वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
हे कधीतरी घडणार होते आचके देत रुग्णालयात आय सी यु मध्ये असणाऱ्या रुग्नाप्रमाणे शेवटी महाराष्ट्र परिचय केंद्राचे पणजीतलं कार्यालय बंद पडले व शेवटी महाराष्ट्राशी असणारा दुवा निखळला असे खेदाने म्हणावे लागेल.
February 12, 2023
महाराष्ट्रामध्ये विविध कारणांसाठी एकत्र जेवणावळींची प्रथा तशी खूप जुनी ! घरातील शुभकार्य,देवाचा सार्वजनिक उत्सव यापासून ते अगदी मृत व्यक्तीचे तेरावे अशा कारणांसाठी जेवणावळी होत असत.बरेचदा या जेवणावळी जातीनिहाय, कुटुंबनिहायसुद्धा असायच्या . स्वातंत्र्यवीर सावरकरांनी समाजातील जातीयता मोडण्यासाठी समाजातील सर्व जातींच्या लोकांबरोबर, पूर्वी अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या लोकांच्या एकत्र जेवणावळीही केल्या.७०/ ८० वर्षांपूर्वी अशा जेवणावळीत भांड्यांचा आवाज, एकमेकांशी कुजबुज, यजमानांचा आवाज यापेक्षाही एक वेगळा आवाज हळूहळू घुमू लागला. जेवण सुरु असतांना देवाचे संस्कृत किंवा मराठी श्लोक म्हणणे सुरु झाले. एकावेळी ३०० / ४०० लोकांच्या पंगतीला ( माईकशिवाय ) स्पष्टपणे ऐकू जाईल इतक्या मोठ्या आवाजात असे श्लोक म्हणणे हे एक कसब होते. मग तर असे श्लोक म्हणण्याची जुगलबंदी सुरु होई. लग्नात मुलीकडच्या माणसांनी श्लोक म्हटल्यावर, मुलाकडे कुणीतरी आणखी चांगला / वेगळा श्लोक आणखी मोठ्याने म्हणत असे. नंतर या श्लोकात नर्म विनोदी प्रकारही आले.
उदा. " गोविंद गोपाळ हे दोघे बंधू, जेवीत होते दहीभात लिंबू ।
जेवता जेवता चमत्कार झाला, पानात उंदीर मुतून गेला ।।
माझे काका कै. नरहरी भार्गव करंदीकर ( जन्म १९१७ ) हे एक पारंपारिक रचना अत्यंत खड्या आवाजात म्हणत असत. ४०० माणसांना त्यांचा प्रत्येक शब्द ऐकू जात असे. सर्व ज्येष्ठ मंडळींमध्ये त्यांचे " नरू " हे नाव फार प्रसिद्ध होते. लग्नात आमचा हा " नरू " जर मुलीच्या बाजूने म्हणणार असेल तर मुलीकडच्या मंडळींची कॉलर टाईट असायची. त्याकाळी सरकार दरबारी अर्ज करण्याची एक विशिष्ट भाषा असे. जेवणावळीतील अनेक पदार्थांची नवे गुंफून तयार केलेला हा अर्ज, तेव्हां लोकांना खूप आवडत असे. सुमारे ७० / ७५ वर्षांपूर्वीचा हा अर्ज, तत्कालीन अभिरुचीमध्ये मजेदार वाटत असे. माझ्या नरूकाकांना यासाठी चक्क " वन्स मोअर " ही मिळत असे.
हा अर्ज मुद्दाम सर्वांसाठी देत आहे --
मेहेरबान रावसाहेब श्रीखंडशास्त्री,केशरीभात, तालुके गुपचूप, जिल्हा जिलबी,यांचे हुजुरांस, अर्जदार शिरापुरी बिन करंज्या अनरसे, राहणार खाजा परगणा,तूप साजूक, यांचा विनयपूर्वक ऐसाजे. मौजे बासुंदी येथील बेसन लोकांनी दळ्याची चोरी केली. त्याची चौकशी मांडे साहेबांस करावयास सांगावी. तुमचे कोतवाल मेतकूटसाहेब यांस,चटणी सेशनी पाठवून, फेणीबाईस समन्स धाडून साक्षीकरीता वरचेवर येण्याचे करावे. मध्यंतरी तिळाची चटणी,ओल्या मिरच्यांचे तिखट,कोरड्या मिरच्या गडबड करू लागल्यास घिवर शिपायास चाबुकस्वाराचा पोशाख देऊन त्याचा बंदोबस्त करावयास सांगावे. त्याचे चवीस काही कमी झाल्यास मठठे साहेबांना साक्ष ठेवून,
लाडूभट्टावर हल्ला करून उदरनिर्वाहाची केस पुरी करावी. मेहेरबानांस जाहीर व्हावे.
सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा !
-मकरंद करंदीकर.
October 23, 2017
आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-क्रमांक अकरा
जे जे देवासाठी ते ते देहासाठी-भाग 12
वस्त्र अलंकार झाल्यावर तिलक धारण केला जातो. देवाला भ्रूमध्य स्थानी चंदनतिलक केला जातो.भ्रूमध्य हे स्थान आज्ञाचक्राचे आहे. या चक्राला तिलक लावणे म्हणजे आज्ञाचक्राला संरक्षण देणे होय. जणुकाही फिल्टरच ! जे योग्य असतील तेवढीच सकारात्मक स्पंदने आत पाठवणे आणि नको असतील ती नकारात्मक स्पंदने बाहेर ठेवणे, अशी दोन कामे हा मंगल तिलक करत असतो. दक्षिण भारतात तर तिलक लावल्याशिवाय पुरूषदेखील घराबाहेर पडत नाहीत.
उगाळलेले चंदन, रक्तचंदन, अष्टगंध, केशर, कुंकू, हळद, गोपीचंदन इ. लेप या आज्ञाचक्रावर लावले जातात. देवतांना चंदनतिलक लावताना अनामिकेने, म्हणजे करंगळीजवळच्या मरंगळीने लावावे. स्वतःला किंवा दुसऱ्याला लावताना मधल्या बोटाने भ्रूमध्यावर लावावे.
भ्रूमध्य हेच स्थान आत्म्याचे स्थान सांगितले जाते. म्हणजे इथे लावलेले लेप ही एक प्रकारची प्रत्यक्ष स्वपूजा किंवा आत्मपूजाच आहे.
मी हिंदु आहे, हे न सांगताच समजले पाहिजे, हे ओळखण्यासाठी हा तिलक काम करत असतो. इतर कोणत्याही धर्मात असा मंगल तिलक दररोज लावला जात नाही. पण आज सर्व धर्मसमभावाच्या गोंडस संस्कारांनी, "मी हिंदु आहे" असे अभिमानाने सांगायची पण लाज वाटू लागली आहे.
भारतीय सौभाग्यवती महिलांचे "मांग मे सिंदूर भरना" अगदी अनिवार्यच असते. आता तर सिरीयल्स पाहून महाराष्ट्रीयन भगिनीदेखील मांग मे सिंदूर भरने लगी है ।
प्रश्न नवयुवतींचा आणि समस्त पुरूष वर्गाचा आहे. पुरूषांना कपाळी केशरी गंध आणि महिलांना हळदीकुंकु लावणे म्हणजे मागासलेपणाचे आणि बुरसटपणाचे वाटते. काही वर्षांपूर्वी टिकली तर टिकली होती, आता तीपण टिकत नाही. त्याचे शास्त्र आणि त्यामागील भारतीय दृष्टीकोन वेळीच न समजल्याचे हे दुष्परिणाम आहेत. आता तरी जागे होऊया. संस्कृतीचे पालन करूया.
देवासाठी "चंदनं समर्पयामी" आणि देवीसाठी "हरिद्राकुंकुमम् सौभाग्यद्रव्यम समर्पयामी" हे जसे सांगितले आहे तसेच आपल्या देहासाठीदेखील आहे, हे दोघांनीही लक्षात ठेवूया. पालकांनी आपली थोडी कडक भूमिका आपल्या घरातील देव आणि देवींना, समजावून सांगितली तर षटचक्र दूषित झाल्यामुळे बिघडलेले काम क्रोध आदि रिपु सहजपणे जिंकता येतील.
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
05.06.2017
June 5, 2017
हायड्रेटिंग फेस पॅक
उन्हाच्या वातावरणात आपली त्वचा नेहमीपेक्षा जास्त तेलकट होते. अशा वेळेस चेह-यावर तजेलदारपणा आणायचा असेल तर आंब्याचा रस घेऊन त्यात मुलतानी माती टाकावी. आंब्याचा रस व मुलतानी माती यांचे उत्तम मिश्रण करून चेह-यावर लावावं. हे मिश्रण चेह-यावर पंधरा मिनिटं ठेवावं. त्यानंतर स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावं. चेह-यावर तेज येऊन त्वचा सुंदर दिसते.
