नागरी बॅंका/पतसंस्था किंवा कोणत्याही संस्थेतील सी.ई.ओ.- मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजे व्यवस्थापनातील वजिराचे प्यादे असते. .ई.ओ ची भूमिका यशस्वीरीत्या निभावणे म्हणजे तारेवरची कसरत असते. ही भूमिका त्याला प्रभावी रीत्या निभाविता यावी, यासाठी त्याची नेमकी बाबदारी काय? भूमिका कार्य? र्यादा काय? यांचे सांगोपांग विवेचन व मार्गदर्शन शाखा व्यवस्थापन या लोकप्रिय व दुसरी आवृत्ती निघालेल्या पुस्तकाचे लेखक व नागरी बॅंकांचा प्रदीर्घ अनुभव सणारे डॉ. माधव गोगटे यांनी या पुस्तकातून केले आहे.नचिकेत प्रकाशन पाने : १४४ किंमत : २५० रु.
September 29, 2012
पु. ना. गाडगीळ आणि कंपनी या पुण्यातल्या सराफी पेढीचे आधारस्तंभ, नव्वदीतही तरुणाईला लाजविणारा उत्साह अंगी असणारे अनंत गणेश ऊर्फ दाजीकाका गाडगीळ यांना वाहिलेला मानाचा मुजरा म्हणजे `सुवर्णमुद्रा.’ दाजीकाकांचे नातू सौरभ गाडगीळ यांच्या आग्रहातून तयार झालेल्या उत्कर्ष प्रकाशनच्या या देखण्या पुस्तकाला शब्दसाज चढविला आहे, सहजसुंदर भाषाशैली असलेल्या मंगला गोडबोले यांनी.
August 29, 2010
आपला प्रत्येकाचा दुकानांशी जवळ जवळ रोज संबंध येतो. पण दुकानदारीच्या जगाबद्दल आपल्याला काहीच माहित नसते. लहान मोठे दुकानदार त्यांच्या दुकानदारीच्या विविध तऱ्हा, त्यांचे अनंत प्रश्न, अर्थव्यवस्थेत रिटेल दुकानदारीचे स्थान, महत्व, व्यवसायाचे विविध पैलू यावर सांगोपांग विवेचन करणारे मराठीतील पहिले व एकमेव पुस्तक. विलास कुळकर्णी पाने : १५८, किंमत : १६० रु.
September 29, 2012
वाचाल तर वाचाल, असे आपण नेहमी ऐकतो. या उक्तीची कृती करण्याची कशी गरज आहे, हे या पुस्तकावरून समजते. लेखक सतीश पोरे यांच्या या पुस्तकातील एकूण ९ भागांतून वाचन संस्कृतीचा वेध घेतला आहे.
October 1, 2023
वडिलोपार्जीत स्थावर मालमत्ता, शेती, जागा, किंवा पै पै जमवून मिळवलेली मालमत्तेची नोंदणी कायद्यानुसार योग्यवेळी होणे आवश्यक असते. तसे न झाल्यास त्यासंबधी उद्भवणाऱ्या वादांना सामोरे जाऊन कोर्ट प्रकरणे करावी लागतात. हे टाळण्यासाठी याविषयीच्या कायद्याची प्राथमिक माहिती घेणे आवश्यक आहे.
February 28, 2024
लेखक मनोहर महादेव भोसले यांनी स्वतः च्या मनोगतामध्ये आजच्या काळातील स्त्रियांच्या बदलत्या विचार सरणीला स्पर्श केला आहे. लग्नामध्ये किंवा लग्न झाल्यावर अनेक वस्तूंच्या किंवा आर्थिक गोष्टी बद्दल एकमेकांचे वाद विवाद असतात. परंतु लेखकाने अनुभवलेल्या एका प्रसंगांमध्ये स्त्रीचे मत स्पष्टपणे आणि योग्य ठिकाणी मांडणे कितपत आवश्यक आहे याची सर्वांना नक्कीच कल्पना येईल. आजच्या या २१व्या युगातील महिलांमधील शारीरिक, मानसिक, भावनिक वैचारिक बदला बद्दलची ही लघुनाटिका आहे.
भारतीय संस्कृतीमध्ये स्त्री आणि पुरुष या दोघांनाही समान मानले जाते परंतु काही धार्मिक पंडित म्हणवून घेणा-या व्यक्तीच्या मूळे लिंगभेद निर्माण केला जात आहे. त्याचा परिणाम संपूर्ण मानव जातीवर होतो आहे लिंगभेदामुळे अनेक नवनवीन वाद विवाद होत आहेत. पुरुषांना सर्व बाबतीत मुक्तता असते परंतु स्त्रीयांवर अनेक प्रकारची बंधने घातली जातात. भारतीय संस्कृती हि पुरुष प्रधान मनाली जाते परंतु कोणताही पुरुष हा स्त्री शिवाय अपूर्णच आहे.
