Articles by sachingadkari
डिस्को किंग’ संगीतकार व गायक बप्पी लहिरी
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteबप्पी लहिरींनी जितकी डिस्को गाणी बनवली, त्यापेक्षा अधिक भजने ध्वनिमुद्रित केलेली आहेत. त्यांची गणेश आराधनेची गीते खूप लोकप्रिय झाली होती. किंग ऑफ पॉप मायकल जॅक्सन देखील बप्पी दा यांच्या संगीत शैलीने प्रभावित झाला होता. मायकल जॅक्सनने बप्पी दा यांना मुंबईत झालेल्या शोमध्ये आमंत्रित केले होते.
दिग्दर्शक गजेंद्र अहिरे
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteआपल्या कलाकृतीनं जाणकारांचं लक्ष वेधून घेणारे कलावंत फार थोडे असतात. सामाजिक विषय समर्थपणे पडद्यावर जिवंत करणारे नवीन पिढीतील दिग्दर्शक गजेंद्र अहिरे हे त्यापैकी एक. आपल्याला काय सांगायचंय, ते कसं मांडायचं आहे याचा पक्का आराखडा गजेंद्र अहिरे यांच्या डोक्यात असतो.
विच्छा’ आमची अपुरीच राहिली
Category:
साहित्य - ललित९८ च्या मार्चमधील चौदा तारखेला आम्हाला ‘दादा गेले’ असा फोन आला. दादा गेले हे मानायला मन तयार नव्हतं. दादांच्या सहवासात राहून अजून खूप काम करायचं बाकी होतं. त्यांना नवीन चित्रपट निर्मिती करायची होती. सगळंच अर्धवट सोडून दादा निघून गेले.
वेस्ट इंडिजचे ज्येष्ठ खेळाडू जोएल गार्नर
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteखरतर त्याची महाकाय उंची बघूनच फलंदाजाच्या छातीत धडकी भरायची. गार्नरचा यॉर्कर सरळसोटपणे यष्ट्यांचा वेध घ्यायचा. मुळात यॉर्कर म्हणजे पायाच्या बुंध्यात टाकलेला चेंडू, त्यामुळे पायांना हालचाल करायला वाव जवळपास नाहीच आणि तशा अवस्थेत ऑफ स्टम्पच्या किंचित बाहेर पडलेला चेंडू आत येतो म्हणजे फलंदाजांची त्रेधातिरपीट नक्कीच.
स्त्रियांचे सौंदर्य यावर संशोधन करणारे सर फ्रान्सिस गाल्टन
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteफ्रान्सिस गाल्टन यांच्या घराण्यात विज्ञानासंबंधी परंपरागत प्रेम होते. त्याच्या आजोबांनी- सॅम्युएल गाल्टननी बंदुका निर्मितीच्या व्यवसायात भरपूर पैसा कमावला होता. त्यामुळे शांतताप्रेमी समजल्या जाणाऱ्या क्वेकर पंथीयांचा त्यांनी रोष ओढवून घेतला होता.
महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री रावसाहेब रामराव पाटील ऊर्फ आर आर पाटील
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteआबा सत्तेची एक एक पायरी चढत गेले पण कुटुंबानं आबांप्रमाणेच आपला साधेपणा टिकवून ठेवला. पत्नी सुमन, मुलगा रोहित आणि मुलगी स्मिता, आई भागिरथी यांनी वागण्या बोलण्यात सत्तेचा दर्प येऊ दिला नाही. आबांचे एक भाऊ सुरेश हे गावाकडे शेती बघतात. तर दुसरे भाऊ राजाराम पोलीस दलात आहेत. आबा गृहमंत्री असतांना आबांचे भाऊ राजाराम पाटील पोलीस दलात कुठलाही बडेजाव न करता सेवा बजावत होते.
थोरले माधवराव पेशवे
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteपानिपत येथे मराठयांचा पुष्कळ नाश होऊन नंतर थोडक्याच अवधीत नानासाहेब मरण पावले, तेव्हा ही संधी मराठ्यांवर स्वारी करण्यास उत्कृष्ट आहे असे पाहून निजामाने लढाई सुरू केली. त्यावेळी राघोबा प्रमुख असल्यामुळे सेनापती राघोबाने राक्षसभुवन येथे निजामाच्या सैन्यास गाठून लढाई दिली. त्यात राघोबाचा पराभव व्हावयाचा परंतु ऐनवेळी माधवरावानें आपल्या तुकडीनिशी निजामाच्या सैन्यावर हल्ला करून जय मिळविला. त्या मुळे निजामाचा उद्देश सिद्धीस न जाऊन त्यास पेशव्यांशी तह करावा लागला.
एक परीस स्पर्श ( भाग – १५ )
Category:
कथा साहित्य - ललितविजयने दुसरा मार्ग स्वीकारण्याचा निर्णय घेतला. आणि एक प्रेमपत्र लिहायला घेतलं. म्हणजे त्याच्या आयुष्यातील पहिलं आणि शेवटचं प्रेमपत्र लिहायला घेतलं. ते प्रेमपत्र हजार शब्दांचं होतं. त्या पत्राच्या शेवटी त्याने त्याच्या आयुष्यातील पहिली कविताही लिहिली होती.