वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
एका बुद्धिमान फलंदाजाचा आणि गु-णी कर्णधाराचा जन्म.
December 17, 2010
वृद्धाश्रमात ठाण्याच्या –
माझी आत्या असते,
मधूनमधून जातो –
मी तिला भेटायला.
August 28, 2022
‘पैशापाशी पैसा जातो!’ जिथे मुळातच खूप पैसा आहे तिथे अजून पैसा जात रहातो. जिथे खूप कमी पैसा आहे तिथून पैसा जमेल तेवढ्या लवकर संपत रहातो. पैसा मिळवण्यासाठी आयुष्यभर आपण खपतो. मग एक दिवस आपण ‘खपल्यावर’, आपण निघून जातो, पैसा मात्र इथेच रहातो !!!
November 28, 2018
या सूचना आणि प्रश्न माझा एक साठी पार केलेला मित्र, आपल्या पत्नीला देत आणि विचारत असतो. पहिले छूट यामागे आपल्या जोडीदाराबद्दलची काळजीच जाणवते, परंतु याकडे थोडं बारकाईने पाहिल्यावर, यामागची जाणवणारी एकटेपणाची भीती दिसायला लागते. यामध्ये, आपली जोडीदार किंवा आपली बायको हयात नसल्यावर आपलं कसं होईल? हा मनाला हादरवून टाकणारा विचार असतो, आणि एकटेपणाच्या जाणिवेतून उमटणारी, आणि आज जोडीदार हयात असतानाही हवालदिल करून सोडणारी भीती असते.
March 31, 2023
डोनाल्ड ट्रम्प यांचा विजय हा भारतातील बहुतेकांसाठी धक्कादायक ठरला. अतिरेकी कारवाया करणारे आणि अमेरिकेसाठी धोकादायक असलेल्या लोकांना नक्कीच जरब बसणार आहे. मोदी यांचे सरकार सर्व निर्णय देशाच्या उन्नती साठीच घेत आहेत यावर सध्यातरी ठाम विश्वास ठेवून जनता आहे. पंतप्रधानांचा हेतू प्रामाणिक आहे हे पुन्हा पुन्हा सिद्ध होत आहे.फक्त त्यांना चांगल्या लोकांची साथ मिळाली पाहिजे. पुढील सर्व धक्के सुखद असतील असे मला वाटते. धक्का तंत्रा शिवाय हा देश सुधारणार नाही.
November 11, 2016
→ जर पैसे झाडाला लागत नाहीत तर बँकांच्या “शाखा” का असतात??
→ बँकर्स कधीच कंटाळत नाहीत, त्यांचा फक्त ‘इंटरेस्ट’ कमी होतो.
→ नोटाबंदीचा एक फायदा झाला की आपल्याला विभागातील सर्व ATM चा व त्या निमित्ताने आजूबाजूच्या परिसराचा ठावठिकाणा मुखोद्गत झाला.
→ जेव्हा एखाद्या व्यक्तीवर बँकेचं ‘दहा लाख’ रुपये कर्ज असतं तेव्हा त्याची परतफेड हा त्या व्यक्तीचा प्रॉब्लेम असतो, पण जेव्हा ते कर्ज “दहा हजार कोटी” रुपयांचं असतं तेव्हा तो बँकेचा प्रॉब्लेम असतो.
→ गोलरक्षकांचा (goal keepers) बँक बॅलन्स उत्तम का असतो?
: कारण त्यांना चांगल्या “सेव्हींग” (saving) चा भरपूर सराव असतो.
→ उत्तर ध्रुवावर बँक खाती का उघडली जात नाहीत?
: कारण तेथे खाती लगेच “गोठवली” (freeze) जातात.
→ रमेशची बँकेतली नोकरी पहिल्याच दिवशी तेव्हा गेली, जेव्हा एका वृद्ध स्त्रीने त्याला तिचा ‘बॅलन्स’ चेक करायला सांगितला आणि त्याने त्यासाठी तिला हलकासा धक्का दिला.
→ राहुलला आपल्या बँकेच्या आर्थिक परिस्थितीबद्दल तेव्हा फार चिंता वाटू लागली जेव्हा तो पाच ATM फिरला पण सर्व ठिकाणी आपले एटीएम कार्ड टाकल्यावर त्याला “insufficient funds” चा बोर्ड दिसला.
→ नोटाबंदीच्या काळात असे वाटायचे की आपण भारतीय चलन घेऊन कुठेतरी परदेशात आलोय आणि परकीय चलनाच्या अदलाबदली साठी आटापिटा करतोय.
