(User Level: User is not logged in.)

आरोग्य

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • सांगेन गोष्टी हिताच्याच चार – भाग नऊ

    जगण्याची साधी सोपी सूत्रे - एकशे एकावन्न
    आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे - भाग तेरा
    सांगेन गोष्टी हिताच्याच चार - भाग नऊ

    ग्रंथकार किती सावध करत आहेत पहा. ते म्हणतात, एकट्याने बाहेर फिरायला जाताना विशेष काळजी घ्यावी. ते म्हणतात, पहाटेचा किंवा रात्रीचा अंधार पडलेला असताना आकाशात ढग जमून आले असताना, भर दुपारी सूर्य तळपत असताना, आवश्यकता भासल्यास मधे कुठे पाणी सुद्धा मिळण्याची शक्यता नाही, अशा रस्त्यावरुन, फार जलद गतीने किंवा एकदम धीम्या चालीने, शत्रुवृत्ती असलेल्या किंवा अनोळखी व्यक्ती समवेत, किंवा अधार्मिक व्यक्तीबरोबर, एकट्याने जाऊ नये. रुग्णाच्या घरी देखील जाताना सोबतीला बरोबर कोणीतरी न्यावा.

    आजच्या काळात या सूचना किती आवश्यक वाटतात ना ! सकाळी घराबाहेर पडलेली व्यक्ती सायंकाळी सुस्थितीत घरी परतेल, याची खात्री नसलेल्या बेभरवंशी काळात याची काळजी जास्तीच घ्यावी लागेल. अबल असलेल्या व्यक्तींना जास्त सावध रहावे लागते. ('अबला' म्हटलेलं नाही. ज्यांचे 'बल' कमी आहे, असे पुरुष देखील ! )

    या व्यक्तींना नेहेमीच सोबत कुठुन मिळणार ? अशा वेळी मोबाईल कामास येतो. आपत्कालीन प्रसंगी, मोबाईल बंद असला तरी, बॅटरी संपली असली तरी, कुणाचा नंबर पाठ नसला तरी, एकट्याने, अनोळखी जागी, रात्रीच्या अथवा पहाटेच्या वेळी, सुनसान राहोंपर, एखाद्या रिक्शेतून प्रवास करताना, खोटंखोटं फोनवर बोलायची सवय करून ठेवायला काहीच हरकत नाही. आपण कोण आहोत, कुठे जात आहोत, याचा पत्ता एखाद्या प्रवासी वाहतुक करणाऱ्या चालकाला लागू देऊ नये, याउलट चातुर्याने असे बोलणे करावे की, चालकाला जरासुद्धा शंका येऊ देऊ नये, की आपण घाबरलेलो आहोत. दगाफटक्याची शंका येईल तेव्हा चुकुनसुद्धा चालकाकडे माझा मोबाईल बंद पडलाय, आपल्या मदतीला कुणीपण येणार नाही, हे समजू देऊ नका. एवढी समयसूचकता आपल्यात हवीच.

    तरुण पिढीला तंत्रज्ञान माहिती आहे, पण समयसूचकता नाही, आणि जुन्या पिढीला अनुभवाने समयसूचकता प्राप्त झाली आहे, पण नवीन तंत्रज्ञान अवगत नाही.
    आपल्यातील ड्राॅ बॅक आपणच शोधून काढले पाहिजेत, कारण ते आपल्यालाच माहिती असतात. स्मार्ट फोन वरील नवीन यंत्रणा जुन्या पिढीने शिकून घेतलीच पाहिजे. त्यातील गुगल मॅप, जीपीआरएस, इमर्जन्सी काॅल करणे, मेसेज टाकणे, या गोष्टी नवीन पिढीकडून शिकून घेतल्या पाहिजेत.

    आपत्कालामधे केवळ एखाद्या व्यक्तीमुळेच प्राणभय असेल असे नाही तर क्षुद्र किटक, वा हिंस्त्र पशु पक्षी, नैसर्गिक आपत्ती यापासून देखील आपल्याला आपले जीवरक्षण करायचे असते.

