(User Level: User is not logged in.)

आरोग्य

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • देवपूजेतील अंतिम उपचार – मंत्रपुष्प – भाग २

    एका गंभीर सुरात सर्वानी मिळून म्हटलेले हे मंत्रपुष्प, केवळ ऐकत असताना देखील अंगावर रोमांच उभे राहातात.

      July 25, 2017


  • जगण्याची साधी सोप्पी तत्वे-भाग पंचेचाळीस

    आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-क्रमांक दहा

    विज्ञान शाप की वरदान-भाग तीन

    यंत्रांची निर्मिती ही टेक्नाॅलाॅजीची म्हणजे तंत्रज्ञानाची देणगी आहे की विज्ञानाची या वादात अडकून न पडता, आज या नवनवीन साधनांमुळे पूर्वीचा होणारा व्यायाम बंद झालाय, हे तरी मान्य करावेच लागेल. जाते, पाटा वरवंटा आता कोकलून सांगितले तरी शहरातील बायका काही या वस्तु परत वापरणारच नाहीत. परंतु भारतातील सत्तर टक्के जनता अजूनही ग्रामीण भागात राहाते आहे. भारतातील जवळपास पन्नास टक्के ग्रामीण भागात विज्ञान आणि तंत्रज्ञान अजूनही पोचलेले नाही.

    ग्रामीण भागापेक्षा शहरी भागात स्वाईन फ्लु सारखे साथीचे रोग वेगाने पसरतात. हे आपण पहातोच आहोत. जेव्हा शहरातील एखाद्या बऱ्या न होणाऱ्या रूग्णाला, डाॅक्टर खेड्यामधे हवापालट करण्यासाठी जायला सांगतात.
    शहरीकरणाचे वारे न लागलेल्या अशा एखाद्या खेड्यातील घरात एसी नसला तरी आरोग्य दडलेले असते.

    अशी खेडीदेखील आता दुर्मिळ होत चालली आहेत. प्रत्येक गावामधे टाळू न शकणारी मोबाईलची रेडीएशन्स पोचलेली आहेत. कर्करोगाला निमंत्रण देणारी कोल्ड्रींक्स पोचलेली आहेत. ही पण वस्तुस्थिती आहे.

    या सर्व परिस्थितीत आपण स्वतःला कसे सावरायचे आणि पुढील पिढीला कसे आवरायचे हाच प्रश्न आहे. एका बाजूने रासायनिक खतांचा मारा असलेले अन्नधान्य आम्हाला विकत घेऊन खावे लागते आहे तर दुसऱ्या बाजूने अशा खतांशिवाय आम्हाला पैसा मिळत नाही, असे सांगणारा, कर्जबाजारी शेतकरी आहे.

    एका बाजूने डाॅक्टर चांगल्या आरोग्यासाठी पालेभाज्या खा, फळे खा, असे सांगत आहेत. तर दुसऱ्या बाजूने रासायनिक द्रव्यांमधे बुडवून काढलेली फळे, सांडपाण्यावर पोसवलेल्या पालेभाज्याच उपलब्ध आहेत.

    औषधांशिवाय कसे जगता येईल हे सांगणारा आयुर्वेद एका बाजुला आहे तर औषधांशिवाय तुम्हाला जगताच येणार नाही, हे सांगणारी वैद्यकीय प्रणालीचा प्रचंड प्रभाव सरकारवर आणि जनमानसात आहे.

    एका बाजूने नैसर्गिक जीवनशैली तर दुसऱ्या बाजूने कृत्रिमपणे आधुनिकतेचा बाज घेतलेली झगमगीत लाईफस्टाईल.
    एका बाजूने भारत तर दुसऱ्या बाजूने इंडिया, हा वाद सुरूच राहणार आहे.

    एका बाजुला आधुनिकीकरण, विज्ञान तंत्रज्ञान तर दुसऱ्या बाजुला निसर्गातील सहज ज्ञान.

    एका बाजूने औषधे घेत घेत केवळ आयुष्य वाढवणे तर दुसऱ्या बाजूला खऱ्या अर्थाने जीवन जगणे.

    पाकिस्तानशी खेळायचे असेल तर आम्ही स्वतःला हिंदुस्थानी समजतो, इतर देशाविरूद्ध मात्र इंडिया खेळतो. तर आयपीएल मधे सर्वधर्मसमभावाचे भूत डोक्यावर नाचवीत गळ्यात गळे घालून मिरवतो.......

