व्यक्ती-परिचय

ज्येष्ठ क्रिकेटपटू सर व्हिवियन रिचर्ड्‌स

Category:

 

च्युइंगगम चघळत चघळत रिचर्ड्‌स नुसता मैदानात येताना दिसला की गोलंदाजांना धडकी भरायची. त्या च्युइंगगम चघळणार्या चेहेऱ्यावर एक कमालीचा थंडपणा असायचा. जंगलात सिंह जसा आजुबाजुला कोण आहे याची पर्वा न करता येतो तसा तो यायचा. तो त्या मैदानावरचा राजा असायचा. उगाचच नाही त्याला किंग म्हणायचे. त्याच्या चेहेऱ्यावर येताना कमालीचे तुच्छ भाव असायचे. तोंडातुन तो एक चकार शब्द नाही काढायचा

व्यक्ती-परिचय

जगातील पहिला अंतराळवीर युरी गागारीन

Category:

 

१२ एप्रिल १९६१ रोजी गागारिन अंतराळात जाणारा सर्वप्रथम माणूस ठरला. पृथ्वीच्या कक्षेबाहेर युरीने ८९ तास ३४ मिनिटे भ्रमण केले. पुन्हा प्रुथ्वी वर उतरताना सात हजार फुट उंची वरुन ते कँप्सुल च्या बाहेर येऊन पँराशुटच्या साह्याने पृथ्वी वर उतरले. या पराक्रमाबद्दल त्याला अनेक देशांचे पुरस्कार मिळाले.

साहित्य - ललित

बालरंगभूमी माझ्या नजरेतून- (भाग १-प्रस्तावना)

Category:

 

१९७९ साली पहीलं बालनाट्य लिहीलं तेंव्हापासून बालरंगभूमीशी माझं नात जुळलं. रंगदेवतेच्या कृपेने गेली ४१ वर्षे बालरंगभूमी वर कार्यरत राहून बाल मनोरंजनाचे कार्य करत आहे. बालरंगभूमीच्या सहवासात चार दशके राहील्यावर मला जे दिसलं, जाणवलं, ते माझ्या शब्दातुन मांडण्याचा प्रयत्न करत आहे.

व्यक्ती-परिचय

अमेरिकन ग्रॅंडमास्टर रॉबर्ट जेम्स बॉबी फिशर

Category:

 

फिशरचे खेळणे नेहमी आक्रमक असे. त्याने कधीही प्रतिर्स्पध्याने ऑफर केलेला ‘ड्रॉ’ स्वीकारला नाही. तो शेवटपर्यंत झुंजत राही. त्याने भाग घेतलेल्या सगळ्या टुर्नामेंटस मोठ्या फरकाने जिंकल्या. त्याच्याबद्दल कॅस्पोरोव्हने म्हटलं आहे की, ‘फिशर आणि त्याचे समकालीन यांच्यातील फरक वेगवेगळ्या बुद्धिबळ जगज्जेत्यांमधील फरकांपेक्षा मोठा होता.’

दिनविशेष

मनसेचा वर्धापनदिन

Category:

 

२००८ साली मराठीच्या मुद्द्यावर रान पेटवलं. ते नाणं खणखणीत निघालं. आणि २००९ च्या लोकसभा निवडणुकीत मनसे हरुनही जिंकणारी बाजीगर ठरली. लाखालाखाची मतं घेत मनसेनं शिवसेनेचे उमेदवार पाडले. मनसेचे तब्बल १३ आमदार निवडून आले. मुंबईत तर सहा जागा जिंकल्या. २०१० च्या कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीत मनसेचे २७ नगरसेवक निवडून आले.

लेखसंग्रह

रिडेव्हलपमेंट (पुनर्निर्मिती? पुनर्विकास?)

Category:

 

आपले दिवस सरले तेव्हा गाशा गुंडाळलेला बरा, असं त्या वाड्याला वाटत असेल कां ? भर डेक्कनवर, चव्हाट्यावर आपलं वय झाल्याचं वर्तमान प्रसिद्ध केल्याबद्दल संकोच, किंचित उद्वेग आणि बराचसा राग त्या वास्तूच्या मनात आला असेल कां ? किंवा ” मेकअप ” मुळे आपण अधिक तरुण, चित्ताकर्षक, लोभस दिसणार म्हणून आतून नवी हिरवाई जाणवत असणार कां ?

व्यक्ती-परिचय

पत्रकार अनंत दीक्षित

Category:

 

वृत्तवाहिन्यांवर राजकीय विश्लेषक म्हणून त्यांनी ठसा उमटविला होता. पुरोगामी विचारधारा मानणाऱ्या दीक्षित यांची सडेतोड राजकीय विश्लेषक म्हणून ख्याती होती. अचूक आणि निष्पक्ष मांडणी हे त्यांचं वैशिष्ट्ये होतं. महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ यांच्यासह अनेक पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आलं होतं.