    यासाठी एखादे लहानसे शस्त्रदेखील आपल्याबरोबर असावे. अगदी लायटर, खिळा, टाचणीसुद्धा उपयोगी ठरू शकते. फक्त त्यावेळी ते नवीन पिढीला कसे वापरायचे ते सुचले पाहिजे. यासाठी जाणकार मंडळीबरोबर त्यांचा इतिहास जाणून घ्यावा. मनात त्याची रंगीत तालीमही करून ठेवावी.

    पानीपतच्या लढाईत विश्वासराव हरवल्यानंतर माणसामाणसावरचा विश्वास कमी होत चाललाय. यासाठी आपण सावध रहाणे हे जास्त हिताचे असेल.

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    02362-223423.
    ०९.०९.२०१७

      September 9, 2017


  • आहारातील बदल भाग ६० – चवदार आहार -भाग २२

    कडू चव म्हणजे फक्त मधुमेहवाल्यांसाठीच आहे, आमचा काही संबंध नाही, असं नाही. मधुमेह होऊ नये यासाठी देखील रोज खाण्यात कडू असावे.

    जसे तिखटाचा अॅण्टीडोट आंबट आहे, तसे गोडाचा कडू असे समजावे. ज्यांना गोड खूप आवडते त्यांनी अगदी तेवढ्या प्रमाणात नाही, पण कडू जरूर खावे. गोड खाऊन मधुमेह झालाय ना, आता तेवढेच कडू खातो, म्हणजे गोड " नील " होईल, असं नाही हां !

    कडूपणा कमी होण्यासाठी लवण रस उपयोगी होतो. कारल्याची भाजी जास्त कडू व्हायला नको असेल तर फोडींवर मीठ पेरून ठेवतात, मीठामुळे त्याला काही वेळाने पाणी सुटते. फोडी पिळून हे पाणी काढून टाकले तरी थोडा कडूपणा कमी होतो.

    कडू खाताना पण जरा काळजी घ्यावी लागते.
    अति प्रमाणात जर कडू चवीचे पदार्थ पोटात गेले तर पित्त हमखास वाढते. जेवणाच्या पानात कडू चवीची जागा डाव्या बाजूला असते, एवढे लक्षात ठेवावे.

    कारल्याची भाजी किंवा भजी, काही महाभाग तर रोज सकाळी कारल्याचा ज्युसदेखील पितात. मेथीची भाजी अथवा पराठे, मेथीचे दाणे पाण्यात भिजवून ते पाणी पिणे, किंवा मेथी पावडर घेणे, भाकरीच्या किलोभर पीठात, दोन तीन चमचे मेथीची पावडर घालणे, शेवग्याच्या शेंगा आणि केळफूलाची भाजी देखील कडवटच असते. असा कडू आहार आठवड्यातून एखाद दुसऱ्या वेळा ठीक आहे, याने लिव्हर म्हणजे यकृताचे काम सुधारते. पित्ताला उद्दीपना मिळते, पाचक रस नीट पाझरायला मदत होते, जीभेला चव येते. आतड्यातील आमाचे गोळे हलायला, पुढे ढकलायला मदत मिळते.

    पण रोज रोज एवढे कडू खाल्ले तर स्नायुंची ताकद कमी होते. शुक्रजंतु कमी होतात, हे पण लक्षात ठेवावे. अति सर्वत्र वर्ज्ययेत् असे म्हणतात ते चुकीचे नाही.

    किराईत या कडू औषधाप्रमाणेच आणखी एक सुप्रसिद्ध कडू औषध म्हणजे कुमारी, कोरफड, अॅलोवेरा. याचा रस आटवला की त्यालाच काळा बोळ किंवा सबर म्हणतात. बाळऔषधात हा असतो.

    बाळगुटी हल्ली गायबच झालेली दिसते. त्यातील बहुतेक औषधे ही कडूच असतात. अगदी दररोज नको पण आठवड्यातून दोन वेळा, रविवारी आणि बुधवारी बाळाला दोन दोन वळसे अवश्य उगाळून द्यावी. उगाळून झाल्यावर ही गुटीतील कडू औषधे नीट पुसुन, कोरडी करून, ठेवावीत, म्हणजे बुरशी येत नाही.