    या परिस्थितीमधे स्वतःला कसे जगवावे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.

    पुढे धोका आहे, हे समजून उमजून तसेच हट्टाने पुढे जायचेच असेल तर कोणी कोणाला अडवणार नाही, पण आधुनिकता आणि तंत्रज्ञानाच्या या घोड्याला जोपर्यंत भारतीय आध्यात्मिक दृष्टीचा लगाम नसेल तर विनाश अटळ आहे.

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    25.05.2017

      May 25, 2017


  • जगण्याची साधी सोप्पी तत्वे-भाग चौतीस

    आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-क्रमांक आठ

    धान्य किमान एक वर्ष जुने वापरावे-भाग दोन

    धान्य जुनं करून वापरल्याने त्यातील पाण्याचा अंश कमी होतो. आणि ते कोरडे, सुके, रूक्ष व्हायला लागते. निसर्गाच्या नियमाप्रमाणे जे नूतन असते, ते रसदार असते. (नूतन म्हणजे नवीन. गैरसमज नकोत. ) ओली फळे रसदार असतात आणि जसजसे फळ सुकत जाते, तसा त्यातील रस कमी होत जातो. खजूर आणि खारीक, आलं आणि सुंठ, द्राक्षे आणि मनुका या जोड्या लक्षात आणा, म्हणजे हा विषय समजेल. (उगाच आंबटगोड गैरसमज नकोत.)

    ज्या फळामधील रस. (रस म्हणजे जलमहाभूत.) कमी होत जातो, ते टिकाऊ होत जाते. आमरस आणि आंब्याची पोळी ( आमच्या कोकणात आंब्याच्या पोळीला "साट" म्हणतात.) यात टिकाऊ काय आहे ? साट जास्ती दिवस टिकते, कारण त्यातील पाणी कमी होत जाते.

    निसर्गामधे सूर्य हा जणुकाही साक्षात अग्निदेव. अन्न पदार्थातील रस, पाणी, द्रवांश, जलमहाभूत ओढून घेत असतो. याला "आदान कर्म" असे म्हणतात. या पाण्याला शोषून, ओढून घेण्यामुळे अन्न टिकाऊ बनते. आजच्या भाषेत, सूर्यापासून येणाऱ्या काही किरणांमधून काही उपकारक तर काही अपायकारक किरणे येत असतात. या किरणांमधे प्रचंड उर्जा साठवलेली असते. व्हिटामिन डी सारखी उर्जा जी फक्त थेट सूर्य किरणांमधूनच मिळत असते, ती पत्र्याच्या डब्यातील टाॅनिकच्या पावडरीमधे कशी भरतात, हा मोठा संशोधनाचा विषय आहे. असो.

    धान्य वाळवून ठेवल्याने, त्यांना चार पाच कडकडीत उन्हे दिल्याने ती टिकून रहातात, हे सत्य आपण बघतोच आहोत. धान्यामधे टोका, बरड आदि जंतुसंसर्ग देखील होत नाही.

    टीव्हीवरील एका कंपनीच्या बासमती तांदळाची जाहीरात बघितली आहे ? ती कंपनी चक्क जाहीरात करते आहे, की आमचे तांदुळ एवढे जुने करून ठेवल्यानंतर, आता आम्ही विकायला काढले आहेत. ( म्हणून त्याची किंमत एवढी जास्त आहे)
    बिझनेस सोडला तर जाहीरातीमधे तथ्य आहे. जुना तांदुळ शिजल्यानंतर, तो वाफेवर झाकून ठेवल्यानंतर, छान फुलतो. नवीन तांदळाचा भात केला तर कसा होतो, ते सुगृहिणीला विचारून बघा. शिजताना कमी पाण्यात जरी शिजवला तरी, नवीन तांदळामधे अंगभूत पाणी जास्ती असल्याने, शिजताना जरा जोरात ढवळले तरी त्याची कणी होते, तुकडा पडतो, परिणामी तो भात चिकचिकित, गिजगिजीत होतो. अशा भाताची बिर्याणी कशी चांगली होणार ?

    भातात अपेक्षित असलेला मोकळेपणा येण्यासाठी तो जुनाच हवा ! जुना करूनच वापरायला हवा.

