आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-क्रमांक अकरा
जे जे देवासाठी ते ते देहासाठी-भाग 5
जसा संकल्प, जसे आवाहन तसे फळ हा नियम लक्षात ठेवावा. जसा योग करताना मनाला शरीराशी जोडणे महत्त्वाचे असते, तसे पूजा करताना मन, इंद्रिय आणि शरीर आत्म्याशी जोडले जाणे महत्त्वाचे आहे. अन्यथा ते फक्त एक कर्मकांड होईल.
पूजा करतानाचा भाव महत्त्वाचा ! मनात तो निर्माण करावा लागतो, भटजी मंत्र म्हणत आहेत, आणि यजमान मोबाईलवर बोलत आहेत, यजमानीण आपली नथ नीट करत आहे, अशावेळी झालेला संकल्प आणि आवाहन कोणाला हितकारक होईल ? जर पुरोहितांनी मनापासून मंत्र म्हटलेले असतील तर, त्यांना नक्कीच होईल. यासाठी आपले पूर्ण लक्ष आपण करत असलेल्या कार्यावरच असावे.
जसे एखाद्या आस्थापनामधे कोणी काम करत असेल, जर ते मनापासून केले गेले तरच त्यापासून आनंद निर्माण होईल, नाहीतर नुसते पाट्या टाकणे होईल. कामातला हा फरक लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. मी ही करत असलेली कृती, पैसे मिळवण्यासाठी करत आहे, की कोणीतरी सांगितलेले काम म्हणून करत आहे, की या कृतीतून पूर्ण आनंद आणि समाधान मिळवण्यासाठी करत आहे, यातील हेतुनुसार फळ बदलत जाते.
तसेच मी जगतो आहे ते ईश्वराला प्राप्त करून घेण्यासाठी की, टीचभर पोटाची खळगी भरण्यासाठी की, मरण येत नाही म्हणून जगतोय ? जगण्यासाठीचा उद्देश, संकल्प जसा असेल, तसे समाधान मिळत जाते. हेतू बदलला की जगणे ही धडपड वाटत नाही.
जशी देवपूजा, तशी देह पूजा
जसे देवाला स्नान घालताना मनात अत्यंत सात्त्विक भाव असतो तोच भाव आपण देहाला स्नान घडवताना जर निर्माण केला तरच ते स्नान घडते, नाहीतर नुसते आंघोळीचे कर्मकांड होते. हा देह त्याने दिलेला आहे, काहीतरी उद्दिष्ट ठेवून, त्याने मला जन्माला घातले आहे, आई बाबांना निमित्त बनवून त्याने मला जगवले आहे, इतरांना जे जमणारे नाही, असे एखादे कार्य त्याला माझ्याकडून घडवून घ्यायचे आहे, यासाठी, त्याने दिलेल्या वेळेत ( म्हणजे शंभर वर्षात ) ते कार्य जाणून घेऊन, त्यासाठी सतत प्रयत्नशील राहणे, यालाच जीवन ऐसे नाव.
आपण केलेले प्रत्येक कार्य त्यालाच अर्पण करायचे असते, तुझे तुलाच अर्पण ! म्हणूनच तर पूजा संपल्यावर आपण म्हणतो, "श्रीकृष्णार्पणमस्तु " ! प्रत्येक म्हणजे हे सर्व कार्य भगवंताच्या इच्छेने मी करत आहे, त्याचे मिळणारे सर्व फळ मी त्याला देत आहे. त्यानंतर तो जे काही मला परत देईल, त्यात मी संतुष्ट होणार आहे. हा भाव देवपूजा पूर्ण होईपर्यंत असावा.
एखादा मॅनेजर आपल्या हाताखालच्या कामगारांकडून जे काम करवून घेतो, ते आपल्या मालकासाठी. स्वतःसाठी नाही. तसंच आहे. ड्यूटी संपली की सर्व अहवाल मालकाकडे सुपुर्द करून ठरलेला पगार घेऊन आनंदाने घरी जातो.
बारावीला प्रवेश घेतला, वर्षभर अभ्यास केला, त्याचा निकाल हाती आला, हे माझ्या कर्मानुसार मिळणारे फळ असते, ते त्याला अर्पण केले की निराशा येत नाही, आणि 'मी मार्क्स मिळवले,' हा अभिनिवेश पण उत्पन्न होणार नाही. भगवंत गीतेमधे हेच सांगतात, तू तुझे कर्म करीत रहा, फळाची अपेक्षा ठेवू नकोस, तुला तुझे फळ मी नक्की देणार आहे.