    जे डाॅक्टर बाळाला बाळगुटी अजिबात देऊ नका, असे सांगतात, त्यांच्या "सिलॅबस" मधे बाळगुटी नसल्याने, त्या औषधांचा त्यांना अभ्यास नसतो, म्हणून त्यांना तसे सांगावे लागते. यात त्यांचा काहीच दोष नाही. हे सर्व डाॅक्टर्स लहानाचे मोठे होत असताना, कडू चवीची बाळगुटी खाऊनच मोठे झालेले आहेत, हे पण लक्षात ठेवावे.

    वैद्य सुविनय दामले
    कुडाळ, सिंधुदुर्ग
    9673938021
    22.11.2016

      November 22, 2016


  • याला जीवन ऐसे नाव भाग १७

    वाग्भट सूत्र स्थान 5 मधे ग्रंथकार असे म्हणतात, आकाशातून थेट खाली येणारे पाणी हे सर्वोत्तम. याला गांगेय जल, ऐंद्र जल, अंतरीक्ष जल किंवा दिव्य जल असे म्हणतात.

    जमिनीतून पण पाणी वर येते, जसे विहिरीतून येणारे. याला भूमीतून येते म्हणून भूमीज किंवा भौमजल म्हणतात.

    या दोन्ही प्रकारच्या पाण्याला कोणतीही विशिष्ट चव नसते, रंग नसतो, वास नसतो, पण तरीही ते जीवनदान देणारे आहे, म्हणून त्याला जीवन म्हटले आहे.

    बाह्यरूपावर एखाद्याचे गुणमुल्य ठरत नसते, त्याच्या उपयोगितेवर त्याची किंमत ठरत असते. हे आत्महत्या करू इच्छिणाऱ्या मंडळींनी जरा लक्षात घ्यावे. जर असे विचार येत असतील तर झरा, नदी, धबधबा, समुद्र, तलाव, कारंजा यांच्याजवळ जावे. काठावर शांत बसावे, पाण्याचे उडणारे तुषार अंगावर झेलावेत, मनसोक्त पाण्याशी खेळावे, आणि मनातली सारी जळमटं धुवुन टाकावीत.

    "मी हा असा, मला काही जमत नाही, माझ्यात काहीही गुण नाहीत, माझी इथे आवश्यकता नाही, माझी कोणाला गरज नाही, माझ्यामुळे कोणाचेही काहीही अडत नाही, मग मी जगायचे तरी कशाला", असे नकारार्थी विचार ज्यांच्या मनात येतात, त्यांनी या खळाळत वाहाणाऱ्या पाण्याकडे पहावे. पाणी असा विचार करतं का ? मी कशाला वाहायचे ? माझं पुढे काय होणार आहे. गटारातून समुद्रातच जाणार. तिथेही माझी वाफच होणार. ना मला रूप ना गंध, ना आकार. मग माझ्या जिंदगानीचा काय उपयोग होणार ?
    पण हेच पाणी कोणत्याही अपेक्षाशिवाय वाहात असते. "ज्याला हवे असेल तो माझ्या काठावर येतो आणि अमृतकण घेऊन जातो, हेच माझं मोठेपण" असा सकारात्मक अहंकार बाळगून हे जल इतरांना तृप्त करण्यासाठी समुद्रात विलीन होऊन जाते.

    मनाला प्रसन्न आणि शुद्ध करण्यासाठी देखील हे जीवन काम करते. जेव्हा प्रकुपित पित्तामुळे राग अनावर होतो, अंगाची आग होते, मनाचा तोल जातो, तेव्हा पाण्याचा एक घोट लगेचच शांतपणा आणतो. प्रवासाचा शीण आलेल्या पाहुण्यांचे पहिले स्वागत पाणी देऊनच केले जात असते. प्रवासाचा थकवा एक घोट पाण्याने लगेच निघून जातो ना !

    घरात वारंवार होणाऱ्या भांडणात हे पाणी आग कमी करणारे ठरू शकते. बाहेरून दमूनभागूनचिडून आलेल्या पतीला अथवा पत्नीला, घरात आधी हजर असणाऱ्यांने, दारात पाऊल पडताक्षणी जर पाण्याचा एक ग्लास नेऊन हातात दिला तर ??? सारा थकवा, सारी दुःख, सारा राग, नाहीसा झाल्यासारखा वाटेल.

