एखादा पुरस्कार एखाद्या प्रेरणेला जन्म देतो. एक यश दुसऱ्या यशाला जन्म देतं. यशाचं शिखर गाठण्यासाठी यशामध्ये सातत्य लागतं.यशाला प्रेरणाच लागतें. भिऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे असं म्हणणार असलं की माणसं निर्दास्तपणे वाटचाल करतात. तू फक्त लढ म्हणणारे सुद्धा थकलेल्या मनाला उभारी देण्यासाठी.
एक कौतुकाची छाप पुरेशी असते आयुष्य बदलवण्यासाठी. पाठीवरचा हात हा प्रेरणाचा हात असतो जो पुढे जाण्याला भाग पाडतो. प्रोत्साहन, कौतुक याशिवाय सृजनाचा इंद्रधनु अवतरत नाही.
लहानपणी मिळालेलं एखादा पदक,प्रमाणपत्र हे कारणीभूत असतं मोठेपणी झाल्यावर जेव्हा पूर्ण कपाट पदकांनी भरत तेंव्हा आपलाच प्रवास आपल्याला अचलित करतो. पुरस्कार आपल्याला जाणीव करून देत असतो जबाबदारीची, पुढील वाटचालीची, यशोशिखराची. असाच एक मानला जाणारा पुरस्कार म्हणजे नोबेल पुरस्कार.
आल्फ्रेड नोबेल यांनीआपली सर्व संपत्ती नातेवाईकांना न देता तीन दशलक्ष डॉलर रक्कम साहित्य, शांती, भोतिक शास्त्र,रसायन शास्त्र आणि वैद्यकशास्त्र या नोबेल पुरस्कारासाठी ठेवली. त्यांनी डायनामाइट मधून आपली ही संपत्ती जरी मिळवली असली तरी त्याचा अर्थ त्यांना हिंसा मान्य होतीअसं नव्हे.
लहानपणी रुजलेल्या मूल्यांचाच मोठेपणी वटवृक्ष होतो. नोबेल यांनी डायनामाइटचा शोध लावला म्हणून पाश्चात युरोप व अमेरिका त्यांचे ऋणी आहेत पर्वतांच्या वेध घेऊन त्यातून रेल्वेचे रस्ते बांधण्यात डायनामाईटने मदत केली. बोगदे बांधण्यासाठी डायनामाईटचा उपयोग झाला. रेल्वेने माणसे जोडली गेली याचा उपयोग कोणी युद्धासाठी केला तर तो दोष वापरणाऱ्यांचा आहे.
दरवर्षी काही विशिष्ट क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना नोबेल पुरस्कार दिला जातो. मदन क्युरी यांना दोनदा नोबेल पारितोषिक मिळाले तर त्यांची मुलगी इरीन हिला तो रसायनशास्त्र या विषयासाठी देण्यात आला. त्यांची दुसरी मुलगी इव्हा ही युनेस्को ची प्रतिनिधी होती तिला सुद्धा हा पुरस्कार प्राप्त झाला.
मानवतेच्या कल्याणाच्या कार्याचे बीज अल्फ्रेड नोबेल यांनी पेरले. आज जगभर विविध कार्यासाठी विविध प्रकारचे पुरस्कार आहेत पण नोबेल हे मात्र कार्याच्या रुपाने हिमालयासारखे समर्थपणे आपल्या आठवणीत आहेत व मानवते विषयीचे प्रेम शांती यांचे प्रतीक बनवून अजारामर झाले आहेत.
नोबेल पुरस्काराचे मानकरी कोणत्याही देशाच्या असू शटतात. गेल्या शंभर वर्षांपूर्वी 799 पुरस्कार देण्यात आले आहेत 1901 सालापासून मी पुरस्कार देण्यास सुरुवात झाली. गांधीजींच्या अहिंसा तत्वावर आधारित एकूण तीन व्यक्तींना शांतीसाठीचा नोबेल पुरस्कार प्रदान करण्यात आला त्या व्यक्ती म्हणजे मार्टिन ल्युथर किंग ज्युनियर नेल्सन मंडेला आणि म्यानमारचे अनुग सॅन स्यू काई.
ज्या लोकांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो त्यांच्याकडे साऱ्या जगातील लोक आदराने पाहतात. संपूर्ण पृथ्वी आपली आहे असा विचार करणारा अल्फ्रेड नोबेल हा पहिला मानव असेल मानव जातीवर प्रेम करणारा हा माणूस खऱ्या अर्थाने आंतरराष्ट्रीय माणूस होता.
896 मध्ये त्यांनी जेव्हा स्वतःचे इलेक्ट्रिक पत्र लिहिले तेव्हा आपण मानव कल्याणकारी अशा एका अत्यंत अभिनव संकल्पनेला जन्म देत आहोत याची त्यांना कल्पना तरी असेल का?” मानव जातीच्या कल्याणासाठी जे काही कार्य करण्यात येईल त्याच्या सन्मान झाला पाहिजे त्याला पुरस्कार दिला पाहिजे जो त्या व्यक्तीला आपण अधिकार लिहिले कार्य पार पडताना कोणतीही आर्थिक अडचण भासणार नाही” असे त्यांनी मृत्युपत्रात नमूद केले होते.
आज जगभर विविध कार्यासाठी विविध प्रकारची पुरस्कार ठेवण्यात आले आहे नोबेल हे मात्र आपल्या कार्याचे रोपाने हिमालयासारखे समर्थपणे आपल्या आठवणीत आहे तो मानवते विषयीचे प्रेम व शांती याचे प्रतीक बनून अजरामर झाले आहेत.