संकल्पानुसार कार्य करत राहिले की शेवटच्या क्षणी रडायची वेळ येत नाही. यासाठी जीवनात नेहेमी आनंदाने जगण्याचा संकल्प महत्त्वाचा !
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
30.05.2017
May 30, 2017
आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-क्रमांक अकरा
जे जे देवासाठी ते ते देहासाठी-भाग 32
नैवेद्यम् समर्पयामी-भाग सहा
देवासाठी पान वाढले. देवासमोर ठेवले. पान बाजूला सरकवून पानाखाली पाण्याने एक मंडल (भरीव वर्तुळाकार जागा ) काढले. पुनः मंडल काढलेल्या जागेवर पान सरकवून ठेवले. आता पान पुनः हलवायचे नाही. वाढलेल्या पानाला स्थिर करून घेतले. आता जेवून पूर्ण होईपर्यंत आसन सोडायचे नाही किंवा पान सोडायचे नाही. हा दंडक.
कशासाठी?
वाढलेल्या पानावरून उठून जाणे, हा अन्नदेवतेचा साक्षात अपमान असतो. ( हे समजावणे आस्तिकांसाठी ! नास्तिक उघडपणे देवच मानत नाहीत, त्यांना अन्न ही देवता असते हे पटणारेच नाही. त्यांच्या दृष्टीने अन्न म्हणजे प्रोटीन्स, व्हिटामिन्स, फॅटस आणि कारबोहाड्रेटस ! बाकी अंधश्रद्धा, विषय संपला. )
एकदा वाढलेल्या पानावरून उठल्यानंतर त्या पानावरचा आपला हक्क संपला, आता उरलेले अन्न कृमी किटकांना सोडले.
असे करू नये. आपण वाढलेल्या पानासमोर बसलेलो असताना, आपले लक्ष पूर्णपणे पानावरच असते. ( तसे असावे. ) म्हणजे पानामधे जमिनीवरुन येणारे काही किडामुंगींसारखे किटक, किंवा आकाशमार्गे पानामध्ये उतरु शकणारे कोळ्यासारखे विषारी किटक, अन्नामधे पडू नयेत, ही घेतलेली दक्षता म्हणा हवंतर ! ( हे समजावणे नास्तिकांसाठी ! )
सांगायचं काय तर, कोणत्याही कारणाने एकदा जेवायला सुरवात केली की, पान किंवा आसन हलू नये. एवढा संयम मनावर हवाच. आजकाल तर जेवायला सुरवात केली की, दहा वेळा उठणार. मोबाईल दुसरीकडे राहिला, दरवाज्याची बेल वाजली, बेसिनचा नळ सुरू राहिला, टीव्ही चा रिमोट घ्यायला... अश्या कारणानी जेवत असताना सतरा वेळा उष्ट्या हातानी उठतो. असे मध्येच उठल्यामुळे आपल्या हाताला लागलेले आपले उष्टे दुसऱ्याच्या पानात पडू शकते, किंवा आपल्या अंगाखांद्यावरील सूक्ष्म जीवजंतु, कचरा इकडे तिकडे दुसऱ्याच्या पानातही जाऊ शकतो. ही कृती जंतुसंसर्ग पसरवणारी असते. आणि किती डिसगस्टींग वाटते ना !
अन्न हे कोणत्याही कारणांनी दूषित होऊ नये, यासाठी घेतलेली ही काळजी आहे.
काय चुकीचे सांगितलेले ? आता ज्यांना हे मनुवादी विचार वाटतात, त्यांना खुशाल म्हणू देत. पण जे आरोग्याच्या दृष्टीने योग्य आहे, ते योग्यच आहे. हेच नियम जर एखाद्या मॅकडो ने अथवा डाॅन्कीडोने किंवा नाचोपाचो ने सांगितले असते तर ? डोक्यावर घेऊन नाचले असते. "पण हे आमच्याच भारतीय ग्रंथात सांगितलेले आहे, फक्त आता पुनः एकदा लक्षात आणून देतोय" असे म्हटले तरी काही जणांना ते अन्नाचे "भगवेकरण" वाटेल. कोणाला काय कश्या शंका येतील सांगता येत नाही. अशा शंकासूरांची संख्या हल्ली वाढते आहे. यांच्यापासून सावधान !