    प्रत्येकाला, वेळेत घरी यावंस वाटेल, मला पाणी विचारणारं कोणीतरी माझी वाट बघतंय, ही भावनाच कौटुंबिक संबंध घट्ट करत असते.

    म्हणूनच याला जीवन ऐसे नाव !

    वैद्य सुविनय दामले
    कुडाळ, सिंधुदुर्ग
    9673938021
    24.12.2016

      December 24, 2016


  • आजचा आरोग्य विचार – भाग चौवीस

    दात तोंड स्वच्छ केल्यावर चेहरा पुसण्यासाठी आपला स्वतंत्र नॅपकीन न घेता, बेसिनवरचा सार्वजनिक टाॅवेल वापरू लागलो. त्यामुळेच साथीचे रोग पसरायला शहरी भागात मदत होते. पण गावामधे मात्र स्वतःचा टाॅवेल स्वतःच्या खांद्यावर, डोक्यावर, कंबरेला गुंडाळून काम सुरु असते.

      February 24, 2018


  • जगण्याची साधी सोप्पी तत्वे-भाग चौवेचाळीस

    आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-क्रमांक दहा

    विज्ञान शाप की वरदान-भाग दोन

    विज्ञानाला स्वयंपाकघरात आणून ठेवल्याने त्याने भस्मासूराचे रूप घेतले आहे आणि आता तो निर्माणकर्त्यावरच उलटला आहे. त्याला कार्यालयात, दिवाणखान्यात, शिक्षणक्षेत्रात, अंतराळ क्षेत्रात जागा जरूर द्यावी, पण हा राक्षस जेव्हा आमच्या घरात घुसला तेव्हा, त्याला तिथेच बाहेर रोखायला हवा होता. आता तो एवढा माजला आहे की, त्याला आवरणे भल्याभल्यांना कठीण होत आहे. स्वयंपाकघरात तर त्याच्याशिवाय पानही हलत नाही. आता सगळं कसं "इझी" झालंय, या "इझीपणाची" ही सवय आळसाची सख्खी मैत्रीण आणि व्यायामाची शत्रू झाली आहे. आणि जे व्हायचं तेच होतंय. अनारोग्य !

    विज्ञानाची भलावण करणाऱ्यांना जरूर भलावण करूदेत, पण जेव्हा पाश्चात्य तज्ञ त्यांच्या संशोधनातून सांगतील, तेव्हाच यांना पटेल, तोपर्यंत वेळ निघून गेलेली असेल.
    सावध तो सुखी.
    वेळीच सावध होऊन जेवढे शक्य आहे, तेवढे व्यायामाचे रूपांतर कामात केले तर रोगापासून आणि औषधांपासून आपण लांब जाऊ शकतो.

    पहाटे उठून सडासारवण केले जायचे. घरातील सर्व दहा पंधरा खोल्यामधील केरवारे वाकून केले जायचे. तुळशीला प्रदक्षिणा व्हायची.जमिनीवर खाली बसून समोर एक पाय पसरून मधे जात घेऊन, जात्याच्या आवाजात घुमणारे, ओव्यांचे सूर कमी होत गेले. एका हाताने धान्य जात्यात भरत दुसऱ्या हाताने जात्याचा खुंटा ओढताना एक तान एक लय सापडायची..... आता दोन्ही हातानी गिरणीवर दळण टाकून परत आणणे यातच म्हणे हात गळ्यात येतात. आणि वर म्हणायचं काम सोप झालं.
    गेले ते दिवस उरल्या त्या आठवणी. आता त्या आठवणी आठवणं देखील गुन्हा आहे.

