(User Level: User is not logged in.)

आरोग्य

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • कपिकच्छू/खाजकुहिली

    कपिकच्छू/खाजकुहिली

    पुर्वीच्या काळी खोडकर विद्यार्थी वर्गात ह्याच्या शेंगा वरील लव बाकावर अथवा शिक्षकांच्या खुर्चीवर घालून मुलांच्या व शिक्षकांच्या नाकी नऊ आणत अशी हि खाजकुहिली.जिच्या शेंगेवरील लवंगेचा स्पर्श जर अंगास झाल्यास भयंकर खाज सुटते.
    ह्याचा वर्षायू वेल असून पाने ७-१३ सेंमी लांब,त्रिदलीय असून पानांवर बारीक लव असते.फुल १५-३० सेंमी लांब व मंजिरी स्वरूप असते.फुले वांगी निळ्या रंगाची असतात.फळ शेंगेच्या स्वरूपात ५-१० सेंमी लांब व १ सेंमी रूंद असते ह्याच्या कडा वाकड्या असून शेंगेवरील दाट लव असते.प्रत्येक शेंगेत ५-६ धुरकट व चपट्या बिया असतात.बीज मज्जा पांढरी असते.

    ह्याचे उपयुक्तांग बीज,मुळ व रोम असून कपिकच्छू चवीला गोड,कडू असून थंड गुणाची व जड व स्निग्ध असते.हे गोड,जड व स्निग्ध असून वातनाशक आहे.

    चला आता आपण ह्याचे औषधी उपयोग पाहूयात:

    १)फलरोम क्षोभ उत्पन्न करून कृमिनाशक कार्य करतात म्हणून फल रोम हे गुळ,मध व लोण्यासह मिसळून देतात व त्यानंतर रेचक औषध दिले जाते ज्यामुळे कृमी मरून पडतात.

    २)कपिकच्छू बीज शुक्रवृद्धि करते म्हणून नपुंसकत्वात हे उपयुक्त आहे.

    ३)कपिकच्छू मुळ हे आर्तवजनन असल्याने मासिकपाळीच्या तक्रारींवर उपयुक्त आहे.

    ४)कृशता व अशक्तपणा ह्यात कपिकच्छू बीज उपयोगी आहे

    ५)गोड चव व थंड असल्याने बाळंतीणीमध्ये स्तन्यवृद्धि करण्यास कपिकच्छू बीज उपयुक्त आहे.

    (सुचना: ह्या लेखातील वनस्पती वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे )

    (कृपया फोटो चुकला असल्यास सांगावे हि विनंती)

    वैद्य(सौ)स्वाती हेमंत अणवेकर
    आरोग्य आयुर्वेदीक क्लिनीक,
    म्हापसा गोवा.
    संपर्क:९९६०६९९७०४
    ©Dr Swati Anvekar

      January 15, 2018


  • इंद्रिये, अवयव आणि आहार – भाग अठरा

    अवयवांना आपले काम करायला एक विशिष्ट स्पेस हवी असते. जी स्पेस या गॅसच्या दबावामुळे मिळत नाही, आणि चांगले निरोगी असलेले अवयव देखील काऽही काम करू शकत नाही.

      April 2, 2017


  • आजचा आरोग्य विचार – भाग पंधरा

    उकीडवे ( हिंदी मे उकुडू बैठकर ) बसून मलविसर्जन केल्यामुळे मल सहजपणे बाहेर पडायला मदत होते. दोन्ही मांड्या पोटावर विशेषतः पोटाच्या खालच्या भागावर दाबल्या गेल्याने पक्वाशय, मलाशय अधिक कार्यरत होतात. पोटऱ्या दाबल्या जातात. त्यामुळे मलविसर्जनाची सर्वात आदर्श पद्धत म्हणजे उकीडवे बसण्याची आहे, असे संशोधन आंग्ल भाषेतील पाश्चात्य विद्वानांनी लिहिलेल्या पुस्तकामधे नमूद केलेले आहे.

