(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • श्री मीनाक्षीस्तोत्रम् – १

    श्रीविद्यॆ शिववामभागनिलयॆ श्रीराजराजार्चितॆ
    श्रीनाथादिगुरुस्वरूपविभवॆ चिन्तामणीपीठिकॆ ।
    श्रीवाणीगिरिजानुताङ्घ्रिकमलॆ श्रीशांभवि श्रीशिवॆ
    मध्याह्नॆ मलयध्वजाधिपसुतॆ मां पाहि मीनाम्बिकॆ ॥ १ ॥

    भगवान जगद्गुरु आदि शंकराचार्य स्वामी महाराजांनी मीनाक्षी पंचरत्नम् सोबतच मीनाक्षी स्तोत्रम् या नावाची ही एक नितांत सुंदर रचना साकारली आहे.
    यात आई मीनाक्षीचे वैभव वर्णन करतांना आचार्यश्री म्हणतात,

    श्रीविद्यॆ- शाक्त संप्रदायाचे तत्त्वज्ञान सांगणाऱ्या श्रीविद्या स्वरुपिणी. शिववामभागनिलयॆ- भगवान शंकरांच्या डाव्या भागात अर्थात येथे असणाऱ्या हृदयात निवास करणारी. श्रीराजराजार्चितॆ- सामान्य जीवावर सत्ता गाजवतो त्याला राजा म्हणतात. अनेक राजांवर सत्ता गाजवतो तो राजराज. अशा अनेक सम्राटांनी अर्चना केलेली.

    श्रीनाथादिगुरुस्वरूपविभवॆ- भारतीय संस्कृतीत वैभवशाली उपासना मार्ग विद्यमान आहे त्यापैकी एक श्रेष्ठ मार्ग आहे नाथपंथ. हे सर्व नाथ आई जगदंबे ला आपली गुरु मानतात. तिचे हे गुरुस्वरूपच तिचे दिव्य वैभव आहे. चिन्तामणीपीठिकॆ - चिंतामणी रत्नाच्या आसनावर विराजमान असणारी.

    श्रीवाणीगिरिजानुताङ्घ्रिकमलॆ - श्री म्हणजे देवी लक्ष्मी, वाणी म्हणजे देवी सरस्वती आणि गिरीजा म्हणजे देवी पार्वती, या त्रिगुणात्मिका तीन देवता जिच्या चरण कमलाला वंदन करतात अशी.

    श्रीशांभवी- भगवान शंकरांची सहधर्मचारिणी.

    श्रीशिवॆ- अत्यंत पवित्र, शुद्ध.

    मलयध्वजाधिपसुतॆ- दक्षिणे मध्ये असणाऱ्या पांड्य राजवंशातील मलयध्वज राजा ने आपली पत्‍नी कांचनमाला हिच्यासोबत भगवान शंकराची तपश्चर्या केल्यावर त्यांच्या आशीर्वादाने कन्या रुपात प्रकट झालेल्या,

    मध्याह्नॆ मां पाहि मीनाम्बिकॆ- हे मीनाम्बिके या मध्याह्न काळात माझे रक्षण कर.मध्याह्न समयी अर्थात दुपारी सूर्य मस्तकावर असणे हा सर्वाधिक तापदायक काळ. अशा या तापातून माझे रक्षण कर.

    -- प्रा. स्वानंद गजानन पुंड

      May 25, 2020


  • नवरत्नमालिका – २

    गन्धसारघनसारचारुनवनागवल्लिरसवासिनीं
    सान्ध्यरागमधुराधराभरणसुन्दराननशुचिस्मिताम् ।
    मन्थरायतविलोचनाममलबालचन्द्रकृतशेखरीं
    इन्दिरारमणसोदरीं मनसि भावयामि परदेवताम् ॥ २॥

    आई जगदंबेच्या दिव्य शृंगाराचे वर्णन करताना भगवान जगद्गुरु शंकराचार्य स्वामी महाराज म्हणतात,

    गन्धसार- अर्थात मलय पर्वतावर निर्माण होणारे उत्तम चंदन.
    घनसार- म्हणजे कापूर,
    चारुनवनागवल्लि- सुंदर कोवळ्या विड्याच्या पानांचा,
    रसवासिनीं - रस धारण करणाऱ्या,