→ प्रभाकर आपल्या बँक मॅनेजर कडे गेला आणि म्हणाला : मला एक छोटासा व्यवसाय सुरू करण्यासाठी काही सल्ला द्याल का?
बँक मॅनेजर उत्तरला : एखादा मोठा व्यवसाय चालू कर आणि फक्त सहा महीने वाट पहा!
→ महेश व नरेश हे बँकेतले मित्र गावात नदीकिनारी फिरायला गेले असता अचानक महेशने खिशातून एक दहा रुपयाची नोट काढून नदीच्या प्रवाहात सोडून दिली. यावर नरेशने कारण विचारले असता महेश बोलला : काल माझ्या लोन्स मॅनेजर ने “कॅश फ्लो” (cash flow) चा अभ्यास करून ये म्हणून बजावले आहे!
→ (तीन बंद atm बघून निराश होऊन चौथ्या ठिकाणी आलेली) तरुणी : ते तीन जादुई शब्द ऐकायला मी आतूर झाले आहे,
ATM गार्ड (खूश होऊन) : कोणते?
तरुणी : एटीएममध्ये कॅश आहे!
→ बँक दरोडा टाकून पळून जाण्याच्या बेतात असणाऱ्या दरोडेखोरांच्या म्होरक्याला, इतर कर्मचारी घाबरून शांत असताना कॅशियर मात्र बांधलेले हात पाय झाडत आणि तोंडात बोळा असतानाही जीवाच्या आकांताने काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत असलेला दिसला. तेव्हा दया येऊन म्होरक्याने तोंडातला बोळा काढला असता कॅशियर विनवणी करू लागला : “भाऊ, तुम्ही येण्याआधी गेला एक तास माझी कॅश पोझिशन टॅलि होत नव्हती आणि दहा हजारचा डिफरन्स मिळत नव्हता. तेव्हा जाताना जरा माझे हे कॅश बुक सुद्धा घेऊन जाता का, म्हणजे माझ्या डोक्याची भुणभूण तरी थांबेल!”
→ बँकेत कॅश काढायच्या रांगेत उभ्या असलेल्या एका महिलेला अचानक उचक्या सुरू झाल्या. १५ मिनिटांनंतर जेव्हा ती कॅश काउंटरवर पोहोचली तेव्हा तिच्या उचक्या खूपच वाढल्याने ती पार हैराण होऊन गेली होती. तिने चेक कॅशियर कडे दिल्यावर त्याने काही काळ संगणकात बघून तिला चेक परत दिला आणि सांगितले की तिला कॅश मिळू शकत नाही. यावर महिलेने कारण विचारले असता कॅशियरने सांगितले की तिच्या खात्यात पुरेशी रक्कम जमा नाही किंबहुना रु.५०० डेबिट बॅलन्स असल्याने तिलाच खात्यात पैसे भरावे लागतील. या उत्तराने भडका उडून काही काळ कॅशियरवर शाब्दिक भडिमार केल्यावर तिचे शेवटचे वाक्य होते – “तुला इथे मस्करी म्हणून ठेवले आहे वाटते”. यावर तो कॅशियर शांतपणे स्मितहास्य करत म्हणाला – “होय मॅडम, मी तुमची मस्करीच केली, पण गेल्या पाच मिनिटात तुम्हाला एकही उचकी आली नाही हे तुमच्या लक्ष्यात आले का?”
संकलन : गुरुप्रसाद दिनकर पणदूरकर,
माहीम, मुंबई.
फोन : ८८७९४३१३७१
ईमेल : guru.pandurkar@gmail.com
(व्यास क्रिएशन्स च्या पासबुक आनंदाचे दिवाळी २०२२ ह्या अंकामधून प्रकाशित)
November 27, 2022
७ नोव्हेंबर १८६७ साली पोलंडमध्ये शिक्षकी पेशातील स्क्लोडोवस्की दाम्पत्याच्या पोटी मादाम मारी यांचा जन्म झाला होता. रेडियमचा शोध लावून आणि पदार्थविज्ञान आणि रसायनशास्त्र या विषयांतील दोन नोबेल पारितोषिके मिळवून मादाम मारी क्युरी यांनी आपल्या आयुष्याचे सोने केले.