    प्लॅस्टिकच्या डब्यात भात साठवून ठेवले तर, प्लॅस्टिकचे दुष्परिणाम तर त्यावर होणारच. प्लॅस्टिकमधे उष्णता असतेच, पण डबा अगदी "एअर टाईट" झाल्यामुळे भाताच्या गोट्यातील आतील पाण्याची होणारी जी वाफ आहे, ती कुठे जाणार ? ती बाहेर तर जाऊच शकत नाही, म्हणजे ती पुनः डब्यातील भातातच मुरून राहते.

    गवताच्या मुडीत साठवून ठेवलेला भात आणखी हलका होतो, कारण हे गवताच्या मुडीत, साठवलेले भात "वेल व्हेंटिलेटेड" असते. या मुडीतून भाताचा गोटा बाहेर पडणार नाही, पण तयार होणारी वाफ मात्र गवतामधून बाहेर जायला, भरपूर जागा असते. हीच तर निसर्गाची किमया आहे.

    गवतामधे मात्र प्रचंड उष्णता दडलेली असते. ही उष्णता मुडीमधील भातातील जलांशाचे, वाफेत रूपांतर करायला पुरेशी असते.

    आवश्यक असतील ते बाकी सर्व बदल घडवायला गवताच्या मुडीतील निसर्ग समर्थ आहे.
    सिर्फ अपना "मूड" बनना चाहीये ।

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    14.05.2017

      May 14, 2017


  • किचन क्लिनीक – काकडी

    किचन क्लिनीक – काकडी

    हि प्रत्येकाची आवडती.हिला बोली भाषेत तवसे देखील म्हणतात.हिची कोशिंबीर,रायते अगदी लाजवाब लागते.गरमी मध्ये शरीर व मन थंड करणारी हि काकडी सगळ्यांचीच लाडकी.
    हिचा उपयोग स्वयंपाका मध्ये जसा होतो तसाच हिचा वापर आपण घरगुती औषध उपचारात देखील करू शकतो.

    हिचा वर्षायू रोमश वेल असतो.आणि ह्याच वेलीला हि रसरशीत फिक्कट हिरव्या रंगांची फळे लागतात जे चवीला गोड व थंड असते.त्यामुळेच हे शरीरातील पित्तदोष कमी करते व वात व कफ दोष वाढविते.

    आता आपण हिचे औषधी उपयोग पाहू:

    १)अंगाची जळजळ होत असल्यास काकडीचा लेप लावावा व हिच्या बिया थंडाई मध्ये घालून देतात.

    २)लघ्वी कमी होत असेल तर काकडीचे बी, जिरे व साखर पाण्यात घालून केलेला काढा प्यावा फायदा होतो.

    ३)अंगावर पांढरे जात असल्यास १ ग्राम काकडी बी मधला गर + १ ग्राम पांढ-या कमळाच्या पाकळ्या वाटून त्यात जिरे व खडीसाखर घालून ७ दिवस खावे.

    ४)उन्हाळयात उष्णता कमी करायला काकडी चिरून त्यात खडीसाखर व लिंबाचा रस घालून खावी.

    ५)छातीत जळ जळ होत असल्यास ४ चमचे काकडी रस+खडीसाखर हे मिश्रण सकाळी उपाशी पोटी घ्यावे.

    ६)गव्हाचे पदार्थ खाऊन जर अजीर्ण झाले तर त्यावर उतारा म्हणून काकडी खावी.

    अतिमात्रेत काकडी खाल्ल्यास सर्दी होते.

    वैद्य स्वाती हे.अणवेकर
    आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
    म्हापसा गोवा.
    संपर्क:९९६०६९९७०४

      November 11, 2016


  • किचन क्लिनीक – दही

    दही हा पदार्थ जरी दुधापासूनच बनत असला तरी दुध व दह्याच्या गुणधर्मात बराच फरक आहे.दुधासारखे जर आपण दह्याचे नियमीत सेवन केले तर ते रोगांना आयतेच निमंत्रण दिल्या सारखे होईल.

    दही हा पदार्थ थंड असून तो शरीरात थंडावा निर्माण करतो हा जो समज आपल्या समाजात रूढ झाला आहे तो पुर्णत: चुकीचा आहे.वास्तविक दही हे उष्ण गुणाचे असते.

    आता दह्याचे सामान्य गुणधर्म पाहूया:

    दही हे शरीरात स्निग्धपणा निर्माण करते,पचायला जड असते,तोंडास रूची आणते,शरीरात शुक्रधातू व चरबी वाढविते,वात दोष कमी करून पित्त व कफ दोष वाढविते.

