वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
छत्रपती संभाजी महाराजांनी अवघ्या नऊ वर्षांच्या कारकिर्दीमध्ये पोर्तृगीजांशी असा लढा दिला की पोर्तृगीजांची यापूर्वी कधीही फजिती झाली नव्हती अशी फजिती झाली. अवघ्या 32 वर्षांच्या वादळी आयुष्यात त्यांनी अनेक विजय संपादन केले. एकूण 120 मोहिमांचे त्यांनी नेतृत्व केले. तरीही छत्रपती संभाजी महाराजांनी एकदाही हार पत्करली नाही.
April 28, 2023
आटपाट नगर होतं. तिथं एक गरीब ब्राह्मण राहत होता. पुढं एके दिवशी काय झालं? भाद्रपद महिना आला. घरोघर लोकांनी गौरी आणल्या. रस्तोरस्ती बायका दृष्टीस पडू लागल्या. घंटा वाजू लागल्या. हे त्या ब्राह्मणाच्या मुलांनी पाहिलं. मुलं घरी आली. आईला सांगितलं, आई, आई, आपल्या घरी गौर आण! आई म्हणाली, बाळांनो, गौर आणून काय करू? तिची पूजा-अर्चा केली पाहिजे, घावनघाटल्याचा नैवेद्य दाखवला पाहिजे आणि आपल्या घरात तर काही नाही. तुम्ही तुमच्या वडिलांजवळ जा, बाजारातलं सामान आणायला सांगा. सामान आणलं म्हणजे गौर आणीन! मुलं तिथून उठली, वडिलांकडे आली. बाबा बाबा, बाजारात जा. घावनघाटल्याचं सामान आणा. म्हणजे आई गौर आणेल!
वडिलांनी घरात चौकशी केली. मुलांचा नाद ऐकला. मनात फार दु:खी झाला. सोन्यासारखी मुलं आहेत, पण त्यांचा हट्ट पुरविता येत नाही. गरिबांपुढे उपाय नाही. मागायला जावं तर मिळत नाही. त्यापेक्षा मरण बरं म्हणून उठला. देवाचा धावा केला. तळ्याच्या पाळी गेला. जीव द्यावा म्हणून निश्चय केला. अर्ध्या वाटेवर गेला, इतक्यात संध्याकाळ झाली. जवळच एक म्हातारी सवाशीण भेटली. तिनं त्याची चाहूल ऐकली. कोण म्हणून विचारलं. ब्राह्मणानं हकीकत सांगितली. म्हातारीनं त्याचं समाधान केलं. बोधाच्या चार गोष्टी सांगितल्या. ब्राह्मणानं म्हातारीला घरी आणलं.
बायकोनं दिवा लावला. चौकशी केली. पाहुण्या बाई कोण आणल्या म्हणून विचारलं. नवर्यानं आजी म्हणून सांगितलं. बायको घरात गेली आणि अंबिलाकरता कण्या पाहू लागली. तो मडकं आपलं कण्यांनी भरलेलं दृष्टीस पडलं. तिला मोठं नवल वाटलं. ही गोष्ट तिनं आपल्या नवर्याला सांगितली. त्याला मोठा आनंद झाला. पुढं पुष्कळ पेज केली, सगळ्यांनी पोटभर खाल्ली. सगळी जणं आनंदानं निजली.
सकाळ झाली तशी म्हातारीनं ब्राह्मणाला हाक मारली. मुला, मुला मला न्हाऊ घालायला सांग, म्हणून म्हणाली, घावनघाटलं देवाला कर. नाही काही म्हणू नको, रंड काही गाऊ नको. ब्राह्मण तसाच उठला, घरात गेला बायकोला हाक मारली, अगं, अगं, ऐकलंस का, आजीबाईला न्हाऊ घाल, असं सांगितलं. आपण उठून भिक्षेला गेला. भिक्षा पुष्कळ मिळाली. सपाटून गूळ मिळाला. मग सगळं सामान आणलं. ब्राह्मणाला आनंद झाला. बायकोनं सर्व स्वयंपाक केला. मुलंबाळंसुद्धा पोटभर जेवली.