January 2, 2024
October 31, 2017
रस्त्यावर, बस-ट्रेनमधे आपल्याला भेटणारी सर्वसामान्य माणसं आपल्याला त्यांच्या नकळत काय ‘दृष्टी’ देऊन जातात..! अट एकच, आपण त्यांच्याशी बोलायचं किंवा त्यानी बोलायचा प्रयत्न केला तर प्रतिसाद द्यायचा..
August 8, 2016
आपल्याला शाळेत आठवी, नववी मधे शरीर शास्त्रात शिकवलेआहे की--आपल्या पोटात जठर, यकृत म्हणजे मराठीत लिव्हर,प्लीहा,स्वादु पिंड,लहान आंतडे, मोठे आंतडे मुत्र पिंड वगेर अवयव आहेत. ह्यातील लहान आतड्याची लांबी 22 फूट आहे.
आता विचार करा. देवाने,निसर्गाने एवढ्याशा जागेत एवढे अवयव व 22 फूटाचे आतडे कसे बसविले असेल? 22 फूटाची कमीत कमी व्यासाची एवढ्या लहान जागेत कशी राहते आणि आपण जे अन्न खातो त्याचा व्हाल्युम किती? हे कसे? विचार चालेना!! एक दिवस
फुगेवाला नळीचा फुगा पंपाने हवा भरताना पाहिला आणि कोडे सुटले, आन्नाचा घास जेव्हा येतो तेव्हा आतड्याचा व्यास वाढतो,प्रसरण पावते आणि घास पुढे गेला की अकुंचन पावते. म्हणजे अन्न पुढे पुढे सरकणे व न पचलेले अन्न शरीरा बाहेर पडणे ह्यासाठी आतड्याचे आकुंचन व पसरण होणे आवशक आहे. म्हणजे पोट एकदा दाबले जाणे व ताणले जाणे आवशक आहे. नुसत्या चालण्याने ते होत नाही. पण सुर्यनमस्कारात ते होते.
सुर्यनमस्कारात प्रथम खाली वाकतो, तेव्हा पोट दाबले जाते. नंतर डावा पाय दुमडतो व उजवा पाय मागे नेतो, तेव्हा पोटाचा डावा भाग दाबला जातो व उजवा भाग ताणला जातो. नंतर ओणवे होतो तेव्हा पोट सरळ होते.नंतर ह्या स्थितीत धडाचा भाग वर करून आकाशाकडे पाहतो, तेव्हा पोट ताणले जाते. नंतर उठताना उजवा पाय पुढे घेतो तेव्हा पोटाचा उजवा भाग दाबला जातो व डावा भाग ताणला जातो नंतर वाकलेल्या स्थितीत येतो तेव्हा पोट दाबले जाते. नंतर सरळ होतो तेव्हा पोट सरळ होते. ह्या क्रमाने पोट दाबले व ताणले जाते. पोटातील अवयव व्यवस्थित काम करू लागतात. अन्न नीट पचते, शौचास साफ होते, ह्याचा प्रोस्टेट ग्लॅडला व स्रियाना गर्भाशय व ओव्हरीला फायदा होतो. दिवसभराच्या कामाने संध्याकाळीच आपण दमून जात असू तर सकाळी 5 ते 12 नमस्कार घातले तर दमायला होत नाही. रात्री पर्यंत फ्रेश राहतो व दिवस उत्साहात जातो असा माझा गेल्या 32 वर्षाचा अनुभव आहे.
1985 साली मला एक गृहस्थ भेटले. वय 72 होते. मला म्हणाले--मला दोन दिवस संडासला झाली नव्हती, डायबेटीस,गुडघे दुखी होती. (हे बोटीवर कॅप्टन होते) 69 व्या वर्षी आयुष्यातील पहिला सुर्यनमस्कार घातला आणि संडासला धावलो. जोशी आता किती नमस्कार घालत असेन सांगा. मी म्हणालो २०-२५ घालत असाल. ते म्हणाले- रोज 156 नमस्कार घालतो माझे सर्व त्रास गेले
ह्या गृहस्थाचे पासून मी स्फुर्ती घेतली व नमस्कार चालू केले. माझा अनुभव असा की रोज 5 ते 12 नमस्कार तब्बेत चांगली ठेवायला पुरतात.
नमस्कारासाठी झोपण्या एवढीच जागा लागते. 10 ते 15 मिनीटे लागतात. घरी करणे असल्याने जीमची फी व जाण्या येण्याचा वेळ वाचतो.
फक्त केले पाहिजे रे !!?
-- अरविंद जोशी
B.Sc.
९४२१९४८८९४
April 6, 2017
Copyright © 2025 | Marathisrushti