मिलिंद वेर्लेकरांचे या पुस्तकाच्या निर्मितीमधील अनुभव. त्यांच्याच शब्दात !!
July 26, 2016
मराठीतील १०० वाचनीय पुस्तके..
January 27, 2017
मानवी प्रतिभेचे उत्तुंग शिखर असणारे महर्षी भृगू यांनी जीवनाच्या आणि ज्ञानाच्या नानाविध शाखांमध्ये आश्चर्यकारक, अतुलनीय व मूलभूत काम केले आहे. अनेक ज्ञाती समाजाचे ते मूळ पुरूष आहेत. त्यांच्या कर्तृत्वाचा आणि जीवनाचा परिचय प्रथमच मराठीत एकत्रितपणे करून दिला आहे.
June 13, 2014
मानवी जीवन ज्यावर अवलंबून आहे अशा निसर्गचक्रात कीटकांच्या दुनियेची ही महत्वाची भूमिका आहे. या कीटकांच्या दुनियेतील कोळी,पतंग, काजवा, झुरळ, माशी, उधई, आदी विविध कीटकांचा माहितीपूर्ण मनोरंजक पण सोप्या भाषेत परिचय करून दिला आहे.
June 17, 2014
निरभ्र आकाशातील असंख्य चांदण्यांचे द्रुष्य अतिशय मनोहारी वाटते. या लुकलुकणार्या चांदण्यांबद्दल सर्वांच्याच मनात मोठे कुतुहल असते. उंच आकाशात चमकणारे हे हिरे असल्याचे बालकांना वाटते, तर कधीही नष्ट न होणारी ही नक्षत्रे असल्याचे मोठ्या माणसांची कल्पना असते. शीर्षक : नक्षत्र मैत्री लेखक : डॉ.पु.वि.खांडेकर डॉ. मधुकर आपटे पाने : 61, किंमत : 60/- रू प्रकाशक : नचिकेत प्रकाशन, नागपूर
September 29, 2012
नुकतेच Three Thousand Stitches हे सुधा मुर्ती यांचे पुस्तक वाचून हाता वेगळे केले . या पुस्तकात त्यांनी त्यांचे काही अनुभव कथन केले आहेत . हे अनुभव वाचकांचे केवळ मनोरंजन करत नाहीत तर काही तरी पदरात टाकून जातात . श्रीमंत करून जातात !
सुधा मुर्ती या लेखिका म्हणून सर्वाना परिचित आहेत , पण त्या 'एक व्यक्ती 'म्हणून किती मोठ्या आहेत याची कल्पना हे पुस्तक वाचून येते . पुस्तक वाचताना आपला मोठेपणा त्या वाचकावर लादत नाहीत . आपलीच एखादी लहान /मोठी बहीण आपली सुख -दुःखे , यश -अपयशाच्या कथा आपल्याशी 'शेअर ' करतेय असा भास होतो .
हे पुस्तक इंग्रजीत आहे . इंग्रजी बद्दल एकंदरच आपल्या मनात न्यूनगंड आहे . इंग्लिश बोलण्या इतकेच वाचनाला सुद्धा आपण बिचकतो . पण या पुस्तकातली भाषा परकी वाटत नाही . अत्यंत सोपी ,साधी आणि प्रवाही (म्हणूनच प्रभावी ), भाषा आहे .
सुधाजीनी इंग्रजीत लिखाण कसे सुरु केले याचा किस्सा ऐकण्या सारखा आहे . त्यांचे दहावी पर्यंतचे शिक्षण त्यांच्या मातृभाषेत म्हणजे कानडी माध्यमात झाले . त्यांना एकदा 'न्यू इंडियन एक्सप्रेस ' या इंग्रजी वृत्तपत्रातून साप्ताहिक स्तंभ लेखना साठी विचारणा झाली . त्या वर त्या म्हणाल्या कि मला इंग्लिश पेक्षा कानडीतुन कथन करणे सोपे जाईल . त्यावर एक प्रसिद्ध पत्रकार (TJS George )म्हणाले कि 'भाषा एक माध्यम /वहान आहे . तुमच्यातला कथा गुंफणारा लेखक महत्वाचा असतो . तेव्हा भाषेचा फारसा बाऊ न करता लिहिते व्हा , भाषा तुमच्या लिखाणाला आपोआप साहाय्यभूत होत जाईल !' आणि त्यांचा साहित्य प्रवास सुरु झाला . तात्पर्य इतकेच कि भाषा गौण लेखन /वाचन महत्वाचे .
