भूजलप्रदूषण, मातीप्रदूषण, औष्णिक प्रदूषण, आण्विक प्रदूषण या प्रत्येकासाठी स्वतंत्र अशा प्रकरणांत सविस्तर, सखोल, उद्बोधक व उपयुक्त माहिती दिली आहे. सध्या सर्व जगाला भेडसावणाऱ्या जागतिक तापमान वाढीच्या समस्येवर आणि आम्लपर्जन्यावर पुस्तकात लिहितांना लेखकांनी या विषयांना योग्य तो न्याय दिला आहे. प्रदूषणातून पर्यावरणाकडे : प्रा. डॉ. किशोर पवार, प्रा. सौ. नलिनी पवार नचिकेत प्रकाशन : पाने : १६०, किंमत :१६०/- रू. 24 योगक्षेम ले-आऊट, स्नेहनगर, वर्धा रोड, नागपूर-15, भ्र. 9225210130
September 29, 2012
गौरवशाली प्रगत संशोधन करणारे भारतीय वैज्ञानिक अनेक शतके भारत विविध आक्रमणांना तोंड देत राहिल्याने या देशात औद्योगिक प्रगतीसाठी आवश्यक असलेली स्थिरता आणि शांतता नव्हती. सतत लढाया, अशांतता होती. यामुळे मधल्या काळात येथे संशोधनासाठी पूरक वातावरण निर्माण होऊ शकले नाही. मात्र तरीही वैदिक काळात व नंतरही भारतात विविध विषयांवर संशोधन झाले होते. त्याकाळी व त्यानतर भारताने संशोधन क्षेत्रात केलेल्या गौरवशाली प्रगतीची ओळख करून देणारे काही साहित्य जाणीवपूर्वक प्रकाशित होत असते. नचिकेत प्रकाशनाने प्रसिद्ध केलेले डॉ. मधुकर आपटे यांचे ङ्गभारतीय वैज्ञानिकङ्घ हे पुस्तक अशाच प्रकारातील आहे.
या पुस्तकाबाबत उल्लेखनीय बाब म्हणजे जुन्या काळात झालेल्या वैज्ञानिक प्रगतीची माहिती मोघम व अस्पष्ट नसून थोडक्यात पण अतिशय मुद्देसूद आहे.
उदाहरणार्थ- ङ्गप्राचीन भारतीय खगोलविद आर्यभट्टङ्ख मध्ये आर्यभट्टांनी पृथ्वीचा परिध मोजण्याबाबत व पृथ्वीवरील नाक्षत्र दिनाचा (डळवशीशरश्र ऊरू) काळ काढण्याबाबत केलेल्या संशोधनाची माहिती देताना नमूद केले आहे की-
ङ्गआर्यभट्टांनी पृथ्वीचा परिध मोजण्याची पद्धत सांगून पृथ्वीचा परिध 24,835 मैल असल्याचे सांगितले. हा आकडा आधुनिक पद्धतीने पृथ्वीचा परिध काढून सर्वत्र मान्यताप्राप्त पृथ्वीच्या परिघापेक्षा (24,902 मैल) फक्त 0.2 टक्के कमी आहे.
आर्यभट्टांनी त्यांच्या गणिताने पृथ्वीवरील नाक्षत्र दिनाचा काळ 23 तास 56 मिनिटे 4.1 सेकंद ठरविला होता. त्याचा आधुनिक काळ 23 तास 56 मिनिटे 4.01 असल्याचे पाहून आर्यभट्टांच्या गणितातील अचूकता जाणवते. तसेच त्यांनी ठरविलेल्या नाक्षत्र वर्षाच्या काळात सध्याच्या मान्यताप्राप्त काळाच्या तुलनेत फक्त 3 मिनिटे 20 सेकंदाची चूक दिसते.
ख्रिस्तपूर्व सहाव्या शतकात होऊन गेलेला प्रसिद्ध शल्यविशारद सुश्रुत यांच्याबाबतच्या माहितीत म्हटले आहे की, त्यांच्या ङ्गसुश्रुत संहिताङ्ख या संस्कृत ग्रंथात 184 प्रकरणे असून त्यात 1120 आजारांची वर्णने आहेत. यात 120 प्रकरणात शस्त्रक्रियेची सविस्तर माहिती, इतर 64 प्रकरणात औषधांची माहिती आहे. तसेच औषधात वापरल्या जाणाऱ्या 700 वनस्पती, 64 खनिज आणि 57 प्राण्यांचीही सविस्तर माहिती आहे.