    विज्ञानाने ही सर्व यांत्रिक साधने दिल्यामुळे, आता काम सोपं झाल्याने, सर्व गृहिणी निश्चितच विज्ञानाचे आभार मानणार. आणि डाॅक्टरसुद्धा ! ( त्यांचे रूग्ण वाढले म्हणून! )

    विज्ञान वापरावं. जरूर वापरावं, पण जर तेच आरोग्याच्या मुळावर येत असेल तर ! आमच्या बदलत्या पाश्चिमात्य वृत्तीमुळे शरीराच्या कमी होत असलेल्या हालचाली, बैठी जीवनशैली, हे प्रमेह, ह्रदयरोग, पीसीओडी, थायराॅईड सारख्या रोगाचे कारण आहे. हे विसरून जायचे का ?

    पूर्वी दुचाकी गाडी सुरू करण्यासाठी एक तंगडी तरी झाडायला लागायची. आता एका बोटाने दुचाकी सुरू होतेय. तेवढे सुद्धा श्रम नाहीत. काम सोपे झाले.

    पुरणपोळीसाठी लागणारे पुरण, पाटा आणि वरवंट्यावर वाटावे लागे, त्यासाठी उकीडवे बसावे लागे. पोट मांड्या यांना छान व्यायाम होत होता. मध्यंतरीच्या काळात पुरण यंत्र आले. पाटा वरवंटा मागे पडला, उकीडवी बैठक लुप्त झाली आणि फतकल मारून सुद्धा पुरण वाटले जाऊ लागले. आता आणखीनच सोपे झाले, पुरणपोळ्या "रेडीमेड" मिळतात. काम सोपे झाले.

    सायकल चालवून आरोग्य मिळत होते, आता गाडीवरून जिममधे जाऊन तिथे सायकलच चालवावी लागते.

    घरात सहजपणे मिळणारे आरोग्य शोधण्यासाठी घराबाहेर जावे लागत आहे.

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    24.05.2017

      May 24, 2017


  • निरोगी राहाण्यासाठी काय करावे-भाग वीस

    संसार टिकायला हवा असेल, तर उठसूठ माहेरचं कौतुक सासरी सांगू नये. माझ्या माहेरी अस्सं होतं, तस्सं होतं. इथपर्यंत ठीक आहे. पण हे सर्व तुमच्याकडे नाहीच आहे, असं सासरला डिवचून सांगण्याची काही आवश्यकता नाही. इथे वाद वाढत जातात. ताण वाढतात. त्याचा परिणाम रोगावस्था.

      August 15, 2017


  • निरोगी राहाण्यासाठी काय करावे ? – भाग ४

    इथे वापरलेला सम शब्द हा सर्वधर्मसमभाव यामधल्या सम पेक्षा थोडा वेगळा आहे. समभाव हवाच, पण नको त्या ठिकाणी नको. इतर जण जर सम भावाने पाहात असतील, कृती करत असतील तर समभाव आपणही जरूर दाखवावा. नको त्या ठिकाणी समभाव दाखवत गेलो तर अबू चे रूपांतर बाबूत होते आणि नंतर हे डोक्यावर चढून बसतात.

      July 30, 2017


  • तुवरक / कडू कवठ

    तुवरकाचे उपयुक्तांग आहे बीज व बीज तेल.हे चवीला तुरट,कडू,तिखट असून उष्ण गुणाचे व हल्के स्निग्ध व तीक्ष्ण असते.तुवरक कफनाशक व वातनाशक आहे.

      February 6, 2018


  • किचन क्लिनीक – ताकाचे काही घरगुती उपचार

    १)वारंवार संडासला होत असल्यास तसेच जर संडास करताना जळजळ होत असेल तर लोणी न काढलेले ताक आहारात ठेवावे पण जर संडासला चिकट,बुळबुळीत,जड होत असेल तर लोणी काढलेले ताक आहारात ठेवावे.तसेच वैद्यांचासल्लाघेऊनत्यातसैंधव,बडीशेप,जिरे,
    ओवा,मिरी,असे काही द्रव्य त्यात घालावे.

    २)मुळव्याध झाली असता आहारामध्ये ताक वापरावे पण जर रक्त पडत असेल तर वैद्यांचा विशेष सल्ला घ्यावा.