संवेदनशील त्वचेसाठी
काही तरुणींची त्वचा अत्यंत संवेदनशील असते, त्यामुळे बाहेरील उन्हाचा, हवेचा व वातावरणाचा त्यांच्या चेह-यावर लगेच फरक जाणवतो. अशा वेळेस आमरसमध्ये तीन चमचे मुलतानी माती घेऊन त्यात २ चमचे पाणी आणि १ चमचा दही टाकून मिश्रण तयार करावे. ही पेस्ट तयार करून चेह-यावर व मानेवर हलक्या हाताने लावावी. हा फेस पॅक चेह-यावर जवळपास तीस मिनिटे ठेवावा. अध्र्या तासानंतर चेहरा सुकल्यावर थंड पाण्याने धुवून टाकावा.
ताजे मँगो फिल्टर
संपूर्ण दिवसभर काम केल्यावर शरीरासोबतच आपला चेहराही थकतो. त्यामुळे चेह-यावर आलेला थकवा घालवण्यासाठी व अकालीन आलेलं वृद्धत्व दूर करण्यासाठी ताज्या मँगो फिल्टरचा वापर करावा. ७-८ अक्रोड किसून त्यात ओटचे जाडे भरडे पीठ २-३ चमचे टाकावे, ३ चमचे मुलतानी माती आणि त्यामध्ये योग्य प्रमाणात पाणी मिसळावे. या सगळ्यांचे योग्य मिश्रण करावे.
तयार झालेले मिश्रण चेह-यावर व मानेवर लावून जवळपास तीन तास तरी सुकवावे. चेहरा पूर्णपणे सुकल्यावर थंड पाण्याने धुवून घ्यावा. जेणेकरून चेह-यावरचा ताण कमी होऊन चेहरा त्राणविरहीत दिसू लागतो. हा उपाय सर्व प्रकारच्या चेह-यासाठी उपयुक्त असून रोज वापर केल्यास चेहरा जास्त खुलून येतो.
मँगो बॉडी स्क्रब
चेह-यासोबतच बाहेरील वातावरणामुळे शरीरावरही परिणाम होतो. आपली त्वचा कोरडी होते तसंच त्वचेतील पेशी मृत पावतात. अशा वेळेस एका भांडयात २ चमचे आंब्याचा रस घ्यावा, त्यात २ चमचे दूध आणि एक चमचा साखर घालून मिश्रण तयार करावं. मिश्रण तयार झाल्यावर ते मिश्रण चेह-यावर व शरीरावर लावून घ्यावं. २० ते २५ मिनिटं शरीरावर मसाज करून कोमट पाण्याने धुवून टाका. साखरेमुळे शरीरावरील मृत पेशी नष्ट होण्यास मदत होते. मृत पेशी नष्ट झाल्यामुळे शरीर व चेहरा टवटवीत दिसतो.
डागविरहीत त्वचेसाठी
आंब्याच्या रसामध्ये हरभ-याचे कूट टाकून त्यात एक चमचा मधाचा टाकावा. हे मिश्रण एकजीव करून घ्यावं. चेह-यावर आणि विशेषत: डाग असलेल्या भागावर हे मिश्रण लावावं. १५ मिनिटांनंतर चेहरा थंड पाण्याने धुवून घ्यावा. हा उपाय रोज केल्यास चेह-यावरील डाग कमी होण्यास मदत होते. चेहरा स्वच्छ होऊन डागविरहीत होतो.
मँगो फेशिअल
चेह-यावरील सुरकुत्या कमी करण्यासाठी व चेह-याला तेज आणण्यासाठी मँगो फेशिअल नावाचा प्रकार सध्या पार्लरमध्ये प्रचलित आहे. या फेशिअलमध्ये आंब्याच्या रसामध्ये अंडयातील आतील पिवळा द्रवपदार्थ मिसळावा आणि त्यामध्ये मधाचे काही थेंब टाकावेय.
