वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
सायंकाळी सातला जेवण्याचा प्रयत्न केला. पण पुनः रात्री झोपताना भूक लागते. गेल्या अनेक वर्षांची सवय आहे. जात नाही.. पित्ताची प्रकृती आहे, काय करावे ? अशा सर्व सामुदायिक शंका लक्षात घेऊन ही सोयीस्कर टीप.
आपण आजच्या काळातील बिझ्झी लाईफमधील जेवणखाण कसे करतो ?
सकाळी उठतो आधी चहा. त्याबरोबर मैद्यापासूनचे टोस्ट, बटर, बिस्कीट, मारी, खारी. ती वचावचा खाऊन झाली की, आंघोळ वगैरे आटपून नाश्ता. काही जणांचा नाश्ता हा उपीट पोहे, तर काहींचा इडली, आंबोळी, तर काही जणांकडे चपाती भाजी तर काही जणांकडे पेज किंवा मऊ भात असतो. तर काही जण पावात टोमॅटो काकडी कांदा गुंडाळून खातात, तर काही जण चहात बुचकळून पाव खातात की झाला नाश्ता !
बायकोनं पहाटे लवकर उठून केलेला आणि आठवणीने बरोबर दिलेला डबा. बहुतेक वेळा डब्यात चपातीभाजीच असते. आणि भाजी म्हणजे सुक्या बटाट्याची. सांडायची भीती नाही. रसभाजी न्यायची म्हणजे पुलंच्या धड्यातील कोचरेकर मास्तर व्हायची भीती.
दुपारच्या वेळेत डबा खाणे म्हणजे, तिथल्या तिथे डब्यातल्या डब्यात दोन्ही हातानी चपाती ओढून तोडून भाजीबरोबर गिळायची. प्लॅस्टिकच्या बाटलीतले पाणी ढोसायचे, उरलेले पाणी हाताला लावून हात "शुद्ध" करायचे. वर फक्कड चहा मारायचा की झाले. चार पाच वाजता, कोणीतरी दिलाच तर वडापाव, समोसा सहज जातो. तब्येतीला बरा म्हणून ज्युसचा ग्लास पोटात रिकामा होतो. रंमत गंमत घरी येईपर्यंत आठ वाजतात.बूट साॅक्स फेकून दिले, शर्टची वरची दोन बटणं काढली की, सोफ्यावर आडवे राहात, पाय खुर्चीवर ताणून, चेहेऱ्यावर जमेल तेवढा दमल्याचा आव आणायचा आणि डोक्याला आठ्या घालत, अश्शी ताणून द्यायची, की बघणाऱ्याला वाटलं पाहिजे की, साहेब कोणत्यातरी मोठ्या लढाईहून घायाळ होऊन परतलेले सैनिकच आहेत.
तिथूनच पोरांवर ओरडत, पंख्याची गरगर सुरू करायची ऑर्डर द्यायची, आणि आपण आल्याची वर्दी स्वयंपाकघरात आपसूक जायची. गरमागरम चहा आयता हातात पडेपर्यंत, बाहेर गरम झालेलं डोकं घरातल्या कुणावर तरी राग काढून शांत व्हायचं.भरपूर भुक लागलेली असल्यामुळे चहाबरोबर काहीतरी कुरकुरीत चकली चिवडा फरसाणाचा डबाच घेऊन बसायचं. मग कुठेतरी जरा जीव शांत व्हायचा.
"टिव्ही समोर बसून खायचं नसतं" हे सकाळी पोरांना ऐकवलेलं वाक्य विसरून जात, चहा चकली पोटात विरून जाते. दिवसभराचा तथाकथित सगळा शीण, टीव्ही मालिकेतल्या सुंदऱ्यांनी आणि जाहीरातीतल्या चिचुंद्यांनी तासा दोन तासात घालवला, की टेबलावर ताट पाणी यायला सुरवात होते. "आता कसं शांतपणे जेवता येतं. एकत्र चर्चा होते." हीच वेळ असते मुलांसोबत त्यांच्याशी अभ्यासपूस करायची. म्हणजे पोरं सुद्धा वाढलेल्या ताटाखालचं मांजर होतात. दिवसभर सगळं वचावचा खाल्लेलं असल्यामुळे रात्रीचे जेवण कसं साग्र संगीत बनवलेलं असतं, पुनः गरमागरम चपाती भाजी, आमटी, भात, सॅलेड, भाजी, उसळ, तळलेली दोन चार कापं, लोणचं पापड. ताट असं गच्च भरलेलं. भरल्या पोटानं उठून, हात धुवत, दात कोरत, हालत डुलत स्वारी थेट शयनकक्षात. स्वयंपाकघरातली आवराआवरी करून बाईसाहेब तासाभरात पुनः दुधाचा ग्लास घेऊन प्रवेशतात. आणि दुधाचा ग्लास रिता करून आमचा दिवस संपतो. भरल्यापोटी कशी मस्त झोप लागते ना.
