गजाची आई
Category:
साहित्य - ललितगजानन उर्फ गजा, हा आमच्या सर्व मित्रमंडळी पैकीच एक. पण या सर्व मित्र मंडळीत व गजात एकच साम्य होते व ते त्याच्या विलक्षण हास्याचे. गजानन आमच्या कॉलनीत राहायला आला तेव्हा अगदी दोन वर्षाचा होता. आपल्या आई बरोबर म्हणजे सुमाताई बरोबर लहानगा गजा आला. आमच्या चर्चेला एक नवीन विषय मिळाला.