      February 15, 2018


  • आजचा आरोग्य विचार – भाग पाच

    एक काळ असा होता, की पाश्चात्यांना पोट कसे भरावे याची चिंता होती. संस्कृती, संस्कार हे शब्द त्यांच्या खिजगणतीतही नव्हते. लज्जारक्षण कसे करावे, हे त्यांना माहित नव्हते. अर्थात अजून तरी कुठे कळले आहे म्हणा ! लज्जारक्षण करण्यासाठी चांगले कपडे घालायचे असतात, हा उद्देश नाहीच आहे. शरीर आणखी आकर्षक कसे दिसेल यासाठीच आज ते कपडे घालतात. त्यातूनच रॅम्पवाॅक कॅट वाॅक, फॅशनशो आणि स्त्री शरीराचा बाजार इ. प्रकार पुढे येत गेले.

      February 5, 2018


  • नवी अस्पृश्यता

    सांगली जिल्ह्यात एड्स रुग्णांची संख्या एक लाखापेक्षा जास्त असल्याच्या आशयाचे वृत्त नुकतेच एका बड्या मराठी दैनिकात उमटले. अशा तह्रेच्या बातम्यांचे आजकाल नावीण्य राहिलेले नाही. अधूनमधून अशा आशयाच्या बातम्या उमटतच असतात. दोन-तीन वर्षांपूर्वी तर आता अकोल्याहूनही प्रकाशित होणाऱ्या एका मराठी दैनिकाने एड्समुळे मृत्युमुखी (?) पडलेल्या एका व्यक्तीच्या नावासह बातमी प्रसिद्ध केली होती. आमच्या संपादकीय विभागाने मात्र त्या रुग्णाच्या नावाचा उल्लेख न करता बातमी प्रसिद्ध करण्याचे तारतम्य बाळगले होते. रुग्णाचे नाव प्रसिद्ध न करता बातमी छापल्यामुळे त्या गावचा आमचा वार्ताहर तणतण करीत कार्यालयात आला होता. मात्र जेव्हा त्याला हे समजावून सांगितले की, बाबा रे मरणारा तर मेला. एड्सने मेला की आणखी कशामुळे हे त्यालाच ठाऊक. पण तो एड्सने मेला ही बातमी त्याच्या नावासकट छापल्यामुळे त्याच्या कुटुंबीयांना समाजाकडून अस्पृश्यतेची वागणूक मिळेल. आपल्याला त्या पापात सहभागी व्हायचे नव्हते, म्हणून आपण नाव छापण्याचे टाळले, तेव्हा त्याची समजूत पटली.

      June 16, 2002


  • प्रमुख आहार सूत्र – भाग ४

    दुधाचा जो उल्लेख या सूत्रात केलाय, ते नक्की देशी गाईचेच आहे का ? अशी विचारणा काल काही गोप्रेमींनी, काही राजीव दीक्षितजीच्या अनुयायांनी केली. मला कोणाच्याही व्यक्ती भावना दुखवायच्या नाहीयेत, पण जे चुकतंय त्याची दुरूस्ती केल्याशिवाय पूर्ण आरोग्याची प्राप्ती होणार नाही, हे लक्षात घ्यावे.

    काय झालंय, ज्याला त्याला प्रत्येकाला आपण सांगतोय तेच बरोबर असे वाटतेय. आणि मूळ सूत्र बाजुलाला पडते. वाग्भटजींना नेमकेपणाने काय सांगायचे आहे, तो मुळ मुद्दा मुळ ग्रंथातून कोणीच वाचलेला नसतो. केवळ राजीवजी दीक्षित सांगतात, म्हणजे ते बरोबरच, असा हेका धरून नाही, चालणार !