१५ मिनिटांनंतर थंड पाणी व फेस वॉशने चेहरा धुवून घ्यावा. फेस वॉशने चेह-यावर अंडयामुळे आलेली दरुगधी कमी करता येते. साधारण तरुणी महिन्यातून एकदा तरी फेशिअल करतात. त्यामुळे चेह-यावरील सुरकुत्या कमी होतात. मँगो फेशिअलमुळे चेहरा निखळ व तेजस्वी दिसतो.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
May 3, 2017
दुसर्या महायुद्धावरील अनेक पुस्तकांच्या वाचना दरम्यान समज गैरसमज यांची ही उदाहरणे माझ्या स्मरणात राहिली. या घटना मी अगदी संक्षेपात मांडल्या आहेत. काही वेगळे समोर ठेवावे या हेतूने बॉंबची सर्वश्रृत नावे (Little boy, Fat man) न सांगता त्यांचे प्रकार सांगितले आहेत. युद्ध रम्य नक्कीच नाही, पण युद्धकथा काहीतरी विचार करण्यास वाव देतात ना? ‘दुसरे महायुद्ध’ या विषयावरील हा पहिला लेख.
March 6, 2025

तिबेटचं पठार म्हणजे एक आत्यंतिक परिस्थिती असणारं ठिकाण आहे. सुमारे पंचवीस लाख चौरस किलोमीटर इतक्या मोठ्या आकाराच्या या पठाराची सरासरी उंची चार हजार मीटरहून अधिक आहे. इथली हवा अत्यंत विरळ आणि थंड असते. इथलं तापमान हिवाळ्यात शून्याखाली वीस अंश सेल्सिअसच्या खाली जातं.
May 3, 2023
आपली प्रकृती सुधारण्यात विविध पदार्थांची वेगवेगळी भूमिका असते. सोयाबीनही त्यासाठी फायद्याचे ठरते. यापासून तयार केलेले पदार्थ आपल्याला निरोगी राहण्यास मदत करतात. यामध्ये सोया सॉस, मोड आलेले सोयाबीन, सोयाबीन दूध, आटा अशा सोयाबीनच्या पदार्थांचे सेवन केले असता अनेक आजारांपासून दूर राहता येते.
सोयाबीनपासून मिळत असलेल्या प्रथिनांमुळे (प्रोटिनमुळे) आपल्या हाडांना भरपूर कॅल्शियम मिळते. त्याचबरोबर यामध्ये असलेल्या इसोफ्लेवोन्स या घटकामुळे हाडांना पोहोचणार्यार इजांचे प्रमाण कमी होते. त्यामुळे ऑस्टियोरोसिसच्या धोक्यापासून दूर राहण्यास मदत मिळते.
सोयाबीनमध्ये प्रथिने व तंतूचे प्रमाण अधिक असल्याने रक्तातील शर्करेची पातळी नियंत्रित केली जाते. त्याचबरोबर आपल्या मूत्रपिंडाची गाळणक्षमता वाढवण्यासही सोयाबीनचे पदार्थ मदत करत असतात. त्यामुळे आपल्याला मधुमेह व मूत्रपिंडाशी निगडित आजार होण्याची शक्यता कमी होते.
सोयाबीनमध्ये असलेल्या अँटिऑक्सिडंट तत्त्वामुळे प्रदूषण, उन्हाचा त्रास व वयानुसार मृत होणार्या पेशींची समस्याही थांबते. इजा पोहोचलेल्या पेशींचे पुनरुज्जीवन होण्यासही या अँटिऑक्सिडंटमुळे मदत होते. यामध्ये डायटरी फायबरही भरपूर प्रमाणात असल्याने आपले वजन घटवण्यासही सोयाबीनपासून बनवलेले पदार्थ साहाय्यकारी ठरतात.हे एक ‘लो ग्लायसेमिक इंडेक्स’ प्रकारातील खाद्य आहे. अशा प्रकारातील खाद्य आपल्या रक्तातील शर्करेचे प्रमाण नियंत्रित करण्यास मदत करते.सोयाबीनपासून तयार केलेल्या पदार्थांनी आपली भूक भागल्याचे समाधान लाभते.
संजीव वेलणकर
९४२२३०१७३३
January 5, 2017
पुण्यात बरेच ठिकाणी मायक्रोब्रूअरी रेस्टोबार झालेत. अशाच एक मायक्रोब्रूअरी मधे मध्यंतरी गेलेलो. मुंढव्यात.
मुंढवा एरिया म्हणजे जवळपास अमेरिका आहे. मोठमोठे रस्ते. स्वच्छता. चकाचक बिल्डिंग्स. एकदम खास.
काही ठिकाणी अजूनही ग्रामीण भाग मधेच येतो. पण कोरेगाव पार्कातून येऊन उजवीकडे वळल्यावर क्रोम स्टोअर कडे जाणारा रस्ता चकाचक. इथेच इंडीपेंडन्स शेजारी झहीर खानचं 'झेडकेज'ही आहे.