वंश आणि अंश या लघुनाटिकेमध्ये लेखकाने एका काल्पनिक विवाहात स्त्री पुरुषामध्ये लिंगभेदामुळे घटस्फोट घेण्यासाठी ते कोर्टामध्ये जातात. त्या दोघांनाही घटस्फोट हवा असतो परंतु त्यांना तीन मुली असतात त्या मुलींच्या जोपासनेसाठी लागणारी पोटगी त्या महिलेला मिळावी यासाठी ते कोर्टात जातात. तेथे त्यास्रीला सर्वजण वंशाचा दिवा मानला जाणारा मुलगाच हवा आणि ते ती स्त्री देऊ शकत नाही म्हणून तिचा पती घटस्फोट घेत असतो. परंतु मुलं जन्माला घालणे हे फक्त एका स्त्रीचे काम नसून त्यामध्ये पुरुष देखील खुल महत्वाची भूमिका बजावत असतात. कोर्टा मध्ये काही जेष्ठ आणि तज्ज्ञ व्यक्ती तसेच डॉक्टर यांना बोलावून मुलं जन्माला घालणे, त्यासाठी आवश्यक असणा-या गोष्ट या सर्व बाबींची चर्चा होते.
डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार स्त्री मध्ये फक्त X पेशी असतात तर पुरुषामध्ये X आणि Y अशा दोन प्रकारच्या पेशी असतात पुरुषापासून मिळालेल्या पेशींनुसारच जे बाळ जन्माला येणार आहे ते स्त्री किंवा पुरुष ठरत असते त्यामुळे स्त्रियांना दोष देण्यापेक्षा पुरुष ही तितकाच जबाबदार आहे हे आपण लक्षात घ्यायला हवे. स्त्री ही नेहमी जमिनीची भूमिका बजावते तर पुरुष हा शेतक-याची भूमिका बजावत असतो पुरुष जे पेरतो तेच उगवत असते मग पुरुषाने काय पेरायचे ते स्वतः ठरवावे लागेल.
लेखक मनोहर भोसले यांनी मुलगा किंवा मुलगी या दोघात ही वंश न समजता तो आपला अंश आहे म्हणून त्याचा सर्वांगीण विकास केला पाहिजे. असा मुक्त विचार सरणीचा संदेश खूप छान पद्धतीने दिला आहे. शाळा, कॉलेज, महाविद्यालयामध्ये ही लघुनाटिका सादर व्हावी आणि समाज जागृतीचे आणि प्रबोधनाचे कार्य होणे आवश्यक आहे आणि ते वंश आणि अंश या लघु नाटिकेतून नक्कीच होईल असा मला ठाम विश्वास वाटतो. लेखकाला पुढील लिखाणासाठी खूप खूप शुभेच्छा.
- मंगेश विठ्ठल कोळी (लेखक-संपादक-समीक्षक)
o Title - Vansh Aani Ansh (वंश आणि अंश)
o Author - Manohar Mahadev Bhosale (मनोहर महादेव भोसले)
o Price - Rs. 40/- (मूल्य 40/- रुपये)
o Publisher - Dr. Sunil Patil (डॉ. सुनील पाटील)
o Publication - KavitaSagar Publication (कवितासागर प्रकाशन)
o Contact - 02322 - 225500, 09975873569
o Email - sunildadapatil@gmail.com
January 24, 2016
लहानपणापासून सारं आयुष्य ग्रंथाच्या सहवासातच गेलं, तरी एखाद्याला वाचनाचा नाद लागेलच, असं सांगता येणं कठीण आहे. तसं असतं तर प्रत्येक ग्रंथविक्रेता हा चांगला वाचक झाला असता. पण तस होतं नाही. मात्र याचा मात्र नेहमीचं खरा ठरतो. आणि वाचनाचा नाद असलेला ग्रंथविक्रेता हा उत्तम पुस्तकविक्रेता होतो! मला स्वत:ला वाचनाचा नाद नव्हे वेड आहे, अगदी लहानपणीच लागलं. त्याचं कारण ग्रंथांच्या सहवासात गेलेलं बालपण हेच होय.
December 23, 2009
शेतीमातीचे प्रश्न नवे नाहीत. ते आदीम काळापासून आलेले आहेत. जो दुसऱ्याला जगवितो त्याच्या स्वतःच्या जगण्याचे काय ? या प्रश्नाने अश्वस्थ झालेले आणि स्वतः घेतलेले अनुभव आविष्कृत होण्याची तडफ कवितेतून मांडणारे डॉ.प्रभाकर शेळके हे 'करपलं रान सारं' या कवितासंग्रहातून व्यक्त होतात. मिरगाचा खेळ,दु:ख सांदीत ठेऊन, निबर मनाने, बया काटेरी उनगा, बेंदाड अंगावर येणार , चिभडं पिकांचा हुडहूड होम अशी शब्दरचना ग्रामनात्याची साक्ष देतात. धान्य पिकविले जाते. ते विकले जाते. शेतकऱ्यांची पदोपदी पिळवणूक होते.हे सांगताना ते म्हणतात.
