वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
जम्मू-काश्मीर हे राज्य भारताचे नंदनवन म्हणून ओळखले जाते. देशी विदेशी पर्यटक, दांपत्यांना मधुचंद्रासाठी आवडणारे ठिकाण म्हणूनही ओळखले जाते. हिंदी चित्रपटांसाठी लागणारे निसर्गाचे देखावे, वैष्णोदेवीची यात्रा, अमरनाथ यात्रेचे चित्रिकरण करण्यासाठी दिग्दर्शक काश्मीरचा आवर्जून वापर करत असतात. मात्र गेली काही वर्षे हे राज्य दहशतवाद्यांची कर्मभूमी बनून आहे.
September 13, 2014

September 24, 2015
रत्नागिरी जिल्ह्यातील ‘अलकनंदा’ आणि ‘वरुणा’ या दोन नद्यांच्या संगमावर वसलेले ‘संगमेश्वर’ हे ‘कसबा संगमेश्वर’ म्हणून ओळखले जाते.
February 28, 2023
तथाकथित मशीद म्हणून दाखवल्या जाणाऱ्या या इमारतीच्या बाजूला एक बांधकाम उभे आहे त्याला ‘सराई’ म्हटले जाते. ‘सराई’ हा हिंदी-उर्दू शब्द सोडला तर त्या इमारतीत ‘मुस्लीम’ म्हणण्यासारखे काहीच नाही. ‘सराई’ म्हणजे यात्रेकरू किंवा प्रवाशांसाठी बांधलेला निवारा – धर्मशाळा. आपण महाराष्ट्रात त्यांना ‘ओवऱ्या’ म्हणतो.
August 10, 2025
शिवरायांनी एक पुल बांधला होता माहिती आहे का..?????
प्रतापगडाच्या पायथ्याशी "पार्वतीपुर" नावाचे एक गाव आहे नंतर त्यांचे "पार"असे नाव पडले. पार गावाजवळ शिवरायांनी एक पुल बांधून घेतला होता,त्याच खणखणीत नि योजनापूर्व केलेले बांधकाम अजूनही शाबूत आहे.
८ मीटर रुंदीचा हा पुल बहुधा प्रतापगडाच्या उभारणीच्या काळात म्हणजे १६५६-१६५८ या दरम्यान बांधला गेला असावा.
कोयना नदी ओलांडण्यासाठी ५२ मीटर लांब,८ मीटर रुंद असा भक्कम दगडी पुल निर्माण केलेला आहे.पुलाला असणाऱ्या पाच अधारांवर पुलाच्या चार कमानी तयार झाल्या आहेत, त्याची उंची जास्तीत जास्त पंधरा मीटर भरते. पाण्याच्या उगमाकडून येणाऱ्या जोरदार प्रवाहाने पुलाच्या कमानींना धोका पोहचु नये म्हणून कमानी मधील खांबांना काटकोन तिरका आकार दुभागतो. हे सारेच बांधकाम चुन्यात केलेले आहे.
सुमारे साडेतीनशेवर्षां नंतरही हा पुल अद्यापही एकही चिरा न ढासळता शाबूत आहे, दगडांच्या फटीमध्ये साधे झाडही उगवलेले नाही पुलाच्या दोन्ही बाजूंना हातभर उंचीचा ३० सेमी / १ फूटी दगडी कठडा आहे.
पाण्याचा प्रवाहाचा तडाखा सोसत, पाणी झिरपण्याच्या धोक्यावर मात करत, काही शतके देखभाल न करावी लागणं हेच त्या भक्कम बांधकामाचे वैशिष्ट्य आहे.
August 7, 2016
आता उरलेल्या संध्याकाळच्या वेळात जंगलाच्या कडेकडेने सफारी केली. जंगलातला हा संध्या समयच असा असतो, की मनात येईल तो प्राणी तिथे प्रत्यक्षात नसला तरी आपोआप दिसू लागतो. म्हणाल तो प्राणी इथं दिसू लागतो.
June 1, 2017
फ्रान्सच्या एका लहानशा खेड्यात १४१२ साली जन्मलेली एक मुलगी मायभूमीच्या स्वातंत्र्यासाठी अल्पवयात जगातील महान योद्ध्याची भूमिका बजावून इंग्रजांशी लढा देता देता आपल्या प्राणाची आहुती देते, ही घटना आश्चर्यकारक आणि प्रेरणादायी वाटते.