म्हातारीनं ब्राह्मणाला हाक मारली. उद्या जेवायला खीर कर म्हणून सांगितलं. ब्राह्मण म्हणाला, आजी आजी दूध कोठून आणू? तशी म्हातारी म्हणाली, तू काही काळजी करू नको. आता उठ आणि तुला जितक्या गाईम्हशी पाहिजे असतील तितके खुंट पूर, तितक्यांना दावी बांध. संध्याकाळी गोरज मुहूर्तावर गाईम्हशींची नावे घेऊन हाका मार म्हणजे त्या येतील. तुझा गोठा भरेल. त्याचं दूध काढ! ब्राह्मणानं तसं केलं, गाईम्हशींना हाका मारल्या (त्या) वासरांना घेऊन धावत आल्या. ब्राह्मणाचा गोठा गाईम्हशींनी भरून गेला. ब्राह्मणाने त्यांचं दूध काढलं. दुसर्या दिवशी खीर केली.
संध्याकाळ झाली तशी म्हातारी म्हणाली, मुला, मुला मला आता पोचती कर! ब्राह्मण म्हणू लागला, आजी आजी, तुमच्या कृपेनं मला आता सगळं प्राप्त झालं. आता तुम्हाला पोचती कसे करू? तुम्ही गेलात म्हणजे हे सर्व नाहीसे होईल? म्हातारी म्हणाली, तू काही घाबरू नको. माझ्या आशीर्वादाने तुला काही कमी पडणार नाही. ज्येष्ठागौर म्हणतात ती मीच! मला आज पोचती कर! ब्राह्मण म्हणाला, हे दिलेले असंच वाढावं असा काही उपाय सांग!
गौरीनं सांगितलं, तुला येताना वाळू देईन, ती सार्या घरभर टाक, हांड्यावर टाक, मडक्यांवर टाक, पेटीत टाक, गोठ्यात टाक. असं केलंस म्हणजे कधी कमी होणार नाही. ब्राह्मणानं बरं म्हटलं. तिची पूजा केली. गौर आपली प्रसन्न झाली. तिनं आपलं व्रत सांगितलं. भाद्रपदाच्या महिन्यात तळ्याच्या पाळी जावं. दोन खडे घरी आणावे. ऊन पाण्यानं धुवावे. ज्येष्ठागौर व कनिष्ठागौर म्हणून त्यांची स्थापना करावी. त्यांची पूजा करावी. दुसरे दिवशी घावनगोड तिसरे दिवशी खीरपोळीचा नैवेद्य दाखवावा. सवाष्णीला जेवू घालावं. तिची ओटी भरावी. संध्याकाळी हळदीकुंकू वाहून बोळवण करावी म्हणजे त्याला अक्षयसुख मिळेल. संतती, संपत्ती मिळेल. ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी देवाच्या दारी, गाईच्या गोठी, पिंपळाच्या पारी सुफळ संपूर्ण.....
स्त्रीचं मन नेहमी स्वत:च्या कुटुंबाशी जोडलेलं असतं. घराची भरभराट व्हावी घरात नेहमी सुखसमृद्धी नांदावी, आपल्या माणसांचा उत्कर्ष व्हावा व त्यांना चांगले आरोग्य प्राप्त व्हावे ही इच्छा तिच्या मनात सदैव असते त्यामुळेच हे सणवार, व्रतवैकल्ये ती मोठ्या उत्साहाने, श्रद्धेने व मनोभावे करते.
September 8, 2016
देशाची सुरक्षा दोन प्रकारची असु शकते.बाह्य सुरक्षा म्हणजे सिमेवरची सुरक्षा आणी अंतर्गत सुरक्षा म्हणजे देशाच्या आतील सुरक्षा.बाह्य सुरक्षेमध्ये चीन, पाकिस्तान पासून असलेला धोका महत्वाचा आहे. या विषयावर संरक्षणतज्ज्ञ ब्रिगेडियर हेमंत महाजन यांचे सविस्तर भाष्य दृक-श्राव्य (ऑडिओ – व्हिज्युअल्स) माध्यमातून सादर केले आहे.
September 19, 2013
आईसक्रीम हे दुधापासून बनत नसते; ते बनते तेल आणि डालडा यांच्या मिश्रणापासून!
October 28, 2016
बर्याच जणांनास्पाॅन्डेलायटीस,व्हर्टिगो म्हणजे मानेतील दोष, पाठदुखी स्लीप डिस्क म्हणजे कंबर दूखी असे त्रास असतात. ह्यासाठी एक सोपा घरगुती उपाय सांगतो.
ह्यासाठी लागणारी सामुग्री - दोन सारख्या आकाराच्या काचेच्या रिकाम्या बाटल्या, चटई
१. प्रथम चटई वर उशी न घेता पाठ टेकून झोपावे.