    साधारण पणे दही हे ७ प्रकारचे असते व प्रत्येकाचे गुण वेगळे असतात चला आता ते आपण थोडक्यात पाहू:

    १)ताजे दही:
    रुचिकर,गोड,शरीरात विविध स्त्रावांची उत्पत्ती करणारे व चरबी व कफ वाढविणारे असते.

    २)आंबट दही:
    कफपित्तकर,अंगावर सूज उत्पन्न करणारे व शरीरात स्त्राव उत्पन्न करणारे असते.

    ३)शिळे आंबट दही:
    रक्तधातू विकृत करते,पित्त वाढविते व त्यामुळे रक्ताचे व पित्ताचे अनेक विकार जसे त्वचारोग,डोळे लाल होणे,घशाशी आंबटकडू येणे,झोपेचा अतिरेक असे त्रास होतात.

    ४)अदमुरे दही:
    ह्याचे वारंवार सेवन केल्याने छातीत जळजळ,सर्दी,खोकला,पोट फुगणे,अशा तक्रारी होतात.

    ५)तापविलेल्या दुधाचे दही:
    वातनाशक,तोंडास रूचि आणते,शरीर पुष्ट करते,बलदायक आहे.

    ६)साय काढलेल्या दुधाचे दही:
    तुरट,पचायला साईच्या दह्या पेक्षा हल्के,भुक वाढविणारे,मळ घट्ट बांधुन बाहेर काढणारे,आतड्यांची गती कमी करणारे,ह्याच्या नियमीत सेवनाने पोट फुगते.

    ७)साईचे दही:
    पचायला जड,वातनाशक,कफकर,शुक्रधातू वाढविणारे आहे.

    (ह्या लेखामधील उपचार हे वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे हि विनंती)

    वैद्य स्वाती हे.अणवेकर
    आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
    म्हापसा गोवा.
    संपर्क:
    ९९६०६९९७०४

      February 10, 2017


  • जगण्याची साधी सोप्पी तत्वे – भाग अठरा

    आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे - क्रमांक चार

    जगण्यासाठी औषधं काम करत नाही. - भाग नऊ

    विश्वासराव पानीपतच्या लढाईत मारला गेला. आता कोणावर विश्वास म्हणून ठेवायला नको, असे वाक्प्रचार आपण व्यवहारात वापरतो.

    औषध देणाऱ्यावर पूर्ण विश्वास ठेवून औषध घेणं महत्वाचे असते, तसंच मी बरा होत आहे, बरा होणार आहे, हा स्वतःवरचा विश्वास देखील महत्वाचा असतो.

    औषध सेवन करत असताना हा विश्वास मिळवण्यासाठी भाव निर्माण करणं महत्त्वाचा असतो.
    औषधं जाह्नवीतोयं, वैद्यो नारायणो हरिः ।
    ...... श्रद्धय हरिकिर्तनम।

    मी हे जे काही औषध घेत आहे, ते जणुकाही गंगोदक आहे, त्याने माझे सर्व रोग नष्ट होत आहेत, आणि "औषध देणाऱ्या वैद्याला, मी नारायण स्वरूपात पहातोय, मग त्याने दिलेले तीर्थ घेतल्यावर मला गुण का येणार नाही," अशी श्रद्धा हवी, म्हणजे साधे एचटुओ सुद्धा तीर्थ बनते.

    अकाल मृत्यु हरणम्
    सर्व व्याधी विनाशनम्,
    विष्णुपादोदकं तीर्थे
    जठरे धारयाम्यहम् ।

    असा मंत्र आपण देवाचे तीर्थ घेताना म्हणतो, (असा म्हणावा, म्हणजे तसा भाव, कल्पनेने तयार करावा, म्हणजे आपण जे एचटुओ, दूध, पंचामृत, नदीचे, नळाचे पाणी पितो, ते जणुकाही प्रत्यक्ष भगवंताने दिलेले औषध आहे, असा भाव ठेवावा. ब्रॅण्डेड औषध आणि जेनेरीक औषध घेताना सुद्धा असाच भाव ठेवावा का, असा प्रश्न कृपया विचारू नये.