करपलं रान सारं,झाला डागीनचा वाडा
गाव वेशीला टांगला,ह्यो ग जन्माचा ख्वोडा
गावचं गावपण हरवत चाललय. शहराच्या ओढीनं माणसं जास्त व्यावहारिक बनत आहेत.गाव, गावचा मळा, माणसाचा लळा ओसाड होतो की काय ?अशी अनामिक भिती कवीला सतावते आहे. 'गेला गावकुस' या कवितेत ते खंत व्यक्त करतात.
गेला गावकुस गेला लपंडाव
व्यसनाचे पेव आता गावांमध्ये
अध्यात्माची वाटचाल पुर्वीइतकी निर्मळ आता राहिलेली नाही. देवाच्या वाटेवर भक्तीमार्गाचा वास असतो तरी अपघातात मरण येते. तोंडामध्ये ईश्वराच्या नामोच्चार असतो मग असे का घडावे? देवाच्या नावाने धर्मभोळेपणा जपला तर जात नाही ना? हे विचारण्याचे धाडस कवीने दाखविले आहे.
असं दिंडीचं मरण
उभ्या जन्माची जिभाळी
सवसांज आहेवाची
कशी रडते आभाळी
'करपलं रानं सारं ' हा कवितासंग्रह वाचताना काही प्रश्न उभे केले आहेत. तर काही प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न केला आहे.ते म्हणतात काळ्या आईच्या प्राक्तनातून माझ्या भूमियांच्या वेदनेचे कढ मला नेहमीच अस्वस्थ करत आले. खरेतर अस्वस्थताच लेखनाची उर्जा असायला हवी. आजची गावखेड्याची अवस्था पाहून कवी गलबलतो. कुणब्यांची दु:खसल कुणबावा असल्याशिवाय मांडता येत नाही. अनुभवाची शिदोरी पाठीशी लागतेच.
कुणबी कर्जात बुडाला
सालदार घेई झोके
मोंढ्यामंदी टपलेले
त्यांच्या मालावर बोके
साध्या शब्दात समर्पक आशय कवीने मांडला आहे. जालना हा मराठवाड्यातील जिल्हा. तेथील बोलीभाषेचा शब्दपरिपोष कवितासंग्रहात जाणवतो.तो स्वाभाविक आहे.करपलं रान सारं मध्ये पाच श्रृंगारिक लावण्यादेखिल आहेत. हायकू हा काव्यप्रकार कवितासंग्रहात आला आहे. बेकारीचे चटके उद्धृत केलेले आहेत. ही प्रचंड मोठी समस्या आहे. खेड्यातील तरूण युवक शहरांकडे धावत आहे. पोटाचे नवे प्रश्न निर्माण झाले आहेत. या बाबतीत हा संग्रह नाविन्याचा शोध घेत आहे.एकूण बासष्ट कवितांचा समावेश यात आहे. सरदार जाधव यांनी केलेले मुखपृष्ठ बोलके आहे. कुंडलिक अतकरे यांनी देखणा कविता संग्रह बनविला आहे.फक्त एकाच विषयावरील कवितांचा समावेश होणे शक्य झाले असते तर वेगळी झालर प्राप्त झाली असती. सर्वच कविता गेय आहेत. नादनिर्मितीमुळे हृदयापर्यंत भिडतात.
करपलं रान सारं (कवितासंग्रह)
डॉ. प्रभाकर शेळके
कैलास पब्लिकेशन्स, औरंगाबाद
पृष्ठे;७१ मुल्य ; ७०₹
विठ्ठल जाधव
शिरूरकासार,बीड
सं.९४२१४४२९९५
November 21, 2018
`घरीदारी' या इंद्रजित भालेरावांच्या व्यक्तिचित्रांच्या संग्रहाचे नुकतेच प्रकाशन झाले आहे. ही व्यक्तिचित्रे म्हणजे साहित्य क्षेत्रातल्या व्यक्तींचा वेगळा परिचय देणारी आहेत. त्यांच्या गुणांनी व स्वभाववैशिष्ट्यांनी नटलेली ही माणसे जात्याच प्रसिद्ध आहेत.
`घरीदारी' :
लेखक : इंद्रजित भालेराव
January 25, 2010
महाराष्ट्राच्या लोकसंख्येच्या अंदाजे १८ टक्के मराठी माणूस हा बृहन्महाराष्ट्रात वास्तव्यास असतो. मराठ्यांच्या साम्राज्याला टिकविण्यासाठी आणि एकेकाळी त्यांचा झेंडा अटकेपार फडकविण्यासाठी, निमूटपणे मराठ्यांच्या सैन्याबरोबर बृहन्महाराष्ट्रात गेलेला हा मराठी माणूस गेल्या २५० पेक्षा जास्त वर्षांपासून त्या त्या प्रांतात आपापल्यापरीने स्थानिक परिस्थितीशी जुळवून घेत आनंदी आहे.
October 6, 2023
Copyright © 2025 | Marathisrushti