बाहेरचा किटक वाढलेल्या पानात येऊ नये म्हणून पानाभोवती देखील पाणी वर्तुळाकार फिरवायचे असते. आणि या किडा मुंगीसाठी, आपण जेवायला सुरवात करण्या अगोदर, अन्न उष्टे करण्यापूर्वी, पाच सहा अन्नाचे कण ताटाबाहेर काढून ठेवायचे. याला काय म्हणायचे ? "भूतदया" म्हणू !
काही महाभाग तर वाढलेले पान जणुकाही कुशीत घेऊन जेवतात ! वाढलेले ताट मांडीवर, अंगावर घेऊन जेवणे ही तर राक्षसी कृती आहे. वाढलेले पान हलवत हलवत फिरत फिरत खाल्ले तर नकळतपणे चंचलपणा निर्माण होतो.
चंचलपणा म्हणजे साक्षात वाताचा प्रकोप. मुलांमधला चंचलपणा, आपल्या विचारातील चंचलपणा, कमी होण्यासाठी, जेवण पूर्ण होईपर्यंत, आपले आसन पृथ्वीला धरून ठेवणारे, दृढ हवे. स्थिर हवे. तरच खाल्लेल्या अन्नाने शरीराची पुष्टी होईल.
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
25.06.2017
June 25, 2017
आपण खातोय त्या पदार्थाचे ज्ञान इंद्रियांना अगोदर होते. शब्द, स्पर्श, रूप, रस गंध या तन्मात्रा द्वारे, पृथ्वी आप तेज वायु आणि आकाश महाभूतांची आहारातील अनुभूती निर्गुण आत्म्यापर्यंत, चंचल मनामार्फत नेली जाते. आणि जी अनुभूती येते तिला "समाधान" म्हणतात. जेवताना हे समाधान मिळाले पाहिजे. नाहीतर "माझ्या श्योन्याला खाल्लेले अंगालाच लागत नाही" अशा तक्रारी सांगणाऱ्या अनेक माता असतात.
खाताना लक्ष अन्य गोष्टीमधे असणे, म्हणजे जसे, टीव्ही पहाणे, मोबाईलवर बोलणे किंवा चॅटींग, गोष्टीचे पुस्तक वाचणे, अभ्यास करत करत जेवणे, वृत्तपत्र वाचणे, वायफळ गप्पागोष्टी करणे, पटत नसलेल्या मुद्द्यांवर जेवताना भांडणे, लक्ष जेवणामधे नसणे, स्वतःच्याच विचारात असणे, किंवा दुसऱ्यांच्या विचारात असणे, लक्ष जेवणात असले तरी जेवणातले दोष दिसणे, आवडीचे पदार्थ अति खाणे, नको असतील त्यांची चव सुद्धा न पहाणे, एकाच पद्धतीचे, एकाच चवीचे जेवण घेणे इ. दोष आहेत, आणि रुग्णाला तपासल्यानंतर अनेक शारीरिक दोष देखील वैद्यांना समजतात. ज्यांचा संबंध खाल्लेले अन्न, अंगाला न लागण्याशी आहे. हे बालक पालकांनी लक्षात ठेवावे. याला म्हणतात, इंद्रियगम्य ज्ञान !
मग कितीही बॅलन्स डाएट द्या, काहीही उपयोग होत नाही.
बदाम अक्रोड हे पदार्थ पचायला जड असतात. ते अशा मुलांनाच द्यावेत, ज्यांना नारळ, शेंगदाणे, तीळ, काजूगर कधी मिळतच नाहीत. आणि ज्यांची भूक खूप जास्ती आहे. नाहीतर हेच पदार्थ पौष्टिक म्हणून कितीही खाल्ले तरी अजीर्ण होण्याशिवाय काही होणार नाही.
काय खातोय यापेक्षा कसं पचवू शकतोय हे जास्त महत्त्वाचे! मनापासून खाल्लं, आनंद निर्माण करत खाल्लं तरच पचते. रडत रडत, ताटातल्या अन्नाला नावे ठेवत, नाक मुरडत, चिडत चिडत, जेवलो तर आतील अवयव आणि इंद्रिये यांचे संतुलन बिघडते.
