साहित्य - ललित

वृक्षवल्ली

Category:

 

निसर्गाशी माणसाचं नातं फार पुरातन काळापासून आहे. आपल्या बोलण्यातून कित्येक झाडं, झुडपं, रोपं, फळा-फुलांचे संदर्भ सहजपणे येत असतात.. त्यामुळेच संत तुकाराम महाराजांनी म्हटलेला अभंग माणसांच्या बाबतीत तंतोतंत लागू पडतो.. वृक्षवल्ली आम्हा, फक्त सोयरीच नाही तर ती आमच्यात भिनलेली आहेत..

व्यक्ती-परिचय

सुप्रसिद्ध लेखक गो. नी. दांडेकर

Category:

 

वयाच्या अवघ्या चौदाव्या वर्षी म्हणजे म्हणजे चौथी पर्यंत प्राथमिक शिक्षण झाल्यावर त्यांनी घर सोडले. तेव्हापासून त्यांच्या पायाला भिंगरी लागली ती कायमचीच. संत गाडगेबाबांजवळ ते राहिले, त्यांच्याबरोबर हिंडले. त्यांनी पन्नास वर्षे दुर्गभ्रमण केले. या काळात त्यांनी गडाकोटांची, त्यांवरील वास्तूंची असंख्य छायाचित्रे काढली. त्यांच्या कादंबऱ्यांचे चरित्रात्मक , आत्मचरित्रात्मक कादंबऱ्या आणि प्रासंगिक आणि अन्य कादंबऱ्या असे वर्गीकरण केले जाते.

व्यक्ती-परिचय

संगीतकार अनिल विश्वास

Category:

 

अनिल विश्वास यांनी ‘ धरम की देवी ‘ पासून १९६५ पर्यंतच्या छोटो छोटी बाते ‘ पर्यंत अंदाजे ७८ ते ८० चित्रपटांना संगीत दिले . विदेशी संगीताला कधीही जवळ न करणारा , त्यासाठी तडजोड न करणारा , अस्सल-भारतीय शास्त्रीय संगीताचा सतत ध्यास धरणारा संगीतकार अशी त्यांची ख्याती होती.

व्यक्ती-परिचय

लेखिका इंदिरा गोस्वामी

Category:

 

त्यांचा पहिला कथासंग्रह त्यांच्या वयाच्या २० व्या वर्षी प्रकाशित झाला. तेव्हा त्यांचे शिक्षण चालू होते. त्याच्या आत्मचरित्रात्मक ‘ द अनफिनिशड आटोबायोग्राफी ‘ या कादंबरीत अनेक घटना त्यांनी प्रमाणिकपणे सांगितल्या आहेत.

साहित्य - ललित

ड्रीम लायनर टू होम क्वारंटाईन

Category:

 

जकार्ता विमानतळावर फक्त एअर इंडियाच्या विमानासाठी भारतीय जमा होतं होते. भारतीय दूतावासातील कर्मचारी आपुलकीने सहकार्य आणि मार्गदर्शन करत होते. इंडियन नेव्हीचे एक कमांडर स्वतः अडचण असलेल्या प्रवाशाला शांतपणे ऐकून आणि समजून घेत होते तसेच त्याची समस्या दूर करत होते. भारतीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना विमानतळावर भारतात परतण्यासाठी आतुर असलेल्या तणाव ग्रस्त भारतीयांशी आपुलकीने आणि सहजतेने वागतानाचे भावनात्मक क्षण पाहून भारावल्यासारखे झाले होते.