    हे तीर्थस्वरूप औषध घेतल्यावर, माझा अकालमृत्यु टळणार आहे, सगळे व्याधी मुळातून नष्ट होत आहेत, म्हणून हे औषध स्वरूपात असलेले तीर्थ, मी माझ्या जठरात म्हणजे पोटात घेत आहेत. (आता मला काळजीचे काहीच कारण नाही. आता माझी काळजी घेणारा, सर्व शक्तीमान परमेश्वर माझ्याबरोबर असताना काळजी कशाला ? काळोख कितीही पडलेला असेना का, जर माझ्याकडे उजेड करण्याचे खात्रीचे साधन जर असेल तर काळोखाची भीती वाटायचे काहीच कारण नाही.)

    आता, परमेश्वरच नाही, ही विकल्प भावना आपणच जर तयार करून घेतली असेल तर, तीर्थ काय, पाणी काय. ब्रॅण्डेड काय, जेनेरीक काय, कशानेच गुण येणार नाही. एक भक्कम आधार भक्तीचा हवा तर भीती नाहीशी होते.

    "मेरे लिए दुवा करो,"
    "प्लीज, प्रे फाॅर मी" असं सांगणारी मुसलमान ख्रिश्चन माणसे आपण अवतीभवती बघतो, पिक्चरमधे असे डायलाॅगदेखील आपण ऐकतो, पण "माझे आजारपण कमी होण्यासाठी तुम्ही, माझ्यासाठी देवाला सांगा", असं विश्वासाने सांगणारी माणसे कमी होत चालली आहेत.

    केवळ औषध काम करत नाही.
    हरबार दवा काम नही करती, कभी कभी दुवा भी काम करती है !
    यालाच दैवं पंचमम् उत्तमम् असे म्हटलेलं आहे.

    -- वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग. 9673938021
    02362-223423.
    27.04.2017

      April 27, 2017


  • किचन क्लिनीक – डाळींब

    किचन क्लिनीक – डाळींब

    डाळींबाच्या द्राक्ष्यांप्रमाणे लालचुटूक ओठ अशी उपमा सुंदर स्त्रीयांच्या ओठांना दिली जाते.खरोखरच हे डाळींबाचे दाणे जणू काही रूबीच्या रत्नाप्रमाणेच दिसतात.ह्या दाण्यांचा रस पिण्यासाठी वापरतात तसेच मुंबई दाबेली मध्ये चव यायला हे डाळींब दाणे घातले जातात.

    काही म्हणा पण हे डाळींब जसे सुरेख लागते तसेच ते खाल्ल्यावर शरीरात तरतरी येते.ह्या डाळींबाचे १०-१५ फुट उंच वृक्ष असतो जो मध्यम आकाराचा असतो.ह्याची फुले नारंगी लाल रंगांची असतात तर फळे गोल लालसर व टपोरे दाणे युक्त असतात.

    ह्याचे गोड फळ हे थंड व त्रिदोष शामक असून गोड आंबट चवीचे फळ हे किंचीत पित्तकर असते तर आंबट फळ हे कफवातनाशक असून पित्तकर असते.

    चला आता ह्याचे औषधी उपयोग पाहूया:

    १)लहान मुलांना होणाऱ्या जुलाबात फळाची साल पाण्यात उगाळून मधासह त्याचे चाटण द्यावे.

    २)पित्ताचा त्रास,आंबट ढेकर,जळजळ ह्यात १/२ डाळींब रस+१ चमचा खडीसाखर घ्यावी.

    ३)तापामध्ये तहान लागत असल्यास थोड्या थोड्या वेळाने डाळींबाचा रस प्यावा.

    ४)डाळींबाची साल सुकवून त्याची पूड करावी व त्याने दात घासावे ह्याने दात व हिरड्या बळकट होतात,रक्त स्त्राव होत असल्यास कमी होतो.

    ५)घसा बसणे,दुखणे,टाॅन्सील्स वाढणे ह्यात डाळींबाच्या ताज्या सालीचा काढा+चिमूटभर हळद घालून गुळण्या कराव्यात.

    डाळींब अतिप्रमाणात खाल्ल्यास जुलाब,सर्दी असे त्रास होऊ शकतात.

    वैद्य स्वाती हे.अणवेकर
    आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
    म्हापसा गोवा.
    संपर्क:९९६०६९९७०४

      December 18, 2016


  • आहारातील बदल भाग ६५ – चवदार आहार -भाग २७

    तुरटी कशी ? या प्रश्नाचे उत्तर अनुभुति घेतल्याशिवाय येत नाही. ती तुरट आहे. हे उत्तर तर सर्वांनाच माहिती आहे. कशाप्रमाणे गोड वगैरे वर्णन करता येईल. पण तुरट म्हणजे काय ? या प्रश्नाचे उत्तर काय देणार ना ?