    आचार्य श्री येथे बाह्य आणि अंतर्गत अशा दोन्ही शृंगारांचा विचार करीत आहेत.
    चंदनाचा लेप हा बाह्य शृंगार आहे. तर विडा खाणे हा अंतर्गत शृंगार. पूर्ण भोजन झाल्यानंतर तांबूल ग्रहण हे अंतर्गत तृप्तीचे प्रतीक.
    यातील कापूर दोन्हीकडे वापरला जातो. चंदना सोबत लेपा मध्ये आणि विड्या सोबत खाण्यासाठी.
    अशा अंतर्बाह्य रसांना धारण करणाऱ्या, परमरसपूर्ण असणाऱ्या,

    सान्ध्यराग- संध्याकाळी सूर्यास्त समयी पसरलेल्या रंगाप्रमाणे असणाऱ्या,
    मधुराधराभरण- अत्यंत मधुर अर्थात आकर्षक असणाऱ्या म्हणजे ओठांचे आभूषण असणाऱ्या धारण करणाऱ्या,
    सुन्दरानन- सुंदरतम मुखकमल असणाऱ्या,
    शुचिस्मिताम् - अतीव पवित्र हास्य असणाऱ्या,
    मन्थर- आत्मतृप्त अवस्थेत किंचित मिटलेल्या स्वरूपातील मंद,
    आयत- लांब,
    विलोचनाम्- नेत्र असणाऱ्या
    अमल- अत्यंत स्वच्छ, बालचंद्र- चंद्राची कोर,
    कृतशेखरीं- मस्तकावर धारण करणाऱ्या,
    इन्दिरा- देवी लक्ष्मी
    रमण- तिचे रमन म्हणजे भगवान श्री विष्णू.
    सोदरीं - त्यांची भगिनी असणाऱ्या,

    मनसि भावयामि परदेवताम् - परमदेवता आई जगदंबेचे मी मनाने ध्यान करतो.

    -- प्रा. स्वानंद गजानन पुंड

      May 16, 2020


  • हल्ल्यामध्ये सुध्दा विकीलीक्स आपल्याला इंटरनेटवर सुरु ठेवण्याच्या प्रयत्नात

    सर्वत्र इंटरनेटवर जरी विकीलीक्सची अमेरिकन सरकार आणि हॅकर्स द्वारे कोंडी केली जात असली, तरी सुध्दा ऑनलाईन राहण्याचा प्रयत्न विकीलीक्स करीत आहे.

      December 4, 2010


  • साउथ आफ्रिका – डर्बन!!

    माझा गेल्या पंधरा वर्षातील काळ ध्यानात घेतला तर, त्यातील बरीचशी वर्षे हीं पिटरमेरित्झबर्ग आणि डर्बन याच परिसरात गेली. त्यामुळे, आपसूकच डर्बन शहराबद्दल माझ्या मनात ममत्वाच्याच भावना आहेत. एकतर, या शहरात भारतीय वंशाची लोकसंख्या बरीच आहे. त्यामुळे, कितीही नाही म्हटले तरी, अशा लोकांशी तुमच्या ओळखी लगेच होतात आणि तश्या माझ्या झाल्यादेखील.

      October 10, 2018


  • मनुष्य गजमुख गणेशमूर्ती – इंडोचायना

    श्री विनायक स्वरुपात ओळखली जाणारी मूर्ती व्कांगताम प्रांतात मि-सोअन येथील एका मंदिरात मिळाली. ती ७ व्या – ८व्या शतकातील असावी. तिची दिसण्यातील भव्यता, प्रौढता अगदी अद्वितीयच आहे. मूर्ती उभी असून चार हात आहेत.

      July 24, 2012


  • कटीपतंग, चॉईस इज युअर्स !

