कथा

एक परीस स्पर्श ( भाग – १५ )

Category:

 

विजयने दुसरा मार्ग स्वीकारण्याचा निर्णय घेतला. आणि एक प्रेमपत्र लिहायला घेतलं. म्हणजे त्याच्या आयुष्यातील पहिलं आणि शेवटचं प्रेमपत्र लिहायला घेतलं. ते प्रेमपत्र हजार शब्दांचं होतं. त्या पत्राच्या शेवटी त्याने त्याच्या आयुष्यातील पहिली कविताही लिहिली होती.

साहित्य - ललित

पालक बालक

Category:

 

मातृत्व ही स्रीची एक नैसर्गिक देणगी आहे. त्यामुळे तिला खूप संयमाने आणि शांत पणे हे सगळे सहन करावे लागते. आणि मी आई होणार आहे म्हणून मलाच सगळ्या गोष्टी करायला लागतात.

व्यक्ती-परिचय

ज्येष्ठ रंगकर्मी राजा मयेकर

Category:

 

राजा मयेकर यांनी काम केलेले ‘आंधळं दळतंय’, ‘यमराज्यात एक रात्र’,‘असूनी खास घरचा मालक’, ‘बापाचा बाप’, ‘नशीब फुटकं सांधून घ्या’, ‘कोयना स्वयंवर’, ‘श्यामची आई’, ‘धांदलीत धांदल’, ‘भावबंध’, ‘बंबदशाही’, ‘झुंझारराव’ ही त्यांची गाजलेली नाटके.

व्यक्ती-परिचय

दिग्गज व्हाईस ओव्हर कलाकार हरीश भिमाणी

Category:

 

८० च्या दशकातील लोकप्रिय टीवी मालिका ‘महाभारत’ सुरु होताना महेंद्र कपूर यांच्या आवाजातील ‘महाभारत’चे टाइटल सॉंग व नंतर ‘मैं समय हूं’ हा आवाज हरीश भिमाणी यांचा होता. ‘मैं समय हूं’ हे इतके लोकप्रिय झाले होते मालिका सुरु होताना लहान मुले ही हे सुरात म्हणत असत.

व्यक्ती-परिचय

दलित चळवळीमधले ज्येष्ठ नेते नामदेव ढसाळ

Category:

 

मुंबईतल्या अत्यंत गरीब आणि बकाल भागात बालपण घालवल्याने त्यांनी दारिद्र्य आणि ससेहोलपट जवळून पाहिली आणि आपल्या विशिष्ट भाषेतून त्यांनी ते दलितांचं आयुष्य शब्दबद्ध केलं.

साहित्य - ललित

जसच्या तसं

Category:

 

आमच्या पिढीने हे सर्व थिएटरमधील भव्य पडद्यावर पाहिलंय. त्यामुळे आम्ही चित्रपट संपल्यानंतर बाहेर पडताना आमच्या डोक्यात हिरोच असायचा. त्याचं चालणं, बोलणं नकळत आमच्यामध्ये भिनलेलं असायचं. आता पडद्याचा जमाना गेला. आता चाळीस इंची टीव्हीवर तुम्ही जे पाहता त्याची नक्कल व अनुकरण केले जाते.

दिनविशेष

पुणे महानगरपालिकेचा वर्धापन दिन

Category:

 

परप्रांतीय व परदेशी विद्यार्थी असोत, रोजगार शोधणारे तरुण असोत व सुखाचा विसावा शोधणारे जागोजागचे पेन्शनर असोत, सर्वाना हि पुण्यनगरी आकर्षित करत आहे. तिचे रंगरूप झपाट्याने पालटत आहे; पण बदल कितीही झाले तरी ‘पुणे शहर अमोलिक, रचना अशी दुसरी नाही’, हे शाहीर राम जोशींचे उद्गार सदैव खरे ठरतील, यात शंका नाही!

कथा

काळोखी गुहेत (कथा २)

Category:

 

खेड्यातील एक तरुण आदिवासी बाई आपल्या ३ वर्षाच्या छकुलीला कडेवर घेऊन पाणी आणण्या साठी एका ओढ्याकडे चालत निघाली होती. प्रेमाने तिचे नाव ठेवले होते प्रीती झिंटा. हात पायाच्या कड्या, पुढे आलेले पोट. खोल गेलेले डोळे, डोक्यावर हातात पाण्याची भांडी, खाच खळग्याची जमीन तुडवत एका डबक्याकडे चालल्या होत्या, भांडी कपडे धुवायचे आणी तेच पाणी पिण्यासाठी घेऊन यायचे, रोज ५ किमी चालणे तर कायमचे पुजलेले, पाण्याचे कायमच दुर्भिक्ष, पिण्या करता वेगळे पाणी असू शकते हे माहीतच नाही, विजेचा दीवा कधी पाहिलेलाच नाही, जेवणात भाताची पेज, व सुकी चवळी शिजवलेली, बटाटा कधी पाहिलेलाच नाही.