    त्यासाठी तुरटी चाखून पाहिल्यावर जे लागते त्याला तुरट म्हणतात. असेच सांगावे लागेल.
    यालाच अनुभुति म्हणतांत. प्रत्येक गोष्ट सिद्धत्वाच्या कसोटीवर तपासता येत नाही हेच खरे.

    तेच प्रत्येक चवींच्या बाबतीत आहे. वापरून बघितली की, अभ्यास केला की, यांची अनुभूती घेता येते.

    या सर्व चवींचे ज्ञान जीभ या ज्ञानेंद्रियानी होत असते. हे एकमेव इंद्रीय उभयात्मक आहे. म्हणजे कर्मेंद्रिय पण आहे आणि ज्ञानेंद्रिय सुद्धा आहे.
    रसना म्हणजे आत चवीची अनुभुति देणे म्हणून रसनेंद्रिय आणि निर्माण झालेला शब्द बाहेर फेकणे म्हणून वागेंद्रीय.

    आत बाहेर दोन्ही कामे करते. म्हणून या जीभेवर संयम आणता आला की, सर्व साध्य झाले. ज्याने जिंकीली रसना, त्याने जिंकिली वासना.

    सर्व इच्छांवर संयम आणण्यासाठीदेखील ही तुरट चव मदत करेल.

    संयमात ठेवणे हा गुण झाला, पण काहीवेळा तो दोषही होतो. जिथून विष बाहेर काढायचे आहे तिथून ही तुरट चव बाहेर पडायलाच देत नाही. स्रोतसांचे आकुंचित झाल्यामुळे बाहेर पडणारे स्राव कमी होतात. न पचलेले अन्न देखील आत मधे पडून राहाते. आम जागचा हलत नाही, तो तुरट चवीच्या याच स्तंभ गुणामुळे ! त्याचा परिणाम म्हणून पोटदुखी, मलावष्टंभ.

    रक्तवाहिनीचा गरजेपेक्षा जास्त संकोच झाला तर रस रक्त विक्षेपणात अडथळे येणे, ह्रदयात वेदना होणे, ह्रदयाची ताकद कमी होणे, ही लक्षणे दिसतात.त्याचा परिणाम अन्य अवयवांवर होऊन यकृत, किडनी इ. मधे पण अवरोध जमा होऊ लागतो. म्हणून थकवा येणे, ग्लानी येणे, उत्साह जाणे, रक्तदाब वाढणे, तोंड सुकणे, आवाज बसणे यासारखी लक्षणे निर्माण होतात. चेहेरा वाकडा होणे, एक बाजू लुळी पडणे, हे वाताचे आजार देखील याच तुरट चवीच्या अतिसेवनाने होतात. हे विसरता नये.

    पोषण करणाऱ्या नलिकांचा संकोच झाल्यामुळे कमालीचा अशक्तपणा येतो. वजन खूप कमी होते, प्रतिकार करण्याची शारीरिक आणि मानसिक ताकदच संपून जाते. याला देखील हीच तुरट चव जबाबदार आहे.

    आपणाला कायम एकच बाजू दिसत असते. दुसऱ्याची चुक आणि आपली बरोबर.
    दोन्ही बाजूने विचार करण्याची सवय ठेवली तर भूमिकेला योग्य न्याय देता येतो. आपले काय चूक नि काय बरोबर. आणि ते का. हे शोधले की सापडते.

    वैद्य सुविनय दामले
    कुडाळ, सिंधुदुर्ग
    9673938021
    27.11.2016

      November 27, 2016


  • आयुर्वेदीय चिकित्सेमागील दृष्टीकोन – भाग तेरा

    परत परत त्याच शंका विचारल्या जात आहेत, याचा अर्थ मला नेमकेपणाने काय म्हणायचं आहे ते नीट समजले नसावे. एकतर मला नीट सांगता येत नसावे, किंवा वाचणाऱ्याने समजून घेण्याचा प्रयत्न केला नसावा. असो. पुनः एकदा सांगतो. कोणतेही, कोणाचेही गैरसमज नसावेत

      February 23, 2017


  • जगण्याची साधी सोप्पी तत्वे – भाग अठ्ठावीस

    आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे - क्रमांक सात

    निसर्गाचे नियम - सर्वांसाठी सारखेच - भाग तीन !

