साहित्य - ललित

कल चमन था

Category:

 

फटीआयआय मध्ये अभिनयाचं शिक्षण घेऊन, १९७६ साली ‘मृगया’ चित्रपटातून त्यानं रुपेरी कारकिर्दीला सुरुवात केली. सडपातळ, सावळ्या रंगाचा व घोगरा आवाज असलेला मिथुन पहिल्या चित्रपटालाच राष्ट्रीय पुरस्कार मिळाला व त्याची घोडदौड सुरू झाली. ‘सुरक्षा’ व ‘तराना’ मध्ये तो रंजितासोबत, बेलबाॅटममध्ये दिसला. या दोन्ही चित्रपटांमधील, सर्वच गाणी उत्तम होती. इथूनच त्याची ‘टिपिकल’ नाचण्याची स्टाईल, लोकप्रिय झाली.

  June 30, 2022


व्यक्ती-परिचय

नंदिनी बेडेकर

Category:

 

शेवटी संगीत हे मृगजळ आहे. म्हणूनच संगीताच्या या अथांग सागरात डुबकी मारून कोणकोणती रत्नं हाताला लागतील काहीच सांगू शकत नाही. मग काही वेळा या प्रवासात गटांगळ्या सुद्धा खाव्या लागतील मात्र डगमगून नं जाता एकेका स्वराचा आधार घेऊन ही नाव तरून न्यावीच लागते. तेव्हा आणि तेव्हाच हे मृगजळ पार करणं शक्य आहे हे नंदिनी बेडेकर यांच्या या सांगीतिक प्रवासातून दिसून येईल.

  June 30, 2022


व्यक्ती-परिचय

भारतीय राजकारणातील भीष्माचार्य दादाभाई नौरोजी

Category:

 

दादाभाई नौरोजी यांना भारताचे पितामह म्हणून ओळखतात. ते भारतीय राष्ट्रवादाचे प्रणेते होते. भारतीय अर्थशास्त्राचे जनक, जहाल व मवाळ यांच्यात सुवर्णमध्य साधणारे नेते, भारतीय स्वराज्याचे पहिले उद्गाते अशी त्यांची ओळख होती.

  June 30, 2022


व्यक्ती-परिचय

देवदत्त दाभोलकर

Category:

 

शिक्षणक्षेत्रात मुलगामी विचार मांडणारे दाभोलकर हे स्वातंत्र्योत्तर सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीतील बिनीचे शिलेदार म्हणून ओळखले जात असत.

  June 30, 2022


व्यक्ती-परिचय

जगविख्यात मुष्टियोद्धा माईक टायसन

Category:

 

टायसनने व्यावसायिक बॉक्सिंगचं जग आपलंसं केलं. पहिल्या १८ महिन्यांत त्याने २७ विजय मिळवले. २७ मधील २५ विजय नॉक आऊट होते . पुढे हेवीवेट अजिंक्यपदाच्या लढतीत टेव्हर बसिकला दोन फेऱ्यात लोळवलं आणि केवळ २० व्या वर्षी वर्ल्ड हेवीवेट चम्पिअनचा किताब मिळवून जगाच्या इतिहासात आपल्या कर्तृत्वाची मोहर उटविली.

  June 30, 2022


व्यक्ती-परिचय

केसरी टुर्स च्या संचालिका झेलम चौबळ

Category:

 

केसरीच्या संचालिका असलेल्या झेलम यांना फायनान्स, टिकिटिंग आणि ॲडमिनिस्ट्रेशन या विभागांमध्ये विशेष रुची आहे. मात्र, पर्यटनाच्या नवनवीन योजना आखण्यात त्यांचा हातखंडा आहे. नेहमीच्या ग्राहकांबरोबरच शेतकऱ्यांना पर्यटनाबरोबरच शेती आणि शेतीपूरक व्यवसायासंबंधी नवीन तंत्रज्ञानाची ओळख व्हावी म्हणून ॲग्रो टुरिझम, विद्यार्थ्यांसाठी ‘नासा’ टूर आणि कार्पोरेट क्षेत्रात विशेष लोकप्रिय असलेली माईस (MICE) अशा पूर्णपणे भिन्न आणि लोकप्रिय योजना आखण्याचे श्रेय ‘झेलम’ यांचेच.

  June 30, 2022


अवर्गिकृत

भारतमातेच्या वीरांगना – 9 : कनकलता बारुआ

Category:

 

२० सप्टेंबर १९४२ साली तेजपूर पासून ८२ किलोमीटर दूर गहपुर च्या पोलीस ठाण्यावर तिरंगा फडकविण्याचे निश्चित करण्यात आले. सकाळी आपली घरातल्या कामाची सगळी जबाबदारी पूर्ण करूनच कनकलता घराबाहेर पडल्या. त्या आत्मबलिदानी दलाची सदस्य होत्या ज्यात सगळेच तरुण/तरुणी होते. कनकलता त्यांचे नेतृत्व करत होत्या. ह्या आंदोलनाच्या नेत्यांच्या मनात शंका उत्पन्न झाली की कदाचित पुढे येणारे संकट पाहून हे तरुण पळून जातील, आपल्या नेत्यांच्या मनातल्या शंकेला कनकलताने तात्काळ ओळखले आणि जोरदार गरजली, ‘आम्हा तरुणींना अबला समजू नका, शरीर नश्वर आहे, आत्मा अमर आहे, करेंगे या मरेंगे’, स्वातंत्रता हमारा अधिकार है’

  June 30, 2022