हे एवढं खाताना आपण चार ते पाचवेळा तरी ढेकरा दिलेल्या असतात.
या जीवनपद्धती मधे आम निर्मिती, क्लेदामधे रूपांतरण या क्रिया अगदी सहजपणे घडत असतात. पहिले अन्न पचायच्या आतच दुसरा अन्नाचा गोळा वरून आत पडत असतो.
सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत चारच वेळा आपण खाल्लंय असं गृहीत धरू.
सकाळी नाश्ता, दुपारी जेवण, सायंकाळी नाश्ता आणि रात्री पुनः जेवण.
आता आपण कायदा केला, सकाळी आणि सायंकाळी जेवावे. या कायद्याची सोयीस्कर पळवाट पाहून ठेवू.
असं करता येतं काय पहा.
टीव्ही बंद, घरात सौ. ला थोडी हाताखाली मदत करायची, भाजी चिरून देणे, टेबल साफ करणे, नारळ खोवून देणे, ताटपाणी घेणे, कपबश्या विसळणे, अशी कामे जरा चुकली तरी फारसा ओरडा खावा लागणार नाही, मुलांची शाळा अभ्यास जेवताना बिलकुल नाही.आणि जेवणाचे कौतुक करतच जेवायचं.
सकाळी नाश्त्याऐवजी जेवण करूनच बाहेर पडायचं. दुपारी जेवणाऐवजी नाश्ता करायचा. सायंकाळी घरी आल्यावर परत जेवायचे. आणि रात्रौ झोपताना भूक लागली तरच नाश्ता करायचा ! तोही अगदी सुका. दूध नको, पाणी नको. कुठेतरी राजगिरा लाडू, लाह्या, पाॅपकाॅर्न, चुरमुरे, भडंग, सुका मेवा, चिक्की, काॅर्नफ्लेक्स इ. पचायला हलके असणारा पण इकडे तर पोट भरती करणारा......
हा नियम नाही, पण नियमातील प्रॅक्टीकल पळवाट आहे. पण शास्त्र तत्वाला कुठेही बाधा येत नाही.
म्हणजे सकाळी जेवण सूर्याबरोबर, दुपारचा नाश्ता सूर्याबरोबर, सायं भोजन सूर्याबरोबर ! आणि रात्रौचा नाश्ता "सौ" बरोबर !!
ये हो गया हिसाब बराबर, सौ साल के लिए !!!
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
07.03.2017
March 7, 2017
शहरं स्मार्ट असून उपयोग नाही, तर शहरवासी स्मार्ट असावे लागतात. रस्ते व वाह्न स्मार्ट असली तरी ते वापरणारेही स्मार्ट असले पाहिजेत. तसच आहे गॅजेट्सचं. फोन स्मार्ट नसतो, तर तो वापरणारा स्मार्ट असावा लागतो. विचार प्रगल्भ करा. आपली गरज आहे वैचारिक श्रीमंतीची. तेव्हा ‘विचारी बना’ हा आपल्या सर्वांसाठी मंत्र आहे.
March 7, 2019
कर्पूरागरुकुङ्कुमाङ्कितकुचां कर्पूरवर्णस्थितांकृष्टोत्कृष्टसुकृष्ट कर्मदहनां कामेश्वरीं कामिनीम् ।
कामाक्षीं करुणारसार्द्रहृदयां कल्पान्तरस्थायिनीं
श्रीशैलस्थलवासिनीं भगवतीं श्रीमातरं भावये ॥ ८॥
कर्पूर- कापूर
आगरु- काळे चंदन
कुङ्कुम- कुंकू
अङ्कितकुचां- यांनी वक्षस्थल व्याप्त असलेली. या सगळ्यांची उटी आई जगदंबेने शरीराला लावली आहे. कर्पूरवर्णस्थितां- कापरा प्रमाणे शुभ्र पांढऱ्या रंगाची.