बाहेरील परिस्थिती जर बिघडलेली असेल तर आत कितीही भूक असेल तरी जेवण जात नाही. भले साग्रसंगीत पंचपक्वान्नाचे ताट समोर आहे, पण बाजूच्याच घरात एका कोणाचा मृत्यु झालाय तर जेवण जाईल ? घरात भांडण सुरू आहे तर जेवण जाईल ? काही रागाने भरलेलं ताट कोणी भिरकावून दिलं तर जेवण जाईल ?
आणि जबरदस्ती करून जेवलात तर ते नीट पचेल असे वाटतेय ?
नुसते अन्न गिळले म्हणजे सर्व धातु तयार होतात असे नाही. म्हणून पालक आणि बीट खाल्ला म्हणजे रक्त वाढेलच असं नाही आणि आवळाज्युस प्याला तर कॅल्शियम वाढेल असंही नाही.
बाहेरील शक्तीपेक्षा, आतली इंद्रियांची ताकद जास्ती काम करणारी असते, हे लक्षात घ्यावे.
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
19.03.2017
March 19, 2017
जायफळ हा भारतीय स्वयंपाकामध्ये वापरला जाणारा मसाल्याचा पदार्थ.
गोडाची खीर असो साखरभात असो जायफळ घातल्या शिवाय त्यांना मजा नाही.गरम मसाला असो कि दिवाळीच केला जाणारा फराळ ह्याच्या हजेरी शिवाय सगळेच फिके. मसाले दूध म्हणू नका की चहाचा मसाला सगळ्यांतच हा हवा.
असे हे सुगंधी जायफळ ह्याचा भला मोठा उंच सुगंधी व्रुक्ष असतो. आणी जायफळ हे त्याचे फळाचे बी.हे चवीला तिखट कडू असे मिश्र चवीचे असते.आणी उष्ण देखील असते.म्हणूनच शरीरातील वात व कफ दोष कमी करते.
चला आता ह्याचे काही औषधी उपयोग पाहूयात.
१)मुरूमांवर दुधात उगाळून ह्याचा लेप लावल्यास मूरुमं कमी होतात व चेहर्यावरचे डाग कमी होतात.
२)वारंवार उल्टया होत असतील तर जायफळ तांदूळाच्या धुवणातून उगाळून त्याचे चाटण द्यावे फायदा होतो.
३)लहान मुलांना पोटात थंडी साठून पातळ संडासला होते तेव्हा गाईच्या तूपामध्ये जायफळ व सुंठ समप्रमाणात उगाळून हे चाटण थोड्या थोड्या वेळाने देत रहावे.
४)पोट फुंगून जुलाब होत असल्यास जायफळ लिंबु रसात उगाळून ते चाटण मध्ये मध्ये चाटावे.
५)शरीरावर कुठल्या ही भागावर सुज आली असून तिथे दुखत असल्यास तिथे जायफळाचा लेप करावा.
जायफळ जर जास्त प्रमाणात सेवन केले तर पोटात आग होते,चक्कर येते,छातीत धडधड होते घूसमटल्यासारखे वाटते.
वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
September 22, 2016
हे जंगली फळ असल्याने ह्याला जंगलची काळी मैना म्हणतात.घनदाट काळ्या झुडपात हि पिकतात साधारणपणे डोंगराळ भागात.करवंदांची फळांच्या पुड्या घेऊन लोक हायवेच्या कडेला किंवा बाजारात बसतात.
करवंदे कच्ची असताना टणक,हिरवी,आंबट तुरट चवीची व उष्ण आणी पित्तकर व वातनाशक असतात.तर पिकलेली करवंदे जांभळी चवीला आंबट गोड व थंड आणी कफपित्त नाशक असतात.कच्ची करवंदे लोणचे करायला वापरतात.
आता आपण ह्याचे घरगुती उपचार पाहूयात:
१)कच्च्या करवंदांचे लोणचे भुक वाढविते,खाल्लेल्या अन्नात पाचक स्त्राव मिसळून त्याचे चांगले पचन करविते.
२)पोटात पित्त वाढून आग होत असल्यास पिकलेली गोड करवंदे खावीत आराम पडतो.
३)गांधीलमाशी किंवा विषारी किडा चावल्यास करवंदे कुचकरून त्याची चटणी दंश झालेल्या भागी चोळावी.
४)पोपटामध्ये वात धरून पोट फुगले व दुंखु लागल्यास मुगाचे कढण करावे व त्यात ५ कच्ची करवंदे व १ मोठा चमचा दही घालून प्यावे फायदा होतो.