    सांगायला अभिमान आणि आनंद वाटतो की, मी आज जे लिहितोय, बोलतोय, विचार करतोय, तो फक्त आणि फक्त राजीवजींच्या प्रभावामुळेच. जर राजीवजी माझ्या आयुष्यात आले नसते तर आजचा मी, असा घडलोच नसतो. मी एवढा भाग्यवान आहे, की प्रत्यक्ष राजीवजींबरोबर मी स्वतः सहा वर्षे काम केले आहे. राजीवजी माझे सामाजिक, राजकीय, धार्मिक, शैक्षणिक, आर्थिक, व्यावहारिक, बौद्धिक गुरू आहेत. वर्ध्यापासून अगदी राजस्थान, गुजराथ, कर्नाटक सर्वत्र त्यांच्याबरोबरीने फिरलोय. आजादी बचाओ आंदोलनाच्या स्थापनेपासून आम्ही त्यांच्याबरोबर काम केलंय. अनेक गोष्टींवर आमची चर्चा होत असे. राजीवजी हे होमियोपॅथीमधले उत्तम निष्णात होते. तशी पदवीसुद्धा त्यांच्याकडे होती. आमच्या चर्चेमधून देशी स्वदेशी विदेशी बद्दल जेव्हा चर्चा व्हायची, तेव्हा होमियो औषधे परदेशातूनच आयात करावी लागतात, त्यापेक्षा स्वदेशी आयुर्वेदातील सूत्रांचा आपण आपल्या भारतीय पद्धतीने का विचार करू नये, हा विचार राजीवजींना पटला, आणि या चर्चेनंतर त्यांना वाग्भट हा ग्रंथ पुणे येथील जागतिक आयुर्वेद परिषदेच्या वेळी सप्रेम भेट दिला. त्यानंतर आमची दूरध्वनी वरून काही विषयावर चर्चा व्हायची. तेव्हा एखाद्या ग्रंथाचा अभ्यास कसा करायचा असतो, हे मला शिकायला मिळाले. आम्ही ग्रंथ अभ्यासला तो केवळ परीक्षेत उत्तरे लिहिण्यासाठी. पण राजीवजींनी भारतीय पद्धतीने हेच भारतीय ग्रंथ कसे अभ्यासायचे हे शिकवले.

    फक्त या आयुर्वेदीय ग्रंथाची शैली ही केवळ शब्दशः भाषांतर अशी नसल्याने काही वेळा नेमकेपणाने भाषांतर केले तर अर्थ बदलतात आणि अर्थाचे अनर्थ होतात. श्लोकांचे इन बिटवीन द लाईन्स अर्थ वेगळे होतात, ते अर्थ अगोदरच्या आणि नंतरच्या श्लोकांच्या आधारे, तर्काने लावायचे असतात, हे पण राजीवजीना पटले होते. पण दुर्दैवाने त्यांच्या चेन्नई येथील व्याख्यानानंतर ! तोपर्यंत त्यांच्या आरोग्यावरील वाग्भटजींच्या व्याख्यानांच्या सिडीज प्रसारीत सुद्धा झाल्या होत्या. आणि नंतर, नियतीनेपण ही चुक सांगायला आणि सुधारायला संधीच दिली नाही. आज भारतामधे होत असलेला सकारात्मक बदल पहायला आणि पुढे मार्गदर्शन करायला राजीवजी हवेच होते पण........
    या पणपाशी नियतीने आम्हाला थांबायला सांगितले.
    .
    .
    .
    .
    .

    वाग्भटजी पूर्वी देखील अनेक शास्त्रकार होऊन गेले, चरक सुश्रुत यांनी लिहिलेल्या ग्रंथातील काही सोपी आणि व्यावहारिक सूत्रे वाग्भटजीनी संकलीत केली. त्यातील चरकाचार्यांनी प्रमेह प्रकरणामधे सांगितलेले हे अत्यंत महत्वाचे सूत्र. मधुमेह होऊ नये या करीता सांगितले गेलेले हे सूत्र आता विस्ताराने बघूया. कोणतेही पूर्वग्रहदूषित न ठेवता या सूत्राचा नव्याने अभ्यास करूया. राजीवजींनी जी दृष्टी दिली ती आपल्यामधे उतरवण्याचा प्रयत्न करूया, पुनः एकदा इतिहासातील वैभवशाली भारत अभ्यासूया, आणि भारताला आरोग्यसंपन्न भारत बनवूया, हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल.