कृष्टोत्कृष्ट- कृष्ट म्हणजे निम्न तर उत्कृष्ट म्हणजे अप्रतिम.
सुकृष्ट- सुयोग्यरीत्या केलेले,
कर्मदहनां - कर्माला जाळून टाकणारी.
कर्माची रचना एखाद्या बीजाप्रमाणे असते. बीज ज्या प्रकारचे असते वृक्ष त्या प्रकारचा निर्माण होतो. तसे कर्म जसे असते तसे फळ प्राप्त होते. मात्र जर हे बी भाजले आणि नंतर पेरले तर ते उगवत नाही. त्याप्रमाणे एकदा आई जगदंबेची कृपा प्राप्त झाली की मग कोणत्याही कर्माचे फळ अर्थात बंध लागत नाहीत.
कामेश्वरीं - सर्व कामना अर्थात इच्छांची अधिष्ठात्री.
कामिनीम् - भक्तांच्या, साधकांच्या सकल कामना पूर्ण करणारी.
कामाक्षीं- काम म्हणजे इच्छा. अक्षी म्हणजे निवास. सकल कामनांचे निवास अर्थात मूळ स्थान. करुणारसार्द्रहृदयां- कारुण्य रसाने जिचे हृदय भरलेले आहे अशी. कल्पान्तरस्थायिनीं-
भगवान श्री ब्रह्मदेवांच्या दिवसाच्या शेवटी या संपूर्ण विश्वाचा जो लय होतो तो पर्यंतच्या काळाला कल्प म्हणतात. त्यावेळी सर्वकाही नष्ट होते. मात्र त्यावेळी सुद्धा नष्ट होणारी आदिशक्ती कल्पान्तरस्थायिनी संबोधिली जाते.
श्रीशैलस्थलवासिनीं भगवतीं श्रीमातरं भावये - श्रीशैल पर्वतावर निवास करणाऱ्या आई जगदंबेचे मी भजन करतो.
-- विद्यावाचस्पती प्रा. स्वानंद गजानन पुंड
April 10, 2020
महाराष्ट्र शासनाने नुकतीच धान्यापासुन मद्य बनविण्याच्या कारखान्यांना परवानगी दिली, यातील बरेचसे कारखाने विदर्भात असुन त्यांची यंत्रसामुग्रीही तयार आहे , फक्त शासनाच्या परवानगीचाच काय तो उशिर होता , असेही समजले. आता यावर बर्याच लोकाना आक्षेप होता . शेतकर्यांच्या आत्महत्या जास्त असणार्या विदर्भात हे कारखाने कशाला ? असे काहींचे म्हणणे होते , तर गरिबी जास्त असताना धान्याचा उपयोग लोकाना खाण्यासाठी करण्याऐवजी मद्यासाठी कशाला ? असाही एक मतप्रवाह होता . काही लोकांनी शासनाला पत्रे लिहिली , काहींनी उपोषणाचा मार्ग अवलंबला , पण शासन आपल्या निर्णयापासुन तसुभरही ढळले नाही , विशेष म्हणजे विरोधी पक्षांनीही याबाबतीत सरकारला साथच दिली , आणि कारखाने चालु होण्याचा मार्ग मोकळा झाला.
आता हा निर्णय शासनाने काही तडकाफडकी घेतला नव्हता . बर्याच विचारविनिमयानंतर आधी समिती स्थापन करण्याचा निर्णय झाला . समितिने या विषयावर काम करुन गोपनीय अहवाल शासनाला सादर करावा , असे आदेश देण्यात आले . या समितीने सहा महिने अथक प्रयत्नांनी अहवाल तयार केला , आणि शासनाला सादर केला. या गोपनीय अहवालाच्या शिफारशीनुसारच हा निर्णय घेण्यात आला. हा गोपनीय अहवाल नुकताच फुटला आणि आमच्या हाती लागला . ( सर्व गोपनीय अहवालच का फुटतात , या विषयावर अहवाल तयार करण्याचे काम शासनाची एक समिती करीत आहे . तो अहवाल मात्र अद्यापपर्यंत फुटलेला नाही. ) आम्ही तो वाचकांसाठी प्रकाशित करीत आहोत .
अहवाल
धान्यापासुन मद्यनिर्मिती महाराष्ट्रात शक्य आहे काय ? या विषयावर विविध विषयातील तज्ञ मंडळींनी सहा महिन्यांच्या अथक प्रयत्नांनी हा अहवाल तयार केला असुन त्यातील प्रमुख मुद्दे खालीलप्रमाणे आहेत .