५)तोंडास रूची नसणे,तोंड बेचव होणे ह्यात ८-१० करवंदे चावून तोंडात येणारी लाळ थुंकून टाकावा तोंडाची चव सुधारते.
कच्ची करवंदे जास्त खाल्ल्यास पोटात आग होते तर पिकलेली करवंदे जास्त खाल्ल्यास पोट बिघडते.
वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
December 21, 2016
हिला वालपापडी असे देखील म्हटले जाते.संपुर्ण भारतात ही भाजी अत्यंत प्रसिध्द आहे.विशेषत: चायनीज पदार्थ बनवताना हिचा भरपूर वापर केला जातो.तसेच पंजाबी डिशेस मध्ये देखील हि वापरतात.हिची भाजी,उसळ देखील केली जाते.तसेच बिर्याणी,पुलाव ह्याच देखील हि घालतात.
२-३ हात उंचीच्या झाडाला ह्या फरसबीचा शेंगा लागतात.ह्या कोवळ्या शेंगांचा वापर खायला केला जातो.हि भाजी चवीला गोड तुरट असून थंड असते त्यामुळे ती शरीरातील वात दोष वाढविते व कफपित्त हे दोष कमी करते.
चला तर आता हिचे घरगुती उपचार पाहूयात:
१)गजकर्णा मध्ये फरसबीच्या पाल्याचा रस व लसणीचा रस एकत्र करून लावावा.
२)खोल चरणा-या जखमेमध्ये फरसबीच्या पाल्याच्या रसात कापुस बुडवून वात करावी व दर दिवशी अशी नवीन वात त्या जखमेत ठेवावी साधारण पणे ३ आठवड्यात जखम भरते.
३)डोळ्यांची शक्ती वाढवायला इतर उपचारांसह रोज रात्री कोवळ्या फरसबीची भाजी जेवणात ठेवावी.
४)ज्या मधुमेह झालेल्या व्यक्तिच्या लघ्वीतून साखर जात असेल त्याला कोवळ्या फरसबीच्या शेंगा उकडून त्याला हळदींची फोडणी देऊन खायला द्यावी.
फरसबी खायचा अतिरेक केल्यास पोटात दुखणे व संडासला घट्ट होण्याची तक्रार होऊ शकते.
वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
November 27, 2016
जगण्याची साधी सोप्पी तत्वे-भाग एकशे पस्तीस
आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-भाग बारा
निरोगी राहाण्यासाठी काय करावे-भाग एकोणतीस
बाबा सांगतात...
गरीब, रोगी आणि शोकाकुल असणाऱ्यांना यथाशक्ती सहाय्य करावे. इथे यथाशक्ती असा शब्द आला आहे, तो महत्त्वाचा आहे.
यथाशक्ती म्हणजे आपल्याला जे करणे शक्य आहे ते करावे. नियम म्हणून नको. नियम केला की जबरदस्ती आली. सरकारी नियम केला की कायदा झाला आणि भारतात कायदा मोडण्यासाठीच असतो.
असो. तर आप्त मंडळी जे सांगतात, तेच बाबाही सांगताहेत. गरजूंना यथाशक्ती आणि यथायोग्य मदत करावी. ज्याची जशी गरज तशी ती पुरवावी.
काहीवेळा कुणाला पैशाची गरज असते, (आपलं राखून हा विवेक जागृत ठेवत ) परतफेडीची अपेक्षा न ठेवता, जरूर मदत करावी.
काहीवेळा आपली संसाधने गरज म्हणून दुसऱ्याला वापरायला हवी असतात, आपली गाडी हवी असते, आपलं एखादं पुस्तक हवं असतं, आपली गैरसोय होणार नसेल तर जरूर मदत करावी. कारण भविष्यात आपल्याला सुद्धा अशी गरज निर्माण होऊ शकते.
काही वेळा ही गरज श्रमशक्तीची असते. विशेषतः सार्वजनिक क्षेत्रात काम करताना ही श्रमशक्ती जास्त लागते. ती पण द्यावी.
तर काहीवेळा मदत ही धीर देणारी हवी असते. "काही घाबरू नकोस, सगळं ठीक होईल. मी आहे ना गरज लागेल तेव्हा!" या अशा शब्दांची ती गरज असते.
काही वेळा लढण्यासाठी तर काही वेळा रडण्यासाठी सुद्धा एका भक्कम आधाराची गरज पडते.