२. ह्या स्थितीत मानेखाली व कंबरेखाली गॅप पडते.
३. एक बाटली मानेखालील गॅप मध्ये आडवी ठेवावी.
४. नंतर दोन्ही पाय जवळ घेऊन कंबर उचलावी. माकड हाडाजवळ दुसरी बाटली आडवी सरकवावी.
५. आता एक एक पाय सरळ करावा. दोन्ही पाय एकदम सरळ करू नयेत. हे महत्वाचे आहे.
६. पाय सरळ केले की डोके जमिनीला टेकवावे. ह्यामुळे पाठीच्या कण्याला ताण येतो. अशा स्थितीत अर्धा मिनिट राहावे..
७. उठताना एकेक पाय जवळ घेऊन कंबर उचलून कंबरे खालील बाटली प्रथम काढावी व नंतर मानेखालची बाटली काढावी. व कुशीवर वळून उठून बसावे.
हा प्रयोग करताना कधीही घाई करू नये शांतपणेच करावा. असे रोज एकदा करावे.
अरविंद जोशी B.Sc.
व्हीडीओ साठी क्लिक करा
https://youtu.be/Xju7asFx6IU
July 12, 2017
लोकसत्ताच्या ८ मार्च २०१६ च्या अग्रलेखात झुंझार पत्रकार श्री गिरीश कुबेर यांनी माझं नाव न घेता मला - "कोणी तरी रिकामटेकडा संगीतकार कलात्मक झटापट आणि माल-विक्रीकौशल्याची खटपट करीत अभिमानगीत गात लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करतो." - म्हणून संबोधलंय! कुबेरांना ‘रिकामटेकड्या संगीतकारांवर’ अग्रलेख लिहायची वेळ आली हे पाहून मला त्यांची कीव आली. असंही वाटलं की रिकामटेकडेपणाचे फायदे कुबेरांना लहानपणीच कुणी समजावून दिले असते तर आज बिचाऱ्यांमध्ये इतकी कटुता नसती!
कुबेरांना एकच सांगतो.
की सव्वा वर्ष रिकामटेकडा राहून फक्त अभिमानगीत करत राहिलो
- म्हणून रत्नागिरीत ८००० मुलं ते एका सुरात गायली.
-म्हणून अमेरिकेत जन्माला आलेल्या मराठी घरातल्या मुलांना, ‘आपण हे गीत बसवून आपल्या आईवडिलांना एक सुखद धक्का देऊया’ असं वाटलं.
- रिकामटेकडा राहून हे गीत केलं म्हणून मुंबईच्या खासगी रेडियो वाहिन्यांवर मराठी गाणी लागू लागली आणि व्होडाफोनचे लोक मराठीतून सेवा देऊ लागले
- म्हणूनच चीनमध्ये राहाणाऱ्या Chu San Quek या चायनीज माणसाला वाटलं की भारतात येऊन महाराष्ट्र काय ते पहायला हवं.
- म्हणूनच बिवरली हिल्सच्या सुप्रसिद्ध फॅशन डिझायनर शेखर रहाटे यांनी ऑस्कर ॲवॉर्डपूर्व संध्येला हॉलिवुडच्या मॉडेल्सना घेऊन मराठी अभिमानगीतावर फॅशन शो केला.
- म्हणून अमिताभ बच्चन यांना वाटलं की या गाण्यात मीही गायला हवं होतं.
- म्हणून हे गाणं ऐकून श्रीनिवास खळ्यांच्या डोळ्यात पाणी आलं.
- आणि म्हणूनच या रिकामटेकड्या संगीतकाराच्या कलात्मक खटपटीची तुमच्या जगविख्यात वर्तमानपत्राला पहिल्या पानावर दखल घ्यावी लागली
कुबेर, अशा अनेक कथा आहेत. कधी रिकामा वेळ मिळाला तर या. ऐकवेन. आणखी एक गोष्ट. माझ्या रिकामटेकडेपणात अनेकांना आनंद देण्याची क्षमता आहे जी तुमच्या ‘कार्यग्रस्ततेत’ जराही नाही.
तुम्हाला तुमच्या कार्यबाहुल्यामुळे कदाचित एक गोष्ट लक्षात आली नसेल ती सांगतो आणि थांबतो.
उद्या तुमचा हा ‘व्यग्रलेख’ रद्दीत जाणार आहे आणि या रिकामटेकड्याने केलेलं गाणं लहान लहान मुलं पुढची शंभर वर्ष गात रहाणार आहेत.