कुठल्याही प्रकारच्या कारखान्यासाठी प्रमुख चार गोष्टींची आवश्यकता असते. कारखान्यासाठी जागा , कच्या मालाची उपलब्धता , मनुष्यबळ , आणि विक्रीसाठी बाजारपेठ . यातील प्रत्येक गोष्टीचा ही समिती सांगोपांग विचार करुन अहवाल सादर करीत आहे.
१ . महाराष्ट्रात भरपुर प्रमाणात जमीन आहे . सिंचनाचा अभाव असल्याने बरीचशी जमीन कोरडवाहु आहे . पावसाच्या अनियमिततेमुळे पिके अनिश्चित आहेत. त्यात बराचसा शेतकरी हा कर्जाच्या विळख्यात बुडालेला आहे , आणि त्याच्या बर्याच जमिनी या गहाण पडलेल्या आहेत. त्यामुळे शेतजमीन ताब्यात घेणे सहज शक्य असुन कारखान्याला जागा सहज मिळेल , असे म्हणता येइल .
२. क्रुषिमंत्र्यांनी नुकत्याच केलेल्या विधानानुसार आपल्याकडे अन्नधान्याचा अतिरिक्त साठा ( सरप्लस ) शिल्लक आहे . हा अतिरिक्त साठा उपलब्ध असला तरी अन्नधान्याच्या किंमती सामान्य लोकांच्या अवाक्याबाहेर गेलेल्या आहेत . त्यामुळे हे धान्य त्यांना विकत घेणे शक्य नाही . हा साठा पडुन रहाण्यापेक्षा मद्यनिर्मितीसाठी वापरता येणे शक्य आहे.
३. शेतीची अवस्था बिकट झाल्यामुळे बरेचसे शेतकरी मजुरी करतात . त्यात परराज्यातुन येणार्या लोंढ्यांमुळे राज्याच्या लोकसंख्येत वाढच होत आहे . हे सर्व मनुष्यबळ अशिक्षित असल्याने स्वस्त आहे , आणि मद्यनिर्मितीच्या कारखान्यात वापरता येण्याजोगे आहे . अनायासे बेरोजगारीवरही तोडगा निघेल .
४. शेवटची आणि महत्वाची आवश्यकता म्हणजे , उपलब्ध बाजारपेठ . आता यासाठी थोडा विचार करावा लागेल. आपल्याकडे कित्येक कोटी लोक दारिद्र्यरेषेखाली आहेत. त्यांच्याकडे धान्य पिकवण्यासाठी शेतजमीन नाही,. धान्य महाग झाल्यामुळे ते विकत घेण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नाहीत , १०० रु किलो दाळ घेण्यापेक्षा ५ रुपयांचा देशी दारुचा कट्टा त्यांना परवडतो, त्यामुळे त्यांना मद्य विकणे सोपे आहे. अशी जनता आपल्याकडे कोटींमधे असल्याने ही बाजारपेठ खुप मोठी आहे .
महाराष्ट्र राज्य औद्योगिकरणात खुप पुढे होते. हळुहळु बरीच राज्ये आपल्या पुढे निघुन गेली. आपण मात्र जिथल्या तिथे राहिलो. मात्र हळुहळु दरवर्षी अशा शेकडो कारखान्यांना परवानगी दिली तर कारखान्यांची संख्या आपल्याकडे खुप वाढेल , आणि औद्योगिकरणात आपसुकच आपले पाउल पुढे पडेल . त्यामुळे धान्यापासुन मद्यनिर्मितीच्या कारखान्यांना शासनाने परवानगी द्यावी , आणि असे कारखाने महाराष्ट्रात अधिकाधिक कसे वाढतील हे बघावे , अशा शिफारशी ही समिती शासनाला करीत आहे.
आम्ही पक्के म(द्य)हाराष्ट्रवादी असल्याने ” मेड इन महाराष्ट्र ” अशा मद्याची चव कधी चाखायला मिळते याची अत्यंत मनापासुन वाट बघत आहोत .
