बाळक्रीडा अभंग क्र.२४

बाळक्रीडा अभंग क्र.२४

संत तुकाराम महाराज यांनी श्री भगवान श्रीकृष्ण यांचे बालपणाचे वर्णन करणारे जे अभंग आहेत, त्या अभंगाला बाळक्रीडा अभंग असे शिर्षनाम देण्यात आलेले असून त्या अभंगांना वारकरी सांप्रदायात फार मोठ्या प्रमाणात गायिल्या जात असतात. हे बाळक्रीडा अभंग ४२ असून त्या सर्व अभंगांना (माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम | ऐसें देईं प्रेम काहीं कळा ||धृ||) हे गाताना एकाच धृपद लावले जाते.



केला पुढे हरि अस्तमाना दिसा । मागें त्यासरिसे थाट चाले ॥१॥
थाट चाले गाई गोपाळांची धूम । पुढे कृष्णराम तयां सोयी ॥२॥
सोयी लागलिया तयांची आवर्ती । न बोलविता येती मागे तया ॥३॥
तयांचिये चित्ती बैसला अनंत । घेती नित्य नित्य तेचि सुख ॥४॥
सुख नाही कोणा हरिच्या वियोगे । तुका म्हणे युगे घडी जाय ॥५॥
माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम | ऐसें देईं प्रेम कांहीं कळा ||धृ||

Author