१९९६ला इन्फोसिस फाउंडेश स्थापन झाली . सामान्य माणसांना मदत करण्याच्या उद्देशाने हि Non Profit संस्था काढण्यात आली . या विश्वविख्यात संस्थेच्या चेअरपर्सन आहेत सुधा मुर्ती .
सुधाजीनी 'देवदासी पुनर्वसन आणि जागरूकता ' या स्फोटक प्रोजेक्ट पासून सुरवात केली . त्या वेळी त्या अननुभवी होत्या . एकी कडे छुपा सामाजिक विरोध ,दुसरीकडे देवदासी ,बोलणेतर दूरच पण जवळ पण येऊ देईनात . ज्या देवदासींना त्यांना चपला ,टमाटे फेकून मारले ,त्याच देवदासींना तीन हजार 'हातानी ' प्रेमाचे प्रतीक म्हणून , एक -एक टाका घालून विणलेली चादर एका भव्य कार्यक्रमात 'भेट ' दिली ,इथपर्यंतचा प्रवास Three Thousand Stitches या पहिल्या प्रकरणात आहे .पण खरी 'भेट 'होती ती ,या देवदासींनी ,सुधाजींच्या मदतीने ,या गलीच्छ प्रथे पासून करून घेतलेली सुटका ,आणि समर्थपणे सामान्य ,सन्माननीय जीवन जगण्याचा घेतलेला वसा ! आज याच देवदासींची मुलं उच्य शिक्षित ( डॉक्टर ,इंजिनियर वगैरे) आहेत .!
काशी यात्रा केल्यावर ,आपल्या आवडीचे काही तरी सोडावे लागते ,अशी आपली प्रथा आहे . Three Handful Of Water या प्रकरणात सुधाजीनी काय वर्ज केले हे वाचून तुम्ही अवाक व्हाल ( मी झालोय !)
कपड्यावरून माणसांची 'किंमत ' ठरवणार ,स्वतःहास श्रीमंत आणि इतरांना Cattle Class म्हणून हिणवणारा एक वर्ग उदयास आला आहे . अश्याच एकाचा अनुभव Cattle Class मध्ये वाचायला मिळतो .
भारतातल्या गरजू ,गरीब महिलांना नौकरी आणि मोठ्या पगाराचे आमिष दाखून परदेशात कशी पिळवणूक आणि अडवणूक होते हे No Place Like Home मध्ये .
सिनेमाचे वेड ,तुमच्या माझ्या प्रमाणे सुधाजीना पण आहे ! Bollywood चा इतर देशातील प्रभाव ,आणि त्याचा त्यांना आलेला अनुभव ,A Powerful Ambassador मध्ये त्यांनी लिहलंय . मला हे प्रकरण 'मस्त ' वाटले .
इतकेच नाही तर अजून हि बरेच काही या पुस्तकात आहे . हि फक्त काही उदाहरणे आपल्या साठी दिलीत .
त्यांचा जन्म आपल्या सारखाच मध्यम वर्गीय ,सुशिक्षत , संस्कारक्षम घरात ,आणि वातावरणातला झाला , ('आपल्या सारखा 'या साठी लिहल कि मी हि साधारण अशाच वातावरणात वाढलोय -माझा जन्म १९५२ चा ) पण त्यांची 'झेप ' अफाट आहे ! हे त्यांनी कसे साध्य केले ? या साठी या पुस्तकातील काही प्रसंग सूचक आहेत .
तेव्हा इंग्रजीची भीती बाजूला सारून हे पुस्तक जरूर वाचा , वाचनानंदाची gurantee माझी !
Title of Book : Three Thousand Stitches
Author : Sudha Murty
Publication : Penguin Random House India 2017
-- सु र कुलकर्णी .