-- निखिल नारायण मुदगलकर
February 15, 2010
आज भलेही आपण जागतिक महासत्ता बनण्याचा दावा करीत असलो तरी ही वस्तुस्थिती आपण नाकारू शकत नाही की आजच्या घडीला या देशात मोबाईल फोनची संख्या स्वच्छतागृहांपेक्षाही अधिक आहे. मोबाईलची संख्या वाढत आहे म्हणजेच देशाचा विकास किंवा आधुनिकीकरण होत आहे, असा दावा आपले सरकार केल्याशिवाय राहणार नाही. संयुक्त राष्ट्रसंघाने 2008 साली केलेल्या सर्वेक्षणात तब्बल 54.5 कोटी मोबाईलधारकांची नोंद करण्यात आली होती. हे प्रमाण लोकसंख्येच्या तुलनेत 45 टक्के होते. गेल्या दोन वर्षांत त्यात आणखी दहा टक्क्यांची भर नक्कीच पडली असेल. या तुलनेत स्वच्छतागृहे मात्र 36.6 कोटी, म्हणजे लोकसंख्येच्या मानाने फक्त 31 टक्के एवढीच आहेत! याचाच अर्थ स्वच्छतागृहाबाहेर जाणार्या लोकांचे प्रमाण आजदेखील खूप अधिक आहे. घरात स्वच्छतागृह नसले तरी चालेल, पण खिशात मोबाईल हवाच असे मानणार्यांचे प्रमाण प्रचंड आहे.
June 9, 2010
दहाची नोट म्हणे कांद्याला
येतो का माझा संगे बाजारा
कांदा म्हणे ऐटीत
पन्नासची नोट, बघतेय वाट
जातो मी तिच्या संगे बाजारा
-- विवेक पटाईत
February 19, 2011
( अर्थात वटपौर्णिमा व्रत )
स्त्री जातीचा मुकुटमणीं महासती मान मिळोनी
धन्य झाली जीवनीं पतीव्रता सावित्री //१//
ब्रह्मा लिखित अटळ ह्या सूत्रीं केला बदल
हे तिच्या तपाचे फळ सावित्रीने मिळविले //२//
जरी येतां काळ चुकवावी वेळ
बदलेल फळ हेच दाखविले तीने //३//
समजण्या धर्म पतिव्रता ऐकावी सावित्री कथा
मनीं भाव भरुनी येतां आदर वाटे तिच्या परीं //४//
मद्रदेशाचा नृपति नांव तयाचे अश्वपति
कन्या त्याची सावित्री प्रेम करी तिजवर //५//
कन्या होती उपवर धाडीले शोधण्या वर
राजा करी कदर कन्येच्या इच्छेची //६//
फिरुनी सर्व देशी न मिळे कुणीही तीजशी
आली एका आश्रमापाशी दृष्टीस पडला एक युवक //७//
नजर त्यावरी पडूनी स्तंभित राजकन्या होऊनी
रुप लागली न्याहाळूनी सत्यवान युवकाचे //८//
तेजोमय युवक पाहूनी भान जाय हरपूनी
राजकन्येने वरिले मनोमनी संकल्प लग्नाचा करी //९//
राजपूत्र होता सत्यवान पिता जाई राज्य गमावून
अंधत्व पित्याचे त्यास कारण वनवासी झाले सारे //१०//
सावित्री परतूनी घरीं सर्व हकीकत कथन करी
आवड तिची सत्यवानापरी मनीं त्यास वरिले //११//
चर्चा करीत समयीं नारदाचे आगमन होई
आनंदी भाव भरुनी येई पुता पुत्रीचे //१२//
वंदन करुनी देवर्षीला कन्येचा संकल्प सांगितला
आशिर्वाद मागती लग्नाला सावित्री सत्यवानाच्या //१३//
नारद वदले खिन्न होऊनी लग्न संकल्प द्यावा सोडूनी
विचार काढावा मनातूनी सत्यवानाविषयी //१४//
दुर्दैवी आहे सत्यवान त्याची आयुष्यरेषा लहान
एक वर्षांत जाईल मिटून जीवन त्याचे //१५//
हे आहे विधी लिखीत म्हणून होत निश्चीत
कोण करील बदल त्यांत प्रभूविना //१६//
ब्रह्मा लिखीत अटळ झडप घालीतो काळ
न चुके कधी ही वेळ हीच निसर्ग शक्ती //१७/
थर्रर्र कापला नृपति चकीत झाली सावित्री