    मूळ सूत्र असे,

    आस्यासुखं स्वप्नसुखम् दधिनी
    ग्राम्यौदकः आनूपरसः पयांसि ।
    नवान्नपानं गुडवैकृतंच
    प्रमेहहेतु कफकृच्च सर्वम ।।

    पय म्हणजे दूध. म्हणजे देशी गाईचे दूध असा अर्थ होतो. जिथे जिथे दूध असा उल्लेख येतो, ते दूध म्हणजे गाईचे. आणि गाय देशी. जिथे घृत असा उल्लेख येतो, तिथे गाईचे तूप, दही, ताक, लोणी, मूत्र, शेण याच्या बाबतीत जाणावे असे एक सूत्र ग्रंथामधे आधी येऊन गेले आहे. परत परत आम्ही सांगणार नाही. असे वाग्भटजी म्हणतात. जिथे बदल अपेक्षित असेल तिथे आमच्याकडून नेमकेपणाने सांगितले जाईल. अन्यथा दुग्धादि सर्व गाईचेच जाणावे.

    जसे कोणत्याही कार्यक्रमामधे सुरवातीला जो प्रास्ताविक करतो, त्यानेच व्यासपीठावर बसलेल्या प्रत्येकाचे पद आणि नाव यांचा उल्लेख करायचा असतो. अगदी थोडक्यात त्याची प्रतिष्ठा सांभाळायची असते. पण एकदा खुर्चीवर बसलेल्या अध्यक्ष, प्रमुख पाहुणे, मा.खासदार आमदार, अमुक बॅकेचे चेअरमन, तमुक गावचे सरपंच, मा. पोलीसपाटील असे सांगून झाले की, नंतर व्यासपीठावर स्वागतासाठी येणाऱ्या, किंवा अन्य प्रमुख वक्ते, अध्यक्ष, चेअरमन, आणि आभार प्रदर्शन करणाऱ्यांनी फक्त आदरणीय व्यासपीठ आणि उपस्थित सज्जनहो, असे म्हणून आपला विषय पुढे सुरू करावयाचा असतो. येणारा प्रत्येक वक्ता जर स्टेजवर बसलेल्या सर्वांची नावे घेऊ लागला तर ते श्रोत्यांना कंटाळवाणे होते. तसेच......
    म्हणजे इथे जो पय असा उल्लेख केला आहे तो गाईचे दूध असाच होतो. आणि त्याकाळी गाईंचा वर्णसंकर न झाल्याने या सर्व गाई देशीच होत्या. हो आणखी एक गोष्ट. मूळ सूत्रात पय असे न म्हणता पयांसि असा शब्द वापरला आहे, याचा अर्थ केवळ गाईचेच नव्हे तर म्हैस, शेळी, मेंढी, या अन्य सर्व दुधांचे अतिसेवन हे मधुमेहाचे कारण आहे.

    ज्याचे अन्न फक्त दूधच आहे असे बालक सोडून अन्य पालक वर्गाने याचा विचार करावा.
    आजच्या पुरते खूप झाले. आज एवढे लक्षात ठेवूया,
    चहातले दूध चालते, पण दुधाचा चहा नको.

    वैद्य सुविनय दामले,
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    20.01.2017

      January 20, 2017


  • वरूण – वायवर्ण

    वरूण चवीला कडू,तुरट,तिखट व गोड असून उष्ण गुणाचा व हल्का व रूक्ष असून तो प्रभावाने रक्तदोषनाशक व अशमरीभेदक आहे.ह्याचे उपयुक्तांग आहे त्वचा,पाने व मुळ.वरूण वातनाशक व कफनाशक आहे.