तर काही वेळा आजच्या भाषेत केवळ "माॅरल सपोर्ट" म्हणून मदत हवी असते. तुझं स्थूलातून किंवा सूक्ष्मातून असलेले अस्तित्वच मला गरजेचं बनतं.
अर्जुन उत्तम योद्धा होता. क्षात्रवीर होता. युद्ध कोणतेही असो, मी एकटा ते जिंकेन याचा विश्वास अर्जुनाला होता. अठरा अक्षौहिणी सेना सोडून, अर्जुनाने फक्त श्रीकृष्णांचे सहाय्य एवढ्यासाठीच घेतले की, जर तू माझ्याबरोबर असशील तर माझे आत्मबल वाढणार आहे. मग मला कसलीच भीती नाही. मी नक्कीच जिंकणार आहे.
आजच्या काळातील कुसुमाग्रजांच्या भाषेत, पाठीवर हात ठेवून, तू फक्त लढ म्हण. या माॅरल सपोर्टची गरज आज वाढली आहे.
मी करतो आहे ते बरोबर आहे की चुक आहे, हे विश्वासानं सांगणाऱ्या आप्त व्यक्ती देखील कमी होत चालल्या आहेत.
हा अनुभव या ज्येष्ठ व्यक्तींकडे असतो.
म्हणून बाबा सांगतात, ते सर्व ऐकलं पाहिजे. असं, आपण बाबा व्हायच्या वयात कळलं, तरी पुष्कळ आहे.
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
02362-223423.
August 24, 2017
लॅबची कमाल, रिपोर्ट ची धमाल भाग 3
लॅबच्या रिपोर्टच्या मागील बाजूला एक वाक्य अजून छापलेले असते.
Individual laboratory investigations are never conclusive, but should be used along with other relevant clinical examinations to achieve final dignosis.
त्याचा भावार्थ असा की, आम्ही दिलेले हे तपासणीचे रिपोर्ट हे कदापि अंतिम निदान असत नाही. रुग्ण जी लक्षणे सांगत असतो, त्यातील लक्षणाबरोबर हा रिपोर्ट अभ्यासून पहावा. आणि त्यानंतरच अंतिम निदान करावे.
याचा दुसरा सरळ अर्थ असा होतो, जिवंत रुग्ण जी लक्षणे सांगतोय ती, निर्जीव यंत्र सांगत असलेल्या रिपोर्टपेक्षा, जास्त महत्वाची असतात. कोणत्याही यंत्रावर पूर्णपणे विसंबून राहू नका. अहो साधा वजन काटाच घ्या ना, चार वजन काट्यावरचे आपलेच वजन वेगवेगळे येते. रेल्वे स्टेशनवरच्या चकाकत्या मशीनमधले वजन वेगळे, बस स्टॅन्ड वरचे वेगळे, रेल्वेच्या ब्रीजवरील एक रूपयातले वजन वेगळे, दवाखान्यातले वेगळे, जीम मधल्या काट्यावरचे वेगळे. असे का होते ? प्रत्येक मशीनमधले हे तांत्रिक दोष असतात. कुणाची स्प्रिंग जुनी असते तर कुणाचा सेल संपत आलेला असतो, कुणाचा बॅलन्स गेलेला असतो, तर कुणाचा पाया पक्का नसतो.
पण वजन करणाऱ्याचं काय ? त्याचं वजन तर बदलत रहातं ना !
यंत्र जेवढं मोठं तेवढी त्यातली गुंतागुंत जास्त.
बरं हे कोण सांगतंय तर, ज्या लॅबमधे आपण तपासणीसाठी जातो, त्या लॅबला असलेली कायदेशीर बंधने सांगत आहेत. जर चुकुन कोणी या दिलेल्या रिपोर्टविरोधात कोर्टात तक्रार वगैरे करायला जाणार असेल तर, त्याचाही काही उपयोग होणार नाही. कारण 'कंडीशन ऑफ रिपोर्टींग'मध्ये आणखी एक वाक्य लिहिलेले असते.
"This medical dignostic report is not valid for medico legal purposes."
आहे ना गंमत ?
आश्चर्य वाटण्यासारखे आणखी एक विधान त्यावर लिहिलेले आढळते...
It is presumed that....
हे गृहीत धरले आहे, (काय? )
The test performed on the specimen belongs to the patients name or identified.