(माझा पहिलाच प्रयत्न . परीक्षण कसे वाटले ? जरूर कळवा . आपल्या प्रतिक्रियांची वाट पहातोय . पुन्हा भेटूच . Bye . )
November 29, 2017
इतिहास घडताना…..सचिन सर्वाधिक सामने खेळणारा कसोटीवीर
August 3, 2010
मानवाच्या शक्तीचा, बुद्धी चा आणि लालसेचा परिणाम म्हणून या पृथ्वीतलावर अनेक प्राणी नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत अशा काही निवडक प्राण्यांची माहिती देणारे पर्यावरण रक्षणासाठी प्रत्येकाने वाचावे असे पुस्तक. विनाशाच्या वाटेवरील प्राणी 15, विद्याविहार, प्रतापनगर, नागपूर 440 022 लेखक : गो. बा. सरदेसाई पाने : ११२, किंमत : ११० रू. प्रकाशक : नचिकेत प्रकाशन मो. : 9225210130
September 29, 2012
लेखक एम.टी.एन.एल. मध्ये अधिकारी होते. त्यांना हिमालयात पायी फिरण्याचा छंद होता. पायी जात असताना निसर्गाचं रम्य दर्शन, बर्फाच्छादित शिखरं, वन्य प्राणी, विविध रंगाची फुलं, वनौषधीची झाडं यांचा त्यांना परिचय झाला. गंगोत्री, यमनोत्री, केदारनाथ, बद्रीनाथ या धार्मिक स्थळांना भेट देताना त्याचे पुराणातील संदर्भ त्यांनी दिले आहेत. निसर्गाचं विराट रुप त्यांना सतत आकषिर्त करीत होतं तर जिम कार्बेटचं जंगल जीवन त्यांना शीळ घालीत होतं. वन्यप्राण्यांच्या विशेषत: वाघाच्या शिकारीवर निर्बंध घालणार्या जिम कार्बेटला ते सलाम करतात. त्या सर्व ठिकाणांची पुराणाचा आधार घेऊन केलेली वर्णनं मनाला मोहवून टाकतात.
हिमशिखरांच्या सहवासात
लेखक : प्रकाश लेले
प्रकाशक : अनघा प्रकाशन, ठाणे पूर्व
मूल्य : १८०/- रुपये
पाने : १५०
हिमालयाच्या निसर्गाला पावित्र्याची, अध्यात्माची, संस्कृतीची जोड आहे. हिमालयातील स्थाने, मंदिरे, पर्वत शिखरे, सरोवरे, प्रपात, नद्या बघताना मन मंत्रमुग्ध होते. हिमालयाचा निसर्ग अनुभवावयाचा असेल तर अनवट वाटेवरुन पदभ्रमंती सारखा दुसरा पर्याय नाही. या पुस्तकातील सर्व स्थाने उत्तराखंडातील आहेत. या सर्व हिमशिखरांचे आभार कसे मानायचे हेच कळत नाही. त्या हिमशिखरांनी माझ्यावर केलेल्या प्रमाचा, आपुलकीचा वर्षाव आहे. सर्वांना माझे एकच सांगणे आहे, वर्षातील काही दिवस तरी तुम्ही अशा सुंदर निसर्गाच्या सान्निध्यात घालवा.
-- प्रकाश लेले
October 18, 2016
सर्वसाधारण भारतीयांच्या अमेरिकेबद्दलच्या अतिप्रगत, अत्याधुनिक, चंगळवादी कल्पनाचित्राला छेद देणारे, अमेरिकेच्या ग्रामीण भागात गेली १२ वर्षे वास्तव्याला असलेल्या डॉ. संजीव चौबळ यांनी केलेले अमेरिकेच्या ग्रामीण अंतरंगाचे हे चित्रण. अमेरिकेतील मोठमोठ्या शहरांमध्ये रहाणार्या बहुतांश मराठी लोकांनीही ग्रामीण अमेरिकेचा हा पैलू अनुभवलेला नाही. भारतात राहून अमेरिकेची झगझगीत आणि भव्यदिव्य कल्पनाचित्रे रेखाटणार्या मंडळींना हे पुस्तक वाचून वास्तवाचे नक्कीच भान येईल.
July 16, 2011
Copyright © 2025 | Marathisrushti