    ३)अंगावर सुज येण्याची सवय असल्यास बिनसाईचे दही घुसळून लोणी काढावे व त्या ताकामध्ये मिरी,सुंठ,हिंग,लसूण असे पदार्थ घालून ते ताक जर सुजेवर दाबल्याने खड्डा पडत असेल तर त्या व्यक्तिला द्यावे.

    ४)तोंडला रूची नसल्यास जेवताना मध्ये मध्ये फोडणी दिलेली ताकाची कढि प्यावी.

    ताक प्यायचा अतिरेक केल्यास कफ व पित्ताचे आजार होऊ शकतात.

    (ह्या लेखामधील उपचार हे वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे हि विनंती)

    वैद्य स्वाती हे.अणवेकर
    आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
    म्हापसा गोवा.
    संपर्क:
    ९९६०६९९७०४

      February 16, 2017


  • किचन क्लिनीक – तांदुळ

    कोकण गोवा केरळ प्रांतातील जनतेचे आहारामधील प्रमुख घटक होय.ह्याचा नुसता भातच नव्हे तर ह्या पासून अनेक पदार्थ बनविले जाता जसे पुलाव,बिर्याणी,साखरभात, घावन,इडली,डोसे,भाकरी,पायस इ.आणी प्रत्येक रूपात ह्याची चव अप्रतीम लागते.

    ह्याचे उकडे,सुरे असे दोन प्रकार असतात.तसेच ह्याच्या अनेक पोटजाती देखील असतात जसे कोलम,सोनामसुरी,बलम,बासमती इ.आणी हो प्रत्येक तांदुळाची चव वेगळी लागते बरं का.

    सर्व प्रकारच्या भातामध्ये साठे साळी हा भात श्रेष्ठ असून त्यात देखील काळा व पांढरा असे दोन प्रकार असतात त्यात पांढरा उत्तम मानला जातो.

    सुरे तांदुळ पचायला जड असतात तर उकडे तांदुळ पचायला हल्के असतात.सर्वच तांदुळ चवीला गोड असतात पण साठे साळी मात्र मागुन थोड्या तुरट चवीचे लागतात.तांदुळ पचायला हल्के,स्निग्ध,थंड,पित्तघ्न,अल्प कफवातकर,शरीर पुष्ट करणारे,वृष्य,अल्प मल उत्पन्न करणारे आहेत.

    आता तांदुळा पासुन बनविलेल्या विविध व्यंजनांचे गुण पाहुया:

    १)यवागु(कण्हेरी):

    १ भाग तांदुळ व ६ भाग पाणी घालून केली जाते ती दाट कण्हेरी.हि पचायला हल्की,मल बांधुन ठेवणारी,तहान कमी करणारी,जुलाब,ताप ह्यात उपकारक,मुत्रल आहे.

    २)अटवल(विलेपी):

    १ भाग तांदुळ व ४ भाग पाणी घालून कण्हेरी पेक्षा दाट केली जाते तिला अटवल म्हणतात.हि भुक वाढविणारी,हृद्य,बल्य,पचायला हल्की,जखम,ताप,डोळ्याचे रोग ह्यात पथ्यकर,गोड,रुचिकर,पौष्टीक,तहान कमी करणारी व मल बांधुन ठेवणारी असते.

    ३)पेज(पेया):

    १ भाग भातामध्ये १४ भाग पाणी घालून केली जाते ती पेज.हि थकवा,ताप,जुलाब ह्यात पथ्यकर आहे,पचायला हल्की,भुक वाढविणारी,रुचिकर,वात व मल ह्यांना पुढे सरकवणारी,घाम उत्पन्न करणारी आहे.

    ४)मंड:

    पेजेतील शितें काढली कि जो द्रव भाग उरतो तों म्हणजे मंड होय.हा पचायला हल्का,थंड,मल बांधुन ठेवणारा,भुक वाढविणारा,ताप,अतिसार ह्यात पथ्यकर,चक्कर येत असल्यास ती कमी करणारा,कफ पित्त नाशक आहे.

    (क्रमश:)

    (ह्या लेखामधील उपचार हे वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे हि विनंती)

    वैद्य स्वाती हे.अणवेकर
    आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
    म्हापसा गोवा.
    संपर्क:
    ९९६०६९९७०४

      February 7, 2017