      January 22, 2018


  • जगण्याची साधी सोप्पी तत्वे-भाग पासष्ट

    आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-क्रमांक अकरा

    जे जे देवासाठी ते ते देहासाठी-भाग 21-धूपं समर्पयामी-भाग दोन

    धूपन ही एक उत्तम चिकित्सा म्हणून आयुर्वेदात वर्णन केली आहे. औषधे टिकून रहावीत यासाठी जी भांडी बरण्या वापरल्या जात त्याला वेगवेगळ्या प्रकारच्या लाकडाच्या धुराने धुपीत करून घ्यायला सांगितले आहे. उद्देश्य एकच. जंतुनाश ! जखमेतील सूक्ष्म जीव नाहीसे व्हावेत, मरून जावेत, जखमांना धूप दाखवण्याची पद्धतही आपल्याकडे आहे. अनेक प्रकारचे हट्टी त्वचारोग धुपन केल्यावर काबूत येतात. धुपन करण्याची अगदी साधी सोपी पद्धत आहे. कोळसा पेटवून लाल करून घ्यावा, त्यावर धूपन द्रव्य घालावे, आणि जिथे आवश्यक आहे तिथे युक्तीने फिरवावा.

    कोळसा नसेल तर काय ? आणि धूपन द्रव्य कोणती ? असेच प्रश्न आले ना मनात.

    कोळसा नसेल तर नारळाची करवंटी गॅसवर ठेवावी आणि पेटवावी. पूर्ण पेटल्यावर ती एका पत्र्यावर काढून घ्यावी आणि त्यावर कोणत्याही प्रकारचे तीक्ष्ण वास येईल अशी जंतुनाश करणारी द्रव्य घालावे. जसे धूप, हळद पूड,कांद्याची साले, लसणीची साले, लवंग, वेलचीची टरफले, काजूची टरफले, मिरचीचे देठ, मीठ मोहोरी, तूप तांदुळ, कढीलिंबाची किंवा कढीपत्त्याची पाने, ज्यातून तीक्ष्ण वास येईल असे काहीही चालेल. ज्याचा दळ गेलेला आहे असा मसाला, किड पडलेली हळकुंडे, टोके झालेली मिरचीपूड, यापैकी सुद्धा काहीही चालेल. पण प्रमाण कमी वापरावे. अगदी चिमूटभर. नाहीतर धूप, गुग्गुळ, हिंग, डिंक, यासारखे नैसर्गिक निर्यास, नाहीतर काळाच्या ओघात फुकट गेलेली आयुर्वेदातील चूर्ण, जसे त्रिफळा चूर्ण, अविपत्तिकर चूर्ण, हिंग्वाष्टक चूर्ण, यापैकी चूर्ण देखील धूपाप्रमाणे वापरावे. आपल्याला तीक्ष्ण वास तयार करायचा आहे, हे तत्व लक्षात ठेवायचे. आणि त्या वासाचा आपल्याला त्रास न होता, फक्त रोगजंतु घराबाहेर जावेत हा हेतु, ही युक्ती मात्र वापरावी. नाहीतर घरात एवढा धूर होईल की, आपणालाही आपले घर सोडावे लागेल ऐसे न व्हावे !

    वर्षातून एकदा घरामधे होम करावा तो यासाठी असाही विचार करायला हरकत नाही. यासाठी द्रव्य म्हणून अनेक प्रकारच्या समिधा वापरल्या जातात. वड, गुळवेल, औदुंबर, पिंपळ, रूई, पळस, दुर्वा, तीळ, शिजलेला भात, रेशमी वस्त्र, केळी, नारळ, तूप, इ. अनेक हविर्द्रव्य सांगितलेली आहेत. ही सर्व औषधे आहेतच. यांचा धूर महा औषध आहे.