ऐकून भयंकर भविष्याती सत्यवानाच्या //१८//
सावरोनी स्वतःशी विचार करी मनासी
वदू लागली नारदासी निश्चयीं स्वरानें //१९//
प्रथम दर्शनी वरिले मनोंमनीं पती मानिले
सर्वस्वी अर्पिण्या संकल्पले कशी त्यागू मी त्याना //२०//
काया वाचा मन सत्यवाना अर्पून
पतिठायी त्याना वरुन ह्रदयीं बसविले //२१//
निवड करता पतीची मनीं बसवुनी प्रतिमा त्याची
कल्पना न यावी दुजाची हाच स्त्रीधर्म //२२//
सप्त-पावली हा उपचार होण्या सर्व जगजाहीर
धार्मिक विधी एक प्रकार राहीला असे //२३//
स्त्रीचा असता हा धर्म कां सुचविता अधर्म
सांगा यातूनीच मार्ग सावित्री विनवी नारदासी //२४//
पतिव्रता ही श्रेष्ठ शक्ति करोनी पति भक्ति
ईश्वर मिळविण्याची युक्ती सांगू लागले नारद //२५//
पतिभक्ति करुन तपसामर्थ्य येइल महान
तेच नेईल उध्वरुन पावन होता प्रभू //२६//
बघूनी सावित्रीचा निश्चय नारद आनंदी होय
आशिर्वाद देऊनी जाय नारायण नाम घेत //२७//
दृढ निश्चयाची शक्ति सावित्रीस चेतना देती
माहित असून भविष्याती उडी घेई जीवनयज्ञांत //२८//
राजकन्या सावित्री सत्यवानासंगे वनाती
लग्न करोनी राहती संसार करण्या //२९//
पतीसी समजूनी देव त्याचे ठायीं आदर भाव
मनीं बसवी त्यांचे नांव अवरित //३०//
नामात असते लय लयांत एकाग्रता होय
एकाग्र मनी ईश्वरी भाव परमेश्वर सान्नीध्याचा //३१//
पति हाच परमेश्वर न पूजे दुजा ईश्वर
सावित्री त्याचे चरणावर अर्पण करी सेवा //३२//
सेवेत असते तप शक्तीचा तो दीप
प्रज्वलीत होईल आपोआप तपः सामर्थ्य वाढता //३३//
सोडूनी काळजी काळाची पर्वा नव्हती वेळेची
अंतरीक इच्छा समर्पणाची पतीच्या अल्प अयुष्यी //३४//
वर्षा अखेरचा दिवस भयाण घेत विश्रांति सत्यवान
वटवृक्षाखाली होता झोपून सावित्री देत मांडीचा आसरा //३५//
आयुष्याची रेखा संपता जीवन दोर जाई तुटतां
प्राणज्योत नेई यमदुता त्याक्षणीं //३६//
फांस घेऊन यमदूत नेण्या सत्यवान प्राणज्योत
टाकले फांस गळ्यांत सत्यवानाच्या //३७//
सावित्रीची तपशक्ति देई तिज दिव्य दृष्ठी
सोडून फास गळ्याभोवती देई दूर फेकून //३८//
यमदूत जाई घाबरुन हतबल झाले ते बघून
सावित्रीची शक्ति जाणून रिक्त हस्तें गेले यमपूरीं //३९//
यमराज मृत्युदंडाधिपती संतापून ते येती
नेण्या प्राणज्योती सत्यवानाची //४०//
यमराज प्रभूचे दिक् पाळ मृत्युरुपी ते महाकाळ
अपूर्व त्यांचे बळ राज्यकरीं यमपूरी ///४१//
नेवून मानव प्राणज्योत कर्माप्रमाणे शिक्षा देत
पाठवूनी नविन देही परत जीवन गाडा चालवी //४२//
रेड्यावर बैसूनी यमराज आले धाऊनी
हातीं फांस घेऊनी प्राण नेण्या सत्यवानाचे //४३//
बसूनी सत्यवाना शेजारीं पतीधर्माचे ध्यान धरीं
रक्षण कवच उत्पन्न करी पती पत्नी भोवती //४४//
तपाची दिव्य शक्ति यमराजासी येण्या रोकती
फांस त्याचे न पोहोंचती सत्यवाना पर्यंत //४५//
बघूनी ते तेजोवलय यमराज चकीत होय
शोधूं लागला उपाय सत्यवानाची नेण्या प्राण ज्योत //४६//
पतीकडून पाणी मागवून सावित्रीस दूर सारुन