    निसर्ग कोणासाठी थांबत नाही.
    निसर्गाने निर्माण केलेले प्राणी सहसा आजारी पडत नाहीत. कर्मभोगाप्रमाणे जे आजार होत असतात, ते निसर्गच बरे करत असतो. त्यासाठी वापरायची औषधे ही नैसर्गिकच असावीत.
    कृत्रिम औषधे वापरून कृत्रिम आजार वाढविण्यात येत आहेत, असे म्हटले तरी अतिशोयोक्ती होणार नाही.

    निसर्ग शक्तीमान आहे. निसर्गाचे जसे एक मन आहे, तसेच निसर्गाचा एक आत्माही आहे. परम आत्मा! त्याची काही कर्मेंद्रिये आणि ज्ञानेंद्रिये पण असतील. या सर्वांच्या आधारे निसर्ग आपला गाडा हाकत असतो.

    मनुष्य ही निसर्गाची छोटी प्रतिकृती आहे. जसे निसर्गामधे घडत असते, अगदी तस्सेच शरीरात देखील घडत असते. जसा निसर्गामधे सूर्य तसा शरीरात अग्नि किंवा पित्त, उष्णता. जसा निसर्गामधे चंद्र तसा शरीरात कफ किंवा थंडावा, ओलावा. जसा निसर्गामधे वारा तसा शरीरात वायु, गती, हालचाल, चंचलता.

    जे बदल निसर्गात होत असतात, त्याचा परिणाम थेट शरीरावर होत असतो. बाहेर उष्णता वाढली की शरीरावर घाम यायला सुरवात होते आणि त्वचा ओली ठेवून आतील रक्त आदि थंड ठेवले जातात. साहाजिकच उन्हाळ्यात लघवीला कमी होते.

    याउलट हिवाळ्यात लघवीला जास्ती वेळा जावे लागते, आणि घाम येतच नाही. त्वचेचे, घर्मछिद्रांचे आकुंचन केले जाते. आतील उष्णता बाहेर जाऊ नये यासाठी जणुकाही दरवाजे बंद केले जातात.

    हे सर्व बदल कोण करते ? कोण ठरवतं आता आकुंचन आता प्रसरण ? कोण ठरवतं काय खावे प्यावे ? इच्छा कोण निर्माण करतं ? ह्रदय यकृत मेंदूकडून काम करवून घेणारी एक यंत्रणा समांतरपणे काम करीत असते. याचे नियंत्रण कोणाकडे असते ? या प्रश्नांची उत्तरे आजही अर्वाचीन शास्त्राकडे नाहीत.

    उपनिषदे, वेद, पुराणे यामधे याची उत्तरे दडलेली आहेत. याला आपण निसर्ग म्हणू, ईश्वर म्हणू. अशी एक अत्यंत सूक्ष्म शक्ती की, जिच्या सुप्त इच्छेपुढे आपले विचार कस्पटासमान आहेत. या शक्तीचेच विराट रूपातील दर्शन म्हणजे अर्जुनाला झालेले विश्वरूप दर्शन होय !

    म्हणजे मी अर्जुन झालो तर मला सुद्धा असे दर्शन होईल का ? याचे उत्तर हो. असेच येईल. फक्त अर्जुनाचे सर्वच्या सर्व गुण आपल्यात आले पाहिजेत. ती उत्कट भक्ती, ती शक्ती, ती मैत्री, ती भावविभोरता, ती जिज्ञासा, ते वैराग्य, तो कर्मयोग, ते बंधुप्रेम, त्या प्रतिज्ञा, तो संयम, ते शौर्य, ती वीरता, ते चातुर्य, तो संन्यास, सारं काही असलं की भगवंत ( म्हणजे निसर्ग ) अनुकुल होऊन आपल्या सर्व शक्तींनी युक्त होऊन विराट रूप दर्शनासाठी आपल्यासमोर उभे ठाकतात.

    जाणून घेण्याची शक्ती नसली की काही जणांना तो प्रलय वाटतो तर काही जणांना ते तांडव वाटते.
    अक्राळविक्राळ रूपातील नरसिंहाला शांत करण्यासाठीचा, प्रल्हादाचा एक भक्तीकटाक्ष जरी आपल्यात आणता आला तरी निसर्ग आपल्याला अनुकुल होईल आणि निरामय आरोग्य निश्चितच मिळेल.

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    08.05.2017

      May 8, 2017