मायक्रोब्रूअरी म्हणजे मद्य बनवायचा कारखाना.
इंडीपेंडन्स मधे बियर बनवली जाते आणि बफे बरोबर सर्व्ह केली जाते.
इथलं वैशिष्ट्य हे, की इथे आठ प्रकारच्या बियर मिळतात.
तुम्हाला फारशी प्यायची सवय नसेल, तर तुम्ही फक्त शंभर रुपयात (taxes extra) इथल्या वेगवेगळ्या बियर्स ट्राय करून पाहू शकता.
याला म्हणतात ‘बियर फ्लाईट’ !
‘बियर फ्लाईट' म्हणजे सगळ्या प्रकारच्या बियर्स ३० एमएल मापात आणून दिल्या जातात.
डावीकडून उजवीकडे एक ते आठ अशा क्रमाने ग्लासेस ठेवले जातात.
सगळ्यात डावीकडे एकदम लाईट बियर. सगळ्यात उजवीकडे डार्क. डावीकडून उजवीकडे बियर्स डार्क होत जातात. नंबर चार म्हणजे बाहेर कॉमनली मिळणारी रेग्युलर लागर.
शंभर रुपयात फक्त आठ टाईप चे ३० एम एल प्रत्येकी. (एकूण २४० एम एल)
यानंतर,पूर्ण भरलेल्या ग्लास प्रमाणे पैसे देऊन आपण, जी आवडेल ती निवडून पिऊ शकतो.
या आठ बियर्स खालीलप्रमाणे -
१. हनी लव्हेंडर एल - मध आणि लव्हेंडर याच्या मिश्रणापासून बनलेलं एल. सुंदर लागतं. बडलाईट लाईम बियर सारखं.
२. रासबेरी पाय - ब्रूइंग करताना भरपूर प्रमाणात रासबेरी घालून बनवलेली चक्क गुलाबी रंगाची बियर !
३. बेल्जियन विट – ओट, पिल्सनर बियर, गहू याच्या मिश्रणापासून बनवलेली बियर. याला संत्र्याचं साल आणि कोथिंबिरीचा हलकासा स्वाद असतो.
४ फोर ग्रेन सीझन – बार्ले, गहू,राय आणि ओट हे यीस्ट घालून फरमेंट केलं जातं. याला प्लम आणि पेअरचा प्रॉमिनंट स्वाद असतो.
ही बियर बाहेर कुठेही मिळणाऱ्या लागर बियर सारखी लागते.
५. बेल्जियन डबेल – ही पण जवळपास फोर ग्रेन सीझनचीच बहीण. यात थोडासा गूळ वापरलेला असतो.
६. इक्सककाओ – कोकोच्या बिया आणि बोरबॉन व्हॅनिला घालून ही बियर बनवली जाते.
७. अॅव्हेगेडॉन – व्हाईट IPA म्हणजे बियर ब्रूइंग करतानाच्या विशिष्ट अमेरिकन आणि बेल्जियन पद्धतीचं मिश्रण. या व्हाईट आयपीए मधे होप्स मिसळले जातात. ही किंचित गोड पण मुख्यत्वेकरून कडूझार असते.
८. मेथड टू मॅडनेस IPA V१.० – तमाम वूडी, सायट्रस, फ्लोरल आणि फ्रूटी अशा सगळ्या स्वादांचं मिश्रण करून बनवलेली माल्ट आय पी ए.
भयंकर कडू. जीभ एकदम ठार होते :)
जर तुम्ही बफे विथ ड्रिंक्स घेतलात तर, तुम्हाला वर वर्णन केल्याप्रमाणे ‘बियर फ्लाईट’ तर मिळतेच. पण सोबत कुठलीही बियर, स्टार्टर्स आणि मेन कोर्स अनलिमिटेड मिळतो.
जर तुम्ही वेगन असाल, ड्रिंक्स घेऊ इच्छित नसाल तर तुमच्याकरता व्हेज स्टार्टर आणि मेन कोर्स असतोच.
फूड क्वालिटी आणि व्हरायटी उत्तम आहे.
बियर आवडणाऱ्या लोकांना इथे प्रचंड व्हरायटी मिळेल.
मला स्वतःला रासबेरी आणि इक्सककाओ या बियर्स त्यांच्या वेगळेपणा मुळे प्रचंड आवडल्या.