शस्त्रक्रियेचे आठ प्रकार, पट्टीबंधनाचे (इरपवरसशी) चौदा प्रकार आणि शस्त्रक्रियेच्या शंभराहून जास्त उपकरणांचे वर्णनही "सुश्रुत संहितेत आहे."
पुस्तकातील सर्वच लिखाण असेच शास्त्र व आधार यांना धरून लिहिलेले आहे. या पुस्तकात खगोल शास्त्रज्ञ आर्यभट्ट, वैद्यक शास्त्राचे सुश्रुत यांच्याशिवाय चरक, नागार्जुन, अणुसंकल्पनेचे जनक कणाद, गणितज्ज्ञ भास्काराचार्य या प्राचीन काळातील संशोधकांसोबतच आधुनिक काळात विविध क्षेत्रात संशोधक म्हणून मान्यताप्राप्त भारतीय संशोधक डॉ. जगदीशचंद्र बोस, सर सी. व्ही. रमण, श्रीनिवास रामानुजम, होमी भाभा, डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम, डॉ. रघुनाथ माशेलकर, डॉ. विजय भटकर, डॉ. जयंत नारळीकर अशा एकूण 25 संशोधकांचे जीवन आणि कार्य याबद्दल सखोल, सविस्तर व सचित्र माहिती आहे.
पुस्तकाची भाषा गोष्ट सांगण्यासारखी सोपी आणि सहज समजणारी आहे.
नचिकेत प्रकाशनाची अंतरबाह्य दर्जेदार निर्मिती आहे. मुखपृष्ठही कल्पक व आकर्षक झाले आहे. नव्या पिढीला वाचनाची सवय लागावी असा विचार गेल्या काही वर्षात जोर धरू लागला आहे. त्यात मुलांना वाढदिवस, मौंज किंवा सत्कार प्रसंगी पुस्तके भेट देण्याची प्रथा सुरू झाली आहे. त्या भेट देण्याच्या पुस्तकांमध्ये ङ्गभारतीय वैज्ञानिकङ्घचा समावेश आवर्जून करायला हवा. उत्तम पुस्तकनिर्मितीसाठी लेखक व प्रकाशक दोघाचेही अभिनंदन.
नचिकेत प्रकाशन, नागपूर. 1 विकास कुळकर्णी
(पृ. 112 / किंमत 100 रुपये)
September 29, 2012
अमृता खंडेराव यांचं हे कथासंग्रह म्हणजे विदर्भाच्या मातीतून उगम पावलेलं, चुलीवर शिजवलेलं आणि बोलीभाषेच्या फोडणीने झणझणीत झालेलं साहित्यिक जेवण आहे. हे पुस्तक वाचताना वाटतं, आपण एखाद्या खेड्यातल्या अंगणात बसलो आहोत, समोर चुलीवर भाकरी भाजतेय, आणि आजूबाजूच्या बायका आपापल्या कहाण्या सांगतायत—कधी हसवणाऱ्या, कधी डोळ्यांत पाणी आणणाऱ्या, पण नेहमीच मनात घर करणाऱ्या.
July 16, 2026
अलीकडील काळात फादर्स डे साजरा केला जातो ते मुलांच्या भावविश्वात पित्याचे स्थान मात्र तेवढीच महत्त्वपूर्ण असते म्हणूनच आई हा विषय घेऊन मराठीत जेवण साहित्य निर्माण झाले तेवढ्या प्रमाणात वडिलांवर झालेले नाही मात्र वडिलांवर जे काही लिहिले गेले त्याची खूप प्रशंसा झाली दुर्लक्षिलेल्या बाप या नात्याचे कंगोरे शिरीष पै नरेंद्र जाधव सुधा मूर्ती आदींनी उलगडले आहेत
October 31, 2023
संस्थेत कर्मचारी रुजू होण्यापासून निवृत्त होईपर्यंत सर्व टप्प्यावरील धोरणे आणि संबंधित नियम यांचे संपूर्ण मार्गदर्शन. सेवक रचना सेवकांची जबाबदारी व उत्तरदायित्व सेवक भरती, सेवक पदोन्नती, सेवक बदली, सेवक रजा नियम, सेवक शिस्त नियम, सेवकांचे गोपनीय अहवाल, सेवकांना द्यावयाचे आर्थिक लाभ, सेवकांसाठीचे कायदे, सेवक संघटना, सेवकांचा व्यवस्थापनात सहभाग या सर्व विषयांवरील तपशीलवार चर्चा खाली केलेली आहे पाने :156, किंमत : 250
September 29, 2012
मधु मंगेश कर्णिकांच्या लेखणीतून तब्बल १२ वर्षानंतर लिहिली गेलेली कादंबरी. इंग्रजांना ब्रह्मदेशचा राजा थिबा याला रत्नागिरीला आणून स्थानबध्द केलं. राजाचा मोठा डामडौल होता. राण्यांवर तो खूप खर्च करावयाचा. आपल्या राहणीमानाला पूरक व्हावं म्हणून त्याने पोत्यांमधून जडजवाहिर बोटीत बसायच्या आधी टाकून घेतलं होतं. रत्नागिरीला आल्यावर जवळचे जडजवाहिर विकून ते आपला थाट करीत होते. रत्नागिरीला त्यांच्यासाठी 'थिबा पॅलेस' बांधण्यात आला. घरातील अंतर्गत बाबींचा यात अंतर्भाव केलेला आहे.