January 9, 2024
विश्वकर्मा समाजाच्या सांस्कृतिक अध्ययनात सर्वप्रथम शिल्पकारांच्या अस्तित्वाचा शोध घेतल्या गेला आणि नंतर अन्य पैलुवर विचार करण्यात आला आहे. विश्वकर्मा शिल्पकारांनी आपल्या कला कौशल्याने धर्म, रुढी, परंपरा, श्रद्धा, दैवते, कुलाचार, नैतीकता, शिष्ठाचार, या सर्व मनो व्यापाराना शाश्वत रुप दिले आणि एका पिढीने जतन केलेली सांस्कृतिक ठेव पुढच्या अनेक पिढींपर्यंत पोहोचविण्याचे कार्य केले. त्यांनी राष्ट्रीय जीवनच समृद्ध करुन नवोन्मेषाने जगण्याची प्रेरणा दिली. पाषाणात प्रेम, शौर्य, हास्य, करुणा किंवा कोणताही भाव मूर्तीमंत (जसाच्या तसा) कोरणे मोठे अबघड काम आहे. पुराण ग्रंथातील प्रसंगाना सुद्धा मूर्त रुप देऊन पाषाणातून सजीव केल्या गेले, त्यामुळे वाचा नसलेले दगडही बोलते झाले; प्रेक्षकांशी संबाद साधू लागले.
January 17, 2026
भगवान जगदगुरु आदि शंकराचार्यांचे स्तोत्र वाङमय म्हणजे परमानंदाचा शब्दावतार. यापैकी एकेका श्लोकाचा दररोज रसास्वाद घेण्याचा प्रयत्न करुया, विद्यावाचस्पति प्रा स्वानंद गजानन पुंड यांच्या सिद्धहस्त लेखणीतून उतरलेल्या श्री शांकर स्तोत्ररसावली या आध्यात्मिक सदरातून.....
मुदा करात्तमोदकंसदा विमुक्तिसाधकं !
कलाधरावतंसकंविलासिलोकरञ्जकम् !!
अनायकैकनायकं विनाशितेभदैत्यकं !
नताशुभाशुनाशकं नमामि तं विनायकम् !!१!!
भगवान श्री गणेशांच्या दिव्य वैभवाचे आनंदगायन करताना भगवान जगद्गुरु आदि शंकराचार्य स्वामी महाराज शब्दकळा साकारतात,
मुदा करात्तमोदक- मुदा अर्थात आनंदाने. ज्यांनी आनंदाने हाती मोदक धारण केला आहे असे. आतून, आपला आपल्याला होणारा आनंद म्हणजे मोद. भगवान स्वत: त्या आनंदाने युक्त आहेत आणि भक्तांच्या जीवनात तो आनंद देण्यासाठी त्यांनी हातात मोदक घेतला आहे. मोद म्हणजे आनंद , तो निर्माण करतो तो मोद-क.
सदाविमुक्तिसाधक- हा आनंद प्राप्त होणे हेच मुक्तीचे स्वरूप. साधकांना सदैव मुक्ती प्रदान करणारा आहे माझा मोरया.
कलाधरावतंसक - कलाधर म्हणजे चंद्र. त्याच्या विविध कला असतात. ती चंद्रकला मस्तकावर धारण करून सौंदर्यपूर्ण असणारे ते कलाधरावतंसक.
विलासिलोकरञ्जक- स्वर्गाला विलास लोक असे म्हणतात. तेथे देवता तथा स्वर्गीय जीव विविध आनंदांचा चा उपयोग घेत विलास करीत असतात. त्या सगळ्यांना आनंद प्रदान करणारे मोरया विलासिलोकरञ्जक संबोधिले जातात.
अनायक-एकनायक- त्यांच्यावर कोणाचीही सत्ता चालत नाही म्हणून त्यांना म्हणतात अनायक. तसेच ते एकटेच सगळ्या विश्वाचे नायक असल्याने त्यांना म्हणतात एकनायक .
विनाशितेभदैत्यक- इभ म्हणजे हत्ती. हा सर्वाधिक बलशाली जीव. तसे जे भयंकर दैत्य ते इभदैत्य.
श्री मुदगल पुराणात आपल्याच आत असणाऱ्या काम, क्रोधादिक षट् विकारांना आणि ममत्व तथा अहंकार यांना राक्षस रूपात वर्णिले आहे. यासर्व महाभयानक राक्षसांचा विनाश करणारे श्री गणेश विनाशितेभदैत्यक असतात.
नताशुभाशुनाशक- नत अर्थात शरण आलेल्यांचे अशुभ अर्थात दुःख, दैन्य, दारिद्र्य, पीडा, व्यथा इ. आशु म्हणजे तत्काल नष्ट करणारे भगवान गणेश भक्तांसाठी नताशुभाशुनाशक आहेत असे भगवान शंकराचार्य स्वामी महाराज म्हणत आहेत.
भगवान श्री गणेशांच्या याच स्वरूपाने आनंदित होऊन ते म्हणतात- नमामि तं विनायकम् !
भगवान गणेशांवर कोणाचीही नायकत्व चालत नाही त्यामुळे त्यांना वि-नायक म्हणतात. तसेच ते एकटेच सगळ्यांचे विशेष नायक असल्यानेही त्यांना वि-नायक म्हणतात.