    एक साधे उदाहरण बघूया. जो मिरची चावतो, त्याला ती तिखट लागते, नाकातोंडातून पाणी येते, डोळे चुरचुरतात, अंगाची आग होते हे फक्त मिरची चावणाऱ्यालाच होते इतरांना नाही. पण हीच मिरची निखाऱ्यावर टाकली तर हीच सर्व लक्षणे तिथे आसपास असणाऱ्या सर्व माणसांवर दिसतात. याचा अर्थ एक मिरची जर जाळली तर त्याचा परिणाम सार्वजनिक स्वरूपात दिसतो, आणि चावण्यापेक्षा जहाल रूपात दिसतो. हा आहे धुराचा सूक्ष्म परिणाम. त्रिफळा किंवा हळदी सारखे प्रमेहावर काम करणारे औषध, दोन चिमूट प्रमाणात जर निखाऱ्यावर धुपाप्रमाणे घालून रोज सकाळी सायंकाळी घरात सर्वत्र फिरवले तर ? ....

    तर निर्माण होणारा धूर प्रमेहातील क्लेद म्हणजे चिकटपणा कमी करायला मदत करतो, असा अनुभव घेतला आहे. आपणही असा प्रयोग करायला हरकत नाही. अपाय नक्कीच नाही.

    आपल्याकडे सायंकाळी मीठ मोहोरीची दृष्ट काढण्याची पद्धत आहे. ती या चिकित्सेतीलच एक भाग आहे. हा "मिनी होम" झाला. सायंकाळच्या वेळी घरात प्रवेश करणाऱ्या वाईट शक्तींना, जीवजंतुंना, अटकाव करण्यासाठी हा धूर मदत करणार नाही का ?

    ज्यांना या शक्तींचे अस्तित्व मान्य नाही, त्यांनी देखील असा धूर घरात रोज सकाळ संध्याकाळ करावा. त्यांचे विचार शुद्ध व्हायला वेळ लागणार नाही.

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    14.06.2017

      June 14, 2017


  • आहारातील बदल भाग ४२ – चवदार आहार -भाग ३

    आंबट आणि तिखट या मिश्र चवीचा एक पदार्थ म्हणजे लोणचे.

    पानातील डाव्या बाजूला वाढलेल्या लोणच्याला डाव्या बाजूचा राजा म्हटलं तरी चालेल, एवढा मान या लोणच्याला भारतीय जेवणाच्या दुनियेत आहे. आणि पानामधे स्थान पण अगदी वर. राजाचेच.

    भारतीय म्हणण्याचे कारण, हा अस्सल भारतीय प्रकार आहे. कारण त्यात वापरले जाणारे मसाले, हे मूलतः भारतातीलच आहेत.
    एकेकाळी भारत हाच सर्व जगाला मसाले पुरवित होता. भारताचा इतर देशात असलेला व्यापार हा मसाल्याच्या पदार्थामुळे दरवळत होता. काही परदेशी नागरीकांना तर भारतातील मसाले देणारी झाडं ही जादूची झाडं वाटंत.

    काय कमाल आहे ना ईश्वराची, एकाच जमिनीमधे आंबट चिंचेचे झाड, तुरट सुपारीचे झाड, या हलणाऱ्या डुलणाऱ्या सुपारीच्या झाडाला, जणुकाही ते वाऱ्याने पडू नये म्हणून, घट्ट बिलगून राहिलेली तिखी मिरीची वेल. या पोफळीच्या सावलीत, मातीला अगदी कुशीत वाढणारी मंद वासाची वेलची, कळीरूपातच वापरली जाणारी लवंगाची मध्यम आकाराची झाडे, तर काहीसे मोठे होणारे आणि एकाच झाडाच्या सालीतून मिळणारी दालचिनी आणि पानातून मिळणारे तमालपत्रे, असे दोन वेगळे फ्लेवर देणारे दालचिनीचे झाड. फळ फोडून आतला सुवास देणारे जायफळ, आणि भूगर्भातच तयार होणारी काहीशी कडवट चवीची पिवळी धम्मक हळद,

    हे सर्व वेगवेगळ्या वासाचे, वेगवेगळ्या रंगाचे, चवीचे पदार्थ, एकाच पाण्यावर पोसले जातात. पण, कडु तिखट आणि तुरट ( कटु तिक्त कषाय ) या वेगवेगळ्या औषधी गुणांनी भरलेले
    (असतात. (एकही मसाला, मधुर अम्ल लवण रसाचा नाही.)
    माती, पाणी, सूर्यप्रकाश हवा एकच असते, पण विविधता किती दिसते. खरंच गाॅड इज ग्रेट !

