अवर्गिकृत

“आयदान”:अप्रतिम,अप्रतिम,अप्रतिम!

Category:

 

उर्मिला पवार ह्या नामवंत ‘क्रियाशील साहित्यिक’. ‘आयदान’ हे त्यांचे आत्मचरित्र २००३ साली प्रसिध्द झाले तेव्हा वाचक, समीक्षक, विचारवंत सगळ्यांनीच त्याची प्रशंसा केली. या ‘आयदान’चे सादरीकरण ‘आविष्कार’ व ‘अंजोर’ या संस्थांनी प्रस्तुत केले आहे. या आत्मचरित्राची रंगावृत्ती सुषमा देशपांडे यांनी तयार केली असून दिग्दर्शनही त्यांचेच आहे.

  October 10, 2014


अवर्गिकृत

“अ‍ॅग्रेसिव्ह” – माईल्ड,कोल्ड आणि रिग्रेसिव्ह

Category:

 

नाटकाचा विषय बोल्ड असला तरीही त्यात समाजाला संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे अशा प्रकारे नाटकाची हवा निर्माण करण्यात आली. जणू लैंगिक विषयावरचे एक गंभीर उद्देशपूर्ण नाटक. त्यामुळे हे नाटक मी आवर्जून बघितले. तुम्ही गालातल्या गालात हसत अर्थातच म्हणू शकता की गृहस्थ आबंटशौकीन आहे आणि हिट अ‍ॅन्ड हॉट नाटक बघण्यासाठी त्याने हा बहाणा शोधलेला आहे.

  July 30, 2014


साहित्य - ललित

नाटकातील नाटक

Category:

 

स्व. सत्यदेव दुबे हे अनेक कलाकारांचे गुरू व नाटककार. पण मुख्यत: ते होते नाट्यदिग्दर्शक. त्यांचा आग्रह असायचा, नाटकात ‘क्रायसिस’ हवा. त्याशिवाय प्रेक्षक त्यात गुंतणार नाहीत. क्रायसिस म्हणजे पेचप्रसंग, ही जर थोडी वरच्या पातळीवरची संकल्पना वाटत असेल तर प्राथमिक स्तरावरचा शब्द वापरू. आपल्याला म्हणता येईल नाटकात संघर्ष हवा.

  February 19, 2013