आपला विनीत
कौशल इनामदार
March 9, 2016
चौदा विद्या आणि चौसष्ट कलांचा अधिपती असलेल्या गणेश देवतेचे आपल्या लेखणीद्वारे अनेकांनी गुणगान केले आहे. कवी, गीतकार, शाहीर यांच्यासह महाराष्ट्रातील संतांनीही आपल्या अभंगातून आणि काव्यातून गणपतीचे वर्णन केले आहे.
July 22, 2025
प्रात: स्मरामि ललितावदनारविन्दंबिम्बाधरं पृथुलमौक्तिकशोभिनासम् ।
आकर्णदीर्घनयनं मणिकुण्डलाढ़्यं
मन्दस्मितं मृगमदोज्ज्वलभालदेशम् ।।१।।
आई जगदंबेचे एक नितांत सुंदर नाव आहे ललिता. कोमल, मनोज्ञ, चित्ताकर्षक असा या शब्दाचा अर्थ. आई जगदंबेचे स्वरूप तसेच आहे.
शाक्त उपासनेतील दशमहाविद्या मध्ये देवी त्रिपुरसुंदरी स्वरुपात ललितांबेचे अर्चन केले जाते.
त्या ललितांबेचे स्तवन करताना पूज्यपाद आचार्य श्री म्हणतात,
प्रात: स्मरामि ललितावदनारविन्दम् - मी सकाळी आई ललितांबेच्या वदन अरविंद अर्थात मुखकमलाचे स्मरण करतो.
यातील स्मरण शब्द अधिक सुंदर आहे. आई जगदंबेचे दर्शन घ्यायचे तर किमान देवघरापर्यंत जावे लागेल. पण स्मरणासाठी त्याची आवश्यकता नाही. अगदी आंथरुणात पडल्यापडल्या पडता, डोळे न उघडतात देखील स्मरण शक्य आहे. अर्थात प्रत्यक्ष कोणतीही शारीरिक क्रिया करण्याच्याही पूर्वी आईचे स्मरण हा प्राधान्याचा विषय आहे. हा भाव.
कसे आहे आईचे मुखकमल?
बिम्बाधरं- बिंब अर्थात उगवता सूर्य किंवा पिकलेली गुंज. ज्याप्रमाणे लालबुंद असे अधर म्हणजे ओठ असणारी. जगातील सर्वाधिक आकर्षक रंग आहे लाल. त्यामुळे स्वाभाविक पहिली नजर गेली ती लाल रंगाचा ओठांकडे.
पृथुल म्हणजे टपोरा, मोठा.मौक्तिक म्हणजे मोती. शोभिनासम् म्हणजे नासिका असणारी. अर्थात आई जगदंबेच्या नाकात मोठ्या मोत्याची नथ घातली आहे.
सामान्यतः सकाळी या अवयवाचे स्मरण करू नये , नाव काढू नये असे संकेत आहेत. ते अपशकुनी मानले आहे .पण आई जगदंबेच्या बाबतीत सर्वच गोष्टी शुभच असतात.
आकर्णदीर्घनयनं- कानापर्यंत जिचे नयन अर्थात पापण्या किंवा भुवया लांबलेल्या आहेत अशी. मणिकुण्डलाढ़्यं- त्या कानांमध्ये दिव्य रत्न युक्त कुंडलांनी शोभून दिसणारी.
मन्दस्मितं- आईच्या मुखावर मंदस्मित झळकत आहे. मृगमद- मृगाच्या नाभीतून मिळणारी कस्तुरी. उज्ज्वलभालदेशम्- त्या कस्तुरीच्या तिलकाने जिचा भालप्रदेश अर्थात कपाळ उजळले आहे अशी.
अशा अवयवांनी युक्त असलेल्या आईच्या मुखकमळाचे मी स्मरण करतो.
-- विद्यावाचस्पती प्रा. स्वानंद गजानन पुंड
March 28, 2020
आपण रोजच्या व्यवहारात हे मराठी शब्द नक्कीच वापरु शकतो. प्रयत्न करायला काय हरकत आहे ?
November 6, 2016
भगवंतांच्या विविध नावांच्या सोबत स्वाभाविकच भक्ताच्या मनात जागृत होत असतात भगवंताच्या विविध लीला. त्या त्या अवतार लीलांच्यासोबत काही नावांचे संदर्भ जुळलेले आहेत. येथे अशाच काही अवतारांचे वर्णन आहे.
October 15, 2020
Copyright © 2025 | Marathisrushti