    या लोणच्यात हिंगासारखे काही पाश्चात्य मसालेपण येऊन बसलेत. पण या विविधतेला एका बरणीत सामावून घेणारे हे भारतीय लोणचे.

    हळद, मेथी, हिंग, मीठ, मिरची, मोहोरी, तेल हा मुख्य मसाला, काही फोडींना लावला की झाले लोणचे तयार. पण ते टिकाऊ होण्यासाठी, बाहेरचा जंतुसंसर्ग टाळला जावा, यासाठी सर्व फोडी बुडतील एवढे तेल आणि त्यांना सर्व बाजूनी दाबून टाकणारा एक गोल दगड, आणि चिनी मातीच्या, फिरकीच्या झाकणाच्या बरणीत दादरा बांधून, आमच्या देवघरात वर ठेवलेली लोणच्याची बरणी, माझ्या अजूनही लक्षात आहे.

    हे लोणचे त्यातील या वेगवेगळ्या मसाल्यामुळे एवढे औषधी बनले आहे, की ते औषध म्हणूनच पानात वाढून घ्यावे, एवढेच त्याचे प्रमाण. डाव्या बाजुचा पदार्थ तिथेच रहावा, तो उजव्या बाजूला आला की साईडइफेक्ट सुरू.

    मग ते लोणचे कैरीचे असूदेत नाहीतर लिंबू मिरचीचे. नाहीतर गाजरा कारल्याचे ! औषधी गुण जवळपास तेच. फोडींनुसार बदलणारे. पण मसाला तोच.

    काही लक्षात येतंय का ?

    हा सर्व मसाला म्हणजे मधुमेहावरील औषधांचे मिश्रणच आहे. आणि फोडी जर आवळ्याच्या किंवा ओल्या हळदीच्या असतील तर ???

    जैसे घी मे शक्कर.

    इन दोनोंका आजके जमाने मे दिखनेवाला साईड इफेक्ट, याने कोलेस्टेरॉल और डायबेटीस.
    दोनों के उपर काम करनेवाली एकही दवा !
    पिकल, लोणचे, अचार माझ्या पानात हवा.!!

    पण....
    हे अचार बाजारी नको. आणि आचारी सुद्धा !
    बाजारी लोणच्यात चार दोष दिसतात.
    एक कृत्रिम रंग, दोन हानीकारक प्रिझर्वेटीव, तीन सरकीचे तेल, आणि चार, व्हिनीगर मधे बुडवून ठेवलेल्या फोडी. हे दोष टाळण्यासाठी आणि औषधी फायदे मिळवण्यासाठी उपाय एकच,
    हे लोणचे घरीच घातलेले हवे. आईच्या किंवा आज्जीच्या हातचे.

    पण घरात वेळ मोडून करणार कोण ?
    इथेच तर लोणच्याचा लोच्या आहे ना !

    वैद्य सुविनय दामले
    कुडाळ, सिंधुदुर्ग
    9673938021
    03.11.2016

      November 3, 2016


  • इंद्रिये, अवयव आणि आहार – भाग दोन

    प्रत्यक्ष इंद्रिय पचनाला ताटातच सुरवात होते. आपल्या हातानी, बोटांनी आपण आहार जेवायला सुरवात करतो. म्हणजे त्या अन्नाचा स्पर्श आपण अनुभवतो. एखादा पदार्थ गरम, गार, कोमट, कडक, मऊ, त्याचा घट्टपणा, पातळपणा हे आपण बोटांमार्फत अनुभवतो.