    पतंग उडविण्याचा इतिहास ३००० वर्षाहून जास्त आहे. चीनमध्ये बांबू आणि सिल्कच्या कपड्या पासून पतंग बनवीत असतं. चीनमध्ये पतंग उडवीण्याला धार्मिक व पौराणिक महत्व होते. पतंगाच्या मांजाला वैज्ञानिक उपकरणे बांधून हवामानाचे अनेक अंदाज घेतले जात असतं. अमेरिकन शास्त्रज्ञ बेंजामिन फ्रँन्क्लीन याने पतंगाच्या साह्याने वातावरणातील (पावसाळी ढगातील) विद्युत शक्तीचा शोध लावण्यासाठी उपयोग केला. लॉरेन्स हर्ग्वे यांनी पतंगाचा उपयोग वाहतुकीसाठी केला असे म्हंटले जाते. ७ नोव्हेंबर १९०३ साली स्यॅमुअल फ्रँन्क्लीन कोडी यांनी इग्लिश खाडी पार करतांना होडीला खेचण्यासाठी पतंगांचा उपयोग केला होता. पूर्वीच्या काळी पतंगांचा मांजाला काही उपकरणे बांधून खूप उंचावरून शत्रूवर नजर ठेवण्यासाठीही मिलिटरीत त्याचा उपयोग केला जात असे. दुसऱ्या महायुद्धात (१९३९-४५) मध्ये पतंगांचा गनरी टार्गेट म्हणून उपयोग केला गेला होता. प्रत्येक देशामध्ये त्याचे महत्व वेगवेगळे आहे.

      January 12, 2012


  • श्री विष्णु पादादिकेशांत स्तोत्र – २९

    या श्लोकात भगवान विष्णूंच्या छातीवर असणाऱ्या श्री व चिन्हाचे वर्णन आचार्य श्री करीत आहेत. यामागे एक पौराणिक कथा आहे.

      January 1, 2021


  • विचार वेध

    विचारांचा वेध घेण्याची सवय असायला हवी त्यातून नीरक्षीरविवेक वृत्ती विकसित व्हायला मदत होते. सर्वंकष सकारात्मक मानसिकता हवी असेल तर विचारांबरोबर समझोता करावा लागतो. हे जुळवून घेणे सुरुवातीला अवघड वाटत असले तरीही सवयीने जमते.

      March 15, 2022


  • घरानंतरचं बाहेरचं जेवण..

    फर्ग्युसन महाविद्यालयाचे माजी प्राचार्य, आदरणीय वसंत वाघ सरांचा मला महिन्यातून एकदा तरी फोन येतो, ‘गुडमाॅर्निंग सुरेशराव, मी डेक्कनला येतोय. पंधरा मिनिटांत ‘गुडलक’ला या.’ मी लगेचच निघतो. भिडे पुलावरुन पलीकडे गेलं की, दहाव्या मिनिटाला मी गुडलकला पोहोचतो. रिक्षा कडेला घेऊन सर उतरतात. आम्ही दोघे गुडलकमध्ये पलीकडील पॅसेजमधील एक टेबल पटकावतो. वेटरला दोन चहाची आॅर्डर दिल्यानंतर सर बोलू लागतात…

      December 25, 2022


  • ऋणानुबंधाच्या जिथून पडल्या गाठी

    मंडळी , माझं माहेर आमची मुंबई शहरातलं एक छानसं सुंदरसं टुमदार उपनगर : गोरेगांव ( पूर्व ).तिथल्या रेल्वे फाटकाजवळ गोगटे वाडीमधे आमची एक छान शाळा आहे , शिशूवर्ग ते इयत्ता चौथी — बैराम जीजीभाॅय शाळा आणि इयत्ता पाचवी ते दहावी सन्मित्र मंडळ विद्यामंदिर ! इसवी सन १९८० ला आम्ही जवळपास १२० विद्यार्थी वर्गमित्र—मैत्रिणी ( दोन तुकड्या मिळून ) १० वी परिक्षेला म्हणजे शालान्त परिक्षेला बसलो आणि आता यावर्षी म्हणजे २०२५ सालामधे तेंव्हा ( कमीत कमी ) १५ वर्षांचे असलेले सगळे साठी चे झालो किंवा यावर्षी होऊ ! त्यामुळे यावर्षी एक संमेलन करूया अशी एक टूम वर्गातील मित्र—मैत्रिणींच्या मनात आली , आणि महाराजा , त्याच संकल्पनेचा पाठपुरावा करत काल ती संकल्पना आम्ही २८ जणांनी प्रत्यक्षात उतरवली ना ! अंधेरीच्या चकाला येथील हाॅटेल साई पॅलेसमधे आम्ही सगळे एकत्र जमलो आणि रंगतदार संध्याकाळ सुरु झाली…..

      March 3, 2025