राजा थिबा
लेखक : मधु मंगेश कर्णिक
प्रकाशक : अनघा प्रकाशन, ठाणे पूर्व
मूल्य : १३०/- रुपये
पाने : १२८
October 17, 2016
चमत्कार रहस्य यांची सरमिसळ असले या असलेल्या या संदीप दांडेकर यांच्या कथा आहेत एकूण तेरा कथांचा हा संग्रह अतर्क्य मांडून वाचकांची भयकथा नची भूक भागवतो मात्र या कथा लिहिताना लेखकाने विज्ञान मानसशास्त्र इतिहासाचा अभ्यास केला आहे.
February 27, 2024
प्रत्यक्ष मृत्यूवर विजय मिळवून मृत्युंजय ठरलेले मार्कंडेय ऋषी. पदमशाली समाजाचे दैवत आहे. त्यांचे जीवन व कार्य, देशभरातील त्यांची स्थाने, मंदिरे, यात्रा आदीबद्दल प्रथमच सर्वंकष माहिती एकत्र ओघवत्या भाषेत लिहिली आहे.
June 17, 2014
मराठीसृष्टी या आघाडीच्या आणि लोकप्रिय मराठी वेबपोर्टलवर ब्रिगेडिअर हेमंत महाजन हे गेली अनेक वर्षे “राष्ट्रीय सुरक्षा” या विषयावर नियमितपणे लेखन करत आहेत. हे लेख अल्पावधीतच आमच्या हजारो वाचकांच्या पसंतीला उतरले असून अतिशय लोकप्रिय झाले आहेत.
“भारताची सुरक्षा” हा विषय नेहमीच लोकांच्या जिव्हाळ्याचा राहिला असून २६/११ च्या हल्ल्यांनंतर तर तो मोठ्या प्रमाणात नागरिकांच्या चिंतेचा विषयही झाला आहे. `आव्हान भारताच्या अंतर्गत सुरक्षेचे` या इ-पुस्तकात भारताच्या “अंतर्गत सुरक्षे”शी संबंधित लेखांचे संकलन करुन ते वाचकांपर्यंत आणले आहे. ब्रिगेडिअर हेमंत महाजन यांनी हा विषय अतिशय सोप्या पद्धतीने समजावून सांगितला आहे.
स्वत: युद्धभूमीवर शत्रूचा सामना केल्यामुळे त्यांच्या लिखाणात सुरक्षेविषयीची कळकळ आणि ढोंगी राजकारणाबद्दलची चिड जाणवते. त्यांचे लिखाण अत्यंत मोकळेपणाने आणि कोणतीही भीड न ठेवता केलेले असते. त्यामुळेच ते वाचकांना भावते. वातानुकुलित केबीनमध्ये बसून पत्रकारिता करणार्या किंवा दूरदर्शन चॅनेलवर भडकाऊ चर्चा करणार्या पत्रकार आणि नेत्यांपेक्षा प्रत्यक्ष सीमारेषेवर जवानांचे नेतृत्त्व केलेल्या एका सेनाधिकार्याने सत्ताधार्यांना सुनावलेले खडे बोलही वाचकाला आपलेसे वाटतात.
या पुस्तकातील लेखांची यादी पुढील पानांवर :
या पुस्तकातील लेख :
January 25, 2016
मानवी प्रतिभेचे उत्तुंग शिखर असणारे महर्षी भृगू यांनी जीवनाच्या आणि ज्ञानाच्या नानाविध शाखांमध्ये आश्चर्यकारक, अतुलनीय व मूलभूत काम केले आहे. अनेक ज्ञाती समाजाचे ते मूळ पुरूष आहेत. महर्षी भृगु
September 29, 2012
Copyright © 2025 | Marathisrushti