||82||

    जेणे जाळिला काम तो राम ध्यातो | उमेसी अती आदरे गूण गातो |
    बहू ज्ञान वैराग्य सामर्थ्य जेथे | परी अंतरी नामविश्वास तेथे ||83||

    विठोने शिरी वाहिला देवराणा | तया अंतरी ध्यास रे त्यासि नेणा |
    निवाला स्वये तापसी चंदमौळी | जिवा सोडवी राम हा अंतकाळी ||84||

    भजा राम विश्राम योगेश्वराचा | जपू नेमिला नेम गौरीहराचा |
    स्वये नीववी तापसी चंदमौळी | तुम्हा सोडवी राम हा अंतकाळी ||85||

    मुखी राम विश्राम तेथेचि आहे | सदानंद आनंद सेवूनि राहे |
    तयावीण तो सीण संदेहकारी | निजधाम हे नाम शोकापहारी ||86||

    मुखी राम त्या काम बाधू शकेना | गुणे इष्ट धारिष्ट त्याचे चुकेना |
    हरीभक्त तो शक्त कामास मारी | जगी धन्य तो मारुती ब्रह्मचारी ||87||

    बहू चांगले नाम या राघवाचे | अती साजिरे स्वल्प सोपे फुकाचे |
    करी मूळ निर्मूळ घेता भवाचे | जिवा मानवा हेचि कैवल्य साचे ||88||

    जनी भोजनी नाम वाचे वदावे | अती आदरे गद्य घोषे म्हणावे |
    हरीचिंतने अन्न सेवीत जावे | तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावे ||89||

    न ये राम वाणी तया थोर हानी | जनी व्यर्थ प्राणी तया नाम कोणी |
    हरीनाम हे वेदशास्त्री पुराणी | बहू आगळे बोलिली व्यासवाणी ||90||

    - श्री रामदासस्वामी लिखित मनाचे श्लोक (क्रमशः)

      January 6, 2016


  • राष्ट्रकुल दिवस

    आपल्या राजवटीखाली असलेल्या देशांना ‘स्वयंशिस्त’ लागावी, या हेतूने ब्रिटिशांनी सगळ्या देशांची एकत्रित स्पर्धा सुरू केली आणि त्यालाच कॉमनवेल्थ गेम्स अथवा राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा असे नाव दिले.१९३० पासून या स्पर्धेला प्रारंभ झाला आणि दर चार वर्षांनी ही स्पर्धा होते.१९४२ आणि १९४६ साली दुसऱ्या महायुद्धामुळे ही स्पर्धा स्थगित करण्यात आली होती.१९३० ते १९५० या कालावधीत राष्ट्रकुलला ‘ब्रिटिश राजवट क्रीडा स्पर्धा’ म्हणूनही ओळखले जात.

      May 24, 2022