सहकार खात्याच्या मागील 20 वर्षांतील नागरी बॅंकांना लागू असणाऱ्या सर्व परिपत्रकांचे एकमेव व प्रथम संकलन. एकूण 106 परिपत्रकांचा यात समावेश आहे. पृष्ठे 160 असून आकार एक अष्टमांश डेमी आहे. नागरी बॅंकेच्या प्रत्येक शाखेत असावेच, असे हे संकलन असून हाताळण्यास अत्यंत सुलभ आहे.
June 17, 2014
वाचाल तर वाचाल, असे आपण नेहमी ऐकतो. या उक्तीची कृती करण्याची कशी गरज आहे, हे या पुस्तकावरून समजते. लेखक सतीश पोरे यांच्या या पुस्तकातील एकूण ९ भागांतून वाचन संस्कृतीचा वेध घेतला आहे.
October 1, 2023
महाराष्ट्राच्या लोकसंख्येच्या अंदाजे १८ टक्के मराठी माणूस हा बृहन्महाराष्ट्रात वास्तव्यास असतो. मराठ्यांच्या साम्राज्याला टिकविण्यासाठी आणि एकेकाळी त्यांचा झेंडा अटकेपार फडकविण्यासाठी, निमूटपणे मराठ्यांच्या सैन्याबरोबर बृहन्महाराष्ट्रात गेलेला हा मराठी माणूस गेल्या २५० पेक्षा जास्त वर्षांपासून त्या त्या प्रांतात आपापल्यापरीने स्थानिक परिस्थितीशी जुळवून घेत आनंदी आहे.
October 6, 2023
वडिलोपार्जीत स्थावर मालमत्ता, शेती, जागा, किंवा पै पै जमवून मिळवलेली मालमत्तेची नोंदणी कायद्यानुसार योग्यवेळी होणे आवश्यक असते. तसे न झाल्यास त्यासंबधी उद्भवणाऱ्या वादांना सामोरे जाऊन कोर्ट प्रकरणे करावी लागतात. हे टाळण्यासाठी याविषयीच्या कायद्याची प्राथमिक माहिती घेणे आवश्यक आहे.
February 28, 2024
श्री. पाळंदे तीस वर्षे गिरिभ्रमण करताहेत. उदंड अनुभवाचा इतरेजनांना फायदा व्हावा, या सद्हेतूने त्यांनी `डोंगरमत्री’चं लेखन केलं. यातील तीसही लेख अभ्यासपूर्ण आणि मार्गदर्शक आहेत. गिरिकंदरामध्ये भटकण्याचा अनुभव घरबसल्या रसिकाला घेता येईल, या दृष्टीने पुस्तकाची जडणघडण डोळ्यात भरते.
January 25, 2010
सतराव्या-अठराव्या शतकात नाणी वा कागदी नोटांच्या स्वरूपातला पैसा आजच्याप्रमाणे सरसकट वापरात नव्हता. अनेक आर्थिक व्यवहार वस्तूंच्या प्रत्यक्ष देवाण-घेवाणीतून केले जात. सोन्या-चांदीच्या नाण्यांचा उपयोग मुख्यत: व्यापारी आणि राजांपुरता मर्यादित असे. आजच्या प्रमाणे प्रत्येक गोष्टीचे, वस्तूचे, सेवेचे मोल पैशांत करण्याची पद्धत नव्हती.
November 26, 2010
अमेरिका आणि चीन ही राष्ट्रे सातत्याने राष्ट्रीय धोरणांवर लक्ष केंद्रीत करून असतात. आपल्या अर्थव्यवस्थेला कशाप्रकारे बळकटी आणि नवीन बाजारपेठ मिळेल यावर ही राष्ट्रे सतत काही ना काही धोरणे राबवताना दिसतात. आपल्या अर्थव्यवस्थेला आणि एकूणच राष्ट्रीय हिताला साजेशे निर्णय अमेरिका आणि चीन ही राष्ट्रे घेत असतात.
November 10, 2010
कवी श्री. निलेश बामणे लिखीत " एका निवांत समयी " व " साहित्य उपेक्षितांचे " या पुस्तकाचे प्रकाशन करताना राजमाता प्रतिष्ठान च्या अध्यक्षा सौ. आशाताई मामिडी, सरिता को.आॅप.क्रेडिट सोसायटी लि.चे अध्यक्ष श्री. सदाशिव मते, संचालक डॉ. शांताराम कारंडे, संचालक श्री विनोद निक्षे, सचिव श्री. प्रभाकर देसाई, श्री हरिशचंद्र झावरे, धगधगती मुंबई मराठी वृत्तपत्राचे उपसंपादक श्री जगदीश लाड.


January 11, 2016
मूल जन्माला आलं की हल्लीचे पालक त्याचं पुढिल भविष्य ठरवायला जणू काही तयारच असतात. ही विचारसरणी सध्या सुशिक्षित पालकांमध्ये जास्त प्रमाणात पाहायला मिळते. माझा मुलगा मोठा झाला की तो एखादा डॉक्टर किंवा इंजिनिअर व्हावा. नाही तर मग एखादी UPSC किंवा MPSC ची परीक्षा पास होऊन ऑफिसर बनून कमिशनर किंवा कलेक्टर तरी व्हावा अशी बऱ्याच पालकांची मनोमन इच्छा असते . त्यासाठी ते मुलांना तशा प्रकारचे वातावरण सुद्धा बहाल करत असतात. लेखक हे स्वतः त्या परिस्थितीतून गेलेले असल्यामुळे त्यातील वर्णन अधिकच जिवंत आणि वास्तववादी वाटतात. लेखकाचं हे पहिलंच पुस्तक असलं तरी ही कादंबरी वाचताना खिळवून ठेवते. प्रत्येक स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्याला वाटेल की हे सर्व माझ्याशी निगडित असंच लिखाण आहे.
January 5, 2022
देशाच्या आर्थिक विकासात वेगवेगळ्या उद्योगांचा वाटा मोठा आहे. या उद्योजकांची वाटचाल कशी झाली याविषयी सर्वसामान्यांना कुतुहल असते. अनेक उद्योजकांची वाटचाल संघर्षमय होती. प्रतिकूल परिस्थितीवर मात करून त्यांनी यश मिळवले आणि देशातील आघाडीचे उद्योजक म्हणून स्थान मिळवले. अशा काही आघाडीच्या उद्योजकांशी संवाद साधून ज्येष्ठ पत्रकार वीर संघवी यांच्या लेखणीतून ‘नवभारताचे शिल्पकार’ हे पुस्तक साकारलं आहे.
August 8, 2009
Copyright © 2025 | Marathisrushti