अशा विनायक भगवान गणेशांना मी वंदन करतो.!! १!!
-- प्रा. स्वानंद गजानन पुंड
January 1, 2020
पाण्याचा सारांश
पाणी पिताना तहान लागेल तेव्हाच प्यावे.
तहान असेल तेवढेच प्यावे.
तांब्या पितळीच्या कल्हई केलेल्या पातेल्यातील प्यावे, नाहीतर मातीचे मडके उत्तम.
काच किंवा स्टील हे सुद्धा चांगले पर्याय आहेत, पण प्लॅस्टिकच्या बाटलीतील पाणी ? कभी नही. विष आहे ते. आज दुधही प्लॅस्टिकच्या पिशवीतच मिळते. प्रत्येक वेळी हे प्लॅस्टीक फूड ग्रेडचे असेल, यावर माझा तरी विश्वास नाही.
सकाळी उठल्यावर गरज असल्यास फक्त आठ घोट पाणीच प्यावे, ते सुद्धा तोंड धुवुन, दात घासून झाल्यावरच ! त्याअगोदर नाही.
पाणी जेवता जेवताच प्यावे. सकाळी तहान नसताना, रात्री झोपताना, कधीही अधेमधे उगाच बाटली दिसली की, रात्री जर लघवी करून आले तरी पाणी शक्यतो नकोच.
पाणी जेवताना जरूर प्यावे आणि जेवणानंतर पचन पूर्ण झाल्यावर, दोन तासांनी शरीराने मागितले तरच. नाहीतर फक्त एखादा कप भर. मिक्सरचे काम झाल्यावर मिक्सर कसा धुवुन ठेवला जातो, तसं.
पावसाचे पाणी जमिनीला लागायच्या अगोदर साठवले तर शुद्धीकरण नको. नाहीतर शुद्ध केल्याशिवाय अजिबात नको.
अति पाणी अतिरिक्त पिल्याने मधुमेह, मुतखडे, किडनीचे आजार, त्वचाविकार, दमा, अॅलर्जी, कफाचे सर्व आजार, जलोदर, संधीवात, सूज येणे, पीसीओडी, थायराॅईड, सारखे आजार तसेच वाताची दुखणी वाढतात. रक्तदाबासारख्या आजारात जर शरीरातील पाणी लघवीवाटे बाहेर काढणे, ही चिकित्सा असेल तर वरून पाणी का ढोसावे ?
अजीर्ण, अपचन सारख्या आजारात अन्य काही न खाता, केवळ गरम गरम पाणी पिणे हे औषध आहे.
प्रदेशानुसार पाणी आपले गुणधर्म बदलते.
तहान लागली तर पाणी जरूर प्यावे. पण तहान हा रोग असेल तर मात्र साधे पाणी हे औषध नाही. त्यासाठी काही औषधे घालून मसाला पाणी घोट घोट घ्यावे.
सूर्यास्त झाल्यावर पाणी पचनशक्ती बिघडवते, म्हणून रात्रौचे जेवण देखील सायंकाळीच करावे.
संडास साफ होण्यासाठी पाणी पिणे भ्रामक आहे. पाणी संडासवाटे बाहेर पडतच नाही, ते लघवीवाटे बाहेर पडते. म्हणजे पुनः किडनीना गरज नसताना अतिरिक्त काम.
मग संडास साफ कसा होणार ? त्यासाठी जेवताना तेल कच्च्या स्वरूपात वापरावे, आणि जेवताना गरम पाणी वापरावे. बात खतम.
ग्रीष्म आणि शरद ऋतु सोडून निरोगी माणसाने देखील पाणी कमीच प्यावे.
पाणी तोंडात घोट घोट घेऊन, घोळवून मगच हे लाळमिश्रीत पाणी प्यायले तर पचन सुधारेल.
फ्रिजमधले पाणी. ना रे बाबा ना !
आपण उजव्या हाताने जेवतो, पानातील उजव्या बाजुचे पदार्थ भरपूर खावेत, पण डाव्या बाजुचे पदार्थ कमी खावेत. म्हणून भारतीय परंपरेत पाण्याचे भांडे डाव्या बाजुला ठेवतात.
सर्वात महत्वाचे आपण भारतात राहातो, भारतातील सर्व नियमांनी आपण बांधलेलो आहोत. उगाच पाश्चात्यांनी सांगितले म्हणून आपण तसेच वागायचे, हा गुलामीचा भ्रामक मूर्खपणा आता बंद करूया,
भारतीय आहोत, भारतीय म्हणून जगुया.
पाणी हे जसे जीवन देणारे आहे, तसे आलेला जलप्रलय जीवन उद्ध्वस्त करून जातो, हे पण लक्षात ठेवूया !
वैद्य सुविनय दामले,
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
16.01.2017
January 16, 2017
Copyright © 2025 | Marathisrushti