    सुरी काट्या चमच्याने जेवत हा अनुभव घेता येईल का ? नाही.
    आणि हातपाय पाण्याने धुवुन जेवायला बसावं हे ओघाने आलंच.
    आणि नखं सुद्धा कापलेलीच असावीत, हे पण गृहीत धरलेले असते. नाहीतर नखातील घाण जेवताना पोटात जाते, त्याने पोट दुखते, हे इयत्ता दुसरी अ मधे आपण शिकलेलो आहोतच !

    हेच भारतीयत्व !

    बाळाला भरवताना सुद्धा चमचा वापरू नये. बाळाला सुद्धा या ज्ञानेंद्रियांचा अनुभव घेऊ देत ना ! घास किती गरम आहे हे आईच्या हाताला सुद्धा समजलं पाहिजे. नाहीतर घाई घाईत चमच्याने जर त्या बाळाला काही गरम भरवलं तर बाळाचं काही खरं नाही. जमाना जरी चमच्यांचाअसला तरी "हात" असताना, वेगळ्या चमच्यांची काय गरज ?

    भात किती मुरडला पाहिजे, ते चमच्यापेक्षा बोटानाच कळेल ना. आता चायनीज राईस बाहेर मुरडायचा नसतो, हे मॅनर्स समजल्यानंतर चाजनीज राईस खायला चमचा ठीक आहे. पण नूडल्सना मात्र स्टीकच लागणार.

    कोकणातल्या ताज्या शेवया खाताना हाताच्या पाची बोटांचा युक्तीने वापर करता यायलाच हवा. शेवया नारळाच्या रसात बुडवून अंगावर न सांडता, सर्व शेवया बाहेर न लोंबता, थेट तोंडात घालवण्याची ती मजा स्टीकने खाण्यात नाही.

    दक्षिण भारतीय लोक इडली सांबार खाताना सुद्धा काटे चमचे वापरत नाहीत. इडली हातानी कुस्करून, सांबारात बुचकळून, भुरके मारत खातात.

    पंजाबी लोकांना पराठा कधी चमच्याने खाताना बघितलंय ? दोन्ही हातानी धरून त्याला उभा आडवा फाडून दह्यात बुडवूनच खातात.

    शेवग्याची शेंग चमच्याने कशी खाणार ? तर्जनी आणि करंगळी मधे उभी धरून थम्स अप करीत, सगळा गर अंगठ्यावर कोरून कोरूनच खायचा, त्यापेक्षा तो शेंगेचा तुकडाच तोंडात कोंबायचा आणि त्या तुकड्याचे पार रसग्रहण करून चोथा चिपाड करूनच बाहेर काढायचा, हा शेंग खाण्याचा उत्तम प्रकार.

    आमरसात पुरी बुडवताना तिच्या दोन बाजू तर्जनी आणि अंगठ्यात पकडून पुरीला आमरसाच्या वाटीत अशी आंघोळ घालून बाहेर काढावी की जशी विहिरीत कळशी.

    समोसा, वडापाव खाताना काय चमच्याने खायचा ? मस्त दोन्ही हातांनी धरून जणुकाही माऊथ ऑर्गन वाजवतो आहोत, असा भास दुसऱ्याला होईल अशा शिस्तीत राहूनच वडापाव खाल्ला पाहिजे.

    आहारीय पदार्थ पचवण्यासाठी तो तोंडात जाण्याआधी ताटातच पचवून घ्यायला सुरवात झालेली असते, हे समजलं म्हणजे झालं.

    जो पदार्थ जसा खायचा तसा खाल्ला तरच त्यातून इंद्रियाना आनंद मिळतो, नाहीतर करकोच्याला ताटलीतून आणि कोल्ह्याला बाटलीतून खीर "सर्व्ह" केल्यासारखं होईल.

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग. 9673938021
    17.03.2017

      March 17, 2017