सवय अजिबात नसल्याने तीन ग्लासच्या वर पिऊ शकलो नाही :)
याचं जरा वाईट वाटलं :)
याशिवाय, या बियर्स बनत असताना तुम्ही प्रत्यक्ष पाहू शकता.
स्टीलचे छानदार व्हेसल्स इथे आहेत. बारले, होप्स आत टाकताना तुम्ही पाहू शकता. मॉनिटर वर रिअॅक्टर्स मधे आत काय चाललंय ते पाहू शकता. गम्मत वाटते. एकदा मजा म्हणून जायला हरकत नाही.
लाईट बियर्सच्या चाहत्यांना रासबेरी बियर होल-हार्टेडली रेकमेंडेड.
-- From WhatsApp. I liked this so hared with you. I do not know the original author.
July 1, 2017
सुरुवातीच्या दिवसात व्हॉट्सअप चा इन्कम महिन्याला फक्त ५००० डॉलर्स इतकाच होता. परंतु २०११ जेव्हा त्यांनी अँड्रॉइड मोबाईल साठी आपले व्हॉट्सअप लाँच केले तेव्हा त्यांचा इन्कम २ वर्षात २० पटीने वाढला आणि त्यांचे अँप Play Store मध्ये २० व्या क्रमांकाचे अँप बनले. २०१४ मध्ये व्हॉट्सअप चा प्रभाव एवढा वाढला कि फेसबुक चे संस्थापक मार्क झुकरबर्ग यांना फेसबुक मेसेंजर ची लोकप्रियता कमी होते की काय याची भीती वाटू लागली.
February 24, 2022
यदा रौरवादि स्मरन्नेव भीत्या
व्रजाम्यत्र मोहं महादेव घोरम् |
तदा मामहो नाथ कस्तारयिष्यत्यनाथं पराधीनमर्धेंदुमौले ‖ २७ ‖
सर्वसामान्य संसारी जीवांची अंतिम समयी जी भयावह अवस्था निर्माण होते त्याचे आचार्यश्री आपल्यासाठी वर्णन करीत आहेत. त्यावेळी आपला उद्धार व्हावा यासाठी खरे तर आपल्या करिता प्रार्थना करीत आहे. आपल्याकरिता यासाठी म्हटले की ही आचार्यश्रींनी अवस्था नाही. ते आपल्या अवस्थेची कल्पना करीत म्हणत आहेत,
यदा - ज्यावेळी
रौरवादि - रौवर इत्यादी ८४ प्रकारच्या नरकांचे, शास्त्रात वर्णन केलेल्या तेथे प्राप्त होणाऱ्या भीषण अशा यातनांच्या
स्मरन्नेव - स्मरणानेच
भीत्या - घाबरून जाऊन,
व्रजाम्यत्र मोहं महादेव घोरम् - हे भगवान महादेवा मी येथे घोर अशा मोहामध्ये जाईल. अर्थात बेशुद्ध पडेल.
या वर्णनात अत्र म्हणजे येथेच हा शब्द फार महत्त्वाचा आहे. तिथे गेल्यावर तर भयानक यातना आहेतच पण येथे त्यांचे केवळ स्मरण देखील शेवटी जीवाचा थरकाप करते. त्यामुळे शेवटी तो बेशुद्ध पडतो.
सामान्यतः मृत्यूच्या पूर्वी जीव बेशुद्ध पडतो. अनेकांना थरकाप सुटतो. घाम फुटतो. मलमूत्र त्याग देखील होतो. त्याचे कारण हेच असते. आयुष्यभर केलेल्या पापांचे स्मरण होऊन आता त्यामुळे मला कशा नरकयातना होणार? या कल्पनेनेच तो जीव कासावीस होतो. त्याचे वर्णन करून आचार्य म्हणतात,
तदा - त्यावेळी
मामहो नाथ - हे माझ्या स्वामी मला, कस्तारयिष्यति - कोण तारणार? आपल्या शिवाय माझे आहे तरी कोण?
मी कसा आहे तर,
अनाथं - मला आपल्याशिवाय कोणीही नाही.
पराधीनम् - मी पूर्णतः पराधीन, हतबल आहे.
अर्धेंदुमौले - हे मस्तकावर चंद्रकोर धारण करणाऱ्या भगवंता, याप्रसंगी माझे रक्षण करा.
-- प्रा. स्वानंद गजानन पुंड
July 6, 2020
Copyright © 2025 | Marathisrushti