प्राण ज्योती घेई काढून सत्यवानाची //४७//
यमराज निघाला स्वर्गी सावित्री त्याच्या मागे मार्गी
पतिव्रता शक्ति तिचे अंगीं चेतना देई मार्गक्रमण्यास //४८//
मनीं तिच्या पतिभक्ति बघून अपूर्व शक्ति
यमराज प्रसन्न होती सांगतले वर मागण्या //४९//
श्वशुराचे अंधत्व गेले राज्य तया परत मिळाले
वडीलांस पुत्र प्राप्त झाले सावित्री मिळवी तीन वर //५०//
न पावली समाधान पाठलाग चालूं ठेवून
यमासी ठेवीत झुलवून चर्चुनी विषय निराळे //५१//
शेवटचा मी वर देईन परी तू जावे परतून
मानव देहा स्वर्ग कठीण कसे राहशील तूं तेथें ? //५२//
जीवन आतां माझें व्यर्थ न उरे जगण्या अर्थ
एकटेपणा ठरेल अनर्थ माझ्या आयुष्यीं //५३//
इच्छा माझी व्हावे माता सानिध्य मुलाचे मिळतां
एकटेपणाचा भाव न राहता उर्वरीत जीवनामध्यें //५४//
पाठलाग घेण्या सोडूनी तथास्तू म्हटले यमानी
मान्य तिची विनंती करुनी वर देई तिला //५५//
तथास्तू म्हणतां क्षणी धरती गेली हादरुनी
भयंकर विजा चमकोनी निसर्ग उत्पात माजला //५६//
मान्य केले मातृत्व नसता जीवित पितृत्व
शक्य कसे हे अस्तित्व चुक उमगली यमराजा //५७//
निसर्गाच्या नियमाला तथास्तूने धक्का दिला
नियतीचा डाव उलटला सावित्रीच्या शक्तिनें //५८//
जसा सुटावा बाण तसा शब्द जाऊन
यमराज पेचांत पडून हारला सावित्रीपूढे //५९//
सोडून देई प्राणज्योत सत्यवान जीवदान मिळत
अखंड सौभ्याग्यवती वरदान मिळाले सावित्रीला //६०//
वटवृक्षाखालती पाऊनी सतीशक्ति
जीवदान मिळती सत्यवाना //६१//
ज्येष्ठ शुद्ध पौर्णिमेला स्त्रीया पूजती वटवृक्षाला
अखंड मिळण्या सौभाग्याला सावित्रीप्रमाणे //६२//
पतिपत्नीतील प्रेमभाव समजोनी मनाचा ठाव
एकमेका आदरभाव हीच दिर्घायुष्याची गुरु किल्ली //६३//
// शुभंभवतु //
डॉ. भगवान नागापूरकर
१३- २५११८३
January 13, 2018
चीन सीमेवर २१ दिवसांपासून असलेला तणाव दूर करण्यासाठी अखेर केंद्र सरकारने चीनच्या हट्टापुढे गुडघे टेकले. लष्कराचा विरोध असूनही सरकारी आदेशामुळे भारतीय संरक्षण दलाने चुमार येथील बंकर तोडून टाकण्याचा निर्णय घेतला आहे.चीनने भारताच्या हद्दीत दौलत बेग ओल्डी क्षेत्रात १९ किलोमीटर आतपर्यंत घुसखोरी करुन लष्करी चौकी बांधण्याचे काम सुरू केले होते.
May 13, 2013
मला आतून पक्के माहित होते की अतृप्त आत्मे , शनी महाराज वगैरे मला त्रास देत नाहीयेत तर माझे विचार आणि वर्तन माझ्या अधःपतनास जवाबदार होते , मात्र हे मला उघडपणे मान्य करणे कठीण जात होते . माझा दिवसातील जास्तीत जास्त वेळ गांजा पिणे , वाचन आणि मित्रांबरोबर टिवल्याबावल्या करण्यात जात असे, त्याच काळात ‘ श्रीमद्भगवद्गीता ‘ जशी आहे तशी वाचनात आली ,
January 25, 2020
भगवंताच्या त्या ओठाचे वर्णन केल्यानंतर त्याच्या हालचाली नंतर आतून डोकावणाऱ्या दंतपंक्ती कडे आचार्यश्रींचे लक्ष जाते. त्या अनुपमेय सौंदर्य धारण करणाऱ्या दंत मालिकेचे वर्णन करताना आचार्य श्री म्हणतात,
January 8, 2021
Copyright © 2025 | Marathisrushti