की, हा रिपोर्ट त्याचा आहे, ज्याचे नाव त्या सॅपलच्या बाटलीवर लिहिलेले आहे, ( म्हणजे त्याचेच असावे, असे वाटते. ) नक्की सांगता येणार नाही, की ते रिपोर्ट त्याचेच असतील.
दिलेल्या रिपोर्टमधे एवढी संदिग्धता का ? एवढासुद्धा विश्वास ठेवायचा नाही का ?
मग विश्वास नेमका कोणत्या यंत्रावर ठेवावा ?
समर्थ म्हणतात,
"या शरीरासारखे दुसरे यंत्र नाही"
हे यंत्र ज्याने निर्माण केले, तो परमात्मा
आणि ज्याच्याकडे शरीर, मन इंद्रियांसह, सांभाळायला दिले, तो अंतस्थ आत्मा, यांच्यावरच ना !
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
17.02.2017
February 17, 2017

तुवरकाचे उपयुक्तांग आहे बीज व बीज तेल.हे चवीला तुरट,कडू,तिखट असून उष्ण गुणाचे व हल्के स्निग्ध व तीक्ष्ण असते.तुवरक कफनाशक व वातनाशक आहे.
February 6, 2018
आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे - क्रमांक सहा
पोटात खड्डा पडावा.
सोकपिट सगळ्यांनाच माहिती आहे. सोकपीटचे काम काय असते ? तर आजूबाजूला असलेले पाणी आपोआप ओढून घेणे.
त्यामुळे काय होते ?
आजूबाजूला असलेली ओल कमी होते. तिथे सुकेपणा निर्माण होतो आणि पाणी खड्ड्यात ओढले जाते.
पोट म्हणजे सोकपिट अशी कल्पना करून पाहूया. पोट म्हणजे मुख्य स्रोतस. जिथून सर्व शरीराचे पोषण सुरू होते. आपण जे काही खातो पितो, त्यातूनच हे पोषण होत असते. जे काही खातो पितो, त्यातून पोषण झाल्यावर जो भाग शिल्लक रहातो, त्याला मल असे म्हणतात. जो टाकाऊ असतो. घाम, लघवी, संडास या मुख्य मार्गाने तो काढला जातो.
ही अत्यंत स्वाभाविक प्रक्रिया आहे. पचन पूर्ण होण्यासाठी आपण स्वतः तर काहीच करत नाही. जे काही करायचे तेवढे सर्व शरीरच करत असते. आध्यात्मिक भाषेत हे सर्व ईश्वर करत असतो. आणि वैज्ञानिक भाषेत यालाच "नेचर" असे म्हणतात.
आपला "मीपणा" यामधे आला की पचन बिघडते. आणि आम तयार होतो. या आमाचा स्वभाव चिकटून रहाण्याचा असतो. आणि कोणतीही गोष्ट पाण्याशिवाय चिकटतच नाही. म्हणजे जर या आमातील रस म्हणजे द्रव भाग, कमी केले गेले तर चिकटण्याची प्रक्रिया कमी होत जाईल.
अतिरिक्त पाणी काढण्यासाठी आजूबाजूला जर खड्डा असेल तर हेच पाणी वेगळे करण्याचे काम विनासायास होते. यालाच मी सोकपिट टेक्निक म्हणतो. आता हा खड्डा जर पोटात तयार केला तर ?
खड्डा म्हणजे रिकामी जागा. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण हे पोट भर भर भरत असतो. आतमधे तो जागा असतो, म्हणून खाल्लेल्या अन्नावर प्रक्रिया होत असते. दर दोन तासांनी खा खा खाऊन ही जागा आपण कमी करत जातो. त्याच्या कामावरचा लोड जर आम्ही वाढवला तरच आम तयार होऊन चिकटणार आहे. म्हणून पोट थोडे रिकामे करावे, त्याच्यावरचा लोड कमी करावा, पोटात थोडा खड्डा तयार करावा. म्हणजे "आमातील रस म्हणजे द्रवांश" या खड्ड्यांमधे आपोआपच ओढला जाईल. चिकटणे कमी होईल, उरलेला आम सहजच सुकुन जाईल.
नियम म्हणून हा खड्डा ( सोकपिट ) तयार करून घेतला की, आम नष्ट झालाच म्हणून समजा.
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
02362-223423.
03.05.2017
May 3, 2017
Copyright © 2025 | Marathisrushti